यंदाचा नवरात्रोत्सव होणार अधिकच चैतन्यमय
दुर्गा देवी व नवरात्रोत्सव स्त्री शक्तीचा एक जागरच मानला जातो. देवीची आराधना करण्यासाठी मंत्रांचे उच्चारण केले असता पावित्र्याची आणि मांगल्याची अनुभूती होते. मंत्रोच्चाराने मन प्रसन्न होते. 'सुमन एन्टरटेन्मेंट आणि मिडिया प्रा. लि', प्रस्तुत 'श्री सुक्तम' हा मंगलमय मंत्र व्हीडीयो रूपात भक्तांच्या भेटीला आला आहे. विविध मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री उमा पेंढारकर 'श्री सुक्तम' हा मंत्र म्हणत देवीची उपासना करताना दिसत आहे. या मंत्राचे वैशिष्टय म्हणजे एरव्ही देवीचा फोटो आणि बाजुला मंत्र सुरू असतो मात्र या मंत्राला एखाद्या गाण्यासारखे व्हिज्युअल्स देण्यात आले आहेत. अशा प्रकारचा प्रयोग पहिल्यांदाच करण्यात आला आहे. या मंत्राचे निर्माता केदार जोशी असून दिग्दर्शक संकेत सावंत आहेत. भारतीय पुराणात मंत्र परंपरा हजारो वर्षांपूर्वीची आहे. 'श्री सुक्तम' या मंत्राला चिनार-महेश यांनी संगीत दिले असून आनंदी जोशी हिचा सुमधूर आवाज लाभला आहे. मंत्रांचे उच्चारण केल्याने तयार होणाऱ्या ध्वनी लहरींमुळे आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. लवकरच सगळीकडे देवीचे आगमन होणार असून तिच्या आगमनाने चैतन्यमय झालेले वातावरण 'श्री सुक्तम' च्या मंत्रोच्चाराने अधिकच उत्साहवर्धक होणार आहे.
No comments:
Post a Comment