Sunday, 31 July 2022

'आय हेट यू डॅडी' 'दगडी चाळ २' मध्ये 'डॅडी आणि सूर्या' मध्ये नेमकं काय झालं?

 



'आय हेट यू डॅडी'


'दगडी चाळ २' मध्ये 'डॅडी आणि सूर्या' मध्ये नेमकं काय झालं?  


मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित, 

चंद्रकांत कणसे दिग्दर्शित 'दगडी चाळ ' हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एखाद्या वादळासारखा आला आणि त्यानंतर 'चुकीला माफी नाही' असे म्हणणाऱ्या अरुण गुलाब गवळी ऊर्फ ‘डॅडीं'ची पुन्हा सर्वत्र चर्चा सुरू झाली. 

'दगडी चाळ १' ला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिल्यानंतर आता या चित्रपटाचे दुसरे पर्व १८ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे. या चित्रपटाचे नवं पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले असून यात पुन्हा एकदा अंकुश चौधरी आपल्याला सूर्याच्या भूमिकेत दिसतोय. ‘डॅडी’ आणि सूर्याचे नाते आपण याआधीच पाहिले. 'डॅडीं'च्या गुंडांसोबत होणाऱ्या भांडणानंतर सूर्या-डॅडींची होणारी मांडवली, 'डोकॅलिटी' वापरून काम करणारा 'सूर्या' डॅडींचा उजवा हात बनला, त्यात सूर्याचा कौटुंबिक ताण, हे सगळं आपण यापूर्वी पाहिलं. 

 

मात्र यावेळी 'आय हेट यू डॅडी' असे म्हणत, सूर्याच्या चेहऱ्यावर प्रचंड राग दिसतोय, आता तो डॅडींचा तिरस्कार का करतोय?, याचे उत्तर 'दगडी चाळ २' पाहिल्यावरच मिळेल. 


या चित्रपटात मकरंद देशपांडे 'डॅडीं'ची भूमिका साकारत आहेत.

Tuesday, 26 July 2022

टाटा संपन्नचे ड्राय फ्रुट्स कॅटेगरी मध्ये पदार्पण परिपूर्ण पोषण देणारे अन्नपदार्थ बाजारपेठेत उपलब्ध करवून देण्यासाठी टाटा संपन्न आग्रही

 


टाटा संपन्नचे ड्राय फ्रुट्स कॅटेगरी मध्ये पदार्पण

परिपूर्ण पोषण देणारे अन्नपदार्थ बाजारपेठेत उपलब्ध करवून देण्यासाठी टाटा संपन्न आग्रही


मुंबई, २६ जुलै २०२२:- भारतातील एक सर्वात लोकप्रिय एफएमसीजी ब्रँड टाटा संपन्नने ड्राय फ्रुट्स कॅटेगरीमध्ये अतिशय दमदार पदार्पण केले आहे. एरव्ही काहीशा विस्कळीत स्वरूपाच्या या उद्योगक्षेत्रात टाटा संपन्न ब्रँड सातत्याने विस्तार करत असून त्यांना भरपूर लोकप्रियता मिळत आहे. लवकरच हा ब्रँड देशभरातील खूप मोठ्या रिटेल नेटवर्कमध्ये उपलब्ध होईल. परिपूर्ण पोषण देणारे अन्नपदार्थ बाजारपेठेत उपलब्ध करवून देण्यासाठी सुरु करण्यात आलेला ब्रँड टाटा संपन्नने उत्तरोत्तर प्रगतीच्या दिशेने वाटचालीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठत गुणवत्तेमध्ये समृद्ध ड्राय फ्रुट्स सादर केले आहेत. टाटा संपन्नच्या नट्स अँड ड्राय फ्रुट्स रेन्जमध्ये उत्तम दर्जाचे काजू, मनुका, बदाम आणि पिस्ते आहेत. सर्वोत्तम दर्जाचे, उत्कृष्ट चवीचे सुके मेवे मिळावेत या ग्राहकांच्या मागणीबरोबरीनेच खाद्यपदार्थांचे पोषक पर्याय उपलब्ध व्हावेत ही त्यांची गरज देखील टाटा संपन्न पूर्ण करत आहे.


टाटा संपन्न ड्राय फ्रुट्सच्या प्रत्येक पॅकमधील नट्स व ड्राय फ्रुट्स सर्वोत्तम दर्जाचे असून खास तुमच्यासाठी अतिशय काळजीपूर्वक निवडले गेले आहेत. बहुस्तरीय पॅकेजिंगचा वापर करण्यात आल्यामुळे सुक्या मेव्यांचा स्वाद आणि दर्जा यांना जराही धक्का पोचत नाही. २०० ग्रॅम व ५०० ग्रॅम वजनाच्या पॅक्समध्ये संपूर्ण भारतभरात ई-कॉमर्स तसेच निवडक जनरल दुकानांमध्ये टाटा संपन्न ड्राय फ्रुट्स उपलब्ध आहेत.


पिस्ते, काजू व बदामांमध्ये प्रथिने, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यांचे प्रमाण निसर्गतःच भरपूर असते.  आपल्या शरीरातील हाडे निरोगी व मजबूत राखण्यासाठी हे घटक महत्त्वाचे असतात. तसेच त्यांमध्ये डाएटरी फायबरचे प्रमाण देखील भरपूर असते. हे सुके मेवे संतुलित आहाराचा एक प्रमुख भाग मानले गेले आहेत. टाटा संपन्न ड्राय फ्रुट्स रेन्जमध्ये खारवलेले व भाजलेले १००% प्रीमियम पिस्ते, कुरकुरीत, स्वादिष्ट व डिलक्स आकाराचे १००% प्युअर कॅलिफोर्निया अल्मन्डस (बदाम) व १००% प्युअर प्रीमियम कॅश्यु (काजू) आहेत. दर्जा व पोषण याबाबतीत पूर्णपणे निश्चिन्त राहून टाटा संपन्न ड्राय फ्रुट्सच्या उत्कृष्ट स्वादाचा आस्वाद घेता येईल. टाटा संपन्न १००% प्युअर प्रीमियम रेसिन्स (मनुका) चा देखील यामध्ये समावेश आहे. अतिशय काळजीपूर्वक निवडण्यात आलेले हे सर्व सुके मेवे सादर करून टाटा संपन्नने सतत सर्वोत्तम गुणवत्ता व पोषण प्रदान करण्याच्या वचनाच्या दिशेने पुढचे पाऊल उचलले आहे.

‘एकदा काय झालं!!’ चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित - गोष्टी सांगणाऱ्या माणसाची गोष्ट - वडिल-मुलाच्या नात्यावर प्रकाश टाकणारी गोष्ट - ५ ऑगस्टला होणार सर्वत्र प्रदर्शित

 


‘एकदा काय झालं!!’ चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित

- गोष्टी सांगणाऱ्या माणसाची गोष्ट

- वडिल-मुलाच्या नात्यावर प्रकाश टाकणारी गोष्ट

- ५ ऑगस्टला होणार सर्वत्र प्रदर्शित


गोष्टी सांगणाऱ्या माणसाची गोष्ट आणि ‘मला सेम बाबा व्हायचंय…’ असं म्हणणाऱ्या त्याच्या मुलाची गोष्ट डॉ. सलील कुलकर्णी ‘एकदा काय झालं!!’च्या रूपात आपल्यासमोर घेऊन येत आहे. आज (ता. २५) या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले. टीझरला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर प्रेक्षक या चित्रपटाच्या ट्रेलरची अतुरतेने वाट बघत होते. ट्रेलरवरून वडिल-मुलाच्या नाजूक नात्याला या कथेतून स्पर्श केलेला दिसतो. तसेच गोष्ट प्रभावीपणे सांगणाऱ्या माणसाच्या आयुष्याचीच गोष्ट या चित्रपटातून साकारण्यात आल्याचेही ट्रेलरमध्ये स्पष्ट होत आहे. 


अभिनेता सुमीत राघवन, उर्मिला कोठारे, बालकलाकार अर्जुन पुर्णपात्रे यांच्या मुख्य भूमिका आहेत. यांसोबतच मोहन आगाशे, सुहास जोशी, मुक्ता बर्वे, पुष्कर श्रोत्री, राजेश भोसले या कलाकारांनी आपल्या अभिनयाने चित्रपट एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरसोबतच त्यातील गाण्यांचीही जोरदार चर्चा होत आहे. या चित्रपटातील विशेष बाब म्हणजे यातील एक अंगाई प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान यांनी गायली आहे. 


डॉ. सलील कुलकर्णी यांनी पुन्हा एकदा लेखक, दिग्दर्शक आणि संगीतकार अशी तिहेरी कामगिरी केलेली आहे. विशेष बाब म्हणजे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांचे मार्गदर्शन या चित्रपटाला लाभले आहे, तर त्यांचा मुलगा आणि संगीतकार सिद्धार्थ महादेवन, शोबॉक्स एन्टरटेंन्मेंटच्या अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करत आहे.


‘एकदा काय झालं!!’ हा चित्रपट पुणे टॉकीज प्रायव्हेट लिमिटेड आणि हेमंत गुजराथी प्रस्तुत करत आहेत. तर या चित्रपटाची निर्मिती गजवदन प्रॉडक्शन्सचे अरूंधती दात्ये, अनुप निमकर, नितीन प्रकाश वैद्य आणि डॉ. सलील कुलकर्णी तसेच शोबॉक्स एन्टरटेंन्मेंटच्या सिद्धार्थ महादेवन, सौमिल श्रुंगारपुरे, सौमेंदु कुबेर आणि सिद्धार्थ खिंवसरा यांनी केली आहे. हा चित्रपट ५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येईल.


Trailer Link

https://www.facebook.com/103135255782343/videos/1140031039885897

Monday, 25 July 2022

‘किंग जेडी’ने केली ‘गणराज स्टुडिओ’ची स्थापना



 ‘किंग जेडी’ने केली ‘गणराज स्टुडिओ’ची स्थापना 

मराठीतील पहिला रॅपर, निर्माता, दिग्दर्शक श्रेयश जाधव उर्फ ‘किंग जेडी’ याने अल्पावधितच सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. मराठी प्रेक्षकांना जबरदस्त रॅप साँग, बाबू बँड बाजा सारखा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट, मी पण सचिन, बघतोस काय मुजरा कर, बस स्टॅाप असे अनेक यशस्वी चित्रपट दिल्यानंतर आता श्रेयशचा प्रवास आणखी एक पाऊल पुढे गेला आहे. श्रेयशने ‘गणराज स्टुडिओ’ची स्थापना केली असून या अंतर्गत एडिटिंग, डबिंग, व्हीएफएक्स साउंड मिक्स अगदी फ़ाइनल आउट्पुट्सपर्यंत सर्व पोस्ट प्रॅाडक्शन सेवा उपलब्ध होणार आहे. 



      नुकताच या स्टुडिओचा लोकार्पण सोहळा चित्रपट दिग्दर्शक अनिस बाझमी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी अभिनेता स्वप्नील जोशीसह अनेक मान्यवर उपस्थित होते. 




गणराज स्टुडिओच्या स्थापनेबाबत श्रेयश जाधव म्हणतो, ‘’गणराजचा प्रवास आता एक पाऊल आणखी पुढे गेला आहे. ‘गणराज स्टुडिओ’मुळे आता एकाच छताखाली चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत. बेसलाइट २, डोल्बीअटमोस, ९.१ मिक्सिंग इत्यादी अत्याधुनिक सुविधासह इतक्या वर्षांच्या अनुभवातून दर्जेदार कलाकृतींची निर्मिती करण्याच्या दृष्टीने या स्टुडिओची स्थापना करण्यात आली आहे.’’

Friday, 22 July 2022

वसंतराव’साठी राहुल देशपांडे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित



वसंतराव’साठी राहुल देशपांडे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित 

यंदाच्या ६८ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली असून सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून राहुल देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे. निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘मी वसंतराव’ या चित्रपटासाठी राहुल देशपांडे यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. तसंच सर्वोत्कृष्ट ‘ध्वनी आरेखन’ पुरस्कारदेखील अनमोल भावे यांना ‘मी वसंतराव’ या चित्रपटासाठी मिळाला आहे.


 या पुरस्काराबाबत राहुल देशपांडे म्हणतात, ‘हा पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ज्यावेळी माझे नाव या पुरस्कारासाठी जाहीर झाले त्यावेळी माझ्यासह माझ्या घरच्यांच्याही डोळ्यांत पाणी आले. हा पुरस्कार मी माझ्या आजोबांना म्हणजेच पंडित वसंतराव देशपांडे यांना समर्पित करत आहे. कारण संगीताचा वारसा मला त्यांच्याकडून लाभला. त्यामुळे हा त्यांचाही सन्मान आहे. या पुरस्कारावर नाव माझे असले तरीही मेहनत चित्रपटाच्या संपूर्ण टीमची आहे. इतक्या वर्षांची मेहनत फळाला आली.’’


दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी या यशाबद्दल म्हणतात, ‘’हा क्षण खूप मौल्यवान आहे. ‘मी वसंतराव’ची गाणी हा या चित्रपटाचा आत्मा आहे आणि या गाण्यांना राहुल देशपांडे यांनी पूर्णपणे न्याय दिला आहे. आणि आज त्याच्या या मेहनतीचा गौरव झाला आहे, याचा आम्हांला आनंद आहे.’’


जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘मी वसंतराव’ या चित्रपटाची निर्मिती चंद्रशेखर गोखले, दर्शन देसाई, आणि निरंजन किर्लोस्कर यांनी केली आहे.

गोष्ट एका पैठणीची', ‘जून'ला राष्ट्रीय पुरस्कार



 गोष्ट एका पैठणीची', ‘जून'ला राष्ट्रीय पुरस्कार



चित्रपट क्षेत्रातील विविध विभागातील मान्यवरांना दरवर्षी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाच्या ६८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून या वर्षीचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार शंतनु गणेश रोडे दिग्दर्शित 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाला प्रदान करण्यात आला असून सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा स्पेशल ज्युरी मेंशन अवॉर्ड 'जून' चित्रपटासाठी सिध्दार्थ मेनन याला मिळाला आहे.  'गोष्ट एका पैठणीची' आणि 'जून' या दोन्ही चित्रपटांची निर्मिती 'प्लॅनेट मराठी'ची असून गोष्ट 'एका पैठणीची' मध्ये सायली संजीव आणि सुव्रत जोशी प्रमुख भूमिकेत आहे. तर या चित्रपटाची निर्मिती अक्षय बर्दापूरकर, अभयानंद सिंग, चिंतामणी दगडे यांनी, प्लॅनेट मराठी, गोल्डन रेशो फिल्म्स आणि लेकसाईड प्रोड्कशन या बॅनर अंतर्गत केली आहे. 


सायली संजीव म्हणते, "चित्रपटातील कामाचे चीज झाले आहे. चित्रपटासाठी मी विशेष मेहनत घेतली आहे. माझ्यासाठी चित्रपट खूप स्पेशल आहे. मी हा पुरस्कार माझ्या वडिलांना समर्पित करते." तर चित्रपटाचे दिग्दर्शक शंतनु रोडे म्हणतात, ‘’माझ्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे. याचे श्रेय संपूर्ण टीमला जाते. सगळ्यांनीच यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आणि आज स्वप्न पूर्ण झाले.’’ 


पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना सिद्धार्थ मेनन म्हणतो, "मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा आनंद होतोय. स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटतेय. हा पुरस्कार मी आमच्या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला समर्पित करतो. मला 'जून' चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला याचा सर्वात जास्त आनंद आहे.''सुहृद गोडबोले, वैभव खिस्ती दिग्दर्शित या चित्रपटाची कथा निखिल महाजन यांची आहे.


प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, "प्लॅनेट मराठी नेहमीच दर्जेदार आशय बनवण्याच्या प्रयत्नात असते. या दर्जेदार आशयाच्या आधारावरच प्लॅनेट मराठीच्या दोन चित्रपटांनी राष्ट्रीय पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. सर्वांसाठीच हा आनंद देणारा क्षण आहे. हे पुरस्कार आमच्या कामासाठी पोचपावती आहे. यापुढे आणखी दर्जेदार चित्रपट बनवण्याचे प्रयत्न करू.

The wait is over ! Ameya Vinod khopkar Entertainment & Skylink Entertainment launch the Music & Trailer of De Dhakka 2 that

 


The wait is over ! Ameya Vinod khopkar Entertainment & Skylink Entertainment launch the Music & Trailer of De Dhakka 2 that 

leaves you in splits .

Some films don't only leave a mark at the box office but also succeed

in making an impression on the minds of the fans. One such is "De Dhakka". The film received a lot of love from the fans and it is now

time for " De Dhakka2" to hit screens on August 5. After the teaser

getting a huge response , it's now time for the  Music & trailer of " De Dhakka 2".

The iconic and successful first film in the franchise De Dhakka (2008) was helmed by Atul Kale and Sudesh Manjrekar. Starring Makarand Anaspure, Siddharth Jadhav, Shivaji Satam, Medha Manjrekar, Sanjay Khapare and Saksham Kulkarni, the film was about a crazy family’s journey in an auto-rickshaw in a village in Maharashtra. 

De Dhakka 2, the auto-rickshaw is replaced by an automobile while the film takes place all the way in London. This time, Makrand Anaspure , Shivaji Satam,  Medha Manjrekar, Siddharath Jadhav,  Saksham Kulkarni

 Sanjaay Khapre while the additional cast member in DE DHAKKA 2 are

 Gauri Ingawale, Pravin Tarde, Vidyadhar Joshi, Anand Ingale . 

De Dhakka 2 is Directed by Mahesh Manjrekar and Sudesh Manjrekar

Story & Screenplay by Mahesh Manjrekar and Dialogues written by 

Ganesh Matkari. DOP is karan Rawat . Film is Edited by Satish Padwal and Nilesh Gawand. 

Music Director Hitesh Modak Lyrics given by Mandar Cholkar and Neha Shitole. Tracks sung by Avdhoot Gupte, Vaishali Mhade, Shamika Bhide, Riya Bhattacharya. Music is on Video Palace .

On the Event of Music and Trailer launch of De Dhakka 2 . Ameya Khopkar launches the logo of his new Distribution Company named

"Filmastra". along with Amol Kagne and Pranit Waykar

De Dhakka 2 is Produced by Yatin Jadhav and Swati Khopkar . 

Co.Produced by Ninad Nandkumar Battin and Tabrez Patel . 

Associate Producer Karmika Tandon and Vishistha Duseja is all set 

to release on 5th August 2022.

सर्वत्र एकच धमाका होणार रिक्षाच्या हॉर्नमधून वाघाची डरकाळी येणार ! टाइमपास ३ मधील धम्माल ‘वाघाची डरकाळी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला !

https://www.youtube.com/watch?v=7uw-_XXUkAQ

 सर्वत्र एकच धमाका होणार

रिक्षाच्या हॉर्नमधून वाघाची डरकाळी येणार !

टाइमपास ३ मधील धम्माल ‘वाघाची डरकाळी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला !

टाइमपास ३ च्या टिझर आणि ट्रेलरमधून एका गाण्याच्या केवळ एकाच ओळीने प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण केली होती. ती ओळ होती ‘याच्या रिक्षाच्या हॉर्नमधनं आली वाघाची डरकाळी’ ! ही एवढी एकच ओळ ऐकून हे गाणं धमाल असणार आहे हे रसिकांनी ओळखलं होतं. त्यामुळेच ते या गाण्याची उत्सुकतेने वाट बघत होते. त्यांची ही प्रतीक्षा आता संपली आहे कारण हे पूर्ण गाणं त्यांच्या भेटीला आलं आहे. वैशाली सामंतच्या ठसकेबाज आवाजाचा तडका लागलेलं आणि कृतिका गायकवाडच्या दिलखेचक अदांनी सजलेलं हे गाणं धमाका उडवून देण्यास सज्ज झालं आहे.  

टाइमपासच्या यापूर्वीच्या दोन्ही भागातील गाणी विशेष लोकप्रिय झाली होती. रोमॅंटिक गाण्यांबरोबरच पहिल्या भागातील ‘ही पोली साजूक तुपातली’ आणि दुसऱ्या भागातील ‘ऍम्ब्युलन्स सॉंग’ने सर्वत्र एकच धम्माल उडवून दिली होती. तशीच धम्माल उडवून द्यायला आणि दंगा घालायला टाइमपास ३ मधील ‘वाघाची डरकाळी’ आलं आहे. क्षितीज पटवर्धनचे शब्द असलेल्या या गाण्याला संगीतबद्ध केलं आहे अमितराजने तर आवाज आहे वैशाली सामंतचा. चित्रपटातील इतर गाण्यांप्रमाणेच याही गाण्याचं जोशपूर्ण ढंगातलं नृत्य दिग्दर्शन केलं आहे राहुल ठोंबरे आणि संजीव होवालदार यांनी तर या गाण्यावर ठेका धरत दिलखेचक अदा पेश केल्या आहेत कृतिका गायकवाडने. 

टिझर असो ट्रेलर असो की गाणी टाइमपास ३ दिवसेंदिवस प्रेक्षकांची उत्सुकता वाढवतच आहे. येत्या २९ जुलैला झी स्टुडिओजच्या माध्यमातून हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशनची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन रवी जाधव यांचं आहे तर प्रथमेश परब आणि हृता दुर्गुळे ही जोडी मुख्य भूमिकेत आहे.

Thursday, 21 July 2022

२९ जुलैपासून प्लॅनेट मराठीवर ‘मी पुन्हा येईन’मध्ये दिसणार राजकारणाची अस्पष्ट बाजू



२९ जुलैपासून प्लॅनेट मराठीवर   ‘मी पुन्हा येईन’मध्ये दिसणार राजकारणाची अस्पष्ट बाजू 

https://www.youtube.com/watch?v=a6Rke8qcnzE

प्रेक्षकांना विचार करायला लावणाऱ्या ‘मी पुन्हा येईन’ या राजकीय व्यंगचित्र असणाऱ्या वेबसीरिजचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. २९ जुलैपासून प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या या वेबसीरिजमध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, सिद्धार्थ जाधव, रूचिता जाधव, भारत गणेशपुरे अशी तगडी स्टारकास्ट आहे. 


ट्रेलरमधील जबरदस्त संवाद, विनोदी किस्से प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरणारे आहेत. राजकारणातील अस्पष्ट बाजूचे व्यंगात्मक चित्रण पहिल्यांदाच मराठी सीरीजमध्ये दाखवण्याचा प्रयत्न ‘मी पुन्हा येईन’मधून करण्यात आला आहे. प्रत्येक क्षणी डोळ्यांत अंजन टाकणारी, विचार करण्यास भाग पाडणारी ही वेबसीरिज प्रेक्षकांचे मनोरंजनही करणारी आहे. राजकारणातील नाटकाभोवती फिरणाऱ्या या  कथानकात कलाकारांनी आपल्या विनोदी शैलीने, विनोदाची अचूक वेळ साधत अधिकच रंगत आणली आहे.


प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ‘’ आम्ही नेहमीच आमच्या ओटीटीवर उत्तमोत्तम आणि नवीन आशय देण्याच्या प्रयत्न केला आहोत. ‘मी पुन्हा येईन’ ही मराठी वेबविश्वासाठी एक वेगळी संकल्पना आहे आणि मला या गोष्टींचा विशेष आनंद आहे की, ही मनोरंजनात्मक सीरीज प्रेक्षकांना प्लॅनेट मराठीवर पाहाता येणार आहे.’‘


‘मी पुन्हा येईन’ बद्दल लेखक, दिग्दर्शक अरविंद जगताप म्हणतात, ‘’ प्रेक्षकांची प्रतिक्रिया ही सर्वोत्तम प्रतिक्रिया असते. आता ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षक याला कसा प्रतिसाद देतात, हे जाणून घेण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. बहुमतासाठी पक्षाची चाललेली धडपड, आमदारांची पळवापळवी, कारस्थाने सत्तेसाठी कोणत्या थराला जातात, याचे गंमतीशीर चित्रण ‘मी पुन्हा येईन’मध्ये पाहायला मिळणार आहे. राजकारणाचे काही खरे नाही, हेच खरे आहे, हे हसतखेळत सांगणारी ही सीरीज आहे. मला खात्री आहे, हे कथानक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेईलच याशिवाय यातील मनोरंजक ट्विस्ट्स प्रेक्षकांना खिळवून ठेवतील.’’


लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या वेबसीरिजचे सह दिग्दर्शक यश जाधव असून निर्माते गौतम कोळी आहेत. तर या बेबसीरिजची निर्मिती जेम क्रिएशन्सने केली आहे.

'अभंगवारी'त रंगणार शास्त्रीय गाण्यांची मैफल


 'अभंगवारी'त रंगणार शास्त्रीय गाण्यांची मैफल 

२०१८- २०१९ मध्ये मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता पुन्हा एकदा 'अभंगवारी'ची संगीत मैफल रंगणार आहे. २३ जुलै रोजी सायंकाळी साडे सहा वाजता मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात राहुल देशपांडे आपल्या सुरेल गायकीने अवघे सभागृह मंत्रमुग्ध करणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्वरी जमेनीस करणार असून  संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज या कार्यक्रमाला उपस्थित राहून या 'अभंगवारी'ची शोभा वाढवणार आहेत.


   नुकतीच भक्तीमय वातावरणात सर्वत्र आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. हेच भक्तिमय वातावरण पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानतर्फे खास या शास्त्रीय संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अभंग, भक्तिगीते यांचा संगीत नजराणा श्रोत्यांना अनुभवायला मिळणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बुकमायशोवर तिकीटे उपलब्ध आहेत.

Monday, 18 July 2022

'मी पुन्हा येईन'मध्ये दिसणार सत्तेचा घोडेबाजार



 'मी पुन्हा येईन'मध्ये दिसणार सत्तेचा घोडेबाजार 


सध्याच्या राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर वेबविश्वातही एक मोठी घडामोड घडणार आहे. 'प्लॅनेट मराठी' ओटीटीवर 'मी पुन्हा येईन' या वेबसीरिजच्या माध्यमातून सत्तेचा घोडेबाजार पाहायला मिळणार आहे. नुकतेच या वेबसीरिजचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी चाललेली चुरस यात पाहायला मिळत आहे. अरविंद जगताप लिखित, दिग्दर्शित या वेबसीरिजमध्ये  सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, भारत गणेशपुरे, सिद्धार्थ जाधव, प्रभाकर मोरे, अमित तडवळकर, रमेश वाणी, संजय कुलकर्णी, राजेश दुर्गे, राजेंद्र गुप्ता, रुचिता जाधव, सीमा कुलकर्णी आणि दिप्ती क्षीरसागर यांच्या प्रमुख भूमिका असून 'मी पुन्हा येईन'ची निर्मिती प्लॅनेट मराठी, गौतम कोळी आणि जेम क्रिएशन्सने केली आहे.

 

     मोशन पोस्टरमध्ये सयाजी शिंदे आणि उपेंद्र लिमये यांच्यात खुर्चीसाठीची चढाओढ दिसत आहे. या चढाओढीत आता ते हातमिळवणी करणार की, दोघांपैकी कोणाची सत्ता स्थापन होणार? हे 'मी पुन्हा येईन' आल्यावरच कळेल. दरम्यान या वेबसीरिजमध्ये राजकारणातील कट- कारस्थाने, नेत्यांची फोडाफोडी आणि मुख्य म्हणजे सध्या चर्चेत असलेले 'रिसॉर्ट पॉलिटिक्स' पाहायला मिळणार आहे. 


    दिग्दर्शक अरविंद जगताप म्हणतात, '' खरं सांगायचे तर वास्तवातील राजकारणापर्यंत पोहोचणे आपल्यासारख्यांना शक्यच नाही. मात्र बहुमतासाठी पक्षांची चाललेली धडपड, आमदारांची पळवापळवी, नेत्यांची कारस्थाने कोणत्या थराला जातात, याचे गंमतीशीर चित्र म्हणजे 'मी पुन्हा येईन'.'' 


 'मी पुन्हा येईन' या वेबसीरिजबद्दल प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, "प्रेक्षकांना असे विषय पाहायला आवडतात. या वेबसीरिजचा सध्याच्या राजकीय घडामोडींशी काहीही संबंध नसून राजकारणात घडत असणाऱ्या काही गोष्टी यात पाहायला मिळणार आहेत. या वेबसीरिजची  निर्मिती निव्वळ मनोरंजनच्या हेतूने करण्यात आली आहे.''

वातावरणातला गारवा वाढवणारं टाईमपास ३ चं कोल्ड ड्रिंक सॉंग प्रेक्षकांच्या भेटीला

 


वातावरणातला गारवा वाढवणारं टाईमपास ३ चं कोल्ड ड्रिंक सॉंग प्रेक्षकांच्या भेटीला

झी स्टुडिओजच्या टाइमपास ३ या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांचा सध्या समाजमाध्यमांवर एकच बोलबाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने केवळ तरुणाईचं नाही तर सर्वच वयोगटातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. शिवाय साई तुझं लेकरू आणि लव्हेबल या गाण्यांनाही प्रेक्षकांनी आपल्या पसंतीची पावती दिली आहे. यामुळे टाइमपास ३ बद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. ही उत्सुकता अधिक वाढविण्यासाठी आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. ‘कोल्ड ड्रिंक वाटतेस’ हे नवीन गाणं प्रेक्षकांना आपल्या तालावर ठेका धरायला लावण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रथमेश परब आणि हृता दुर्गुळे यांच्यावर चित्रित झालेलं हे धम्माल गाणं गायलं आहे अमितराज आणि हिंदीमध्ये आपल्या आवाजाची जादू पसरवणाऱ्या शाल्मली खोलगडे यांनी. याचं संगीत अमितराज यांचं असून गाण्याचे शब्द क्षितीज पटवर्धनचे आहेत.

टाइमपास चित्रपटाच्या यापूर्वीच्या दोन्ही भागाच्या यशामध्ये त्यांच्या संगीताचा महत्त्वाचा वाटा होता. दोन्ही भागातील गाणी रसिकांमध्ये आजही लोकप्रिय आहेत. हीच परंपरा टाइमपास ३ नेही कायम ठेवली आहे. साई तुझं लेकरू या गाण्याने सोशल मीडियावर एकच कल्ला केला आहे. यात आता कोल्ड सॉंग नव्याने धुमाकूळ घालणार आहे. या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे याचे भन्नाट शब्द आणि चाल आणि त्याला न्याय देणारं तेवढंच धम्माल नृत्य दिग्दर्शन. राहुल ठोंबरे आणि संजीव होवालदार यांनी रचलेल्या कोरिओग्राफीवर प्रथमेश आणि हृता यांनी भन्नाट डान्स केला आहे. याशिवाय या गाण्यासाठी संतोष फुटाणे यांनी अतिशय सुरेख असं कला दिग्दर्शन केलं आहे. 

सध्या पावसामुळे सगळीकडे गार गार वातावरण झालंच आहे. हा गारवा अधिक वाढवण्याचं काम हे कोल्ड ड्रिंक सॉंग करणार आहे. झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशनची निर्मिती असलेल्या टाइमपास ३ चे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले आहे. येत्या २९ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Friday, 15 July 2022

दगडू पालवीची गोष्ट झकास ! पुन्हा एकदा होणार फुल्ल टाइमपास ! टाइमपास ३ चा धमाल ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

 


दगडू पालवीची गोष्ट झकास ! पुन्हा एकदा होणार फुल्ल टाइमपास ! 

टाइमपास ३ चा धमाल ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला



'टाइमपास' म्हटलं की डोळ्यासमोर येते ती दगडू आणि प्राजूची जोडी आणि त्यांची आगळी वेगळी लव्हस्टोरी. पहिल्या भागात प्रेक्षकांच्या मनाला हुरहूर लावून अधुरी राहिलेली प्रेमकथा दुसऱ्या भागात प्रेक्षकांना आनंद देत पूर्ण झाली. पहिल्या भागात बालपणात एकमेकांपासून दुरावलेले दगडू आणि प्राजू दुसऱ्या भागात तरुणपणात एकमेकांना भेटले आणि एकही झाले. याच बालपण आणि तरुणपणाच्या मधल्या टप्प्यात दगडूचं नेमकं काय झालं ? प्राजू त्याच्यापासून दूर गेल्यानंतर त्याच्या आयुष्यात काय काय बदल झाले? हे सांगणारी गोष्ट आता टाइमपास ३ मधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशनची निर्मिती असलेल्या आणि रवी जाधव यांच्या दिग्दर्शनाने सजलेल्या या चित्रपटाच्या टिझरने आणि गाण्यांनी प्रेक्षकांमध्ये यापूर्वीच उत्सुकता निर्माण केली आहे. चित्रपटाबद्दलची हीच उत्सुकता आणि उत्कंठा आता ट्रेलरमधून अधिकच वाढणार आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर एका शानदार सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आला. यावेळी दिग्दर्शक रवी जाधव, झी स्टुडिओजचे बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी, निर्मात्या मेघना जाधव यांसह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. 



टाइमपासच्या दोन्ही भागात प्रेक्षकांना दगडू आणि प्राजूची प्रेमकथा बघायला मिळाली होती. याही भागात प्रेमकथा असणार आहेच पण यावेळी दगडूसोबत असणार आहे पालवी. आणि ही पालवी साकारली आहे सध्याच्या तरुणाईच्या 'दिल की धडकन' अशी ओळख असणाऱ्या हृता दुर्गुळे हिने. विशेष म्हणजे आजवर कधीच न बघितलेल्या अवतारात हृता आपल्याला यात दिसणार आहे. तिचा हाच डॅशिंग अवतार टिझर मधून प्रेक्षकांनी बघितला होताच आता ट्रेलरमधून डॅशिंग सोबत तिची 'लव्हेबल' अदाही बघायला मिळणार आहे. चित्रपटात दगडूच्या भूमिकेतील प्रथमेश परब आणि पालवी हृता दुर्गुळेसोबतच, माधव लेले उर्फ शाकाल म्हणजेच वैभव मांगले, शांताराम परब म्हणजे भाऊ कदम, आरती वडगबाळकर, दगडू गॅंग आणि एका जबरदस्त भूमिकेत संजय नार्वेकर बघायला मिळणार आहेत. चित्रपटात एकूण पाच गाणी असून ती क्षितीज पटवर्धन यांनी लिहिली आहेत तर संगीत अमितराज यांचं आहे. चित्रपटाची कथा रवी जाधव यांची असून त्यांच्यासोबतीने प्रियदर्शन जाधव याने चित्रपटाची पटकथा आणि सवांद लिहिले आहेत. 


'टाइमपास ३' बद्दल बोलतांना रवी जाधव म्हणाले की, "टाइमपासच्या पहिल्या भागात शेवटी दगडू म्हणतो की 'आपण शिक्षणाचा ब्रिज घेऊन प्राजूपर्यंत पोहचणार' दुसऱ्या भागाची सुरुवात एक यशस्वी उद्योजक बनलेल्या दगडूच्या गोष्टीपासून झाली होती. या दोन्हीच्या मधला नेमका दगडूचा प्रवास कसा होता ? शिक्षणाचा ब्रिज घेताना त्या वाटेत त्याला नेमकं कोण कोण भेटलं ? कोणतं वळण आलं ? हे सांगायचं राहून गेलं होतं. तेच सर्व तेवढ्याच धमाल पद्धतीने सांगण्यासाठी आम्ही 'टाइमपास ३' चा घाट घातला. माझ्या मते एखाद्या चित्रपटाचा पूर्वार्ध(प्रिक्वेल) आणि उत्तरार्ध (सिक्वेल) प्रदर्शित झाल्यानंतर अशी मधली गोष्ट सांगणारा भाग आणणे हा प्रयोग मराठीत पहिल्यांदाच होत असेल. पहिल्या दोन भागांप्रमाणे हा चित्रपटही प्रेक्षकांना आवडेल असा विश्वास आहे."


तर झी स्टुडिओजचे व्यवाय प्रमुख मंगेश कुलकर्णी म्हणाले की, "टाइमपास' या चित्रपटाचं, यातील व्यक्तिरेखांचं प्रेक्षकांच्या मनात एक विशेष असं स्थान आहे. ही बाब लक्षात घेऊनच रवी जाधव यांनी 'टाइमपास ३' ची संकल्पना आमच्यासमोर मांडली आणि आम्हालाही ती आवडली. दगडू आणि पालवीच्या मैत्रीतील प्रेमाची किंवा प्रेमळ मैत्रीची ही गोष्ट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी खात्री आम्हाला आहे."


'टाइमपास ३' चा धम्माल ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला असून येत्या २९ जुलैला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Thursday, 14 July 2022

हृता दुर्गुळे म्हणतेय, 'शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे!'

 


हृता दुर्गुळे म्हणतेय, 'शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे!'


प्रताप फड दिग्दर्शित ‘अनन्या’ येत्या २२ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर आल्यापासूनच 'अनन्या'च्या या प्रेरणादायी प्रवासाबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. लवकरच हा प्रवास आता प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी हृता दुर्गुळेचा ‘अनन्या’पर्यंत पोहोचण्याचा प्रवास अजिबातच सोपा नव्हता. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ झळकला असून यात हृता ते ‘अनन्या’ हा प्रवास दाखवण्यात आला आहे. या प्रवासात हृताने ‘अनन्या’ला कसे आपलेसे केले आहे, हे शेअर केले आहे. हृताने घेतलेली प्रचंड मेहनत यात दिसत आहे. 


  या मेहनतीबाबत हृता दुर्गुळे म्हणते, ‘’ या चित्रपटासाठी मला शारीरिक मेहनत घ्यायची आहे, हे सुरुवातीपासूनच मला ठाऊक होते आणि त्यासाठी मला मानसिकदृष्ट्या खंबीर राहाणे आवश्यक होते. सर्वात आधी माझ्यासमोर वजन कमी करण्याचे आव्हान होते. या दरम्यानच माझे योगा आणि व्यायामाचे प्रशिक्षण सुरू होते. या काळात मी प्रचंड आव्हानात्मक गोष्टी केल्या. अक्षरशः मी रडायचे, कळवळायचे. एका अशा वळणावर मी आले होते की, असे वाटत होते सोडून द्यावे. परंतु मग चित्रपटाच्या टॅगलाईननेच मला स्फूर्ती दिली 'शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे.' हेच डोक्यात ठेवून मग मी हे आव्हान स्वीकारायचे ठरवले. मला दोन्ही हात नाहीत, हेच मी डोक्यात ठेवून पुढे वावरायला लागले आणि तेव्हाच मला 'अनन्या' सापडली. मी 'अनन्या'शी एवढी एकरूप झाले होते की, पडद्यामागेही अनेक गोष्टी करताना माझ्यात 'अनन्या'च असायची. ही आयुष्याची एक सकारात्मक लढाई आहे, जी ध्येयाकडे नेणारी आहे. 'अनन्या' साकारताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे, आपल्याकडे जे आहे, त्यात आनंद मानावा.'' 


एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, ड्रीमव्हीवर एंटरटेनमेंट आणि रवी जाधव फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन प्रताप फड यांनी केले आहे  ध्रुव दास, रवी जाधव आणि संजय छाब्रिया या चित्रपटाचे निर्माता आहेत.

Monday, 11 July 2022

पुन्हा प्रेमात पाडणार ऋता आणि प्रथमेशचं ‘लव्हेबल’ २९ जुलैला ’टाइमपास ३’ होणार प्रदर्शित

 


पुन्हा प्रेमात पाडणार ऋता आणि प्रथमेशचं ‘लव्हेबल’

२९ जुलैला ’टाइमपास ३’ होणार प्रदर्शित


झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्सची निर्मिती, रवी जाधव दिग्दर्शित 'टाइमपास ३' येत्या २९ जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. दगडूचे वेड लावणारे प्रेम याआधी आपण सर्वांनीच पाहिले आहे. आता पुन्हा एकदा त्याच्या ