Thursday 27 May 2021

ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँकेच्‍या कार्योत्‍तर नफ्यात 28.07% वाढ

 



मुंबई – केरळस्थित एक सामाजिक बँक, ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँकेने 31 मार्च, 2021 रोजी संपलेल्या वर्षाच्या कार्योत्‍तर नफ्यात 28.07% वाढ नोंदवली आहे. वर्षभरात अनेक आव्हानांचा सामना करत कार्योत्‍तर नफा 324.70 कोटी वरुन 415.84 कोटींवर पोहोचला. 31 मार्च 2020 रोजी एकूण ठेवी रु.7028 कोटी होत्‍या व त्‍या मध्‍ये 28.04% ची वाढ झाली असून 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या वर्षासाठी एकूण ठेवी रु.8999 कोटी होत्‍या. एकूण CASA (कासा) रु. 960 कोटीमध्‍ये मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 81.99% ची वाढ होवून रक्‍कम रु.1748 कोटी इतकी झाली आहे. ठेवींमधील कासाचे प्रमाणही 31 मार्च 2020 रोजी संपलेल्या वर्षाच्या 13.55% वरून 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या वर्षासाठी 19.42% इतका लक्षणीय सुधारले आहे.

सर्वसाधारण वर्गात एक विवेकी उपाय म्हणून बँकेने आरबीआयने घालून दिलेल्‍या नियमापेक्षा जास्‍त तरतुद केली आहे;  दिनांक 31 मार्च 2021 रोजी ही तरतुद रु. 91 कोटी रुपये आहे. त्यानुसार 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा बँकेचा निव्वळ नफा रु. 105.40 ​​कोटी असूनगेल्या वर्षी निव्‍वळ नफा रक्‍कम रु. 190.39 कोटी होती.  

ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी के. पॉल थॉमस यांनी निकालावर भाष्य करताना सांगितले की, “सर्व देशभर महामारीची परिस्थितीमुळे बँकेपुढे अशी आव्हाने असूनही बँकेचा कार्योत्‍तर नफा आणि एकूण व्यवसायात सुधारणा झाली आहे. आमच्या ग्राहकांच्या पाठिंब्यामुळे आणि त्‍यांचा आमच्‍या वरील विश्वासामुळे आम्ही देशभर आपली उपस्थिती वाढवू शकलो. पीएटीमधील कपात ही मुख्यत: आर्थिक वर्षातील उच्च तरतुदींमुळे झाली.

ग्रॉस अ‍ॅडव्हान्सेस 27.37 टक्क्यांनी वाढून रु. 6606 कोटी ते रु. 8415 कोटी झाला आहे व बँकेचा गतवर्षीचा व्‍यवसाय रु. 13,846 मध्‍ये 25.85 टक्क्यांनी वाढून 31 मार्च, 2021 रोजी रु. 17,425/- झाला आहे.

एका वर्षात बँकेने खाजगी प्लेसमेंटद्वारे टायर 1 भांडवलाची रक्कम रु .162.59 कोटी केली आहे. चालू वर्षाच्या नफ्यासह सीआरआरमध्ये 20 बीपीएसने 24.03% वरून 31 मार्च 2020 पर्यंतची वाढ झाली असून व्यवसायात वाढ असूनही ती 31 मार्च 2021 पर्यंत 24.23% झाली आहे.

कोविड महामारीमुळे प्रत्‍यक्ष कार्य पातळीवर संकलन कार्यकुशलतेवर प्रतिकूल परिणाम झाला परिणामी एकूण अनुत्‍पादक मालमत्‍ता प्रमाण (एनपीए) पातळी 6.70% आणि निव्वळ एनपीए 3.88% ने वाढली आहे. 31 मार्च 2020 रोजी संपलेल्या वर्षासाठी एकूण कासा रुपये 960 कोटी होता, त्‍यामध्‍ये 81.99% ने सुधारणा होवून दिनांक 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या वर्षासाठी ही रक्‍कम रु. 1748 कोटीपर्यंत पोहचली आहे.  ठेवींमधील 'सीएएसए' चे प्रमाण देखील 31 मार्च 2020 रोजी संपलेल्या वर्षाच्या 13.55% वरून 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या वर्षाच्या 19.42% र्इतकी लक्षणीय सुधारणा झाली आहे.

सध्या ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँकेचे देशातील 19 राज्‍ये आणि २ केंद्रशासित प्रदेशात अस्तित्‍व आहे. 31 मार्च 2021 पर्यंत बँक 550 शाखांमार्फत 43 लाखाहून अधिक ग्राहकांना सेवा देत आहे.

 


No comments:

Post a Comment