कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्रच वाढला आहे.कोरोनाने आपल्या देशालाच नव्हे तर संपूर्ण जगालाच वेठीस धरले आहे. मार्च 2020 मध्ये याची सुरवात झाली होती.आणि मध्यन तरीच्या काळामध्ये कोरोनवरती नियंत्रण आले होते.परंतु चालू वर्षांमध्ये कोरोना पुन्हा डोके वर काढू लागला आहे. या कोरोना मूळे अनेक लोकांचे बळी गेले आहेत.लोक ही निष्काळजीपणे जगत होते.जीवन पूर्वपदावर आल्यामुळे कोरोना संपला की काय अस लोकांना वाटू लागले .म्हणून आम्ही लोकांना जनजागृती करण्यासाठी त्यांना मास्क चा वापर करा,सॅनिटाईझर चा वापर करा .सुरक्षित अंतर ठेवा याप्रकारचे पोस्टर बनवून वसई रेल्वे स्टेशन वरती उभे राहून जनजागृती केली.या कार्यक्रमा साठी वसई पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.सचिन शिवाजी इंगवले उपस्थित होते.तसेच रेल्वे पोलीसअधिकारी व पोलीस कर्मचारी स्नेहा कदम,योगिता भिसे,श्रद्धा नाईक,जयश्री निदानकर,अनिल गुजर, तसेच महिला दक्षता समिती च्या गीता गायकवाड, संगीता सरढाना, तेजनदर राईत व इतर मान्यवर उपस्थित होते
No comments:
Post a Comment