Saturday 30 April 2022



टीम ‘तमाशा लाईव्ह'कडून मराठी सिनेसृष्टीला मानाचा मुजरा

                                                              सादर केली नव्या युगाची 'नांदी'

काही महिन्यांपूर्वी  बिग बजेट फिल्म 'तमाशा लाईव्ह'चे पोस्टर झळकले होते. या पोस्टरमधील सोनाली कुलकर्णीचा जबरदस्त लूक बघून अनेकांना उत्सुकता लागून राहिली होती की, हा नक्की कशावर आधारित चित्रपट आहे. मात्र या चित्रपटातील एक एक गोष्टी आता गुलदस्त्याबाहेर येऊ लागल्या असून 'तमाशा लाईव्ह'मधील 'चित्रपटाची नांदी' हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या जयंतीचे निमित्त साधून हे गाणे भव्यदिव्य स्वरूपात कर्जत येथील एन डी स्टुडिओ येथे प्रदर्शित करण्यात आले. १०० फूट व्यासपीठावर नृत्याचे आद्यदैवत नटराजाला नमन करून 'चित्रपटाची नांदी'ची सुरुवात झाली. या वेळी संजय जाधव, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, सचित पाटील, हेमांगी कवी, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, आयुषी भावे, मनमीत पेम, अमितराज, पंकज पडघन, क्षितीज पटवर्धन यांनी आपल्या मराठी संस्कृतीला साजेसा असा पारंपरिक वेष परिधान करून सिनेमा घडवणाऱ्या सर्व कलाकारांना, तंत्रज्ञांना, एकंदरच पडद्यामागे मेहनत घेणाऱ्या सर्वांनाच मानाचा मुजरा केला. मराठी सिनेसृष्टीचा अभिमान वाटावा, असा हा सोहळा होता. 


प्रेक्षकांच्या तुफान गर्दीत प्रदर्शित झालेल्या या गाण्याला क्षितिज पटवर्धन यांचे बोल लाभले असून पंकज पडघन यांनी संगीत दिले आहे. सिनेसृष्टीतील वेगवेगळ्या विभागात अमूल्य योगदान देणाऱ्या दिग्गजांचा सन्मान या गाण्याच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या गाण्याची खासियत म्हणजे शौनक अभिषेकी, आनंद भाटे, राहुल देशपांडे आणि अनुराधा कुबेर असे शास्रीय संगीतातील नामवंत गायक यानिमित्ताने एकत्र आले आहेत. त्यामुळे संगीतप्रेमींसाठी हा एक संगीत नजराणाच आहे. तसेच या खास दिनाचे औचित्य साधत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली असून हा चित्रपट २४ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 


  प्लॅनेट मराठी आणि माऊली प्रॉडक्शन प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती अक्षय बर्दापूरकर यांनी केली असून सौम्या विळेकर, डॅा. मनीषा किशोर तोलमारे, समीर विष्णू केळकर, अजय वासुदेव उपर्वात सहनिर्माते आहेत. संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, सचित पाटील, पुष्कर जोग, भरत जाधव, हेमांगी कवी, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे यांच्या भूमिका आहेत. संजय जाधव यांची पटकथा असलेल्या या चित्रपटाची कथा मनीष कदम यांनी लिहिली असून संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. तर या चित्रपटाला अमितराज, पंकज पडघन यांचे संगीत लाभले असून क्षितिज पटवर्धन यांनी ही गाणी शब्दबद्ध केली आहेत. हा एक संगीतमय चित्रपट असून यात सुमारे तीस गाणी आहेत. मराठीत अशा प्रकारचा प्रयोग पहिल्यांदाच होत आहे. 


'तमाशा लाईव्ह'बद्दल दिग्दर्शक संजय जाधव म्हणतात, '' आपल्या मराठी संस्कृतीला लाभलेला भव्य परंपरेचा वारसा जतन करण्याचे काम मराठी सिनेसृष्टी नेहमीच करत आली आहे. याच परंपरेला आधुनिकतेचा साजही वेळोवेळी चढवण्यात आला. आज नितीन देसाई यांच्या स्टुडिओमध्ये एका मोठ्या महोत्सवात 'चित्रपटाची नांदी' हे गाणे प्रदर्शित होणे ही आमच्यासाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे. त्यासाठी नितीन देसाई यांचे मनापासून आभार मानतो. तसेच या चित्रपटाचे पहिले गाणे इतक्या प्रेक्षकांसमोर प्रदर्शित झाले याचाही विशेष आनंद आहे. मराठी सिनेसृष्टीतील नामवंत कलाकार यानिमित्ताने एकत्र आले आहेत. विशेष म्हणजे शास्त्रीय संगीतातील दिगज्जांचा या गाण्याला आवाज लाभला आहे. ‘तमाशा लाईव्ह’मधून संगीतात काहीतरी नवीन प्रयोग करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. त्यामुळे आमचा हा प्रयत्न प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.'' 


  सोनाली कुलकर्णी 'तमाशा लाईव्ह'विषयी म्हणते, '' आज इतक्या प्रेक्षकांसमोर 'चित्रपटाची नांदी' हे गाणे प्रदर्शित करण्यात आले. हा माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. पडद्यावर चित्रपट पाहताना जितका सोप्पा वाटतो. तितकाच आव्हानात्मक आणि कठीण तो पडद्यामागे असतो. पडद्यावर कलाकारांचे चेहरे दिसतात. परंतु पडद्यामागच्या कलाकारांची मेहनत कधीच दिसत नाहीत. आज या गाण्याच्या माध्यमातून आम्ही सर्वांचाच सन्मान करत आहोत. ज्यांच्यामुळे चित्रपट घडतो अशा सर्वांना आमच्याकडून मानाचा मुजरा. आजच्या या शुभदिनी चित्रपट प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या चित्रपटाची भव्यता लवकरच प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.'' 


'प्लॅनेट मराठी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ''हे गाणे याच दिनी प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचे खास कारण आहे. ज्यांनी चित्रपटाची मुहूर्तमेढ रोवली असे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची आज जयंती असून आजच्या दिवशी हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यासाठी दुसरा शुभदिवस असूच शकत नाही. या गाण्याच्या माध्यमातून सिनेसृष्टीत आपले योगदान देणाऱ्या प्रत्येकाला सलाम करण्यात आला आहे. हा संगीतमय चित्रपट आहे. संजय जाधवने ज्यावेळी ही संकल्पना मला सांगितली त्या क्षणी ती मला पसंत पडली. एवढ्या मोठ्या उत्सवात आणि एवढ्या प्रेक्षकवर्गासमोर अशा पद्धतीने गाणे प्रदर्शित होण्याची मराठी सिनेसृष्टीतील ही बहुदा पहिली वेळ असावी. ''

Friday 29 April 2022

प्रसाद ओक यांना आनंद दिघे यांच्या रुपात बघून बहिण अरुणाताई झाल्या भावूक !

 


प्रसाद ओक यांना आनंद दिघे यांच्या रुपात बघून बहिण अरुणाताई झाल्या भावूक ! 



धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या निमित्ताने धर्मवीर आनंद दिघे यांच्या अनेक आठवणींना उजाळा मिळत आहे. आनंद दिघे हे कुणासाठी वडिलांसमान होते, कुणासाठी मुलगा तर कुणासाठी भाऊ होते. ठाण्यातील महिलांच्या समस्या सोडवणारा, अपप्रवृत्तीपासून त्यांचं रक्षण करणारा आणि रक्षा बंधनाच्या वचनाला  जागणारा असा हा समस्त महिला वर्गाचा भाऊ होता. असं म्हणतात की रक्षाबंधनाच्या दिवशी आनंद दिघे यांचे दोन्ही हात राख्यांनी भरून जायचे. मनटापासून ते अगदी खांद्यापर्यंत राख्या बांधलेल्या असायच्या. या सगळ्या राख्यात एक अतिशय हक्काची आणि लहानपणापासून त्यांच्या हातावर बांधली जायची अशी राखी म्हणजे त्यांच्या सख्या बहिणीची ...अरूणाची. वयाच्या पंचाहत्तरीत पोहचलेल्या अरुणा गडकरी आजही आपल्या या लाडक्या भावाच्या आठवणीने गहिवरून जातात. नुकताच या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा मोठ्या थाटात पार पडला. यामध्ये अभिनेता प्रसाद ओक आनंद दिघे यांच्या लूकमध्ये सर्वांसमोर हजर झाला आणि सर्वांना अरे हे तर हुबेहूब दिघे साहेब असा भास झाला. या सोहळ्याला अरुणाताईसुद्धा उपस्थित होत्या. प्रसादला या रुपात बघून त्या थक्क झाल्या. प्रसादला समोर बघून त्यांना अक्षरशः गहिवरून आलं होतं, त्यांच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. आज माझा भाऊ मला परत भेटला असं त्या म्हणाल्या आणि उपस्थित सर्वांच्याच डोळ्यांत पाणी तरळले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की "मला माहित आहे की प्रसादने केवळ हे रूप धारण केलं आहे, हा चित्रपट आहे, हा खरा आनंद नाहीये पण तरीही मन हे मानायला तयार नाहीये इतकं ते खरं खरं रुप प्रसादने साकारलंय. मी चित्रपटाचा टिझर बघितला तेव्हाच भारावून गेले होते आणि आज प्रसादला प्रत्यक्ष त्या रुपात बघून तर जणू काय माझे भानच हरवले आहे. मला शब्दही सुचत नाहीये. मी एवढंच म्हणेन की आज प्रसादाच्या या रूपाने माझा आनंद मला परत एकदा भेटला."

 

प्रसादही अरूणाताईंच्या जवळ बसून त्यांचा हात हातात घेऊन म्हणाला की," मीही तुमचा भाऊच आहे असं समजा. आज मलाही एक बहिण मिळाली याचा आनंद होतोय. मी खरंच भाग्यवान आहे. ज्या माणसावर लोकं एवढं निरपेक्ष प्रेम करतात त्या माणसाची भूमिका माझ्या वाट्याला आली हे माझं भाग्यच आहे."

झी स्टुडियोज, मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्सची निर्मिती असलेला, आणि प्रविण तरडे यांच्या लेखन दिग्दर्शनाने सजलेला धर्मवीर मु.पो. ठाणे हा चित्रपट येत्या १३ मे रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर अवतरली ‘चंद्रमुखी’

 


मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर अवतरली ‘चंद्रमुखी’



मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ गुरुवारी एकदम गजबजून गेले होते. सर्वत्र ढोलकीचा ताल, घुंगरांचे बोल घुमत होते. या उत्साही वातावरणात या विमानतळावर लावण्यवती 'चंद्रमुखी' अवतरली होती. आपल्या साजशृंगार, मोहमयी नजाकती, अदांनी 'चंद्रा'ने उपस्थितांना घायाळ केले. यावेळी 'चंद्रा'ने सादर केलेल्या या नृत्यात हवाईसुंदरींनीही ठेका धरला. मराठी सिनेसृष्टीत एखाद्या चित्रपटाला अशा प्रकारे प्रसिद्धी देण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे. स्पाईसजेटच्या विमानावर यावेळी ‘चंद्रमुखी’चे पोस्टरही झळकले. 



     सध्या सर्वत्र प्रसाद ओक दिग्दर्शित 'चंद्रमुखी'चीच हवा आहे. जिथे पाहावे तिथे 'चंद्रा' अवतरत आहे. पुण्यातील मेट्रोमध्ये प्रवाशांना आपल्या सूरतालात दंगवल्यानंतर आता 'चंद्रा'ने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपला जलवा सादर केला. या दरम्यान 'चंद्रा' म्हणजेच अमृता खानविलकर आणि 'दौलतराव देशमाने' म्हणजेच आदिनाथ कोठारे यांनी २९ एप्रिल रोजी प्रदर्शित होणारा 'चंद्रमुखी' सर्व प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन पाहावा, असे आवाहनही केले. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, व्हिस्टास मीडिया कंपनी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित, क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन प्रस्तुत फ्लाईंग ड्रॅगन एंटरटेनमेंट, येलस्टार फिल्म्स, लाईटविदिन एंटरटेनमेंट सहप्रस्तुत या चित्रपटात अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे यांच्यासह मृण्मयी देशपांडे, मोहन आगाशे, अशोक शिंदे, राजेंद्र शिसतकर, समीर चौघुले, नेहा दंडाळे, राधा सागर यांच्यासह अन्य प्रमुख कलाकार आहेत.

Friday 22 April 2022

”मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा” एकनाथ शिंदेंच्या हस्ते झाले प्रकाशन

 

”मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा”

एकनाथ शिंदेंच्या हस्ते झाले प्रकाशन




लोकांचा नेता, जननायक अशी ओळख असणा-या धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या टिझरची सध्या सर्वत्र चर्चा आहे. अभिनेता प्रसाद ओकने साकारलेल्या आनंद दिघेंची झलक बघून तर सर्वच जण अवाक् झाले आहेत. केवळ दिसण्यातील साधर्म्यच नाही तर दिघे साहेबांच्या नजरेतील ती जरब, चेह-यावरचे ते तेजस्वी आणि कणखर बाण्याचे भाव, त्यांची देहबोली, संवादफेक हे सर्वच प्रसाद ओक यांनी एवढं लिलया साकारलं आहे की साक्षात दिघे साहेबच पडद्यावर बघितल्याचा भास होतोय अशा प्रतिक्रिया समाजमाध्यमांतून उमटत आहेत. एकाच आठवड्यात समाजमाध्यमांवर सत्तर लाखांहून अधिक व्ह्युव्जचा टप्पा या टिझरने ओलांडला. याच धर्मवीर मु. पो. ठाणे चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा मुंबई येथे अनेक मान्यवर आणि चित्रपटातील कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला. राज्याचे नगरविकास मंत्री तथा आमदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे संगीत प्रकाशन पार पडले. 




या चित्रपटाबद्दल आणि प्रसाद ओक यांच्या भूमिकेबद्दल ही उत्सुकता वाढलेली असतानाच आणखी एका महत्त्वाच्या व्यक्तिरेखेच्या नावाचा उलगडा या सोहळ्यात करण्यात आला. धर्मवीर आनंद दिघे यांना गुरुच नव्हे तर देव मानणारे आणि सावलीसारखे त्यांच्यासोबत असणारे एकनाथ शिंदे यांची व्यक्तिरेखा अभिनेता क्षितिज दाते साकारणार आहे. प्रसाद ओक यांच्याप्रमाणेच क्षितिज दातेचाही लूक एकदम हुबेहुब जुळून आला आहे हे विशेष. ज्येष्ठ रंगभूषाकार विद्याधर भट्टे यांनी या चित्रपटातील हे सर्व लूक डिझाईन केले आहेत. 



मुंबईत पार पडलेल्या या सोहळ्यात अभिनेते प्रसाद ओक आणि क्षितिज दाते त्यांच्या चित्रपटातील लुकमध्ये मंचावर अवतरले आणि त्यांना बघून उपस्थित असलेले सर्वच जण अवाक् झाले. यावेळी बोलतांना प्रसाद ओक म्हणाले की ,"आपण या चित्रपटाच्या टिझर मधून एक फार सुंदर वाक्य ऐकलं ते म्हणजे, 'सर्वच राजकारणी सारखे नसतात,काही आनंद दिघे सुद्धा असतात' लोकमान्य टिळकांनी ज्या भावनेने गणेश उत्सव सुरू केला त्याचं भावनेने मंगेश देसाई यांनी आनंदोत्सव केला.आनंद मूर्तीची स्थापना करण्याचा घाट घातला आणि त्या मूर्तीला अतिशय सुरेख रूप दिलं आणि त्या मूर्ती मध्ये प्राण-प्रतिष्ठा केली ती दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी मी दिघे साहेब यांच्या बदल खूप वाचलं ऐकलं माझ्यासारख्या अभिनेत्याला ९५ चित्रपटानंतर प्रमुख भूमिका साकारण्याची संधी या चित्रपटाच्या माध्यमातून मिळाली याचा मला फार आनंद वाटत आहे. या चित्रपटात ज्या ज्या महारथीनी मला मदत केली त्यांचे मी आभार व्यक्त करतो."


याप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.चित्रपटाबद्दल बोलतांना ते म्हणाले की,"आनंद दिघे हे शिवसेनेसाठी एक आधारस्तंभ होते. त्यांचे विचार चित्रपटांच्या माध्यमातून संपूर्ण जगभरात पसरावे हेच आमचे मुख्य हेतू होते. मंगेश देसाई यांनी मी घातलेला घाट पूर्ण केला आहे. प्रवीण तरडे हे आता या चित्रपटाला पुढे नेण्याचे काम करीत आहेत. आमच्या सर्वांचे मुख्य हेतू हेच आहे की, समस्त तरुण वर्गासमोर त्यांचा आदर्श समोर ठेवणे. आनंद दिघे हे नेहमीच स्फूर्तिदायक होते. कधीच कोणाला दुखावत नव्हते. सर्व प्रेक्षकांनी हा चित्रपट पहावा ही मी विनंती करतो"


झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख मंगेश कुलकर्णी याप्रसंगी बोलताना म्हणाले की, "धर्मवीर चित्रपट करण्यामागचा हेतू हा आनंद दिघे यांचे विचार प्रत्येक घरात पोहोचवायचा होता. झी स्टुडिओज त्यांच्या प्रेक्षकांसाठी नेहमीच नवीन विषय घेऊन येतो. मराठी चित्रपट पाहणारा प्रेक्षकवर्ग देखील नवीन विषयंना भरघोस प्रतिसाद देत राहतो. आनंद दिघे यांचा जीवनपट उलगडून दाखवणारा 'धर्मवीर' हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या मनात घर करेल अशी आशा आहे. आनंद दिघे यांना या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक घरात पोहोचवू शकू अशी इच्छा मनाशी बाळगून हा चित्रपट आम्ही घेऊन येत आहोत. 




तर अभिनेते-निर्माते मंगेश देसाई आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले,"

कोणत्याही चित्रपटात नेहमी काळ वेळ आणि प्रारब्ध हे अतिशय महत्त्वाचा घटक असतो.मला कधीही वाटलं नव्हत, की मी एक निर्माता होईल,परंतु आज माझं भाग्य आहे की आनंद दिघे साहेब यांच्या जीवनावर चित्रपट बनवण्याची संधी मला मिळाली.आज हा चित्रपट प्रदर्शनाच्या टप्प्यावर आहे हे फक्त आनंद दिघे साहेब यांच्यामुळे ते आज शक्य होऊ शकलं."




तर हे शिवधनुष्य पेलणं किती अवघड होतं हे सांगतांना लेखक दिग्दर्शक प्रविण तरडे म्हणाले की,",मी  वेगवेगळे विषय असणारे चित्रपट बनवले शेतकरी, अध्यात्म, इतिहास या विषयांचे चित्रपट बनवल्यानंतर जीवनपट बनवण्याचा विचार होता,पण कोणाच्या जीवनावर आधारीत चित्रपट बनवणार हा प्रश्न होता अनेक राजकीय नेत्यांच्या आयुष्यावर अनेक चित्रपट होऊन गेले पण का झाले माहिती नाही हा समज धर्मवीर हा चित्रपट बदलवणार हे नक्की.आणि झी स्टुडिओज मार्फत हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे,त्यामुळे हा चित्रपट जगभरात प्रसिद्ध केला जाणार याचा मला फार आनंद होत आहे..”


धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटात एकूण पाच गाणी आहेत. यातील गुरुपौर्णिमा आणि धर्मवीर ही गाणी अविनाश-विश्वजीत या जोडीने संगीतबद्ध केली आहेत. तर गोकुळाष्टमीचं गाणं आणि आनंद हरपला हे मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गीतांना चिनार-महेश या जोडीने संगीतबद्ध केलं आहे. या चित्रपटात एक दमदार पोवाडा असून तो शाहिर नंदेश उमप यांनी संगीतबद्ध केला असून त्यांनीच गायला आहे. या संगीत सोहळ्याप्रसंगी हे सारे मान्यवर उपस्थित होते. 


धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आता सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. आपल्या लोकनेत्याला मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी सर्वच जण उत्सुक आहेत. प्रविण तरडे यांच्या दमदार लेखन आणि कौशल्यपूर्ण दिग्दर्शनाने सजलेला, झी स्टुडिओज, मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्सची निर्मिती असलेला

‘धर्मवीर मु.पो. ठाणे’ हा चित्रपट येत्या १३ मे रोजी झी स्टुडिओजच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

Thursday 21 April 2022

एफआयपीआरईएससीआय- इंडिया ग्रँड प्रिक्स(FIPRESCI-India Grand-Prix)मध्ये 'गोदावरी'चा पहिल्या दहा चित्रपटांत समावेश

 



एफआयपीआरईएससीआय- इंडिया ग्रँड प्रिक्स(FIPRESCI-India Grand-Prix)मध्ये 'गोदावरी'चा पहिल्या दहा चित्रपटांत समावेश

          प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या एफआयपीआरईएससीआय- इंडिया ग्रँड प्रिक्स (FIPRESCI-India Grand-Prix ) टॉप १० चित्रपटांमध्ये जिओ स्टुडिओजच्या 'गोदावरी' चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. 

          जिओ स्टुडिओजचा आगामी चित्रपट 'गोदावरी' जगभरातील नामांकित चित्रपट महोत्सवात आपली मोहोर उत्तमरित्या उमटवताना दिसत आहे. ब्लू ड्रॉप फिल्म्स आणि जितेंद्र जोशी पिक्चर्स निर्मित या चित्रपटामध्ये मराठी सिनेसृष्टीतील जितेंद्र जोशी, विक्रम गोखले, नीना कुळकर्णी, संजय मोने व प्रियदर्शन जाधव असे दिग्गज कलाकार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल महाजन यांनी केले आहे. 

       'गोदावरी' चित्रपटाचे दिग्दर्शक निखिल महाजन म्हणतात, ''फ्रिप्रेस्की हा चित्रपट समीक्षकांचा आंतरराष्ट्रीय महासंघ आहे. २०२१ मधील भारतातील दहा सर्वोत्कृष्ट फिचर फिल्ममध्ये या चित्रपटाचा सहभाग होणे, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. 'गोदावरी' हा चित्रपट आम्ही कोरोना महामारीच्या काळात अगदी कमी गोष्टींचा वापर करून बनवला आहे आणि अभिमान वाटतो की आज हा चित्रपट जागतिक प्रवास करत आहे. जिओ स्टुडिओमध्ये अतिशय उत्तम लोक आहेत त्यांच्या माध्यमातून लवकरच आम्ही हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहोत. पवित्र गोदावरीची कथा प्रत्येकाच्या घराघरात पोहोचवण्यासाठी मी उत्सुक आहे.'' 

       'गोदावरी' चित्रपटाला अनेक पुरस्करांनी गौरवण्यात आले आहे. न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल २०२२ मध्ये 'गोदावरी' चित्रपटाची ओपनिंग फिल्म म्हणून निवड करण्यात आली होती. सर्वोत्कृष्ट मराठी आर्टहाऊस सिनेमाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या चित्रपटानं इफ्फी २०२१ मध्ये सुद्धा आपले सुवर्ण अक्षरात नाव कोरले आहे. अभिनेता जितेंद्र जोशी याने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा 'सिल्वर पिकॉक' पुरस्कार पटकवला असून दिग्दर्शक निखिल महाजन यांनी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा 'सिल्वर पिकॉक' आणि 'विशेष ज्युरी पुरस्कार' पटकावला आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२२ मध्ये दिग्दर्शक निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा तर शमीम कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 'गोदावरी' चित्रपटातील संगीत विभागासाठी  ए. व्ही. प्रफुल्लचंद्रा यांना सर्वोत्कृष्ट संगीत विशेष ज्युरी पुरस्काराने गौरविले आहे. या चित्रपटाचा वॅनक्योवर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२१ मध्ये वर्ल्ड प्रीमियर आणि न्यूझीलंड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२१ मध्ये एशिया पॅसिफिक प्रीमियर दाखवण्यात आला. 

        'गोदावरी' चित्रपटात निशिकांतची कथा दाखवण्यात आली आहे, जो आपल्या परिवारापासून काही कारणास्तव दूर झाला आहे. मुळात अस्तित्वात नसलेल्या गोष्टींचा शोध घेण्याकरता व कधीही न तुटलेली नाती सुधारण्यासाठी पुन्हा घराची वाट पकडत असतो. त्याच्या आयुष्यातील, कुटुंबातील गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरे एका नदीजवळ त्याला मिळणार आहेत, ज्या नदीचा तो अनेक दिवस तिरस्कार करत होता. शेवटी तीच नदी त्याच्या आयुष्यातील प्रश्न सोडवते का, हे आपल्याला चित्रपट पाहिल्यानंतर कळेल.

*चंद्रा- दौलतरावांच्या प्रेमकहाणीत 'सौभाग्यवती दमयंती दौलतराव देशमाने'ची एंट्री * ‘चंद्रमुखी’ च्या निमित्ताने प्रसाद ओक - चिन्मय मांडलेकरची हॅट्रिक



 *चंद्रा- दौलतरावांच्या प्रेमकहाणीत 'सौभाग्यवती दमयंती दौलतराव देशमाने'ची एंट्री *

 ‘चंद्रमुखी’ च्या निमित्ताने प्रसाद ओक - चिन्मय मांडलेकरची हॅट्रिक

          आपल्या मोहमयी रूपाने, घायाळ अदांनी, आणि बहारदार नृत्याने सर्वांनाच प्रेमात पाडणारी सौंदर्यवती 'चंद्रा' हिने खासदार दौलतराव देशमानेसोबतच प्रेक्षकांनाही वेड लावले. तिची आणि दौलतराव देशमाने यांची निर्मळ प्रेमकथा जाणून घेण्याविषयी प्रेक्षक उत्सुक असतानाच आता 'चंद्रमुखी' चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून यातून एक नवीन व्यक्तिरेखा आपल्या समोर आली आहे, ती म्हणजे सौभाग्यवती दमयंती दौलतराव देशमाने हिची. ही भूमिका मृण्मयी देशपांडे साकारणार असून हा प्रेमाचा त्रिकोण असल्याचा ट्रेलरवरून अंदाज येतोय. चंद्रा आणि दौलतराव यांच्या हळुवार खुलत जाणाऱ्या प्रेमकहाणीत दमयंतीच्या येण्याने नाट्यमय ट्विस्ट येणार का, की त्यांची प्रेमकहाणी अशीच अबाधित राहणार, याचे उत्तर आपल्याला २९ एप्रिल रोजी चित्रपटगृहात मिळणार आहे. 

              एक ध्येयधुरंदर विवाहित राजकारणी जो समाजात काही सकारात्मक बदल आणू पाहात आहे. तो मोहमयी सौंदर्य, घायाळ करणाऱ्या अदा आणि बहारदार नृत्याने अनेकांना वेड लावणाऱ्या सौंदर्यवतीच्या म्हणजेच 'चंद्रा'च्या प्रेमात पडतो. तेव्हा त्याच्या राजकीय कारकिर्दीवर होणारा परिणाम आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यात येणारी वादळे आपल्याला ट्रेलरमध्ये दिसत आहेत. चंद्रा, दौलतराव आणि दमयंती यांच्या प्रेमाचा हा त्रिकोण पुढे कोणत्या वळणावर जाणार, याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली आहे. 

              चित्रपटाबद्दल दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणतात, ''ही कथा अतिशय ताकदीची आहे. ज्यावेळी हा चित्रपट मी करण्याचे ठरवले तेव्हाच माझ्या डोक्यात या व्यक्तिरेखा कोण साकारणार हे पक्के होते. त्यामुळे प्रत्येक पात्र आपापल्या भूमिकेत चपखल बसले आहे. या चित्रपटातील प्रत्येक गोष्ट खूप विचार करून करण्यात आली आहे आणि त्याची भव्यता प्रेक्षकांना पडद्यावर दिसेलच. चित्रपटातील दमयंती ही व्यक्तिरेखा इतक्या दिवसांनी प्रेक्षकांसमोर आणण्यामागेही काही विचार होता. त्यामुळे आता प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. या चित्रपटासाठी सर्वच कलाकारांनी मेहनत घेतली आहे. मात्र अमृता, मृण्मयी आदिनाथबद्दल मला आवर्जून सांगावेसे वाटते. अमृताने ही भूमिका साकारण्यासाठी वजन वाढवले आणि तेच वजन चित्रपटाकरता कायम ठेवण्यासाठीही तिने खूप मेहनत घेतली आहे. भाषेवर अभ्यास केला आहे. शिवाय अनेक काळ ती सोशल मीडियापासूनही लांब राहिली. तर आदिनाथनेही त्याची देहबोली, ध्येयधुरंदर, रुबाबदार दिसण्यासाठी बरीच मेहनत घेतली आहे. मृण्मयीची भूमिकाही खूप महत्वपूर्ण आहे.'' 

            तर मृण्मयी देशपांडे आपल्या भूमिकेबद्दल बोलते, ''यात मी खासदार दौलतराव देशमाने यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. डॉली म्हणजेच दमयंती दौलतराव देशमाने. जिचा दौलतरावांची कारकीर्द घडवण्यात मोठा सहभाग आहे. ट्रेलरपर्यंत आम्हाला ही व्यक्तिरेखा समोर येऊ द्यायची नव्हती याचे कारण म्हणजे कथानकात पुढे काय गोष्ट बदलते, यावर पडदा ठेवायचा होता. एक एक व्यक्तिरेखा समोर येत होत्या तशा त्या प्रेक्षकांच्या डोक्यात बसत होत्या आणि अचानक माझी व्यक्तिरेखा समोर आल्यावर सगळी समीकरणे बदलली. मात्र चित्रपटात उलट आहे. 'चंद्रमुखी'च्या येण्याने सगळी समीकरणे बदलतात. प्रमोशन आम्ही थोडं वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आहे.  मला एक आवर्जून सांगावेसे वाटते, याची पटकथा चिन्मयने लिहिली आहे आणि आतापर्यंतची चिन्मयची ही सर्वोत्तम कलाकृती आहे. ही कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची खुबी प्रसादकडे आहे. त्यानेही उत्तमरित्या ही कथा समोर आणली आहे.''  

           तर 'प्लॅनेट मराठी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, '' हा एक भव्य चित्रपट आहे. चित्रपटाचे कलाकार, दिग्दर्शक, कथानक, संगीतकार, गीतकार, गायक, छायाचित्रणकार अशा सगळ्याच उजव्या बाजू आहेत. त्यामुळे हा चित्रपट करण्याचा मी निर्णय घेतला. मी फार नशीबवान आहे की, हा चित्रपट करण्याची संधी मला मिळाली. यापूर्वी अनेक जण विश्वास पाटील यांना चित्रपट बनवण्या संदर्भात भेटून आले होते, मात्र त्यांना नकारात्मक प्रतिसाद मिळाला होता आणि माझ्या नशिबात हा चित्रपट होता. मुळात हा एक कठीण चित्रपट होता आणि जो आम्ही कठीण काळात केला आहे. प्रेक्षकांना मी हे खात्रीपूर्वक सांगू शकतो, अमृता आणि आदिनाथचा असा अभिनय तुम्हाला यापूर्वी कधीच पाहायला मिळाला नसेल. दोघांनीही खूप मेहनत घेतली आहे, जी लवकरच पडद्यावर प्रेक्षकांना दिसेल. या चित्रपटाची भव्यता अनुभवायची असेल तर हा चित्रपट फक्त आणि फक्त थिएटरमध्येच जाऊन पाहावा.''

          मराठी सिनेसृष्टीला 'कच्चा लिंबू', 'हिरकणी' यांसारखे सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर आता दिग्दर्शक प्रसाद ओक आणि लेखक चिन्मय मांडलेकर यांची जबरदस्त जोडी 'चंद्रमुखी' सारख्या भव्यदिव्य चित्रपटाच्या निमित्ताने हॅट्रिक करत आहे. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन प्रस्तुत फ्लाइंग ड्रॅगन एंटरटेनमेंट, येलस्टार फिल्म्स, लाइटविदिन एंटरटेनमेंट सहप्रस्तुत 'चंद्रमुखी' या चित्रपटाची पटकथा आणि संवाद चिन्मय मांडलेकर यांचे आहेत. या चित्रपटात अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे, मृण्मयी देशपांडे यांच्यासोबतच मोहन आगाशे, राजेंद्र शिसतकर, समीर चौघुले, नेहा दंडाळे, सुरभी भावे, राधा सागर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. विश्वास पाटील यांच्या 'चंद्रमुखी' या कादंबरीवर आधारित या चित्रपटातील गाण्यांना गुरु ठाकूर यांचे बोल लाभले असून या गाण्याला अजय-अतुल यांनी संगीत दिले आहे. तर छायाचित्रणाची धुरा संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे.

Monday 18 April 2022

सम्या आणि रेणूची मनाला भिडणारी प्रेमकहाणी ‘समरेणू’

 


सम्या आणि रेणूची मनाला भिडणारी प्रेमकहाणी ‘समरेणू’

https://www.youtube.com/watch?v=CydVmZS8Mq4

‘समरेणू’तील सम्या, रेणू व संत्या यांचे चेहरे काही दिवसांपूर्वीच सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले. तसेच 'समरेणू' चित्रपटातील शीर्षकगीताला देखील प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला. त्यानंतर आता चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून टिझरच्या माध्यामातून आपल्याला सम्या आणि रेणूची एकमेकांमध्ये आकंठ बुडालेली प्रेमकहाणी पाहायला मिळत आहे. या चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. येत्या १३ मे रोजी ‘समरेणू’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात महेश डोंगरे, रुचिता मांगडे, भारत लिमन हे मुख्य भूमिकेत असून चित्रपटाचे दिग्दर्शन महेश डोंगरे यांनी केले आहे. 

टिझरमध्ये एका ठिकाणी सम्या आणि रेणूची हळूहळू बहरत जाणारी प्रेमकहाणी दिसत आहे तर सोबत बदल्याची आग मनात भरलेला संत्याही दिसत आहे. या दोघांमध्ये मनाची घालमेल होत असलेल्या रेणूचे आयुष्य एक वेगळ्याच वळणावर आलेले दिसत आहे. हे वळण नक्की कोणते असेल, यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. 

'समरेणू'चे दिग्दर्शक महेश डोंगरे म्हणतात, " 'समरेणू' चित्रपट माझा अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट आहे. त्यामुळे माझ्यासोबत संपूर्ण टीमला या चित्रपटाची नक्कीच उत्सुकता आहे. सम्या आणि रेणू यांच्या प्रेमकहाणीत वेगळाच ट्विस्ट अनुभवायला मिळणार आहे. चित्रपटातील संगीत टीम खूप अनुभवी आणि कसलेली आहे. त्यामुळे नक्कीच प्रेक्षकांना चित्रपटासोबतच गाणी सुद्धा आवडतील."

एमआर फिल्म्स वर्ल्ड प्रस्तुत या चित्रपटाचे लेखनही महेश डोंगरे यांनी केले आहे. सूरज- धीरज यांचे संगीत असलेल्या या गाण्यांना गुरू ठाकूर आणि क्षितीज पटवर्धन यांचे शब्द लाभले आहेत. तर या गाण्यांना कुणाल गांजावाला, निती मोहन, आदर्श शिंदे आणि अजय गोगावले अशा दमदार गायकांचा आवाज लाभला आहे. धमाकेदार संगीत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती एमआर फिल्म्स वर्ल्डची असून प्रमोद कवडे, बाळासाहेब बोरकर, बालाजी मोरे, युवराज शेलार सहनिर्माता आहेत.

Thursday 14 April 2022

'चंद्रमुखी'ची नवी लावणी चुकवणार प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका



 'चंद्रमुखी'ची नवी लावणी चुकवणार प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका

https://youtu.be/Z5LM8z6U0D8

'चंद्रमुखी'तील 'चंद्रा'ने आपल्या ठसकेबाज लावणीने सर्वांना घायाळ केल्यानंतर आता चित्रपटातील आणखी एक लावणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. गुरू ठाकूर यांनी शब्दबद्ध केलेल्या 'बाई गं...'ही बैठकीची लावणीला अजय-अतुल यांचं संगीत लाभलं आहे. तर, आर्या आंबेकर हिच्या सुमधूर आवाजाने गाण्याची रंगत वाढवली आहे. विशेष म्हणजे या गाण्याच्या निमित्ताने आर्याने प्रथमच अजय-अतुल सोबत काम केलं आहे. 'लावणीकिंग' म्हणून चर्चेत असणाऱ्या आशिष पाटील यांनी या लावणीचं नृत्य दिग्दर्शन केलं असून, अमृताच्या नृत्य आणि सौंदर्याने या गाण्याला रंगत आणली आहे. 



प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या या लावणीबद्दल  चित्रपटाचे दिग्दर्शक प्रसाद ओक सांगतात की, "बाई गं... ही एक बैठकीची लावणी असल्यामुळे ती कशी चित्रित करायची यावर आमच्या टीमसोबत चर्चा सुरू असताना, आमचे सिनेमॅटोग्राफर संजय मेमाणे यांनी या गाण्यासाठी अमृता काळ्या रंगाच्या नऊवारीवर हे सादरीकरण करणार आणि तिच्या खोलीतही अंधार असणार असं सांगितल्यावर सगळेच थोडे बुचकळ्यात पडतो. काही प्रमाणात चर्चा झाल्यानंतर काळी साडी आणि अंधारी खोली यावर आमचं एकमत झालं. संजय यांच्यावर विश्वास होताच, आणि तो पुन्हा एकदा सार्थ ठरला तो चित्रीकरणाच्या दिवशी... चंद्राचा संपूर्ण महाल समया, पणत्या, लामणदिव्यांनी सजवला. दिव्यांच्या लखलखाटात, अमृता जेव्हा काळी साडी नेसून आली तेव्हा सुमारे पावणे दोनशे लोकांचे युनिट तिच्याकडे एकटक बघत राहिले. तिच्यावर पडणारा तो दिव्यांचा प्रकाश तिचे सौंदर्य अधिकच तेजस्वी करत होते. सर्व युनिट त्यावेळी भारावून गेले होते. अमृताचं ते रूप आम्हा सगळ्यांच्या आजही डोळ्यांसमोर आहे आणि या सगळ्यामुळेच चित्रपटातील हे माझं सर्वात आवडतं गाणं आहे. प्रेक्षकांनाही हे गाणं नक्की आवडेल असा विश्वासही आहे ’’



    चित्रपटाचे निर्माते आणि 'प्लॅनेट मराठी'चे प्रमुख संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात ,"चित्रपटात बैठकीची लावणी असणारं हे आम्हाला कळल्यावर आम्हालाही त्याविषयीची उत्सुकता होती. या गाण्याच्या रेकॉर्डिंगपासून ते चित्रीकरणापर्यंतचा प्रवास हा लक्षात राहणारा आहे. हे गाणं जेवढ्या उत्तम पद्धतीने लिहिलं आणि संगीतबद्द केलं आहे. तेवढ्याच ताकदीचं चित्रीकरणही झाल्याचा मला आनंद आहे. चंद्राची ही मंत्रमुग्ध करणारी ही लावणी प्रेक्षकांना भुरळ घालणारं यात शंका नाही" अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.


      अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन प्रस्तुत फ्लाइंग ड्रॅगन एंटरटेनमेंट, येलस्टार फिल्म्स, लाइटविदिन एंटरटेनमेंट सहप्रस्तुत 'चंद्रमुखी' या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले आहे. चिन्मय मांडलेकर यांचे पटकथा-संवाद असलेल्या या चित्रपटात अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'चंद्रमुखी' या कादंबरीवर आधारित हा चित्रपट २९ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Wednesday 13 April 2022

कल्पनेपलिकडील वास्तवाची , 'ती' च्या लढ्याची गोष्ट 'वाय' २४ जूनपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात

 


कल्पनेपलिकडील वास्तवाची ,  'ती' च्या लढ्याची गोष्ट 'वाय'

२४ जूनपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात

सत्य घटनांवर आधारित 'वाय' हा चित्रपट येत्या २४ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कन्ट्रोल-एन प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाची घोषणा नुकतीच सोशल मीडियावर करण्यात आली आहे. अजित सूर्यकांत वाडीकर दिग्दर्शित 'वाय' या चित्रपटात मुक्ता बर्वेची प्रमुख भूमिका आहे.  

 पोस्टरमध्ये मुक्ताच्या संघर्षपूर्ण डोळ्यांत खंबीरपणे लढण्याची ताकद दिसत असून आजुबाजूला आगीचे लोळ दिसत आहेत. तर लाल रंगाच्या 'वाय' मध्ये ग्लोव्हस घातलेले हात वैद्यकीय हत्यार हाताळताना दिसत आहे.  पोस्टरवरून हा चित्रपट महत्वपूर्ण विषयावर भाष्य करणारा दिसतोय. चित्रपटाच्या 'वाय' या शिर्षकाच्या पार्श्वभागी असणाऱ्या WHY या इंग्रजी अक्षरामुळे ही चित्रपटाच्या आशय आणि विषयाबद्दल उत्सुकता निर्माण झालेली आहे. ‘वाय’ एक दमदार कथा आणि आशय घेऊन प्रेक्षकांसमोर येणार असल्याचे दिसतेय. चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अजित सूर्यकांत वाडीकर म्हणतात, ''सत्य परिस्थिती दाखवणारी, आजच्या काळात घडणारी ही कथा आहे.  या भूमिकेसाठी मुक्ता शिवाय दुसऱ्या कोणत्याही अभिनेत्रीचा विचार माझ्या मनात नव्हता. मला खात्री आहे, या चित्रपटाला तुम्ही भरपूर प्रतिसाद द्याल.’’

झी स्टुडिओज प्रस्तुत 'धर्मवीर मु.पो. ठाणे' चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका साकारणार प्रसाद ओक



 झी स्टुडिओज प्रस्तुत 'धर्मवीर मु.पो. ठाणे' चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका साकारणार प्रसाद ओक

https://bit.ly/Dharmaveer_Teaser

जनसामान्यांचा नेता नाही तर जनसामान्यांचा आधार अशी कीर्ती असलेले आणि आपली संपूर्ण हयात सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी खर्ची घालणारे 'लोककारणी' म्हणजे आनंद दिघे. आभाळाएवढं कर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्व असलेल्या या लोकनेत्याचा जीवनप्रवास चित्रपटाच्या रुपात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच यात आनंद दिघे यांची भूमिका कोण साकारणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता होती. या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले असून आनंद दिघेची दमदार व्यक्तिरेखा अत्यंत ताकदीचा अभिनेता प्रसाद ओक साकारणार आहे. प्रवीण विठ्ठल तरडे यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती अभिनेते मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्स आणि झी स्टुडिओजने केली आहे. आजवर अनेक दर्जेदार आणि एकाहून एक सरस चित्रपट देणाऱ्या झी स्टुडिओजच्या माध्यमातून येत्या १३ मे रोजी 'धर्मवीर मु.पो. ठाणे' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 


धर्मवीर आनंद दिघे. गरीब, शोषितांच्या अन्यायाला वाचा फोडणारे आणि जुलूमाची भाषा करणाऱ्यांर आपली जरब बसवणारे हे व्यक्तिमत्व. आनंद दिघे यांचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं ते म्हणजे तळागाळातील लोकांचा विचार. गरीब, शोषितांच्या अन्यायाला वाचा फोडणारे आणि जुलूमाची भाषा करणाऱ्यांर आपली जरब बसवणारे हे व्यक्तिमत्व. माणसं जोडण्याची कला त्यांना अवगत होती आणि ही माणसे त्यांनी जोडली ती त्यांच्या कामाच्या माध्यमातून. सामान्य माणसाची कितीही छोटी किंवा कितीही मोठी समस्या असू दे ती सोडवणं हेच त्यांच्या जीवनाचं जणू व्रतच होतं. घरावर तुळशीपत्र ठेवून निघालेल्या, बँकेत अकाउंट नसलेल्या आणि दोन्ही खिसे रिकामे असलेल्या या माणसाची श्रीमंती होती ती सामान्य माणसाचा पाठिंबा ! आनंद दिघे आज लौकिक अर्थाने हयात नसले तरी सर्वसामान्यांच्या मनात ते आजही जिवंत आहेत. 


अशा लार्जर दॅन लाईफ' व्यक्तिमत्वावर चित्रपट बनवणे हे शिवधनुष्य पेलण्याइतकंच जिकरीचं आणि त्यातही त्यांची व्यक्तिरेखा साकारणं हे त्याहूनही अवघड काम. परंतु या दोन्ही जबाबदाऱ्या अतिशय सक्षमपणे आपल्या खांद्यावर घेतल्या त्या दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि अभिनेते प्रसाद ओक यांनी. आनंद दिघे यांचा एवढा मोठा जीवनप्रवास चित्रपटात मांडणं तसं अवघडच काम पण हा सगळा घाट घातला तो निर्माते मंगेश देसाई यांनी. त्यांच्या साहिल मोशन आर्टने या चित्रपटाची निर्मिती केली. चांगल्या कलाकृतींच्या मागे भक्कमपणे उभे राहण्याचं काम झी स्टुडिओज ही निर्मितीसंस्था कायमच करत आलेली आहे. याही चित्रपटासाठी आता झी स्टुडिओज निर्माते आणि प्रस्तुतकर्ते अशी दुहेरी जबाबदारी पार पाडणार आहे. येत्या १३ मे रोजी 'धर्मवीर मु. पो. ठाणे' हा चित्रपट झी स्टुडिओजच्या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

Friday 8 April 2022

'समरेणू' चे प्रेमात पाडणारे शीर्षकगीत प्रदर्शित....



 'समरेणू' चे प्रेमात पाडणारे शीर्षकगीत प्रदर्शित....

 लोकप्रिय नेत्या पंकजा मुंढे यांच्या हस्ते 'समरेणू' चित्रपटाचे काही दिवसांपूर्वी पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. आता या चित्रपटातील शीर्षकगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या शीर्षकगीतात सम्या आणि रेणूची निखळ प्रेमकहाणी अनुभवायला मिळत आहे. निसर्गाच्या सान्निध्यात प्रेम अधिकच खुलून येते, हे या गाण्यातून दिसून येत आहे. एका निसर्गरम्य गावात या गाण्याचे चित्रिकरण करण्यात आले आहे. 




'समरेणू'चे दिग्दर्शक, लेखक महेश डोंगरे म्हणतात,  " हे गाणे सम्या आणि रेणू यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे. या गाण्यातून सम्या आणि रेणूचे घनिष्ठ नाते दिसत आहे. मात्र शेवटी हे नाते कोणत्या वळणावर जाते, हे चित्रपटात दिसणार आहे."


'समरेणू' हे शीर्षकगीत सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले यांनी गायले आहे. या प्रेमगीताला गुरू ठाकूर यांनी शब्दबद्ध केले असून सूरज- धीरज यांचे संगीत लाभले आहे. 'समरेणू' ची निर्मिती एमआर फिल्म्स वर्ल्डची असून प्रमोद कवडे, बाळासाहेब बोरकर, बालाजी मोरे, युवराज शेलार सहनिर्माता आहेत.

'तो चांद राती'त खुलणार अमृता - आदिनाथची प्रेमकहाणी 'चंद्रमुखी'तील प्रेमगीत प्रदर्शित


 'तो चांद राती'त खुलणार अमृता - आदिनाथची प्रेमकहाणी

'चंद्रमुखी'तील प्रेमगीत प्रदर्शित

'चंद्रमुखी' या चित्रपटाची मागील अनेक महिन्यांपासून जोरदार चर्चा सुरु आहे. पहिल्याच पोस्टरमध्ये पडद्यामागे लपलेला 'तो' चेहरा कोणाचा? टिझरमध्ये पिळदार शरीरयष्टी असणारा 'तो' ध्येयधुरंदर राजकारणी कोण? असे अनेक प्रश्न या चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या मनात येत होते आणि हळूहळू या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना मिळू लागली. 'तो' ध्येयधुरंदर राजकारणी दौलतराव देशमाने म्हणजेच आदिनाथ कोठारे असल्याचे काही दिवसांपूर्वीच समोर आले. त्यानंतर मोठ्या दिमाखदार सोहळ्यात 'चंद्रमुखी' ऊर्फ चंद्रा आपल्या भेटीला आली. याच दरम्यान चित्रपटातील 'चंद्रा' या बहारदार लावणीनेही श्रोत्यांना वेड लावले. आता या चित्रपटातील चंद्रा आणि दौलतराव यांच्यावर चित्रित करण्यात आलेले एक प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.  'तो चांद राती' असे बोल असलेल्या या गाण्याला गुरु ठाकूर यांनी शब्दबद्ध केले आहे. तर अजय अतुल यांचे सुरेल संगीत लाभलेल्या या गाण्याला आपल्या सुमधुर आवाजाने श्रेया घोषाल हिने चारचाँद लावले आहेत. 


 या गाण्यात रात्रीच्या मंद प्रकाशात, नीरव शांततेत, चांदण्यांच्या साक्षीने शिकाऱ्यात बसलेल्या दौलतराव आणि चंद्रा यांची हळुवार खुलत जाणारी प्रेमकहाणी दिसत आहे. त्यात या गाण्याला गुरु ठाकूर यांचे थेट हृदयाला भिडणारे बोल आणि अजय -अतुल यांचे सुरेल संगीत लाभल्याने या गाण्याची रंगत अधिकच वाढत आहे. तर हे गाणे अधिक खुलले आहे ते आजुबाजुच्या मोहमयी वातावरणाने. रात्रीचे असे सौंदर्य क्वचितच कोणत्या मराठी चित्रपटात दिसले असेल. या सगळ्याचे श्रेय जाते छायाचित्रणकार संजय मेमाणे यांना. 


 या गाण्याबद्दल संगीतकार अजय -अतुल म्हणतात, ''बऱ्याच काळाने आम्ही मराठीत पुनरागमन करत आहोत आणि तेसुद्धा 'चंद्रमुखी' सारख्या चित्रपटातून.  यापूर्वी एक लावणी आपल्या भेटीला आल्यानंतर आता हे प्रेमगीत आपल्या समोर आले आहे. ज्यावेळी आम्हाला कळले की, 'चंद्रमुखी' सारख्या चित्रपटाला संगीत द्यायचे आहे. तेव्हा चित्रपटाची भव्यता पाहून त्याला संगीतही तसेच साजेसे हवे, त्यानुसार मग आम्ही संगीताचा विचार केला. खरंतर आमच्यासाठी प्रत्येक गाणे हे पहिलेच गाणे असते. त्यामुळे प्रत्येक गाण्यावर आम्ही  तितक्याच तन्मयतेने, निष्ठेने काम करतो. प्रत्येक गाण्यात जीव ओतण्याचा आमचा प्रयत्न असतो. लावणी, प्रेमगीत आल्यानंतर आता आणखी इतर गाणीही हळूहळू आपल्या भेटीला येतील. 'चंद्रमुखी'च्या निमित्ताने आम्ही पहिल्यांदाच 'प्लॅनेट मराठी'सोबत काम करत आहोत. अक्षय बर्दापूरकर आणि दिग्दर्शक प्रसाद ओक यांचेही आम्हाला वेळोवेळी सहकार्य लाभले.'' तर गीतकार गुरू ठाकूर म्हणतात, ‘’ या चित्रपटाचे कथानक जितके ताकदीचे आहे, त्याच क्षमतेचे गाण्यांचे बोल आवश्यक होते. प्रेमगीत, लावणी असे गाण्यांचे विविध प्रकार असलेल्या या प्रत्येक गाण्याचे बोल भावपूर्ण आहेत. कथेच्या मूळ गाभ्याला कुठेही धक्का लागणार नाही, याची पुरेपूर काळजी गाणी लिहीताना घेण्यात आली आहे. प्रत्येक गाणे कथा पुढे घेऊन जाणारे आहे.’’


'प्लॅनेट मराठी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ''अजय -अतुल सारख्या जोडीचे या चित्रपटाला संगीत लाभले आहे. जेव्हा जेव्हा आम्ही चित्रपटाच्या संगीताबाबत बोलण्यासाठी भेटायचो, त्या प्रत्येकवेळी त्यांचे संगीताबाबतचे अफाट ज्ञान बघून मी अवाक झालो. त्यांचे संगीत काय ताकदीचे असते, याची जाणीव झाली. प्रत्येक गाण्याचे संगीत ते जीव ओतून साकारण्याचा प्रयत्न करतात. काहीतरी नाविन्यपूर्ण देण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असतो. हा चित्रपट ज्याप्रमाणे भव्य आहे. तशीच या चित्रपटातील गाणीही श्रवणीय आणि दर्शनीय आहेत. याची भव्यता आपल्याला गाण्यात दिसेलच. 'चंद्रमुखी'तील गाणीही श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतील. चित्रपटातील लावणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्यानंतर आता हे प्रेमगीत गाणेही श्रोत्यांच्या ओठावर रुळणारे असून आपल्या प्रियकराला, प्रेयसीला हे गाणे आपण नक्कीच समर्पित करू शकतो.'' 


अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन प्रस्तुत फ्लाइंग ड्रॅगन एंटरटेनमेंट, येलस्टार फिल्म्स, लाइटविदिन एंटरटेनमेंट सहप्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले असून पटकथा, संवाद चिन्मय मांडलेकर यांचे आहेत. विश्वास पाटील यांच्या 'चंद्रमुखी' कादंबरीवर आधारित हा चित्रपट येत्या २९ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Patanjali-backed Ruchi Soya’s FPO shares lists at Rs 850 on the exchanges, closes 42% premium to the issue price



 Patanjali-backed Ruchi Soya’s FPO shares lists at Rs 850 on the exchanges, closes 42% premium to the issue price

The board of Ruchi Soya decides to clear entire bank borrowings thereby making it a debt free company.

The shares lists at Rs 850, with a premium of Rs 200 over its issue price




Mumbai, April 08, 2022: Patanjali-backed Ruchi Soya Industries Limited, a diversified FMCG and FMHG focused company, with strategically located manufacturing facilities and well-recognised brands having Pan-India presence, FPO shares listed on the BSE at Rs 850, with a premium of Rs 200 over the issue price. The shares of the company at day end closed at Rs 924.85 per share on BSE and at Rs 938 per share on NSE. The follow-on public offering was offered at a lower price band of Rs 615 per share and higher price band of Rs 650 per equity share.

As per BSE, the total quantity traded stood at 30.23 lakh shares with a delivery quantity percentage of 26.01%. Quantity traded and total quantity traded at NSE stood at 4.03 crore shares with a delivery quantity percentage of 29.65%. Total Turnover (BSE+NSE) stood at Rs 3824.22 crore.

Mr. Sanjeev Asthana, CEO, said “The board has decided to clear entire bank borrowings of the company thereby making it a debt free company as on date. It covers Term loan from banks, Working Capital borrowing, Bank Guarantees and Letter of Credits”

The issue was opened for subscription from 24 March 2022 to 28 March 2022, and the withdrawal window was open for two days until March 30.

The company informed stock markets on Tuesday that it has approved the allotment of 6,61,53,846 equity shares for a total of Rs 4,300 crore under the FPO. The company's paid-up equity share capital has increased from Rs 59.16 crore to Rs 72.4 crore as a result of the offering.

The FPO comprised of equity shares of face value of Rs 2 each aggregating to Rs 4300 crore. The issue also includes a reservation of up to 10,000 equity shares for subscription by eligible employees.

'मी वसंतराव'ला समीक्षकांसह प्रेक्षकांचे कडून जोरदार कौतुक !



 'मी वसंतराव'ला समीक्षकांसह प्रेक्षकांचे कडून जोरदार कौतुक !


निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित 'मी वसंतराव' हा नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून सिनेसृष्टीतील कलाकार, समीक्षक त्याचे भरभरून कौतुक करत आहेत. याशिवाय प्रेक्षकांकडूनही 'मी वसंतराव'ला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटात राहुल देशपांडे, अनिता दाते, पुष्कराज चिरपुटकर, कौमुदी वालोकर आणि अमेय वाघ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 




चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी चित्रपटाबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. हा केवळ चित्रपट नसून यातून बोध घेण्यासारखे खूप काही आहे. निपुणने चित्रपटाची उत्कृष्ट मांडणी केली असून राहुलने या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे. प्रत्येकाने आवर्जून पाहावा, असा हा चित्रपट आहे, अशी प्रतिक्रिया दिग्दर्शक राजेश मापुस्कर यांनी दिली आहे. तर संगीतकार अवधूत गुप्ते म्हणतात, ''हा चित्रपट माझ्या जवळच्या लोकांनी बनवला आहे. मला अभिमान वाटतो की, मराठी सिनेसृष्टीत असा संगीतमय चित्रपट बनला.'' आपली संस्कृती किती श्रीमंत आहे, हे या चित्रपटातून दिसते. मात्र हे अनुभवण्यासाठी हा चित्रपट आवर्जून पाहावा, असे आवाहन अभिनेता मकरंद देशपांडे यांनी केले आहे. जिओ स्टुडिओजने 'मी वसंतराव'च्या निमिताने नवी सुरुवात केली आहे. हा चित्रपट पाहताना कुठेही यात राहुल आहे, असे वाटत नाही. वसंतरावच आहेत असा भास होतो. अशा शब्दांत दिग्दर्शक केदार शिंदे यांनी चित्रपटाची स्तुती केली आहे. या चित्रपटाला अश्विनी भावे, रेणुका शहाणे, अंकुश चौधरी, गितांजली कुलकर्णी, आदित्य सरपोतदार, स्वप्नील बांदोडकर, रवी जाधव, वैदेही परशुरामी आदी कलाकारांनीही चित्रपटाबद्दल सकारत्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.


         


 

 तर समीक्षकांनीही 'मी वसंतराव'ला पसंती दर्शवली आहे. सोशल मीडियावरही या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. चित्रपटाचे दमदार संगीत आणि कलाकारांचा दर्जेदार अभिनय या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत, चित्रपटाचे दिग्दर्शन आणि अभिनय अफलातून आहे. प्रत्येक मराठी माणसाने आवर्जून पाहावा असा चित्रपट, काळजाला भिडणारे संगीत, खूपच सुंदर सांगितिक चित्रपट असून केवळ आठवडे नाही तर दशकापर्यंत हा चित्रपट चालावा, असा हा सिनेमा आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या आहेत. याव्यतिरिक्त प्लाझा सारखे सर्वसामान्यांसाठी असलेले चित्रपटगृह असो वा पॅलेडिअमसारखे उच्चभ्रू वर्गासाठी ओळखले जाणारे थिएटर असो, अशा दोन्ही प्रकारच्या सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांनी चित्रपट संपल्यावर शेवटच्या नावापर्यंत थांबून टाळ्यांच्या कडकडाटात पसंती दर्शवली तर पुण्याच्या काही थिएटरमध्ये प्रेक्षक भावनिक होऊन, राहुल देशपांडे यांच्या पाया पडत होते. तर काही प्रेक्षकांच्या डोळ्यांतून अश्रूही येत होते. 


'मी वसंतराव'ला मिळालेल्या या प्रेमाबद्दल, यशाबद्दल दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी म्हणतात, '' प्रेक्षक, समीक्षक, सिनेसृष्टीतील मंडळी, मित्रपरिवार या सगळ्यांकडून आलेल्या सकारात्मक प्रतिक्रियेमुळे खूपच आनंद झाला आहे. इतक्या वर्षांच्या मेहनतीची चीज झाल्याची भावना सध्या मनात आहे. सर्वांचेच मनापासून आभार.'' 


तर पं. पंडितरावांची भूमिका साकारणारे त्यांचे नातू राहुल देशपांडे म्हणतात, ''मी आजोबांच्या सहवासात फारसा आलो नाही, मात्र 'मी वसंतराव'च्या निमित्ताने मला त्यांचे आयुष्य जगता आले. याहून सुदैवाची गोष्ट दुसरी कोणती असूच शकत नाही. आज या चित्रपटाच्या निमित्ताने मला त्याने आयुष्य जवळून अनुभवता आले. त्यांचा पं. वसंतराव देशपांडेंपर्यंतचा प्रवास खूपच खडतर होता. आज सगळ्यांकडून मिळणाऱ्या प्रतिक्रिया पाहून, ऐकून भारावलो आहे.

Wednesday 6 April 2022

प्रत्येक पाल्याने आपल्या पालकांसोबत पाहावा असा 'भारत माझा देश आहे' पोस्टर सोशल मीडियावर झळकले

 


प्रत्येक पाल्याने आपल्या पालकांसोबत पाहावा असा 'भारत माझा देश आहे'

पोस्टर सोशल मीडियावर झळकले


'अहिंसा परमो धर्म:' अशी टॅगलाईन असलेला पांडुरंग कृष्णा जाधव दिग्दर्शित 'भारत माझा देश आहे' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच जाहीर झाली असून आता या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांसमोर आले आहे. नावावरूनच हा चित्रपट देशभक्तीवर आधारित आहे, हे कळतेय. एबीसी क्रिएशन प्रस्तुत, डॉ. आशिष अग्रवाल निर्मित हा चित्रपट येत्या ६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 


   पोस्टरमध्ये राजविरसिंह राजे गायकवाड आणि देवांशी सावंत हे बालकलाकार दिसत असून त्यांच्यामध्ये एक बकरीही दिसत आहे. आता 'भारत माझा देश आहे' या चित्रपटाचा बकरीशी काय संबंध आणि तिची या चित्रपटात काय भूमिका आहे, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. यात या बालकरांसोबत मंगेश देसाई, शशांक शेंडे, छाया कदम आणि हेमांगी कवीही दिसत आहेत. पोस्टरमध्ये टीव्हीवर ब्रेकिंग न्यूजही दिसत आहे. ही ब्रेकिंग न्यूज नेमकी कोणती? याचे उत्तर चित्रपटातच मिळेल. 


चित्रपटाचे दिग्दर्शक पांडुरंग जाधव म्हणतात, "हा एक देशभक्तीपर चित्रपट आहे, मात्र या चित्रपटाची कथा खूप वेगळी आहे. आतापर्यंत क्वचितच असा विषय या पद्धतीच्या चित्रपटांमध्ये हाताळला गेला असेल. या चित्रपटात अनेक प्रसंग हसवत हसवत, नकळत खूप गोष्टी सांगून जातात, मनाला स्पर्शून जातात. हा एक कौटुंबिक चित्रपट असून प्रत्येक लहान मुलाने आवर्जून पाहावा, असा हा 'भारत माझा देश आहे. या चित्रपटातील कलाकारांचा अभिनय अतिशय दमदार असून प्रत्येकाने आपली व्यक्तरेखा उत्तम साकारली आहे. हा चित्रपट एक सकारात्मक दिशा देणारा आहे.''


    'भारत माझा देश आहे' या चित्रपटाची कथा पांडुरंग कृष्णा जाधव यांची असून निशांत नाथाराम धापसे यांची पटकथा, संवाद लाभले आहेत. .या चित्रपटाला  समीर सामंत गीत लाभले असून अश्विन श्रीनिवासन यांचे संगीत आहे. निलेश गावंड यांनी या चित्रपटाचे संकलक आहेत तर चित्रपटाचे छायांकन नागराज यांनी केले आहे.

Tuesday 5 April 2022

Celebrating his 80th year of life, acclaimed artist and Padma Bhushan awardee Jatin Das holds his solo exhibition after five years titled 'Prakriti Purush'

 


Celebrating his 80th year of life, acclaimed artist and Padma Bhushan awardee Jatin Das holds his solo exhibition after five years titled 'Prakriti Purush'


*Preview on Tuesday 5th April 2022, 6 PM
Jehangir Art Gallery, Auditorium Hall
Exhibition from 6th April to 11th April
Daily 11 am – 7 pm

The exhibition continues at Gallery Art & Soul
12th April to 23rd April 2022
Mon-Sat 10 am to 7.30 pm
Sundays 11 -4 pm




Jatin Das
 is a name that needs no introduction in the world of art. A painter, poet, sculptor, muralist, printmaker, teacher, and cultural expert, he has been a constant inspiration for artistic expression. With a career spanning over 5 decades, Jatin Das has been commemorated among the most contemporary artists of India. The Padma Bhushan awardee has held a total of 68 one-man exhibitions over the span of his career with several of his works being displayed in public and private art collections.




Celebrating the life milestone of his 80th year, Das has held his solo exhibition at the Jehangir Art Gallery after five long years. Titled ‘Prakriti Purush’, the exhibition consisted of - paintings, terracotta platters, drawings, and graphics based on Shiva. The show that commenced on 6th April will continue till 11th April 2022 at the auditorium hall of Jehangir and then move to Gallery Art & Soul from 12th April to 23rd April 2022.




The Director of Art & Soul, Dr.Tarana Khubchandani says about the exhibition, “Bringing spirit and matter onto the same canvas, Jatinda expresses his fascination with the form of Shiva and the energy of Shakti. Apart from sculpting his canvases, he produced an impressive and enchanting collection of works on terracotta. Jatin Das unveils this body of large and small works on canvas, paper & etchings, inviting one for an immersive experience in the oeuvre of his inspiration- Shiva. Personally, I find myself mesmerized once again!”



Jatin Das says, “Normally, I don’t like to talk about my work. Neither at a show nor in a brochure. In my early days, I had a little Shiva murti in the house and I used to offer it flowers. For no reason. I am not a religious person but I come from a traditional Indian family where puja, Prarthana, and all the festivals are celebrated.




Recently, I did a large mural at the Adani Headquarters. But before I started work on it, I did a lot of drawings, sketches, watercolor, and ink drawings to free my hand, to free my thoughts. So, in the two years in Ahmedabad, along with the mural, I also painted on little canvases and boards; some etchings and on terracotta platters (tawdi), series of works on the same theme.

As I drew and painted, the works took the energy of Shiva-Shakti. I began to visualize the series on Shiva as Prakruti and Purush. There cannot be any form unless there is Prakruti. It is Ardhanarishwar. I was amazed to see an Ardhanarishwar sculpture even in Egypt! And when somebody read out the various forms of Shiva, to my surprise, they befitted the postures that I had painted.

I never pick a theme to draw or paint. I work and it flows and I follow that journey. I turned 80 on the 2nd of December 2021. I have seen many tough times in my life and now I am tired. Yet I continue my journey.”

पंकजा मुंढे यांच्या हस्ते ‘समरेणू’चे पोस्टर प्रदर्शित

 



पंकजा मुंढे यांच्या हस्ते ‘समरेणू’चे पोस्टर प्रदर्शित 



महेश डोंगरे दिग्दर्शित ‘समरेणू’ चित्रपटाचे पोस्टर नुकतेच राजकारणातील लोकप्रिय व्यक्तिमत्व असणाऱ्या पंकजा मुंढे यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आले असून या चित्रपटात महेश डोंगरे, रूचिता मांगडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या सम्या आणि रेणूची ही प्रेमकहाणी आहे. येत्या १३ मे रोजी चित्रपटगृहात ‘समरेणू’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  


‘सुरवात महत्वाची नाय, शेवट महत्वाचाय…’ अशी टॅगलाईन असल्येला या पोस्टरमध्ये सम्या आणि रेणू दिसत असून त्यांचा नात्याचा शेवट कसा होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 


पोस्टर प्रदर्शनाबाबत पंकजा मुंढे म्हणतात, '' या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत मी उत्सुक आहे. याचे कारण हे निर्माते माझ्या जिल्ह्यातील आहेत आणि या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण बीड जिल्ह्यात झाले आहे. बीड जिल्ह्यात खूप कष्टकरी लोक आहेत, जे विविध राज्यात कामानिमित्ताने जातात. त्यांच्यात हुशारी असल्याने त्यांनी आपला ठसा विविध ठिकाणी उमटवला आहे. हा चित्रपट सफल व्हावा, याकरता मी चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देते.'' 


 चित्रपटाचे दिग्दर्शक, अभिनेता महेश डोंगरे म्हणतात, “हा माझा दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून पहिला चित्रपट आहे. त्यामुळे मला या चित्रपटाच्या प्रदर्शनाची खूपच उत्सुकता आहे. ही एक प्रेमकहाणी आहे. जास्त काही सांगणार नाही परंतु सम्या आणि रेणूच्या प्रेमाचा प्रवास एका रंजक वळणावर जाणार आहे. या चित्रपटाची संगीत टीम अतिशय जबरदस्त आहे. त्यामुळे चित्रपटाची गाणी प्रेक्षकांना नक्कीच आवडतील..”


एमआर फिल्म्स वर्ल्ड प्रस्तुत या चित्रपटाचे लेखनही महेश डोंगरे यांनी केले आहे. सूरज- धीरज यांचे संगीत असलेल्या या गाण्यांना गुरू ठाकूर आणि क्षितीज पटवर्धन यांचे शब्द लाभले आहेत. तर या गाण्यांना कुणाल गांजावाला, निती मोहन, आदर्श शिंदे आणि अजय गोगावले अशा दमदार गायकांचा आवाज लाभला आहे. धमाकेदार संगीत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती एमआर फिल्म्स वर्ल्डची असून प्रमोद कवडे, बाळासाहेब बोरकर, बालाजी मोरे, युवराज शेलार सहनिर्माता आहेत.

महाराष्ट्रातील कलाकारांमध्ये रंगणार क्रिकेटची मॅच 'एमबीसीसीएल'च्या लोगोचे अनावरण




 महाराष्ट्रातील कलाकारांमध्ये रंगणार क्रिकेटची मॅच

'एमबीसीसीएल'च्या लोगोचे अनावरण



क्रिकेट म्हणजे आपल्या सर्वांचाच जिव्हाळ्याचा विषय. मग त्यापासून आपले कलाकारही कसे दूर राहणार? अनेक जण क्रिकेटचे शौकीन आहेत. मात्र चित्रीकरणाअभावी, वेळेअभावी त्यांना आपली ही आवड जोपासता येत नाही. हेच कारण लक्षात घेऊन अभिनेता सुशांत शेलार यांनी मराठी बॉक्स सेलिब्रिटी क्रिकेट लीगची (एमबीसीसीएल) स्थापना केली आहे. 'शेलार मामा फाऊंडेशन' आणि 'प्लॅनेट मराठी' प्रस्तुत एमबीसीसीएलच्या लोगोचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे. या जबरदस्त लोगोमध्ये महाराष्ट्राची शान दर्शवणाऱ्या पिळदार मिश्या, फेटा, बॅट, बॉल आणि स्टंप दिसत आहेत. मराठीबाणा जपणारा हा लोगो समोर आल्यानंतर आता क्रिकेटप्रेमींना उत्सुकता लागून राहिली आहे ती एमबीसीसीएलची. त्यामुळे आता एमबीसीसीएलही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


एमबीसीसीएलबद्दल सुशांत शेलार म्हणतात, '' प्लॅनेट मराठीसोबत हा उपक्रम राबवताना खूप आनंद होत आहे. प्लॅनेट मराठीने नेहमीच अशा उपक्रमांना प्रोत्साहन दिले आहे. आता लोगोचे अनावरण झाले असून लवकरच एमबीसीसीएलमध्ये महाराष्ट्रातील आपल्या लाडक्या कलाकारांचा खेळ पाहायला मिळणार आहे. ही एक खरीखुरी क्रिकेटची मॅच असून यात काही संघ असतील. फक्त पुरुषच नाही तर स्त्रियाही या खेळात सहभागी होणार आहेत. लवकरच हे संघ जाहीर होणार असून महाराष्ट्रातील विविध शहरातल्या प्रसिद्ध ठिकाणाचे नाव प्रत्येक संघाला दिले जाणार आहे. यानिमित्ताने  खेळ आणि महाराष्ट्रातील वास्तुंना प्रोत्साहन दिले जाणार आहे.'' 


प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, '' एमबीसीसीएलचा भाग असणे ही आमच्यासाठीही तितकीच मोठी गोष्ट आहे. एमबीसीसीएलच्या निमित्ताने सगळे कलाकार एकत्र येऊन खेळणार आहेत. प्लॅनेट मराठी अशा वेगवेगळ्या उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन देते. मुळात क्रिकेट हा प्रत्येकाचाच आवडीचा विषय आहे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रीय कलाकारांना एकत्र घेऊन या क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले आहे. क्रिकेटच्या खेळाडूंना आपण नेहमीच खेळताना बघतो. अभिनय करणाऱ्या कलाकारांचा खेळ पाहण्याची संधी प्रेक्षकांना या निमित्ताने मिळणार आहे. प्रत्येक संघात कलाकार, दिग्दर्शक, चित्रपटसृष्टीतील तंत्रज्ञ अशा सगळ्यांचाच समावेश असेल. हळूहळू एमबीसीसीएलविषयीच्या अनेक गोष्टी समोर येणार आहेत.''

Monday 4 April 2022

निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार 'विशू'ची प्रेमकहाणी

 




निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार 'विशू'ची प्रेमकहाणी

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या मयूर मधुकर शिंदे दिग्दर्शित 'विशू' या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये एक डायलॉग होता. ‘ये मालवण कहा आया? त्यावर 'विशू' म्हणतो, यहा दिल में...  या एका डायलॉगने अनेक कोकणवासीयांसह अनेकांची मने जिंकली. कोकणचे निसर्गरम्य सौंदर्य, निळेशार समुद्रकिनारे, तिथली साधी भोळी माणसे, प्राचीन मंदिरे, तिथली संस्कृती, परंपरा  या सगळ्याचेच अनेक पर्यटकांना आकर्षण आहे. सौंदर्याने बहरलेले हे मालवण 'विशू' चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. अनेकदा चित्रीकरणासाठी महाराष्ट्राबाहेरील आणि परदेशातील बेटांचा विचार केला जातो. परंतु आपल्या महाराष्ट्रातही खूप सुंदर बेटं आहेत, याचा आपल्याला अनेकदा विसर पडतो. त्यापैकीच एका सुंदर बेटाचे दर्शन आपल्याला 'विशू' पाहिल्यावर घडणार आहे. 


  'विशू'चे काही चित्रीकरण कोकणातील एका बेटावर करण्यात आले आहे. चित्रपटात सुंदर दिसणाऱ्या या बेटावर चित्रीकरण करणे तसे आव्हानात्मक होते. एकतर या बेटावर मोबाईलचे नेटवर्क नव्हते, त्यामुळे इतरांशी संपर्कात राहणे खूप कठीण होते. त्यात चित्रीकरण बेटावर आणि बाहेर कलाकरांच्या राहण्याची सोय त्यामुळे बोटीने ये-जा करावी लागत होती. तांत्रिकदृष्ट्याही हे कठीण जात होते. तरीही या सगळ्यावर मात करत 'विशू'चे चित्रीकरण पूर्ण झाले. 


   याबाबत गश्मीर महाजनी व मृण्मयी गोडबोले म्हणतात," मालवणमध्ये शूट करताना एक वेगळीच मजा आली. बाजूला इतके निसर्गसौंदर्य असताना काम करण्यातही एक वेगळाच उत्साह असतो. चित्रीकरणासाठी रोज बोटीने बेटावर जाणे, दगदगीचे होते, मात्र त्याचा कधी कंटाळा नाही आला. अनेकदा तांत्रिक अडचणी आल्या परंतु या जादुई बेटावर त्या अतिशय नगण्य वाटल्या. चित्रपट पाहताना प्रेक्षकही या बेटाच्या नक्कीच प्रेमात पडतील.'' तर दिग्दर्शक  मयूर शिंदे म्हणतात की, "आपल्या महाराष्ट्रातही निसर्गाची मुक्तहस्ते उधळण असलेली अनेक ठिकाणे आहेत आणि त्यापैकीच एक असलेल्या मालवणातील एका बेटाचा आम्ही चित्रीकरणासाठी विचार केला. 'विशू'च्या निमित्ताने मालवणचे सौंदर्य प्रेक्षकांसमोर येईल. ही एक प्रेमकहाणी आहे, जी मालवणच्या निसर्गसौंदर्यात अधिकच  खुलणार आहे.'' 



   श्री कृपा प्रॉडक्शन प्रस्तुत बाबू कृष्णा भोईर निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन मयूर मधुकर शिंदे यांनी केले आहे. हृषिकेश कोळी यांनी विशू'चे संवाद, पटकथा केले असून या चित्रपटाला हृषिकेश कामेरकर यांचे संगीत लाभले आहे. तर मंगेश कांगणे यांनी गाणी शब्दबद्ध केली आहेत. 'विशू'चे छायाचित्रण मोहित जाधव यांनी केले आहे.या चित्रपटात गश्मीर महाजनी, मृण्मयी गोडबोले यांच्यासोबत ऐताशा संझगिरी, मानसी मोहिले, मिलिंद पाठक, विजय निकम, संजय गुरुबक्शानी, प्रज्ञेश डिंगोरकर हे प्रमुखेत दिसणार आहे.

नात्यांची गोष्ट सांगणार 'एका हाताचं अंतर' प्लॅनेट मराठी ओटीटीवर नवीन चित्रपट लवकरच भेटीला



 नात्यांची गोष्ट सांगणार 'एका हाताचं अंतर'

प्लॅनेट मराठी ओटीटीवर नवीन चित्रपट लवकरच भेटीला


एकापेक्षा एक दर्जेदार मराठी चित्रपट प्रदर्शित होत असतानाच, त्यात आता आणखी एका चित्रपटाची भर पडणार आहे. प्लॅनेट मराठी ओटीटी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनीवर प्रकाश कुंटे दिग्दर्शित ‘एका हाताचं अंतर’ हा चित्रपट लवकरच भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून मुहूर्त सोहळाही संपन्न झाला आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना गौरी नलावडे, अभिजीत खांडकेकर, नेहा जोशी, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, रेशम श्रीवर्धनकर हे कलाकार झळकणार आहेत. ‘एका हाताचं अंतर’ या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण निसर्गरम्य अशा पाँडीचेरीमध्ये होणार आहे. 




चित्रपटाबद्दल दिग्दर्शक प्रकाश कुंटे म्हणतात, "प्लॅनेट मराठी सोबतचा हा माझा पहिला चित्रपट आहे. तर काही कलाकारांसोबतही मी पहिल्यांदाच काम करत आहे. हे सगळेच कलाकार कमाल आहेत. या चित्रपटाबद्दल सांगायचे तर ही एक प्रेमकहाणी असून कुटूंबासोबत पाहावा असा हा चित्रपट आहे. नात्यातील विविध पैलू यात पाहायला मिळणार आहेत.’’


‘प्लॅनेट मराठी ओटीटी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, "प्रकाश कुंटे हे अतिशय उत्कृष्ट आणि संवेदनशील दिग्दर्शक आहेत. त्यांनी सिनेसृष्टीला नेहमीच वेगवेगळे विषय दिले असून प्रेक्षकांनीही त्याला भरभरून प्रतिसाद दिला आहे. लवकरच एक नवीन विषय घेऊन आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहोत. यापूर्वी आम्ही 'पाँडीचेरी' हा चित्रपट केला होता ज्याचे संपूर्ण चित्रीकरण पाँडीचेरीमध्ये करण्यात आले होते. आता 'एका हाताचं अंतर' या चित्रपटाचे चित्रीकरणही पाँडीचेरीमध्ये होणार आहे. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीला आता एक नवीन चित्रीकरणस्थळ मिळाले आहे. या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीही महाराष्ट्राबाहेर आपला ठसा उमटवू पाहात आहे.''


हाई आईक्यू एन्टरटेनमेंटचे राजीव रमेश अग्रवाल म्हणतात, ‘’प्लॅनेट मराठी ओटीटीच्या सोबत काम करण्याची संधी मिळणे, ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. या माध्यमातून आम्ही ‘एका हाताचं अंतर’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत. ही एक अशी कथा आहे जी आपल्या आयुष्याशी मिळतीजुळती असून मनोरंजनात्मक आहे. उत्कृष्ट कलाकार आणि पाँडीचेरीतील चित्रीकरण या चित्रपटातील जमेच्या बाजू आहेत.’’


अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी व हाई आईक्यू एंटरटेनमेंट निर्मित या चित्रपटाच्या छायाचित्रणाची धुरा स्टेफानो मोर्कल्डो यांनी सांभाळली आहे.

Saturday 2 April 2022

१७ जूनला भेटीला येणार 'भिरकीट' गुढीपाडव्याच्या निमित्ताने पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

 


१७ जूनला भेटीला येणार 'भिरकीट'

गुढीपाडव्याच्या निमित्ताने पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला


सध्या अनुप जगदाळे दिग्दर्शित 'भिरकीट' या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर झळकले होते , त्यात गिरीश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी आणि तानाजी गालगुंडे एकाच स्कुटरवर दिसले होते. या धमाल पोस्टरवरून या चित्रपटाचीविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. अखेर १७ जून रोजी 'भिरकीट' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 


   या संदर्भात दिग्दर्शक अनुप जगदाळे म्हणाले की, आजच्या काळात पैसा, प्रसिद्धी एकंदरच भौतिक सुखाचे भिरकीट प्रत्येकाच्या मागे हात धुवून लागले आहे. यात एक  अशी व्यक्तिरेखा पाहायला मिळणार आहे, जी स्वतःच 'भिरकीट' आहे. त्या व्यक्तीच्या आयुष्यात अशी घटना घडते आणि तो त्यात कसा अडकला जातो, हे 'भिरकीट'मध्ये पाहायला मिळणार आहे. त्यातूनच उडू लागतात विनोदाची कारंजी. हा चित्रपट एक ब्लॅक कॉमेडी आहे, कलाकारही तितकेच ताकदीचे आहेत. या चित्रपटात गिरीश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, मोनालिसा बागल, कुशल बद्रिके, सागर कारंडे, सैराट फेम तानाजी गालगुंडे, कैलास वाघमारे, उषा नाईक, याकूब सय्यद या कलावंतांनी विनोदाची बहार उडवून दिली आहे.''


क्लासिक एंटरप्राइज प्रस्तुत सुरेश जामतराज ओसवाल आणि भाग्यवंती ओसवाल यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. कथा अनुप जगदाळे तर पटकथा संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत ,कॅमेरा मीर आणि संकलन फैजल महाडिक यांचे आहेत. शैल-प्रितेश या हिंदी जोडीचे धमाल संगीत लाभले आहे ,युफओने या चित्रपटाची धुरा सांभाळली आहे. रसिकप्रेक्षक या विनोदी सिनेमाची आतुरतेने वाट बघत आहेत.