Friday 12 April 2024

या म्हाताऱ्याला अडवून दाखवाच ! जुनं फर्निचर'चा ट्रेलर लाँच सोहळा दिमाखात संपन्न



 या म्हाताऱ्याला अडवून दाखवाच ! 

जुनं फर्निचर'चा ट्रेलर लाँच सोहळा दिमाखात संपन्न 


काय अपेक्षा आहेत आमच्या अशा त्यांच्याकडून... दिवसातून एकदा आमच्या खांद्यावरून हात फिरवून विचार ना.. आई कशी आहेस? बाबा कसे आहात? मन सुन्न करणारे हे वाक्य नकळत डोळ्यांच्या कडा पाणावणारे आहे. आपल्याकडे अनेकदा वयस्कर व्यक्तींना आऊटडेटेड, अडगळीतले सामान असे म्हटले जाते. परंतु याच सामानाची किंमत आणि ताकद काय आहे, हे सांगणारा चित्रपट येत्या २६ एप्रिल रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित 'जुनं फर्निचर' या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच दिमाखात पार पडला. या सोहळ्याला अधिक रंगात आणण्यासाठी वैभव जोशी यांच्या 'सोबतीचा करार' या संगीत मैफलचेही आयोजन यावेळी करण्यात आले. यात स्वप्नील बांदोडकर, केतकी माटेगावकर, पवनदीप राजन यांचाही सहभाग होता. यावेळी महेश मांजरेकर यांनी 'काय चुकले सांग ना?' या मनाला स्पर्शून जाणाऱ्या गाण्याच्या काही ओळी गायल्या. 


'जुनं फर्निचर... या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा !" ट्रेलरवरूनच हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा आहे, हे कळतेच. मुलांप्रती असलेल्या कर्तव्यांमध्ये आपण कमी पडणार याची चिंता आईवडिलांना नेहमीच असते. परंतु तीच चिंता, काळजी, जबाबदारी आई वडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात? वृद्धापकाळात मुलांकडून चार प्रेमाचे शब्द ऐकण्याची इच्छा असते. ती इच्छाही ही पिढी पूर्ण करू शकत नसेल, तर आई वडिलांनी या वयात कोणाकडून प्रेमाची अपेक्षा ठेवावी,  असा प्रश्न ट्रेलर पाहून मनात उद्भवतो. आपल्या पोटच्या मुलावरच आईच्या मृत्यूचा आरोप गोविंद पाठक यांनी लावला असून आता या प्रकरणाचा निकाल काय लागणार, याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहूनच मिळणार आहे. 


सत्य- सई फिल्म्स आणि स्कायलिंक एन्टरटेनमेंट प्रस्तुत 'जुनं फर्निचर' चे यतिन जाधव निर्माते आहेत. 'जुनं फर्निचर'ची कथा, पटकथा, संवाद  महेश वामन मांजरेकर यांनी लिहिले असून यात महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर,  समीर धर्माधिकरी, डॉ. गिरीश ओक, विजय निकम, संतोष मिजगर, अलका परब, शरद पोंक्षे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


चित्रपटाबद्दल दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर म्हणतात, ‘’ जुनं फर्निचर… या नावातच चित्रपट काय आहे, याचा संदर्भ लागतो. अनेक घरांमध्ये हल्ली असे चित्र दिसतेय. बाहेरही अनेक ठिकाणी ज्येष्ठांना जुनं फर्निचर म्हणूनच संबोधले जातेय आणि याबाबतचा किस्सा मी स्वतः पाहिला आहे. त्यातूनच मला हा विषय सुचला. मी या चित्रपटाबद्दल एकच सांगेन ‘जुनं फर्निचर’ला कमी समजू नका. त्यांच्यात जी ताकद आहे, ती आताच्या तकलादू फर्निचरमध्ये अजिबात नाही. ही ताकद फक्त शारीरिकच नाही तर मानसिक आणि भावनिकदृष्ट्याही तितकीच खमकी आहे. हा चित्रपट प्रत्येकाने आपल्या मुलांसोबत नक्की पाहावा, त्यातून कदाचित मुलांचा दृष्टीकोन बदलेल.’’


Tuesday 9 April 2024

प्राचीन रुढीची परंपरा आणि नव्याची गुढी बांधायला... येतो आहे मुखवट्यांचा बोहाडा.

 


प्राचीन रुढीची परंपरा आणि नव्याची गुढी बांधायला... येतो आहे 

मुखवट्यांचा बोहाडा. 


वेगवेगळे मुखवटे धारण करत.. माणसाचा खरा चेहरा त्याला दाखवणारा सगळ्यात मोठा देव म्हणजे निसर्ग.. आणि ह्या निसर्गाचा गौरव, भारतीय  पुराणातील भव्य दिव्य मुखवट्यांना पूजून  करायचा उत्सव म्हणजे "बोहाडा"


२०२५ या वर्षात भेटीला येणाऱ्या   बोहाड्या ची घोषणा नुकतीच करण्यात आली असून दाक्षिणात्य निर्माता मणीगंडन मंजुनाथन 'बोहाडा'ची निर्मिती करणार आहेत.


 राहुल सतिश पाटील, कृतिका तुळसकर देवरूखकर सहनिर्मिती, विशाल सखाराम देवरुखकर दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन अंबर विनोद हडप यांनी केले आहे. सध्या तरी या चित्रपटात कोण कलाकार झळकणार, याबाबत गोपनीयता आहे. 


या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक विशाल देवरुखकर म्हणतात, '' निसर्गाची आपल्यावर जी कृपा आहे, त्याचे आभार मानण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो. खंत या गोष्टीची आहे की, आतापर्यंत हा उत्सव लोकांना माहित नव्हता. हा परंपरागत उत्सव आहे, त्यामुळे या रूढी, परंपरा या चित्रपटातून मांडण्याचा मी प्रयत्न केलाय. या चित्रपटाच्या माध्यमातून हा उत्सव लोकांपर्यंत पोहोचेल, अशी आशा आहे. चित्रपटाचे वेगळेपण म्हणजे निसर्गाशी संबंधित असल्याने यात मजा, सस्पेन्स, थ्रिलर यांचे मिश्रण असणार. त्यामुळे प्रेक्षकांना एक जबरदस्त अनुभव येणार आहे. वर्षात ५२ आठवडे असतात, ५२ सोंगेही असतात, जे त्यांचे अस्तित्व दाखवत असतात. परंतु याचा थांगपत्ता आपल्याला नसतो. हेच या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या विषयाचे नावीन्यही अफाट आहे, महाराष्ट्राच्या जंगलात लपलेल्या संस्कृतीवर आधारीत चित्रपट करण्याचा मोह दाक्षिणात्य निर्मात्यांनाही आवरला नाहीये. मराठी सिने दिग्दर्शक म्हणून मला अभिमान वाटतोय की, आपल्या विषयाला दाक्षिणात्य निर्माता पसंती दर्शवत आहेत.''


V-Guard Unveils ‘Arizo’: The Next Generation Melt Resistant & Eco Safe Wires, Setting a New Standard of Safety and Sustainability



 V-Guard Unveils ‘Arizo’: The Next Generation Melt Resistant & Eco Safe Wires,

Setting a New Standard of Safety and Sustainability

 

8th April 2024: V-Guard, India’s leading electricals, electronics, and home appliances major, launches Arizo Wires, a path-breaking innovation in electrical wiring technology. Powered by advanced e-beam technology and boasting zero-halogen low-smoke properties, Arizo Wires heralds a new era in electrical safety and sustainability standards, offering consumers unparalleled peace of mind.


As the Indian Housing Wires & Cables market continues to thrive, projected to reach a staggering 22 - 25,000 Cr (INR) with a growth rate of 9%-10%, the demand for safer and eco-friendly solutions is on the rise. Arizo Wires, with its cutting-edge e-beam processing technique, promises to meet this demand head-on, offering a remarkable 75% increase in current carrying capacity compared to conventional FR PVC wires. This advanced technology enhances both the electrical and physical strength of Arizo Wires, making them suitable for 90 Degree C continuous operation.  As a result, Arizo Wires are highly heat-resistant, melt-resistant and fire retardant, and significantly reduce the risk of short circuits and fire hazards, thereby ensuring enhanced safety for homes and businesses.

 

Furthermore, Arizo wires are crafted from lead-free and non-carcinogenic raw materials, complying with stringent ROHS and REACH standards, and therefore does not emit toxic gasesfrom the insulation during fireaccidents. This makes them not only eco-friendly but also a safe choice for consumers.

 

With 99.97% pure copper for superior conductivity, Arizo Wires adheres to national and international standards, including the prestigious Conformité Européenne certification (CE). Designed for utmost convenience and durability, Arizo Wirespossess flexibility for better installation, while its moisture-defying armour ensure long lasting performance regardless of weather conditions. Additionally, Arizo Wires are fortified against termites and rodents, further enhancing their longevity and resilience.

 

Mr. Ramachandran V, Director & COO, V-Guard Industries Ltd commented at the launch, “We are delighted to introduce Arizo Wires, the next frontier in electrical safety and sustainability. With Arizo, consumers can trust that they are investing in a product that not only prioritizes their safety but also contributes to a cleaner, greener future.”

 

The launch of V-Guard Arizo Wires took place in a glittering ceremony at Taj Westend Bangalore, alongside two other advanced offerings - SUPERIO+ Eco Safe Wires and ELEGNA MCBs. This further strengthens V-Guard’s electrical portfolio and underscores its commitment to delivering high-quality products while prioritizing safety and sustainability.

 

Sunday 7 April 2024

‘जर तर ची गोष्ट’ची’ची शंभरी प्रिया बापटच्या आवाजातील गाणे प्रदर्शित

 


‘जर तर ची गोष्ट’ची’ची शंभरी

प्रिया बापटच्या आवाजातील गाणे प्रदर्शित 


 आजवर ‘जर तर ची गोष्ट’ या नाटकावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. प्रत्येकवेळी नाट्यगृहाबाहेर ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड झळकला. नाट्यरसिकांच्या या प्रेमामुळेच हे नाटक आता ‘शंभरी’ साजरी करतेय. नुकताच या नाटकाचा शतक महोत्सव साजरा झाला आणि दुग्धशर्करा योग म्हणजे या नाटकातील गाणेही प्रदर्शित झाले आहे. प्रिया बापटच्या आवाजातील हे सुंदर गीत नात्यातील गुपित दर्शवणारे असून संगीतप्रेमींना हे गाणे आता कुठेही ऐकता येईल. 


प्रिया बापट आणि उमेश कामत हे इंडस्ट्रीतील क्यूट कपलपैकी एक आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकत्र पाहाण्याची त्यांच्या चाहत्यांची इच्छा होती. सुमारे एका दशकानंतर ही इच्छा ‘जर तर ची गोष्ट’च्या निमित्ताने पूर्ण झाली. पाहाता पाहाता आता या नाटकाने यशाचे शिखर गाठले आहे. सर्व वयोगटाला आवडेल. असे हे कौटुंबिक नाटक असल्याने प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकवर्ग या नाटकाला लाभत आहे आणि हीच या नाटकाची जमेची बाजू ठरत आहे. यात प्रिया बापट, उमेश कामत यांच्यासह आशुतोष गोखले, पल्लवी अजय यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. कथा, दिग्दर्शन, कलाकार हे सगळे उत्तम जुळून आल्यानेच ही सर्वोत्कृष्ट कलाकृती आज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 


सोनल प्रोडक्शन निर्मित, प्रिया बापट सादर करत असलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन अद्वैत दादरकर, रणजित पाटील यांनी केले असून इरावती कर्णिक यांचे लेखन या नाटकाला लाभले आहे. नंदू कदम या नाटकाचे निर्माते आहेत. 


या नाटकाबद्दल प्रिया बापट म्हणते, ‘’ खरंतर हे सांगताना खरंच खूप आनंद होतोय की, आज आमच्या शंभराव्या प्रयोगचा टप्पा आम्ही गाठला आहे आणि इतर प्रयोगांप्रमाणे हा प्रयोगही हाऊसफुल्ल होता. एकाच वेळी मनात अनेक भावना आहेत. आनंद आहे, भारावले आहे, जबाबदारी आहे. या गोष्टी शब्दांत मांडणे अशक्यच. परंतु एक आवर्जून सांगेन, हा पल्ला गाठणे, रसिकप्रेक्षकांच्या प्रेमामुळेच शक्य झाले. तुमचे प्रेम आमच्यावर असेच राहू दे. या नाटकातील गाणेही प्रदर्शित झाले आहे. त्यामुळे ही डबल ट्रीट आहे.’’


Friday 5 April 2024

Kareena Kapoor, Kriti Sanon & Tabu starrer Crew's Music & Film - A Superstar Hit!

 


Kareena Kapoor, Kriti Sanon & Tabu starrer Crew's Music & Film - A Superstar Hit!


Crew featuring powerhouse performers Kareena Kapoor, Tabu and Kriti Sanon has taken the box office by storm, surpassing expectations and setting a new milestone as the largest worldwide opening for an Indian movie led by women.


