Wednesday 28 December 2022

‘बांबू’तून वैष्णवी कल्याणकरचे मोठ्या पडद्यावर पदार्पण


‘बांबू’तून वैष्णवी कल्याणकरचे मोठ्या पडद्यावर पदार्पण 

विविध मालिकांमधून अवघ्या महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे वैष्णवी कल्याणकर. अल्पावधितच वैष्णवीने प्रेक्षकांना आपलेसे केले. आता वैष्णवी चित्रपटात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली असून विशाल सखाराम देवरूखकर दिग्दर्शित ‘बांबू’ या चित्रपटातून ती मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. नुकतीच तिची चित्रपटातील झलक सोशल मीडियावर झळकली आहे. सरळ, साधी, सालस असणारी ही 'झुळूक' तरुणांना भावणारी आहे. 

आपल्या चित्रपटातील पदार्पणाबद्दल वैष्णवी कल्याणकर म्हणते, '' मोठ्या पडद्यावर मी पहिल्यांदाच झळकणार आहे. त्यामुळे आनंदी, उत्साही, थोडीशी धाकधूक अशा विविध भावना सध्या मी अनुभवतेय. यात मी 'झुळूक'ची व्यक्तिरेखा साकारतेय, जी खूपच सोज्वळ, निरागस आहे. तरुणींना ही व्यक्तिरेखा आपल्या खूप जवळची वाटेल. जणू काही ही आपल्याच घरातली आहे, असे वाटेल. एका मालिकेदरम्यान मी 'बांबू'मधील 'झुळूक'साठी ऑडिशन दिले होते. माझी निवड झाली आणि प्रॉडक्शनकडून मला एकदा सकाळी सात वाजता पुण्याला बोलवले. आमची ही मीटिंग सुमारे पाच तास चालू होती. त्यानंतर मग पुढची प्रक्रिया सुरु झाली. आता लवकरच 'झुळूक' तुम्हाला भेटायला येणार आहे.'' 

क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन निर्मित या चित्रपटाचे निर्माते तेजस्विनी पंडित, संतोष खेर आहेत. तर या चित्रपटाचे लेखन अंबर हडप यांनी केले आहे. अभिनय बेर्डे, शिवाजी साटम, अतुल काळे, वैष्णवी कल्याणकर, पार्थ भालेराव, स्नेहल शिदम, समीर चौघुले यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'बांबू' येत्या २६ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Sah Polymers Limited’s Initial Public Offering to open on Friday, 30th December, 2022, sets price band at ₹61 to ₹65 per Equity Share


 




Sah Polymers Limited’s Initial Public Offering to open on Friday, 30th December, 2022, sets price band at ₹61 to ₹65 per Equity Share

 

·         Price Band of  ₹ 61 – ₹ 65 per equity share bearing face value of  ₹ 10 each (“Equity Shares”)

·         Anchor Investor BIDDING DATE- Thursday 29 ,December 2022*

·         Bid/Offer Opening Date – Friday, 30th December, 2022 and Bid/Offer Closing Date – Wednesday, 4th January, 2023.

·         Minimum Bid Lot is 230 Equity Shares and in multiples of 230 Equity Shares thereafter.

·         The Floor Price is 6.1 times the face value of the Equity Share and the Cap Price is 6.5 times the face value of the Equity Share.

*Company in consultation with the BRLM may consider participation by Anchor Investors in accordance with the SEBI ICDR Regulations. The Anchor Investor Bidding Date shall be one Working Day prior to the Bid/Issuer Opening Date.

 

Risks to Investors

 

The BRLM associated with the Offer have handled 08 public issues in the past three years, out of which 01 issue was closed below the offer price on the listing date respectively.

Name of BRLM

Total Issues

Issues closed below IPO Price on listing date

Pantomath Capital Advisors Private Limited

8

1

 

 

Mumbai, December 26, 2022:Sah Polymers Limited, primarily engaged in manufacturing and selling of Polypropylene (PP)/ High Density Polyethylene (HDPE) Flexible Intermediate Bulk Containers (FIBC) Bags, Woven Sacks, HDPE/PP woven fabrics, woven polymer based products has fixed the price band at ₹61to ₹65per Equity Share for its maiden public offer. The initial public offering (“IPO” or “Offer”) of the Company will open on Friday, 30th December, 2022, for subscription and closes on Wednesday, 4th January, 2023. Investors can bid for a minimum of 230 Equity Shares and in multiples of 230 Equity Shares thereafter.

 

The public issue with a face value of Rs 10 per equity share consists of a fresh issue of equity shares ofupto102,00,000 equity shares, with no offer for sale component.

 

Sah Polymers is led by Asad Daud and professionally backed by Hakim Sadiq Ali Tidiwalaand Murtaza Ali Motiwith a combined expertise of approximately 20 years in the FIBC packaging sector. The Company provides tailored bulk packaging solutions to business-to-business ("B2B") producers in a variety of industries, including agro pesticides, basic drugs, cement, chemicals, fertilisers, food products, textiles, ceramics, and steel.

