Wednesday 15 September 2021

फार्मईझी २००+ इंजिनीअर्सची भरती करणार आणि हैदराबाद, पुणे आणि एनसीआर येथे नवी विकास केंद्रे लाँच करणार

 फार्मईझी २००+ इंजिनीअर्सची भरती करणार आणि हैदराबाद, पुणे आणि एनसीआर येथे नवी विकास केंद्रे लाँच करणार

 

मुंबई, १३ सप्टेंबर २०२१ : फार्मईझी या भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल हेल्थकेअर ब्रँडतर्फे त्यांच्या हैदराबाद, पुणे आणि एनसीआर प्रदेशातील आगामी विकास केंद्रांमध्ये २००+ इंजिनीअर्सची भरती करण्यात येणार आहे. बाह्यरुग्ण आरोग्यसेवा क्षेत्रातील आव्हानांवर उपाययोजना करून आरोग्यसेवा क्षेत्रातील ही दरी बुजविण्यासाठी फार्मईझीतर्फे मोठी इकोसिस्टिम तयार करण्यात येत आहे. तंत्रज्ञान हा यास चालना देणारा मुख्य घटक असल्याने विविध तंत्रज्ञान कार्यक्षमतांमध्ये आपले मनुष्यबळ बळकट करण्याची फार्मईझीची योजना आहे.

ग्राहकांच्या मागण्या अधिक कार्यक्षमतेने पूर्ण करण्यासाठी धोरणांना गती देण्यासाठी सध्या सुरू असलेल्या महामारीने तंत्रज्ञानाधारित कंपन्यांना प्रवृत्त केले असतानाच फार्मईझीची विकास केंद्रे उभारण्याची योजना आकार घेत आहे. परिणामी, संपूर्ण क्षेत्रामध्येच तंत्रज्ञान कौशल्याची मागणी वाढली आहे. फार्मईझीकडे सध्या ६,१०० कर्मचाऱ्यांचे भक्कम मनुष्यबळ आहे.

फार्मईझीचे सीटीओ अभिनव यजुर्वेदी म्हणतात, "ही नवी सुविधा म्हणजे विकास आणि नावीन्यतेला चालना देण्यारे महत्त्वपूर्ण केंद्र असेल. नवी केंद्रे सुरू करण्यापूर्वी लवचिक वर्क मॉडेलसह देशातील विविध लोकेशन्समध्ये प्रोडक्ट व इंजिनीअरिंग शाखेतील जिज्ञासू टेक्नोलॉजी प्रोफेशनल्सना फार्मईझीतर्फे संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

आपल्या अनुभवी तज्ज्ञांच्या मदतीने हे केंद्र आपले कामकाज सुरू करेल, ज्यांच्या हाती प्रगतीची धुरा असेल. ही नवीन विकास केंद्रे हायब्रीड आणि लवचिक कार्यपद्धतीनुसार उपलब्ध असतील, जी गुणवान टेक-टॅलेंटची निवड करण्यासाठी शेअर्ड वर्किंग स्पेसेमधून काम करतील. आरोग्यसेवा यंत्रणेची गुंतागुंत हाताळताना इंजिनीअरिंग टॅलेंटला प्रतिबद्ध करताना, हे उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी टाकलेले एक पाऊल आहे. नव्या गुणवंतांमुळे फार्मईझीसाठी मुख्य टेक्नोलॉजी प्लॅटफॉर्म मजबूत होईल, त्याचप्रमाणे भारतातील वंचित आरोग्यसेवा क्षेत्रात नावीन्यपूर्णता आणि चाकोरीबाहेरील उपक्रमांचे नेतृत्व करेल अशी अपेक्षा आहे.

फार्मईझीचे सहसंस्थापक हार्दिक देढिया म्हणतात, "आरोग्यसेवा सुलभ करणे आणि जीवनावर सकारात्मक परिणाम घडविणे हे आमचे मिशन पूर्ण करण्यासाठी आधुनिक व डिजिटल-फर्स्ट इंडियासाठी आरोग्यसेवा इकोसिस्टिम उभारण्यावर आमच्या टीमचे लक्ष केंद्रीत आहे. आम्ही असमान्य गुणवत्ता आणि प्रेरित व्यक्तींच्या शोधात आहोत, जे या मिशनसाठी प्रतिबद्ध आहेत. या इकोसिस्टिममधून बांधणी करणे ही एखाद्या पिढीतून एकदाच मिळणारी संधी असून लाखो भारतीयांना लाभ देणाऱ्या आणि त्यांच्या आरोग्यांकात (हेल्थ क्वोशंट) सुधारणा करता येणार आहे. व्याप्ती, गुंतागुंत आणि गोपनीयता यांचे व्यवस्थापन करतानाच सिस्टिम्सचे डिझायनिंग करताना सुरक्षा, सुरक्षितता आणि युझर फ्रेंडली ठेवणे या आव्हानांना आमच्या टीमला दररोज सामोरे जावे लागते. तुम्ही वेगवान, डेटावर आधारित आणि परिणामाभिमुख कंपनीत काम करण्याची संधी शोधत असाल तर फार्मईझी ही योग्य जागा आहे."

No comments:

Post a Comment