Monday, 7 June 2021

हरिओम’तर्फे कांदिवलीत महारक्तदान शिबिर





  सिंह नरवीर तानाजी प्रतिष्ठान व ‘हरिओम’ चित्रपटाच्या टीमतर्फे कांदिवली पश्चिम येथील प्रभाग क्रमांक ३२ येथे नुकतेच महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी चित्रपटातील कलाकारांनी सर्वांना रक्तदानाचे महत्त्व पटवून देत रक्तदान करण्याचे आवाहन केले. 

        नगरसेविका  गीता भंडारी यांच्या हस्ते  शिवरायांच्या मुर्तीस पुष्पहार घालून  रक्तदान कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.  या वेळी सिंह नरवीर तानाजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष, हरिओम चित्रपटाचे निर्माते, अभिनेते हरीओम घाडगे यांनी विठ्ठल चरणी श्रीफळ वाहून प्रथम रक्तदान केले.

     कांदिवली पश्चिम येथील श्री विठ्ठल मंदिर छत्रपती शिवाजी राजे कॉम्प्लेक्स, म्हाडा येथे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाचे सर्व नियम पाळून रक्तदान शिबिरास तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

हरिओम चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष नेवाळकर, अभिनेता गौरव कदम यांनी रक्तदान शिबिरास हजेरी लावली होती. नगरसेविका गीता भंडारी यांनी हरीओम घाडगे यांच्या कामाचे कौतुक करून  हरिओम हे फक्त चित्रपटातच नाही तर खऱ्या आयुष्यातही हिरोचे काम करत असल्याचे सांगितले. तर शिवसेना शाखाप्रमुख संदीप कोळी यांनी रक्तदान शिबिराच्या नियोजनाबाबत हरिओम घाडगे यांचे कौतुक करत त्यांच्या ‘हरिओम’ या आगामी चित्रपटास शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment