Tuesday 28 November 2023

ISPL- Indian Street Premier League- T10, a groundbreaking Tennis Cricket League that seeks to redefine the cricketing landscape in India




ISPL- Indian Street Premier League- T10, a groundbreaking Tennis Cricket League that seeks to redefine the cricketing landscape in India

27th November 2023 in Mumbai-
 In a historic moment for Indian cricket, CCS Sports LLP is delighted to announce the launch of the Indian Street Premier League (ISPL), India’s first ever T10 is set to kick off, promising to revolutionize the cricketing landscape in the country. The inaugural edition will get underway from March 2nd – March 9th, 2024. This unique initiative, that will feature 19 high-octane matches in Mumbai is a movement aimed at discovering, nurturing, and propelling cricketers from grassroots levels onto the international stage.



The ISPL-T10's primary mission is to unite the finest local cricket talent in India, providing a comprehensive platform for players to showcase their skills and establish themselves as future cricketing superstars. With a vision to transcend boundaries and become an international platform, ISPL-T10 brings the raw energy and talent of street cricket onto the grand stage of stadiums.

The Indian Street Premier League will feature six teams, each owned by franchises representing Mumbai (Maharashtra), Hyderabad (Andhra Pradesh and Telangana), Bengaluru (Karnataka), Chennai (Tamil Nadu), Kolkata (West Bengal), and Srinagar (Jammu and Kashmir). These matches will be conducted within full-fledged stadiums, adding to the flair and grandeur for players and fans.

The league is spearheaded by a distinguished core committee featuring Adv. Ashish Shelar and Amol Kale. The Chief Mentor for the league is none other than cricketing legend Ravi Shastri, adding unparalleled expertise to the event. The selection committee includes Pravin Ambre and Jatin Paranjape, ensuring a fair and competitive selection process.

ISPL-T10 promises grand opening and closing ceremonies filled with entertainment, adding a touch of cricketing extravaganza to the league. The ceremonies will set the stage for the intense competition that will unfold on the cricket field.

A glamorous and glitzy player auction will set the stage for the league, adding an element of suspense and strategy. Teams will compete to acquire the best talent, setting the tone for thrilling matches and intense competition.

The league will be televised live on a leading sports channel, ensuring widespread coverage across the nation. Cricket enthusiasts can witness the thrill and excitement of the first-ever Tennis Cricket League played in Indian stadiums from the comfort of their homes.

Hon. BCCI Treasurer Ashish Shelar, Core Committee Member of the Indian Street Premier League said ”ISPL is not just a tournament; it’s a transformative journey for aspiring players. Participants will not only compete in a dynamic T10 format but will also receive invaluable coaching tips and advice from seasoned Ranji Trophy players. This mentorship opportunity aims to elevate the skills and understanding of the game among the players, creating a pathway for their future success in the world of cricket.”

Hon. Mumbai Cricket Association President Amol Kale, Core Committee Member of Indian Street Premier League, “The ISPL not only brings a dynamic and entertaining cricket format to the forefront but more importantly, it opens the gates for extraordinary talent that often goes unnoticed. It provides a vital platform for those players who dream of playing inside the stadiums, allowing them to showcase their exceptional skills to a wider audience.”

Ravi Shastri, Chief Mentor, Indian Street Premier League said, “The ISPL will offer the cricketing dreams of many a chance to flourish on a big stage. I commend the organizers for their vision and commitment to nurturing grassroots talent, and I look forward to witnessing the success stories that will undoubtedly emerge from this exciting venture.”

About CCS Sports LLP- CCS Sports LLP is a pioneering sports management company committed to bringing innovative and inclusive sporting experiences to enthusiasts across the nation. The Indian Street Premier League is a testament to CCS Sports LLP’s dedication to nurturing grassroots talent and providing a platform for aspiring cricketers to shine.

Monday 27 November 2023

मैत्री, प्रेम आणि स्वप्नांची 'कन्नी' ८ मार्चपासून सर्व चित्रपटगृहांत



मैत्री, प्रेम आणि स्वप्नांची 'कन्नी' 

 ८ मार्चपासून सर्व चित्रपटगृहांत 


मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियॉंड इमॅजिनेशन फिल्म्स निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने 'कन्नी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली असून आजच्या काळाच्या मैत्रीची, प्रेमाची ओळख करून देणारा हा चित्रपट  येत्या ८ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.  या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन समीर जोशी यांनी केले आहे. यात हृता दुर्गुळे, शुभंकर तावडे, अजिंक्य राऊत, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर निर्माते अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर आणि सनी राजानी आहेत.  या चित्रपटाच्या वितरणाची धुरा ए ए फिल्म्स यांनी सांभाळली आहे.


पोस्टरवरून हा चित्रपट खूपच इंटरेस्टिंग दिसत आहे. मैत्री आणि प्रेमाला जोडणारी ही 'कन्नी' नात्यांची एक नवीन गोष्ट प्रेक्षकांसमोर आणणार आहे. 


या चित्रपटाविषयी बोलताना समीर जोशी म्हणतात की, ज्याप्रमाणे बेभान उडणारा पतंग हवेत त्याचा तोल मजबूत कन्नीमुळे सांभाळू शकतो, त्याचप्रमाणे आपल्या आयुष्याचा, स्वप्नांचा पतंग देखील मैत्री, प्रेम यांची मजबूत कन्नी असली की अगदी चंद्राशेजारीसुद्धा पोहोचू शकतो! याच प्रेम आणि मैत्रीच्या ‘कन्नी’ची तरूण, ताजी, मस्तीखोर आणि तितकीच आपलीशी वाटेल अशी गोष्ट म्हणजे ‘कन्नी’ हा चित्रपट.

 

पत्रकार प्रशिक्षण कार्यशाळेचे नरेंद्र वाबळे यांच्या हस्ते उद्घाटन जय महाराष्ट्र पत्रकार, वृत्तपत्र लेखक, कवी महासंघ आणि साप्ताहिक मराठी जगत यांचा उपक्रम



 पत्रकार प्रशिक्षण कार्यशाळेचे नरेंद्र वाबळे यांच्या हस्ते उद्घाटन

जय महाराष्ट्र पत्रकार, वृत्तपत्र लेखक, कवी महासंघ आणि साप्ताहिक मराठी जगत यांचा उपक्रम

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मोबाईल फोनवरील व्हॉटसअॅप, फेसबुक आदी अत्याधुनिक तंत्रामुळे प्रसिद्धिमाध्यमांचे लोकशाहीकरण झाले आहे. मात्र, त्यासाठी वाचक-दर्शकांपर्यंत घटनेची माहिती तातडीने पोहोचवाव्या लागणार्‍या या स्पर्धेचे धोकेही वाढले आहेत. नागरी पत्रकारितेत माध्यमांमधील या बदलांचा वापर भान ठेवून केला पाहिजे, असे मत 'जय महाराष्ट्र पत्रकार, वृत्तपत्र लेखक, कवी महासंघ आणि साप्ताहिक मराठी जगत' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पत्रकार प्रशिक्षण कार्यशाळा २०२३-२४ च्या उद्घाटन प्रसंगी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि दैनिक शिवनेरचे संपादक नरेंद्र वाबळे यांनी व्यक्त केले. मुंबई मराठी पत्रकार संघ, पत्रकार भवन, लोकमान्य सभागृह येथे संविधान दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त 'जय महाराष्ट्र पत्रकार, वृत्तपत्र लेखक, कवी महासंघ आणि साप्ताहिक मराठी जगत' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पत्रकार प्रशिक्षण कार्यशाळा २०२३-२४ च्या उद्घाटन प्रसंगी त्यांच्यासह कामगार नेते व दैनिक मुंबई मित्रचे संपादक अभिजित राणे, वरिष्ठ पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली, ज्येष्ठ पत्रकार व पर्यावरण तज्ज्ञ प्रा. हेमंत सामंत आणि आकाशवाणी, मुंबई तसेच रेन्बो एफ. एम.च्या निवेदिका प्रा. रश्मी महांबरे, साप्ताहिक मराठी जगतचे संपादक दीपक कलिंगण, जय महाराष्ट्र पत्रकार, वृत्तपत्र लेखक, कवी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश जाधव आणि सचिव सुरज भोईर व्यासपीठावर उपस्थित होते. उद्घाटक नरेंद्र वाबळे यांनी संविधानाच्या सरनाम्याचे वाचन करून पत्रकारिता प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन केले. तत्पूर्वी सर्व मान्यवरांचा 'संविधान गौरव पुरस्कार २०२३' देऊन यथोचित गौरव करण्यात आला.


कार्यशाळेचे आयोजक सुरज भोईर यांनी प्रस्तावना केली. त्यानंतर वरिष्ठ पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते  अनिल गलगली यांनी प्रशिक्षणार्थींना माहिती अधिकार कायदा २००५ बाबत थोडक्यात मार्गदर्शन केले. या कायद्याचा समाजहितासाठी जास्तीत जास्त वापर करण्याचा सल्ला त्यांनी प्रशिक्षणार्थींना दिला. त्यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी जागरूक नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन केले.  गलगली यांनी माहितीच्या अधिकाराशिवाय सेवा हक्क कायदा, लोकशाही दिन, नागरिक सनद अशा विविध कायद्यांची माहिती दिली.


प्रा. रश्मी महांबरे यांनी पत्रकारिता आणि पत्रकार यांच्यापुढील आव्हाने, बातमी तंत्र आत्मसात करण्यासाठी अशा कार्यशाळांची गरज असल्याचे नमूद केले. तसेच अनेक इच्छुकांनी ह्या कार्यशाळेत सहभागी होऊन समाज घडविण्याच्या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहनही केले. प्रा. हेमंत सुधाकर सामंत यांनी क्राइम पत्रकारिता, क्राईम बातम्या, पत्रकारांसाठी असलेला संरक्षण कायदा, पत्रकारांपुढे असलेली आव्हाने, पत्रकारांची आज असलेली अवस्था आदि विषयांना स्पर्श करत सखोल मांडणी ३ डिसेंबर रोजी होणार्‍या त्यांच्या पहिल्या सत्रात करून दिली जाणार असल्याचे सांगितले.

