Tuesday 29 March 2022

’विशू’चे अव्यक्त मन व्यक्त करणार ‘रे मना’

 


’विशू’चे अव्यक्त मन व्यक्त करणार ‘रे मना’

https://www.youtube.com/watch?v=xVzjBXQsxR4

 दोन विभिन्न स्वभावाच्या व्यक्तींची हळुवार खुलत जाणारी प्रेमकहाणी आपल्याला 'विशू' मध्ये पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. ट्रेलरला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता 'विशू' चित्रपटातील 'रे मना' हे प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याला मंगेश कांगणे यांनी शब्दबद्ध केले असून या गाण्याला नेहा राजपाल हीच सुमधुर आवाज लाभला आहे. तर  ह्रषिकेश कामेरकर यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. 

'रे मना' हे गश्मीर महाजनी आणि मृण्मयी गोडबोले यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्यात गश्मीर आणि मृण्मयी यांच्यातील अव्यक्त प्रेम नजरेने व्यक्त करत आहेत. या गाण्याचे बोल अतिशय सुंदर असून प्रेमाच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून देणारे हे गाणे आहे. 


या गाण्याबद्दल चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक मयूर मधुकर शिंदे म्हणतात, 'नकळत झालेल्या प्रेमाची जाणीव करून देणारे हे गाणे आहे. या गाण्यात गश्मीर आणि मृण्मयी प्रेमाची न बोलता कबुली देत आहेत. या गाण्यामुळे प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची उत्सुकता अधिकच वाढेल. शहरी जीवनशैलीत वाढलेली आरवी जेव्हा गावातील लग्नातही तितकीच समरस होऊन जाते. इतकी मालवणची तिच्यावर जादू झाली आहे. कोकणातील लग्नघर कसे असते, याचेही या गाण्याच्या निमित्ताने दर्शन घडतेय.'' 

 

   श्री कृपा प्रॉडक्शन्स प्रस्तुत बाबू कृष्णा भोईर निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन, लेखन मयूर मधुकर शिंदे यांनी केले आहे. या चित्रपटात गश्मीर महाजनी, मृण्मयी गोडबोलेसोबत ऐताशा संझगिरी, मानसी मोहिले, मिलिंद पाठक, विजय निकम, संजय गुरबक्शानी, प्रज्ञेश डिंगोरकरही प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 'विशू' हा चित्रपट ८ एप्रिलपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Friday 25 March 2022

Tips Music new track "Fizool Hai" ft. Saheal Khan & Aditi Budhathoki personifies 'Romance'

 

Tips Music new track "Fizool Hai" ft. Saheal Khan & Aditi Budhathoki personifies 'Romance'

Link- https://youtu.be/xadyAZep-WU

Tips Music has released a new romantic track today on its official YouTube channel "Fizool Hai". Music by Shameer Tandon, the romantic track is a feel-good number. The words by Amit Kumaran depict deep meaning to the thoughts.


However, the high notes of Saheal Khan add to the soul of this song. The backing vocals and the nuances of different instruments in the track are soothing to the ears. No wonder, it has a repeat value and must be included in your romantic jukebox.

In today's fast-paced world where music is created in a rush, 'Fizool Hai' bears testament to the fact that good songs will find their way into the hearts of the audience.

Saheal Khan quotes saying, "Fizool Hai was such a beautiful song to shoot. I am very happy to be part of this track and I feel blessed to be part of Tips Family. I would like to thank Kumar Taurani jiii for giving me this opportunity , believing in me and for making this happen. Aditi is a great co star, she is so talented & hardworking"
 
Aditi Budhathoki says, "I have been listening to Fizool Hai on loop for the past few days. It is such a beautiful song that entrances you in every beat of its music. I was glad I got to shoot the music video because Saheal is such a fun person to shoot with that I enjoyed every moment of it."  

Shamir Tandon says "Love ballads are forever a pleasure to make because they need a music that soothes the heart. So, making something for the heart always comes from the heart and that is the USP of love songs. Fizool Hai captures the intimate feelings between couples be it love or anguish. It was important to mould the music likewise which was the interesting part of it."

Amit Kumaran says, "Fizool Hai was a very wonderful experience. Love is something very difficult to portray through words because it contains so many layers of emotions that together form the collective emotions of love. But that is also what makes it the most charming and interesting subject. This is what I wanted to portray through Fizool Hai, the layers of love and every emotion attached to it."

Wednesday 23 March 2022

चंद्रावरून झळकली 'चंद्रमुखी' सुमारे ३० फूटाच्या फोटोचे अनावरण

 


चंद्रावरून झळकली 'चंद्रमुखी' 

सुमारे ३० फूटाच्या फोटोचे अनावरण 




    प्रवेश करताच रोषणाईने झगमगलेले भव्य मैदान... सर्वत्र रंगीबेरंगी पताके... बाजूला तिकीटबारी... समोरच ३५ फुटाचा 'त्या' लावण्यवतीचा फोटो... समोर सजलेला तमाशाचा फड... गजरा आणि अत्तराचा दरवळणारा सुवास... फेटा बांधलेला रसिक समुदाय... तोंडात विडा... ढोलकीचा ताल... घुंगरांची साथ... बहारदार लावणी... रसिकांच्या टाळ्या, शिट्ट्यांचा गजर... हे वर्णन ऐकून तुम्हाला प्रश्न पडला असेल ना तमाशाचा हा फड महाराष्ट्रात कुठे रंगला आहे. तर हा धमाकेदार भव्य फड रंगला होता मुंबईतील ऑपेरा हाऊस येथे. जिथे प्रामुख्याने इंग्रजी, हिंदी आणि प्रादेशिक भाषांचे कार्यक्रम होतात. तिथे प्रथमच आज ढोलकीची थाप आणि घुंगरांचा नाद घुमत होता. निमित्त होते 'चंद्रमुखी'चे. अनेक दिवसांपासून ज्या 'चंद्रमुखी'ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते ती 'चंद्रमुखी' म्हणजेच सौंदर्याची खाण असलेली चंद्रा. या 'चंद्रा'वरील पडदा अखेर उठला असून स्वर्गलोकातील एखाद्या अप्सरेप्रमाणेच चंद्रावरून तिचे दिमाखदार आगमन झाले. ही सौंदर्यवती चंद्रा म्हणजे अमृता खानविलकर. या वेळी अमृतावर चित्रित करण्यात आलेले 'चंद्रा' हे शीर्षक गीतही सादर करण्यात आले. या गाण्याला श्रेया घोषाल हिने स्वरबध्द केले असून गाण्याचे बोल गुरू ठाकूर यांचे आहेत. तर या गाण्याला अजय-अतुल यांचे संगीत लाभले आहे. डोळे दिपवून टाकणाऱ्या या भव्य सोहळ्यात ३५ फुटाच्या 'चंद्रा'च्या फोटोचे अनावरण लाल दिवाच्या गाडीमधून आलेल्या रूबाबदार अशा दौलत देशमाने म्हणजेच आदिनाथ कोठारे याने केले. या वेळी चंद्राने आपल्या बहारदार लावणीने उपस्थितांची मने जिंकली. 


   या सोहळ्यात खऱ्या लावणी कलावंतांनाही आपली लावणी सादर केली. यात गण, गवळण, असे लावणीचे विविध प्रकार होते.  या वेळी या लोककलावंतांना चित्रपटाच्या टीमतर्फे सन्मानितही करण्यात आले. या कार्यक्रमात खरी रंगत आणली ती आबूराव -बाबूराव म्हणजेच पुष्कर श्रोत्री आणि संदीप पाठक यांनी आपल्या अनोख्या अंदाजात प्रेक्षकांचे मनोरंजन केले. काही दिवसांपूर्वीच 'चंद्रमुखी'चे टिझर प्रदर्शित झाले होते. त्यावेळी ही पाठमोरी बसून शृंगार करणारी 'चंद्रमुखी' दिसत होती. तर पिळदार शरीरयष्टी असलेला करारी दौलत देशमाने ही पाठमोरा दिसत होता. नुकताच दौलत देशमानेचा चेहरा आपल्या समोर आला आणि आता 'चंद्रा' ही प्रेक्षकांसमोर आली आहे. राजकारणात मुरलेला दौलत देशमाने आणि लावणी कलावंत यांच्या अनोख्या प्रेमाची ही कहाणी आहे. 


आपल्या भूमिकेबद्दल अमृता खानविलकर म्हणते, '' आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा सर्वात वेगळी आणि ताकदीची भूमिका मी ‘चंद्रमुखी’मध्ये साकारत आहे. चंद्रा ही एक लावणी कलावंत असून लावणी कलावंतांचे जीवन ती प्रेक्षकांसमोर आणणार आहे. मला खूप आनंद आहे की, अशा प्रकारची भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली आहे. अनेक दिवसांपासूनच्या 'चंद्रमुखी'च्या उत्सुकतेला आज पूर्णविराम मिळाला आहे. जी उत्सुकता तुम्हाला होती, तशीच उत्सुकता आता मला चित्रपट झळकण्याची आहे. हा चित्रपट आम्ही या लोककलावंताना समर्पित करत आहोत. या निमित्ताने त्यांना व्यासपीठ मिळवून देण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न असून या भव्य चित्रपटाचा अनुभव प्रेक्षकांनी चित्रपटगृहातच घ्यावा.'’


चित्रपटाचे दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणतात, '' 'चंद्रमुखी'चा चेहरा प्रेक्षकांसमोर कधी येणार, याची आम्ही सुद्धा आतुरतेने वाट पाहात होतो. मात्र यासाठी आम्ही योग्य वेळेच्या  शोधात होतो आणि अखेर ती योग्य वेळ आली आहे. चंद्रा ही अशी लावण्यवती आहे, जिच्या सौंदर्याने कोणीही घायाळ होईल. आपल्या सौंदर्याने, अदांनी समोरच्याला मोहात पडणारी 'चंद्रा' लढवय्यी आहे. तिच्या या लढ्याला यश मिळते का, हे 'चंद्रमुखी' पाहिल्यावरच कळेल.'' तर संगीतकार अजय -अतुल म्हणतात, '' हा एक भव्य चित्रपटअसल्याने त्याच्या गाण्यांची भव्यताही तितक्याच ताकदीची हवी होती. चंद्रासारख्या सौंदर्यवतीला साजेशी अशी गाणी या चित्रपटात आवश्यक असल्याने यासाठी आम्ही बरीच मेहनत घेतली. यात आम्हाला दिग्दर्शक प्रसाद ओक यांच्यासह चित्रपटाच्या टीमची बरीच मदत झाली. लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. त्यामुळे आमच्या या गाण्यांना अमृताने तिच्या नृत्याच्या अदाकारीने चारचाँद लावले आहेत.'' 


तर 'प्लॅनेट मराठी'चे संस्थापक, प्रमुख अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ''इतक्या महिन्यांपासून प्रेक्षकांनी जी उत्सुकता ताणून ठेवली होती, त्या 'चंद्रमुखी'चा चेहरा अतिशय थाटात प्रेक्षकांसमोर आला आहे. हा एक भव्यदिव्य चित्रपट असून राजकारणाभोवती फिरणारी एक आगळीवेगळी प्रेमकहाणी यात पाहायला मिळणार आहे. हा सोहळा ब्रिटिश कालीन ऑपेरा हाऊसमध्ये करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे या ठिकाणाला ऐतिहासिक महत्व आहे आणि लावणी ही आपल्या महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा एक वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे. त्यामुळे जिथे इंग्रजी आणि हिंदी भाषांना प्रतिष्ठेचे स्थान दिले जाते, तिथे आपली अभिजात परंपरा सादर व्हावी, हा आमचा अट्टाहास होता. या निमित्ताने या लोककलावंतांना एक व्यासपीठही मिळाले.'' तर गोल्डन रेशो फिल्म्सचे सीओओ पियुष सिंग म्हणतात, ''चंद्रमुखी' आम्हाला कोणत्याही माध्यमात प्रदर्शित न करता तो चित्रपटगृहातच प्रदर्शित करायचा होता. म्हणूनच आम्ही इतकी प्रतीक्षा केली. आता शंभर टक्के आसनक्षमतेला परवानगी असल्याने या चित्रपटाचा आनंद प्रेक्षकांनी सिनेमागृहातच घ्यावा.  चित्रपटाची टीम आणि अजय -अतुलची अफलातून गाणी या दोन्ही गोष्टी एकत्र आल्याने एक उत्तम योग जुळून आला आहे.''


   विश्वास पाटील यांच्या 'चंद्रमुखी' कादंबरीवर आधारित, अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन प्रस्तुत फ्लाइंग ड्रॅगन एंटरटेनमेंट, लाइटविदिन एंटरटेनमेंट सहप्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले असून पटकथा, संवाद चिन्मय मांडलेकर यांचे आहेत. 'नटरंग'नंतर बऱ्याच काळानंतर अजय -अतुल यांचे दमदार संगीत प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या छायाचित्रणाची धुरा संजय मेमाणे यांनी सांभाळली असून 'चंद्रमुखी' येत्या २९ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Thursday 17 March 2022

'चंद्रमुखी'तील 'दौलत' आला समोर आदिनाथ कोठारे साकारणार ध्येयधुरंदर राजकारणी



 'चंद्रमुखी'तील 'दौलत' आला समोर 

आदिनाथ कोठारे साकारणार ध्येयधुरंदर राजकारणी

विश्वास पाटील यांच्या 'चंद्रमुखी' या कादंबरीवर आधारित 'चंद्रमुखी' या चित्रपटाचा टिझर काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर झळकला. खरंतर घोषणेपासूनच हा चित्रपट अनेकांसाठी चर्चेचा विषय होता आणि टिझरनंतर या चर्चांना अधिकच उधाण आले. त्यात टिझरमध्ये कोणत्याच कलाकाराचा चेहरा समोर न आल्याने ही उत्सुकता अधिकच वाढली. टिझरमध्ये पिळदार शरीरयष्टी असणारा पाठमोरा 'तो' ध्येयधुरंदर राजकारणी दिसत आहे. हा चेहरा कोण असेल याविषयी अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. अखेर या प्रश्नाला पूर्णविराम देत ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर आली आहे. महाराष्ट्रातील एक असा नेता जो समाजाच्या हितासाठी, प्रत्येकाला मदत करण्यासाठी तत्पर असणारा, महाराष्ट्राची लोककला जपणारा, त्यांचे हक्क मिळवून देणारा आणि आपल्या ध्येयपूर्तीसाठी धडपडणारा 'दौलत देशमाने' आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या दमदार दौलतच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसणार आहे.


  अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन्स प्रस्तुत, फ्लाइंग ड्रॅगन एंटरटेनमेंट, लाइटविदिन एंटरटेनमेंट सहप्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले असून पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर यांचे आहेत. तर या चित्रपटाला अजय -अतुल यांचे जबरदस्त संगीत लाभले आहे. ‘चंद्रमुखी’ येत्या २९ एप्रिल रोजी चित्रपटगृहात आपल्या भेटीला येणार आहे. 


 आदिनाथ कोठारे भूमिकेबद्दल म्हणतो, ''निर्मिती, दिग्दर्शन, बॉलिवूड चित्रपट केल्यानंतर आता बऱ्याच काळाने आपल्या भाषेत अभिनय करत आहे आणि त्यातही इतकी दमदार भूमिका साकारण्याची संधी मिळतेय, त्यामुळे यापेक्षा वेगळा आनंद कोणता असूच शकत नाही. भूमिकेबद्दल सांगायचे तर यापूर्वीही मी राजकारण्याची भूमिका साकारली आहे. मात्र ही भूमिका खूप वेगळी आहे. एक असा राजकारणी ज्याची आयुष्यात काही ध्येय आहेत. तो समाजकल्याणासाठी, हक्कांसाठी लढत, धडपडत आहे. त्याच्या या धडपडीला यश मिळेल का, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल. प्रसाद ओक यांच्यासोबत काम करण्याचा एक वेगळाच अनुभव आहे. व्यक्तिरेखेबद्दलची प्रतिमा त्यांच्या डोक्यात निश्चित असल्याने समोरच्याकडून अपेक्षित आणि उत्तम अभिनय ते करून घेतात. माझ्या ह्या भूमिकेसाठी मी घेतलेल्या मेहनतीविषयी सांगायचे तर, प्रत्येक कलाकाराला कोणतीही भूमिका साकारताना त्या व्यक्तिरेखेशी समरस होण्यासाठी मेहनत ही घ्यावीच लागते. त्या व्यक्तिरेखेचा अभ्यास करावाच लागतो. तसाच ह्या व्यक्तिरेखेच्या देहबोलीचा, वागण्यातील करारीपणाचा अभ्यास मी नक्कीच केला.'' तर दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणतात, ''यापूर्वी मी आदिनाथचे काम पाहिले आहे. त्यामुळे दौलतच्या व्यक्तिरेखेत तो चपखल बसला. त्याने त्याच्या भूमिकेला शंभर टक्के न्याय दिला आहे. टिझरमध्येच आपल्याला दौलतच्या व्यक्तिरेखेचा अंदाज आला आहे. त्यामुळे पडद्यावर दौलत काय करणार आहे, हे प्रेक्षकांना कळेलच. आता 'चंद्रमुखी' समोर यायची आहे. तीही लवकरच आपल्या भेटीला येईल.'' 


 प्लॅनेट मराठी’चे संस्थापक, प्रमुख अक्षय बर्दापूरकर 'चंद्रमुखी'विषयी म्हणतात, ''आतापर्यंत 'प्लॅनेट मराठी'ला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. म्हणूनच त्यांच्यासाठी आम्ही 'चंद्रमुखी'सारखा भव्य चित्रपट घेऊन येत आहोत. इतर कोणत्याही माध्यमावर हा चित्रपट प्रदर्शित न करता केवळ चित्रपटगृहातच या चित्रपटाची भव्यता प्रेक्षकांनी अनुभवावी, असा आमचा अट्टाहास असल्याने आम्ही इतका काळ प्रतीक्षा केली. पन्नास टक्के आसन क्षमता असतानाही हा चित्रपट प्रदर्शित करण्याचे टाळले. आता शंभर टक्के आसन क्षमता असल्याने प्रदर्शनाची हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे लवकरच ‘चंद्रमुखी’ आपल्या भेटीला येणार आहे. यात प्रेक्षकांना राजकारण आणि त्याभोवती फिरणारी प्रेमकहाणी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची कथाही एकदम दमदार आहे. आम्हाला आनंद आहे की, असे चित्रपट आम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत.''


गोल्डन रेशो फिल्म्सचे सीओओ पियुष सिंग म्हणाले, ‘’प्लॅनेट मराठी सोबत ‘चंद्रमुखी’सारखा भव्य चित्रपट करायला मिळणे म्हणजे आमच्यासाठीही ही एक सुवर्णसंधी आहे. बऱ्याच मोठ्या काळानंतर इतका भव्य मराठी सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अजय-अतुल या अफलातून जोडीचे मराठीत पुनरागमन होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा संगीतप्रेमींना त्यांच्या तालावर थिरकायला मिळणार आहे.’’

Tuesday 15 March 2022

'मी वसंतराव' उलगडणार वसंत देशपांडेपासून पंडित वसंतराव देशपांडेंपर्यंतचा प्रवास… 'मी वसंतराव'चा ट्रेलर प्रदर्शित !

 



'मी वसंतराव' उलगडणार वसंत देशपांडेपासून पंडित वसंतराव देशपांडेंपर्यंतचा प्रवास…


'मी वसंतराव'चा ट्रेलर प्रदर्शित !


जिओ स्टुडिओज् प्रस्तुत 'मी वसंतराव' हा सुरांची सांगितिक मैफील असलेला चित्रपट गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच १ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.


तुमचं घराणं कोणतं, या खोचक प्रश्नावर ‘माझं घराणं हे माझ्यापासूनच सुरू होतं’ हे धाडसी उत्तर देण्याची ताकद असलेल्या पं. वसंतराव देशपांडे यांनी स्वताःला त्यांच्या गायकीतून सिद्ध केलं. 


पंडित वसंतराव देशपांडे हे एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व. शास्त्रीय संगीतानं नटलेली एखादी बंदिश असो, वा चित्रपटातील भावगीत असो, अथवा नाट्यगीत असो या प्रत्येक संगीत प्रकारावर वसंतरावांची गायकी आपला ठसा उमटवून जाते. 


वसंतरावांची सांगितिक कारकीर्द अनेकांना माहित आहे परंतु त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी, त्यांच्या सांगितिक प्रवासाविषयी कमी माहिती आहे. आणि नेमका हाच प्रवास 'मी वसंतराव' या चित्रपटाद्वारे मध्ये प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.



वसंतरावांची गोष्ट म्हणजे अक्षरशः अनेक अडथळ्यांवर, संकटांवर आणि अपमानांवर मात करून स्वताःची ओळख निर्माण करणाऱ्या कलाकाराच्या प्रवासाची ही गोष्ट आहे.


'मी वसंतराव' या चित्रपटाचा ट्रेलर सोहळा नुकताच ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी, राहुल देशपांडे, अनिता दाते, सारंग साठ्ये, कौमुदी वालोकर, अमेय वाघ यांच्यासह सुबोध भावे, हृषिकेश जोशी, जितेंद्र जोशी आदी कलाकार उपस्थित होते. 


ज्येष्ठ अभिनेते आणि प्रमुख पाहुणे नाना पाटेकर 'मी वसंतराव'च्या ट्रेलर लाँच निमित्ताने म्हणाले, '' पु. ल. देशपांडे म्हणायचे, मोठी माणसं जात नसतात. ती संगीत रूपानं चिरंतन राहतात. हे वाक्य वसंतरावांच्या बाबतीत तंतोतंत जुळतं. वसंतरावांना भावगीत, ठुमरी, नाट्यगीत, गझल, लावणी अशा सगळ्याच प्रकारची गायकी यायची. गायकी त्यांच्या नसनसात भिनलेली होती. त्यांचा साहित्याचा अभ्यासही अफाट होता. मी वसंतरावांना भेटलो आहे. त्यांच्या सान्निध्यात आल्यानं एक व्यक्ती म्हणून मला त्यांना जवळून अनुभवता आले. 'मी वसंतराव'बद्दल बोलायचं तर हा चित्रपट मी पाहिला आहे आणि तो इतका अप्रतिम आहे की, अनेकदा मी हा चित्रपट पाहू शकतो. संगीतातील मला फारसं काही कळत नाही. त्यामुळे त्याबद्दल मी फारसं बोलणार नाही. मात्र हा मराठीतील एक उत्कृष्ट चित्रपट ठरणार आहे. राहुल संगीत उत्तमच सादर करणार याची मला खात्री होतीच, मात्र एक कलाकार म्हणूनही राहुल सर्वोत्कृष्ट असल्याचं त्यानं सिद्ध केलं आहे. चित्रपटातील प्रत्येकानंच अप्रतिम कामं केली आहेत.”


'मी वसंतराव'च्या प्रवासाबद्दल राहुल देशपांडे म्हणतात, ''आपण स्वतःचा जितका चहुबाजूनं शोध घेऊ, तितकं आपण समृद्ध होतो. याचा अनुभव मला 'मी वसंतराव' करताना आला. या प्रवासात एक कलाकार आणि मुख्य म्हणजे एक व्यक्ती म्हणून मी वृद्धिंगत झालो. आजोबा आणि त्यांची गायकी हा माझ्यासाठी मुळात जिव्हाळ्याचा विषय. मला आजोबांचा सहवास जास्त लाभला नाही. मात्र आजीकडून, आईवडिलांकडून, नातेवाईकांकडून आणि त्यांच्या सान्निध्यात आलेल्या व्यक्तींकडून मला त्यांना समजून घेता आलं. त्यांची गाणी ऐकली, रेकॉर्डिंग्स पाहिले. त्यातील बारकावे, हावभाव याचा मी अभ्यास केला. वयाच्या प्रत्येक टप्प्यांवर आजोबांमधील बदल माझ्यात उतरवणं माझ्यासाठी तसं आव्हानात्मक होतं. मला शारीरिक मेहनतही तितकीच घ्यावी लागली. कुठेही त्यांच्या व्यक्तिमत्वाला धक्का पोहोचू नये, याची माझ्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम पुरेपूर काळजी घेत होतो. 'मी वसंतराव' म्हणजे त्यांच्या जीवनकार्याला वाहिलेली आदरांजली आहे.'' 


आपल्या 'मी वसंतराव'च्या अनुभवाबद्दल निपुण धर्माधिकारी म्हणतात, ''मी आणि राहुलने पाहिलेलं हे स्वप्न आहे, आज नऊ वर्षांनी प्रत्यक्षात उतरत आहे. पहिल्यांदाच मी बायोपिक या प्रकारचा चित्रपट बनवत आहे. एखादी प्रसिद्ध व्यक्तिरेखा पडद्यावर दाखवणं निश्चितच सोपं नसतं, ही प्रक्रिया खूप आव्हानात्मक  असते. वसंतरावांबद्दल बोलायचं तर त्यांना समजून घेणं खूप अवघड होतं कारण त्यांच्या स्वभावाचे अनेक विविध पैलू समोर येत गेले. अखेर अनेक संशोधनातून आणि राहुलच्या मदतीने आज हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.


राहुलने घेतलेली मेहनत आपल्याला आतापर्यंत दिसली आहेच. पण अमेय वाघ (दीनानाथ मंगेशकर), पुष्कराज चिरपुटकर (पु. ल. देशपांडे), अनिता दाते (वसंतरावांची आई), कौमुदी वालोकर (वसंतरावांची पत्नी) दुर्गा जसराज (बेगम अख्तर) यांच्यासह सगळ्याच कलाकारांनी आपल्या व्यक्तिरेखेचा अभ्यास करून त्यांना योग्य न्याय दिला आहे.”


जिओ स्टुडिओज प्रस्तुत 'मी वसंतराव' या चित्रपटाची निर्मिती चंद्रशेखर गोखले, दर्शन देसाई, निरंजन किर्लोस्कर यांनी केली असून निपुण अविनाश धर्माधिकारी  दिग्दर्शक आहेत. या चित्रपटात राहुल देशपांडे, अनिता दाते, पुष्कराज चिरपुटकर, कौमुदी वालोकर आणि अमेय वाघ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Monday 14 March 2022

‘विशू’च्या आयुष्यात ‘ती’ येणार ? टिझर सोशल मीडियावर प्रदर्शित


‘विशू’च्या आयुष्यात ‘ती’ येणार ? 

टिझर सोशल मीडियावर प्रदर्शित 


मयूर मधुकर शिंदे दिग्दर्शित, एक आगळीवेगळी प्रेमकहाणी असलेला ‘विशू’ हा कौटुंबिक चित्रपट ८ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. पोस्टरपासूनच या चित्रपटाविषयी उत्सुकता होती आणि आता नुकताच या चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून तोही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. गश्मीर महाजनी आणि मृण्मयी गोडबोले प्रथमच या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र पडद्यावर झळकणार आहे. 


टिझरमध्ये निसर्गरम्य कोकण व आपल्या प्रेमाचा शोध घेणारा ‘विशू’ दिसत आहे. ‘ती’ला न भेटताही तिला मिस करणाऱ्या ‘विशू’च्या आयुष्यात ‘ती’ येणार का? याचे उत्तर मात्र ‘विशू’ पाहिल्यावरच मिळेल. गश्मीर महाजनी, मृण्मयी गोडबोले यांच्यासोबत या चित्रपटात ऐताशा संझगिरी, मानसी मोहिले, मिलिंद पाठक, विजय निकम, संजय गुरबक्शानी, प्रज्ञेश डिंगोरकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.


चित्रपटाचे दिग्दर्शक मयूर मधुकर शिंदे म्हणतात, ‘’ ही एक अनोखी प्रेमकहाणी असून इमोशनल आणि प्रॅक्टिकल अशा भिन्न विचारांच्या व्यक्ती एकत्र येतात, तेव्हा त्यांचा प्रवास कसा होतो, हे ‘विशू’मध्ये पाहायला मिळणार आहे. गश्मीर आणि मृण्मयी हे पहिल्यांदाच एकत्र काम करत असूनही त्यांची केमिस्ट्री खूपच छान जुळून आली आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट असून आपल्या गावाशी नाळ जोडणारा आहे.’’


गशमीर आणि मृण्मयी आपल्या भूमिकेविषयी म्हणतात, ‘प्रेमाचा वेगळाच ट्विस्ट यात पाहायला मिळणार आहे. दोन परस्परविरोधी व्यक्ती जेव्हा एकमेकांच्या सहवासात येतात तेव्हा नकळत त्यांच्यातील नाते बहरत जाते आणि ते एका वेगळ्याच वळणावर येते. हा प्रवास म्हणजे ‘विशू’. कोकणात चित्रीकरण करताना खूप मजा आली. आमची केमिस्ट्री प्रेक्षकांना नक्कीच पडद्यावर पाहायला आवडेल.’’


   श्री कृपा प्रॉडक्शन्स प्रस्तुत बाबू कृष्णा भोईर निर्मित या चित्रपटाचे लेखन मयूर मधुकर शिंदे यांनी केले आहे. या चित्रपटाचे पटकथा व संवाद ऋषिकेश कोळी यांचे असून या चित्रपटाला ऋषिकेश कामेरकर यांचे संगीत लाभले आहे तर गाण्यांचे बोल मंगेश कांगणे यांचे आहेत. ‘विशू’चे छायाचित्रण मोहित जाधव यांनी केले आहे.

