Wednesday 15 May 2024

 




Q4/FY’24 Results - 15th May, 2024

Ø Consolidated Financial Highlights

·      PFC Group registered the highest annual Profit After Tax (PAT) with 25% increase - Rs. 21,179 crores in FY’23 to Rs. 26,461 crores in FY’24.

·      PFC Group continues to be the largest NBFC Group in India with total balance sheet size crossing more than Rs.10 lakh crore in FY’24 – The current balance sheet size is 10.39 lakh crores.

·      16% growth in consolidated loan asset book from Rs. 8,57,500 crores as on 31.03.2023 to Rs. 9,90,824 crores as on 31.03.2024

·      Consolidated Net worth (including  non-controlling interest) increased by 20% - Rs. 1,11,981 crores as on 31.03.2023 to Rs. 1,34,289 crores as on 31.03.2024

·      The consolidated Gross NPA nearly touches 3% and is at 3.02% in FY’24 vs. 3.66% in FY’23.

·      Owing to active resolution efforts, consolidated Net NPA has reached its lowest level at 0.85% in FY’24 from 1.03% in FY’23.

 

Ø Stand Alone Financial Highlights

·      PFC is now the highest profit making NBFC in India, with 24% remarkable increase registered in Standalone Profit After Tax from Rs. 11,605 crores in FY’23 to Rs. 14,367 crores in FY’24.

·      18% increase registered in Quarterly PAT from Rs. 3,492 crores in Q4’23 to Rs. 4,135 crores in Q4’24.

·      Final dividend of Rs. 2.50 per share proposed by Board in Q4’24. With this, PFC has given a total dividend of Rs. 13.50 per share for FY 24.

·      Double-digit growth of 14% witnessed in loan asset book- from Rs. 4,22,498 crores as on 31.03.2023 to Rs.4,81,462 crores as on 31.03.2024.

·      Renewable book registered 25% year on year growth, The renewable loan portfolio has crossed the 60K milestone and is at Rs.60,208 crores. PFC continues to be the largest renewable lender in India.

·      PFC continues to maintain comfortable capital adequacy levels. CRAR as on 31st March,2024 is at 25.41%, with Tier 1 capital at 23.18%, well above the regulatory limit.

·      16% increase in net worth from Rs. 68,202 crores as on 31.03.2023 to Rs. 79,203 crores as on 31.03.2024.

·      The asset quality has further improved with Net NPA ratio reaching its lowest level in last 6 years at 0.85% in FY’24 vs. 1.07% in FY’23. No new NPA added in more than a year. Gross NPA for FY’24 is at 3.34%, a decrease of 57 bps from 3.91% in FY’23.

 

Ø Management comments

On PFC’s performance, Chairperson and Managing Director, Parminder Chopra shared that PFC Group continues to be the largest NBFC Group in India and is also India's highest profit making NBFC both on a consolidated and on a stand-alone basis.

PFC achieved record profits in FY 24. Profit increased by 24% to Rs. 14,367 crores. This strong performance is backed by a 14% growth in our loan portfolio while retaining a strong asset quality.  Our Net NPA levels reduced from 1.07% in previous financial year to 0.85% currently.

Maximizing shareholder value remains a priority. Today, the final dividend of Rs. 2.50 per share has been proposed by the Board. With this, the total dividend for FY’24 would be Rs. 13.50 per share.

Beyond financials, PFC leads India's clean energy push. Our renewable loan portfolio grew 25% year on year to over Rs. 60,000 crores, solidifying our position as the leading renewable lender in India.

Looking ahead, PFC sees exciting growth in power and infrastructure, and is positioned to be a proactive partner in India's future development.

Friday 10 May 2024

Go Digit General Insurance Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, May 15, 2024, sets price band at ₹258 to ₹272 per Equity Share

 


Go Digit General Insurance Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, May 15, 2024, sets price band at ₹258 to ₹272 per Equity Share

 

Mumbai, May 10, 2024: Bengaluru-based Go Digit General Insurance Limited is one of the leading digital full-stack insurance companies founded in 2017 by insurance veteran Kamesh Goyal has fixed the price band at ₹258 to ₹272 per equity share for its initial public offer.  The Initial Public Offering (“IPO” or “Offer”) of the Company will open on Wednesday, May 15, 2024, for subscription and close on Friday, May 17, 2024. Investors can bid for a minimum of 55 Equity Shares and in multiples of 55 Equity Shares thereafter.

The Offer with a face value of ₹10 per Equity Share is a mix of fresh issue of Rs 1,125 crore and an offer for sale up to 54.77 million equity shares by Promoters and Other Selling Shareholders.

Go Digit has an end-to-end digital capability and a digital-first approach across customers’ insurance value chain. According to the RedSeer Report for the nine months ended December 31, 2023, and Financial Year 2023, the Company catered for approximately 82.5% (equating to ₹ 66.80 billion) and 82.1% (equating to ₹ 72.43 billion), respectively, of the GWPs written by the digital full-stack insurance players which include Acko and Navi, making it the largest digital full-stack insurance player in India. The Company offers motor insurance, health insurance, travel insurance, property insurance, marine insurance, liability insurance, and other insurance products, according to the needs of the customers. For the nine months ended December 31, 2023 motor insurance contributed 61.1% of the GWP.

As of December 31, 2023, there were 43.26 million customers or people availing insurance benefits under various policies issued by the company since the inception of its insurance operations in 2017.

According to the RedSeer Report, Go Digit's GWP per employee for each of the nine months ended December 31, 2023, and Financial Year 2023 is highest compared to the average GWP per employee for non-life insurance companies in India demonstrating better operational efficiency compared to other general insurance companies in India.

Go Digit launched 74 active products across all business lines. As of the nine months ended December 31, 2023, and Financial Year 2023, it had a market share of approximately 6.0% and 5.4%, respectively, in the motor insurance segment one of the largest non-life insurance segment in India, according to the RedSeer Report.

The company has an established track record of delivering growth. GWP increased from ₹ 5,267.63 crore in Financial Year 2022 to ₹ 7,242.99 crore in Financial Year 2023, an increase of 37.5%, primarily due to an increase in GDPI from motor insurance, health insurance and personal accident insurance. The company has maintained an adequate capital position with a solvency ratio of 1.78 times and 1.60 times as of March 31, 2023, and December 31, 2023, respectively, compared to the IRDAI level minimum solvency ratio guidance of 1.50 times. The policies issued for fiscal 2023 stood at 10.63 million against 7.76 million in fiscal 2022. For the nine months ended 31 December, 2023, policies issued stood at 8.46 million. The Company's AUM increased from Rs 9,393.87 crore in Financial Year 2022 to Rs 12,668.36 crore in Financial Year 2023, an increase of 34.9%, primarily due to an increase in GWP and additional capital infusion from share issuances. For the nine months ended December 31, 2023, AUM stood at 14,909.01 crore. The GDPI increased from ₹ 4,673.94 crore in the Financial Year 2022 to ₹ 6,160.01 crore in the Financial Year 2023, an increase of 31.8%. For the nine months ended December 31, 2023, GDPI stood at ₹ 5,970.53 crore.

The Offer is being made through the Book Building Process, wherein at least 75% of the Offer shall be allocated to Qualified Institutional Buyers, not more than 15% of the Offer shall be available for allocation on a proportionate basis to Non-Institutional Bidders and not more than 10% of the Offer shall be available for allocation to Retail Individual Bidders.

ICICI Securities Limited, Morgan Stanley India Company Private Limited, Axis Capital Limited, HDFC Bank Limited, IIFL Securities Limited, and Nuvama Wealth Management Limited and Link Intime India Private Limited is the registrar to the Offer. The Equity Shares are proposed to be listed on BSE and NSE.

Notes for Reference:

Issue Size of the IPO based on the upper and lower end of the price band

 

Fresh  

OFS (54,766,392 equity shares)

Total

Lower Band (@Rs 258)

Rs 1,125 crore

Rs 1,412.97 crore

Rs 2,537.97 crore

Upper Band (@Rs 272)

Rs 1,125 crore

Rs 1,489.65 crore

Rs 2,614.65 crore

 

Tuesday 7 May 2024

जागतिक मातृदिनानिमित्त कविसंमेलन दादर येथे संपन्न मराठी साहित्य व कला सेवा आणि शोध आनंदाचा फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम

 


जागतिक मातृदिनानिमित्त कविसंमेलन दादर येथे संपन्न 


मराठी साहित्य व कला सेवा आणि शोध आनंदाचा फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : नातेसंबंधांना जिच्यामुळे परिसस्पर्श लाभतो ती म्हणजे "आई". जगातलं सर्वोच्च आदराचं आणि परमपवित्र स्थान म्हणजे "आई". प्रेमाच्या अथांग सागरात लेकरांच्या अगणित चूका किंवा अक्षम्य अपराध पोटात सामावून घेणारी व्यक्ती म्हणजे "आई". ह्याच आईवर अगणित वेळा लिहिलं गेलं आहे आणि यापुढेही लिहिले जाईल. आईबद्दलच्या आपल्या भावना मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर येथून आलेल्या निवडक निमंत्रित सारस्वतांनी दादर येथील राजा शिवाजी विद्यालयात आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.


"मराठी साहित्य व कला सेवा" आणि "शोध आनंदाचा फाऊंडेशन" यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीय कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी मुंबईतील प्रथितयश कवयित्री सीमा विश्वास मळेकर ह्या विराजमान होत्या. त्यांचे शाल, शब्दगुच्छ अर्थात पुस्तक आणि सन्मानचिन्ह देऊन कवयित्री वैभवी गावडे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. त्यावेळी शोध आनंदाचा फाऊंडेशनचे अध्यक्ष नितीन सुखदरे, सचिव सनी आडेकर आणि मराठी साहित्य व कला सेवाचे संस्थापक अध्यक्ष गुरुदत्त वाकदेकर हेदेखील उपस्थित होते.


कविसंमेलनामध्ये स्वाती हेमंतकुमार शिवशरण, बालकवी वेदान्त यशवंत पंडित, विक्रांत मारूती लाळे, प्रसाद यशवंत कोचरेकर, वैभवी विनीत गावडे, गौरी यशवंत पंडित, जयश्री हेमचंद्र चुरी, संतोष धर्मराज मोहिते, शैलेश भागोजी निवाते, कल्पना दिलीप मापूसकर, शितलादेवी सुनिल कुळकर्णी, आदित्य प्रदीप भडवळकर, किशोरी शंकर पाटील, सुनिता पांडुरंग अनभुले, सरोज सुरेश गाजरे, अशोक नार्वेकर आणि कविसंमेलनाच्या आयोजनाचा महत्त्वाचा भाग असलेले सनी आडेकर यांनी पहिल्या सत्रामध्ये जागतिक मातृदिनानिमित्त आपल्या सुंदर रचना सादर केल्या आणि उपस्थितांनी त्यांना टाळ्यांच्या गजरात दादही दिली. मध्यंतरामध्ये शितलादेवी कुळकर्णी यांनी एक प्रहसन सादर करून उपस्थितांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं. चहा अल्पोपहाराचा आस्वाद घेतल्यानंतर सगळेच कवी पुन्हा कविता सादरीकरणासाठी सज्ज झाले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सर्व कवींनी आपल्या आवडीची कविता सादर करून सभागृह भारून टाकले.   

कविसंमेलनच्या अध्यक्षपदी विराजमान असलेल्या सीमा विश्वास यांनी देखील आपल्या दोन रचना सादर केल्या. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना त्यांनी मराठी साहित्य व कला सेवा आणि शोध आनंदाचा फाऊंडेशन यांच्या आयोजकांच्या कार्याची दखल घेतली. त्या आपल्या मनोगतामध्ये पुढे म्हणाल्या, "आपण सर्व कवी नेहमीच सुंदर रचना सादर करण्याचा प्रयत्न करतो, यावेळीही सर्वांच्याच रचना खूप सुंदर होत्या. पण मला बालकवी वेदान्तचे खूप कौतुक करावेसे वाटते कारण त्याच्या कविता तर छान असतातच पण ह्या वयात त्याला कविता सुचतात हीच फार कौतुकाची गोष्ट आहे. वेदांत, तुला माझ्याकडून खूप खूप प्रेमळ शुभेच्छा आणि हे कवीपण असेच कायम जप आणि 'बाळाचे पाय पाळण्यात दिसतात' या उक्तीप्रमाणे नक्किच मोठेपणी या क्षेत्रात तू आपला वेगळा ठसा उमटवशील असा आमच्या सर्वांकडूनच तुला आशिर्वाद आहे." मनोगताच्या अखेरीस आयोजकांनी सुरू केलेली ही वाटचाल प्रगतीचे शिखर गाठू दे, अशी प्रार्थना करून आभार मानले.
 
कार्यक्रमाची सांगता करताना 'मराठी साहित्य व कला सेवा' आणि 'शोध आनंदाचा फाऊंडेशन' यांच्या वतीने सर्व सारस्वतांना सहभाग सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. 

जून महिन्याच्या पहिल्या रविवारी पुढचे मासिक कविसंमेलन होणार असून त्याच्या अध्यक्षपदी अष्टपैलू साहित्यिक कल्पना मापूसकर यांची निवड करण्यात आली. कविसंमेलनाचे समयोचित सूत्रसंचालन गुरुदत्त वाकदेकर यांनी केले.

कविसंमेलन यशस्वी करण्यासाठी नितीन सुखदरे, सनी आडेकर, शैलेश निवाते, विक्रांत लाळे आणि गुरुदत्त वाकदेकर यांनी अथक परिश्रम घेतले.

Plant based Specialty Products and Ingredients Solutions Company, Sanstar Limited, gets SEBI nod to float IPO

 Plant based Specialty Products and Ingredients Solutions Company, Sanstar Limited,  gets SEBI nod to float IPO


Ahmedabad based Sanstar Limited (“Sanstar” or “the Company”), one of the major manufacturers of Plant-based Specialty Products and Ingredient Solutions in India for Food, Animal Nutrition, and Industrial Applications filed its DRHP dated January 01, 2024 with SEBI and has received capital markets regulator SEBI's nod on April 30, 2024 to launch Initial Public Offering (IPO). 


Sanstar exports to over 45 countries across Asia, Americas, Europe and Oceania, Middle East and Africa and derives more than 30% of the revenue from exports. Notably, the Kutch facility of the Company is registered with United States Food and Drug Administration (USFDA). The manufacturing facilities of the Company are spread across cumulative land area of approximate 245 acres (~11 million square feet) with ample scope for expansion. During FY 2023, on a Consolidated basis, the Company generated ₹ ~1,180 crores of revenue, ~73 cores of EBITDA and ~ 42 crores of Profit After Tax (PAT) while ROE and ROCE were ~28% and 24% respectively. Revenue, EBITDA and PAT have grown at a CAGR of ~57%, ~39% and ~71% respectively during FY21-FY23, on a Standalone basis.


Speciality products and ingredient solutions add taste, texture, nutrients and increased functionality to food, animal nutrition and industrial products, as ingredients, thickening agents, stabilizers, sweeteners, emulsifiers, additives nutritional ingredients, disintegrants, excipients, supplements, coating agents, binders, smoothing & flattering agents, finishing agents, among others.


The IPO comprises Fresh Issue of upto 40 million shares and an Offer for Sale of upto 8 million shares by the selling shareholders. 


Sanstar has an installed capacity of 1,100 tons per day through its two manufacturing facilities at Dhule in Maharashtra and Kutch in Gujarat. Sanstar is promoted by two generations of the Promoters having cumulative experience of over 6 decades in the industry. To tap the next phase of the growth, the Company is in the process of expanding the capacity at Dhule facility on the existing land which is expected to increase 1,000 tons per day in capacity.


The Fresh Issue proceeds (or “Net Proceeds”) would be utilised for funding the capital expenditure requirement for expansion of the Dhule facility and repayment and/or pre-payment of certain borrowings. 


Pantomath Capital Advisors Private Limited is the sole Book Running Lead Manager. Company’s equity shares are proposed to be listed on the BSE and NSE.

Monday 6 May 2024

"शिव उद्योग स्वराधिश १.० कराओके राज्यस्तरीय स्पर्धा"


"शिव उद्योग स्वराधिश १.० कराओके राज्यस्तरीय स्पर्धा"

शिव उद्योग संघटना आणि मराठी साहित्य व कला सेवा देणार नवोदित गायकांना संधी

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : प्रत्येकाच्या हाताला काम हा एकच ध्यास घेऊन देशात कार्यरत असणारी "शिव उद्योग संघटना" आणि मराठी साहित्य आणि कला क्षेत्रात नवोदितांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी कार्यरत असणारी "मराठी साहित्य व कला सेवा" यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरातील गायकांसाठी एक सर्वोत्तम संधी अर्थात "शिव उद्योग स्वराधिश १.० कराओके राज्यस्तरीय स्पर्धा" जाहीर करण्यात आली आहे.


तीन फेर्‍यांमध्ये रंगणाऱ्या ह्या स्पर्धेसाठी १६ ते ५० वयोगटातल्या स्पर्धकांना सहभाग नोंदवता येईल. नावनोंदणीची अंतिम तारीख २५ मे २०२४ आहे. स्पर्धा शुल्क ₹३००/- आहे. स्पर्धेची अंतिम फेरी मुंबई येथे १३ जुलै २०२४ होणार आहे. स्पर्धेच्या विजेत्यांना रोख रकमेसोबतच, आकर्षक सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी गुरुदत्त वाकदेकर ९९८७७४६७७६ ह्या क्रमांकावर संपर्क साधू शकता.


Saturday 4 May 2024

*मुंबईत रविवारी रात्रीपर्यंत समुद्राच्या उंच लाटा; महानगरपालिकेने दिला इशारा*



*मुंबईत रविवारी रात्रीपर्यंत समुद्राच्या उंच लाटा; महानगरपालिकेने दिला इशारा*


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : बृहन्मुंबई महानगरपालिकेने शनिवारी एक सावधानतेचा इशारा दिला आहे. ज्यामध्ये रविवारी संध्याकाळपर्यंत कायम राहणाऱ्या भरतीमुळे लोकांना अरबी समुद्रात जाण्यापासून परावृत्त करण्याचा सल्ला दिला.


नागरी संस्थेने सांगितले की, भारतीय हवामान विभाग आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन  नुसार, शनिवार सकाळी ११:३० ते रविवारी रात्री ११:३० वाजेपर्यंत समुद्रात "लाटांच्या लाटा" दिसून येतील. या कालावधीत, लाटांची उंची ०.५ ते १.५ मीटरने वाढण्याची अपेक्षा आहे.


महानगरपालिकेने मच्छीमारांनाही परिस्थिती लक्षात घेता आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. 

महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी नागरी अधिकाऱ्यांना पोलिसांच्या सहकार्याने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय, शहरातील समुद्रकिनाऱ्यांवर तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना लोकांना पाण्यात जाण्यापासून रोखण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Thursday 2 May 2024

'जुनं फर्निचर' चित्रपटाच्या संपूर्ण टीमने केली धमाल; 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' शोचा प्रोमो रिलीझ

 




'जुनं फर्निचर' चित्रपटाच्या संपूर्ण टीमने केली धमाल; 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' शोचा प्रोमो रिलीझ 

“हसताय ना मंडळी? हसायलाच पाहिजे!” असे म्हणत प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडणारा अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक डॉ. निलेश साबळे त्याचा नवीन शो 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' कलर्स मराठीवर आपल्या रसिकांसाठी घेऊन आला आहे.


गेल्या अनेक दिवसांपासून या नव्या शोचे बरेच प्रोमोज, व्हिडिओज आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळत होते. तेव्हापासूनच या शोची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये ओंकार भोजने व भाऊ कदम यांच्या विनोदावर ‘बाईपण भारी देवा' या चित्रपटाची संपूर्ण टीम खळखळून हसली.

नुकताच या शोचा दुसरा प्रोमो रिलीझ झाला असून या नवीन प्रोमोत निलेश साबळे व भाऊ कदम यांच्या विनोदावर महेश मांजरेकरांसह जुनं फर्निचर चित्रपटाची संपूर्ण टीम एन्जॅाय करताना दिसत आहे. इतकंच नाही तर, चित्रपटाच्या संपूर्ण टीमने चांगलीच धमाल, मजामस्ती केल्याचे व्हिडिओत पाहायला मिळत आहे. निलेश साबळेंचे प्रश्न आणि रोहितच्या उत्तरांवर उपेंद्र लिमेय अन् सचिन खेडेकर लोटपोट हसत आहेत. त्यामुळे एकंदरीत या मंचावरती संपूर्ण टीम धमाल करणार असल्याचे दिसून येतेय.

‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’च्या या नवीन प्रोमोला चाहत्यांनीही लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला. रसिकवर्ग आता पुढच्या एपिसोडची आतुरतेने वाट पाहात आहेत. निलेश साबळेंचा नवीन शो प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरलेला दिसत आहे. 

‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या शोचे लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन डॉ. निलेश साबळे करत आहेत.  तर भाऊ कदम, ओंकार भोजनेबरोबरच सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम व रोहित चव्हाण आदी कलाकारांचा समावेश आहे. कलर्स मराठीवर शनिवार-रविवार रात्री नऊ वाजता हा कार्यक्रम पाहायला मिळणार.


Racks & Rollers - Storage Technologies and Automation Limited’s SME Initial Public Offering to open on Tuesday, April 30, 2024, price band set at ₹73/- to ₹78/- per Equity Share

 


Racks & Rollers - Storage Technologies and Automation Limited’s SME Initial Public Offering to open on Tuesday, April 30, 2024, price band set at ₹73/- to ₹78/- per Equity Share

 

Price Band of ₹73/- – ₹78/- per equity share bearing face value of ₹10/- each (“Equity Shares”)

Bid/Offer Opening Date – Tuesday, April 30, 2024 and Bid/Offer Closing Date – Friday, May 03, 2024.

Minimum Bid Lot is 1600 Equity Shares and in multiples of 1600 Equity Shares thereafter.

The Floor Price is 7.3 times the face value of the Equity Share and the Cap Price is 7.8 times the face value of the Equity Share


Mumbai, April 30, 2024: Bengaluru-based Racks & Rollers - Storage Technologies and Automation Limited is engaged in a storage racking system, with specialising in design, manufacturing, installation services of metal storage racks, automated warehouses and other storage solutions, has fixed the price band of ₹73/- to ₹78/- per Equity Share of face value ₹10/- each for its maiden initial public offer.  The Initial Public Offering (“IPO” or “Offer”) of the Company will open on Tuesday, April 30, 2024, for subscription and close on Friday, May 03, 2024. Investors can bid for a minimum of 1600 Equity Shares and in multiples of 1600 Equity Shares thereafter.

 

The issue consists of a fresh issue of up to 3,840,000 equity shares with no offer for sale (OFS) component.

The Issue is being made through the Book Building Process, wherein not more than 50% of the Net Issue shall be available for allocation to Qualified Institutional Buyers, not less than 15% of the Net Issue shall be available for allocation to Non-Institutional Investors and not less than 35% of the Net Issue shall be available for allocation to Retail Individual Investors.

Of the total net proceeds to be raised through the issue, Rs 27.50 crore will be used to meet working capital requirements and general corporate expenses.

Racks & Rollers - Storage Technologies and Automation Limited was incorporated in the year 2010 by its promoter Mr. Mohammed Arif and Mr. Khasim Sait with experience of around, 13 years and 13 years in the storage racking system industry.

The company's commitment to delivering innovative and efficient solutions for diverse warehousing needs demonstrates their commitment in its wide range of products and services. These solutions cater to various industries such as oil & gas, automotive components & aerospace, food & beverages, cold storage, pharmaceuticals, textiles, retail, FMCG, and others, each with unique storage and logistical requirements.

The Bengaluru-based company operates with a customer-centric approach, driven by a focus on continuous innovation and operational efficiency. It offers a comprehensive range of display and storage racks designed for commercial and industrial purposes, utilizing high-quality raw materials to ensure durability and optimum strength in the finished products. These raw materials include different grades of mild steel (hot rolled coils, cold rolled coils, galvanized steel coils, PPGI coils, pipes, and structural sections), powder coatings for powder coating, epoxy, enamel paints, and plastic for packaging.

The company has a manufacturing unit that covers approximately 56,250 square feet in Singanayakanahalli, Yelahanka Hobli, Bangalore, along with a 56,250 square feet storage facility, supporting a streamlined manufacturing process. The company manages product design, manufacturing, quality checking, packaging, storing, and delivery processes across specialized segments of its infrastructure, all closely monitored by an experienced team of quality controllers.

Through its manufacturing prowess, competitive strengths, and strategic business approaches, Storage Technologies and Automation Limited is well-positioned to meet the evolving needs of its clients effectively. The company is dedicated to innovation, quality, and delivering economically feasible solutions that exceed client expectations.

As of April 01, 2024, the total order book value of the Company is ₹ 21.36 Crore.

Racks & Rollers - Storage Technologies and Automation Limited has turnaround from a loss of Rs 0.20 crore in the financial year 2022 to Rs 0.48 crore in the financial year FY23. Revenue during the year FY23 increased 16.39% to Rs 81.32 crore from Rs 69.87 crore in the previous year, primarily due to an increase in the business operations of the company and increase in number of customers.

 

For the seven months ended October 31, 2023, revenue from operations stood at Rs 52.92 crore, and profit after tax stood at Rs 3.59 crore.

 

OneView Corporate Advisors Private Limited is the sole book-running lead. The equity shares are proposed to be listed on SME Platform of BSE Limited.

Wednesday 1 May 2024

३ मे रोजी संपन्न होणाऱ्या विवाह सोहळ्यात बडेजाव आणि अवांतर खर्चाला फाटा देत गुर्जर समाज मंडळाला भरीव मदत



 ३ मे रोजी संपन्न होणाऱ्या विवाह सोहळ्यात बडेजाव आणि अवांतर खर्चाला फाटा देत गुर्जर समाज मंडळाला भरीव मदत

पाचोरा (गुरुदत्त वाकदेकर) : विवाह सोहळ्याच्या आधी आणि नंतरही होणार्‍या विविध कार्यक्रमांमध्ये पैशांची उधळपट्टी करत आपल्या श्रीमंतचे प्रदर्शन करण्याची मनोवृत्ती अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वृद्धिंगत होतांना दिसत आहे. या संदर्भात अनेक साधकबाधक चर्चा प्रतिक्रिया व्यक्त होत असल्या तरी त्यात कोणतीही सुधारणा अथवा बदल होतांना दिसत नाहीत. अशा परिस्थितीत लेवा गुर्जर समाजातर्फे अनेक अनिष्ठ रूढी परंपरांसोबतच नावीन्यपूर्ण चुकीच्या उपक्रमांचा शिरकाव झाल्याने यावर प्रतिबंध व्हावा यासाठी ठिकठिकाणी बैठका घेऊन निर्णय घेण्यात आला. अर्थात आजपर्यंत जवळ-जवळ सर्वच समाजामधील अनुभव असा आहे की, ठराव निर्णय होतात परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही किंवा काही कठोर निर्णय घेण्यासाठी सहसा कोणी हिंमत करत नाही. परंतु पाचोरा येथील स्वातंत्र्य सैनिक पुत्र संदीप दामोदर महाजन आणि त्यांच्या अर्धांगिणी उपशिक्षिका शितल संदीप महाजन यांनी सर्व समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. आपली उच्चशिक्षित कन्या प्रा. डॉ. वैष्णवी संदीप महाजन आणि चि. अनंत सुदाम पाटील यांच्या दिनांक ३ मे रोजी संपन्न होणार्‍या विवाह सोहळ्यात आर्थिक परिस्थितीने सक्षम असतांना देखील आपण समाजाचे देणे लागतो या उद्दात्त भावनेने निमंत्रणासाठी समाज माध्यमांचा वापर करून विशेषत: कोणालाही व्यक्तीश: फोन न करता संदेशांद्वारे निमंत्रण दिले. तर प्री-वेडींग शुटींग, बँड, डीजे, ऑर्केस्ट्रा, घोडा, बग्गी, पत्रिका छपाई इत्यादींवर होणारा वाटपाचा खर्च, व्यक्तीगत जाऊन मुळ लावणे, जानोसा अक्षदांच्या नावे (तांदूळ) ची नासाडी अशा सर्व चुकीच्या रूढी परंपरांना फाटा देत कोणताही बडेजाव न करता विवाह सोहळ्यातील अवांतर खर्चाला फाटा देवून मुंबई येथे होणार्‍या समाज मंदिराच्या उभारणीसाठी १,११,१११ रूपयांची भरीव देणगी संदीप महाजन यांनी दिली. त्यांच्या या औदार्याला त्यांच्या अर्धांगिणी पाचोरा येथील श्री गो से हायस्कूल मधील उपशिक्षिका शितल संदीप महाजन यांनी देखिल आपल्या पगारातून स्वतःच्या वडीलांच्या नावे ३१,००० रूपयांची भरीव मदत देवून माहेर आणि समाजाप्रती असलेली निष्ठा, आपुलकी स्पष्ट करून एक आगळा वेगळा आदर्श घालून दिला आहे. 

पाचोरा तालुक्यातील लोहटार येथील मुळ रहिवाशी नगरपालिकेत ऑक्ट्रॉय इन्स्पेक्टर म्हणून सेवा बजावलेल्या आणि वर्ग ८ वीत असतांना बालवयातच भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटीश विरोधी कारवाया केल्याने सहा महिन्यांचा येरवडा तुरूंगात शिक्षा भोगलेल्या कै. आण्णासाो. दामोदर लोटन महाजन यांचे सुपुत्र, ध्येय करिअर अ‍ॅकडमीचे संचालक तथा पत्रकार संदीप महाजन यांची जेष्ठ कन्या प्रा. डॉ. वैष्णवी संदीप महाजन यांचा विवाह परधाडे येथील मुळ रहिवाशी आणि सध्या जळगाव येथे वास्तव्यास असलेले राहुरी कृषी विद्यापीठाचे सेवानिवृत्त शास्त्रज्ञ, मुक्ताईनगर कृषी कॉलेजचे माजी प्राचार्य, भारत सरकारच्या वतीने सन्मानीत होऊन इंग्लंड आणि कॅनडा दौर्‍यासाठी नियुक्ती झालेले डॉ. सुदाम चिंधु पाटील यांचे एम. टेक. इलेक्ट्रीकल अशी उच्चशैक्षणिक पात्रता असलेले सुपुत्र अनंत सुदाम पाटील यांच्याशी निश्चित झाला. विवाहाची बोलणी चालू असतांना संदीप आणि शितल महाजन यांनी विवाह सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात मेहेंदी, हळद, संगीत, वैदिक विवाह, विवाह सोहळा असे उपक्रम उत्साहपूर्ण साजरे करणार असले तरी वरील अवांतर खर्च आणि बडेजाव यांना फाटा देऊन खारघर येथील गुर्जर समाजाच्या नियोजीत समाज मंदिराच्या उभारणीसाठी भरीव मदत देण्याचा विषय मांडला त्या विषयास डॉ. सुदाम आणि त्यांचे सुपुत्र अनंत पाटील यांच्यासह सर्व कुटूंबियांनी मान्यता दिली. गुर्जर समाजातील आदर्श असा विवाह दिनांक ३ मे रोजी संपन्न होणार आहे. योगायोग म्हणजे वधु स्वातंत्र्य सैनिक यांची नात तर वर सध्या भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट कर्नल पदावर सेवेत असलेले चारूदत्त सुदाम पाटील यांचे लहान बंधू आहेत.


नशिबाने मांडला लग्नाचा घाट, पण नियतीने आणला दुराव्याचा 'अंतरपाट' कलर्स मराठीवर ‘अंतरपाट’चा नवीन प्रोमो



 नशिबाने मांडला लग्नाचा घाट, पण नियतीने आणला दुराव्याचा 'अंतरपाट'

कलर्स मराठीवर ‘अंतरपाट’चा नवीन प्रोमो 


संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी वाहिनी कलर्स मराठी कायमच आपल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ‘कलर्स मराठी’चे प्रोग्रामिंग हेड म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर नवनवीन मालिका रसिकांच्या भेटीला येत आहेत.


 'इंद्रायणी', 'सुख कळले', 'हसताय ना, हसायलाच पाहिजे! ’ या नव्या शोजनंतर 'अबीर गुलाल' या नव्या मालिकेचा टिझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असतानाच आता 'अंतरपाट' ही आणखी एक नवीन मालिका रसिकांच्या भेटीला आली आहे.


नुकताच या नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला असून,  त्यात हळदीचा समारंभ सुरू असल्याचे दिसतेय. उल्हासित, आनंदी वातावरण, लग्नाची लगबग, सजलेले घर, पाहुण्यांचा वावर दिसत आहे. लव्ह मॅरेजच्या काळात अरेन्ज मॅरेज करणाऱ्या गौतमीला परफेक्ट जोडीदार मिळाल्याने ती अतिशय आनंदी आहे. गौतमीला आपल्या जोडीदारासोबत प्रत्येक स्वप्नं पूर्ण करायचे आहे. प्रोमोमध्ये आपल्याला मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री रेशम टिपणीसही दिसत असून ती नवऱ्याच्या म्हणजेच क्षितीजच्या बाजुने आहे. गौतमीला वाटतेय की, क्षितिज हा सर्वोत्तम आणि परिपूर्ण असा नवरा आहे, जसा तिला हवा होता, अगदी तसा. पण खरंच  क्षितिज या लग्नाने खुश आहे का? काय लिहिले आहे गौतमीच्या नशिबात?  नशिबाने मांडला लग्नाचा घाट, पण नियतीने आणला दुराव्याचा अंतरपाट!



या मालिकेचा टिझर तुम्ही कलर्स मराठीच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर पाहू शकता.  'अंतरपाट' या मालिकेत अशोक ढगे, रश्मी अनपट, रेशम टिपणीस यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही गोष्ट नेमकी काय असणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.  या नवीन मालिकेसंदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी पाहात राहा कलर्स मराठी.