घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्यांनी आपल्या उपजीविकेसाठी तासगांवहून मुंबई गाठली आणि मोटर मेकॅनिकचे काम करुन चार पैसे जोडयला सुरुवात केली.
याच दरम्यान त्यांना सेकंड हॅन्ड कार बाजाराच्या संधीची व्याप्ती लक्षात आली आणि त्यांनी सेकंड-हँड कार विक्रीसाठी एजंट म्हणून काम करण्यास सुरवात केली. कालांतराने गिरगाव येथे त्यांनी आपली “डेक्कन मोटर एजन्सी” स्थापन केली आणि मोटारींचा विश्वासार्ह डीलर म्हणून नावलौकिक मिळवला. १९३३ मध्ये आबासाहेबांनी इंग्लंडमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी इंग्लंडमध्ये सेकंड-हँड गाड्या स्वस्त होत्या. लंडनमध्ये त्यांनी केवळ सेकंड हँड गाड्यांचाच व्यापार केला नाही तर त्यांनी मंदीचा फायदा घेऊन व्यावसायिकांकडून कंपन्या खरेदी केल्या. या चालीमुळे त्यांना चांगला नफा मिळाला.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांना प्लास्टिक व्यवसायाबद्दल माहिती झाली आणि त्यांनी नेव्हीसाठी प्लास्टिकची बटणे बनवायला सुरवात केली आणि त्यानंतर त्यांचे प्लास्टिक व्यवसायातील साम्राज्य उभं राहिले आणि मग पाहता पाहता गरवारे नायलॉन, गरवारे प्लास्टिक, गरवारे वॉल रोप्स या कंपन्यांचा जन्म झाला.आज गरवारे साम्राज्यात जवळपास १०० कंपन्यांचा समावेश आहे. यातल्या अनेक कंपन्या भांडवल बाजारात नोंदणीकृत देखील आहेत.
आबासाहेब हे गांधीजींच्या विचारांवर चालणारे व्यावसायिक होते. त्यांनी शिक्षणासाठी भरीव मदत केली, पुण्यातील वासुदेव बळवंत फडके यांनी चालू केलेल्या एमईएस कॉलेजला दिलेल्या देणगीमुळे या कॉलेजचे नाव बदलून आबासाहेब गरवारे कॉलेज करण्यात आले.१९५९ साली आबासाहेब मुंबईचे शेरीफ बनले तर काही काळ ते स्टेट बँकेचे अध्यक्ष देखील होते.
प्लॅस्टिक व नायलॉन उद्योगाचे जनक, महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील एक प्रमुख शिल्पकार, पद्मभूषण, डि. लिट. (पुणे विद्यापीठ)
वाहन उद्योगापासून प्लास्टिक उद्योगा पर्यंत अगदी काळाच्या पुढे जाऊन द्रष्टेपणाने उद्योग क्षेत्रात भरारी घेणाऱ्या गरवारे उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आबासाहेब गरवारेंच्या स्मृतीस त्रिवार वंदन!¡!!!
© ® सौ.संध्या यादवाडकर.....
No comments:
Post a Comment