Monday, 9 November 2020

‘डार्लिंग’च्या प्रेमात निखिल चव्हाण



हळूहळू एकीकडे संपूर्ण जग पूर्वपदावर येत आहे, दुसरीकडे भारतीय सिनेसृष्टीही प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नवनवे सिनेमे घेऊन सज्ज झाली आहे. मागील सात महिन्यांपासून सिनेचाहत्यांना ज्याची प्रतीक्षा होती, ती सिनेमागृहेही दिवाळीपूर्वा महाराष्ट्रात खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीसह सिनेप्रेमींमध्येही आनंदाचे वातावरण आहे. आता रसिकांना आपले आवडते कलाकार नव्या रूपात मोठया पडद्यावर भेटणार आहे. लागीर झालं जी या मराठी मालिकेद्वारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला निखिल चव्हाण एका नव्या रूपात आणि नव्या शैलीत आपल्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. निखिल सध्या ‘डार्लिंग’च्या प्रेमात आहे...

7 हॉर्स एंटरटेनमेंट प्रा. लि., व्ही. पतके फिल्म्स आणि कथाकार मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली बनलेल्या ‘डार्लिंग’ या आगामी सिनेमात निखिल एका नव्या रूपात दिसणार आहे. निर्माते अमित धुपे, अजय ठाकूर, व्ही.  जे. शलाका आणि निखील खजिनदार यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी केले आहे. समीर आशा पाटील यांनी यापूर्वा दिग्दर्शित केलेले सिनेमे पाहता ‘डार्लिंग’मध्येही काहीतरी नावीन्यपूर्ण पहायला मिळणार यात वाद नाही. त्यामुळेच अशा एका महत्त्वपूर्ण सिनेमात निखिलसारख्या हरहुन्नरी कलाकाराला आपले कलागुण दाखवण्याची संधी मिळणे हे लक्षवेधी ठरते. निखिलने नेहमीच मिळालेल्या संधीचे सोने करत आपल्या वाटयाला आलेल्या प्रत्येक व्यक्तिरेखेला अचूक न्याय दिला आहे. याच कारणामुळे आज तो घराघरात लोकप्रिय आहे. याचाच फायदा निखिलला ‘डार्लिंग’ या सिनेमातही होणार यात शंका नाही.

या सिनेमात निखिलची ‘डार्लिंग’ बनलीय रितिका श्रोत्री ...! असाच अंदाज सध्या तरी वांधला जात आहे. खरे काय ते सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच समजणार आहे. त्याशिवाय यात प्रथमेश परबही मुख्य भूमिकेत असल्याने उत्सुकता वाढली आहे. मराठी सिनेसृष्टीतील आजच्या घडीचे आघाडीचे तीन कलाकार ‘डार्लिंग’मध्ये एकत्र आल्याने सिनेमात काहीतरी अचाट पहायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ‘टकाटक’ या सिनेमाच्या यशानंतर रितिका आणि प्रथमेश ही जोडी पुन्हा ‘डार्लिंग’मध्ये एकत्र आल्याने या सिनेमात निखिलची व्यक्तिरेखा कोणत्या प्रकारची असणार याबाबत मराठी सिनेसृष्टीसोबतच सिनेरसिकांमध्येही कमालीची उत्सुकता आहे. 7 जानेवारी 2021 ला ‘डार्लिंग’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

No comments:

Post a Comment