Thursday, 18 February 2021

"मला विविध भाषा आणि लोकांपर्यंत पोहोचायला मिळते आहे यासाठी मी स्वत:ला नशीबवान समजते." आगामी चित्रपट ‘लायगर’ बाबत अनन्या पांडे ने व्यक्त केल्या भावना.

 


"मला विविध भाषा आणि लोकांपर्यंत पोहोचायला मिळते आहे यासाठी मी स्वत:ला नशीबवान समजते." आगामी चित्रपट ‘लायगर’ बाबत अनन्या पांडे ने व्यक्त केल्या भावना.  


‘लायगर’चित्रपटातून अनन्या पांडे चक्क एक दोन नव्हे तर तमिळ, तेलगु मल्याळम आणि कन्नडा अशा चार महत्त्वाच्या  चित्रपट सृष्टीत प्रवेश करत आहे. एका युवा अभिनेत्रीसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. पैन-इंडिया चित्रपट 'लायगर’ मध्ये अनन्या पांडे घातक शस्त्र आणि धमाकेदार एक्शनमध्ये दिसणार आहे.  

यावर आनंद व्यक्त करताना अनन्या पांडे म्हणते की, "नक्कीच! ही माझ्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आणि मी या साठी अतिशय उत्साहित आहे. मी दोन वर्षांपूर्वी हिंदी चित्रपट सृष्टीतून सुरुवात केली होती आणि ‘लायगर’च्या निमित्ताने मी इतर चार महत्त्वाच्या चित्रपट सृष्टीत प्रवेश करणार आहे. ही चौपट आनंदाची गोष्ट आहे. त्यासोबतच चौपट धाकधुक देखील आहे जणू पोटात फुलपाखरे उडत असल्याची जाणीव होते आहे. मला वाटते की जग लहान झाले आहे. आपला भारत एक असा देश आहे ज्यामध्ये इतक्या संस्कृति आणि खूप सारे प्रेम सामावले आहे विविध भाषा आहेत आणि सध्या ओटीटीमुळे खूप साऱ्या संधी निर्माण होत आहेत. एक ठराविक अशी सीमाच नाहीये. ‘लायगर’च्या निमित्ताने मला विविध भाषा आणि लोकांपर्यंत पोहोचायला मिळते आहे यासाठी मी स्वत:ला नशीबवान समजते."

अनन्याला 'लायगर'च्या प्रदर्शनाची घोषणा होण्यापूर्वी आपण तेलुगु मध्ये संवाद साधताना पहिले होते. अनन्या और विजय देवरकोंडा एक ताजी जोड़ी यानिमिताने भेटीला येते आहे आणि हे म्हणणे नक्कीच योग्य ठरेल की दोघांचाही व्यापक फैन बेस आणि लोकप्रियता पाहता ते या शो सोबत चर्चेत आहेत. या दोघांनाही आपण नेहमीच एकमेकांचे कौतुक करताना पाहिले आहे.

पैन-इंडिया प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातील सर्वात युवा अभिनेत्रीचा हा आगामी चित्रपट 'लायगर' पुरी जगन्नाथ यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत आहे तसेच, शकुन बत्राच्या दिग्दर्शनात तयार होणाऱ्या चित्रपटात अनन्या दीपिका पादुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी सोबत दिसणार आहे.

No comments:

Post a Comment