'पॉंडीचेरी', पॉंडीचेरीमध्ये पहिल्यांदाच झळकला मराठी चित्रपट १८ मार्चपासून 'प्लॅनेट मराठी' ओटीटीवर



 'पॉंडीचेरी', पॉंडीचेरीमध्ये पहिल्यांदाच झळकला मराठी चित्रपट 

१८ मार्चपासून 'प्लॅनेट मराठी' ओटीटीवर 


     काही दिवसांपूर्वी 'पॉंडीचेरी' हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. स्मार्टफोनवर चित्रित होऊन चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा हा भारतातातील पहिला चित्रपट आहे. सचिन कुंडलकर दिग्दर्शित या चित्रपटात सई ताम्हणकर, वैभव तत्ववादी, अमृता खानविलकर, नीना कुळकर्णी, महेश मांजरेकर, गौरव घाटणेकर, तन्मय कुलकर्णी यांच्यासोबत आणखी एक प्रमुख व्यक्तिरेखा आहे आणि ही व्यक्तिरेखा म्हणजे 'पॉंडीचेरी' शहर. या निसर्गरम्य, रंगीबेरंगी शहरात नात्यांना हळुवार रंगवणारी एक प्रेमकहाणी पाहायला मिळत आहे. नात्याची एक वेगळी परिभाषा अधोरेखित करणाऱ्या या सिनेमाने चित्रपटगृहात यशस्वी वाटचाल केल्यानंतर आता हा चित्रपट 'प्लॅनेट मराठी' ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. विशेष अभिमानास्पद बाब म्हणजे या चित्रपटाचा पॉंडीचेरीमधील चित्रपट महोत्सवात विशेष शोसुद्धा सादर करण्यात आला. या व्यतिरिक्त तेथील चित्रपटगृहातही 'पॉंडीचेरी'चे शोज लावण्यात आले आहेत. पॉंडीचेरी शहरात मराठी चित्रपट झळकण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि या सगळ्यात पॉंडीचेरी सरकारच्या सांस्कृतिक विभागाचे विशेष सहकार्य लाभले आहे. 


    'पॉंडीचेरी'च्या यशाबद्दल 'प्लॅनेट मराठी' ओटीटीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, '' पॉंडीचेरीसारख्या अमराठी शहरातील चित्रपटगृहात मराठी चित्रपट झळकावा, ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. यासाठी आम्ही पॉंडीचेरी सरकारचे विशेष आभार मानतो, त्यांनी आम्हाला ही संधी दिली. नेहमीच्या प्रेमकहाणीपेक्षा ही एक वेगळी प्रेमकहाणी आहे, जी प्रेक्षकांना नक्कीच भावेल. चित्रपटगृहाच्या प्रदर्शनानंतर आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचे मुख्य कारण म्हणजे जगभरातील मराठी प्रेक्षकही हा चित्रपट कुठेही आणि कधीही पाहू शकतील. या चित्रपटात बरेच प्रयोग करण्यात आले आहेत. मुख्य म्हणजे हा चित्रपट स्मार्टफोनवर चित्रित करण्यात आला आहे. याची जाणीव चित्रपट पाहताना अजिबात होत नाही. प्रत्येक सीन, तिथले आजूबाजूचे सौंदर्य खूपच बारकाईने टिपण्यात आले आहेत. कलाकारांसह केवळ पंधरा लोकांसोबत चित्रित करण्यात आलेल्या या चित्रपटाला कलाकारांनी मेकअपशिवाय त्यांच्या अभिनयाच्या सौंदर्याने चारचाँद लावले आहेत.'' 


     अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी आणि क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन प्रस्तुत 'पॉंडीचेरी' या चित्रपटात सचिन कुंडलकर यांनी दिग्दर्शनासोबतच लेखक आणि निर्मात्याचीही भूमिका बजावली आहे. तर नील पटेलही चित्रपटाचे निर्माता आहेत. मोहमाया फिल्म्स आणि इंक टॅंक निर्मित हा चित्रपट १८ मार्चपासून प्रेक्षकांना 'प्लॅनेट मराठी'ओटीटी पाहता येणार आहे.

Gallagher Completes India Acquisition Rebrands Indian Entity to Global brand to drive further growth in the Indian market


 Gallagher Completes India Acquisition

Rebrands Indian Entity to Global brand to drive further growth in the Indian market

 

Mumbai, March 14, 2022: Gallagher, a global insurance brokerage, risk management and consulting services firm, today announced the rebranding of its India business to the Gallagher global brand. The complete integration and rebranding will be in effect from 14th March 2022. The rebranded entity will be known as Gallagher Insurance Brokers Private Limited.

Gallagher Insurance Brokers Private Limited is one of the leading providers of risk management services, general insurance broking and risk solutions in India. Established in 2005, the company is headquartered in Mumbai with regional presence across Bengaluru, Bhubaneshwar, Chennai, Delhi, Gurugram, Guwahati, and Kolkata.

Gallagher acquired 30% of Edelweiss Insurance Brokers Ltd. in 2019, empowering the Indian broker with a full array of advisory services, best practices, and product innovation capabilities.

Subsequently, in July 2021, Gallagher fully acquired the Indian broker, marking its maiden presence in India and giving the company a footprint in the growing Indian insurance market. The rebrand underscores Gallagher’s commitment to innovation and customer excellence in the Indian market. The customers will continue to benefit from the highest level of service in addition to gaining access to a larger suite of insurance products and services under the Gallagher brand.

Vyvienne Wade, Chairperson of Global Broking in Europe, Middle East, & Asia, Gallagher commented: “This marks the first time the standalone Gallagher brand has been used in India and is a significant step as we continue to expand our footprint globally. Our partnership with the India team under the leadership of Vinay Sohani has been a great success and this further alignment with our global business gives us a springboard for future growth. We view India as a key growth market for Gallagher given its size and scale, and we see many opportunities for further development of the business with the current talented team in place.”

 

Vinay Sohani, MD & CEO, Gallagher Insurance Brokers Ltd. added, “Being a fully integrated part of Gallagher in India will add a lot of value to the business in the long run bringing to our clients access to a larger and more sophisticated suite of insurance products and best-in-class service standards. The integration is also aligned with our company's ambitious business expansion and endeavour of becoming India’s leading insurance and reinsurance broker, providing pathbreaking risk management solutions. Moreover, it strengthens our risk management expertise and puts us on an accelerated path to market leadership”

रेल्वे पोलीस मित्र यांच्याकडून महिला दिन साजरा



 रेल्वे पोलीस मित्र यांच्याकडून महिला दिन साजरा



जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने. .. आज पोलीस मित्र वसई यांच्या वतीने वसई रोड रेल्वे पोलीस ठाणे येथे कार्यरत असणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.
       पोलीस महिला या नेहमीच सर्व ठिकाणी तत्पर असता.  घर असो वा कामाची वास्तू त्या सर्व ठिकाणी आज आघाडीवर काम करत असतात . कोरोना असो वा रोजचं कामकाज, महिला पोलिस नेहमी महत्त्वाची भूमिका बजावतात.

      त्यामुळे पोलिस मित्र ह्यांनी त्यांच्या सन्मान करायचा उपक्रम केला. वसई पोलीस मित्रांच्या वतीने पोलीस स्टेशनमधील ३५ पोलिस महिलांना भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले.

त्याच सोबत वसई रेल्वे पोलिस स्टेशन मधील सदैव तत्पर असलेले होमगार्ड श्री. आशिष गुप्ता आणि त्यांचे सहकारी श्री. गायकवाड ह्यांनी एका अज्ञात व्यक्ती चा जीव वाचवून त्याला त्याच्या कुटुंबच स्वाधीन करून कुटुंबाची हनी टाळली ह्या बद्दल त्यांचे विशेष सन्मान करण्यात आला .

          कार्यक्रमास वसई रोड रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन इंगवले, वसई मित्र.  उस्टेज सिक्वेरिया ,सौ गीता गायकवाड ,मनीषा वाघ,तेजनदर राईत, संगीता सरढाना, हजर होते.

Saturday 12 March 2022

Sufiscrore, Deepak Pandit & Pratibha Singh Baghel new offering "Saiyaan Bina" will feed your soul with positivity and warmth

 



Sufiscrore, Deepak Pandit & Pratibha Singh Baghel new offering "Saiyaan Bina" will feed your soul with positivity and warmth



“Saiyaan Bina" is a traditional thumri in raag mishra pahadi. This thumri was originally sung and made popular by Ustad Nazakat Ali & Salamat Ali Khan sahab who were renowned classical artists par excellence. Inheritance’s Saiyaan Bina is inspired by this legendary duo. There are several artists who have rendered it in the past. The video for Deepak Pandit and Pratibha Singh Baghel’s rendition of Saiyaan Bina from Inheritance released today on Friday, March 11 through the Sufiscore YouTube channel.

Sufiscrore representative says " Saiyaan Bina will assail your senses, calming the mind in one magnificent sweep of transcendental sound. We aim to provide the best to the audience by giving them musical pleasures"

Music Produced by Deepak Pandit, Singer: Pratibha Singh Baghel, Music Co-Produced by Gaurav Vaswani, Solo Violin: Deepak Pandit, Tabla: Prashant Sonagra, Stringed Instruments: Tapas Roy, Live Orchestra: Budapest Live Symphony Orchestra, Recorded and Mixed at: Seven Heaven Studios, Mumbai, Recording Engineers: K. Sethuraman, Sanket Tole, Ezekiah Naniwadekar, Harshul Khadse, Anushree Manjrekar, Dolby Atmos and Stereo Mixing Engineer : K. Sethuraman, Mastering Engineer : Christian Wright- Abbey Road Studios (London)

Friday 11 March 2022

गश्मीर मृण्मयीला म्हणतोय 'ही जादू तुझी' 'विशू' मधील गाणे प्रदर्शित



गश्मीर मृण्मयीला म्हणतोय  'ही जादू तुझी'

'विशू' मधील गाणे प्रदर्शित

    'विशू' एक अनोखी प्रेमकहाणी घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले होते. आता या चित्रपटातील पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. प्रेमात पडल्यावर भावना अबोल होतात आणि डोळे बोलू लागतात, सर्वत्र तिचा, त्याचा भास होऊ लागलो, दिवसाही स्वप्नं पडू लागतात. सारं काही जादुई वाटते, अशी ही प्रेमाची जादू या गाण्यातून सर्वत्र पसरणार आहे. 'ही जादू तुझी' असे या गाण्याचे बोल असून हे गाणे मृण्मयी गोडबोले आणि गश्मीर महाजनी यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. हे एक रोमँटिक साँग असून या गाण्यात गश्मीर मृण्मयीच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचे दिसत आहे. गाण्याचे बोल, संगीत रसिकांना भावणारे असून प्रत्येकाला प्रेमात पाडणारे हे गाणे आहे. 

    'विशू'बद्दल मृण्मयी गोडबोले आणि गश्मीर महाजनी म्हणतात, ''या चित्रपटात एक सुंदर प्रेमकहाणी पाहायला मिळणार आहे. 'ही जादू तुझी' हे चित्रपटातील पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. खूपच सुंदर आणि प्रेमाची तरल भावना व्यक्त करणारे हे गाणे आहे. प्रत्येक प्रियकर- प्रेयसीला आपल्या प्रेमाच्या 'त्या' सुंदर दिवसांची आठवण करून देणारे हे गाणे आहे. 'विशू'च्या निमित्ताने आम्ही दोघे एकत्र स्क्रीन शेअर करणार आहोत. प्रेक्षकांना आमची केमिस्ट्री नक्कीच आवडेल.'' 

     'ही जादू तुझी' या गाण्याला मंगेश कांगणे यांनी शब्दबद्ध केले असून हृषिकेश कामेकर यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. तर या प्रेमगीताला आवाजही हृषिकेश कामेकर यांचाच लाभला आहे. श्री कृपा प्रॉडक्शन्स प्रस्तुत बाबू कृष्णा भोईर निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन, लेखन मयूर मधुकर शिंदे यांनी केले आहे. या चित्रपटात गश्मीर, मृण्मयीसोबत ऐताशा संझगिरी, मानसी मोहिले, मिलिंद पाठक, विजय निकम, संजय गुरबक्शानी, प्रज्ञेश डिंगोरकरही प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 'विशू' हा चित्रपट ८ एप्रिलपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Tuesday 8 March 2022

'मी वसंतराव'चे संगीत श्रोत्यांच्या भेटीला.. शंकर महादेवन यांच्या उपस्थितीत रंगला संगीत सोहळा !

 


'मी वसंतराव'चे संगीत श्रोत्यांच्या भेटीला.. शंकर महादेवन यांच्या उपस्थितीत रंगला संगीत सोहळा !


तुमचे घराणे कोणते? या खोचक प्रश्नावर 'माझं घराणं माझ्यापासूनच सुरु होतं' हे धाडसी उत्तर देण्याची ताकद पंडित वसंतराव देशपांडे यांनी त्यांच्या गायकीतून सिद्ध केली. उन्मुक्त मोकळेपण त्यांच्या स्वरातून आणि आविर्भावातून कायमच व्यक्त होत आले आहे. या असामान्य गायकाने शास्त्रीय संगीताला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. आणि आता या महान कलाकाराच्या जीवनावर आधारित 'मी वसंतराव' हा चित्रपट गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर म्हणजेच १ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महत्वाचं म्हणजे वसंतरावांचे नातू आणि प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे, या चित्रपटाच्या निमित्ताने संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत.



आजपासून या चित्रपटातील गाणी रसिकांच्या भेटीला आली असून हा सांगितिक सोहळा सुप्रसिद्ध गायक, संगीतकार शंकर महादेवन यांच्या उपस्थितीत पार पडला. यानिमित्ताने राहुल देशपांडे यांनी आपल्या आजोबांनी अजरामर केलेलं नाट्यगीत 'घेई छंद' एका नव्या दमदार रूपात सादर केले. आणि याच सप्तरंगी अल्बममधील ‘घेई छंद’ याच गाण्याचा पहिला व्हिडीओ आज प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.



या चित्रपटाचे संगीत म्हणजे प्रेक्षकांसाठी मुक्त अशा विविध रंगांची उधळण असणार आहे. यात ठुमरी, भैरवी, शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भक्तीगीत, गझल इ. असे संगीताचे विविध प्रकार ऐकायला, पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात एकूण बावीस गाणी असून मनाला भिडणाऱ्या या गाण्यांना दिग्गज गायकांचे स्वर लाभले आहेत. यात श्रेया घोषाल, उस्ताद रशीद खान, राहुल देशपांडे, आनंद भाटे, विजय कोपरकर, अंजली गायकवाड, प्रियांका बर्वे, सौरभ काडगांवकर, जिज्ञेश वझे आणि हिमानी कपूर असे दर्जेदार गायक आपलं गाणं सादर करणार आहे. या गाण्यांना वैभव जोशी, मंगेश कांगणे आणि मयुरेश वाघ यांनी शब्दबद्ध केले आहे. 

आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संगीत दिग्दर्शक म्हणून राहुल देशपांडे हे या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्यासमोर येणार आहेत. या निमित्ताने राहुलने पहिल्यांदाच लावणी गाण्याचा प्रयत्न केला असून त्याला दमदार साथ ऊर्मिला धनगरने दिली आहे.



पं. वसंतराव देशपांडे, या चित्रपटाचं संगीत आणि राहुलबद्दल शंकर महादेवन म्हणाले, ''मी स्वतः पं. वसंतराव देशपांडे यांच्या गायकीचा चाहता आहे. माझ्या लहानपणी श्रीनिवास खळेकाकांकडे शिकत असल्यापासून मी त्यांचं गाणं ऐकत आलो आहे. त्यांची गायकी अत्यंत वेगळ्या आणि अवघड वळणाची असून ती अनेकदा अक्षरशः अंगावर शहारा आणते. योगायोग म्हणजे माझ्या संगीताच्या कारकिर्दीतील पहिलं गाणं हे वसंतरावांचंच गायलं होतं. ‘बगळ्यांची माळ फुले’ असे या गाण्याचे बोल होते. आज मला इथं या कार्यक्रमाला येण्याची संधी मिळाली. यासाठी मी स्वतःला नशीबवान समजतो. माझ्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे पुढे अनेकदा मला त्यांची गाणी सादर करण्याचं भाग्य लाभलं आणि अजून एक योगायोगाची गोष्ट म्हणजे ‘कट्यार काळजात घुसली' या त्यांच्या नाटकावर जेव्हा चित्रपट बनला तेव्हा त्याचं ‘घेई छंद’ हे गाणं माझ्यावर चित्रीत झालं. आज वसंतरावजींचा वारसा अत्यंत सक्षमपणे राहुल पुढे नेत आहे. इतक्या महान गायकावर, शास्त्रीय संगीतावर, आजच्या काळात असा चित्रपट निर्माण करण्याचं स्वप्न घेऊन ते प्रत्यक्षात उतरवण्याचं धाडस करणं, याबद्दल राहुलचं, निपुण आणि त्याच्या संपूर्ण टीमचं मी खूप खूप अभिनंदन करतो.”



या संगीत प्रकाशनाच्या सोहळ्यादरम्यान राहुल देशपांडे म्हणतात, “आजोबांना गायकीचा वारसा त्यांच्या आईकडून मिळाला आणि मला त्यांच्याकडूनच. आजोबांना जे स्फुरलं, भावलं तेच ते गायले. त्यांच्या सान्निध्यात राहून मला त्यांच्याकडून गायनाचे धडे गिरवता आले नसले तरी त्यांची गायकी ऐकतच मी संगीतातील अनेक बारकावे शिकलो. त्यांची संगीताविषयी असलेली आस्था घरातील तसंच त्यांच्या सहवासात आलेल्या व्यक्तींकडून ऐकत आलो आहे. शास्त्रीय संगीतातील हे एक मोठं व्यक्तिमत्व आहे आणि ते माझे आजोबा आहेत, यापेक्षा अभिमानास्पद काय असू शकते? त्यांच्या गायकीची सर माझ्या गायकीला नक्कीच येणार नाही. मात्र माझ्या बाजूने मी त्यांच्या गायकीला शंभर टक्के न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.”


जिओ स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती चंद्रशेखर गोखले, दर्शन देसाई, निरंजन किर्लोस्कर यांनी केली आहे. निपुण अविनाश धर्माधिकारी दिग्दर्शित या चित्रपटात राहुल देशपांडे, अनिता दाते, पुष्कराज चिरपुटकर, कौमुदी वालोकर आणि अमेय वाघ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

महिला दिनाच्या निमित्ताने 'अनन्या'चे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला १० जूनला अनुभवायला मिळणार 'अनन्या'चे वेगळेपण



 महिला दिनाच्या निमित्ताने 'अनन्या'चे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

१० जूनला अनुभवायला मिळणार 'अनन्या'चे वेगळेपण 


'अनन्या' म्हणजे वेगळेपण. इतरांपेक्षा वेगळी. अशीच एक दिलखुलास 'अनन्या' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे', अशी सकारात्मक टॅगलाईन असलेल्या 'अनन्या' या चित्रपटाचे पोस्टर आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने खास प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. खूप काही सांगणाऱ्या या पोस्टरमध्ये धाडसी वृत्तीची अनन्या दिसत आहे, जी आनंदाने आयुष्य जगत आहे. तिच्या जिद्दीचा प्रवास या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, ड्रीमव्हीवर एंटरटेनमेंट आणि रवी जाधव फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रताप कड यांनी केले आहे. तर ध्रुव दास, रवी जाधव आणि संजय छाब्रिया यांनी निर्मात्याची धुरा सांभाळली आहे. नावाला सार्थ असणारी 'अनन्या' १० जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

आपल्या भूमिकेविषयी हृता दुर्गुळे म्हणते, '' आयुष्य खूप सुंदर आहे. ते मनमुराद जगावे. खूप उर्जा आणि सकारात्मकता देणारा हा चित्रपट आहे.’’ तर चित्रपटाचे निर्माता रवी जाधव म्हणतात, ''आज महिला दिनाच्या निमित्ताने हे पोस्टर आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहे. या निमित्ताने आम्ही सर्व महिलांचा सन्मान करत आहोत. जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने जगायला हवा. महिलांसाठी काहीही अशक्य नाही. फक्त त्यांची इच्छाशक्ती प्रबळ हवी.'' निर्माता संजय छाब्रिया म्हणतात, ''जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन खूप मह्त्वाचा आहे. 'अनन्या'मधून आपल्याला हेच पाहायला मिळणार आहे. अनन्याची ही  कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल.''

केदार शिंदे यांचा नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला… ‘बाईपण भारी देवा!’ जागतिक महिला दिनानिमित्ताने चित्रपटाची घोषणा…



केदार शिंदे यांचा नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला… ‘बाईपण भारी देवा!’

जागतिक महिला दिनानिमित्ताने  चित्रपटाची घोषणा…


प्रेक्षकांच्या मनातील भावना, आवडीनिवडी अचूक ओळखून, तुमच्याआमच्या घरातील गोष्ट अगदी सहजरित्या प्रेक्षकांसमोर मांडणारे दिग्दर्शक केदार शिंदे 

पुन्हा एकदा एक नवीन चित्रपट सादर करण्यासाठी सज्ज झाले आहेत. जिओ स्टुडिओज प्रस्तुत एमव्हीबी मीडिया निर्मित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एका वैशिष्ठ्यपूर्ण पोस्टरने घोषणा करण्यात आली आहे.


‘मी वसंतराव’ या चित्रपटाच्या घोषणेनंतर आज जिओ स्टुडिओज् आपला दुसरा आणि अत्यंत वेगळा बाज असलेला चित्रपट घेऊन येत आहेत. तसंच एमव्हीबी मीडिया यांची निर्मिती असलेला हा पहिलाच चित्रपट असून माधुरी भोसले यांनी याची निर्मिती केली आहे. त्यांना बेला शिंदे आणि अजित भुरे यांचा सह-निर्माते म्हणून सहभाग लाभला आहे.


आपल्या आजुबाजुला घडणाऱ्या घटना, एखादा संवेदनशील विषय, सामान्य माणसांचे प्रश्न अगदी हलक्याफुलक्या पध्दतीने मांडण्याची ताकद केदार शिंदे यांच्या चित्रपटात असते. 


चित्रपटाच्या या घोषणेनिमित्त दिग्दर्शक केदार शिंदे म्हणतात, “या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांसोबत शेअर करण्यासाठी आजच्या दिवसापेक्षा चांगला दिवस कोणता असूच शकत नाही. मला कायम असे वाटते की, महिला दिन साजरा करण्यासाठी केवळ एकच दिवस पुरेसा नसून दररोजच महिलांचं काम, सहभाग, योगदान आणि आवाका याची जाणीव ठेवायला हवी. हाच विचार घेऊन हा चित्रपट मी निर्माण केला आहे आणि जर आपण बघितलं तर आज प्रत्येक क्षेत्रात महिलांचं कर्तृत्व भारी ठरतं आहे. त्यांच्या याच धडाडीला माझा हा कलात्मक सलाम आहे.”


जिओ स्टुडिओज् प्रस्तुत माधुरी भोसले निर्मित ‘बाईपण भारी देवा’मध्ये सहा लोकप्रिय महिला कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत, मात्र त्यांची नावं अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.

Saturday 5 March 2022

Tips Official presents a love ballad to heal the heartbroken, ‘Kaisi Teri Baatein’ sung by Suyyash Rai and Shilpa Rao

 


Tips Official presents a love ballad to heal the heartbroken, ‘Kaisi Teri Baatein’ sung by Suyyash Rai and Shilpa Rao


Song Link: https://www.youtube.com/watch?v=b2khaIOK_dc

Tips Music Industry has been growing phenomenally over the years as they are branching out their music in different languages all over India. With a flourishing year ahead, Tips has launched yet another remarkable track ‘Kaisi Teri Baatein’ sung by actor/singer Suyyash Rai and Shilpa Rao.

Narrating a story of love and heartbreak, ‘Kaisi Teri Baatein’ is song that heals every heart that has been in love. The song is written by Kaushal Kishore and composed beautifully by Siddharth Singh and Suyyash Rai. The wonderful duo of actor Priyal Gor and singer/actor Suyyash Rai portray the emotions of heartbroken lovers marvellously in the music video directed by Jai Prakash.

Suyyash Rai says, “Kaisi Teri Baatein is very close to my heart and depict emotions that are close to everyone’s heart because I don’t think there is anyone who hasn’t been in love. I loved working very closely for the production of this project and I am glad it all worked out beautifully.”

Shilpa Rao says, “Romantic ballads are always a pleasure to sing as they touch every emotion, may it be heartbreak or first love, very deeply. Kaisi Teri Baatein is a stunning song and I loved singing it.”

Producer: Tips Industries Ltd., Star Cast: Suyyash Rai, Priyal Gor, Singers: Suyyash Rai, Shilpa Rao, Music Composer: Siddharth Singh & Suyyash Rai, Lyrics: Kaushal Kishore, Director: Jay Prakash

Canara Bank retains Interest rates on loans/advances with effect from 07.03.2022




 Canara Bank retains Interest rates on loans/advances with effect from 07.03.2022

Bengaluru, March 5, 2022: Canara Bank, a leading Public Sector Bank, has retained its Marginal Cost of Fund Based Lending Rate (MCLR) on Loans / Advances across all tenors with effect from March 7th, 2022.

 

Accordingly, the tenor linked MCLRs of the Bank shall be as under with effect from 07.03.2022:

 

Tenor

Existing MCLR

MCLR

w.e.f. 07.03.2022

Change

Overnight MCLR

6.55 %

6.55 %

No Change

One Month MCLR

6.55 %

6.55 %

No Change

Three Month MCLR

6.85 %

6.85 %

No Change

Six Month MCLR

7.20 %

7.20 %

No Change

One Year MCLR

7.25 %

7.25 %

No Change

Repo Linked Lending Rate (RLLR) continues to be at 6.90%.

Friday 4 March 2022

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त'प्लॅनेट मराठी ओटीटी'कडून स्त्रियांना खास भेट , ’प्लॅनेट मराठी’ओटीटीचे वर्षभराचे फ्री सबस्क्रिप्शन -



 आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त'प्लॅनेट मराठी ओटीटी'कडून स्त्रियांना खास भेट

’प्लॅनेट मराठी’ओटीटीचे वर्षभराचे फ्री सबस्क्रिप्शन -

८ मार्च म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला दिन. मातृत्व आणि कर्तृत्व अशा दोन्ही जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पेलणाऱ्या स्त्रियांसाठी खरंतर प्रत्येक दिवस हा महिला दिन म्हणून साजरा केला पाहिजे. हा दिवस रोजच साजरा व्हावा, यासाठी प्लॅनेट मराठी ओटीटी जगभरातील महिलांसाठी घेऊन येत आहे एक खास भेट. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने जगभरातील महिलांना 'प्लॅनेट मराठी ओटीटी'चे वर्षभराचे फ्री सबस्क्रिप्शन मिळणार आहे. 


आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने 'प्लॅनेट मराठी ओटीटी'चे प्रमुख, संचालक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ''आज महिलांनी सर्वच क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. स्त्रियांची ही कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे. आज आम्ही जगभरातील महिलांना 'प्लॅनेट मराठी ओटीटी'चे वर्षभराचे फ्री सबस्क्रिप्शन देत आहोत याचे मुख्य कारण म्हणजे घर, नोकरी, मुले यांचा ताळमेळ साधत असताना स्त्रियांमधील 'मी टाईम' हा कुठेतरी हरवत चालला आहे आणि तो त्यांना परत मिळवून देण्याच्या दृष्टीने आम्ही हे पाऊल आजच्या या खास दिनी उचलले आहे. स्त्रियांना त्यांच्या मनोरंजनासाठी वेळच मिळत नाही. 'प्लॅनेट मराठी ओटीटी'च्या माध्यमातून त्यांना त्यांच्या आवडीचे मनोरंजनात्मक कार्यक्रम कुठेही आणि केव्हाही पाहता येतील. चित्रपट, वेबसिरीज, टॉक शो, संगीत अशी मनोरंजनाची विविध माध्यमे इथे उपलब्ध आहेत. या निमित्ताने आम्हाला जगभरातील स्त्रियांचा सन्मान करण्याची संधी मिळत आहे. ही योजना जगभरातील स्त्रियांसाठी असून त्याचा लाभ केवळ आजच घेता येणार आहे.''

Canara Bank raises Rs 1000 crore in Basel III-compliant Additional Tier I, Series III Bonds 2021-22

 


Canara Bank raises Rs 1000 crore in Basel III-compliant Additional Tier I, Series III Bonds 2021-22

Press Release

Bengaluru, 04 March 2022: Canara Bank has raised Rs 1000 crore in Basel III-Compliant Additional Tier I, Series III bonds, at a coupon rate of 8.07% per annum.

The issue received overwhelming response from investors, with bids for more than Rs 3,133 crore against a base issue size of Rs 250 crore and green shoe option of Rs. 750 crore. Based on the response, the Bank has decided   to   accept Rs 1,000 crore at a coupon rate of 8.07% per annum.

The said Tier I bonds are perpetual in nature. However, it can be called back by the issuer after fifth anniversary from the deemed date of allotment or any anniversary date thereafter.

The Bank’s Additional Tier I bonds are rated AA+ by CRISIL Ratings and India Ratings & Research Ltd.

This is the third series of Additional Tier I bond issuance of the Bank for the financial year 2021-22. During FY 2021 -22, Bank has  raised  Basel  III  Compliant  Additional  Tier  I  bonds  of Rs. 4,000 crore and Tier II bonds of Rs. 2,500 crore.