Monday, 21 February 2022

'बाबू' शेठचा जलवा आता लवकरच टिझर प्रेक्षकांच्या भेटीला



'बाबू' शेठचा जलवा आता लवकरच 

टिझर प्रेक्षकांच्या भेटीला 

https://www.youtube.com/watch?v=uB66DaM8w1E

सध्या विविध मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असतानाच आता त्यात आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे. श्री कृपा प्रॉडक्शन्स प्रस्तुत 'बाबू' हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून नुकतेच या चित्रपटाचे टिझर सोशल मीडियावर झळकले आहे. सुरुवातीपासूनच या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होती. त्यात आता टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आल्याने 'बाबू'विषयीची उत्सुकता अधिकच शिगेला पोहोचली आहे. हा एक ॲक्शनपट असून यात 'बाबू'ची भूमिका अंकित मोहन साकारत आहे. याव्यतिरिक्त या चित्रपटात रुचिरा जाधव, नेहा महाजन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. बाबू कृष्णा भोईर निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन मयूर मधुकर शिंदे यांनी केले आहे. 


    आगरी -कोळी भागात घडणारी ही कथा आहे.गावात होणाऱ्या अन्यायाविरोधात, राजकारणाविरोधात  'बाबू' त्याच्या आक्रमक पद्धतीने कशी उत्तरे देतो, हे पाहायला मिळत आहे. गावात नक्की कोणत्या कारणाने आपापसात ही लढाई सुरु आहे, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. मात्र यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागेल. यापूर्वी अंकित मोहन ऐतिहासिक चित्रपटांमधून प्रेक्षकांसमोर आला आहे, या चित्रपटात मात्र अंकित एका वेगळ्याच भूमिकेत दिसत आहे. त्याच्या पिळदार शरीरयष्टीवरून त्याने घेतलेल्या मेहनतीचा चांगलाच अंदाज येतोय. यात रुचिरा आणि नेहाची नेमकी काय भूमिका आहे, हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे. या चित्रपटाची कथा बाबू कृष्णा भोईर यांची असून संवाद आणि पटकथा मयूर मधुकर शिंदे यांची आहे. ॲक्शनचा जबरदस्त धमाका 'बाबू'च्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे.

Sunday, 20 February 2022

'मी वसंतराव' पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला…



 'मी वसंतराव' पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला…


माझं गाणं हे माझंच प्रतिबिंब होतं, आहे, असे म्हणणारे पंडित वसंतराव देशपांडे! संगीत रंगभूमीवरचे अतिशय नावाजलेले व्यक्तिमत्व. अशा या दिग्गज, हरहुन्नरी, प्रतिभाशाली शास्त्रीय गायकाचा प्रवास 'मी वसंतराव'या चित्रपटाच्या माध्यमातून उलगडणार आहे.




आज जगप्रसिद्ध तबलावादक पद्मभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांच्या हस्ते हा चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्यासमोर सादर झाली आहे. आज उस्ताद झाकीर हुसेन यांनी या चित्रपटाचा पहिला टिझर आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.


माझं घराणं माझ्यापासूनच सुरु होईल, असे ठामपणे सांगणाऱ्या पंडीत वसंतराव आणि त्यांच्या संगीताचा वैभवशाली वारसा लाभलेले त्यांचे नातू राहुल देशपांडे यांच्या गायकीची एक परंपरा आपल्यासमोर या टीझरच्या माध्यमातून सादर होत आहे.


जिओ स्टुडिओज प्रस्तुत, संगीताची ही सुरेल मैफल गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच १ एप्रिल पासून चित्रपटगृहात रंगणार आहे. आणि या चित्रपटाच्या निमित्ताने जिओ स्टुडिओज प्रथमच पदार्पण करत आहे.


पं. वसंतराव देशपांडे यांच्यासोबत असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याविषयी उस्ताद झाकीर हुसेन म्हणतात, ''पं वसंतराव देशपांडे हे कलाक्षेत्रातील एक महान व्यक्तिमत्व आहे. मुळात त्यांच्यात आणि माझ्यात भावनिक ऋणानुबंध आहेत. साधारण साडे तीन वर्षांचा असल्यापासून मी त्यांना पाहात आलो आहे. वयाच्या आठव्या वर्षी, त्यांच्याच सांगण्यानुसार मी त्यांना एका कार्यक्रमात तबल्याची साथ दिली होती. मी नशिबवान आहे की, इतक्या महान व्यक्तिमत्वाच्या सान्निध्यात मला राहता आले. त्यांची शेवटची मैफिलही माझ्यासोबतच होती. आज ते आपल्यात नसले तरी त्यांच्या गायकीच्या माध्यमातून त्यांनी आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. मी राहुलजींचा खूप आभारी आहे, त्यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून वसंतरावांना अजरामर केले आहे.”


पं. वसंतराव देशपांडे यांचे नातू, संगीत दिग्दर्शक, गायक, अभिनेता राहुल देशपांडे चित्रपटाविषयी सांगतात, ''मी आणि निपुणने एकत्र पाहिलेले हे स्वप्न आता साकार होत आहे. मी स्वतःला नशीबवान समजतो की, आजोबांचीच व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मला मिळाली आहे. आजोबांच्या सहवासात मी जास्त आलो नाही परंतु त्यांच्याविषयीचे अनेक किस्से मी घरात नेहमीच ऐकले आहेत. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील चढ-उतार मला या चित्रपटाच्या निमित्ताने मला जवळून पाहता आले. ते क्षण मी जगलो आणि त्यातूनच मी मनुष्य, कलाकार आणि गायक म्हणून समृद्ध होऊ शकलोय. नऊ वर्षांचा हा प्रवास अखेर आता पूर्णत्वास येत आहे.'' 


चित्रपटाचे दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी म्हणतात, '' कोणत्याही चित्रपटाची प्रक्रिया ही सोपी नसते. पहिल्यांदाच मी पिरेड फिल्म करत आहे आणि हे सगळे उभे करण्यासाठी माझ्यासोबत एक चांगली टीम होती, त्यामुळेच हे साध्य होऊ शकले. प्रेक्षकांनी पं. वसंतराव यांचा जीवनप्रवास चित्रपटगृहात जाऊनच अनुभवावा.''


जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चंद्रशेखर गोखले, दर्शन देसाई, निरंजन किर्लोस्कर निर्मित या चित्रपटात राहुल देशपांडे यांनी स्वतः पंडित वसंतराव देशपांडे यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. आणि महत्वाचं म्हणजे या चित्रपटाला संगीतही राहुल देशपांडे यांचेच लाभले आहे. याव्यतिरिक्त या चित्रपटात अनिता दाते, पुष्कराज चिरपुटकर, कौमुदी वालोकर आणि अमेय वाघ यांच्या प्रमुख भूमिका आहे.

Wednesday, 16 February 2022

स्मार्टफोनवर चित्रित पहिला मराठी चित्रपट 'पॉंडीचेरी' - २५ फेब्रुवारीपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित -

 


स्मार्टफोनवर चित्रित पहिला मराठी चित्रपट 'पॉंडीचेरी'

- २५ फेब्रुवारीपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित -

https://www.youtube.com/watch?v=ze-2wc_h1Ig     

     स्मार्टफोनवर चित्रीकरण करून प्रदर्शित होणारा भारतातील पहिला मराठी चित्रपट 'पॉंडीचेरी'. अवघ्या एका महिन्यात या अनोख्या चित्रपटाची निर्मिती झाली आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आले. 'पॉंडीचेरी'चे निसर्गसौंदर्य, अथांग समुद्रकिनारे, रंगीबेरंगी फ़्रेंच धाटणीची घरे आणि या शहरात निर्माण होणारे अनोखे नातेसंबंध या ट्रेलरमध्ये दिसले. 'पॉंडीचेरी'बाबतची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात वाढत असतानाच आता चित्रपटाचा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'गुलाबजाम' सारख्या दर्जेदार चित्रपटाची मेजवानी दिल्यानंतर आता सचिन कुंडलकर 'पॉंडीचेरी'ची सैर घडवणार आहेत. या चित्रपटात सई ताम्हणकर, वैभव तत्ववादी, अमृता खानविलकर, नीना कुळकर्णी, महेश मांजरेकर, गौरव घाटणेकर आणि तन्मय कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर मिलिंद जोग यांनी छायाचित्रणकाराची भूमिका निभावत निसर्गरम्य 'पॉंडीचेरी' आणि तिथे निर्माण होणारे भावनिक नातेसंबंध टिपले आहेत. 



      निसर्गाची मुक्तपणे उधळण झालेल्या 'पाँडीचेरी' शहरात घडणारी ही कथा आहे. सई, वैभव आणि अमृता यांच्या आगळ्यावेगळ्या नात्यावर भाष्य करणारा हा चित्रपट असून ट्रेलर पाहता हा चित्रपट लव्ह ट्रॅन्गल असल्याचे जरी दिसत असले तरी नात्याची आणि कुटुंबाची नवीन व्याख्या 'पाँडीचेरी'च्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये प्रत्येकाच्या आयुष्याचा एक वेगळा प्रवास दिसत आहे. हा प्रवास त्यांना आयुष्याच्या कोणत्या वळणावर घेऊन जातो आणि त्यांच्या नात्यातील हा गुंता सुटतो का, हे  'पाँडीचेरी' पाहिल्यावरच कळेल. 




       सई ताम्हणकर आपल्या भूमिकेबद्दल सांगते, '' यात मी अशी व्यक्तिरेखा साकारत आहे, जी तिच्या पतीच्या परतण्याची आतुरतेने वाट पाहात आहे. यात मी मराठी, तामिळ, फ्रेंच, हिंदी आणि इंग्रजी अशा पाच भाषा बोलले आहे. त्यामुळे हा अनुभव माझ्यासाठी खूपच निराळा आहे. इतका उत्कृष्ट चित्रपट आणि इतकी दमदार व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मला मिळाली, यासाठी मी स्वतःला खूप नशीबवान समजते. हा संपूर्ण चित्रपट आयफोनवर चित्रित करण्यात आला आहे, मात्र चित्रपट पाहताना हे कुठेही जाणवणार नाही.'' तर वैभव तत्ववादी आपल्या व्यक्तिरेखेबद्दल सांगतो, ''माझ्या व्यक्तिरेखेला अनेक छटा आहेत. ज्या चित्रपटातील प्रत्येक मूडला साजेशा आहेत. एक अशी कथा जी पॉंडीचेरी शहरावर आधारित आहे, याच गोष्टीने माझे पहिले लक्ष वेधून घेतले. आकर्षक फ्रेम्स, जबरदस्त दिग्दर्शन आणि संपूर्ण चित्रपटाचे चित्रण हे प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन आहे, जे त्यांना नक्कीच आवडेल.'' 'पाँडीचेरी'तील आपल्या भूमिकेबद्दल अमृता खानविलकर म्हणते, '' मी एक अशी व्यक्तिरेखा साकारतेय, जिचे आयुष्य अत्यंत गुंतागुंतीचे होते आणि भूतकाळात झालेल्या आघातांवर ती मात करण्याचा प्रयत्न करत आहे. या भूमिकेसाठी हो म्हणायचे मुख्य कारण म्हणजे ही कथा मला खूप भावली आणि दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी खूपच रंजक पद्धतीने ती मांडली. मुळात हा चित्रपट स्मार्टफोनवर चित्रित करण्यात आला आहे. त्यामुळे हा अनुभवही खूप आगळावेगळा होता. कलाकारांसह केवळ पंधरा लोकांसोबत या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. मर्यादित क्रू सोबत काम करणे खूपच आव्हानात्मक होते. मात्र हे आव्हान पेलून आम्ही सगळ्यांनीच चित्रीकरण यशस्वीरित्या पूर्ण केले. हा माझ्यासाठी नवीन आणि खूप छान अनुभव होता.'' 



    'प्लॅनेट मराठी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर 'पाँडीचेरी'बद्दल म्हणतात, ''हा चित्रपट नात्याभोवती फिरणारा असला तरी नात्याची परिभाषा बदलणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण स्मार्टफोनवर झाले आहे, हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. मात्र पडद्यावर बघताना प्रेक्षकांना याची कुठेही जाणीव होणार नाही. इतक्या सराईतपणे तो चित्रित करण्यात आला आहे. मोठ्या कालावधीनंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा प्लॅनेट मराठीचा हा पहिला चित्रपट असून सिनेरसिकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल आणि याचा अनुभव त्यांनी चित्रपटगृहातच घ्यावा. प्लॅनेट मराठी दर्जेदार, उत्कृष्ट आणि अनोख्या निर्मितीला नेहमीच प्रोत्साहन देते. आम्हाला फार आनंद आहे की,  'पाँडीचेरी' हा आमच्या या परिवाराचा एक भाग आहे.'' 



    अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी आणि क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन प्रस्तुत 'पाँडीचेरी' या चित्रपटासाठी सचिन कुंडलकर यांनी दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता अशा तिहेरी भूमिका साकारल्या आहेत. तर नील पटेलही या चित्रपटाचे निर्माता आहेत. मोह माया फिल्म्स आणि इंक टॅंक निर्मित हा चित्रपट २५ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Tuesday, 15 February 2022

 Blackstone Acquires a Majority Stake in ASK Investment Managers, India’s Leading Asset and Wealth Management Company

 

Mumbai, February 14, 2021 – Blackstone (NYSE:BX) announced today that private equity funds managed by Blackstone (“Blackstone”) have acquired a majority stake in ASK Investment Managers Limited (“ASK”), one of India’s largest asset and wealth management companies, from Advent International and other sellers.

 

ASK is one of the leading asset and wealth managers in India catering to clients across Asia, the Middle East, Africa, and Europe, and manages more than $10.6 billion in assets (as of December 31, 2021). It is one of the first portfolio managers in India, with nearly three decades of experience in managing the investment needs of India’s high-net-worth individuals, family offices and institutions. ASK also specializes in property investment advisory and wealth advisory services. The company follows a cycle-tested investment philosophy, which prioritizes capital preservation and delivering returns through consistent growth. Its flagship portfolio, Indian Entrepreneur Portfolio, is the largest discretionary Portfolio Management Services (PMS) scheme in the country and along with ASK’s other strategies like Growth and India Select has consistently outperformed markets since inception.

 

Amit Dixit, Head of Asia for Blackstone Private Equity, said: “Asset and wealth management in India is a sunrise industry benefitting from secular tailwinds including the financialization of household savings and an emerging wealthy population seeking personalized financial advice and products. ASK is one of the most trusted brands in wealth management, built through a track record of consistent performance, customer-centric approach, and best-in-class distributors. The company is led by an entrepreneurial management team and founder who have been together for more than a decade and established a market-leading business. We are excited to partner with ASK in the next phase of its journey.”

 

Sameer Koticha, Founder Promoter & Chairman, ASK, said: "We are excited about the investment from Blackstone, as a long-term strategic partner. This partnership is a testament to ASK’s high-quality management team and the business we have built over decades. Blackstone’s global reach and deep knowledge of the financial services sector will further strengthen our asset and wealth management businesses and help us grow significantly."

 

Sunil Rohokale, Managing Director and Chief Executive Officer, ASK, said: “We have built our business with industry-defining products and client-centricity. We are excited to partner with Blackstone in the ASK 2.0 journey to further enhance our capabilities. The existing leadership team will continue to drive us forward, in alignment with our core values. We will continue to bring relevant products and solutions to our customers. We plan to expand our geographic reach to 30+ cities in India as well as in select international markets. Technology will play a significant role in this endeavor as a force multiplier in delivering impeccable client experiences and unlocking efficiencies. We will leverage Blackstone’s global network as a leading alternate asset manager to scale ASK’s various business lines.”

 

Shweta Jalan, Managing Partner at Advent International, said: “We are immensely proud of all that has been achieved at the business since we became a partner over five years ago. During this period, ASK has undergone transformational change and continued to grow significantly. We would like to thank the management team for all their hard work throughout our time together and we wish the company great success in the future.”

 

Nomura acted as the exclusive financial advisor to ASK and Advent on the transaction. KPMG and AZB & Partners acted as advisors to ASK. BCG, Ernst & Young, Moelis, Simpson Thacher & Bartlett, and Trilegal acted as advisors to Blackstone.

 

Sunday, 13 February 2022

Blackstone Acquires a Majority Stake in ASK Investment Managers, India’s Leading Asset and Wealth Management Company

 Blackstone Acquires a Majority Stake in ASK Investment Managers, India’s Leading Asset and Wealth Management Company

 

Mumbai, February 14, 2021 – Blackstone (NYSE:BX) announced today that private equity funds managed by Blackstone (“Blackstone”) have acquired a majority stake in ASK Investment Mangers Limited (“ASK”), one of India’s largest asset and wealth management companies, from Advent International and other sellers.

 

ASK is one of the leading asset and wealth managers in India catering to clients across Asia, the Middle East, Africa, and Europe, and manages more than $10.6 billion in assets (as of December 31, 2021). It is one of the first portfolio managers in India, with nearly three decades of experience in managing the investment needs of India’s high-net-worth individuals, family offices and institutions. ASK also specializes in property investment advisory and wealth advisory services. The company follows a cycle-tested investment philosophy, which prioritizes capital preservation and delivering returns through consistent growth. Its flagship portfolio, Indian Entrepreneur Portfolio, is the largest discretionary Portfolio Management Services (PMS) scheme in the country and along with ASK’s other strategies like Growth and India Select has consistently outperformed markets since inception.

 

Amit Dixit, Head of Asia for Blackstone Private Equity, said: “Asset and wealth management in India is a sunrise industry benefitting from secular tailwinds including the financialization of household savings and an emerging wealthy population seeking personalized financial advice and products. ASK is one of the most trusted brands in wealth management, built through a track record of consistent performance, customer-centric approach, and best-in-class distributors. The company is led by an entrepreneurial management team and founder who have been together for more than a decade and established a market-leading business. We are excited to partner with ASK in the next phase of its journey.”

 

Sameer Koticha, Founder Promoter & Chairman, ASK, said: "We are excited about the investment from Blackstone, as a long-term strategic partner. This partnership is a testament to ASK’s high-quality management team and the business we have built over decades. Blackstone’s global reach and deep knowledge of the financial services sector will further strengthen our asset and wealth management businesses and help us grow significantly."

 

Sunil Rohokale, Managing Director and Chief Executive Officer, ASK, said: “We have built our business with industry-defining products and client-centricity. We are excited to partner with Blackstone in the ASK 2.0 journey to further enhance our capabilities. The existing leadership team will continue to drive us forward, in alignment with our core values. We will continue to bring relevant products and solutions to our customers. We plan to expand our geographic reach to 30+ cities in India as well as in select international markets. Technology will play a significant role in this endeavor as a force multiplier in delivering impeccable client experiences and unlocking efficiencies. We will leverage Blackstone’s global network as a leading alternate asset manager to scale ASK’s various business lines.”

 

Shweta Jalan, Managing Partner at Advent International, said: “We are immensely proud of all that has been achieved at the business since we became a partner over five years ago. During this period, ASK has undergone transformational change and continued to grow significantly. We would like to thank the management team for all their hard work throughout our time together and we wish the company great success in the future.”

 

Nomura acted as the exclusive financial advisor to ASK and Advent on the transaction. KPMG and AZB & Partners acted as advisors to ASK. BCG, Ernst & Young, Moelis, Simpson Thacher & Bartlett, and Trilegal acted as advisors to Blackstone.

Saturday, 12 February 2022

२५ फेब्रुवारीपासून घडणार 'पाँडीचेरी'ची सैर स्मार्ट फोनवर चित्रीत करून प्रदर्शित होणारा पहिला मराठी सिनेमा

 


२५ फेब्रुवारीपासून घडणार 'पाँडीचेरी'ची सैर 

स्मार्ट फोनवर चित्रीत करून प्रदर्शित होणारा पहिला मराठी सिनेमा 


पाँडीचेरी. दूरवर पसरलेले अथांग समुद्रकिनारे, फ्रेंच धाटणीची रंगीबेरंगी घरे आणि तेथील निसर्गसौंदर्य. कोणाही पर्यटकाला सहज भुरळ पडेल, असे हे रम्य ठिकाण. याच पाँडीचेरीमध्ये घडणार आहे आगळीवेगळी कथा. ‘गुलाबजाम’ सारख्या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे सचिन कुंडलकर ‘पाँडीचेरी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. या चित्रपटात सई ताम्हणकर, वैभव तत्ववादी, अमृता खानविलकर, महेश मांजरेकर, नीना कुळकर्णी, गौरव घाटणेकर, तन्मय कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 


पाँडीचेरी सारख्या सुंदर निसर्गरम्य शहरात घडणारी मराठी माणसाची गोष्ट आहे. नवीन पिढीच्या नात्याचे प्रतिनिधित्व करणारा हा सिनेमा असून विस्थापित झालेले लोक कोणत्या पध्दतीची नाती निर्माण करतात, यावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. एकंदरच नात्याची आणि कुटुंबाची नवीन व्याख्या या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. यात सई, वैभव आणि अमृता यांच्या नात्याचा नवीन प्रवास आपल्यासमोर उलगडणार आहे.  या चित्रपटाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा भारतातील पहिला चित्रपट आहे, जो संपूर्ण स्मार्ट फोनवर चित्रित करण्यात आला आहे. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी आणि क्रिएटिव्ह वाईब  प्रॅाडक्शन प्रस्तुत या चित्रपटासाठी सचिन कुंडलकर यांनी तिहेरी भूमिका साकारली आहे, दिग्दर्शनासोबतच त्यांनी लेखनाची आणि निर्मात्याची धुराही सांभाळली आहे. याव्यतिरिक्त  नील पटेलही या चित्रपटाचे निर्माता आहेत. मोह माया फिल्म्स आणि इंक टॅंक निर्मित हा चित्रपट २५ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 


'पाँडीचेरी'बद्दल 'प्लॅनेट मराठी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, '’प्लॅनेट मराठी जगातील पहिले मराठी ओटीटी असून त्यावर पहिली थिएटर फिल्म ‘जून’ झळकली होती. आम्ही नेहमीच नवनवीन प्रयोग करण्याच्या प्रयत्नात असतो. असाच वेगळा प्रयोग ‘पाँडीचेरी’मध्येही करण्यात आला आहे. जी स्मार्ट फोनवर चित्रीत करून प्रदर्शित होणार आहे. अशा पध्दतीची ही पहिली फिचर फिल्म आहे. अत्यंत मोजक्या टीममध्ये केवळ एक महिन्यात एका उत्तम चित्रपटाची निर्मिती होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण ‘पाँडीचेरी’ आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमीच वेगवेगळे विषय घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. असाच एक वेगळा विषय, कथा आपल्याला 'पाँडीचेरी' मध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अनेक जमेच्या बाजू आहेत. दिग्दर्शक, कथा, कलाकार आणि नैसर्गिक सौंदर्याने खुललेले नयनरम्य 'पाँडीचेरी'. हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल आणि याचा अनुभव आपल्या कुटुंबासह चित्रपटगृहातच घ्यावा.'' 


दिग्दर्शक सचिन कुंडलकर चित्रपटाबद्दल सांगतात, ''हा एक वेगळा विषय आहे. टिझरवरून हा चित्रपट लव्ह ट्रायंगल वाटत असला तरी चित्रपटाचा हा विषय अजिबात नाही. हा एक भावनिक प्रवास असून या तिघांच्या नात्याचा शेवट कुठे होतो, हे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा संपूर्ण चित्रपट मोबाईलवर चित्रित करण्यात आल्याने साहजिकच यात भरपूर मोठा तांत्रिक फरक आहे. कुठेही त्याचा समतोल बिघडू नये, यासाठी काळजीपूर्वक चित्रीकरण करण्यात आले आहे. यात छायाचित्रणकार मिलिंद जोग यांचेही कसब दिसते. या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक अष्टपैलू कलाकार एकत्र आले आहेत. ही अनोखी भावनिक कथा प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल.''

Wednesday, 9 February 2022

२९ एप्रिलपासून सर्वत्र घुमणार 'चंद्रमुखी'च्या घुंगरांचे बोल



२९ एप्रिलपासून सर्वत्र घुमणार 'चंद्रमुखी'च्या घुंगरांचे बोल

नवीन वर्षात मराठी चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा खजिनाच घेऊन आले आहेत. एका पेक्षा एक चित्रपट प्रदर्शित होत असतानाच त्यात आता भर पडणार आहे एका भव्य चित्रपटाची. 'कच्चा लिंबू', 'हिरकणी' असे जबरदस्त चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिल्यानंतर प्रसाद ओक आता 'चंद्रमुखी' हा बहुचर्चित चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हा चित्रपट २९ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार असून नुकताच या चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. 

टिझरमध्ये ढोलकीचा ताल, घुंगरांचे बोल आणि साजशृंगार, सौंदर्याची नजाकत आणि सोबत दिलखेचक अदांनी सर्वांना घायाळ करणारी नृत्यांगना दिसत आहे. तमाशातील शुक्राची चांदणी चंद्रा आणि राजकारणात मुरलेला ध्येयधुरंदर राजकारणी यांच्यात निर्माण होणारी ओढ.पाहायला मिळत आहे. लाल दिवा आणि घुंगरांच्या गुंतावळीची ही राजकीय रशीली प्रेमकहाणी प्रेक्षकांना 'चंद्रमुखी'मध्ये पाहायला मिळणार आहे. 

'चंद्रमुखी'बद्दल ‘प्लॅनेट मराठी’चे संस्थापक, प्रमुख अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ''प्रेक्षकांना सर्वोत्कृष्ट आशय देण्यासाठी आम्ही वचनबध्द आहोत. त्यानुसार एक दर्जेदार कलाकृती आम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहोत. प्रसाद ओकसोबत काम करताना निश्चितच आनंद होत आहे. यापूर्वी प्रसाद ओकने आपल्या दोन्ही चित्रपटांमध्ये वेगवेगळे विषय हाताळले आहेत. यावरून प्रसाद किती संवेदनशील दिग्दर्शक आहे, हे आपल्याला कळलेलेच आहे. यापूर्वीच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र मधल्या काळात थिएटर बंद असल्याने याचे पदार्पण थांबवावे लागले. मात्र आता सर्वत्र परिस्थिती नियंत्रणात आली असून मला वाटले 'चंद्रमुखी' प्रदर्शित करण्याची हीच योग्य वेळ आहे. ही एक वेगळी प्रेमकहाणी आहे. मला खात्री आहे, प्रेक्षक या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद देतील.'' तर गोल्डन रेशो फिल्म्सचे सीओओ पियुष सिंग म्हणतात, 'प्लॅनेट मराठीसोबत काम करण्याचा अनुभव खूपच अनोखा असतो. हा प्लॅनेट मराठीसोबतचा तिसरा प्रोजेक्ट आहे. या चित्रपटाची कथा अतिशय दमदार आहे. दिग्दर्शक, कलाकार एकंदरच चित्रपटाची संपूर्ण टीमच जबरदस्त आहे आणि मुख्य म्हणजे बऱ्याच काळानंतर या चित्रपटाच्या निमित्ताने अजय - अतुलचे मराठीत पुनरागमन होत आहे आणि तेही तमाशाप्रधान चित्रपटातून. हा एक भव्य चित्रपट आहे आणि याची भव्यता प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहताना नक्कीच दिसेल.''

 'चंद्रमुखी' हा चित्रपट लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर आधारित आहे. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन्स प्रस्तुत, फ्लाइंग ड्रॅगन एंटरटेनमेंट, लाइटविदिन एंटरटेनमेंट सहप्रस्तुत या चित्रपटाची पटकथा, संवाद चिन्मय मांडलेकर यांचे असून अजय - अतुल या दमदार जोडीने 'चंद्रमुखी'ला संगीत दिले आहे. या चित्रपटातील 'चंद्रमुखी'आणि इतर कलाकारांची नावे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहेत. त्यामुळे या चित्रपटाबाबतची प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

IIFL Home Finance Ltd. (IIFL HFL) facilitates over 50,000 households under Credit Linked Subsidy Scheme (CLSS) making it one of the leading Financial Institutions (FIs) contributing towards Pradhan Mantri Awas Yojana-Urban (PMAY-U)

 


IIFL Home Finance Ltd. (IIFL HFL) facilitates over 50,000 households under Credit Linked Subsidy Scheme (CLSS) making it one of the leading Financial Institutions (FIs) contributing towards Pradhan Mantri Awas Yojana-Urban (PMAY-U)

New Delhi, 9th February 2022: IIFL Home Finance Ltd. (IIFL HFL), a subsidiary of IIFL Finance Limited, today announced their milestone of facilitating over 50,000 households under CLSS making it one of the leading FIs contributing towards PMAY-U. The company has been able to disburse subsidy of over Rs. 1200 crores to households since the launch of the scheme in June 2015 . In Financial Year 2017-18, the company was recognized as the 2nd Best Primary Lending Institution under CLSS for Economically Weaker Sections (EWS)/Lower Income Groups (LIG) scheme by the Ministry of Housing and Urban Affairs (MoHUA).

In alignment with Government of India’s commitment towards ‘Housing for All’, IIFL HFL provides affordable home loans to EWS/LIG. Home loans have been disbursed to over 1,40,000 borrowers as on Sept 30th, 2021. (Note-1,40,000 is inclusive of overall disbursed loan, added here as marketing gimmik)

Under CLSS-PMAY (U), borrowers are eligible for interest subsidy on home loans provided they fulfill the  eligibility criteria. The scheme for EWS/LIG is valid up to March 31, 2022.

Speaking at the landmark achievement Mr. Monu Ratra – MD & CEO at IIFL Home Finance said, “Pandemic affected the real estate and housing finance industry, but we have seen a steady demand for housing even during these difficult times and it is certainly growing as the economy is emerging out of Covid situation. The current scenario of people getting offered lowest-ever home loan interest rates, attractive property prices, tax benefits on home loans and increase in the work from home trend, are pushing demand for housing too. IIFL Home Finance’s faith and support towards the Government’s mission of PMAY is intact and it is our mission to provide affordable housing to all first time EWS/LIG home buyers.”

Monu Ratra further added, “We are also very delighted with the current budget announcement on the allotment of Rs. 48,000 crores for completion of 80 lakh houses this year under PMAY. This will definitely further boost the affordable housing segment. We believe that housing in India will see a huge demand in future as the government is working towards supportive environment for affordable housing and the country is seeing increasing urbanization with rising aspirations.”

Digital India's one of the fastest growing & sustainable home finance company, IIFL HFL is looking to expand in smaller towns with an aim to cross the Rs. 25,000 crore mark in terms of assets under management (AUM) by March 2022. It's AUM was at Rs. 21,474 crore at the end of September with home loans contributing almost three-fourth of it. The aim is to enable the customers by intervention of technology such as hundred percent digital on boarding of customers to increase the access.

The HFC already has 125+ branches, as on Sept 30, 2021, and plans to double its branches with focus on tier 3 and tier 4 locations by the end of this financial year.

आता परदेशातही होणार लोच्या - यु.एस., यु.ए.ई.सह अनेक देशांमध्ये 'लोच्या झाला रे' होणार प्रदर्शित -



 आता परदेशातही होणार लोच्या 

- यु.एस., यु.ए.ई.सह अनेक देशांमध्ये 'लोच्या झाला रे' होणार प्रदर्शित -

काही सिनेमे हे केवळ त्या सिनेमातील कलाकारांसाठीच पाहायचे असतात. त्या सिनेमातील कलाकारांचा कल्ला इतका मनोरंजक असतो की, सिनेमा पाहता पाहता त्या पडद्यावरील कल्ल्यात प्रेक्षकही सहभागी होऊन जातो. असाच एक चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. पारितोष पेंटर आणि रवी अधिकारी दिग्दर्शित 'लोच्या झाला रे' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांना भरभरून हसवले. अवघ्या महाराष्ट्रात असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, सयाजी शिंदे, वैदेही परशुरामी, विजय पाटकर, प्रसाद खांडेकर, रेशम टिपणीस आता परदेशातही लोच्या करायला जाणार आहेत. परदेशातील प्रेक्षकांच्या मागणीनंतर आता 'लोच्या झाला रे' हा चित्रपट परदेशातही प्रदर्शित होणार आहे. 


आदी, मानव, डिंपल आणि काका यांच्यात चाललेला गोंधळ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. आता हा लोच्या नक्की कोणाच्या आयुष्यात होतोय, हे मात्र चित्रपट पाहिल्यावरच कळेल. धमाल मस्ती आणि प्रेक्षकांना मनमुराद हसवणाऱ्या या चित्रपटाला रसिकप्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. हा चित्रपट इतका हिट ठरला की, परदेशातही हा चित्रपट प्रदर्शित करावा, अशी मागणी परदेशातील मराठी प्रेक्षकांकडून होऊ लागली. त्यामुळे ‘लोच्या झाला रे’ यु.एस, यु.ए. ई.सह अन्य देशांमध्ये तीसहून अधिक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता ही सगळी टीम परदेशातही कल्ला करणार आहे. 

   या यशाबद्दल दिग्दर्शक पारितोष पेंटर म्हणतात, ‘’महाराष्ट्रात प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाल्यानंतर आता ‘लोच्या झाला रे’ परदेशवारी करणार आहे. आम्हाला अतिशय आनंद होतोय की, परदेशी प्रेक्षकांनी या चित्रपटाला पसंती दर्शवली आहे.’’ तर मुंबई मुव्ही स्टुडिओजचे नवीन चंद्रा म्हणतात, ‘’हा चित्रपट प्रेक्षकाचे मनोरंजन करण्यात यशस्वी झाला आहे आणि त्यामुळेच हा चित्रपट परदेशात प्रदर्शित करण्याची मागणी होत आहे. या परदेशी प्रेक्षकांचा मान राखत आम्ही ‘लोच्या झाला रे’ तिथे प्रदर्शित करण्याचा निर्णय घेत आहोत. आम्हाला आशा आहे की, तेथील प्रेक्षक असेच भरभरून प्रेम देतील.’’


लंडनमध्ये चित्रित झालेला हा चित्रपट मुंबई मुव्ही स्टुडिओज प्रस्तुत आयडिया दी एन्टरटेन्मेंट कंपनी व अभिनय मुंबई प्रोडक्शन अंतर्गत बनवण्यात आला असून 

नवीन चंद्रा, नितीन केणी, पारितोष पेंटर आणि शांताराम मनवे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर मंगेश जगताप कार्यकारी निर्माता आहेत. या चित्रपटाच्या छायाचित्रणाची धुरा संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे.

Wednesday, 2 February 2022

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन झाले आहे.

 

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ  अभिनेते रमेश देव यांचे निधन झाले आहे.


मुंबई :  मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ  अभिनेते रमेश देव यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 93 व्या वर्षी प्राणज्योत मालवली.   याबद्दलची माहिती त्यांचा मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देव यांनी दिली आहे. मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

रमेश देव अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आहेत. त्यांचा जन्म 30 जानेवारी 1929  कोल्हापुर, महाराष्ट्रात झाला. 'आनंद' या चित्रपटातील भूमिकेसाठी ते ओळखले जातात. 1956  साली रमेश देव यांनी  आंधळा मागतो एक डोळा या चित्रपटातून त्यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. तर आरती हा त्यांचा बॉलीवूडमधील पहिला चित्रपट होता.  रमेश देव यांनी दिग्दर्शन तसेच अनेक टीव्ही मालिका आणि नाटकांची निर्मिती केली आहे. त्यांनी पैशाचा पाऊस आणि भाग्यलक्ष्मी या चित्रपटांत काम केले. 

रमेश देव  (Ramesh Deo) यांनी मराठी तसेच हिंदी भाषेतील अनेक सिनेमांमध्ये काम केले. त्यांनी 1962 मध्ये अभिनेत्री सीमा देव (Seema Deo) यांच्यासोबत लग्न केले. रमेश देव आणि सीमा देव यांनी अनेक चित्रपटांत सोबत काम केले. या दोघांचे अनेक चित्रपट चांगलेच गाजले. 

Tuesday, 1 February 2022

What are you willing to do for the one you love? Tips Punjabi presents “Jinna Royi Aan” ft. Paras Chhabra and Mahira Sharma

 


What are you willing to do for the one you love? Tips Punjabi presents “Jinna Royi Aan” ft. Paras Chhabra and Mahira Sharma


Singer - Ninja, Music by - Gold Boy, Lyrics by- Navi Ferozpurwala, Director- Aar- V, Editor - Shourya Kumar Lal


Jinna Royi Aan is the latest music video of Paras Chhabra in which he can be seen romancing Mahira Sharma. A melodious song with an interesting love story between the pair.

If you are a die-hard romantic or someone who is up for watching an incredible journey of two romantic people and are interested to see love in its most intense form, Jinna Royi Aan is your destination.

Kumar Taurani says “Punjabi songs have a pan India fan base, even if people don’t understand the language, music conveys the emotions”

Paras Chhabra says, "Romance is a genre that every generation can relate to. I am ecstatic for being able to be a part of it. Furthermore, Mahira has been an incredible partner, so I it was an opportunity I am glad I took.The video was like a film shoot interesting angle it had and lot of twists and turns also this would be celebrating love month."

Mahira Sharma says, "Jinna Royi Aan is such a beautiful song that I couldn't help but grab the chance to be a part of it. Paras costarring in it was like a cherry on top for me. I really enjoyed shooting for the song and I am glad that our efforts resonated with people."

Director AAR -V says, "Jinna Roiyaan is a love story of a couple who are caught up in act that twists their destiny. While the male part is driven a very unique character played by Paras the female is full of innocence and love played by Mahira . It was fun working with them. The story and the approach of the video is not attempted before. Go watch it"

'पांघरूण’ च्या निमित्ताने रंगणार सांगितिक मैफल



 'पांघरूण’ च्या निमित्ताने रंगणार सांगितिक मैफल


काकस्पर्श, नटसम्राट अशा सर्वोत्कृष्ट कलाकृतीनंतर महेश मांजरेकर आणि झी स्टुडिओज घेऊन येत असलेला 'पांघरूण' हा चित्रपट ४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे . नुकतेच 'पांघरूण' या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित झाले असून या चित्रपटात एक विलक्षण प्रेमकहाणी आहे आणि मुख्य म्हणजे प्रेक्षकांसाठी एक सांगितिक मेजवानी आहे. ६० च्या दशकातील काळ, कोकणातील नयनरम्य निसर्गसौंदर्य आणि तिथे घडणारी विलक्षण प्रेमकहाणी आपल्याला 'पांघरूण' मध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची कथा एका सतरा अठरा वर्षाच्या मुलीची असून वडिलांच्या वयाच्या माणसासोबत लग्न झाल्यावर तिचा जीवनप्रवास कशा प्रकारे होतो यावर आधारित हा चित्रपट आहे . 


      ‘पांघरूण’ या चित्रपटात नऊ गाण्यांचा समावेश असून ही गाणी संगीतरसिकांच्या भेटीस आली आहेत. या गाण्यांचे बोल, संगीत रसिकांना भावले असून ते मनाला भिडणारे आहे. चित्रपटातील 'ही अनोखी गाठ' हे गाणे गायक विजय प्रकाश यांनी गायले असून हे एक भावनिक गाणे आहे. नववधूच्या मनातील घालमेल या गाण्यात दिसत आहे. तर 'धाव घाली आई' या भक्तिमय गाण्याला आनंद भाटे यांचा आवाज लाभला असून 'सतरंगी झाला रे' हे सुमधूर गाणे पवनदीप राजन यांनी गायले आहे.  'इलूसा  हा देह' हे श्रवणीय गाण्याला आनंद भाटे यांनी आवाज दिला आहे. तर 'साहवेना अनुराग' या काळजाला भिडणाऱ्या गाण्याला गायिका केतकी माटेगावकर यांचा मधुर आवाज लाभला आहे.  'इल्लूसा हा देह'  केतकी माटेगावकर व विजय प्रकाश यांनी गायले  आहे ,देवे ठेविले तैसे राहावे' या गाण्याला आनंद भाटे, 'जीव होतो कासावीस’ या गाण्याला आनंद भाटे तर 'इल्लूसा हा देह' (भावनिक) गाणे आनंद भाटे यांनी गायले आहे . या संगीत मैफलीचा आनंद आपल्याला ‘पांघरूण’मध्ये घेता येणार आहे. या सर्व गाण्यांना हितेश मोडक, सलील कुलकर्णी, पवनदीप राजन, अजित परब यांचे संगीत लाभले असून यात संत तुकाराम आणि संत सावळा माळी यांचे अभंग आहेत.  आणि दोन गाणी वैभव जोशींची आहेत.


      झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर हे एक उत्तम समीकरण आहे आणि त्यातून नेहमीच एक अनोखा कलाविष्कार चित्रपट प्रेमींसाठी सादर होतो. अशीच सुंदर कलाकृती 'पांघरूण'च्या निमित्ताने पाहायला मिळणारा आहे.  अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले असून यात अमोल बावडेकर, गौरी इंगवले, रोहित फाळके, विद्याधर जोशी, सुरेखा तळवलकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सुमधुर संगीत, भावनिक कथानक यांमुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा हा चित्रपट ४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.


     महेश मांजरेकर व झी स्टुडिओज 'पांघरूण' च्या निमित्ताने पुन्हा एकदा अनोखा कलाविष्कार रसिक प्रेक्षकांसमोर सादर करण्यास सज्ज झाले आहेत. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावणाऱ्या या चित्रपटात गौरी इंगवले, अमोल बावडेकर, रोहित फाळके, विद्याधर जोशी, प्रवीण तरडे, सुरेखा तळवलकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘पांघरूण’च्या निमित्ताने बऱ्याच काळानंतर रसिक प्रेक्षकांना सुरेख सांगितिक कलाकृती पाहायला मिळणार आहे.