Wednesday, 13 January 2021

युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनीचे जम्मू-काश्मीर अँड लडाख फायनान्स कॉर्पोरेशनशी सामंजस्य

 

११ जानेवारी २०२१: युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने ७ जानेवारी २०२१ रोजी जम्मू अँड काश्मीर अँड लडाख फायनान्स कॉर्पोरेशनशी सामंजस्य करार केला. 
संपूर्ण जम्मू, काश्मीर खोरे आणि लडाख प्रदेशांत जम्मू अँड काश्मीर अँड लडाख फायनान्स कॉर्पोरेशनचे कार्यक्षेत्र विस्तारलेले आहे. विविध लघू व मध्यम उद्योगांना आर्थिक सहाय्य देऊन राज्यातील औद्योगिक वातावरणाला चालना देण्याच्या दिशेने हे वित्तीय महामंडळ अग्रगण्य भूमिका बजावते.
जम्मू अँड काश्मीर अँड लडाख फायनान्स कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार शावन यांनी युनिव्हर्सल सोम्पोबरोबरची ही भागीदारी उभयतांसाठी उपकारक ठरेल. आमच्या सन्मानित ग्राहकांना स्पर्धात्मक किंमतीवर सर्वसमावेशक विमा संरक्षण यामुळे मिळविता येईल. 
युनिव्हर्सल सोम्पोचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शरद माथूर यांनी प्रतिपादन केले की, विशेषत: एमएसएमई ग्राहक आणि इतर कर्जदारांसाठी सानुकूलित सामान्य विमा उपाययोजना आणि नाविन्यपूर्ण उत्पादने प्रस्तुत करण्याचा आपल्या कंपनीचा प्रयत्न असतो.

No comments:

Post a Comment