Wednesday 22 December 2021

मुंबईच्या पीपल्स आर्टस सेंटर द्वारे "महाराष्ट्राची गिरिशिखरे" हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. येत्या २६ डिसेंबर २०२१ रोजी मुंबईत रंगशारदा नाट्यमंदिरात होणाऱ्या एका भव्य दिव्य सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल श्री.भगतसिंग कोश्यारी व राज्याचे गृहमंत्री श्री.दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरीत केल्या जाणार आहे.






अमोल पालेकर, सुनील गावसकर, सुरेश वाडकर, उषा मंगेशकर यांच्यासह ५० सेलिब्रेटींना महाराष्ट्राची  गिरिशिखरे   पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे


मुंबईच्या पीपल्स आर्टस सेंटर द्वारे "महाराष्ट्राची गिरिशिखरे" हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. येत्या २६ डिसेंबर २०२१ रोजी मुंबईत रंगशारदा नाट्यमंदिरात होणाऱ्या एका भव्य दिव्य सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल श्री.भगतसिंग कोश्यारी व राज्याचे गृहमंत्री श्री.दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरीत केल्या जाणार आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी एकदा म्हणाले होते की, 'महाराष्ट्र हे उदात्त कार्यांसाठी समर्पित असून कार्यकर्ते मधमाशांच्या पोळ्यासारखे आहेत.' अशाच महाराष्ट्रातील सर्जनशील व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी मुंबईत महाराष्ट्राची गिरीशिखरे पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.

 महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेस १ मे २०२० रोजी ६० वर्षे पूर्ण झाली. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा हीरक महोत्सवी वर्षाचा सोहळा १ मे २०२० रोजी नियोजित होता. परंतु कोव्हीड प्रादुर्भावामुळे व शासनाच्या निर्बंधा मुळे हा सोहळा आता २६ डिसेंबर रोजी दुपारी २.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रात महत्वाची कामगिरी बजावणाऱ्या ५० व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये श्री.शरद पवार (राजकारण), डॉ.जयंत नारळीकर (विज्ञान), कु.उषा मंगेशकर (पार्श्व गायिका), श्री.सुरेश वाडकर (पार्श्व गायक), डॉ. भालचंद्र नेमाडे (साहित्य), श्री.सुनील गावस्कर (क्रिकेट), डॉ. मीरा बोरवणकर (नोकरशाही), श्री.राजीव खांडेकर (इलेक्ट्रॉनिक मध्यम), सौ.तेजस्विनी सावंत (क्रीडा), डॉ. उदय माहोरकर (वैद्यकीय सेवा), श्री.अमोल पालेकर (अभिनेता), श्रीमती रोहिणी हट्टंगडी (अभिनेत्री), श्री.भीमराव पांचाळे (मराठी गझल गायक), डॉ.विश्वनाथ कराड (शैषणिक). डॉ.जब्बार पटेल (नाटक व चित्रपट), श्री.अशोक पत्की (संगीत दिग्दर्शक), श्री.कुमार केतकर (पत्रकार), डॉ.दीपक शिकारपूर (माहिती तंत्रज्ञान), सिंधुताई सपकाळ (समाजकार्य), श्री.अनंत कुलकर्णी (अभियंता), श्री.हनमंतराव गायकवाड (आतिथ्य क्षेत्र), श्री.उमेश झिरपे (पर्वतारोहण), श्री.प्रवीण ठिपसे (बुद्धीबळ), विश्वासराव मांडलिक (योग गुरु), श्री.दिनकरराव पाटील (अन्न प्रक्रिया), श्री.किशोर रिठे (पर्यावरण), श्री.विजय शिर्के (बांधकाम व्यवसायी), श्रीमती विद्या माने (उद्योग), श्री.शंकर पी. शिंदे (लॉजिस्टिक), श्री.भाऊराव दरेकर (शेती), डॉ.भगवान कापसे (कृषी तज्ञ), डॉ.विलास उंबरकर (पशु संवर्धन), रणजीत भटकर (फुटबॉलपटू), श्री.शशिकांत गरवारे (निर्यात), श्री.संतोष पाटील (कापड निर्यात), श्री. सुनील पाठारे (व्यापार), सौ.अनिता डोंगरे (फॅशन डिझाईन), सौ. आशा खाडिलकर (शास्त्रीय गायन), श्री. माधव पवार (बहुवाद्य वादक), श्री. हसन पाटेवाडीकर (लोकनाट्य), श्री.गोविंद पटवर्धन (सनदी लेखापाल), श्री.शशी प्रभू (आर्किटेक्ट), श्री.वीरेंद्र म्हैसकर (पायाभूत सुविधा), श्री.विश्वनाथ पवार (सहकारी क्षेत्र), श्री.प्रभाकर कोलते (चित्रकार), श्री.मधुकरराव नेराळे (सांस्कृतिक कला), श्री. राहुल सहारे (फलोत्पादन), श्री.भगवान रामपुरे (शिल्पकार), श्री.बाळासाहेब कालशेट्टी (माल वाहतूक), श्री.अभिजित पाटील (पर्यटन) यांचा समावेश आहे.

या शुभप्रसंगी विविध क्षेत्रातील पन्नास नामवंतांना 'महाराष्ट्राची गिरिशिखरम' हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पन्नास व्यक्तिमत्त्व यापैकी वीसहून अधिक व्यक्तींना भारत सरकारने नागरी पुरस्काराने सन्मानित केले.

No comments:

Post a Comment