But it is not just the film; the airwaves are abuzz with the enchanting melodies of the film's music. It has proven to be a musical success for Tips Music, which is the IP owners of the music in the film. The album features three iconic 90s recreations from Tips' catalogue - Choli Ke Peeche (Khal Nayak), Ghagra and Sona Kitna Sona Hai (Hero No. 1).


The album also features the second-biggest collaboration between Diljit Dosanjh and Badshah on the song - Naina. The soulful voice of Diljit and Badshah's on-point rap adds depth to the composition. Naina has proven to be a chart-topping hit by being a constant feature on the Trending section on YouTube and Spotify's Charts since it was released. In addition to the milestones, the album debuted on the Global Charts of Spotify at no #8.


But the success of Naina does not stop there with over 480 Million+ views on reels and counting. The song has taken social media by storm, trending across all platforms. The song received support from celebrities like Arjun Kapoor, Sonam Kapoor, Nimrat Khaira, Amana Sharif and more.


Three songs from their latest release, the highly anticipated film CREW, have secured coveted spots in AirCheck's Top 20 Most Frequently Played Songs on Radio in India for the week of March 25 - 31, 2024. Leading at the prestigious no. #1 position is the chart-topping track Choli Ke Peeche, followed by Naina at no. #9 and the iconic remake Ghagra at no. #15.


Other bangers from the album include Vishal Mishra's peppy track - Kiddan Zaalima and B Praak's heartbreak song - Darbadar. It also featured new-age artists to create fresh music like Bharg's Khwabida and Surshti Tawade's rap in Ghagra.

'महापरिनिर्वाण' निर्माते टीम ने बाबासाहेबांच्या जयंती निमित्त मानवंदना रुपी 'जय भीम' हे स्फूर्तीदायक गाणं प्रदर्शित केल आहे .

 


'महापरिनिर्वाण' निर्माते टीम ने बाबासाहेबांच्या जयंती निमित्त मानवंदना  रुपी  'जय भीम'  हे स्फूर्तीदायक गाणं प्रदर्शित केल आहे .


कल्याणी पिक्चर्स प्रस्तुत, अभिता फिल्म्स निर्मित 'महापरिनिर्वाण' ६ डिसेंबर रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. आपले अवघे आयुष्य शोषित आणि वंचितांसाठी वेचणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनाच्या बातमीने महाराष्ट्र हळहळला. त्यांच्या अंत्ययात्रेला असंख्य अनुयायी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आले होते. हा मन हेलावणारा क्षण टिपणारे नामदेवराव व्हटकर यांची जीवनगाथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात असतानाच या चित्रपटाच्या निर्माता टीमने ड्रॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी  'जय भीम' हे चैतन्यमयी गाणे प्रदर्शित केले आहे. आशिष ढोले यांची संकल्पना आणि अमोल कदम यांनी शब्दबद्ध  केलेल्या या गाण्याला रोहन -रोहन यांचे संगीत लाभले असून हे जबरदस्त गाण्याला नंदेश उमप यांचा भारदस्त आवाज लाभला आहे. 


उत्साहाने आणि उल्हासाने भरलेल्या या गाण्यात एक अभिमान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कर्तृत्व या गाण्यातून अधोरेखित होत असून अतिशय जोशपूर्ण आहे. 


चित्रपटाबद्दल निर्माते सुनील शेळके म्हणतात, '' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारसरणी केवळ देशापुरताच मर्यदित नसून संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे हे महान विचार, कर्तृत्व आम्ही या गाण्याच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि याचे सारे श्रेय अमोल कदम यांना जातेय. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण व्यक्तिमत्व या गाण्यात मांडले आहे. त्याला रोहन-रोहन आणि नंदेश उमप यांनी उत्तम न्याय दिला आहे. मनाला उभारी देणारे हे गाणे संगीतप्रेमींना नक्कीच आवडेल.''


आई -मुलीतील केमिस्ट्री उलगडणार 'मायलेक' जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला


 आई -मुलीतील केमिस्ट्री उलगडणार 'मायलेक' 

जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला 

https://youtu.be/Jtex-aCg6F4?si=MgP2ymx3iEZ2xhIf




'मायलेक' या नावावरूनच हा चित्रपट आई आणि मुलीच्या नातेसंबंधावर बेतलेला आहे, याची कल्पना आतापर्यंत सर्वांनाच आली असेल. रिअलमधील मायलेकींनी रिलमधील अनोखी कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित झाला असून हा एक कमाल कौटुंबिक चित्रपट असल्याचे दिसतेय.  या ट्रेलर लाँच सोहळ्याला मराठी सिनेसृष्टीतील अमृता खानविलकर, हर्षदा खानविलकर, संजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. 



ट्रेलरमध्ये आईमुलीचे स्ट्राँग बाँडिंग दिसत असतानाच त्यांच्या या सुंदर नात्यात दुरावा येत असल्याचेही दिसतेय. आता हा दुरावा का येतोय, यात उमेशची भूमिका काय? या ‘मायलेक’ पुन्हा एकत्र येणार, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना चित्रपट पाहून मिळणार आहेत.


ब्लुमिंग लोटस प्रोडक्शन्स, सोनाली सराओगी प्रस्तुत प्रियांका तन्वर दिग्दर्शित या चित्रपटाची सोनाली आनंद निर्माती असून या चित्रपटात सोनाली खरे, सनाया आनंद, उमेश कामत बिजय आनंद, शुभांगी लाटकर, संजय मोने यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कल्पिता खरे, बिजय आनंद  सहनिर्मिती या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य या चित्रपटाचे असोसिएट प्रोड्यूसर आहेत. आई आणि मुलीची सुंदर केमिस्ट्री 'मायलेक'मधून पाहायला मिळणार असून येत्या १९ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 


चित्रपटाबद्दल निर्माती, अभिनेत्री सोनाली खरे म्हणते, ''हा चित्रपट प्रत्येक आईमुलीची गोष्ट सांगणारा आहे. खूप संवेदनशील असे हे नाते आहे. हे नाते कधी मैत्रीचे असते तर कधी एका वेगळ्याच वळणावर जाते. त्यामुळे हे नाजूक नाते उत्तमरित्या, विचारपूर्वक हाताळणे खूप गरजेचे आहे. 'मायलेक'मधून कोणताही संदेश देण्यात आलेला नसून तुमच्या आमच्या घरातील 'मायलेकी'ची ही जोडी आहे. ज्या धमाल, मजामस्ती करत आहेत. वाईट काळात मोठे निर्णय घेताना एकमेकींना साथही देत आहेत. त्यामुळे 'मायलेक' तुम्हाला विशेषतः आईमुलीला खूप जवळचा वाटेल. माझे आणि सनायाचे नातेही असेच आंबटगोड आहे. त्यामुळे पडद्यावर या व्यक्तिरेखा साकारणे सहज शक्य झाले. हा चित्रपट संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा, असा आहे.''


’श्रीवल्ली' उर्फ रश्मिका मंदाना के बर्थडे के दिन 'पुष्पा 2: द रूल' के मेकर्स ने जारी किया नया पोस्टर, दर्शकों का बढ़ाया टीजर के लिए उत्साह



 ’श्रीवल्ली' उर्फ रश्मिका मंदाना के बर्थडे के दिन 'पुष्पा 2: द रूल' के मेकर्स ने जारी किया नया पोस्टर, दर्शकों का बढ़ाया टीजर के लिए उत्साह

'पुष्पा 2: द रूल' बिना किसी शक इस साल की मच अवेटेड फिल्मों में से एक है। इस फिल्म के पहले पोस्टर के रिलीज़ ने 'पुष्पा' के रूल की शुरुआत के लिए सिर्फ सही माहौल ही नहीं बनाता है, बल्कि यह उत्साह को और भी ऊंचाई पर ले जाता है। दिन ब दिन बढ़ती हुई उत्सुकता के बीच, मेकर्स ने नेशंस हार्टथ्रोब 'श्रीवल्ली' यानी कि रश्मिका मंदाना के जन्मदिन पर नए पोस्टर को रिलीज़ किया है, जिसकी वजह से 8 अप्रैल को टीज़र के रिलीज़ के लिए उत्साह और बढ़ गया है।

रश्मिका मंदाना के बर्थडे के खास मौके पर, 'पुष्पा 2: द रूल' के मेकर्स ने उनके 'श्रीवल्ली' के रूप में एक पोस्टर शेयर किया है, जिसमें उन्हें एक खूबसूरत साड़ी में दिखाया गया है। इसके अलावा पोस्टर में उनके अंदाज और कॉन्फिडेंस को साफ महसूस किया जा सकता है। इसके अलावा इसे शेयर करते हुए मेकर्स ने बर्थडे के मौके पर शुभकामनाएं देते हुए कैप्शन में  लिखा है:

"नेशंस हार्टथ्रोब 'श्रीवल्ली' उर्फ ​​@iamRashmika को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं 🫰🏻

8 अप्रैल को रिलीज होगा #Pushpa2TheRuleTeaser 🔥

#PushpaMassJaathara 💥

#Pushpa2TheRule 15 अगस्त 2024 को दुनिया भर में ग्रैंड रिलीज़ के लिए तैयार है।

आइकॉन स्टार @alluarjun @aryasukku #FahadhFaasil @ThisIsDSP @SukumarWritings @TSeries @PushpaMovie"

https://x.com/mythriofficial/status/1776121897018908867?s=48

श्रीवल्ली के रूप में, रश्मिका मंदाना ने 'पुष्पा द राइज' के साथ पूरी दुनिया में तहलका मचा दिया। उनकी शानदारता, स्टाइल, और 'सामी सामी' में डांस मूव्स, सब कुछ ट्रेंड बन गया। अब, फैंस उन्हें फिर से बड़े पर्दे पर 'पुष्पा 2: द रूल' में श्रीवल्ली के रूप में देखने के लिए बेसब्री से इंतजार कर रहे हैं, और इस फिल्म से उनके एक पोस्टर ने वाकई ही उत्साह को बढ़ा दिया है।

पुष्पा 2 द रूल का निर्देशन सुकुमार ने किया है और इसमें अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना और फहद फासिल नजर आने वाले हैं। माइश्री मूवी मेकर्स और मुत्तमसेट्टी मीडिया द्वारा निर्मित पुष्पा 2 द रूल 15 अगस्त 2024 को रिलीज होगी।


Monday 1 April 2024

SACHIN TENDULKAR BACKED RRP ELECTRONICS LTD UNVEILS SEMICONDUCTOR MILESTONE WITH INAUGURATION OF CUTTING-EDGE FACILITY IN MAHARASHTRA

 


SACHIN TENDULKAR BACKED RRP ELECTRONICS LTD UNVEILS SEMICONDUCTOR MILESTONE WITH INAUGURATION OF CUTTING-EDGE FACILITY IN MAHARASHTRA


23rd March 2024 in Mumbai, Maharashtra – RRP Electronics Ltd, in a historic collaboration with a prestigious European consortium, proudly announced the inauguration of Maharashtra's pioneering semiconductor facility. This groundbreaking endeavour signifies a monumental leap forward, positioning Maharashtra as a global powerhouse in semiconductor innovation and manufacturing.

The 25,000 sq ft facility witnessed the esteemed presence of Dr Anil Kakodkar, renowned Indian nuclear physicist and mechanical engineer and legendary cricketer and global cricketing icon Mr. Sachin Tendulkar along with Mr Rajendra K Chodankar - the Founder, Promoter, Chairman and CEO of RRP S4E Innovative Pvt. Ltd. (RRP S4E) officiated the ceremony.

This momentous occasion heralds the dawn of a transformative era in India's technological landscape. The state-of-the-art OSAT facility is poised to catalyze future growth, paving the path towards establishing a comprehensive R&D centre and an expanded setup encompassing multi-line OSAT and a Fab foundry, bolstered by unwavering support from the Maharashtra Government.

Embarking on a journey of innovation, RRP Electronics Ltd pledges an initial investment of INR 5,000 crores over the forthcoming five years, with equal vigour and commitment earmarked for phase II. The company remains steadfast in its pursuit of leveraging government subsidies to augment this ambitious venture.

In alignment with its steadfast commitment to excellence, RRP Electronics Ltd remains dedicated to serving key sectors such as automotive, power, electronics, and industrial markets, while concurrently propelling advancements in semiconductor-based technology. This ethos of innovation is poised to redefine industry benchmarks and propel the nation to unprecedented technological zeniths.

As a vanguard in the electronics industry, RRP Electronics Ltd epitomizes a relentless pursuit of technological advancement through strategic partnerships, innovation, and unwavering dedication to research and development. The inauguration of this cutting-edge facility underscores RRP's pivotal role in shaping the trajectory of semiconductor technology, not only in India but on a global scale.

Mr Rajendra K Chodankar - the Founder, Promoter, Chairman and CEO of RRP S4E Innovative Pvt. Ltd. (RRP S4E) says “I am exhilarated by the unveiling of Maharashtra's pioneering semiconductor facility by RRP Electronics Ltd. This momentous occasion not only marks a significant stride in our technological journey but also symbolizes our unwavering commitment to driving innovation and shaping the future of semiconductor technology. With this monumental endeavour, we stand poised to revolutionize the industry landscape, cementing Maharashtra's position as a global leader in semiconductor innovation. Together, we embark on a journey of relentless pursuit towards excellence, propelling RRP S4E and the nation to unparalleled heights of technological prowess and prosperity” further adding ”We are honoured to have Mr. Sachin Tendulkar as the strategic investor, he brings a great amount of value addition”

Dr Anil Kakodkar, renowned Indian nuclear physicist and mechanical engineer quotes, ”The inauguration of Maharashtra's pioneering semiconductor facility marks a quantum leap in India's technological prowess. I am honoured to be part of this transformative journey, propelling our nation towards unparalleled innovation and global leadership in semiconductor technology”

Sachin Tendulkar says “We live in exciting times today, when India is building industries that positively impact the world tomorrow. I’m happy to be backing technologies and entrepreneurs who are part of this story. My support for RRP Electronics’ foray into semiconductors stems from this belief. I wish the team at RRP Electronics all the very best for their endeavours”

Mukka Proteins Ltd receives orders worth Rs. 50.39 crores from Ever Light Oil Industrial Co. Ltd. and Uni Best General Trading FZE

 Mukka Proteins Ltd receives orders worth Rs. 50.39 crores from Ever Light Oil Industrial Co. Ltd. and Uni Best General Trading FZE

April 1, 2024: Mangaluru-based Mukka Proteins, manufactures fish meal, fish oil and fish soluble paste, an essential ingredient in the manufacturing of aqua feed (for fish and shrimp), poultry feed (for broiler and layer) and pet food (dog and cat food) has received Purchase Orders worth of Rs. 50.39 Crores, from M/s. Ever Light Oil Industrial Co. Ltd. and M/s. Uni Best General Trading FZE for supply of Fish Meal.

The total order book stands at Rs. 153 Crores (approx.) till date.

On this occasion, Mr. Mohammed Haris, MD and CEO, Mukka Proteins said "We are thrilled to receive this order and are fully committed to delivering exceptional products and services to exceed our customer's expectations. This order reflects our dedication to quality, innovation, and customer satisfaction, and we look forward to building a long-lasting partnership."

एक्सेल एंटरटेनमेंट की मडगांव एक्सप्रेस को देख रणबीर कपूर ने दिया सरप्राइजिंग रिएक्शन, अविनाश तिवारी ने बताई पूरी बात

 


एक्सेल एंटरटेनमेंट की मडगांव एक्सप्रेस को देख रणबीर कपूर ने दिया सरप्राइजिंग रिएक्शन, अविनाश तिवारी ने बताई पूरी बात


एक्सेल एंटरटेनमेंट की मस्ती से भरी फिल्म मडगांव एक्सप्रेस को हर तरफ से शानदार रिव्यू मिला है। हर तरफ से मिले पॉजिटिव वर्ड ऑफ़ माउथ के कारण, बॉक्स ऑफिस पर इसकी लगातार कमाई में इजाफा देखने मिल रहा है और हाल ही में यह धीरे-धीरे 20 करोड़ रुपये की ओर बढ़ रही है। फिल्म को दर्शकों और क्रिटिक के साथ-साथ फिल्म इंडस्ट्री के सदस्यों से भी खूब प्यार मिल रहा है।


एक जाने माने न्यूज़ पोर्टल से बात करते हुए, अविनाश तिवारी ने  पहली स्क्रीनिंग को याद करते हुए बताया की उन्हें हर तरफ से तारीफ मिल रही थी, लेकिन एक शख्स की तारीफ ने उनके हौसले को बढ़ा दिया। अपनी पहली स्क्रीनिंग के दौरान रणबीर कपूर से मिले रिएक्शन के बारे में बताते हुए, उन्होंने कहा, "मैं स्क्रीनिंग खत्म होने के बाद थिएटर के बाहर खड़ा था। तब मैंने रणबीर कपूर को बहार निकलकर मेरे तरफ आते देखा, वह एक अलग तरह के होश में थे। उन्होंने मुझे गले लगाया और कहा, क्या सुपरहिट फिल्म बनाई है तुम लोगों ने ! बस फाड़ दिया है। पहले दो-तीन दिनों तक किसी की न सुनें क्योंकि यह सोमवार और शुक्रवार से भी अधिक समय तक चलेगा।' मैं ऐसा था, 'सचमुच?' वह हमारे लिए बहुत उत्साहित और खुश थे। यह बहुत अच्छा लगा।"


वह इतने तक नहीं रुके उन्होंने दूसरे एक्टर्स और सेलिब्रिटीज के रीस्पॉन्सेस को भी शेयर करते हुए कहा, "करीना कपूर खान, मलायका अरोड़ा और अर्जुन कपूर ने मुझे और दिव्येंदु को घेर लिया और बात करते रहे कि फिल्म कितनी शानदार है, उन्हें कितना मजा आया और वे इसे दोबारा देखने की प्लानिंग किस तरह से बना रहे हैं। इस तरह का रिएक्शन देखना दिल खुश कर देने वाला था।"


दिव्येंदु, प्रतीक गांधी और अविनाश तिवारी अभिनीत मडगांव एक्सप्रेस ने दर्शकों को अपनी हंसी और मस्ती भरे रोमांच के रंग में सराबोर कर दिया है। फिल्म के लिए हर तरफ से पॉजिटिव रिस्पॉन्स आया है, और दर्शक अपने दोस्तों और परिवारों के साथ बड़े पैमाने पर फिल्म देखने आ रहे हैं। यह फिल्म बॉक्स ऑफिस पर अपना दम दिखा रही है और इसके द्वारा की गई कमाई फिल्म को मिल रहे प्यार का सबूत हैं। 


"बचपन के सपने... लग गए अपने," इस टैगलाइन के साथ, 'मडगांव एक्सप्रेस' को रितेश सिधवानी और फरहान अख्तर के एक्सेल एंटरटेनमेंट के बैनर तले बनाया गया है। वहीं, फिल्म को कुणाल खेमू द्वारा लिखा और डायरेक्ट किया गया है, जो अब सिनेमाघरों में रिलीज हो चुकी है और इसे सभी द्वारा खूब पसंद किया जा रहा है।


Monday 25 March 2024

वडिल - मुलगा येणार एकत्र शरद पोंक्षे - स्नेह पोंक्षे लवकरच घेऊन येणार नवीन चित्रपट

 


वडिल - मुलगा येणार एकत्र

शरद पोंक्षे - स्नेह पोंक्षे लवकरच घेऊन येणार नवीन चित्रपट



शरद पोंक्षे… मराठी कलाक्षेत्रातील एक दिग्गज नाव. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांमधून आपण त्यांचा दर्जेदार अभिनय पाहिला आहे. मात्र आता शरद पोंक्षे एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. लवकरच शरद पोंक्षे निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांचा पुत्र म्हणजेच स्नेह पोंक्षे करणार आहे. सध्यातरी या चित्रपटाचे नाव ठरलेले नसले तरी या चित्रपटाच्या निमित्ताने वडिल-मुलाची जोडी मात्र एकत्र काम करणार आहे. या चित्रपटाच्या टीमने प्रभादेवीतील सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेऊन चित्रपटाचा शुभारंभ केला. 


वि. एस. प्रोडक्शन्स व मोरया प्रोडक्शन यांच्या सहयोगाने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची पूर्व तयारी सध्या ‘प्रॅाडक्शन नं १’ या नावाने होत असून रोहिणी विजयसिंह पटवर्धन या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत तर शरद पोंक्षे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाचे लेखन स्नेह पोंक्षे याने केले आहे. ही जोडी नक्की कोणत्या विषयावर चित्रपट घेऊन आपल्या समोर येणार आहेत, हे फार औत्सुक्याचे ठरणार आहे. 


याबद्दल निर्माते शरद पोंक्षे म्हणतात, ‘’एका नवीन भूमिकेतून तुमच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे मुलाच्या सोबतीने ही वेगळी भूमिका साकारत आहे. यापूर्वी स्नेहने पाच वर्षं सह दिग्दर्शक म्हणून काम केले आहे आणि या चित्रपटाच्या निमित्ताने तो दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. मला खात्री आहे, तो ही जबाबदारी उत्तमरित्या पेलेल.’’ 


दिग्दर्शक स्नेह पोंक्षे म्हणतो,  " लवकरच हा चित्रपट आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहोत. आम्ही सुद्धा या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहोत. चित्रीकरणाला सुरूवात होणार असून विषय, शीर्षक, कलाकार हे लवकरच आम्ही जाहीर करू. पदार्पणातच वडिलांसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे, त्याचा विशेष आनंद आहे.’’