"भारतातच नाही तर संपूर्ण जगात पत्रकारितेला मोठे महत्व आहे. त्यामुळे पत्रकारितेला चौथास्तंभ ही उपमा दिली आहे. जागतीक घटना, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय, जिल्हास्तरीय, गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत संपूर्ण माहिती १४० कोटी जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकारितेच्या माध्यमातून होत असते. समाजामध्ये वृत्तपत्रांच्या माध्यमातून विचार पोहोचविले जातात. पत्रकारिता,जनता आणि नितीनिर्माते यांच्यातील मध्यस्थीतीची भुमिका हाताळत असते. तेव्हाच आपल्याला समतोलता दिसून येते. या समतोलतेचे दायीत्व पुर्णपणे पत्रकारितेवर अवलंबून असते व पत्रकार आपली जबाबदारी मोठ्या शिताफीने पार पाडतो. प्रत्येकबाब जनतेच्या हितासाठी असावी या उद्देशाने प्रत्येक गोष्ट जनतेच्या हितार्थ प्रकाशित केली जाते. समाजातील घडामोडींवर नजर ठेवून माहीती एकत्र करने व ती वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजापर्यंत, सरकारपर्यंत व प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे काम आधुनिक युगात वर्तमानपत्र, रेडिओ, दूरदर्शन, वेब-पत्रकारिता, सोशल मिडिया यांच्या माध्यमातून पत्रकारितेची भुमिका मोठ्या प्रमाणात बजावली जात आहे. तीच निर्भीड पत्रकारिता शिकण्यासाठी अशा कार्यशाळांची गरज आहे. त्यामुळे मी आयोजक सुरज भोईर, दीपक कलिंगण आणि संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि ह्या कार्यशाळेत सहभागी झालेल्या /होणार्‍या सर्वांना खूपखूप शुभेच्छा देतो." असे प्रेरणादायी उद्गार कामगार नेते व दैनिक मुंबई मित्रचे संपादक अभिजित राणे यांनी काढले.


कार्यशाळेच्या उद्घाटनाचे समयोचित निवेदन मराठी साहित्य व कला सेवाचे संस्थापक अध्यक्ष तसेच साहित्यिक पत्रकार गुरुदत्त वाकदेकर यांनी केले. तर आभारप्रदर्शनाची जबाबदारी साप्ताहिक मराठी जगतचे संपादक तसेच कार्यशाळेचे आयोजक दीपक कलिंगण यांनी यांनी लिलया पार पाडली. उद्घाटन सोहळ्यासाठी साई रामापूरकर, संतोष तांबे, संदीप पाटील, विनायक जवळेकर, रामभाऊ गुरव, अॅड. आदिती गायकवाड, निशा जाधव, मोहन जाधव यांनी विशेष सहकार्य केले. ह्या कार्यशाळेसाठी दैनिक मुंबई मित्र, वत्स मिडीया, मुंबई मराठी पत्रकार संघ, विशाल महाराष्ट्र युट्युब वाहिनी तसेच वंचित न्यूज युट्युब वाहिनी यांचा विशेष सहयोग लाभला आहे. कार्यशाळेचे पहिले सत्र ३ डिसेंबर २०२३ रोजी होणार आहे. ज्यांना ह्या कार्यशाळेत अजूनदेखील सहभाग घेण्याची इच्छा असेल त्यांनी सुरज भोईर यांच्याशी ९९६९६८६०१४ ह्या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहनही यानिमित्ताने करण्यात आले आहे.

"भारतातच नाही तर संपूर्ण जगात पत्रकारितेला मोठे महत्व आहे. त्यामुळे पत्रकारितेला चौथास्तंभ ही उपमा दिली आहे. जागतीक घटना, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय, जिल्हास्तरीय, गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत संपूर्ण माहिती १४० कोटी जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकारितेच्या माध्यमातून होत असते. समाजामध्ये वृत्तपत्रांच्या माध्यमातून विचार पोहोचविले जातात. पत्रकारिता,जनता आणि नितीनिर्माते यांच्यातील मध्यस्थीतीची भुमिका हाताळत असते. तेव्हाच आपल्याला समतोलता दिसून येते. या समतोलतेचे दायीत्व पुर्णपणे पत्रकारितेवर अवलंबून असते व पत्रकार आपली जबाबदारी मोठ्या शिताफीने पार पाडतो. प्रत्येकबाब जनतेच्या हितासाठी असावी या उद्देशाने प्रत्येक गोष्ट जनतेच्या हितार्थ प्रकाशित केली जाते. समाजातील घडामोडींवर नजर ठेवून माहीती एकत्र करने व ती वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजापर्यंत, सरकारपर्यंत व प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे काम आधुनिक युगात वर्तमानपत्र, रेडिओ, दूरदर्शन, वेब-पत्रकारिता, सोशल मिडिया यांच्या माध्यमातून पत्रकारितेची भुमिका मोठ्या प्रमाणात बजावली जात आहे. तीच निर्भीड पत्रकारिता शिकण्यासाठी अशा कार्यशाळांची गरज आहे. त्यामुळे मी आयोजक सुरज भोईर, दीपक कलिंगण आणि संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि ह्या कार्यशाळेत सहभागी झालेल्या /होणार्‍या सर्वांना खूपखूप शुभेच्छा देतो." असे प्रेरणादायी उद्गार कामगार नेते व दैनिक मुंबई मित्रचे संपादक अभिजित राणे यांनी काढले.

कार्यशाळेच्या उद्घाटनाचे समयोचित निवेदन मराठी साहित्य व कला सेवाचे संस्थापक अध्यक्ष तसेच साहित्यिक पत्रकार गुरुदत्त वाकदेकर यांनी केले. तर आभारप्रदर्शनाची जबाबदारी साप्ताहिक मराठी जगतचे संपादक तसेच कार्यशाळेचे आयोजक दीपक कलिंगण यांनी यांनी लिलया पार पाडली. उद्घाटन सोहळ्यासाठी साई रामापूरकर, संतोष तांबे, संदीप पाटील, विनायक जवळेकर, रामभाऊ गुरव, अॅड. आदिती गायकवाड, निशा जाधव, मोहन जाधव यांनी विशेष सहकार्य केले. ह्या कार्यशाळेसाठी दैनिक मुंबई मित्र, वत्स मिडीया, मुंबई मराठी पत्रकार संघ, विशाल महाराष्ट्र युट्युब वाहिनी तसेच वंचित न्यूज युट्युब वाहिनी यांचा विशेष सहयोग लाभला आहे. कार्यशाळेचे पहिले सत्र ३ डिसेंबर २०२३ रोजी होणार आहे. ज्यांना ह्या कार्यशाळेत अजूनदेखील सहभाग घेण्याची इच्छा असेल त्यांनी सुरज भोईर यांच्याशी ९९६९६८६०१४ ह्या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहनही यानिमित्ताने करण्यात आले आहे.

सूर्यकुमारच्या युवा संघाने केला चमत्कार, सलग दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव; यशस्वी-इशान चमकला

 


सूर्यकुमारच्या युवा संघाने केला चमत्कार, सलग दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव;  यशस्वी-इशान चमकला


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना टीम इंडियाने ४४ धावांनी जिंकला. या मालिकेतील पहिला सामना भारताने दोन गडी राखून जिंकला होता. या विजयासह भारतीय संघ मालिका जिंकण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. आता भारताला उर्वरित तीन सामन्यांपैकी एक सामना जिंकून मालिकेत विजय मिळवता येईल. तिरुअनंतपुरममध्ये युवा खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत भारताला मोठा विजय मिळवून दिला.


ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ४ गडी गमावून २३५ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ केवळ १९१ धावा करू शकला आणि सामना गमावला. भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४४ धावांनी पराभव करत पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताकडून तीन फलंदाजांनी अर्धशतके झळकावली.  यशस्वी जैस्वालने ५३, ऋतुराज गायकवाडने ५८ आणि इशान किशनने ५२ धावा केल्या. शेवटी रिंकू सिंगने नऊ चेंडूत ३१ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिसने तीन बळी घेतले. मार्कस स्टॉइनिसला एक विकेट मिळाली.


ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली आणि दुसऱ्या षटकात संघाची धावसंख्या ३० धावांपर्यंत पोहोचली. मात्र, शॉर्ट १९ धावा करून बाद झाला आणि कांगारूंचा संघ रुळावरून घसरला. इंग्लिश दोन धावा करून बाद झाला आणि मॅक्सवेल १२ धावा करून बाद झाला. स्मिथही १९ धावा करून बाद झाला. स्टॉइनिस आणि डेव्हिडने अर्धशतकी भागीदारी करून संघाला सामन्यात परत आणले, पण डेव्हिड बाद झाल्यानंतर भारताचा विजय जवळपास निश्चित झाला. डेव्हिडने ३७ आणि स्टॉइनिसने ४५ धावा केल्या. शेवटी मॅथ्यू वेडने नाबाद ४२ धावा केल्या, पण ऑस्ट्रेलियन संघ नऊ गडी गमावून १९१ धावाच करू शकला. भारताकडून प्रसीध कृष्णा आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. अर्शदीप सिंग, अक्षर पटेल आणि मुकेश कुमार यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय फलंदाजांनी शेवटच्या सात षटकात १११ धावा केल्या आणि ४ विकेट गमावत २३५ धावांची मोठी धावसंख्या उभारली. यशस्वी जैस्वाल (५३, २५ चेंडू), ऋतुराज गायकवाड (५८, ४३ चेंडू) आणि इशान किशन (५२, ३२ चेंडू) यांच्या अर्धशतकांनी भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. अखेरच्या षटकांमध्ये रिंकू सिंगने नऊ चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ३१ धावा करून ऑस्ट्रेलियन गोलंदाजीची पिसं काढली.


मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीचे निमंत्रण दिले, मात्र ऋतुराज गायकवाडसह सलामीला आलेल्या यशस्वी जैस्वालने आपल्या झंझावाती खेळीने त्याचा निर्णय उलटवून टाकला. शॉन अॅबॉटच्या चौथ्या षटकात त्याने पहिल्या तीन चेंडूंवर चौकार आणि पुढच्या दोन चेंडूंवर षटकार मारत २४ धावा केल्या.  भारताने केवळ ३.५ षटकात ५० धावा पार केल्या. एलिसने टाकलेल्या सहाव्या षटकात यशस्वीने सलग तीन चौकार मारत २४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे टी-२० मधील दुसरे अर्धशतक होते, परंतु एलिसच्या चेंडूवर चौकार मारण्याच्या प्रयत्नात तो शॉर्ट थर्ड मॅनवर झेलबाद झाला. त्याने २५ चेंडूंत नऊ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ५३ धावा केल्या. पॉवरप्लेच्या सहा षटकांत भारताने एका विकेटच्या मोबदल्यांत ७७ धावा केल्या.

यशस्वी बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी धावांवर मर्यादा आणल्या.  भारताने ९.५ षटकात १०० धावा पूर्ण केल्या. पॉवरप्लेनंतर भारताने पुढच्या सहा षटकांत ३९ धावा केल्या, पण गायकवाड आणि इशान किशन खेळपट्टीवर तग धरून राहिले. या काळात ईशानने स्टॉइनिसला षटकारही लगावला. दोघांनीही ४६ चेंडूत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. ही भागीदारी पूर्ण होताच इशानने ९५ मीटर दूर षटकार आणि नंतर मॅक्सवेलवर चौकार मारला. या षटकात गायकवाडने पहिला षटकार मारला. या षटकात २३ धावा आल्या.  इशानने सांघाला षटकार मारून २९ चेंडूत आपले सहावे टी-२० अर्धशतक पूर्ण केले. ‍१५ षटकात भारताची धावसंख्या १ विकेटवर १६४ धावा होती. १४व्या आणि १५व्या षटकात एकूण ४० धावा झाल्या.

स्टॉइनिसच्या वाईड बॉलवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात इशान झेलबाद झाला. त्याने ३२ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ५२ धावा केल्या. त्याने गायकवाडसोबत ८७ धावांची भागीदारी केली. कर्णधार सूर्यकुमार येताच त्याने स्टॉइनिस आणि नंतर झम्पाला षटकार ठोकला. यानंतर सलामीवीर गायकवाडने ३९ चेंडूत तिसरे टी-२० अर्धशतक पूर्ण केले.  स्टॉइनिसने सूर्यकुमारचा (१९) नेत्रदीपक झेल घेत त्याचा डाव संपवला. रिंकू सिंगने १९ व्या षटकात अॅबॉटवर दोन षटकार आणि तीन चौकार मारून भारताला २०० च्या पुढे नेले. या षटकात २५ धावा आल्या.

यशस्वी जैस्वालला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. मालिकेतला तिसरा सामना २८ नोव्हेंबर रोजी बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी येथे संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. भारत सलग तिसर्‍या विजयासह मालिकेवर कब्जा करणार की कांगारू पलटवार करणार हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

भालचंद्र नेमाडे लिखित कादंबरी 'कोसला' आता झळकणार पडद्यावर भव्य समारंभात 'कोसला - शंभरातील नव्याण्णवांस... ' चित्रपटाची घोषणा

 


भालचंद्र नेमाडे लिखित कादंबरी 'कोसला' आता झळकणार पडद्यावर

भव्य समारंभात 'कोसला - शंभरातील नव्याण्णवांस... ' चित्रपटाची घोषणा 



 भालचंद्र नेमाडे लिखित 'कोसला' या बहुचर्चित कादंबरीने साहित्य विश्वात एक वेगळे युग निर्माण केले. लेखनाची साचेबंद चौकट मोडून आपली रोखठोक मते यात लेखकांनी मांडली होती. त्यामुळेच ही कादंबरी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. पांडुरंग सांगवीकर नामक तरुणाची ही कथा. गावातून शिक्षणासाठी शहरात आलेल्या तरुणाला कसे अनुभव येतात, त्यानंतर पुन्हा गावात गेल्यावर त्याला तिथे आलेले अनुभव यांचा प्रवास म्हणजे कोसला. या तरुणाचा जीवनप्रवास सांगणारी ही कादंबरी आता चित्रपटाच्या माध्यमातून पडद्यावर झळकणार आहे. नुकतीच 'कोसला - शंभरातील नव्याण्णवांस...' या चित्रपटाची एका भव्य सोहळयात घोषणा करण्यात आली. या सोहळ्याला कादंबरीचे लेखक भालचंद्र नेमाडेही उपस्थित होत. यावेळी गायक जयदीप वैद्य आणि तबला वादक केतन पवार यांच्या निर्गुण शास्त्रीय संगीताने या सोहळ्यात रंगत आणली तर अच्युत पालव यांनी कॅनव्हासवर ‘कोसला’ची सुंदर कलाकृती साकारली. आदित्य राठी आणि गायत्री पाटील दिग्दर्शित या चित्रपटात सयाजी शिंदे यांची प्रमुख भूमिका असून निर्माण स्टुडिओज निर्मित या चित्रपटाचे मेहुल शाह निर्माते आहेत. 

१९६३ मध्ये वयाच्या २५व्या वर्षी भालचंद्र नेमाडे यांनी ही कादंबरी लिहिली. ही कादंबरी इंग्रजीसह हिंदी, गुजराती, कन्नड, असामी, पंजाबी, उर्दू, बंगाली आणि ओरिया भाषेत अनुवादित करण्यात आली. त्यामुळे या कादंबरीची ओळख केवळ भारतापुरताच मर्यादित राहिली नसून आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे. २०१४ मध्ये डॉ. भालचंद्र नेमाडे यांना भारतीय साहित्यातील सर्वोच्च समजला जाणारा ५० वा ज्ञानपीठ पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

चित्रपटाबद्दल साहित्यिक भालचंद्र नेमाडे म्हणाले, ‘’ साहित्या इतकेच माझे चित्रपटांवरही प्रेम आहे. मला चित्रपटांमध्ये पाहाण्याव्यतिरिक्त काही करता आले नाही. मात्र सयाजी शिंदे या मित्रामुळे माझा पाय चित्रपटांपर्यंत पोहोचला आहे. आतापर्यंत ‘कोसला’ साठी अनेक जण मला भेटले परंतु त्यांना ते जमले  नाही. मला यांच्याबाबतीतही तसेच वाटले. वर्षभरात म्हणतील काही जमत नाही आणि सोडून देतील. परंतु यांची चिकाटी अफाट होती. ते इथपर्यंत पोहोचले. त्यांनी खूप कष्ट घेतले आहेत आणि त्यामुळे मला उभारी मिळाली. पुढच्या कांदबऱ्या लिहिण्याचा उत्साह यांनी मला दिला आहे.’’

तर अभिनेते सयाजी शिंदे म्हणतात, ‘’ जेव्हा मी मुंबईत आलो तेव्हाच ही कांदबरी आली होती. तेव्हा मी स्वतः या कादंबरीतील उतारे पाठ केले होते. बोलण्यासाठी आणि अभिनयासाठी त्याचा कसा वापर होईल, याचा विचार करायचो. त्यानंतर बराच काळ लोटला. अनेकांचा या कादंबरीवर चित्रपट करण्याचा विचार होता. याच दरम्यान मला मेहुल सरांचा फोन आला. आम्ही नेमाडे सरांसोबत एक-दोन मिटिंग केल्या आणि अखेर नेमाडे सरांनी ‘कोसला’ला संमती दिली. सरांच्या सगळ्या नियंमांचे पालन करत आता या चित्रपटाची सुरूवात होत आहे.’’

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आदित्य राठी म्हणतात, '' भालचंद्र नेमाडे हे खूप मोठे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्यावर आम्ही चित्रपट करतोय. यासाठी मी मेहुल शाह यांचे आभार मानेन की, त्यांनी आम्हाला सहकार्य केले. ही कादंबरी भालचंद्र नेमाडे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. गावातील निरुत्साही वातावरण न आवडणाऱ्या, त्याचा तिटकारा वाटत असतानाही गावासाठी काहीतरी थोर स्वप्न पाहणाऱ्या तरुणाची ही भावनिक कथा आहे. खरंतर चित्रपटाविषयी काही सांगायची गरजच नाही. कारण आपल्यापैकी अनेकांनी ही कादंबरी वाचली आहे. त्यामुळे आता ही कथा प्रेक्षकांना लवकरच पडद्यावर पाहायला मिळणार आहे.' तर गायत्री पाटील म्हणतात, ‘’ भालचंद्र नेमाडे सर जळगावचे आहेत आणि मी सुद्धा. ‘कोसला’ मला भावण्याचे कारण म्हणजे या कांदबरीत महिलांना दिलेला सन्मान. त्यामुळे ही कथा मला विशेष वाटली.’’



पहिल्या तीन दिवसांत ‘झिम्मा २’ ची ४.७७ कोटींची कमाई

 


पहिल्या तीन दिवसांत ‘झिम्मा २’ ची ४.७७ कोटींची कमाई 


हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ सध्या चित्रपटगृहात धुमाकूळ घालत आहे. २४ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत बॅाक्स ॲाफिसवर कमाल कमाई केली आहे.  ‘झिम्मा २’ ने ४.७७ कोटींचा गल्ला जमवला असून या आकड्याचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. 


चित्रपटाला मिळणाऱ्या यशाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, ‘’प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम सुखावणारे आहे. आम्ही अनेक थिएटर्सना भेट देत आहोत खूप ठिकाणी हाऊसफुल्लचे बोर्ड झळकत आहेत. चित्रपट पाहून प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या प्रतिक्रिया भारावणाऱ्या आहेत. हा भाग आधीच्या भागापेक्षा अधिक चांगला असल्याच्याही प्रतिक्रिया येत आहेत. प्रेक्षक आवर्जून भेटायला येत असून सोशल मीडियावरही अनेकांचे संदेश येत आहेत. प्रेक्षकांकडून ‘झिम्मा २’वर होणारा कौतुकाचा वर्षाव भारी फिलिंग देणारा आहे. 


कलर यल्लो प्रॅाडक्शनच्या सहकार्याने जिओ स्टुडिओज, चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्माते आहेत. सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकु राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


Saturday 25 November 2023

डॉ. यशवंत मनोहर यांना यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक प्रदान

 


डॉ. यशवंत मनोहर यांना यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक प्रदान


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :  यशवंतराव चव्हाण सेंटर धर्मनिरपेक्ष आणि पक्ष निरपेक्ष पद्धतीने कार्य करते आणि फुले-शाहू-आंबेडकर या दीपस्तंभांना प्रमाण मानते, ही माझ्यासाठी अत्यंत गौरवाची गोष्ट आहे. इथे जमलेल्या सर्व मान्यवरांच्या साक्षीने ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार’ मला प्रदान करण्यात आला, त्याचा मी विनम्रपणे स्वीकार करतो. हा पुरस्कार संविधानातील मूल्यांच्या मनाने लेखन करणाऱ्या नवजागृत आणि धडपड्या प्रतिभांना आणि प्रज्ञांना मी सद्भावपूर्वक अर्पण करतो, अशा भावना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरचा राज्यस्तरीय पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना केल्या. यशवंतराव चव्हाण ही एक सभ्य, सुंदर, प्रगल्भ आणि सर्वसमावेशक संस्कृती होती. या सुसंस्कृत, सर्जनशील आणि सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्वामुळेच यशवंतराव चव्हाणांचा मला नेहमीच आदर वाटतो, असे प्रतिपादन त्यांनी केले. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने देण्यात येणारा सन २०२३ चा राज्यस्तरीय पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरचे अध्यक्ष तसेच खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते स्वीकारला, त्यावेळी ते बोलत होते.


यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे दरवर्षी कृषी, औद्योगिक, समाज रचना, व्यवस्थापन, प्रशासन, सामाजिक एकात्मता, विज्ञान-तंत्रज्ञान, ग्रामीण विकास, आर्थिक-सामाजिक विकास, मराठी साहित्य संस्कृती, कला, क्रीडा या क्षेत्रांपैकी कोणत्याही एका क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या व्यक्तीस किंवा संस्थेस हे पारितोषिक व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात येते.


अध्यक्षीय भाषणात यशवंतराव चव्हाण सेंटरचे अध्यक्ष शरदचंद्र पवार म्हणाले की, चव्हाण साहेब प्रागतिक विचारांचे होते. विकासाभिमुख योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या माणसापर्यंत कसा पोचेल याची व्यवस्था करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे यशवंतराव चव्हाण. त्यांचा विचार समाजात अखंड रुजेल असा प्रयत्न यशवंतराव चव्हाण सेंटर करत असते.  चव्हाण साहेब आणि डॉ. यशवंत मनोहर यांच्या कौटुंबीक परिस्थितीमध्ये काही फरक नव्हता, परंतु त्यांनी परिस्थितीवर मात केली.  यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून आम्ही संविधानाच्या रस्त्याने जाऊ इच्छितो. डॉ. मनोहरांची भूमिका या विचारांशी अत्यंत सुसंगत आहे. त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला याचा आनंद वाटला.


चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात यशवंतराव चव्हाण सेंटरच्या स्थापनेमागील भूमिका विषद करून चव्हाण सेंटरच्या तीन दशकातील कार्याचा मागोवा घेतला. तसेच सध्या चव्हाण सेंटरच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या समाजाभिमुख योजनांची महिती उपस्थितांना दिली. त्यांनी डॉ. यशवंत मनोहर यांच्या काव्यसंपदेचा गौरव करताना "शब्दांची पूजा करत नाही मी, माणसांसाठी आरती गातो", ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेड देतो” या कवितांच्या ओळी सादर केल्या.

चव्हाण सेंटरचे सरचिटणीस हेमंत टकले यांनी डॉ. मनोहर यांना प्रदान करण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन केले.


यावेळी २०२३ चा ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ही जाहीर करण्यात आला. राष्ट्रीय पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी हा पुरस्कार विख्यात बालरोगतज्ञ आणि क्लिनिकल सायंटिस्ट डॉ. सौम्या स्वामीनाथन यांना जाहीर केला. डॉ. सौम्या क्षयरोग आणि एचआयव्हीवरील संशोधनासाठी प्रसिद्ध असून त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेत मुख्य शास्त्रज्ञ म्हणून काम केले आहे.


या कार्यक्रमाध्ये चव्हाण सेंटरतर्फे दरवर्षी भारताचे माजी सरन्यायाधीश व यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार निवड समितीचे माजी अध्यक्ष मा. न्यायमूर्ती वाय. व्ही. चंद्रचूड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुंबई विद्यापीठातून एल.एल.एम.च्या अंतिम परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यास मा. न्यायमूर्ती वाय. व्ही. चंद्रचूड परितोषिक”ने गौरविण्यात येते. यावर्षीचे पारितोषिक डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते अॅड. विजेत शेट्टी यांना प्रदान करण्यात आले.


सेंटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीप्ती नाखले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.



Thursday 23 November 2023

ऑस्ट्रेलियाला हरवून भारताने रचला इतिहास; सूर्यकुमार चमकला, शेवटच्या षटकात रिंकूमुळे विजय

 


ऑस्ट्रेलियाला हरवून भारताने रचला इतिहास;  सूर्यकुमार चमकला, शेवटच्या षटकात रिंकूमुळे विजय


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : विशाखापट्टणम येथे झालेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाने दिलेले २०९ धावांचे लक्ष्य गाठले. गुरुवारी (२३ नोव्हेंबर) झालेल्या या विजयासह भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.  भारताने आपल्या टी-२० इतिहासातील सर्वात मोठे लक्ष्य गाठले आहे. त्यांनी चार वर्षे जुना विक्रम मोडला. टीम इंडियाने हैदराबादमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध २८ धावा करत सामना जिंकला होता.


भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२ मध्ये दुसऱ्यांदा २०० हून अधिक धावांचे लक्ष्य गाठले आहे. गेल्या वेळी टीम इंडियाने राजकोटमध्ये असे केले होते. २०१३ मध्ये भारताने २०२ धावा करत विजय मिळवला होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने १९० किंवा त्याहून अधिक धावा केल्याचा हा सहावा प्रसंग होता. दुर्दैवाने प्रत्येक वेळी त्या संघाला पराभवाला सामोरे जावे लागले.


भारताचा नवा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  ऑस्ट्रेलियाने २० षटकात तीन विकेट गमावत २०८ धावा केल्या.  टीम इंडियाने १९.५ षटकांत ८ विकेट गमावत २०९ धावा करत सामना जिंकला. भारताने पाचव्यांदा टी-२० मध्ये २०० हून अधिक धावांचे लक्ष्य गाठले आहे. या बाबतीत त्याने दक्षिण आफ्रिकेला मागे टाकले. आफ्रिकन संघाने चार वेळा अशी कामगिरी केली आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहेत. दोघांनी प्रत्येकी तीन वेळा टी-२० मध्ये २०० हून अधिक धावांचे लक्ष्य गाठले आहे.

२०९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाचे दोन्ही सलामीवीर १५ चेंडूतच तंबूमध्ये परतले. ऋतुराज गायकवाड पहिल्याच षटकात खाते न उघडता धावबाद झाला. त्याला एका चेंडूचाही सामना करता आला नाही. तिसर्‍याच षटकात यशस्वी जैस्वाल तंबूमध्ये परतला. यशस्वीने आठ चेंडूत २१ धावा केल्या. दोन गडी बाद झाल्यानंतर इशान किशन आणि सूर्यकुमार यांनी डावाची धुरा सांभाळली. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी ११२ धावांची भागीदारी केली. सूर्यकुमारने ४२ चेंडूत ८० धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ९ चौकार आणि ४ षटकार मारले. इशान किशनने ३९ चेंडूत ५८ धावा केल्या. त्याने २ चौकार आणि ५ षटकार मारले. रिंकू सिंगने १४ चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने नाबाद २२ धावा करत संघाला विजयाकडे नेले. तिलक वर्माने १२ आणि अक्षर पटेलने २ धावा केल्या. रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंग यांना खातेही उघडता आले नाही. मुकेश कुमार शून्यावर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून तन्वीर संघाने दोन बळी घेतले. जेसन बेहरेनडॉर्फ, मॅथ्यू शॉर्ट आणि सीन अॅबॉट यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

टीम इंडियाने १९.५ षटकांत ८ विकेट गमावत २०९ धावा करत सामना जिंकला. सामन्यातील शेवटचे षटक अतिशय रोमांचक होते. यामध्ये टीम इंडियाच्या तीन विकेट पडल्या आणि रिंकू सिंगच्या षटकारावर भारताला सहा धावा मिळाल्या नाहीत. २० व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रिंकूने चौकार लगावला, दुसर्‍या चेंडूवर एकेरी धाव घेतली. तिसर्‍या चेंडूवर अक्षर पटेल बाद झाला. चौथ्या चेंडूवर रवी बिश्नोई धावबाद झाला. पाचव्या चेंडूवर अर्शदीप सिंग धावबाद झाला. सहाव्या चेंडूवर रिंकू सिंग चेंडूला सामोरा गेला. जर तो बाद झाला असता किंवा एकही धाव काढू शकला नसता तर सामना सुपर ओव्हरमध्ये गेला असता. पण तसे झाले नाही.  सीन अॅबॉटच्या चेंडूवर रिंकूने षटकार ठोकला. दुर्दैवाने तो रिंकूच्या खात्यात जमा झाला नाही, कारण अॅबॉटचा पाय क्रीजच्या बाहेर होता आणि पंचांनी त्याला नो-बॉल म्हटले होते. अशा परिस्थितीत भारताच्या खात्यात षटकारा ऐवजी एकच धाव जमा झाली आणि टीम इंडियाने एक चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला.

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाकडून जोश इंग्लिशने शानदार शतक झळकावले. त्याने ५० चेंडूत ११० धावा केल्या. या काळात त्याने ११ चौकार आणि ८ षटकार मारले. इंग्लिशने २२० च्या धावगतीने धावा केल्या. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील त्याचे हे पहिलेच शतक होते. केवळ ४७ चेंडूंत त्याने शतक झळकावले होते. भारताविरुद्ध सर्वात वेगात शतक झळकवणारा तो दुसरा फलंदाज ठरला. दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरने सर्वात वेगवान शतक झळकावले आहे. मिलरने गुवाहाटी येथे २०२२ मध्ये केवळ ४६ चेंडूंत शतक झळकावले होते. वेस्ट इंडिजच्या इविन लुईसने २०१६ मध्ये ४८ चेंडूंत शतक झळकावले होते. दक्षिण आफ्रिकेच्या रिले रुसो यानेही २०२२ मध्ये इंदौर येथे ४८ चेंडूंत शतक झळकावले होते. ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने २०१९ मध्ये बंगळुरू येथे ५० चेंडूंत शतक झळकावले होते. जोश इंग्लिशने स्टीव्ह स्मिथसोबत दुसऱ्या विकेटसाठी १३० धावांची भागीदारीही केली. स्मिथने ५२ धावांची खेळी खेळली. टीम डेव्हिडने नाबाद १९ धावा केल्या. मॅथ्यू शॉर्ट १३ धावा करून बाद झाला. मार्कस स्टॉइनिसने नाबाद ७ धावा केल्या. भारताकडून प्रसिध कृष्णा आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

सूर्यकुमार यंदाच्या वर्षातला टी-२० क्रिकेट संघाचा चौथा आणि आजवरचा भारतीय टी-२० क्रिकेट संघाचा १३वा कर्णधार बनला. जानेवारी २०२१ पासून ९ जणांनी भारतीय टी-२० क्रिकेट संघाची धुरा सांभाळली आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये  वेस्ट इंडिजविरुद्ध हार्दिक पांड्या, ऑगस्टमध्येच आयर्लंडविरुद्ध जसप्रित बुमराह, आशिया स्पर्धेमध्ये ऋतुराज गायकवाड आणि आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार यादव यांनी भारतीय टी-२० क्रिकेट संघाची धुरा सांभाळली आहे. 

सूर्यकुमार यादवला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. मालिकेतला दुसरा सामना रविवार २६ नोव्हेंबर रोजी ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियम, तिरुवनंतपुरम येथे संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे.


राज्यभरात ७५ ठिकाणी नव्या नाट्यगृहांची उभारणी करणार - सांस्कृतिक कार्यमंत्री

 


राज्यभरात ७५ ठिकाणी नव्या नाट्यगृहांची उभारणी करणार - सांस्कृतिक कार्यमंत्री


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर हे सांस्कृतिक कार्य विभागाचे एकमेव नाट्यगृह आहे. राज्यातील इतर सर्व नाट्यगृहे ही स्थानिक स्वराज्य संस्थांची आहेत. त्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात राज्य सरकारतर्फे ७५ ठिकाणी नवीन नाट्यगृहे बांधण्यात येतील, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.


राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीची नांदी झाली. त्यावेळी सर्व केंद्रावरील स्पर्धकांना दृक्‌श्राव्य माध्यमातून शुभेच्छा देताना मुनगंटीवार बोलत होते. स्पर्धेच्या पारितोषिकांच्या मानधनामध्ये वाढ, परीक्षकांच्या मानधनामध्ये वाढ या बाबीही विचाराधीन असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.


मुंबई केंद्रावरील स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमास साहित्य संघ मंदिर, गिरगाव येथे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहसंचालक श्रीराम पांडे, ज्येष्ठ अभिनेते निर्माता दिग्दर्शक प्रमोद पवार, नाट्य अनुदान समिती सदस्या शैला सामंत, रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य व अभिनेता मकरंद पाध्ये, अभिनेते आनंदा कारेकर तसेच परीक्षक विनोद दुर्गपुरोहित, डॉ. समीर मोने, सुजाता गोडसे तर यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, ज्येष्ठ अभिनेते व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, ज्येष्ठ अभिनेते व रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय गोखले तसेच परीक्षक वसंत सामदेकर, ईश्वर जगताप, प्राची गडकरी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि नटराज पूजन झाले. साहित्य संघ मंदिर येथे 'अभिनय साधना, मुंबई' या संस्थेने 'मामला गडबड है!' तर यशवंत नाट्य मंदिर येथे ‘इंम्पल्स नाट्य संस्था, मुंबई’ या संस्थेने सादर केलेल्या ‘या वळणावर’ या नाटकाने स्पर्धेच्या प्राथमिक फेरीची सुरुवात झाली. मुंबई केंद्रावरील प्राथमिक फेरीत यंदा ६० संघांचे सादरीकरण होणार असून साहित्य संघ मंदिर, आणि यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे २८ डिसेंबरपर्यंत दररोज सायंकाळी सात वाजता एका नाटकाचे सादरीकरण होईल.


सातत्याने आयोजित होणारी राज्य नाट्य स्पर्धा राज्यातील महत्त्वाची सांस्कृतिक चळवळ असून यातून अनेक महत्त्वाची नाटके आणि रंगकर्मी उदयास आले आहेत. या स्पर्धेची तिकिटे १५ रुपये आणि १० रुपये, अशा अतिशय अल्प दरात उपलब्ध असून कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी केले.


Mastercard and U GRO Capital collaborate to extend financing solutions to small businesses and support business growth

 Mastercard and U GRO Capital collaborate to extend financing solutions to small businesses and support business growth

 

23rd November 2023, India: Mastercard, today announced a collaboration with U GRO Capital, an NBFC specializing in MSME financing, to extend financing solution to small businesses in India that require financial support to maintain and grow their operations. MSMEs in India have long grappled with substantial challenges, including constrained access to capital. According to recent reports, out of over 64 million MSMEs in India, only 14 per cent have access to credit.

 

This strategic collaboration between Mastercard and U GRO Capital aims to address this challenge by enabling a holistic digital supply chain financing solution for millions of small businesses in India. U GRO Capital will leverage its proprietary underwriting and cash flow backed assessment model to offer short term credit to dealer-distributors and last-mile retailers, among other small merchants and women entrepreneurs. Through its vast network, Mastercard is bringing together the demand and supply side ecosystem stakeholders on a common platform to facilitate the adequate support for the growth of small businesses.

 

Vikas Varma, Chief Operating Officer, South Asia, Mastercard, commented, "Mastercard understands the substantial challenges faced by MSMEs in accessing capital, thus, posing a barrier to the growth of their businesses. The credit gap requires a collective effort, and it is imperative to forge right partnerships within the ecosystem to overcome the existing divide. U GRO Capital and Mastercard are joining forces to deliver an accessible working capital solution and the collaborative commitment aims to fuel the growth of small businesses across India, paving the way for sustained success in the entrepreneurial landscape."

 

With its progressive approach to MSME financing, U GRO Capital leverages data tech platform to extend credit to MSMEs. The approach emphasizes cash flow-backed assessments based on data analysis, transcending traditional financial and collateral-based evaluations. U GRO Capital's proprietary underwriting model, the GRO Score, goes beyond traditional lending by harnessing the power of ecosystems and leverages alternate data sources to evaluate customers based on their banking, bureau, and GST behaviors, facilitating credit extension to the last mile.

 

Shachindra Nath, Vice Chairman and Managing Director, U GRO Capital, said, “We are truly excited to collaborate with Mastercard, a recognized global leader in the payment industry. This strategic partnership complements our vision of reshaping the MSME finance landscape and meeting the pressing demands for instant working capital. We are confident to onboard millions of small businesses through the Mastercard network, thereby magnifying our collective impact on the MSME sector. This alliance, underpinned by innovation and a shared commitment, holds the potential to be a pivotal force in addressing the intricate credit needs of MSMEs nationwide.”

 

Mastercard announced a global commitment to bring a total of one billion people and 50 million micro and small businesses, including 25 million female entrepreneurs into the digital economy by 2025. This collaboration with U GRO Capital aligns with Mastercard’s mission to drive financial inclusion for businesses across India.

Wednesday 22 November 2023

२ फेब्रुवारीला 'मुसाफिर' घडवणार मैत्रीची सुंदर सफर दिमाखदार सोहळ्यात पोस्टरचे अनावरण

 

२ फेब्रुवारीला 'मुसाफिर' घडवणार मैत्रीची सुंदर सफर 

दिमाखदार सोहळ्यात पोस्टरचे अनावरण 

'मुसाफिरा'... स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेला पहिला भारतीय चित्रपट. खरंतर चित्रपटाच्या घोषणेपासूनच 'मुसाफिर'ची सर्वत्र चर्चा होती. एक म्हणजे चित्रीकरण स्थळ आणि दुसरे म्हणजे चित्रपटाची तगडी स्टारकास्ट. त्यामुळे हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक होते. परंतु आता ही प्रतीक्षा संपली असून एका दिमाखदार सोहळ्यात 'मुसाफिरा' च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. यावेळी ढोल ताशाच्या गजरात 'मुसाफिरा'च्या २० फूट लांब भव्य पोस्टरचे अनावरणही करण्यात आले. प्रेमाची नवीन परिभाषा सांगणारा हा चित्रपट २ फेब्रुवारी २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या बिग बजेट चित्रपटात पुष्कर जोग, पूजा सावंत, पुष्कराज चिरपुटकर, भोजपुरी स्टार स्मृती सिन्हा, दिशा परदेशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 


मैत्री हा विषय नेहमीच प्रेक्षकांसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे असे चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजतात. 'मुसाफिरा' ही असाच मैत्रीवर बेतलेला चित्रपट आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर्स, गुझबम्प्स एंटरटेन्मेंट आणि नितीन वैद्य निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर जोग यांनी केले आहे. 


चित्रपटाबद्दल दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणतात, '' स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेल्या पहिल्या भारतीय चित्रपटाचा मान 'मुसाफिरा'ला मिळाला आहे, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. हा चित्रपट केवळ तरुणाईसाठी मर्यादित नसून हा चित्रपट प्रत्येक वयोगटासाठी आहे. हृदयस्पर्शी कहाणी असेलला हा चित्रपट जुन्या मैत्रीची आठवण करून देणारा आहे. आजच्या धकाधकीच्या काळात मित्रपरिवारापासून दूर गेलेल्या मित्रमैत्रीणींना पुन्हा एकत्र आणणारा ‘मुसाफिरा’ आहे. यात मैत्री आहे, धमाल आहे, भावनिक बंध आहेत आणि भांडणेही आहेत. कलाकारही उत्तम आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने भोजपुरी स्टार स्मृती सिन्हा मराठीत पदार्पण करत आहे. 'मुसाफिरा' प्रेक्षकांना मैत्रीची सुंदर सफर घडवणार, हे नक्की !''


Tuesday 21 November 2023

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिकांचा होणार महासंगम



 कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिकांचा होणार महासंगम


कलर्स मराठी वाहिनीवरील ‘भाग्य दिले तू मला’ व ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या सर्वांच्या आवडत्या मालिकांचा होणार मिलाप. या मालिकांतील लोकप्रिय जोडी   म्हणजेच 'भाग्य दिले तू मला’मालिकेतील राजवर्धन-कावेरी आणि  'पिरतीचा वणवा उरी पेटला' मालिकेतील अर्जुन-सावि आपल्याला एकत्र पाहायला मिळणार आहे. सध्या दोन्ही मालिकांमध्ये नात्यांचा दुरावा पाहायला मिळतोय. एकीकडे राज व त्याच्या आईच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे तर अर्जुन साविच्या नात्यात देखील दुरावा निर्माण झाला आहे. आता राज-कावेरी, अर्जुन-सावि यांना कोणत्या संकटाला सामोरं जावं लागेल? कावेरी आणि सावि त्यांच्या युक्तीने सगळ्यांना या संकटातून बाहेर काढू शकतील का? भाग्य जपणारी कावेरी आणि प्रेम जपणारी सावि राज व अर्जुनाची समजूत काढू शकतील का? या महासंगमामुळे दोन्ही जोडप्यांच्या आयुष्यात काय बदल होईल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे येत्या २३ नोव्हेंबरला या विशेष भागात मिळतील. तेव्हा नक्की पहा महासंगम गुरुवारी रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.


Monday 20 November 2023

DSP Mutual Fund launches DSP Banking & Financial Services Fund

 DSP Mutual Fund launches DSP Banking & Financial Services Fund

Offers investors a timely option to invest in the structural growth opportunity

Mumbai, November 20, 2023: The Banking and Financial Services sector has been a structural growth story in India, which is evident in its outperformance over the broader Nifty 50 Index on all 10-year periods. The returns from the sector have also been more consistent across time periods compared to the broader Nifty 50 Index. However, the sector has been underperforming the Nifty 50 Index since September 2019. Hence, the possibility of a reversal in underperformance combined with reasonable valuations for the Banking and Financial Services sector along with their strong balance sheets present an interesting opportunity to investors.

 

DSP Mutual Fund announced the launch of DSP Banking & Financial Services Fund (DSP BFSF), an open-ended scheme that offers investors an opportunity to partake in the long term structural opportunity in the banking and financial services space. Apart from banks, the sector also encompasses major areas like NBFCs including Housing Finance Companies, Life Insurance, Non-Life Insurance, AMC, Exchanges & Depositories, which have all grown at a faster rate than the nominal GDP of India in the last 15 years. All these combined make up a profit opportunity of over $ 4 Trillion.

 

The Nifty Financial Services TRI has also delivered over 12% returns in 90% of times over a 7+ year timeframe compared to 52% for Nifty 50 TRI. Banking, Financial Services and Insurance (BFSI) forms 38% of the profit pool of the Top 500 companies in India, but is just 26% of the market cap. The last 10-year profit growth for BFSI was 17% compared to 10% among Top 500 companies excluding BFSI. Bank balance sheets have also grown stronger with lower NPAs. This could aid a sustained pick up in credit growth.    

 

DSP BFSF follows a stock-specific approach that favors business fundamentals over market outlook and attempts to have a high active share compared to the benchmark. It also has the flexibility for Global Investments where the Fund Manager can invest in selective fundamentally sound businesses internationally which are not available in India.

 

Under normal circumstances, the asset allocation of DSP BFSF would be between minimum 80% to maximum 100% in equity and equity related securities of companies in the Banking and Financial services  sector, up to 20% in equity and equity related securities of other companies, up to 20% in debt and money market instruments and up to 10% in units issued by REITs and InvITs.

 

The New Fund Offer for DSP BFSF will open for subscription on November 20th, 2023, and will close on December 4th, 2023.

 

Companies in the BFSI sector have large profits compared to other sectors. The profit pool is also growing due to the addition of diverse businesses across insurance companies, mutual funds, wealth management firms, tech platforms supporting the industry, payments and fintech. We prefer to raise money in such sectors with long lasting growth when their prices are falling or consolidating. Lenders also have leverage as raw material and hence go through cycles of volatility. In recent years, stocks in the BFSI space have corrected, thus increasing the margin of safety for an investor. We are happy to launch the NFO when valuations are reasonable,” says Kalpen Parekh, MD & CEO, DSP Mutual Fund.

आता होणार पुन्हा झिम्मा’ 'झिम्मा २'चे टायटल सॉन्ग प्रदर्शित

 


आता होणार पुन्हा झिम्मा’

'झिम्मा २'चे टायटल सॉन्ग प्रदर्शित 


बायकांच्या मनात काय सुरु असते, याचे उत्तर मिळणे जरा अशक्यच आहे. त्या कधी कशा व्यक्त होतील याचा काही नेम नसतो. अशाच विविध तऱ्हा असणाऱ्या, व्यक्तिमत्वाच्या बायका जेव्हा एकत्र येतात तेव्हा मात्र धम्माल होते. अशीच धमाल आता 'झिम्मा २'मध्ये ही पाहायला मिळणार आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा २'च्या ट्रेलरची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु असतानाच आता या चित्रपटातील उत्साहाने भरलेले टायटल सॉन्ग प्रदर्शित झाले आहे. या टायटल सॉन्गची धमालही चित्रपटाच्या कथेप्रमाणे डबल धमाकेदार झाली आहे. 


इंदूच्या (सुहास जोशी)च्या ७५ व्या वाढदिवसानिमित्ताने परदेशात रियुनियनसाठी निघालेल्या या सात मैत्रिणींचा प्रवास आता थोडा रंजक, थोडा भावनिक आणि थोडा हटके असणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'पुन्हा झिम्मा' या बहारदार गाण्याची रंगतही आता डबल झाली आहे. अमितराज यांचे संगीत लाभलेल्या या जबरदस्त गाण्याला क्षितिज पटवर्धन यांनी शब्दबद्ध केले आहे तर या भन्नाट गाण्याला वैशाली सामंत आणि अपेक्षा दांडेकर यांच्या एनर्जेटिक आवाजाने चारचांद लावले आहेत. 


सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे यांच्यावर चित्रित झालेले हे गाणे या सात जणींना या सहलीत पुन्हा एकदा स्वतःची एक वेगळी ओळख करून देणार आहे.

यात दिसणाऱ्या सिद्धार्थ चांदेकरच्या चेहेऱ्यावरच या चित्रपटातली धमाल कळुन येत आहे.


गाण्याबद्दल संगीतकर अमितराज म्हणतात, '' या चित्रपटातील गाणी म्हणजे या चित्रपटातील या व्यक्तिरेखा आहेत. सगळीच गाणी करताना मज्जा आली. त्यांचे चित्रीकरणही कमाल झाले आहे. खरं सांगायचे तर 'झिम्मा २' ची गाणी बनवणे आमच्यासाठी खरंच आव्हानात्मक होते. त्यातही 'झिम्मा'चे टायटल सॉन्ग प्रचंड लोकप्रिय झाले होते. त्यामुळे 'झिम्मा २'चे टायटल सॉन्ग करताना आमच्यावर तसे दडपण होते. कारण या गाण्याची पातळी 'झिम्मा २'मध्ये वर नेणे गरजेचे होते. त्यामुळे यात आम्ही काही नवीन घटकही समाविष्ट केले आहेत. प्रत्येकाला ठेका धरायला लावणारे ही गाणे झाले आहे. त्यात वैशाली सामंतने आपल्या अनोख्या आवाजाने हे गाणे अधिकच उत्स्फूर्त केले आहे. त्यामुळे 'झिम्मा २'चे टायटल सॉन्ग यावेळी तुफान झाले आहे.'' 


कलर यल्लो प्रॉडक्शनच्या सहकार्याने जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मित 'झिम्मा २'ची सफर २४ नोव्हेंबरला घडणार आहे.


Thursday 16 November 2023

'नाळ भाग २'सोबत जोडली गेली कलाकारांची नाळ

 



'नाळ भाग २'सोबत जोडली गेली कलाकारांची नाळ 


सध्या सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित 'नाळ भाग २'ची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. दिवाळीत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच आता मराठी कलाकारांचीही या चित्रपटासोबत नाळ जोडली जात आहे. अनेक कलाकार आपल्या सोशल मीडियावरून या चित्रपटाचे भरभरून कौतुक करत आहेत. महेश मांजरेकर, विजू माने, आदिनाथ कोठारे, स्मिता तांबे यांच्यासह अनेक कलाकारांनी या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिल्या आहेत. 


महेश मांजरेकर यांनी आपल्या सोशल मीडियावर खास व्हिडीओ शेअर केला आहे. ''अप्रतिम सिनेमा आहनाळ . अभिमान वाटला, की मराठीत असा चित्रपट यावा. 'नाळ भाग २' हा सिनेमा देशात सगळ्यांनी बघायला पाहिजे. यात तीन मुलांची कामे आहेत. अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये या चित्रपटाला नामांकने मिळतील. विशेषतः या चित्रपटातील चिमीची भूमिका साकारणाऱ्या त्या चिमुकलीला. मी सांगेन तिचे नामांकन सर्वोत्कृष्ट बालकलाकारमध्ये न घेता 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री'मध्ये घ्या. मराठी चित्रपट काहीतरी वेगळे देण्याचा नेहमीच प्रयत्न करतात. अतिशय सुंदर चित्रपट आहे. सर्वानी हा चित्रपट नक्की पाहा.'' असे कौतुक करत हा चित्रपट पाहाण्याचे आवाहनही महेश मांजरेकर यांनी केले आहे. तर दिग्दर्शक विजू माने म्हणतात, ''सुधाकर रेड्डी यंकट्टी यांनी लेखणीसहित कॅमेऱ्यानेही चित्रपट सुंदर रेखाटला आहे. पात्रांच्या रचना आणि त्यांच्या एकमेकांशी असलेला प्रतिकात्मक संबंध हा अगदी सामान्य प्रेक्षकांनाही कळणारा आहे. कुठलाही अविर्भाव नसलेला हा अत्यंत नैसर्गिक आणि निरागस सिनेमा निखळ आनंद देऊन जातो.'' 


 ''प्रत्येक फ्रेम काहीतरी सांगतेय. शब्दांपेक्षा दृष्टिक्षेपातून दाखवण्याचा उत्तम प्रयत्न  केला आहे. बघता बघता आपसूकच कंठ दाटून येतो. अप्रतिम सिनेमा.''अशी प्रतिक्रिया आदिनाथ कोठारे याने दिली आहे. तर स्मिता तांबे म्हणते, '' एक अत्यंत अप्रतिम अनुभव आहे. भावाबहिणीने, संपूर्ण कुटुंबाने एकत्र जाऊन पाहावा, असा हा सिनेमा आहे. या चित्रपटात अनेक हळव्या भावना आहेत. एखाद्या गावाचे चुकून कॅमेरा शिरला आहे, इतका नैसर्गिक अभिनय ही पत्रे करत आहेत. सुधाकर रेड्डी यंकट्टी, नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओजने एक उत्तम कलाकृती दिवाळीच्या निमित्ताने भेट दिली आहे.'' याव्यतिरिक्त प्रियदर्शन जाधव, सोनाली खरे, विजय पाटकर, जयवंत वाडकर, प्रथमेश परब आदी कलाकारांनीही 'नाळ भाग २'चे विशेष कौतुक केले आहे.


Indian Renewable Energy Development Agency Limited’s Initial Public Offering to open on Tuesday, November 21, 2023, sets price band at ₹30 to ₹32 per Equity Share



 Indian Renewable Energy Development Agency Limited’s Initial Public Offering to open on Tuesday, November 21, 2023, sets price band at ₹30 to ₹32 per Equity Share

 

Mumbai, November 16, 2023: Indian Renewable Energy Development AgencyLimited,a Government of India (“GoI”) enterprise notified as a “Public Financial Institution” (“PFI”) registered as a Systemically Important Non-Deposit-taking Non-Banking Finance Company (a “NBFCND-SI”), with Infrastructure Finance Company (“IFC”) status,has fixed the price band at ₹30to ₹32per Equity Share for its maiden initial public offer. The Initial Public Offering (“IPO” or “Offer”) of the Company will open for public on Tuesday, November 21, 2023, for subscription and close on Thursday, November 23, 2023. Investors can bid for a minimum of 460 Equity Shares and in multiples of 460 Equity Shares thereafter.

The Public Issue of face value of ₹10 per Equity Share comprises of fresh issuance of Equity Shares up to 403.16 million and an Offer for Sale (OFS) of up to 268.78 million aggregating to up to 671.94 million equity shares.

IREDA is a financial institution with over 36 years of experience in promoting, developing and extending financial assistance for new and renewable energy projects, and energy efficiency and conservation projects. It provides a comprehensive range of financial products and related services, from project conceptualisation to post-commissioning, for renewable energy projects and other value chain activities, such as equipment manufacturing and transmission.

It is also India's largest pure-play green financing NBFC in India. IREDA is the issuer of first debt security (green masala bond) in India listed on IFSC exchange. IREDA is the first financial institution in India to raise green masala bonds IREDA is among the first financial institution to raise global funds for climate financing from DFIs / multilaterals in India.

It has a geographically diversified portfolio, with Term Loans Outstanding across 23 States and five Union Territories across India, as of September 30, 2023, and has four strategically located branches in Mumbai, Hyderabad, Chennai, and Bhubaneshwar to maximize geographical range in terms of territory.

IREDA also extends lines of credit to other non-banking financial companies (NBFCs) for lending to RE and EEC projects. Additionally, it offers loans to government entities and financing schemes for RE suppliers, manufacturers, and contractors, while non-fund-based products comprise instruments like letters of comfort, letters of undertaking, payment on order instruments, and guarantee assistance schemes. As of September 30, 2023, it had a diversified portfolio of term loan outstanding amounting to Rs 47,514.48 crore.

For the fiscal year 2023, the net interest income increased to Rs 1323.76 crore against Rs 1128.04 crore a year ago. Net profit increased from Rs 633.53 crore in fiscal 2022 to Rs 864.63 crore in fiscal 2023. Capital to risk-weighted asset ratio (“CRAR”) stood at 18.82% for Fiscal 2023 and for the six months ended September 30, 2023, it was 20.92%.

For the six months ended September 30, 2023, Net Interest Income stood at Rs 785.42 crore, and profit after tax was Rs 579.31 crore. For the same period, IREDA sanctioned total loans amounting to Rs 4,744.50 crore.

IDBI Capital Markets & Securities Limited, BOB Capital Markets Limited, and SBI Capital Markets Limited are the book-running lead managers.

Notes for Reference:

Issue Size of the IPO based on the upper and lower end of the price band

 

Fresh (403,164,706 equity shares)

OFS (268,776,471 equity shares)

Total (671,941,177 equity shares)

Lower Band (@Rs 30)

Rs 1209.49 crore

Rs 806.33 crore

Rs 2015.82 crore

Upper Band (@Rs 32)

Rs 1290.13 crore

Rs 860.08 crore

Rs 2150.21 crore

 


Wednesday 15 November 2023

*भारतात दिवाळीचा आनंद द्विगुणित; १२ वर्षांनंतर भारत अंतिम फेरीत; न्यूझीलंडकडून २०१९ च्या पराभवाचा घेतला बदला; कोहली-अय्यरनंतर शमीचे वर्चस्व*

 


*भारतात दिवाळीचा आनंद द्विगुणित; १२ वर्षांनंतर भारत अंतिम फेरीत; न्यूझीलंडकडून २०१९ च्या पराभवाचा घेतला बदला; कोहली-अय्यरनंतर शमीचे वर्चस्व*


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारताने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर बुधवारी (१५ नोव्हेंबर) झालेल्या रोमांचक सामन्यात त्यांनी न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने २०१९ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाचा बदलाही घेतला. भारतीय संघ तब्बल १२ वर्षांनंतर या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. शेवटच्या वेळी २०११ मध्ये टीम इंडियाने घरच्या मैदानावर विजेतेपदाच्या सामन्यात धडक मारली होती. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील संघ विजेता ठरला होता. भारतीय संघ आता १९ नोव्हेंबरला होणाऱ्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे.


भारत चौथ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजचा पराभव करून पहिल्यांदा विजेतेपद पटकावले होते. २००३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम फरीमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. तेव्हा सौरव गांगुली कर्णधार होता. आठ वर्षांनंतर, २०११ मध्ये, जेव्हा भारताने अंतिम फेरी गाठली, तेव्हा त्यांनी श्रीलंकेचा पराभव केला आणि दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. विश्वचषकात सर्वाधिक सलग सामने जिंकणार्‍य़ा संघांत ऑस्ट्रेलिया सलग ११ सामने जिंकून प्रथम स्थानी विराजमान आहे. तर भारताने यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत सलग १० सामनै जिंकले आहेत. 


प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित ५० षटकांत चार गडी गमावून ३९७ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ ४८.५ षटकांत ३२७ धावांवर गारद झाला. भारताच्या विजयात विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि मोहम्मद शमीचे योगदान महत्त्वाचे होते. कोहलीने ११७ धावांची तर अय्यरने १०५ धावांची खेळी खेळली.  त्याचवेळी मोहम्मद शमीने अप्रतिम गोलंदाजीचे कौशल्य दाखवत सात विकेट्स घेतल्या. तिघांनी मिळून भारताला सलग तिसऱ्यांदा उपांत्य फेरीत पराभूत होऊ दिले नाही.  टीम इंडियाला २०१५ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि २०१९ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात पराभव पत्करावा लागला होता.


नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारताने शानदार सुरुवात केली. प्रथम रोहितने वेगाने धावा केल्या आणि त्यानंतर गिलने आक्रमक फलंदाजी केली. रोहितने विश्वचषकामध्ये ५० षटकार पूर्ण केले आणि पॉवरप्लेमध्ये टीमची धावसंख्या ५० धावा पार केली. सौदीच्या चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात रोहित शर्मा वैयक्तिक ४७ धावांवर बाद झाला. मात्र, पॉवरप्लेमध्ये टीम इंडियाला एका विकेटच्या नुकसानावर ८४ धावा करता आल्या. गिल आणि कोहलीने भारताची धावसंख्या १५० धावांच्या पुढे नेली. यादरम्यान गिलने ४१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. ६५ चेंडूत ७९ धावा केल्यानंतर गिलला वानखेडेच्या उकाड्याने त्रास झाला. त्याला पेटके येत होते आणि त्यामुळे तो मैदानाबाहेर गेला होता.


विराट कोहलीने श्रेयस अय्यरच्या साथीने भारताची धावसंख्या २०० धावांच्या पुढे नेली. त्याने ५९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यादरम्यान, तो विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. त्याने सचिनचा ६७३ धावांचा विक्रम मागे टाकला. विराट आणि श्रेयसने शतकी भागीदारी करत भारताची धावसंख्या २५० धावांच्या पुढे नेली. विराटने एकदिवसीय क्रिकेटमधील ५० वे शतक झळकावले आणि भारताची धावसंख्या ३०० धावांच्या पुढे नेली. तो ११७ धावा करून बाद झाला. यानंतर श्रेयस अय्यर आणखीनच आक्रमक झाला. राहुलच्या साथीने त्याने भारताची धावसंख्या ३५० धावांच्या पुढे नेली. यानंतर श्रेयसने ६७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि ७० चेंडूत चार चौकार आणि आठ षटकारांच्या मदतीने १०५ धावा करून तो बाद झाला.  ४९व्या षटकात फलंदाजीला आलेला सूर्यकुमार एक धाव करून बाद झाला. शेवटी लोकेश राहुलने शुभमन गिलच्या साथीने शेवटच्या षटकात शानदार फलंदाजी करत भारताची धावसंख्या ३९७ धावांपर्यंत नेली. ३९ धावा करून तो नाबाद राहिला. तर शुभमन गिल ८० धावा करून नाबाद राहिला. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने तीन आणि ट्रेंट बोल्टने एक विकेट घेतली.


न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेलने १३४ धावा केल्या. कर्णधार केन विल्यमसनने ६९ धावांची खेळी केली. ग्लेन फिलिप्सने ४१ धावांचे योगदान दिले. कॉनवे आणि रचिन हे दोन्ही किवी सलामीवीर १३ धावा करून तंबूमध्ये परतले. भारताकडून मोहम्मद शमीने सात विकेट घेतल्या. तोच सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

Saturday 11 November 2023

अशी सापडली 'नाळ भाग २'मधील चिमी !

 


अशी सापडली 'नाळ भाग २'मधील चिमी !

ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते, तो झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित 'नाळ भाग २' अखेर दिवाळीच्या मुहूर्तावर सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील गाणी, ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. या सगळ्यात आणखी एक व्यक्तिरेखा प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे, ती म्हणजे चिमुकली चिमी म्हणजेच त्रिशा ठोसर. ‘डराव डराव’ गाणे प्रदर्शित झाले आणि या गाण्यातील ही चिमुकली कोण असा सगळ्यांना प्रश्न पडला. तिचा तो तोरा बघून अनेक जण तिचे चाहते झाले. एवढ्या लहानग्या, गोंडस, निरागस त्रिशाची निवड 'चिमी'च्या व्यक्तिरेखेसाठी कशी झाली, हे जाणून घेण्यासाठी अनेक प्रेक्षक उत्सुक आहेत. 

त्रिशाच्या निवडीबद्दल चित्रपटाचे दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यंकट्टी म्हणतात, ''मी, नागराज मंजुळे आणि आमची टीम चित्रपटासाठी कलाकारांची निवड करतो. ज्यावेळी 'चिमी'ची व्यक्तिरेखा लिहिली गेली आणि तिचा शोध सुरु झाला त्यावेळी आम्ही वयाची मर्यादा ठेवली नाही. आमच्या डोक्यात एकच होते ती मुलगी जितकी लहान असेल तितके उत्तम. त्या दृष्टीने आमचे शोधकार्य सुरु होते. अनेक ऑडिशन्स आल्या. आमचे एक होते की, शक्यतो नवा चेहरा असावा. कारण आधी काम केलेले बालकलाकार तसे अनुभवी असतात आणि आम्हाला नैसर्गिक अभिनय हवा होता. आमच्या टीमने तिची ॲाडिशन घेतली. आम्हाला सगळ्यांनाच ती आवडली. म्हणून आमच्या टीममधून काही जण दोन दिवस तिच्या घरी दिवसभर जायचे आणि तिचे ऑडिशन घ्यायचे. ती कशी वावरते, बोलते या सगळ्याचे निरीक्षण केले आणि आम्हाला आमची 'चिमी' सापडली. त्यावेळी ती फक्त साडेतीन वर्षांची होती. त्रिशा अतिशय गुणी मुलगी आहे. इतकी लहान असूनही कधी तिने किरकिर केली नाही. आम्हाला कधी कधी वाटायचे दिवसभर चित्रीकरण ही करू शकेल ना ? परंतु त्रिशा नेहमीच उत्साही असायची. संवादाचे 'गिव्ह अँड टेक'ही तिने पटकन आत्मसात केले. तिचे पाठांतर अतिशय उत्तम आहे. सेटवर त्रिशा सगळ्यांचीच लाडकी होती. आम्ही तिचा चौथा वाढदिवसही सेटवर साजरा केला होता.'' 


या चित्रपटात श्रीनिवास पोकळे, त्रिशा ठोसर, भार्गव जगताप, नागराज मंजुळे, देविका दफ्तरदार, दीप्ती देवी आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


कलर्स मराठीवरील कलाकारांच्या दिवाळीच्या आठवणी आणि किस्से...

 


कलर्स मराठीवरील कलाकारांच्या दिवाळीच्या आठवणी आणि किस्से...


दिवाळी हा आत्मिक व सामाजिक साक्षरतेचं समर्थन करणारा सण आहे. धूप, दीप, रांगोळी व सजावट दिवाळीला अजून सुंदर बनवतात. सुंदर रांगोळी व दीपांची चमक हे आनंदात भर घालतात. कलर्स मराठीवरील लोकप्रिय कलाकार सांगत आहेत त्यांचे दिवाळीच्या आठवणी आणि किस्से.


कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ मालिकेत स्वामी समर्थांची भूमिका साकारणारे अक्षय मुडावदकर म्हणतात, " दिवाळीच्या माझ्या आठवणी वेगवेगळ्या टप्प्यावर आहे. माझं बालपण नाशिकमध्ये गेलं. तिथली विशेष आठवण म्हणजे दिवाळीच्या सुट्टीत लपाछपी आणि क्रिकेट सारखे खेळ खेळून आम्ही खूप मजा करायचो. ह्या टप्प्यावर आमच्या कुटुंबात एक नवीन व्यक्तीचा परिचय झाला आहे, माझी पुतणी, मनू . जी आमची दिवाळी आणखी खास बनवते.ही दिवाळी खरोखरच खास असणार आहे कारण सर्वजण एकत्र असतील."


कलर्स मराठीवरील सिंधुताई माझी माई मालिकेत सिंधुताईंची भूमिका साकारणारी शिवानी सोनार म्हणते,"माझी दिवाळीची आठवण अशी की, गेले ४-५ वर्ष कामामुळे दिवाळीला मी घरी नाही आहे फक्त लक्ष्मीपूजनाला मी घरी जाते. माझ्यासाठी किल्ला बनवणे ही खूप जवळची आठवण आहे. मी आणि माझा भाऊ लहानपणी किल्ला बनवून, त्यावर मावळे ठेवायचो. जेव्हा मी किल्ला बघते मला मनात असं वाटतं की मला पुन्हा किल्ला बनवायचा आहे कारण तो एक वेगळाच उत्साह आणि मजा आहे."



कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला मालिकेतील रत्नमाला म्हणजेच निवेदिता सराफ म्हणतात,"आम्ही लहान असताना आई खाजाचे कानोले, लाडू चिवडा, बाळ फराळ असे स्वादिष्ट पदार्थ बनवत असे. लग्न झाल्यावर दिवाळीच्या वेळी सासरचे लोक माझ्या घरी येतात आणि आम्ही सगळे मिळून जेवतो. या वर्षी आम्ही आमच्या नातेवाईकांच्या घरी जाणार आहोत, तरीही मला हे सगळे दिवाळीचे पदार्थ बनवायला आवडतात. माझा मुलगा अनिकेत गेल्या काही वर्षांपासून दूर आहे आणि मुलांशिवाय सण साजरे करणे रिकामे वाटते. पण, आम्ही त्याच्यासोबत व्हिडिओ कॉल करतो आणि एकत्र दिवाळी फराळ करतो. मी त्याला दरवर्षी फराळ पाठवते. तसेच मी आणि अशोक, श्रद्धानंद महिला आश्रम आणि कुमुदबेन इंडस्ट्रियल होम फॉर ब्लाइंड मुलींना दिवाळीच्या फराळाचे वाटप देखील करतो. जे घरापासून दूर आहेत आणि एकटे साजरे करू शकत नाहीत त्यांना दिवाळीचा फराळ पुरवतो."



कलर्स मराठीवरील रमा राघव मालिकेतील रमा म्हणजेच ऐश्वर्या शेटे म्हणते,"लहानपणी माझ्या कुटुंबात दिवाळीला तुळशीचं लग्न असायचं. सुरुवातीला आम्ही करत नव्हतो, पण शेजारी राहणाऱ्या माझ्या मावशीकडे तुळशीचा विवाह असायचा, म्हणून मी माझ्या आईलाही ते करायला पटवून दिलं. तेव्हापासून आम्ही दिवाळीला तुळशीविवाह मोठ्या उत्साहात साजरा करतो. दिवाळीचा एक किस्सा आहे, जेव्हा मला फटाक्यांची भीती वाटायची कारण कोणीतरी बटरफ्लाय  लावला होता आणि तो माझ्या ड्रेसमध्ये शिरला. ही वाईट आठवण असूनही, हा एक मजेदार किस्सा आहे. दिवाळीच्या काळात मला माझ्या मित्रांना आणि भावंडांना भेटायला मजा येते आणि आम्ही खूप धमाल करतो."



कलर्स मराठीवरील रमा राघव मालिकेतील राघव म्हणजेच निखिल दामले म्हणतो,"माझ्या आजीचा केटरिंगचा व्यवसाय होता त्यामुळे दिवाळी आली की हे सगळे पदार्थ बनवायला घेते. लहान असताना तिला मी, बाबा, आई मदत करायचो आणि सगळे मिळून फराळ बनवायचो. आता कामामुळे मी नसतो तेवढा घरी पण तरी आज्जी आई, बाबा आणि आत्याच्या मदतीने जेवढा जमेल तितका  फराळ करत असते. खूप मजा येते आम्ही सगळे भेटतो सगळे घरी येतात."



कलर्स मराठीवरील पिरतीच वानवा उरी पेटला मालिकेतील सावित्री म्हणजेच रसिका वाखारकर म्हणते, "दिवाळीबद्दलची माझी आवडती गोष्ट म्हणजे त्यातून मिळणारा विलक्षण उत्साह. वातावरण थंड होऊ लागते, वातावरण रम्य होते आणि रात्री सुंदर दिव्यांनी उजळून निघते. हे खूप रोमांचक आहे! दिवाळीचा विचार करते तेव्हा मला लहानपणी रांगोळ्या काढणे आणि किल्ले बनवल्याचे आठवते. जरी मी रांगोळ्या काढण्यात उत्तम नसले तरी माझी रांगोळी वेगळी दिसावी म्हणून मी वेगवेगळे रंग वापरत असे. मी दोन प्रकारच्या रांगोळ्या काढायचे - एक फुलांची आणि एक रंगांची. मी १०वी पूर्ण केल्यानंतर घरापासून दूर राहत असल्याने, आता दिवाळी म्हणजे खूप दिवसांनी कुटुंबाशी भेटणं आहे. दिवाळीत माझ्यासाठी हेच सर्वात महत्त्वाचं असतं."


कलर्स मराठीवरील पिरतीच वानवा उरी पेटला मालिकेतील अर्जुन म्हणजेच इंद्रनील कामत म्हणतो, "दिवाळी म्हंटलं की मला सुट्ट्या, आजोळ, मामाचं शेत. ती १०-१२ दिवसांची मजा. लहानपणी आजी आम्हाला ओळीने बसवायची आणि चंदन उगळायला लावायची ती आमच्यासाठी एक स्पर्धाच असायची की कोण सकाळी लवकर उठेल आणि कोण अभ्यंग स्नान करेल ते ही चंदन उगाळून, उटणं लावून ही एक धमाल होती. लहानपणी मला असा वाटायचं की सगळे लोक फराळ बनवता आहेत तो आपल्याला फक्त बसून वारपायचा आहे. अजून एक आठवण किल्ला बनवायची. मला अजून ही प्रचंड आवड आहे किल्ला बनवायची पण आता वेळे अभावी जमत नाही. मी कामासाठी बाहेर मला घरच्यांना भेटता येत नाही पण दिवाळी माझ्यासाठी त्या जुन्या आठवनींना उजाळा देण्याचं काम करते. नातं जपण्याची संधी दिवाळी देते असा मला वाटतं."