Tuesday, 18 May 2021

दक्षिणेकडील सिमेंट क्षेत्रातील मातब्बर पेन्नाचा रु 1550 कोटींचा आयपीओ


 

15 मे, 2021: हैदराबाद येथील पेन्ना सिमेंट क्षेत्रात चांगली पकड असलेला बिनीचा शिलेदार मानला जातो. भारतातील दक्षिण तसेच पश्चिमेकडील राज्यांमध्ये ब्रँडचे बळकट अस्तित्व आहे. या कंपनीने इक्विटी शेअरचा रु 1300 कोटींचा निधी उभारण्याचे निश्चित केले असून प्रवर्तक विक्रेते समभागधारकांकडून रु 250 कोटींचा, असा एकंदर रु 1550 कोटींचा प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव (आयपीओ) विक्रीसाठी उपलब्ध राहील.

 

या निधीतून उभ्या राहणाऱ्या रकमेचा विनियोग रु 550 कोटींची कंपनीची काही देणी चुकती करण्याकरिता, त्याशिवाय त्यांच्या केपी लाईन II प्रोजेक्टकरिता भांडवली खर्च आवश्यकतेकरिता रु 105 कोटी, रु 80 कोटी तलारीचेरूवू येथे कच्चे ग्राइंडिंग आणि सिमेंट मिल अद्ययावत करण्याकरिता तसेच रु 110 कोटी आणि रु 130 कोटी तलारीचेरुवू आणि तंदूर येथे वेस्ट हिट रिकव्हरी प्लांटकरिता व सर्वसाधारण कॉर्पोरेट कारणासाठी वापरण्यात येईल.  

 

या कंपनीची स्थापना 1991 दरम्यान करण्यात आली तर कामकाजाची सुरुवात 1994 मध्ये झाली. पीसीआयएलच्या वतीने उपलब्ध सिमेंटचे प्रमुख प्रकार जसे की, ऑर्डीनरी पोर्टलँड सिमेंट, पोर्टलँड पोज्झोलाना सिमेंट आणि पोर्टलँड स्लँग सिमेंटचा समावेश आहे. ही भारतामधील सर्वात मोठी खासगी मालकीची सिमेंट कंपनी आहे. तिची कामकाज आंध्र प्रदेश, तेलंगण आणि महाराष्ट्रात असलेल्या 4 आयएसओ प्रमाणित एकीकृत निर्मिती सुविधाकेंद्रे आणि दोन ग्राईंडिंग युनिटमधून चालते. ज्यांची क्षमता 31 मार्च 2021 रोजी एकंदर 10 एमएमटीपीए इतकी आहे. वित्तीय वर्ष 2024 पर्यंत ही क्षमता 16.5 एमएमटीपीएपर्यंत होईल. 

 

मे 2019 दरम्यान कंपनीने श्रीलंकन सिमेंट कंपनी सिंघा सिमेंटचे संपादन केले, या कंपनीचे पॅकिंग टर्मिनल कोलंबो येथे आहे. अगदी स्थापनेपासून कंपनीचे लक्ष्य बंदर-आधारित वितरण रणनीतीवर आहे. त्याशिवाय, भारतातील एक सर्वात मोठे बंदर-आधारीत टर्मिनल कृष्णापट्टणम येथे कार्यान्वित आहे. याठिकाणी स्वयंचलित पद्धतीने जहाजात माल भरला जातो. तसेच पॅकिंग टर्मिनल कोचीन, गोपाळपूर आणि कराईकल बंदरात उपलब्ध आहे.

 

2021च्या वित्तीय वर्षात कामकाजातून कंपनीची झालेली महसूल उलाढाल, ईबीआयडीए आणि वर्षातील नफा अनुक्रमे ₹ 2,476.39 कोटी, ₹ 479.84 कोटी आणि ₹ 152.07 कोटी याप्रमाणे नोंदवण्यात आला.

 

या इश्यूकरिता नियुक्त बँकरमध्ये एडेलवैईस फायनान्शियल सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, एक्सिस कॅपिटल लिमिटेड, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, जेएम फायनान्शियल लिमिटेड आणि यस सिक्युरिटीज (इंडिया) लिमिटेड’चा समावेश आहे.

 

भारतात पायाभूत गुंतवणुका, घरांची पुन्हा वाढलेली मागणी तसेच विविध सरकारी योजनांमुळे देशातील सिमेंट उद्योग वित्तीय वर्ष 21 आणि वित्तीय वर्ष 26 दरम्यान 6-7% सीएजीआरने वाढण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment