Thursday, 13 May 2021

कोरोनाच्या या संकटकाळात केलेल्या मदतीसाठी पुणे पोलिसांनी मानले जॅकलीन फर्नांडीसचे आभार!

 


 

सद्या पसरलेल्या कोरोनाच्या या संकट काळात अनेकजण इतरांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. यामध्ये जॅकलीन फर्नांडीसचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल, जिने या संकट काळात मदत करण्याचा आणि समाजाच्या तळागाळात मदत पोहोचवण्यासाठी आपला हात पुढे केला आणि या मदतीसाठी पुणे पोलिसांनी जॅकलीन फर्नांडीसचे आभार मानले आहेत.

 

"Pune Police thanks @Asli_Jacqueline for her generous contribution towards the Pune Police Foundation. Your kind gesture will go a long way for our team that continues to perform their duties on the frontline in this pandemic.

#WeAreTogether

@CPPuneCity

@Asli_Jacqueline"

 

https://twitter.com/PuneCityPolice/status/1392405516228337669?s=19

 

जॅकलीनने आपल्या सोशल मीडिया हँडलवर मेहनती पुणे पुलिस दलासाठी लिहिले की,

 

"I salute @PuneCityPolice who have been tirelessly working on the frontline and contributing selflessly in our fight with Covid 19. We are in this together 💪🏻"

 

https://twitter.com/Asli_Jacqueline/status/1392437543887462400?s=08

 

जॅकलीन फर्नांडीसने नुकतीच 'यू ओनली लिव वन्स' (वायओएलओ) फाउंडेशनची सुरुवात केली असून ज्याद्वारे अनेक स्वयंसेवी संस्थांसोबत मिळून समाजाच्या तळागाळात पोहोचून काम करण्यात येणार आहे. संस्थेच्या माध्यमातून 1 लाख भोजन, मुंबई पुलिस दलासाठी मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करणार असून या कठीण काळात भटक्या जनावरांच्या सहाय्यासाठी पुढाकार घेतला आहे.

 

जॅकलीनला असे वाटते की समाजासाठी काही चांगलं करण्याचा हा प्रयत्न असून गरजू लोकांच्या मदतीसाठी ती सदैव तयार असते. एवढेच नव्हे, तर मागील वर्षी महाराष्ट्रातील पथराडी आणि सकुर गावातील गावकऱ्यांच्या पोषणासाठी 'एक्शन अगेंस्ट हंगर फाउंडेशनसोबत सहयोग केला होता. 

No comments:

Post a Comment