Monday, 12 December 2022

२६ जानेवारीला लागणार ‘बांबू’

 


२६ जानेवारीला लागणार ‘बांबू’ 


प्रेमाचा इतिहास हेच सांगतो की, खांद्यासाठी बांबू लागतो आणि बांबू लागला की, कोणाचा तरी खांदा हा लागतोच. खरंतर प्रेमात पडलेल्या सॅारी…. प्रेमात लागलेल्या अनेक बांबूचा अनुभव आयुष्यात प्रत्येकानेच घेतला असेल. हे बांबूच लागू नयेत आणि तुमचे गेलेले प्रेम यु टर्न मारून परत येण्यासाठी प्रेमाचे सायन्स पाळणे खूप गरजेचे आहे. प्रेमात बांबू कसे लागतात, यांची गोष्ट सांगणाऱ्या ‘बांबू’ चित्रपटाचे टीझर नुकतेच सोशल मीडियावर झळकले असून येत्या २६ जानेवारीला हा चित्रपट सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. क्रिएटिव्ह वाईब प्रस्तुत, तेजस्विनी पंडित, संतोष खेर निर्मित, विशाल देवरूखकर दिग्दर्शित ‘बांबू’च्या टीझरमध्ये तरूण -तरूणी बांबूच्या बनातून जाताना दिसत आहेत. आता त्यांच्या प्रेमकहाणीत नेमके काय ‘बांबू’ लागले आहेत, हे चित्रपट आल्यावरच कळेल. अंबर विनोद हडप लिखित या चित्रपटात कलाकार नेमके कोण आहेत, हे जाणून घेण्याची आता सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. 


चित्रपटाबद्दल दिग्दर्शक विशाल देवरूखकर म्हणतात, ‘’ मुळात तरूणाईला हा चित्रपट त्यांच्या आयुष्याच्या जवळपासचा वाटणारा आहे. युथला समोर ठेवून जरी या चित्रपटाची निर्मिती केली असली तरी तरूणांनी हा चित्रपट त्यांच्या पालकांसोबत पाहावा, असा आहे. २६ जानेवारीला ‘बांबू’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून हा एक धमाल एंटरटेनर आहे.’’


निर्माते संतोष खेर म्हणतात, ‘’ मुळात याची कथा आम्हाला विशेष भावली. प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी बांबू लागतातच. मग ते प्रेमात असो वा इतर कशाही बाबतीत. अशीच प्रेमात ‘बांबू’ लागल्याची गोष्ट आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार असून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा हा ‘बांबू’ आहे.

राज्यपालांनी केले 'गोष्ट एका पैठणीची'चे कौतुक राजभवनातील कर्मचाऱ्यांसाठी 'गोष्ट एका पैठणीची'चा खास शो



 राज्यपालांनी केले 'गोष्ट एका पैठणीची'चे कौतुक

राजभवनातील कर्मचाऱ्यांसाठी 'गोष्ट एका पैठणीची'चा खास शो 



सरळ, साध्या गृहिणीच्या स्वप्नाचा रंजक प्रवास दाखवणारा 'गोष्ट एका पैठणीची' हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. विशेषतः महिला प्रेक्षकांना हा चित्रपट आपल्या जवळचा वाटत आहे. हा चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा, यासाठी अनेक ठिकाणी खास शोजचे आयोजनही करण्यात आले. नुकताच ‘गोष्ट एका पैठणीची’चा खास शो नरिमन पॉईंट येथे आयोजित करण्यात आला होता. राजभवनातील कर्मचाऱ्यांसाठी आयोजिलेल्या या शोला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी सायली संजीव, गिरीजा ओक- गोडबोले , दिग्दर्शक शंतनू रोडे, पुष्कर श्रोत्री, प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर उपस्थित होते. या वेळी लकी ड्रॉचे आयोजनही करण्यात आले होते आणि विजेत्यांना राज्यपालांच्या हस्ते पैठणी प्रदान करण्यात आली. 



प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, " राज्यपालांच्या उपस्थितीत हा खास शो संपन्न झाला. त्यांच्याकडून या चित्रपटाबाबत चांगल्या प्रतिक्रिया येणे, चित्रपटाच्या टीमचे कौतुक करणे, ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. या वेळीही प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली. आमचा चित्रपट इतक्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय, त्यांच्या पसंतीस उतरतोय, हे पाहून समाधान वाटते.’’


मंत्रा व्हिजन प्रस्तुत, गोल्डन रेशो फिल्म्स, प्लॅनेट मराठी, लेकसाइड प्रॉडक्शन निर्मित 'गोष्ट एका पैठणीची'चे अक्षय विलास बर्दापूरकर, अभयानंद सिंग, पियुष सिंग, सौरभ गुप्ता निर्माते असून अश्विनी चौधरी, चिंतामणी दगडे, सौम्या मोहंती-विळेकर, गायत्री दिलीप चित्रे हे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाचे लेखन, संवाद आणि दिग्दर्शन शंतनू रोडे यांचे असून सायली संजीव, सुव्रत जोशी, मृणाल कुलकर्णी, सुहिता थत्ते, मिलिंद गुणाजी, मधुरा वेलणकर, गिरीजा ओक- गोडबोले, अदिती द्रविड यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.

Sunday, 11 December 2022

अमोल जावडेकर नव्या आवहनात्मक भूमिकेत



अमोल जावडेकर नव्या आवहनात्मक भूमिकेत


नवी मालिका - 'प्रतिशोध' झुंज अस्तित्वाची १६ जानेवारी २०२३ पासून सोम. ते शनि. रा. १० वा. सोनी मराठी वाहिनीवर.

                 सोनी मराठी वाहिनी कायमच आशयघन विषय मांडत वेगवेगळ्या मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. आता 'प्रतिशोध' ही मालिका  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याची पहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळते आहेत. निरनिराळ्या चित्रपटांमधून आणि मालिकांमधून वेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे अमोल जावडेकर आता अजून एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. 'प्रतिशोध' या नव्या कोऱ्या मालिकेतून अमोल जावडेकर यांचा हा चेहरा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ममता असे या व्यक्तिरेखेचे नाव आहे. अमोल जावडेकर सोबतच पायल मेमाणे हि सुद्धा पाहायला मिळत आहे. ममताच्या मुलीची म्हणजेच दिशा ची व्यतिरेखा यात ती साकारताना दिसणार आहे.  पण  मालिकेत भूतकाळातील काही विशिष्ट गोष्टींमुळे ममता आणि दिशा यांच्या भविष्यात काय अडचणींना सामोरे जावे लागत आहे हे आपल्याला या मालिकेतून पाहायला मिळेल.


                 निरनिराळ्या धाटणीच्या मालिका आणि विषय सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळत आहेत. त्यातच आता एक थरारक मालिका आपल्याला पाहायला मिळणार आहे. मालिकेची पहिली झलकदेखील उत्कंठावर्धक रितीने प्रेक्षकांसमोर येते आहे आणि पुढचे कथानकही रोमांचक पद्धतीने  रंगेल यात काही शंका नाही.  भूतकाळाची सावली बदलणार भविष्याची दिशा पाहायला विसरू नका 'प्रतिशोध' झुंज अस्तित्वाची १६ जानेवारी २०२३ पासून सोम. ते शनि. रा. १० वा. सोनी मराठी वाहिनीवर.

Thursday, 8 December 2022

सरदेशमुखांचा वाडा शापमुक्त होणार? प्लॅनेट मराठी ओटीटीवरील 'अथांग' वेबसीरिजचे अंतिम भाग प्रदर्शित




सरदेशमुखांचा वाडा शापमुक्त होणार?

प्लॅनेट मराठी ओटीटीवरील 'अथांग' वेबसीरिजचे अंतिम भाग प्रदर्शित

प्लॅनेट मराठी ओटीटीवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या जयंत पवार दिग्दर्शित'अथांग' या वेबसीरिजला प्रेक्षकांचा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. मराठी वेबसीरिजच्या इतिहासात पहिल्याच दिवशी सर्वात जास्त बघितली जाणारी ही पहिली वेबसीरिज ठरली आहे. या रहस्यमय वाड्यात अनेक गुपिते दडलेली असून एक एक करून ती समोर येत आहेत. आता ही वेबसीरिज एका अशा वळणावर आली आहे, जिथे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यातच आता या वेबसीरिजमधील एक प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘खुलते इथे कळी’ असे या सुमधूर गाण्याचे बोल असून हे गाणे शरयू दाते आणि रोहित राऊत यांनी गायले आहे. गुरू ठाकूर यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला रोहित राऊत याचे संगीत लाभले आहे. या गाण्यात राऊ आणि सुशीलाचे हळूवार खुलत जाणारे प्रेम दिसत आहे. बाईच्या नजरेला नजर न देणाऱ्या राऊच्या डोळ्यांतून आता प्रेम व्यक्त होताना दिसतेय, त्यामुळे आता वाड्यात काय घडणार, हे जाणून घेण्यासाठी ‘अथांग’ ही वेबसीरिज पाहावी लागेल. ही वेबसीरिज प्रेक्षकांना प्लॅनेट मराठी ओटीटीवर पाहता येईल.


मागील भागात प्रेक्षकांनी पाहिले, राऊ आणि सुशीला यांच्यात प्रेमाची कळी फुलत असून दोघं एकमेकांच्या जवळ येत आहेत. याचे काय पडसाद उमटतील, पूर्वजांच्या पापाचे फळ राऊला भोगावे लागणार का, सरदेशमुखांचा वाडा शापमुक्त होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढील भागांत दडलेली आहेत आणि हे जाणून घेण्यासाठी प्लॅनेट मराठी ओटीटीवर ‘अथांग’ ही वेबसीरिज बघावी लागेल.


दिग्दर्शक जयंत पवार म्हणतात, " अथांग ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत आहे, हे पाहून समाधान वाटतंय. प्लॅनेट मराठी ओटीटीवर पहिल्यांदाच असा प्रयोग करण्यात आला आहे. तो यशस्वी होताना दिसतोय. सहा भागांत प्रदर्शित करण्यात आलेली ही वेबसीरिज क्षणोक्षणी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे. त्यामुळेच प्रेक्षक पुढील भागांची आतुरतेने वाट पाहतात. यावरूनच प्रेक्षकांना ‘अथांग’ आवडतेय, हे कळतेय.


 प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, " अथांग या वेबसीरिजचे शेवटचे दोन एपिसोड्स प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित झाले आहेत. या आधी प्रदर्शित झालेल्या एपिसोड्सना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. प्रेक्षकांना काहीतरी नावीन्यपूर्ण देण्याचा आमचा कायमच प्रयत्न असतो. पिरिॲाडिक काळ दाखवणे कठीण काम आहे, मात्र ‘अथांग’च्या संपूर्ण टीमने हे आव्हान पेलले आणि यशस्वीही केले.’’ 


'अथांग' या वेबसीरीजमध्ये  संदीप खरे, निवेदिता जोशी - सराफ, धैर्य घोलप, भाग्यश्री मिलिंद, उर्मिला कोठारे, ऋतुजा बागवे, दीपक कदम, ओमप्रकाश शिंदे, केतकी नारायण, शशांक शेंडे, योगिनी चौक आणि रसिका वखारकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन निर्मित, अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत 'अथांग'चे तेजस्विनी पंडित, संतोष खेर निर्माते आहेत.

Wednesday, 7 December 2022

सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत महिलांनी अनुभवला पैठणीचा नक्षीदार प्रवास 'गोष्ट एका पैठणीची'च्या निमित्ताने मंत्रालयातील महिलांसाठी खास स्क्रिनिंग



 सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत महिलांनी अनुभवला पैठणीचा नक्षीदार प्रवास

'गोष्ट एका पैठणीची'च्या निमित्ताने मंत्रालयातील महिलांसाठी खास स्क्रिनिंग


नुकताच प्रदर्शित झालेला आणि सध्या चर्चेत असलेला ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने मुंबईत काही ठिकाणी स्पर्धांचे, खेळांचे, बाईक रॅलीचे, लकी ड्रॉचे आयोजनही करण्यात आले. या वेळी बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेल्या महिलांना, खेळातील विजेत्यांना पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. तर काही ठिकाणी या चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजनही करण्यात आले. नुकताच राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेल्या या चित्रपटाचा मंत्रालयातील महिलांसाठी खास शो आयोजित करण्यात आला होता. या शोला महाराष्ट्राचे वन आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. 


सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. ते पुढ म्हणाले, ‘’आयुष्याचा अर्थ समजवून सांगणारी 'गोष्ट एका पैठणीची'ची कथा हृदयाला भिडते. सुख कसे शोधावे, हे चित्रपटात उत्तमपणे मांडण्यात आलंय. सायली संजीवच्या सहजसुंदर अभिनयाने मन जिंकलं.’’


प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, " पैठणी म्हटलं की महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान आम्ही अनेक खेळांचे, स्पर्धेचे आयोजन केले. या वेळी मोठ्या संख्येने महिला सहभागी झाला होत्या. या स्पर्धेतील महिलांचा उत्साह खरंच उल्लेखनीय होता. यावेळी अभिनेत्री सायली संजीवनेही या महिलांसोबत धमाल केली. चित्रपटातील इंद्रायणी ही त्यांना आपल्यातीलच एक गृहिणी वाटली. या वेळी अनेकींनी चित्रपट पाहाणार असल्याची इच्छाही व्यक्त केली. हे सगळंच खूप सुखावह आहे. मंत्रालयातील महिलाही कामात व्यस्त असतात. त्यामुळे त्यांना सकारात्मक विचार दाखवण्याच्या उद्देशाने, त्यांचे थोडे मनोरंजन करण्याच्या निमित्ताने आम्ही खास शो आयोजित केला आणि मुख्य म्हणजे या शोला आपल्या महाराष्ट्राचे वन आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. त्यांनीही चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. यावेळी सायलीसोबत महिलांनी हा चित्रपट एन्जॅाय केला.’’


मंत्रा व्हिजन प्रस्तुत, गोल्डन रेशो फिल्म्स, प्लॅनेट मराठी, लेकसाइड प्रॉडक्शन निर्मित 'गोष्ट एका पैठणीची'चे अक्षय विलास बर्दापूरकर, अभयानंद सिंग, पियुष सिंग, सौरभ गुप्ता निर्माते असून अश्विनी चौधरी, चिंतामणी दगडे, सौम्या मोहंती-विळेकर, गायत्री दिलीप चित्रे हे सहनिर्माते आहेत. सायली संजीव, सुव्रत जोशी, मृणाल कुलकर्णी, सुहिता थत्ते, मिलिंद गुणाजी, मधुरा वेलणकर, गिरीजा ओक, अदिती द्रविड यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.

Tuesday, 6 December 2022

The 3rd Edition of High Flyers 50 Global Achievers Awards Night

 


The 3rd Edition of

High Flyers 50 Global Achievers Awards Night



After the successful launch of the 2nd edition of Film & TV Trade Preview’s “High Flyers, 50” at The Westin Mumbai Powai Lake, the 3rd edition of “High Flyers 50 Global Achievers” was a tremendous success. In this edition, global individuals of different nationalities were honored for their remarkable achievements.


This sensational awards night was held on the 5th of December 2022 in Mumbai. Lord Rami Ranger, a Member of the House of Lords of the United Kingdom attended the event as a chief guest. Bollywood celebrity Preeti Jhangiani conferred all the winners. The event was hosted by famous actor Aman Verma. Other eminent personalities were also present at the event.

Only the third Indian player to win the world title at the Tata Archery Academy's Cadet World Youth Archery Championships, Komalika Bari was also on the list of this edition.

A few names of the 3rd edition are Dr. Rajendra Bharud, Mr. Kanwaljit Singh Bakshi (Former Member of Parliament at New Zealand Parliament), Actor Mr. Arun Govil, Mr. Lufti Hasan, USA, Mr. Rohit Chadda, Mr. John Clifford, UK, Sammie Vance, USA, Dr. Zubin Daruwalla, Singapore, Nick Katsoris, USA.  

A few names of the winners of past editions are Padma Vibhushan Avinash Dixit (USA), Padma Bhushan Mr. Kaushik Basu (USA), Lord Rami Ranger CBE (UK), Padma Shri Anup Jalota, Lord Karan Bilimoria (UK), Dr. Vijay Kalantri (Chairman, World Trade Centre), Mr. Aanjjan Srivastav, Padma Shree Dr. Mukesh Batra (Dr. Batra's Clinic), Mr. Ramesh Taurani, Mr. Pahlaj Nihalani, Ms. Sukhinder Singh Cassidy (Google, USA), Mr. Vivek Gupta (Founder of Licious, India), Mr. Ram Gidoomal (UK), Dr. Chirantan Ghosh (USA), Ms. Abhnash K Bains (UK), Ms. Kamel Hothi OBE (UK), Mr. Prabhu Guptara (UK), Dr. Harbeen Arora, Mr. C K Patel (USA), Mr. Talat Aziz, Mr. Malav Sanghavi (UK), Mr. Tanveer Ghazi, Mr. Onir, Ms. Fatema Agarkar, Benzy, Advait Kolarkar.

About High Flyers 50 - High Flyers 50", an initiative of the film trade famous magazine Film & TV Trade Preview" is a unique platform wherein we honor individuals and organizations who deserve to be honored and recognized for their remarkable achievements. We finalize these 50 from different or specific fields and felicitate them in a very distinguished way.   All the 50 achievers are conferred with the awards and certificates of "High Flyers 50". To make lasting forever and to keep the written record, we also publish a classy and trendy Coffee Table Book covering the riveting success stories of all the 50 achievers. The book is available on eBooks platforms. Hardcover/ Paperback copies are available on Amazon and other eBooks platforms. To make these stories inspirational for society and to give these "High Flyers" due respect and well deserve recognition, we promote them extensively through coverage in the key print, television, digital, and social media platforms.

तेजस्विनी पंडित बनली ‘बॅाडी डबल’

 तेजस्विनी पंडित बनली ‘बॅाडी डबल’ 


साहसदृश्ये अथवा काही कारणास्तव कलाकारांसाठी बऱ्याचदा बॅाडी डबलचा वापर केला जातो. अशाच बॅाडी डबलचा उपयोग जयंत पवार दिग्दर्शित ‘अथांग’मध्येही करण्यात आला आहे. मात्र यावेळी परिस्थिती थोडी वेगळी होती. या वेळी एक सुपरस्टार अभिनेत्री दुसऱ्या अभिनेत्रीची बॅाडी डबल बनली आहे आणि ही अभिनेत्री आहे तेजस्विनी पंडित. ‘अथांग’मध्ये तेजस्विनीने केतकी नारायणसाठी बॅाडी डबल म्हणून काम केले आहे. प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या या वेबसीरिजची तेजस्विनी निर्माती आहे. पडद्यावर जरी तेजस्विनी प्रत्यक्ष झळकली नसली तरी पडद्यामागे मात्र तिने अनेक भूमिका साकारल्या आहेत. या वेबसीरिजमधील काही दृश्यांना तिचा आवाजही लाभला आहे. 


याबद्दल तेजस्विनी पंडित म्हणते, ‘’ एक कलाकार म्हणून वावरताना आपल्यावर फार जबाबदारी नसते. शुटिंग, डबिंग करायचे की आपले काम झाले. परंतु निर्माती म्हणून वावरताना अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. कागदावर श्रीगणेशा लिहिण्याच्या प्रक्रियेपासून मी यात सहभागी होते आणि मी हे काम एन्जॅायही केले. अनेकांनी मला विचारले यात तू एखादी भूमिका का नाही केलीस, तर निर्माती म्हणून या भूमिकेला मला शंभर टक्के न्याय द्यायचा होता आणि अभिनय करून मला हे शक्य झाले नसते. मुळात यात मी पडद्यावर जरी दिसत नसले तरी पडद्यामागे मी अनेक भूमिका पार पाडल्या आहेत. यात काही ठिकाणी मी आवाजही दिला आहे. त्यामुळे विविध भागांत मी काम केले आहे.’’ 


प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन निर्मित, अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत ‘अथांग’चे तेजस्विनी पंडित, संतोष खेर निर्माते आहेत. यात संदीप खरे, निवेदिता जोशी- सराफ, धैर्य घोलप,भाग्यश्री मिलिंद, उर्मिला कोठारे, ऋतुजा बागवे, दीपक कदम, ओमप्रकाश शिंदे, केतकी नारायण, शशांक शेंडे, योगिनी चौक आणि रसिका वखारकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  ‘अथांग’ प्लॅनेट मराठी ओटीटीवर उपलब्ध आहे.

'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’चा म्युझिक लाँच सोहळा संपन्न

 


'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’चा म्युझिक लाँच सोहळा संपन्न 


'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा धमाल विनोदी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर आता या चित्रपटातील जबरदस्त गाणीही प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. नुकताच 'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’चा म्युझिक लाँच सोहळा पार पडला. यावेळी भरत जाधव, वैभव मांगले, निखिल चव्हाण यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. 


या चित्रपटात तीन गाणी असून यातील प्रत्येक गाणे वेगवेगळ्या जॉनरचे आहे. अवधूत गुप्ते, वैशाली सामंत आणि सौरभ शेट्ये यांचा आवाज लाभलेल्या 'स्वॅगवाला रेडा' या अफलातून गाण्याला गणेश निगडे यांचे बोल लाभले आहेत. तर 'हलके हलके रेशमी' या प्रेमगीताला गुरु ठाकूर यांनी शब्दबद्ध केले असून सौरभ शेट्ये आणि सना मोइदुट्टी यांनी स्वरबद्ध केले आहे. एका बाजूला धोंडी आणि चंप्याची प्रेमकहाणी खुलत असतानाच दुसऱ्या बाजूला आदित्य आणि ओवीचीही प्रेमकहाणी बहरत असल्याचे या गाण्यातून दिसतेय. तर मंदार चोळकर लिखित 'श्वास कसा हा' या गाण्याला सौरभ शेट्ये आणि सना मोइदुट्टी यांनी गायले आहे. या सर्व गाण्यांना सौरभ - दुर्गेश यांचे संगीत लाभले आहे. तर या गाण्यांचे नृत्य दिग्दर्शन सुजित कुमार, सिद्धेश दळवी यांनी केले आहे. 


चित्रपटातील गाण्यांबद्दल दिग्दर्शक ज्ञानेश भालेकर म्हणतात, " प्रत्येक गाणे काहीतरी सांगत आहे. काही भावना व्यक्त करत आहे. आमची म्युझिक टीम एकदम झक्कास असल्याने प्रत्येक गाण्याची खासियत आहे. उडत्या चालीचे, शांत, रोमँटिक असा सगळ्याच पद्धतीचा यात समावेश आहे. 'स्वॅगवाला रेडा' हे गाणे पाहायला जितके गंमतीशीर वाटते, तितकेच ते ऐकायलाही मजा येते. ज्याप्रमाणे प्रेक्षकांनी ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद या गाण्यांनाही देतील.'' 


रिलायन्स एंटरटेनमेंट प्रस्तुत सुनील जैन आणि कल्ट डिजिटल यांच्या सहकार्याने, फिफ्थ डायमेन्शन आणि कल्ट डिजिटल निर्मित 'धोंडी चंप्या - एक प्रेम कथा' हा चित्रपट प्रभाकर भोगले यांच्या लघुकथे वर प्रेरित होऊन बनवण्यात आला असून याची कथा, पटकथा, संवाद ज्ञानेश भालेकर आणि सागर केसरकर यांचे आहेत. सुनील जैन, आदित्य जोशी, व्हेनिसा रॉय, आदित्य शास्त्री निर्माते असून अमित अवस्थी, सुशांत वेंगुर्लेकर हे  सहनिर्माते आहेत. भरत जाधव, वैभव मांगले, निखिल चव्हाण, सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका असून येत्या १६ डिसेंबरपासून धोंडी आणि चंप्याची प्रेमकहाणी प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.

Saturday, 3 December 2022

सायली संजीवच्या उपस्थितीत दादरमध्ये रंगली बाईक रॅली 'गोष्ट एका पैठणीची'च्या निमित्ताने महिलांसाठी खेळांचे आयोजन

 


सायली संजीवच्या उपस्थितीत दादरमध्ये रंगली बाईक रॅली 

 'गोष्ट एका पैठणीची'च्या निमित्ताने महिलांसाठी खेळांचे आयोजन



भरजरी पैठणी… मराठमोळा साजश्रृंगार करून बाईकस्वारी करायला निघालेल्या महिलांनी शनिवारी दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क परिसर दुमदुमला होता. निमित्त होते ‘गोष्ट एका पैठणीची’ चित्रपटाच्या प्रमोशनचे. या बाईक रॅलीमध्ये इतर महिलांसह सायली संजीवचाही सहभाग होता.  मराठी बाणा आणि त्याला लाभलेली साहसाची जोड उपस्थितांना प्रोत्साहन देणारी होती. एकंदरच हा परिसर उत्साहाने भरलेला होता. या रॅलीला सोहळ्याचे स्वरूप आले होते. या दरम्यान बाईकस्वार महिलांना पैठणीने गौरवण्यात आले. याव्यतिरिक्त खेळांचे आणि लकी ड्रॅाचे आयोजनही करण्यात आले होते. विजेत्या महिलांचा महाराष्ट्राच्या महावस्त्राने सन्मान करण्यात आला. या वेळी सायली संजीव, दिग्दर्शक शंतनू रोडे यांच्यासह चित्रपटाची टीम उपस्थित होती. ‘गोष्ट एका पैठणीची’ हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.


प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, " ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाचे औचित्य साधून आम्ही बाईक रॅलीचे, खेळांचे आयोजन केले. या सगळ्या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग घेतला असून सर्व महिलांनी  एन्जॅाय केले. यावेळी उपस्थित महिलांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. महिलांनी आपली आवड जपावी, आपली स्वप्नं जगावी, याचं हेतूने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.’’ 



हा सोहळा बघून भारावलेली सायली संजीव म्हणते, " या माझ्या मैत्रिणींनी माझ्याप्रती जे प्रेम व्यक्त केले आहे, त्याने मला खरंच खूप छान वाटले. हा क्षण माझ्यासाठी खूप खास आहे. वेळात वेळ काढून आज माझ्या मैत्रीणी इथे आल्या, त्यांचे मनापासून आभार. यावेळी अनेक उपस्थितांनी चित्रपट पाहाणार असल्याची इच्छाही व्यक्त केली. प्रेक्षकांचे हे प्रेम आम्हाला सकारात्मक ऊर्जा देणारे आहे."


'गोष्ट एका पैठणीची'ची निर्मिती अक्षय विलास बर्दापूरकर, अभयानंद सिंग, पियुष सिंग, सौरभ गुप्ता यांनी  केली असून अश्विनी चौधरी, चिंतामणी दगडे, सौम्या मोहंती-विळेकर, गायत्री दिलीप चित्रे हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. मंत्रा व्हिजन प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माता अक्षय विलास बर्दापूरकर, पियुष सिंग, गोल्डन रेशो फिल्म्स आणि प्लॅनेट मराठी, लेकसाइड प्रॉडक्शन आहेत.  सायली संजीव, सुव्रत जोशी, मृणाल कुलकर्णी, सुहिता थत्ते, मिलिंद गुणाजी, मधुरा वेलणकर, गिरीजा ओक, अदिती द्रविड यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Mark your calendar for the biggest collaboration of 2022: Sukriti x Prakrit x Badshah with KYA SAY



 Mark your calendar for the biggest collaboration of 2022: Sukriti x Prakrit x Badshah with KYA SAY

 

Badshah, Sukriti, and Prakriti took to social media to promote the upcoming release of their exciting collaboration, Kya Say, which is set for release on December 6 on Vyrl Originals. The trio have been tempting their fans by posting their exotic appearances in identical locations, which has swamped the media and their followers all over the internet with anxious anticipation

 

The musical superstars have also offered an early peek of their upcoming release, which shows Badshah in a new persona, without his usual bling jacket and shoes. He is shown in a rustic style, donning a breezy ensemble completing it with regular slippers. The girls, on the other hand, look ravishing in their never before seen avatar, and the twin divas seem to be crushing their nature goddess look. As much as there is a urban twist in the song's title, we also note that the artwork features an extraordinary elephant.

 

In another interesting angle, the elephant featured in the song is Kalidas-Chirakkal Kalidasan, the second tallest elephant in India, is a celebrity elephant known for his appearances in epic films such as Baahubali. We can confidently state that the music video has not three, but four stars !


It has also been reported that the music video was shot at Athirappilly Waterfalls in Kerala, which has been spotlighted in films like Bahubali, Raavan, and a few Mani Ratnam films. With this, we can surely say that no music video has ever been shot on such a grand cinematic scale.

 

So mark your calendars because this much-anticipated collaboration with Kya Say is slated to release on the 6th of December, 2022, on the VYRL Originals Youtube Channel


Time to be Deewana for Vishal Mishra's latest from Maarrich!



 Time to be Deewana for Vishal Mishra's latest from Maarrich!


Watch now- https://m.youtube.com/watch?v=roWrduaFoA8

The latest song, Deewana, from the upcoming Bollywood movie, Maarrich is out! A groovy party song that will ensure you can't stop yourself from hitting the dance floor. Written, composed and sung by Vishal Mishra the song gives a glimpse into the inside world of Maarrich where Everyone is A Suspect.

With the party season setting in, Deewana will surely make it to being the "Club Anthem of the Year".

Tusshar Kapoor says "It is nothing like the traditional party and love songs. Deewana is a perfect combo of both. You can feel each beat and lyrics. Vishal Mishra has done an amazing job!"

Vishal Mishra says “We didn't want a loud party number or slow love song, we wanted to create something upbeat yet sensuous, also something that fits the plot of the film"

Maarrich is an upcoming thriller movie set to release on 9 Dec 2022. A Dhruv Lather directorial featuring Naseeruddin Shah, Tusshar Kapoor, Anita Hassanandani and Rahul Dev in lead.

Friday, 2 December 2022

'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ चा धमाल विनोदी ट्रेलर प्रदर्शित

 


'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ चा धमाल विनोदी ट्रेलर प्रदर्शित 

  

'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा धमाल विनोदी ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून यात म्हशीची म्हणजेच धोंडीची आणि रेड्याची म्हणजेच चंप्याची अनोखी प्रेमकहाणी पाहायला मिळत आहेत. ज्ञानेश भालेकर दिग्दर्शित या चित्रपटात भरत जाधव, वैभव मांगले, सायली पाटील, निखिल चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात धोंडी चंप्याच्या प्रेमकहाणीबरोबरच ओवी -आदित्यची प्रेमकहाणीही खुलताना दिसणार आहे. 


आपण एका मुला मुलीची प्रेम कथा तर नेहमीच बघत आलो आहोत, परंतु ही कहाणी एका रेडा आणि म्हशीची म्हणजे धोंडी आणि चंप्याची असून या प्रेमकहाणीत आणखी एक प्रेमकहाणी लपलेली आहे. ती म्हणजे सायली आणि निखिलची म्हणजेच ओवी आणि आदित्यची. या सगळ्यांच्या प्रेमाच्या आड येत आहेत, अंकुश आणि उमाजी, म्हणजे भरत जाधव आणि वैभव मांगले. हे दोघं एकाच गावचे असून दोघांमध्ये कसलं तरी शत्रुत्व असल्याचं दिसून येत आहे, त्यामुळे त्यांचे   खटके उडताना दिसत आहेत. आता धोंडी-चंप्या आणि ओवी-आदित्यची यांचे प्रेम यशस्वी होणार का, की शत्रुत्व जिंकणार हे जाणून घेण्यासाठी आपल्याला १६ डिसेंबरला सिनेमागृहात जाऊन चित्रपट बघावा लागेल.  


या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक ज्ञानेश भालेकर म्हणतात, "प्रेक्षकांना विनोदी चित्रपट आवडतात. ही एक धमाकेदार कहाणी आहे. निव्वळ मनोरंजन असलेला हा चित्रपट प्रेक्षकांनी आपल्या कुटुंबासोबत पाहावा असा आहे. धोंडी आणि चंप्याला एकत्र आणताना उडणारी धमाल यात पाहायला मिळणार असून प्रेमकथा आणि विनोद हे दोन्ही जॉनर अनुभवायला मिळतील. या चित्रपटाच्या निमित्ताने भरत जाधव, वैभव मांगले हे हास्यसम्राट एकत्र आले आहेत.'' 


रिलायन्स एंटरटेनमेंट प्रस्तुत सुनील जैन आणि कल्ट डिजिटल यांच्या सहकार्याने, फिफ्थ डायमेन्शन आणि कल्ट डिजिटल निर्मित 'धोंडी चंप्या - एक प्रेम कथा' हा चित्रपट प्रभाकर भोगले यांच्या कथेला प्रेरित होऊन बनवण्यात आला असून याची कथा, पटकथा, संवाद ज्ञानेश भालेकर आणि सागर केसरकर यांचे आहेत. सुनील जैन, आदित्य जोशी, व्हेनिसा रॉय, आदित्य शास्त्री निर्माते असून अमित अवस्थी, सुशांत वेंगुर्लेकर हे  सहनिर्माते आहेत. येत्या १६ डिसेंबर रोजी 'धोंडी चंप्या  प्रेक्षकांना चित्रपटगृहात भेटायला येणार आहेत.