Tuesday 26 January 2021

चिंगारी शक्ती फाउंडेशन वसई विभागातर्फे आयोजित हळदी कुंकू समारंभ




मुंबई: महिला सबलीकरणाला आधार देणे हेच चिंगारी शक्ती फाउंडेशनचं प्रमुख धोरण आहे. चिंगारी शक्ती फाउंडेशन वसई विभागाच्या वतीनं ७२व्या गणतंत्र दिवसाच्या निमित्तानं वसईतील महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ राम मनोहर लोहिया नगर, उमेळा फाटा वसई  येथे पार पडला . हा कार्यक्रम वसईतील महिलांना प्रोत्साहन आणि त्यांच्यात महिला सबलीकरणाचा आत्मविश्वास वाढवावा ह्यासाठी आयोजित केला होता. 


मिसेस  पिंकी राजगडिया, फाउंडर, चिंगारी शक्ती फाउंडेशन, सिया राजगडिया, आम्ही चौघी सेवेस तत्पर च्या सौ. वैजंतीमाला मदने आणि गीता गायकवाड व  अन्य मान्यवर ह्या कार्यक्रमास उपस्थित होते. हा कार्यक्रम गोल अकादमी, उमेळा फाटा, वसई रोड येथे आयोजित केला होता. महिला सबलीकरण हा नेहमीच सर्वत्र एक चर्चेचा विषय आहे. मकरसंक्रातीच्या ह्या महिन्यात ह्या कार्यक्रमाला १०० हुन अधिक महिलांनी पिंकी राजगडियांना भेटण्यासाठी आणि त्यांचा महिला सबलीकरणाचा प्रवास जाणून घेण्यासाठी उपस्तिथी लावली. 


ग्रामीण भागात महिलांनसाठी काम करणे हेच चिंगारी शक्ती फाउंडेशन चे प्राथमिक धोरण आहे. आम्ही महिलांना आग्रह करतो कि त्यांनी पुढे येऊन चिंगारी शक्ती फाउंडेशन बरोबर जोडले जावे,. आणि महिला सबलीकरणास आम्हास मदत करावी, त्याच बरोबर त्यांचे जीवन आणि परिवारास चांगले  आयुष्य लाभेल ह्याची देखील काळजी घ्यावी. 


ह्या कार्यक्रमास हळदी कुंकू चे वाण देताना त्यांनी उपस्थित असलेली लहान मुलांसाठी खाऊ चा देखील वाटप केला. चिंगारी शक्ती फाउंडेशनच्या वतीनं आम्हास वेळोवेळी मदत करणारे आम्ही चौघी सेवेस तत्पर च्या गीता गायकवाड, अरुण धायवत आणि संध्या गायकवाड ह्यांचे देखील आभार मानले.

No comments:

Post a Comment