Tuesday 28 June 2022

श्री छत्रपती उदयनराजे भोसले यांनाही 'भिरकीट'ची भुरळ प्रेक्षकांना चित्रपट पाहाण्याचे आवाहन

 


श्री छत्रपती उदयनराजे भोसले यांनाही 'भिरकीट'ची भुरळ 

प्रेक्षकांना चित्रपट पाहाण्याचे आवाहन

 


हसताहसता मनाला स्पर्शून जाणारा चित्रपट म्हणजे 'भिरकीट'. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात सिनेसृष्टीतील सगळे विनोदवीर आहेत. त्यामुळे हा एक धमाल चित्रपट बनला आहे. मनोरंजनासोबतच एक खूपच महत्वाचा संदेश देणाऱ्या अनुप जगदाळे दिग्दर्शित 'भिरकीट'ला समीक्षकांसह प्रेक्षकांनीही पसंती दर्शवली असून आता यात आणखी एक मोठे नाव सामील झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज श्री छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपल्या काही निकटवर्तीयांसह 'भिरकीट' हा चित्रपट नुकताच साताऱ्यात पाहिला आणि हा चित्रपट पाहण्यासाठी  छत्रपती उदयनराजे भोसले भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ट महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पंकज चव्हाण तसेच सुनील काटकर, नितीन चौघुले व दिग्दर्शक अनुप जगदाळे इतर निकटवर्तीय  उपस्थित होते. व उदयनराजे यांनी या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. केवळ कौतुक नाही तर प्रत्येक प्रेक्षकाने हा चित्रपट पाहावा आणि याकरता साताऱ्यातील चित्रपटगृहात या चित्रपटाचे खेळ काही दिवस अजून ठेवावेत, असे आवाहनही यावेळी केले आहे. 


चित्रपटाबद्दल श्री छत्रपती उदयनराजे भोसले म्हणतात, '' माझा काही परिचयाच्या लोकांनी हा 'भिरकीट' पाहिला आणि त्यांच्याकडून आलेल्या चित्रपटाबद्दलच्या प्रतिक्रिया ऐकून चित्रपट पाहण्याची इच्छा अधिकच तीव्र झाली. नुकताच हा चित्रपट पाहिला असून खूपच सुंदर अशी या चित्रपटाची बांधणी केली आहे. 'भिरकीट'मधील प्रत्येक कलाकाराने उत्कृष्ट अभिनय केला आहे. चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा आपल्या आसपास वावरत असते, हे चित्रपट पाहताना प्रकर्षाने जाणवते. काळासोबत पुढे जाताना माणूस माणुसकी मागे सोडत आहे, हेच खूप उत्तमरित्या यात मांडले आहे. माणुसकी जपण्यासाठी, नाते जपण्यासाठी, प्रेक्षकांनी हा चित्रपट आवर्जून पाहावा.

जगण्याची नवी दिशा देणाऱ्या 'अनन्या'चा ट्रेलर प्रदर्शित २२ जुलैला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

 


जगण्याची नवी दिशा देणाऱ्या 'अनन्या'चा ट्रेलर प्रदर्शित 

२२ जुलैला येणार प्रेक्षकांच्या भेटीला 




एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, ड्रीमव्हीवर एंटरटेनमेंट आणि रवी जाधव निर्मित 'अनन्या' येत्या २२ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे!', असे म्हणणाऱ्या 'अनन्या'च्या जिद्दीचा प्रवास यात पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून एका क्षणी मन सुन्न करणारा हा ट्रेलर क्षणार्धात मनाला जगण्याची नवी उमेद देणाराही आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रताप फड यांनी केले असून 'अनन्या'ची व्यक्तिरेखा हृता दुर्गुळे साकारत आहे. तर ध्रुव दास, रवी जाधव आणि संजय छाब्रिया 'अनन्या'चे निर्माते आहेत. 



ट्रेलरमध्ये आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी धडपडणारी, आयुष्य दिलखुलास जगणारी 'अनन्या' दिसत आहे. एका अपघातात तिचे दोन्ही हात जातात. मात्र  'अनन्या' पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर उभी राहताना यात दिसत आहे. नावाप्रमाणेच इतरांपेक्षा वेगळ्या असणाऱ्या 'अनन्या'चा एक प्रेरणादायी प्रवास यात दिसत असून 'शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे!' हा खूप मोलाचा सल्ला देणारा हा चित्रपट आहे. 



दिग्दर्शक प्रताप फड 'अनन्या'बदल म्हणतात, " गेल्या अनेक वर्षांपासून 'अनन्या' ला मी नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर सादर केले. 'अनन्या'चा हा स्फूर्तिदायी प्रवास प्रत्येकाने पाहावा, याकरता मी हा चित्रपट बनवण्याचा विचार केला. यामधील 'अनन्या'चा ध्येय साध्य करण्यासाठी आयुष्यासोबत चाललेला लढा प्रत्येकालाच जगण्यासाठी प्रेरणा देणारा आहे. हृताने अगदी उत्तमरित्या 'अनन्या' ही व्यक्तिरेखा साकारली आहे. तिने घेतलेली मेहनत ट्रेलरमध्येही दिसत आहे. यासाठी ती दिवसातील अनेक तास सराव करत होती. नाटकात आम्हाला इतक्या भव्य स्वरूपात हा विषय मांडता आला नाही, मात्र चित्रपटात या विषयाला आम्हाला योग्य न्याय देता आला. मी एव्हरेस्ट एंटरटेनमेंटच्या संजय छाब्रिया यांचे विशेष आभार मानतो, त्यांच्या सहकार्यामुळेच हा चित्रपट आज जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.'' 


'अनन्या'ची भूमिका साकारणारी हृता दुर्गुळे आपल्या अनुभवाबद्दल सांगते, '' ज्यावेळी 'अनन्या'साठी माझी निवड झाल्याचा फोन आला, आधी मला विश्वासच बसत नव्हता. काही दिवस हे खरं आहे, हे मनाला समजवण्यात गेले. कारण 'अनन्या'च्या निमित्ताने माझे चित्रपटात पदार्पण होणार होते. पहिलाच चित्रपट एवढा मोठा, याहून आनंदाची गोष्ट कोणती असूच शकत नाही. या भूमिकेसाठी मला शारीरिक, मानसिक अशा सगळ्याच गोष्टींवर काम करावे लागले. प्रचंड मेहनत घ्यावी लागली. अर्थात यात मला अनेकांची साथ लाभली. 'अनन्या'चा प्रवास माझ्यासाठी सुद्धा खूप आव्हानात्मक होता.  या चित्रपटातून म्हणजेच 'अनन्या'कडून मी काही गोष्टी शिकले त्या म्हणजे आपल्याकडे जे नाही त्यासाठी रडत बसण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्यात सुख मानून आयुष्य पुढे न्यायचे आणि छोट्याछोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणे. आयुष्यात हे जमले तर आपले आयुष्य सुखकर होते.'' 


एव्हरेस्ट एंटरटेनमेंटचे संजय छाब्रिया म्हणतात, ''मराठी कॉन्टेन्ट हा नेहमीच अर्थपूर्ण असतो. यात अनेक वेगवेगळे विषय हाताळले जातात. त्यामुळे असे चित्रपट जगभरात पोहोचावे, असे मला मनापासून वाटते. 'अनन्या'... मुळात हा विषय खूप वेगळा आहे. कथा खूप प्रेरणादायी, स्फूर्तिदायी आहे आणि हा विषय प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचावा, याकरताच मी 'अनन्या'चा एक भाग झालो. बऱ्याच काळानंतर एव्हरेस्ट असा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.'' तर निर्माते रवी जाधव म्हणतात, ''हे नाटक जेव्हा मी पहिले तेव्हाच या नाटकाचे चित्रपटात रूपांतर व्हावे, अशी माझी इच्छा होती आणि आता ती पूर्णत्वास येत आहे. मला आनंद आहे या चित्रपटाचा मी एक भाग आहे.''

Monday 27 June 2022

'बॉईज ३'मधून धैर्य, ढुंग्या, कबीर घालणार पुन्हा एकदा राडा

 



'बॉईज ३'मधून धैर्य, ढुंग्या, कबीर घालणार पुन्हा एकदा राडा

https://www.youtube.com/watch?v=tYTBRJOeFig

काहीही वर्षांपूर्वी धैर्य, ढुंग्या आणि कबीर या 'बॉईज'नी अवघ्या महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता. हा धुमाकूळ कमी म्हणून पुन्हा 'बॉईज २' मधून ते डबल धमाका घेऊन आपल्या भेटीला आले आणि अजूनही प्रेक्षकांचे मन भरत नसल्याने परत तसाच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त राडा घालायला 'हे' तीन अतरंगी पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. नुकतेच 'बॉईज ३' चे टिझर सोशल मीडियावर झळकले असून १६ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात हा धमाका उडणार आहे.


    'बॉईज' आणि 'बॉईज २' ने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः दंगा घातला होता. 'बॉईज ३'ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची घोषणा झाल्यापासूनच हा चित्रपट कधी एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, याची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली होती. अखेर या चित्रपटाचे टिझर प्रदर्शित झाले असून यात हे तिघेही दाक्षिणात्य पेहेरावात दिसत असून यात तिघांचा एक वेगळाच स्वॅग आपल्याला अनुभवयाला मिळणार आहे. त्यांच्या आयुष्यात पुन्हा एक नवीन मुलगी आल्याचे दिसतेय. आता तिच्या येण्याने हे काय रंग उधळणार, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल. 


 अ सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटच्या सहयोगाने अवधूत गुप्ते प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शक विशाल सखाराम देवरुखकर असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया निर्माते आहेत. 'बॉईज ३'मध्ये प्रतीक लाड, पार्थ भालेराव, सुमंत शिंदे हे त्रिकुटच पुन्हा झळकणार असल्याने आता हे नक्की काय धमालगिरी करणार आहेत, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Saturday 25 June 2022

'वाय'साठी प्रेक्षकांचा मुक्ता बर्वेला पाठिंबा


 'वाय'साठी प्रेक्षकांचा मुक्ता बर्वेला पाठिंबा 

काळजाचा ठोका चुकवणारा 'वाय' हा चित्रपट आता सर्वत्र प्रदर्शित झाला असून या चित्रपटाचा प्रीमियर अनेक मान्यवारांच्या उपस्थितीत पार पडले. काही दिवसांपूर्वी हातात मशाल धरलेले मुक्त बर्वे हिचे एक थरारक पोस्टर झळकले होते. याचा नेमका अर्थ काय, यावर अनेक चर्चाही झाल्या. याचे उत्तर आता प्रेक्षकांना मिळाले असून या विषयाचे समर्थन करत पुण्यातील एका शोदरम्यान काही महिला प्रेक्षकांनी या विषयाला, मुक्ताला तिच्या या लढ्यात आपला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे 'वाय'चा विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचला असल्याचा हा संकेत आहे. 


   मुक्ता बर्वे या चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिक्रियांबाबत म्हणते, " समाजात घडणाऱ्या एका ज्वलंत विषयवार भाष्य करणारा हा चित्रपट आहे आणि अशा घटना आपल्या आजूबाजूला सर्हास घडत असतात, मात्र आपण त्यापासून अनभिज्ञ असतो किंवा मग आपण त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करतो. त्यामुळे या घटना समाजापर्यंत पोहोचाव्यात म्हणून हा विषय आम्ही प्रेक्षकांपर्यंत आणला आहे. प्रेक्षकांकडून, सिनेसृष्टीतील दिग्गजांकडून, समीक्षकांनच्या मिळणाऱ्या प्रतिक्रया पाहून हा चित्रपट अनेकांपर्यंत पोहोचला असून चित्रपटाच्या विषयांचे गांभीर्य लोकांच्या लक्षात येत आहे आणि हीच आमच्या कामाची पोचपावती आहे, असे मी समजते. 


कन्ट्रोल एन प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन अजित सूर्यकांत वाडीकर यांनी केले असून पटकथा व संवाद अजित वाडीकर , स्वप्नील सोज्वळ व संदीप दंडवते यांनी लिहिले आहेत. तर कार्यकारी निर्माते विराज विनय मुनोत आहेत. या चित्रपटात मुक्तासोबत प्राजक्ता माळी, नंदू माधव, ओमकार गोवर्धन, रसिका चव्हाण, सुहास शिरसाट, संदीप पाठक, रोहित कोकाटे, संदीप दंडवते, प्रदीप भोसले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'वाय'ची पटकथा आणि संवाद अजित वाडीकर, स्वप्नील सोज्वळ व संदीप दंडवते यांनी लिहिले आहेत.

सिद्धार्थ जाधव बनला गायक ‘तमाशा लाईव्ह’मधील ‘मेल्याहून मेल्यागत’ गाणे प्रदर्शित

 


सिद्धार्थ जाधव बनला गायक

‘तमाशा लाईव्ह’मधील ‘मेल्याहून मेल्यागत’ गाणे प्रदर्शित 

https://www.youtube.com/watch?v=dMfWCaCHgqk

अक्षय बर्दापूरकर निर्मित, संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’ हा चित्रपट म्हणजे एक सांगितिक नजराणा आहे, हे यापूर्वी आपल्याला कळलेच आहे. आता यातील एक-एक पुष्प आपल्या समोर येत असून प्रेमगीत आणि रॅप साँगनंतर आता ‘मेल्याहून मेल्यागात’ हे सिद्धार्थ जाधववर चित्रीत गाणे आपल्या भेटीला आले आहे. या गाण्याला क्षितीज पटवर्धन यांनी शब्दबद्ध केले असून या गाण्याला पंकज पडघन यांनी संगीत दिले आहे. या गाण्याची खासियत म्हणजे हे गाणे स्वतः सिद्धार्थ जाधवने गायले आहे. वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणारा सिद्धार्थ या गाण्याच्या माध्यमातून काहीतरी सांगू पाहात आहे. एखादे सत्य शोधण्यासाठीची त्याची धडपड या गाण्यातून दिसत आहे. 


या गाण्याबद्दल संगीतकार पंकज पडघन म्हणतात, “हा एक सांगितिक चित्रपट असल्याने या गाण्यांच्या माध्यमातूनच कथा पुढे जाणारी आहे. त्यामुळे या कथानकाला साजेसे आणि दमदार संगीत असणे आवश्यक होते. यापूर्वीही सांगितले आहे की प्रत्येक गाण्यात आम्ही काही प्रयोग केले आहेत. या गाण्याच्या निमित्ताने सिद्धार्थ प्रथमच गाणे गायला असून त्यासाठी त्याने विशेष मेहनत घेतली आहे. इतर गाण्याप्रमाणे हे गाणेही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल.”


‘प्लॅनेट मराठी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “ संगीताच्या माध्यमातून व्यक्तिरेखेची ओळख होणे, कथा पुढे जाणे ही संकल्पनाच खूप अनोखी आहे आणि प्रत्येक गाण्यात काहीतरी नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याचा संजय जाधव यांचा प्रयत्न नक्कीच  स्वागतार्ह आहे. यात त्यांना संगीत टीम उत्कृष्ट लाभल्याने या सगळ्याच गाण्यांना चारचाँद लागले आहेत. काहीतरी गूढ उलगडणारे हे गाणे अतिशय श्रवणीय आहे.’’


प्लॅनेट मराठी, माऊली प्रॉडक्शन, एटीएट पिक्चर्स प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती अक्षय बर्दापूरकर यांनी केली आहे. सौम्या विळेकर, डॉ. मनीषा तोलमारे, समीर केळकर, अजय उपर्वात सहनिर्मित या चित्रपटाची कथा मनीष कदम यांची असून संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपट येत्या १५ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Heartfulness institute in collaboration with Ayush Ministry, Times of India, Shaina NC, and giants welfare organised and celebrated International Yoga day at Marine Lines

 


Heartfulness institute in collaboration with Ayush Ministry, Times of India, Shaina NC, and giants welfare organised and celebrated International Yoga day at Marine Lines


More than 1000 participants participated in the event. Yoga was conducted by the yoga institute followed by Heartfulness meditation and relaxation technique by Dr. Nivedita Shreyans and her team from Heartfulness institute conducted the relaxation technique which was very well received by all the participants.




Heartfulness institute is an international NGO and has its presence all over the world. The World renowned meditation is headed by its guide Shri Kamlesh Patel who is also fondly called as Daaji. Heartfulness is a voluntary organisation and provides training in meditation  all over the World totally free of cost. The Maharashtra and Mumbai zone by Shri Tushar Pradhan the zonal Coordinator of Heartfulness.

Dr. Nivedita Shreyans says "Happy soul, a fresh mind, and a healthy body. All three can be achieved with yoga. Wishing you a very Happy Yoga Day"

Tuesday 21 June 2022

वडील -मुलीच्या नात्याची हृदयस्पर्शी कहाणी ‘डियर मॉली’

 


वडील -मुलीच्या नात्याची हृदयस्पर्शी कहाणी ‘डियर मॉली’

सिनेसृष्टीला अनेक उत्तमोत्तम चित्रपट देणारे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे पुन्हा एकदा एक अनोखा विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहेत. गुवाहाटी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘बेस्ट फिचर फिल्म’ने सन्मानित करण्यात आलेला ‘डियर मॅाली’ १ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर झळकला  असून हा एक नातेसंबंधावर भाष्य करणारा चित्रपट आहे. 


  ट्रेलरमध्ये आपल्या वडिलांचा शोध घेण्यासाठी सातासमुद्रापार पोहोचलेली मॅाली दिसत आहे. जिचा खूप धडपडीचा प्रवास सुरू आहे. स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी आपल्या माणसांना पाठीशी ठेवून परदेशी निघून गेलेल्या बाबांना शोधण्यात मॅाली यशस्वी होणार का? तिला दिलेल्या पत्रांमध्ये तिच्या मनात दडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळणार का? अशी अनेक रहस्यांचा उलगडा १ जुलैला होणार आहे. या चित्रपटात गुरबानी गिल, अलोक राजवाडे, मृण्मयी गोडबोले, अश्विनी गिरी, लिया बॅायसेन, क्रिस्टर होल्मग्रेन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. वडील आणि मुलीच्या नात्यातील अव्यक्त प्रेम यात पाहायला मिळत आहे. 



चित्रपटाबद्दल दिग्दर्शक गजेंद्र अहिरे म्हणतात, ‘’ ही कहाणी आहे नवरा - बायकोची. ही कहाणी आहे वडील -मुलीच्या नात्याची. ही एक हृदयस्पर्शी कहाणी आहे. या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा मला हवी होती तशीच आहे. विशेष कौतुक आलोक आणि मृण्मयीचे कारण त्यांच्या वयापेक्षा जास्त वयाची व्यक्तिरेखा त्यांनी साकारली आहे. या भूमिकेला त्यांनी शंभर टक्के न्याय दिला आहे. या चित्रपटातील गाणीही परिस्थितीला साजेसी अशीच आहेत. या चितेरपटाचे चित्रीकरण हे स्विडनमध्ये झाले आहे. त्यामुळे या चित्रपटात स्विडीश संस्कृतीही डोकावते. या चित्रपटासाठी हव्या असलेल्या सर्व गोष्टी मला मिळाल्या, मात्र त्यासाठी आमच्या संपूर्ण टीमला बरीच मेहनत करावी लागली. या सगळ्यात निर्मात्यांचे सहकार्य खूप लाभले. ‘’

निश्चल प्रॉड्क्शन्स निर्मित या चित्रपटाची निर्मिती प्रवीण निश्चल व व्हिनस यांनी केली आहे.

क्रांती रेडकरच्या 'रेनबो'च्या चित्रीकरणाचा लंडनमध्ये श्रीगणेशा


 क्रांती रेडकरच्या 'रेनबो'च्या चित्रीकरणाचा लंडनमध्ये श्रीगणेशा 

काही महिन्यांपूर्वी  'प्लॅनेट मराठी' आणि ‘हाय आयक्यू’ यांच्या सहयोगाने 'मँगोरेंज प्रॉडक्शन’ निर्मित 'रेनबो' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. नुकतेच या चित्रपटाचे लंडनमध्ये चित्रीकरण सुरु झाले असून लवकरच हा चित्रपट रंगांची उधळण घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या चित्रपटात शरद केळकर, सोनाली कुलकर्णी, उर्मिला कोठारे आणि ऋषी सक्सेना यांच्या प्रमुख भूमिका आहते. 'रेनबो' म्हणजे अनेक रंगांचे प्रतीक आणि त्यामुळेच या चित्रपटात देखील आपल्याला विविध रंग पाहायला मिळणार आहेत. आजच्या काळात नात्यांमध्ये येणाऱ्या विविध रंगांचा प्रवास यात पाहायला मिळणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या कलाकारांचा मिळून हा  'रेनबो' तयार होत असल्याने हे सर्व रंग एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत. 


दिग्दर्शिका क्रांती रेडकर म्हणते, " 'रेनबो' हे नावच कलरफुल आहे. या नावातच सारे रंग भरलेले आहेत. नात्यातील हाच सप्तरंगी प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटाच्यानिमित्ताने अक्षय बर्दापूरकर यांच्या 'प्लॅनेट मराठी' चा भाग होण्याची संधी मला मिळाली. इतक्या दिवसांची प्रतीक्षा अखेर संपली असून आता चित्रीकरणाचा श्रीगणेशा झाला आहे.'' 


या चित्रपटाविषयी ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, "क्रांती रेडकर ही अतिशय उत्तम अभिनेत्री तर आहेच याशिवाय तिचे दिग्दर्शन देखील कमाल आहे. 'रेनबो' हा असा चित्रपट आहे, जो नात्यातील काही संवेदनशील गोष्टी समोर आणणार आहे. या चित्रपटाची कथा मनाला भावणारी आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.''

९६ वर्षांच्या वयोवृद्ध आजीवर मणक्याची यशस्वी शस्त्रक्रिया

 


९६ वर्षांच्या वयोवृद्ध आजीवर मणक्याची यशस्वी शस्त्रक्रिया


खाटेला खिळून असलेली वयोवृद्ध आजी ‘लॅमिनेक्टॉमी’ शस्त्रक्रियेच्या दुसऱ्याच दिवशी सरळ उभी राहून चालू लागली


नवी मुंबई, २२ जून २०२२: अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई या एका आघाडीच्या टर्शरी केयर हॉस्पिटलमध्ये एका ९६ वर्षांच्या (पक्षाघात) पॅरलाईज्ड महिला रुग्णावर लॅमिनेक्टोमी आणि मणक्याला संकुचित करणारी गुठळी काढून टाकण्याची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली आहे. मणक्याची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या सर्वात वयोवृद्ध व्यक्तींमध्ये आता याही महिलेचा समावेश झाला आहे. अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबईच्या डॉक्टरांची टीम तब्बल दोन तास ही प्रक्रिया करत होती. शस्त्रक्रियेच्या दुसऱ्याच दिवशी ही वयोवृद्ध रुग्ण सरळ उभी राहू शकली. लॅमिनेक्टॉमी ही एक शस्त्रक्रिया आहे ज्यामध्ये स्पायनल कॅनलवर असलेला कशेरुकी लॅमिना (मणक्याचा मागील भाग) काढून जागा तयार केली जाते. यामुळे मणक्यांमध्ये व त्याच्या आसपासच्या संरचनेमध्ये प्रवेश करता येतो. या केसमध्ये आम्ही मणक्याला संकुचित करणारी गुठळी काढून टाकली.


डॉ सुनील कुट्टी, कन्सल्टन्ट-ब्रेन अँड स्पाईन सर्जन, अपोलो हॉस्पिटल, नवी मुंबई म्हणाले, "इतके वयोवृद्ध रुग्ण शस्त्रक्रिया करवून घेण्यास राजी होणे ही खूपच दुर्मिळ बाब आहे. बहुतेक वेळा लोकांना मणक्याच्या शस्त्रक्रियांची भीती वाटते आणि त्यामुळे त्यांना कायमचे खाटेला खिळून राहावे लागेल अशी समजूत असते. इथे आमच्याकडे ९६ वर्षांची वृद्धा स्ट्रेचरवर आली आणि शस्त्रक्रियेच्या दुसऱ्याच दिवशी ती उभी राहिली, खाटेवरून उठून चालू लागली. वय आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया या दोन्हींविषयी लोकांच्या सर्व गैरसमजांना त्यांनी खोडून काढले. न्यूरोसर्जन्स व ऍनेस्थेटिस्टसच्या आमच्या टीमला सर्जरीमध्ये मिळालेल्या यशामध्ये ही रुग्ण आणि तिच्या नातेवाईकांचा सकारात्मक दृष्टिकोन आणि रुग्णाच्या वयाचा काहीही अडथळा न येणे या गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या."


उरणला राहणाऱ्या ९६ वर्षांच्या वृद्धेला अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये आणण्यात आले तेव्हा त्यांना दहा दिवसांपासून दोन्ही पायांमध्ये कमजोरी जाणवत होती. त्यामुळे त्यांना चालता येत नव्हते व दररोजची कामे देखील करणे शक्य होत नव्हते. त्यांची पाठ खूप दुखत होती आणि हे दुखणे डाव्या पायापर्यंत गेले होते. त्यांच्या मणक्याचा एमआरआय केला गेला ज्यामध्ये आढळून आले की एल१ व एल२ मणके गंभीर प्रमाणात संकुचन पावले होते. कोडल नर्व्ह रूट आपल्या जागेवरून हलले होते (मणक्यातून खाली जाऊन शरीराच्या इतर अवयवांना जोडणारे नर्व्ह रूट्स). अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईच्या न्यूरो टीमने एकत्र मिळून या अतिशय वयोवृद्ध रुग्ण महिलेवर मणक्याची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.


डॉ रवी शंकर, जॉईंट मेडिकल डायरेक्टर, अपोलो हॉस्पिटल, नवी मुंबई म्हणाले, "गरजू रुग्णांसाठी मणक्याची शस्त्रक्रिया सुरक्षित व प्रभावी आहे.  व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून बहुतांश रुग्ण पाठीच्या दुखण्यातून बरे होतात पण या प्रकरणात वय हा एक गंभीर घटक होता आणि पॅरलाईज्ड रुग्णावर उपचार करण्यासाठी शस्त्रक्रिया हा एकमेव व्यवहार्य पर्याय उरला होता. वयोवृद्ध रुग्णांमध्ये देखील जर आवश्यक असेल तर मणक्याची शस्त्रक्रिया हा लक्षणीय इलाज ठरू शकतो, ज्यामुळे त्यांच्या जीवन गुणवत्तेमध्ये सुधारणा होऊ शकते. आम्हाला आनंद आणि समाधान वाटते की, आमच्या न्यूरोसर्जिकल टीमने सर्वतोपरी प्रयत्न करून ही केस यशस्वी केली."

Monday 20 June 2022

Convocation Ceremony of Students who graduated from Ramesh Sippy Academy of Cinema and Entertainment (RSACE)



 Convocation Ceremony of Students who graduated from Ramesh Sippy Academy of Cinema and Entertainment (RSACE)




On this happy occasion (RSACE) will honor the renowned film actress Raveena Tandon for her contribution to the film industry

Padma Shri Ramesh Sippy founded the Ramesh Sippy Academy of Cinema and Entertainment (RSACE), an initiative established in the year 2017 with an endeavor to give back and share the myriad experiences of over 4 decades.



It is an institute that is one of its kind in its tie-up with the highly respected and recognized the University of Mumbai in association with the Garware Institute of Career Education and Development. This partnership awards a graduate degree to students who complete their studies in any of the chosen programs of filmmaking. The ace director Ramesh Sippy endeavors to share his knowledge and experience with the young and enthusiastic learners.

RSACE is affiliated with the University of Mumbai and the students graduating from RSACE receive a Degree from the University of Mumbai. The Graduate degrees are Internationally recognized. Ramesh Sippy Academy of Cinema and Entertainment was inaugurated by Padma Vibhushan Shri Amitabh Bachchan and the Vice-Chancellor of Mumbai University.

RSACE has been ranked 8th and 7th consecutively for 2 years in a row by the Grand Jury awards in vocational and skill training by Education World and they were mentioned in the Hindustan Times 2019 as Educators Decoding Promising Careers in Film – Making.

Ramesh Sippy Academy offers 5 Degree Courses - Film Art (Direction), Animation, Screen-Writing, and Visual Effects (VFX), and Production and Management wherein we offer 25% theoretical education and 75% of hands-on practical training. We have Short Term Courses in Acting, editing and Photography, production, film making, production design Social Media Pro, Sound Design, PhotoShop, and other courses in VFX and Animation as well. Industry specialists design the courses under the guidance of the chairman Mr. Ramesh Sippy.

RSACE has hosted guest master classes by Bollywood actors- Divya Dutta, Director Sujoy Ghosh, Producer Siddharth Roy Kapur, Nikkhil Advani, Sudhir Mishra, Sajid Khan, Director Screenwriter and Producer - Anurag Basu, Sachin Pilgaonkar, etc.

Ramesh Sippy quotes saying "These enterprising students are the future of Cinema, they should be encouraged and given the platform to show their talent"

‘रानबाजार’ची सक्सेस पार्टी दणक्यात साजरी


 ‘रानबाजार’ची सक्सेस पार्टी दणक्यात साजरी 





वेबविश्वाला हादरून लावणाऱ्या अभिजित पानसे लिखित, दिग्दर्शित ‘रानबाजार’ने अल्पावधितच ओटीटी प्लॅटफॉर्म गाजवला. कदाचित असं काही घडलं होतं, असा मनात विचार आणणाऱ्या या वेबसीरिजची क्षणोक्षणी रंजक वळणावर नेणारी दमदार कथा आणि तगड्या स्टारकास्टने अक्षरशः खळबळ माजवली. प्लॅनेट मराठी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी, रावण फ्युचर प्रॅाडक्शन, अभिजित पानसे, अनिता पालांडे निर्मित ‘रानबाजार’ला अल्पावधितच असंख्य व्ह्यूज मिळाले. सबस्क्राइबर्सच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली. टिझर बघून मनात अनेक प्रश्न निर्माण झालेल्या अनेकांनी वेबसीरिज पाहून, त्याचे भरभरून कौतुक केले. अशा या भव्य, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वेबसीरिजने आपल्या या यशाचे नुकतेच धुमधडाक्यात सेलिब्रेशन केले. हा योगायोग जुळून आला ‘रानबाजार’चे निर्माता आणि प्लॅनेट मराठी ओटीटीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने. या वेळी ‘रानबाजर’च्या संपूर्ण टीमसह सिनेसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. या वेळी दोन्ही क्षण दणक्यात साजरे करण्यात आले.








Sunday 19 June 2022

ही इज बॅक! संगीता अहिर निर्मित 'दगडी चाळ २' १८ ऑगस्टला होणार प्रदर्शित!




 ही इज बॅक!

संगीता अहिर निर्मित  'दगडी चाळ २' १८ ऑगस्टला होणार प्रदर्शित!




डोक्यावर गांधी टोपी, पांढरा शुभ्र शर्ट-पायजमा, झुपकेदार मिशा, नजरेत आगीच्या ज्वाला, काटक शरीरयष्टी, या शहराच्या इतिहासातील किंबहुना गँगवॉरच्या इतिहासातील एक महत्वाचे नाव, बाकीचे सगळे डॉन देशाबाहेर पळून गेले, मात्र तो मुंबईतच राहून आपल्या मराठी लोकांच्या पाठीशी उभा राहिलेला, चाळीच्या लोकांवर होणाऱ्या अन्यायाला पोलिसांच्या आधी न्याय देणारा दगडी चाळीचा रॉबिन हूड, म्हणजेच अरुण गुलाब गवळी उर्फ ‘डॅडी’. बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणाऱ्या 'दगडी चाळ'मधील 'चुकीला माफी नाही', असे म्हणणाऱ्या अरुण गुलाब गवळी यांचा दबदबा सर्वांनीच अनुभवला. नुकतीच सोशल मीडियाद्वारे या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करण्यात आली असून मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित 'दगडी चाळ २' हा चित्रपट येत्या १८ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तुफान कोसळणारा पाऊस आणि अनेक लोकांच्या घोळक्यातून समोर येणारे अरुण गुलाब गवळी म्हणजेच मकरंद देशपांडे यांची दमदार एन्ट्री पुन्हा एकदा प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणार आहे, हे नक्की. 

  

संगीता अहिर यांनी यापूर्वी चित्रपटसृष्टीला अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. बॉलिवूडमध्ये निर्माती म्हणून नावलौकिक मिळवल्यानंतर संगीता अहिर यांनी 'दगडी चाळ'च्या निमित्ताने मराठी चित्रपटांच्या निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता त्या 'दगडी चाळ'चा सिक्वेल घेऊन सज्ज झाल्या आहेत. चित्रपटाच्या घोषणेबद्दल निर्मात्या संगीता अहिर म्हणतात, ''आज आम्हाला 'दगडी चाळ २'च्या प्रदर्शनाची घोषणा करताना विशेष आनंद होत आहे. 'दगडी चाळ'ला प्रेक्षकांनी भरभरून दिलेल्या प्रतिसादामुळेच आम्ही या चित्रपटाचा सिक्वेल करण्याचा विचार केला. प्रेक्षकांसोबतच मलाही या चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता आहे. हा चित्रपट एकाच वेळी वर्ल्डवाइड रिलीज करण्याचा आमचा मानस आहे.'' 


आता 'दगडी चाळ २' मध्ये प्रेक्षकांना नक्की काय पाहायला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Friday 17 June 2022

'वाह भाई वाह' शैलेश लोढा करणार रसिकांचे व्यंग्यपूर्ण मनोरंजन

 'वाह भाई वाह' शैलेश लोढा करणार रसिकांचे व्यंग्यपूर्ण मनोरंजन




शेमारू टीव्हीचा नवीन शो 'वाह भाई वाह' मध्ये शैलेश लोढा होस्ट करणार


मुंबई, 17 जून 2022: प्रसिद्ध कवी शैलेश लोढा यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. सुंदर कविता आणि हास्य एकत्र आल्यावर शैलेशचे नाव अग्रक्रमाने येते. शैलेश लोढा, एक आघाडीचा अभिनेता, लेखक, अँकर आणि एक प्रसिद्ध कवी, जगभरातील सर्वात लोकप्रिय कवींपैकी एक आहे. गेली ४२ वर्षे ते अप्रतिम हृदयस्पर्शी कवितांनी प्रेक्षकांना भुरळ घालत आहेत.


शैलेश आता भारतातील आघाडीच्या मनोरंजन चॅनल शेमारू टीव्हीवरील नवीन शो 'वाह भाई वाह' होस्ट करताना दिसणार आहे. हा शो प्रेक्षकांना मजेदार आणि व्यंग्यपूर्ण मनोरंजन प्रदान करेल. 19 जून 2022 रोजी रात्री 9 वाजल्यापासून प्रेक्षकांना शोचा आनंद लुटता येणार आहे.


या शोमध्ये शैलेश लोढा सोबत आणखी तीन कवी दिसणार आहेत जे तुम्हाला हसवतील आणि तुमच्या काव्यात्मक तेजाला गुदगुल्या करतील आणि दैनंदिन जीवनातील हलकी बाजू मांडतील. सर्व काव्य रसिकांना आवडेल अशा विनोदी पद्धतीने कविता आणि यमक सादर करून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा उद्देश असल्याने या शोमध्ये सर्वोत्कृष्ट कविता, व्यंग, भावना आणि कॉमेडी सादर केली जाईल.


'वाह भाई वाह' बद्दल उत्साहित शैलेश लोढा म्हणाले, "शेमारू टीव्हीच्या मूळ शो 'वाह भाई वाह' चा भाग बनून मला खूप आनंद होत आहे. कवी म्हणून हा कार्यक्रम माझ्या हृदयाच्या खूप जवळचा आहे. आपल्या देशातील कवींना आणि त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी शेमारूने असा शो करण्याचा निर्णय घेतला आहे त्याबद्दल संपूर्ण टीमचे आभार. मला खात्री आहे की प्रेक्षकांना हा शो खूप आवडेल आणि ते त्यांच्या मनाला आनंदित करतील.


शेमारू टीव्ही सर्व प्रमुख वितरण नेटवर्क आणि प्लॅटफॉर्मवर विनामूल्य उपलब्ध आहे आणि सर्व डीटीएच, केबल टीव्ही आणि डीडी फ्री डिश नेटवर्कवर सहज पाहता येतो. याशिवाय, शेमारू टीव्हीमध्ये प्रोग्रामिंगची एक मजबूत आणि व्यापक श्रेणी आहे जी भारतीय प्रेक्षकांच्या प्रत्येक मूडला संतुष्ट करते. संपूर्ण कुटुंबाचे मनोरंजन करण्यासाठी या मालिकेत पौराणिक कथा, भक्ती शो, नाटक, प्रणय, रहस्य आणि क्राइम थ्रिलर यांचा समावेश आहे. यासह आता 'वाह भाई वाह' हा नवीन शो रांगेत आपली उपस्थिती नोंदवत आहे.

Thursday 16 June 2022

‘तमाशा लाईव्ह’चा प्रेक्षकांना संगीत नजराणा

 


‘तमाशा लाईव्ह’चा प्रेक्षकांना संगीत नजराणा 


संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’चा सांगीतिक नजराणा येत्या १५ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या चित्रपटाचे संगीत नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. या सोहळ्यात सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव यांच्या नृत्यसादरीकरणाने कार्यक्रमाला चारचाँद लावले. यावेळी चित्रपटातील कलाकारांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

 

हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वी ‘चित्रपटाची नांदी’ हे पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. त्या गाण्याला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता इतरही गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. बातमीची वारी, फड लागलाय, वाघ आला, लाथ घालणार, रंग लागला, कडकलक्ष्मी, गरमा गरम घ्या, झुंज लागली, वासुदेव, जाऊ कशी माघारी, जखम जहरी, गंमत गड्या अशा अनेक गाण्यांची सांगीतिक मैफल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अमितराज व पंकज पडघन यांचे संगीत लाभलेल्या या गाण्यांचे बोल क्षितीज पटवर्धन यांचे आहेत. हे श्रवणीय संगीत चित्रपटाच्या कथेला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाणारे आहे. प्रत्येक पात्राची ओळख ही गाण्याच्या माध्यमातून होत असून अशा प्रकारचा प्रयोग मराठी चित्रपटात पहिल्यांदाच होत आहे. मुख्य म्हणजे सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, सचित पाटील हे पहिल्यांदा 'तमाशा लाईव्ह' चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच गायले आहेत. प्रेक्षकांना चित्रपटात काही विशिष्ट शैलीची गाणी ऐकायला मिळणार आहेत. रॅप, रोमँटिक असे गाण्यांचे विविध प्रकार यात असून नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांनी केले आहे. 


'तमाशा लाईव्ह'चे दिग्दर्शक संजय जाधव म्हणतात, “हल्ली मराठी चित्रपटांमध्ये नवनवे प्रयोग होत आहेत. असाच एक नाविन्यपूर्ण प्रयोग 'तमाशा लाईव्ह'मध्ये करण्यात आला आहे. पारंपरिक संगीताला आधुनिकतेचा साज देण्यात आला आहे. त्यामुळे हे संगीत तरुणाईलाही भावणारे आहे. या चित्रपटाच्या संगीताची टीम इतकी जबरदस्त आहे. याचा अनुभव गाणी ऐकताना रसिकांना येईलच.'' 


गीतकार क्षितीज पटवर्धन म्हणतात, “चित्रपटात बरीच गाणी असली तरी प्रत्येक गाणं वेगळ्या शैलीचे आहे. हे वास्तववादी कथा सांगणारं संगीत आहे, जे आजच्या काळाचे प्रतिनिधित्व करणारे आहे.” तर संगीतकार अमितराज, पंकज पडघन म्हणतात, “ प्रत्येक गाण्याला साजेसे असे संगीत आम्ही गाण्याला दिले आहे. ही संकल्पनाच इतकी अनोखी आहे, की यावर वेगवेगळे प्रयोग करण्याची संधी आम्हाला यानिमित्ताने मिळाली.”


‘प्लॅनेट मराठी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, '' संजय जाधव प्रेक्षकांसाठी नेहमीच काहीतरी हटके आणण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या चित्रपटाचा विषय, संकल्पना नेहमीच वेगळी असते. हा चित्रपट म्हणजे संगीतप्रेमींसाठी पर्वणी आहे. कथेला पुढे घेऊन जाणारे हे संगीत आहे, हा नवीन प्रयोग प्रेक्षकांना आवडेल. ”


प्लॅनेट मराठी व माऊली प्रॉडक्शन प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती अक्षय बर्दापूरकर यांनी केली आहे. सौम्या विळेकर, डॉ. मनीषा किशोर तोलमारे, समीर विष्णू केळकर, अजय वासुदेव उपर्वात सहनिर्मित 'तमाशा लाईव्ह'ची कथा मनीष कदम यांनी लिहिली असून संवाद अरविंद जगताप यांचे आहेत.

Wednesday 15 June 2022

आकाशाला गवसणी घालणाऱ्या 'अनन्या’चा टीझर प्रदर्शित

 


आकाशाला गवसणी घालणाऱ्या 'अनन्या’चा टीझर प्रदर्शित

https://www.youtube.com/watch?v=gUwL5wa_tKc

प्रताप फड  दिग्दर्शित 'अनन्या' हा चित्रपट येत्या २२ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून हा यात अनन्याचा प्रवास दिसत आहे. यात हृता दुर्गुळे ‘अनन्या’ची व्यक्तिरेखा साकारत आहे. 


एम. कॅाममध्ये गोल्ड मेडल पटकावलेली अनन्याचा स्वतःची काही स्वप्नं आहेत, आयुष्यात काही ध्येय आहेत. तिला आकाशात उंच भरारी घ्यायची आहे. आयुष्याकडे सकारात्कतेने बघणाऱ्या अनन्याचा तिच्या नावाप्रमाणेच अनन्यसाधारण असा प्रवास यात दिसत आहे. 


दिग्दर्शक प्रताप फड म्हणतात, "यापूर्वी ‘अनन्या’ रंगभूमीच्या माध्यमातून सर्वांच्या भेटीला आली. प्रेक्षकांनी तिचे भरभरून कौतुक केले. मात्र चित्रपट करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे नाटक पाहणारा एक वेगळा प्रेक्षकवर्ग आहे. वयोगट आहे. तर तरूणाई चित्रपटगृहाकडे विशेष आकर्षित होते. ‘अनन्या’ हा असा विषय आहे. जो कधीही जुना होणार नाही आणि प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांनी पाहावा, असा हा चित्रपट आहे. चित्रपट करण्यामागचे आणखी एक कारण म्हणजे नाटक करताना काही मर्यादा येतात. चित्रपट करताना बरीच मुभा असते. त्यात भव्यता आणू शकता. या ‘अनन्या’लाही प्रेक्षक तसेच भरभरून प्रेम देतील. मी एव्हरेस्ट एंटरटेनमेंटच्या संजय छाब्रिया यांचे विशेष आभार मानतो. त्यांच्या सहकार्यामुळेच हा चित्रपट अतिशय भव्य स्वरूपात प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय.’’ 


प्रताप फड दिग्दर्शित 'अनन्या'  या चित्रपटाची निर्मिती एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, ड्रीमव्हीवर एंटरटेनमेंट आणि रवी जाधव फिल्म्स यांनी केली आहे. या चित्रपटाचं लेखन दिग्दर्शक प्रताप फड यांनी केले आहे.  ध्रुव दास, रवी जाधव आणि संजय छाब्रिया यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे.

Tuesday 14 June 2022

SonyLIV in association with Applause Entertainment presents ‘Tanaav’, the Indian adaptation of the Israeli hit series ‘Fauda’

 


SonyLIV in association with Applause Entertainment presents ‘Tanaav’, the Indian adaptation of the Israeli hit series ‘Fauda’  


A famous saying goes ‘In seeking truth you have to get to both sides of a story’. 


Tuesday, 14th June: Applause Entertainment, the content studio of the Aditya Birla Group is all set to reimagine and retell a story of conflict and struggle, with the Indian adaptation of the globally acclaimed Israeli drama series ‘Fauda’. Hailed as one of the best Israeli shows, the Indian version of Fauda, produced by Applause Entertainment in association with Applause Productions, is titled ‘Tanaav’ (meaning: tension, chaos, stress). Helmed by National Award-Winning Director Sudhir Mishra and co-directed by Sachin Mamta Krishn, Tanaav will stream exclusively on SonyLIV. 

Set against the idyllic backdrop of Kashmir in the year 2017, Tanaav tells the story of a Special Covert Ops Unit, their bravery and courage. Delving into the human drama behind the ideologies, dealing with complex emotions and flawed characters, all of whom share the same feelings of love, loss, betrayal and revenge, Tanaav is a socio-political action drama with family at its core.  


Shot extensively in real locations in Kashmir over 100 days, this fast-paced drama is told over 12 nail-biting episodes. The stellar cast is an eclectic ensemble of amazing actors and performers, cast by none other than Mukesh Chhabra. The show features Manav Vij, Sumit Kaul, Rajat Kapoor, Shashank Arora, Arbaaz Khan, Zarina Wahab, Ekta Kaul, Waluscha De Sousa, Danish Hussain, Satyadeep Mishra, Sukhmani Sadana, Sahiba Bali, Amit Gaur, Arslan Goni, Rockey Raina, M.K. Raina, Sheen Dass, Aryaman Seth amongst others in prominent roles.  


Created by Avi Issacharoff & Lior Raz and Distributed by yes Studios, Fauda has been tremendously praised internationally, and is said to be one of the best shows made in a foreign language. While staying true to the original format, its Indian adaptation Tanaav has been reimagined for a larger Indian and global audience. 


Danish Khan, EVP & Business Head, Sony Entertainment Television, SonyLIV & StudioNext at Sony Pictures Networks India said, “'Tanaav' reaffirms our commitment towards presenting captivating and entertaining stories of depth and substance. With its compelling storyline, cinematography and stellar cast backed by Applause Entertainment and Sudhir Mishra, Tanaav will find resonance with our viewers.” 


Sameer Nair, CEO Applause Entertainment, said, “A global sensation, ‘Fauda’ was always a story waiting to cross borders and be adapted in a new setting. We at Applause Entertainment find it immensely gratifying to bring an edge-of-the-seat drama of this calibre to Indian audiences, offering a new perspective to the human stories depicting all sides of the conflict. With filmmakers like Sudhir Mishra and Sachin Krishn at the helm, backed by a stellar cast and talented writing, creative and production teams, we are excited to partner with SonyLIV to bring this show to the world. This partnership only strengthens our already strong relationship with SonyLIV after successful collaborations on Scam 1992, Avrodh, Undekhi and Your Honor”   


Sudhir Mishra said, "Applause Entertainment discovers some of the best International stories to be reimagined and adapted for Indian audience. As a filmmaker, ‘Tanaav’ allowed me to explore a variety of characters and delve deep into their psyche. It is a true Indian story weaved into a tightly-knit action drama that highlights human emotions and the dilemmas they face. Cannot wait for the audience to binge-watch Tanaav, soon to launch on SonyLIV" 


Avi Issacharoff, Co-creator of Israeli series Fauda said "We are very happy and proud to hear about Tanaav, the Indian version of Fauda. It's a true honor for us to learn how Fauda succeeded to touch the hearts of so many people from all over the world and especially in India."

Monday 13 June 2022

'भिरकीट' माणुसकी जपण्याचा प्रयत्न - अनुप जगदाळे




'भिरकीट' माणुसकी जपण्याचा प्रयत्न  - अनुप जगदाळे 

या चित्रपटाची कथा नेमकी काय आहे? 

-  या चित्रपटात राजकारण, कौटुंबिक नाते, प्रेमकहाणी, विनोद असे मनोरंजनाचे एक परिपूर्ण पॅकेजच पाहायला मिळणार आहे. मुळात या चित्रपटात गावातील राजकारण दाखवण्यात आलं असलं तरी हा काही राजकीय चित्रपट नाही. ही एका गावातील गोष्ट आहे. गावामध्ये एक अशी घटना घडते, ज्याचा प्रभाव गावातील प्रत्येक व्यक्तीवर पडतो आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी जी धडपड, धमाल  सुरु असते, ती म्हणजे 'भिरकीट'. आता ती नेमकी घटना कोणती, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. प्रेक्षकांचे मनोरंजन करणे, हा आमच्या घराण्याला लाभलेला वारसा आहे. माझ्या वडिलांनी आजपर्यंत टुरिंग टॉकीजच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनेक चित्रपट दाखवले. अगदी ब्लॅक अँड व्हाईटपासून कलरपर्यंतचे अनेक चित्रपट आम्ही प्रेक्षकांना दाखवले आहेत. चित्रपटसृष्टीतील प्रिंटपासून डिजिटलपर्यंतचा प्रवास मी पाहिला आहे. लहानपणापासून आम्ही सतत प्रेक्षकांमध्ये राहिलो आहोत. त्यामुळे प्रेक्षकांना काय आवडते, याचा विचार करूनच आम्ही चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करतो. 



'भिरकीट'च्या चित्रीणीकरणादरम्यानचा अनुभव ? 

- मुळात या चित्रपटात सगळे विनोदाचे बादशाह आहेत.  यात गिरीश कुलकर्णी यांसारखे राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेता आहेत. प्रत्येकाची विनोदाची वेगळी शैली आहे, टायमिंग आहे आणि विनोदाचे हे विविध प्रकार एकत्र आल्यावर काय धमाल होऊ शकते, याचा आपण विचार करूच शकतो. जशी धमाल या कलाकारांनी पडद्यावर केली आहे. तशीच धमाल आमच्या सेटवरही व्हायची. यात तानाजी गालगुंड आणि मोनालिसा बागल ही नवीन जोडी पहिल्यांदाच पडद्यावर झळकणार आहे. चित्रपटातील प्रत्येक जण हा चित्रपट पुढे घेऊन गेला आहे. 



'भिरकीट' नेमकं काय आहे ? 

- खरंतर 'भिरकीट' हा चित्रपट मातीशी जुळलेला आहे. माणूस हा माणसापासूनच लांब होत चालला आहे. माणसातील माणूसपण हरवत चाललं आहे. हे सर्व लहानपणापासून बघत आल्याने मला ही गोष्ट पुढे पुढे दिसत गेली आणि मी तशीतशी ती कागदावर मांडत गेलो. त्यातूनच 'भिरकीट' बनला. आपल्या आयुष्यात सर्वांमध्ये एक 'भिरकीट' असते. आनंद असो वा दुःख 'भिरकीट' आपल्या मागे लागतंच. विशेषतः 'भिरकीट' हा शब्द खेडेगावात सर्रास वापरला जातो. 'भिरकीट' हे आपल्या मागे लागलेल एक अदृश्य  शस्त्र आहे. या चित्रपटात 'भिरकीट' मागे लागल्यावर कशी मजा येते, हे दाखवण्यात आलं आहे. यातून काही संदेश मिळेल. हा एक ब्लॅक कॉमेडी चित्रपट असून प्रत्येकाने कुटुंबासोबत पाहावा, असा हा चित्रपट आहे. 


चित्रीकरणासाठी निसर्गरम्य ठिकाण निवडण्याचे कारण? 

- या चित्रपटाचे चित्रीकरण महाबळेश्वर आणि वाई येथील जवळपासच्या निसर्गरम्य ठिकाणी करण्यात आले आहे. मी मूळचा साताऱ्याचा असल्याने मला या परिसरातील बरीच ठिकाणं माहीत होती. त्यात या चित्रपटाची कथाच ग्रामीण असल्यामुळे आणि ग्रामीण भागात अफाट निसर्गसौंदर्य असल्याने मी चित्रीकरणासाठी ही ठिकाणं निवडली. छायाचित्रणकाराने प्रत्येक फ्रेम अगदी सुंदररित्या चित्रित केली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना हा संपूर्ण चित्रपट पाहताना आल्हाददायक वाटेल.

मन हेलावणाऱ्या ‘वाय’ चा थरारक ट्रेलर प्रदर्शित !


 मन हेलावणाऱ्या ‘वाय’ चा थरारक ट्रेलर प्रदर्शित !

https://www.youtube.com/watch?v=pLmRQPwof8M

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सध्या प्रचंड चर्चेत असलेला आणि मुक्ता बर्वे ची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट म्हणजेच 'वाय’! कन्ट्रोल -एन प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन अजित सूर्यकांत वाडीकर यांनी केले आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर झळकला असून यात हायपर लिंक थरार अनुभवायला मिळत आहे. ही संकल्पना मराठीत पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. येत्या २४ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या 'वाय' या शब्दामागे खूप मोठा अर्थ दडलेला आहे. ही आपल्या सर्वांच्या अस्तित्वाची, अस्तित्वासाठीच्या संघर्षाची कहाणी आहे, जी सत्य घटनांवर आधारित आहे. 



 'वाय'चा पहिला लुक समोर आल्यापासूनच चित्रपटाबद्दल अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात उपस्थित झाले होते. त्याच प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आता 'वाय'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यात मुक्ता बर्वे ही एका शासकीय अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत असून ती कार्यरत असलेल्या क्षेत्रात काही धक्कादायक गोष्टी घडत आहेत. या घटना दर महिन्याच्या अखेरच्या शुक्रवारी का घडत आहेत? या घटनांमागे काही दृश्य आणि अदृश्य हात आहेत; ज्यातील काही मदतीसाठी आहेत तर काही घात करणारेही आहेत. या सर्व गोष्टींचा शोध घेताना मुक्ता दिसत आहे. यात तिला यश मिळणार की तिचा हा शोध अपूर्णच राहणार ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ‘वाय’ पाहिल्यावर मिळणार आहेत. या चित्रपटात मुक्तासोबत प्राजक्ता माळी, नंदू माधव, ओमकार गोवर्धन, रसिका चव्हाण, सुहास शिरसाट, संदीप पाठक अशा नामवंत कलाकारांसोबत रोहित कोकाटे, संदीप दंडवते, प्रदीप भोसले आदी कलाकार असल्याचे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलर वरून दिसून येत असल्याने; मराठीतील हा एक मल्टी-स्टारर चित्रपट असल्याचे दिसून येत आहे. मन हेलावून टाकणारा असा हा चित्रपट आहे. 



 ‘वाय’ चे दिग्दर्शक अजित सूर्यकांत वाडीकर म्हणतात, ‘’ ही एक वास्तववादी कथा आहे. आपल्या आजुबाजुला अशा अनेक घटना घडत असतात, मात्र आपण त्यापासून अनभिज्ञ असतो. ‘वाय’ च्या निमित्ताने हे भयाण वास्तव प्रेक्षकांच्या समोर आणण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. ‘वाय’ बघून प्रेक्षक अंतर्मुख होऊन नक्कीच विचार करायला लागतील, अशी आशा व्यक्त करतो.’’


पटकथा व संवाद अजित वाडीकर , स्वप्नील सोज्वळ व संदीप दंडवते यांनी लिहिले आहेत. तर कार्यकारी निर्माते विराज विनय मुनोत आहेत.

Wednesday 8 June 2022

विनोदाच्या बादशाहांचा 'भिरकीट' १७ जूनला उडणार हास्याचे फवारे



 विनोदाच्या बादशाहांचा 'भिरकीट' 

१७ जूनला उडणार हास्याचे फवारे 



अनुप जगदाळे दिग्दर्शित 'भिरकीट' हा चित्रपट येत्या १७ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. 'भिरकीट'चा धमाल ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटामध्ये हास्याचे फवारे घेऊन मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदाचे बादशाह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटात गिरीश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, कुशल बद्रिके, सागर कारंडे, मोनालिसा बागल, लंगड्या उर्फ तानाजी गालगुंडे, कैलास वाघमारे, उषा नाईक, याकूब सय्यद,  श्रीकांत यादव, मीनल बाळ, शिल्पा ठाकरे, दिप्ती धोत्रे, आर्या घारे, सेवा मोरे, रोहित चव्हाण, बाळकृष्ण शिंदे, नामदेव मिरकुटे, राधा सागर,मी अश्विनी बागल यांच्यासारख्या जबरदस्त कलाकारांची मांदियाळी असून हे सगळेच कलाकार आपल्या धमाल विनोदी शैलीने चित्रपटगृहात अक्षरशः हास्यकल्लोळ करणार आहेत. त्यांची ही धमाल पाहण्यासाठी प्रेक्षकही प्रचंड उत्सुक आहेत. 


  या चित्रपटात गिरीश कुलकर्णी हे एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. ते या चित्रपटात 'तात्या' ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. जो नेहमीच सर्वांच्या मदतीला धावून जाणारा आहे. गावातील प्रत्येक स्त्री तिची व्यथा घेऊन 'तात्या'कडे सोडवायला जाते. असा हा सदैव सेवेसाठी तत्पर असणारा 'तात्या' प्रेक्षकांना पोट दुखेपर्यंत हसवणार असून अशा प्रकारची भूमिका  गिरीश कुलकर्णी यांनी पहिल्यांदा साकारली आहे. तर सागर कारंडे आपल्याला एक धमाल राजकारण करताना दिसणार आहे. तो 'बंटी दादा' ही भूमिका साकारत आहे. याव्यतिरिक्त हृषिकेश जोशी, कुशल बद्रिके, तान्हाजी गालगुंडेही आपल्या अनोख्या अंदाजाने प्रेक्षकांना लोटपोट हसवणार आहेत. या चित्रपटात विनोदाचे बादशाह असल्याने 'भिरकीट' चित्रपटगृहात धुमाकूळ घालणार आहे. 




 दिग्दर्शक अनुप जगदाळे म्हणतात की, " या चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील अनेक विनोदवीर आहेत, ज्यांनी आजवर अवघ्या महाराष्ट्राला आपल्या अभिनयाने हसवले आहे. या चित्रपटातील प्रत्येक विनोदवीराची अनोखी विनोदशैली आहे. त्यांच्या हसवण्याच्या तऱ्हा वेगवेगळ्या आहेत. प्रत्येकाचे हसवण्याचे आपापले वेगळे टाईमिंग आहे आणि हे असे वेगवेगळे विनोदवीर एकत्र 'भिरकीट'मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे हास्याचे जबरदस्त पॅकेज आपल्या भेटीला येणार आहे. प्रेक्षक ज्यावेळी विरंगुळा म्हणून चित्रपटगृहात एखादा चित्रपट पाहायला जातो, तेव्हा त्याला निव्वळ मनोरंजन हवे असते, अशा वेळी 'भिरकीट' त्यांच्या या अपेक्षा नक्कीच पूर्ण करेल. प्रेक्षक केवळ हसणारच नाही तर त्यातून एखादा संदेशही घेऊन जातील.'' 


    क्लासिक एंटरप्राईज प्रस्तुत, सुरेश जमतराज ओसवाल व भाग्यवंती सुरेश ओसवाल निर्मित 'भिरकीट' या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुप जगदाळे यांनी केले असून पटकथा आणि संवाद  प्रताप गंगावणे यांचे आहेत. तर या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी युएफओने सांभाळली आहे.

Tuesday 7 June 2022

Celebrations of Inauguration Day Of Group "Jagna He Nyara Zala Ji" on World Environment Day

 


Celebrations of Inauguration Day Of Group "Jagna He Nyara Zala Ji" on World Environment Day

The inauguration day of the group "Jagna He Nyara Zala Ji" was celebrated along with Environmental Day at Sumedh Farm on 5th June, 2022. On the occasion of Environmental Day, it was resolved by everyone that  they would be instrumental in planting 5 lakhs trees throughout the year. The beginning of this noble endeavour was brought about by the support of Sumedh Farm, situated in the mountain of Vai.


The said group has been working for natural system for life.  when men and women experience loneliness, they sometimes struggle expressing that to someone in the fear of being judged. Keeping in mind the respective norms and with the support of Saujanya Giri (Pune), Halmant More (Latur), Kavita Karankal and Aabhas Patil (Mumbai), a stage has been set up to enforce these needs.

This group would take up and carry out a number of endeavours on the corporate ground.



Sunday 5 June 2022

पाच भारतीय भाषांमध्ये घुमणार शिवगर्जना हर हर महादेव मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नडमध्ये होणार प्रदर्शित !



 पाच भारतीय भाषांमध्ये घुमणार शिवगर्जना

हर हर महादेव

मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नडमध्ये होणार प्रदर्शित ! 


केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात आणि जगात कुठेही असणाऱ्या मराठी माणसाला सतत प्रेरणा देणारं, ऊर्जा देणारं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि या अखंड उर्जेला सतत प्रवाही ठेवणारी गोष्ट म्हणजे 'हर हर महादेव' ही शिवगर्जना ! शिवाजी महाराजांचं कार्य त्यांची थोरवी याचं आकर्षण, कुतूहल आजही अनेकांच्या चर्चेचा, अभ्यासाचा विषय असतो. केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर भारतीय भाषिकही महाराजांच्या कार्यावर संशोधन करतात. महाराजांचा हाच महिमा भव्य दिव्य स्वरूपात सर्वांसमोर येणार आहे 'हर हर महादेव' या चित्रपटातून. आणि हा महिमा सर्वदूर पोहचावा यासाठीच या चित्रपटाची निर्मिती संस्था असलेल्या झी स्टुडिओजने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 'हर हर महादेव' हा चित्रपट मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगू आणि कन्नड या भाषांमध्ये एकाच दिवशी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. मराठी चित्रपटांच्या इतिहासात आजवर कधीही न घडलेली अशी ही घटना हर हर महादेवच्या निमित्ताने घडणार आहे. अभिजित देशपांडे यांच्या लेखन आणि दिग्दर्शनाने सजलेला हा चित्रपट दिवाळीमध्ये सर्वांच्या भेटीस येणार आहे. 

दक्षिणेकडील सिनेमाचं दैदीप्यमान यश, हिंदी भाषेत डब (भाषांतरीत) होऊन सर्वदूर पोहोचलेला दक्षिण सिनेमा आज सर्वांवर गारुड करण्यात यशस्वी झालाय. आपला मराठी सिनेमा असा भव्य दिव्य कधी बनणार ? तो इतर भाषांमध्ये कधी प्रदर्शित होणार ? याबद्दलच्या चर्चा आपण नेहमी करतो किंवा ऐकतो. या प्रश्नांना आणि चर्चांना आता एक सकारात्मक उत्तर मिळणार आहे 'हर हर महादेव' चित्रपटाच्या माध्यमातून. याबद्दल बोलताना झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख मंगेश कुलकर्णी म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्यच इतकं महान आणि भव्य आहे की ते फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहू शकत नाही. महाराजांची युद्धनीती ,संघटन कौशल्य जगभरात अभ्यासलं जातं . आज इतर भाषांमधील काल्पनिक गोष्टी आपल्याला मोहवून टाकत आहेत  त्यामुळे  आपला खरा, प्रेरणादायी आणि देदीप्यमान असा इतिहास तेवढ्याच भव्यतेने जगासमोर आलाच पाहिजे ही भावना आमच्या मनात होती. या भावनेतूनच आम्ही हर हर महादेव सर्व भारतात पाच भाषांमध्ये प्रदर्शित करायचं ठरवलं आहे. या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याची व्हिएफएक्स टीम. अनेक हॉलिवूडपटांवर काम करणारे  व्हिएफएक्स तंत्रज्ञ यावर काम करत असून तब्बल ४०० हुन अधिक तंत्रज्ञांचा यात समावेश आहे."


सुनील फडतरे यांच्या श्री गणेश मार्केटिंग आणि झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिजित देशपांडे यांचं आहे. येत्या दिवाळीत हा चित्रपट सर्व प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

Saturday 4 June 2022

मृणाल कुलकर्णी यांची प्लॅनेट मराठी ओटीटी परिवारात एन्ट्री...



 मृणाल कुलकर्णी यांची प्लॅनेट मराठी ओटीटी परिवारात एन्ट्री...

संस्थापक मंडळात, सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि चित्रपट निर्माती मृणाल कुलकर्णीचा सहभाग;

मराठी वेब कंटेंट सर्वोच शिखरावर पोहचवण्याचं स्वप्न...!

 चित्रपट आणि मालिका अभिनेत्री, दिग्दर्शक आणि निर्माती मृणाल कुलकर्णी प्लॅनेट मराठी ओटीटी, अ विस्टास मीडिया कॅपिटल कंपनी, यांच्या संस्थापक मंडळाचा भाग म्हणून सामील झाल्या आहेत. मराठी कंटेंटला सर्वोच्च स्थानी घेऊन जाण्याचं स्वप्न पाहणाऱ्या ‘प्लॅनेट मराठी’च्या ध्येयाशी सुसंगत दृष्टीकोनामुळे मृणाल या संस्थेत सहभागी झाल्या आहेत. 

मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वात उत्कृष्ट अभिनेत्री, दिग्दर्शक आणि पटकथा लेखन असा अनेक दशकांचा अनुभव असलेल्या मृणाल, आता जगातील पहिल्या वहिल्या मराठी ओटीटी माध्यम असलेल्या ‘प्लॅनेट मराठी’च्या यशस्वी वाटचालीत त्यांच्या मार्गदर्शनाने भर पडेल, असा विश्वास व्यक्त होतोय. ‘अवंतिका’, ‘यलो’, ‘फर्जंद’, ‘ये रे ये रे पैसा’ या आणि अशा अनेक चित्रपट आणि मालिकांमधील दमदार भूमिका, ‘रमा माधव’, ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं..’ आणि ‘ती आणि ती’ यांसारख्या चित्रपटांच दिग्दर्शन आणि पटकथा लेखनातून मृणाल यांनी त्यांचं वेगळेपण नेहमीच सिद्ध केलं आहे. तर, ‘सोनपरी’ सारख्या अजरामर भूमिकेच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द काश्मिर फाइल्स’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचंही विशेष कौतुक होतं आहे. पडद्यावरील आणि पडद्यामागील गोष्टींचा अनुभव आणि कौशल्य प्लॅनेट मराठीच्या भविष्यातील वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण आणि कलाटणी देणारा ठरणारं आहे.  

‘प्लॅनेट मराठी ओटीटी’मधील सहभागाबद्दल मृणाल सांगतात, “हे पद स्वीकारणं ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची आणि जबाबदारीची गोष्ट आहे, असं मला वाटतं. आपला सर्वोत्तम कंटेंट निर्भीडपणे जगासमोर मांडता येणं ही वेब विश्वाची खासियत आहे. ‘प्लॅनेट मराठी’ हे जागतिक दर्जाचे व्यासपीठ आहे. आजवर वेगवेगळे विषय आणि उतमोत्तम कंटेंट देऊन ‘प्लॅनेट...’ने अल्पावधीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या कुटुंबातील माझा सहभाग ही माझ्यासाठी सुखावणारी गोष्ट आहे. माझ्या अनुभवांमधून आणि प्रयत्नांतून ‘प्लॅनेट..’च्या बरोबर माय मराठीचा झेंडा अटकेपार घेऊन जाण्यासाठी मी प्रयत्नशील असेन. शिवाय, येत्या काळात सर्वोत्तम कलाकृती प्रेक्षकांसमोर घेऊन येण्यासाठी सज्ज आहोत.” 

निर्माते आणि ‘प्लॅनेट मराठी’चे संस्थापक अक्षय बर्दापूरकर या नियुक्तीबद्दल म्हणतात, “मृणाल कुलकर्णी, यांसारख्या मनोरंजन विश्वातील दिग्गज आणि तज्ज्ञ व्यक्तीचा आमच्या कुटुंबात सहभाग होणं ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मृणाल यांच्या सहभागामुळे आम्ही हे ओटीटी अधिक सक्षम आणि मनोरंजनपूर्ण करण्याचा प्रयत्न करू. त्यांच्याकडील व्यावसायिकता, नाविन्य, सादरीकरणातील तीक्ष्ण भावना या सगळ्याचा आमच्या वाटचालीसाठी उपयोग होईल. त्यांचा अनुभव आणि दूरदृष्टी यांमुळे आम्हाला काम करण्यास नवी उर्जा मिळेल. त्यामुळे मृणालताई आमच्या कुटुंबात येणं हा आमच्यासाठी बहुमान आहे.”, असं मी म्हणेन.

मृणाल कुलकर्णी जून २०२२ पासून या त्यांच्या नवीन कामाची एका नव्या भूमिकेतून सुरुवात करणार आहेत. जगातील पहिलं मराठमोळ ओटीटी म्हणून नावारूपास आलेल्या ‘प्लॅनेट मराठी’ प्रसिद्धीच्या सर्वोच्च स्थानी आहे. रानबाजार, जून, अनुराधा अशा हटके कलाकृतीनंतर अनेक उतमोत्तम कलाकृतीसह ‘प्लॅनेट मराठी’ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झालं आहे. खऱ्या अर्थाने जागतिक व्यासपीठ बनण्याची आणि मराठी कंटेंट आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी प्लॅनेट मराठी ओटीटी दर्जेदार संघ आणि व्यवस्थापन एकत्र आणण्यात आणि उत्तम कथा, पात्र, तंत्रज्ञ आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यात कोणतीही कसर सोडत नाही, यात काही शंका नाही.

Wednesday 1 June 2022

Allied Blenders strikes ‘3 Gold’s’ at the Monde Selection Quality Awards 2022



 Allied Blenders strikes ‘3 Gold’s’ at the Monde Selection Quality Awards 2022



Mumbai, 1st June 2022: Leading brands from Allied Blenders and Distillers (ABD), the largest Indian spirits company, have been honoured with the prestigious Gold Quality Award 2022 by the professional jury of Monde Selection, the world’s leading Quality Institute for consumer products. 


Sterling Reserve Blend 10, Sterling Reserve Blend 7 and Kyron Premium Brandy have all received the ‘Gold’ distinction in this year’s evaluation by a jury of experts composed of internationally recognized oenologists, master sommeliers, oenology professors, chemical engineers, and specialized press columnists. Each brand has been evaluated on up to 30 parameters related to taste, odour, visual appeal, global judgement and packaging. 


Monde Selection Quality Institute, established in Belgium, has been honouring the quality of consumer products since 1961. This year’s proceedings saw over 3000 products from 90 different countries vie for the eagerly sought-after Quality Awards. 


Speaking on the occasion, Shekhar Ramamurthy, Executive Deputy Chairman, stated “We, at ABD, are elated with the results from this year’s evaluation. Receiving a Gold Award on 3 of our leading brands stands testimony to our commitment to offer consumers the best quality”