The Company exports its products to 14 countries including USA, UK, Australia, UAE, Africa, France and Poland. Majority of the sales of the Company comes from exports. For the 3 months ended June 30, 2022 and for Fiscals 2022, the Company’s revenue from exports contributed 57.61% and 55.14%, respectively, of total revenues from operations.

Return on net-worth is 16.42% and PAT margin for the year ended 2022 stood at 5.39%. The Company’s sales have grown from Rs. 49.90 crores in FY  2020 to Rs. 81.23 crores in FY 22. The sales for the quarter ended June 2022 stood at Rs.27.59 crores. Thus the sales CAGR for last three completed years is 27.6%. Similarly, the post-tax profits, i.e., PAT of the Company has increased with CAGR of 284% over last three years.

The Company operates at 85% to 92% of the installed capacity and therefore going for further capex. Total capex is Rs. 33.81 crores, out of which the Company has taken bridge loan of Rs. 15.71 crores from the holding company and deployed while the IPO approvals came so that the overall timeframe of the installation is not delayed. The new Project is estimated to commence commercial operations within this year 2022-23 itself. Out of the current manufacturing facility (located at Mewar Industrial Area, Madri, Udaipur, Rajasthan) the Company manufactures a diverse range of HDPE/PP Woven Sacks and FIBC products with filling capacity of upto 500 KGs per bag/sack. The Company intends to manufacture new variant of FIBC products with filling capacities of upto 2,500 KGs out of the new Unit. The installed capacity of the new Unit is of 3,960 MT per annum, which is equivalent to current capacity therefore the company’s capacity will double upon commissioning of new plant.

Kanpur Plastipack Ltd., Rishi Techtex Ltd., Gopala Polyplast Ltd., Jumbo Bag Ltd., SMVD Polypack Ltd., EMMBI Industries Ltd., and Commercial Syn. Bags Ltd. are competitors; however, the peers are not directly comparable due to the type, range of products/services, turnover, and size of the firm. As disclosed in the offer is given below:

(Rs.in lakhs) (As on March 31, 2022)

 

Key Performance Indicators

Sah Polymers Limited#

Peer-Group

 

Rishi Techtex Limited

Jumbo Bag Limited

SMVD Poly Pack Limited

EMMBI Industries Limited

Commercial Synbag Limited

Revenue from Operations

8,051.14

10,085.75

13,056.50

8,624.13

43,562.20

32,158.0

EBITDA(3)

773.40

634.89

983.92

306.55

4920.8

3487.65

EBITDA Margin(4)

9.61%

6.29

7.50

8.11

11.29

10.85%

Profit After Tax for the Year / Period

437.54

131.85

106.09

104.63

1,903.30

1,818.28

PAT Margin(5)

5.43%

1.30%

0.81%

1.21

4.37

5.65

ROE(6)

16.42%

17.83%

3.35%

4.65

12.41

0.20%

ROCE(7)

0.14

10.55

14

9.07

8.19

0.15

Debt / Equity(8)

1.15

0.98

2.61

1.40

0.94

0.69

Market capitalisationrs. In lakhs.

-

2066

1851

1520

16372

43701

 

The total equity issued before IPO is 15.59 crores and along with reserves the net-worth is Rs 27.74 crores as at the end of the 30th June 2022. Post IPO, the Company’s net-worth shall stand at Rs 92.95 crores. The Book value post IPO would be 36 plus the profit surplus for the period.

The Issue is being made in terms of Rule 19(2)(b) of the SCRR through the Book Building Process in accordance with Regulation 6(2) of the SEBI ICDR Regulations wherein not less than 75% of the Issue shall be Allotted to QIBs on a proportionate basis, provided that the Company in consultation with the BRLM, may allocate up to 60% of the QIB Category to Anchor Investors, on a discretionary basis in accordance with the SEBI ICDR Regulations, of which one-third shall be reserved for domestic Mutual Funds, subject to valid Bids being received from them at or above the price at which allocation is made to Anchor Investors. In case of under-subscription or non-allocation in the Anchor Investor Portion, the remaining Equity Shares will be added back to the QIB Category (other than Anchor Investor Portion). 5% of the QIB Category shall be available for allocation on a proportionate basis to Mutual Funds only, and the remainder of the QIB Category shall be available for allocation on a proportionate basis to all QIBs (other than Anchor Investors), including Mutual Funds, subject to valid Bids being received at or above the Issue Price. If at least 75% of the Issue cannot be Allotted to QIBs, the Bid Amounts received by the Company shall be refunded. Further, not more than 15% of the Issue shall be available for allocation on a proportionate basis to Non-Institutional Bidders and not more than 10% of the Issue shall be available for allocation to Retail Individual Bidders in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received at or above the Issue Price. Further, the allocation to each Non-Institutional Investor shall not be less than Rs. 200,000, subject to availability of Equity Shares in the Non-Institutional Portion, and the remaining Equity Shares, if any, shall be allocated on a proportionate basis, subject to valid Bids being received at or above the Issue Price, in accordance with the SEBI ICDR Regulations. Further, (a) one third of the portion available to Non-Institutional Investors shall be reserved for applicants with application size of more than Rs. 200,000 and up to Rs. 1,000,000; and (b) two third of the portion available to Non-Institutional Investors shall be reserved for applicants with application size of more than Rs. 1,000,000 , provided that the unsubscribed portion in either of the sub-categories specified in clauses (a) or (b), may be allocated to applicants in the other sub-category of Non-Institutional Investors. Under-subscription, if any, in any category, except the QIB Category, would be allowed to be met with spill-over from any other category or categories, as applicable, at the discretion of the Company in consultation with the BRLM and the Designated Stock Exchange, subject to applicable laws.

The Issue comprises of only fresh issue of up to 1,02,00,000 Equity Shares for cash at upper price band of Rs. 65/- per Equity Share (including a premium of Rs. 55/- per Equity Share, aggregating up to Rs. 66 crores. The Issue shall constitute 39% of the post-Issue paid-up Equity share capital of the Company. Notably, the issue involves all fresh issue without any offer for sale component. Out of the issue proceeds, Rs. 8.18 crores shall be utilized for capex for setting up of new manufacturing unit; Rs. 19.66 shall be towards repayment of debt, Rs. 14.95 crores for working capital and balance for general corporate purposes.  The debt repayment is towards the bridge loan from the holding company which was deployed in the capex.

The Group has made several acquisitions from time to time. The Company carefully evaluate and pursue accretive acquisitions. Given the breadth of its product offering, and the scale of manufacturing and customer network, the Company is positioned to grow inorganically within its industry. The Company has gained competitive advantage due to its recent acquisition of FibcorpPolyweave Private Limited on January 5, 2022, which will leverage to generate incremental synergies. The Company intends to apply a selective and disciplined acquisition strategy that focuses on enhancing scale, product diversity and geographic reach, while bolstering financial performance through synergies and additional cash generation.

Pantomath Capital Advisors Private Limited is the sole book running lead manager to the issue and Link Intime India Private Limited is the registrar to the offer.The equity shares are proposed to be listed on the Main Board of NSE and BSE.

Tuesday 27 December 2022

नवीन वर्षात प्लॅनेट मराठीकडून मिळणार मनोरंजनाचे धमाकेदार सरप्राईज २०२३ मध्ये मिळणार प्लॅनेट मराठीवर रिॲलिटी शोची मेजवानी



 नवीन वर्षात प्लॅनेट मराठीकडून मिळणार मनोरंजनाचे धमाकेदार सरप्राईज

२०२३ मध्ये मिळणार प्लॅनेट मराठीवर रिॲलिटी शोची मेजवानी

   

    प्लॅनेट मराठी नेहमीच आपल्या प्रेक्षकांसाठी सर्वोत्तम कलाकृती, नवनवीन विषयांवरील चित्रपट, वेबसीरिज, लघुपट, बहारदार गाणी यांसारखी मनोरंजनाची मेजवानी आणत असते. अल्पावधीतच प्लॅनेट मराठीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. या एका वर्षात प्लॅनेट मराठीने खूप मोठा पल्ला पार केला. २०२२ मध्ये प्लॅनेट मराठीने अनेक रेकॉर्डब्रेक चित्रपट, वेबसीरिज, गाणी, लघुपट प्रेक्षकांच्या भेटीस आणले. 

६८व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात ‘गोष्ट एका पैठणीची’ 'सर्वोत्कृष्ट चित्रपटा'चा मानकरी ठरला तर ‘सुमी’ने सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट' म्हणून पुरस्कार मिळवला. तसेच यावर्षी सुपरहिट ठरलेले ‘चंद्रमुखी’, ‘तमाशा लाईव्ह’, ‘सहेला रे’ सारखे दर्जेदार चित्रपट असो किंवा ‘अनुराधा’, ‘मी पुन्हा येईन’, ‘रानबाजार’, ‘अथांग’ यांसारख्या सर्वात जास्त पाहिल्या गेलेल्या वेबसीरिज असो. हे सर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. प्रेक्षकांनी या चित्रपटांना आणि वेबसीरिजना खूप प्रेम दिले. २०२२ प्रमाणेच प्लॅनेट मराठी आता २०२३ मध्येही प्रेक्षकांसाठी अनेक वेब शो, चित्रपट, लघुपट आणि काही खास सरप्राईज घेऊन येण्यास सज्ज झाले आहे. नवीन वर्षातही प्लॅनेट मराठी मनोरंजनाचा धमाका घेऊन येणार आहे. 


प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, " २०२२ हे वर्ष आमच्यासाठी खूप छान गेले. यावर्षी अनेक पुरस्कार, अनेक उद्दिष्टये साध्य करता आली. चांगला आशय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. खरंतर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद हाच आमच्यासाठी मौल्यवान आहे. २०२३ मध्ये अनेक चित्रपट, वेबसीरिज आम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहोत. सोबतच यावेळी रिॲलिटी शोवर जास्त भर देण्याचा प्रयत्न असेल. यामुळे नवोदितांच्या कलागुणांना वाव मिळेल. २०२२ मध्ये अनेक गोष्टी साध्य केल्या, आता आम्ही पुन्हा नवीन वर्षी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालो आहोत आणि २०२३ त्याहूनही धमाका असणार आहे. "

तवाफ्राय प्रेमाची रवाफ्राय लव्हस्टोरी - ‘पुनीत बालन स्टुडिओज्’ची नवीकोरी निर्मिती

 फेब्रुवारीत मिळणार प्रेमाची भेट, ‘जग्गू आणि जुलिएट’!




- तवाफ्राय प्रेमाची रवाफ्राय लव्हस्टोरी

- ‘पुनीत बालन स्टुडिओज्’ची नवीकोरी निर्मिती

‘पुनीत बालन स्टुडिओज्’ची नवीकोरी निर्मिती, अजय-अतुल यांचं अफलातून म्युझिक, महेश लिमयेंचा जादूई कॅमेरा आणि दिग्दर्शन तर अमेय वाघ-वैदेही परशुरामी यांची सुपरक्यूट जोडी असं भन्नाट कॉम्बिनेशन असलेला 'जग्गू आणि जुलिएट' हा चित्रपट नवीन वर्षात १० फेब्रुवारीला आपल्या भेटीस येतोय.

पुनीत बालन निर्मित ‘जग्गू आणि जुलिएट’ या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटात नक्की कोणती जोडी असेल, याचा अंदाज प्रेक्षक बांधत होते, मात्र प्रेक्षकांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. अमेय वाघ आणि वैदेही परशुरामी यांची भन्नाट जोडी या चित्रपटात दिसत आहे. तसेच मोशन पोस्टरचे अजय-अतुल यांचे म्युझिक ऐकून तरुणाई आणि तमाम रसिक प्रेक्षक त्यावर थिरकतील.

अमेय आणि वैदेही जावा बाईकवर बसलेत, वैदेही बेधडकपणे गाडी चालवत आहे आणि अमेय मागे गाडीवर उभा आहे. अंगात रंगीबेरंगी जॅकेट, गळ्यात सोन्याची साखळी आहे ज्यावर ‘Rich’ असं लिहिलंय. तर वैदेही तिच्या लेदर जॅकेट, गॉगल आणि बिनधास्त स्माईलने सगळ्यांना घायाळ करत आहे. या जोडीचे फॅन आता पुन्हा एकदा हे दोघं काय धमाल करतात हे बघण्यासाठी सज्ज आहे. चित्रपटाचं कलरफुल मोशन पोस्टर, अमेय वाघचा नेहमीपेक्षा वेगळा असा अतरंगी लूक बघून चित्रपटात आणखी कोणकोणते कलाकार असतील हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

‘पुनीत बालन स्टुडिओज्’ने यापूर्वी निर्मिती केलेला सामाजिक विषयावरील ‘मुळशी पॅटर्न’च्या सुपरहिट यशानंतर आता ‘जग्गू आणि जुलिएट’च्या रूपात नवीकोरी रोमँटिक लव्हस्टोरी प्रदर्शित होत आहे. पुनीत बालन स्टुडिओज् निर्मित, अजय-अतुल म्युझिकल आणि महेश लिमये यांच्या दिग्दर्शनाची आणि कॅमेऱ्याची जादू दाखवणारा ‘जग्गू आणि जुलिएट’ १० फेब्रुवारी रोजी आपल्या भेटीस येत आहे.

Friday 23 December 2022

नशेचा खेळ काही दिवसांचा… एक झटका आणि... 'भय : द अनटोल्ड व्हिलन ऑफ लाईफ' लघुपट प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित

 


नशेचा खेळ काही दिवसांचा… एक झटका आणि... 

 'भय : द अनटोल्ड व्हिलन ऑफ लाईफ' लघुपट प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित      


    प्लॅनेट मराठी ओटीटी नेहमीच प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा नजराणा आणत असते. दर्जेदार चित्रपट, वेबसीरिज, सांगितिक मैफल असे मनोरंजनाचे विविध पर्याय प्रेक्षकांना उपलब्ध आहेत. इथे प्रेक्षकांना सर्वोत्कृष्ट विषयांचे लघुपटही पाहायला मिळतात. प्लॅनेट मराठी ओटीटीने उत्तम दर्जाचे आणि अनेक पुरस्कार प्राप्त केलेले लघुपट प्रेक्षकांसाठी प्रदर्शित केले आहेत आणि प्रेक्षकांनी या लघुपटांचा आनंद लुटला आहे. आता असाच 'भय : द अनटोल्ड व्हिलन ऑफ लाईफ' नावाचा रहस्यमय आणि सामाजिक संदेश देणारा लघुपट प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.  नशेच्या आहारी गेलेल्या व्यक्तिचे आयुष्य अखेर कोणत्या वळणावर जाते, यावर भाष्य करणारा हा लघुपट आहे. आता नशेत गुरफटलेला हा तरूण कसा बाहेर येतो, हे आपल्याला लघुपट पाहिल्यावरच समजेल. 


प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, "सर्व प्रकारचा कन्टेन्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो. लघुपट हा त्याचाच एक भाग आहे. उत्तमोत्तम लघुकथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांना योग्य व्यासपीठ मिळावे, हाच आमचा मुख्य उद्देश आहे. सामाजिक संदेश देणारा लघुपट 'भय : द अनटोल्ड व्हिलन ऑफ लाईफ' हा लघुपट आम्ही प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे. एखाद्या वाईट गोष्टीतून बाहेर पडायला एखादा झटकाही पुरेसा असतो. लघुपटाचा विषय जरी सर्वसामान्य असला तरी कथेची मांडणी, सादरीकरण प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.’’


पॅराबिग फिल्म्स प्रस्तुत, नीरज जोशी दिग्दर्शित या लघुपटाची कथा, पटकथा आणि सवांद ओमकार वेताळ यांचे आहेत.

Tuesday 20 December 2022

Randeep Hooda & Rahul Mittra celebrate 70th Anniversary of Diplomatic Relations between Japan and India

 


Randeep Hooda & Rahul Mittra celebrate 70th Anniversary of Diplomatic Relations between Japan and India    

 

                                             
Bollywood star & equestrian Randeep Hooda and renowned filmmaker & branding specialist Rahul Mittra graced the 70th Anniversary of the Establishment of the Diplomatic Relations between Japan and India at an exclusive function at the Army Polo & Riding Club in New Delhi on Sunday with lots of VIPs in attendance. The highlight of the event was Randeep Hooda riding a horse on the occasion.



Lt. Gen Rajinder Dewan, Quarter Master General of the Indian Army presided over the celebrations along with Japanese Ambassador to India Suzuki Hiroshi who charmed the special invitees by delivering his welcome address in Hindi. This high level event saw stunning Yunasame performances by Japanese horsemen and breathtaking tent pegging by Indian army personnel. Randeep Hooda cantering across the sun-kissed ground on a white horse was the highlight of the event, followed by lively performances by Indian dancers.

                                                 
Expressing his gratitude to be part of the anniversary celebrations, Randeep Hooda said, “Delighted to be part of the historic 70th anniversary of establishment of India-Japan diplomatic relations along with Lt. Gen, Rajinder Dewan, Quarter Master General of the Indian Army, Japanese Ambassador to India Suzuki Hiroshi, Rahul Mittra & other dignitaries today in Delhi”.

He also stressed on the commonalities between both the countries like ancient culture and traditions, resilience being one of the most striking. “How India resurrected itself from the aftermath of the painful partition right after attaining independence is similar to how Japan sprung back after the horrific incidents towards the end of world war 2. But now decades later both our countries are leaving their footprints on the world map & fostering such cordial ties which will surely pave way for an even more enhanced relations between the two great countries,” said Randeep Hooda in his opening address.  

Award-winning filmmaker-actor Rahul Mittra spoke about cinema as the most interactive art form and being one of the most effective & powerful mediums of enhancing diplomatic ties and fostering cultural diplomacy.

Actor Randeep Hooda recently has been receiving a phenomenal response for his Netflix original series CAT. It has been loved by the audience globally and fans are pouring great love and response to the series.

Monday 19 December 2022

झारखंड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये 'धोंडी-चंप्या - एक प्रेमकथा'ला पुरस्कार निर्माता सुनील जैन यांना 'बेस्ट रिजनल फिल्म मेकर' पुरस्काराने सन्मानित

 



झारखंड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये 'धोंडी-चंप्या - एक प्रेमकथा'ला पुरस्कार 

निर्माता सुनील जैन यांना 'बेस्ट रिजनल फिल्म मेकर' पुरस्काराने सन्मानित 

रांची येथे झालेल्या पाचव्या झारखंड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये 'धोंडी-चंप्या - एक प्रेमकथा'चे निर्माता सुनील जैन यांना 'बेस्ट रिजनल फिल्म मेकर' या या पुरस्काराने गौरवण्यात आले. धोंडी आणि चंप्याची अनोखी प्रेमकहाणी असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन ज्ञानेश भालेकर यांचे असून या चित्रपटात भरत जाधव, वैभव मांगले, निखिल चव्हाण, सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर प्रभाकर भोगले यांच्या कथेला प्रेरित होऊन निर्मिती केलेल्या या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद ज्ञानेश भालेकर आणि सागर केसरकर यांचे आहेत. 



पुरस्कार मिळाल्याबद्द्ल  निर्माता सुनील जैन म्हणतात, '' हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून चित्रपटाच्या संपूर्ण टीमचा आहे. पडद्यावर दिसणाऱ्या आणि पडद्यामागे असणाऱ्या प्रत्येकाची ही मेहनत आहे. त्यामुळेच या पुरस्काराचे मानकरी होता आले. त्यामुळे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. हा एक कौटुंबिक विनोदी चित्रपट आहे. गावातील दोन मोठे प्रस्थ ज्यांच्यात वैमनस्य आहे आणि त्यांचेच पाळीव प्राणी जेव्हा एकमेकांच्या प्रेमात पडतात, हे प्रेम जुळवून आणताना या शत्रूंची मुलेही एकमेकांच्या प्रेमात पडतात, तेव्हा काय धमाल होते, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. ही संकल्पना मला विशेष आवडली. मला आनंद आहे, की आमच्या कामाचे चीज झाले. 

रिलायन्स एंटरटेनमेंट प्रस्तुत सुनील जैन आणि कल्ट डिजिटल यांच्या सहकार्याने, फिफ्थ डायमेन्शन आणि कल्ट डिजिटल निर्मित या चित्रपटाचे सुनील जैन, आदित्य जोशी, व्हेनिसा रॉय, आदित्य शास्त्री हे निर्माते असून अमित अवस्थी, सुशांत वेंगुर्लेकर हे  सहनिर्माते आहेत. 'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा' महाराष्ट्रात  सर्वत्र प्रदर्शित झाला आहे

'साथ सोबत' चित्रपटाचा उत्कंठावर्धक टिझर प्रदर्शित

 


'साथ सोबत' चित्रपटाचा उत्कंठावर्धक टिझर प्रदर्शित

'साथ सोबत' या आगामी मराठी चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलेल्या 'साथ सोबत'च्या टिझरला नेटकऱ्यांकडून अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक रमेश मोरे यांनी 'साथ सोबत' या चित्रपटात काहीसं वेगळं कथानक सादर केल्याची जाणीव टिझर पाहिल्यावर होते. हा नवा कोरा चित्रपट १३ जानेवारी २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


प्रसन्न वैद्य यांची प्रस्तुती असलेल्या 'साथ सोबत' या चित्रपटाची निर्मिती धनजी मारू यांनी मारू एन्टरप्रायझेस या बॅनरखाली केली आहे. दिग्दर्शनासोबतच या चित्रपटाचं लेखनही रमेश मोरे यांनीच केलं आहे. पिकल एंटरटेन्मेंटचे समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी हे वितरणाच्या माध्यमातून हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवणार आहेत. 'साथ सोबत'च्या टिझरची आपली काही वैशिष्ट्ये आहेत. नायकाच्या मुखातील केवळ एक संवाद उत्सुकता वाढवणारा आहे. 'साथ सोबत'च्या रूपात तांत्रिकदृष्ट्या सक्षम चित्रपट पहायला मिळणार असल्याची चाहूल टिझर पाहिल्यावर लागते. यातील नयनरम्य निसर्ग मन मोहून टाकणारा आहे. सुरेख कॅमेरावर्क, नयनरम्य लोकेशन्स आणि मातब्बर कलाकारांचा सहजसुंदर अभिनय या चित्रपटाचा सर्वात मोठा प्लस पॅाइंट ठरणार असल्याचं टिझरवरूनच जाणवतं. या चित्रपटात गावाकडची प्रेमकथा पहायला मिळणार आहे. भपकेबाजपणापासून दूर असलेली साधी भोळी लव्हस्टोरी हेच या चित्रपटाचं खरं सौंदर्यस्थळ ठरणार आहे. प्रेमकथेसोबतच एक महत्त्वपूर्ण संदेशही चित्रपटात दडलेला आहे. मालिका, चित्रपट, नाटक या तिन्ही माध्यमांमध्ये आपला ठसा उमटवण्यात यशस्वी झालेला संग्राम समेळ मुख्य भूमिकेत आहे. त्याच्या जोडीला नवोदित अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आहे. त्यामुळे नव्या जोडीची अनोखी केमिस्ट्री 'साथ सोबत'मध्ये रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या गेलेल्या चित्रपटांचं दिग्दर्शन करणाऱ्या रमेश मोरेंच्या कल्पक दिग्दर्शनाचा स्पर्श या चित्रपटाला लाभला आहे.

Friday 16 December 2022

अर्चना नेवरेकर फाउंडेशनच्या तपश्चर्येतून या वर्षी “कलादर्पण” पुरस्कार...



र्चना नेवरेकर फाउंडेशनच्या तपश्चर्येतून या वर्षी “कलादर्पण” पुरस्कार...

 सुषमा शिरोमणी यांना  जीवनगौरव तर पत्रकारितेसाठी रविंद्र पाथरे यांना  कलागौरव पुरस्कार जाहीर


तपश्चर्या बारा वर्षांची असते असे आपण मानतो. त्यात अनेक अडथळे आणि आपत्ती येत असतात आणि तरीही ती जिवाच्या आकांताने पूर्ण करायची असते. अर्चना नेवरेकर फाउंडेशन या संस्थेने गेली अकरा वर्षे प्रामाणिकपणे कलेचा आणि कलाकारांचा सन्मान करण्याचे आपले ध्येय साध्य केले आणि आता बाराव्या वर्षी त्यांनी आपले वार्षिक पुरस्कार “कलादर्पण” या नावाने प्रदान करायचे ठरवले असेल तर ही तपश्चर्या सुफळ संपूर्ण झाली असेच म्हणावे लागेल.

कलेचा सन्मान आणि कलाकारांचा आदर आजवर अखंड करीत असताना आपल्या सर्वांना करोनाच्या महामारीने त्रस्त केले होते आणि त्यामुळे आपण ‘संस्कृती कलादर्पण पुरस्कार’ प्रदान करू शकलो नव्हतो. परंतु येत्या २७ डिसेंबर रोजी मुंबईच्या सन अँड सँड येथे आपले आवडते पुरस्कार एका नव्या जोमाने सुरु करणार आहोत. २०२० आणि २०२१ या वर्षांमध्ये यात सहभागी झालेल्या नाटक, चित्रपट, मालिका आणि वृत्त वाहिन्या यांची नामांकने जाहीर करतोय. 

संस्थेच्या संचालक मंडळावर स्मिता जयकर, सुप्रिया पाठारे, प्रदीप कबरे, सविता मालपेकर, मानसी इंगळे, प्रमोद पवार, मिलिंद गवळी, मिलिंद इंगळे, अलका कुबल, तृप्ती अक्कलवार जाधव, रोहिणी निनावे, शीतल कर्देकर आणि रमेश साळगावकर आहेत.

या वर्षीचा “कला गौरव” हा सन्मान पुरस्कार श्रीमती सुषमा शिरोमणी यांना प्रदान करण्याचे जाहीर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.

नाटकांच्या परीक्षक समितीत रोहिणी निनावे, स्मिता जयकर, प्रमोद पवार, रमेश साळगावकर  आणि शीतल करदेकर होत्या तर चित्रपटांसाठी समृद्धी पोरे, अभिजित पानसे आणि मिलिंद इंगळे तसेच  मालिकांसाठी स्मिता जयकर, मानसी इंगळे आणि कल्पना सावंत-नवले यांचा समावेश होता.

यासाठीच्या पत्रकार परिषदेत बोलताना अर्चना नेवरेकर म्हणाल्या, “निर्मितीची क्षमता, जाग आणि जाण असलेले आपण कलाकार आहोत आणि हे आपले पुरस्कार आहेत. स्मिता जयकर अगदी सुरुवातीपासून माझ्या पाठीशी भक्कम उभ्या असल्यामुळेच ही तपश्चर्या आम्ही पूर्ण करू शकलो. आणखी बराच मोठा पल्ला गाठायचा आहे आणि त्यासाठी तुमची साथ आणि आशीर्वाद यांची आवश्यकता आहेच.”

एकमेकांच्या साथीने संजीवनी-निशांतची बांधली जातेय लग्नबंधाची गाठ.



 एकमेकांच्या साथीने संजीवनी-निशांतची बांधली जातेय लग्नबंधाची गाठ.


 "शाब्बास सुनबाई - विवाह सोहळा विशेष" १९ डिसेंबर, सोमवारी संध्याकाळी ७ वाजता फक्त आपल्या सन मराठीवर.

लग्नानंतर स्वतःच्या संसारात अडकून पडल्यावर आपली स्वप्नं, स्वप्नंच  राहून जातात. लग्नानंतर बऱ्याचजणी चूल आणि मूल ह्यातच अडकून राहतात. पण अशातही मार्ग काढून आपली स्वप्नं  पूर्ण करणाऱ्या प्रत्येकीची गोष्ट म्हणजे 'शाब्बास सुनबाई'. आपली स्वप्नं  न विसरता त्या स्वप्नांसाठी झटणाऱ्या  आणि  समोर येईल त्या आव्हानांना सामोरे जाणाऱ्या अशा सगळ्यांसाठीची आपल्या लाडक्या सन मराठी ह्या वाहिनीवर नुकतीच सुरु झालेली 'शाब्बास सुनबाई' ही  मालिका तुम्हाला नक्कीच आवडेल.

जगाच्या स्पर्धेत नेहमी पहिलं येण्यासाठी वडिलांनी घडवलेल्या संजीवनीला तिच्या स्वप्नांसाठी खऱ्या अर्थाने संघर्ष करावा लागणार आहे तिच्या लग्नानंतर. ध्यानीमनी नसताना नाशिकच्या प्रतिष्ठित येवलेकर कुटुंबात लग्न झालेल्या संजीवनीसाठी सगळी चक्र लग्नानंतर फिरली. तिच्या या संघर्षाच्या लग्नाच्या निमित्ताने संजीवनीच्या भेटीला येत आहे एक खास पाहुणी आणि ती पाहुणी म्हणजे ' मृण्मयी देशपांडे'. संजीवनीची गोष्ट आता संघर्षच्या वाटेवर असून मालिकेत तिच्या लग्नाची तयारी जय्यत झालेली आहे. या लग्नसोहळ्यात महाराष्ट्राची लाडकी नायिका मृण्मयी देशपांडे हजेरी लावत असून ती या लग्न सोहळ्यात नाचणार सुद्धा आहे. 'शाब्बास सुनबाई' आता रंजक वळणावर आली असून लग्नानंतर संजीवनीचा नेमका कशाशी आणि कोणाशी संघर्ष करावा लागणार आहे? 'शाब्बास सुनबाई' म्हणणाऱ्या अप्पा येवलेकरांचा संजीवनीला सून करण्यामागे नेमका काय हेतू आहे? अप्पासाहेब खरोखरच महिला सबलीकरणाचे खंदे पुरस्कर्ते आहेत की त्यांच्या रूपात संजीवनीच्या आयुष्यात एका खलनायकाचा प्रवेश होऊ लागलाय ? थोडक्यात, संजीवनीच्या स्वप्नांसाठी तिचं लग्न विघ्न ठरणार की प्रवाहा विरुद्ध पोहून आपली स्वप्नं साकारण्यात संजीवनी यशस्वी होणार? पाहायला विसरू नका, "शाब्बास सुनबाई - विवाह सोहळा विशेष" १९ डिसेंबर, सोमवारी संध्याकाळी ७ वाजता फक्त आपल्या सन मराठीवर.संजीवनीच्या भूमिकेत रश्मी अनपट तर अप्पांच्या भूमिकेत मयूर खांडगे एकमेकांसमोर उभे राहणार आहेत. ह्या मालिकेचे लेखन शार्दुल सराफ व पूर्णानंद वांढेकर यांनी केलं आहे, तर दिनेश घोगळे यांनी या मालिकेचं दिग्दर्शन करत आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री व निर्माती "सुचित्रा आदेश बांदेकर" यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे.

ह्यासोबतच सन मराठी ह्या वाहिनीवर प्रेक्षकांना नात्यांनी सजलेल्या वेगवेगळ्या मालिका संध्याकाळी ७ ते रात्री १०. ३० ह्या वेळेत पाहायला मिळतील. सन मराठीवर संध्याकाळी ७.३० वाजता 'जाऊ नको दूर… बाबा!', रात्री ८ वाजता 'माझी माणसं',  ८.३० वाजता 'कन्यादान', रात्री ९ वाजता 'संत गजानन शेगावीचे', ९. ३० वाजता 'नंदिनी' तसेच रात्री १० वाजता 'सुंदरी' ह्या मालिका दाखविल्या जातात.

सन मराठी ही फ्री वाहिनी सर्व प्रमुख डिटीएच प्लॅटफॉर्म्स आणि केबल नेटवर्क्सवर मोफत उपलब्ध आहे. तसेच ही वाहिनी डीडी फ्री डिश वर देखील चॅनेल नंबर ६ वर उपलब्ध आहे.

Thursday 15 December 2022

Producer Kashish Khan film ‘Rivaj’ highlights patriarchy in her film



Producer Kashish Khan film ‘Rivaj’ highlights patriarchy in her film



Kashish who is constantly involved in developing new revolutionary experimental thoughts and unique ideas to present Indian films in International frame defines “Rivaj” as a story of every woman. The film documents the movement in favour of women and empowering them , it portrays women’s struggles to break free of patronising voices within the community as well as resist external forces against appropriating their movement to suit their own political agenda. It also gives a message that women can achieve something if they want to. 



Producer of the film Kashish  Khan says "Honestly when I was introduced to the concept of the film , I was deeply intrigued and disturbed. Being a Women I wanted to highlight the ethos and pathos of women in general further adding "It was that time when I decided that this subject needs urgent attention. As women and as a person who has the power of media, I take it as a responsibility to bring a change in the society through the medium of films. Rivaj is a film very close to my heart, it sheds light on the subject which is taboo . I can only hope that this film  brings a much needed change"


As a young producer who is full of ideas, Kashish aims to venture into unexplored realms of film making by experimenting with new themes and subjects. She envisions delving in to revolutionary and untrammelled areas and thus be able to discover her inner self using the limitless possibilities and scope of cinema. 


Kashish reveals that the film has been ahir up north and is heading upwards completion