--इंडियन ओव्हरसिज बँकेचे तरुणाईसाठी 'आयओबी ट्रेंडी' खाते
मुंबई: इंडियन ओव्हरसिज बँकेने २१ ते ३८ वयवर्गातील तरुण वर्गाच्या बँकिंगच्या गरजा लक्षात ठेवून 'आयओबी ट्रेंडी' बचत खाते आणले आहे. या खात्यासोबत ऑनलाइन अर्ज सुविधा, तिमाहीत सरासरी १ लाख रुपये बॅलन्स मेंटेन करण्याऱ्या खातेधारकांना मृत्यूपश्चात ५ लाखांचे अपघाती विमा कवच, कमाल ५० चेकची मर्यादा असलेले मोफत चेकबुक, मोफत पैसे पाठवण्याची सुविधा (NEFT/RTGS/IMPS), डेबिट-क्रेडिटचे मोफत एसएमस अलर्ट, ECH/NACH मँडेटची मोफत नोंदणी, स्टँडिंग इन्स्ट्रक्शनची मोफत नोंदणी, महिन्याला नोंदणी केलेल्या इमेलवर खात्याचे स्टेटमेंट, ऑटो स्वीप सुविधा, मोबाइल-इंटरनेट बँकिंग, व्हिडिओ केवायसी, ऑनलाइन खाते उघडण्याची सुविधा, इत्यादी सेवा-सुविधा उपलब्ध होणार आहेत.
No comments:
Post a Comment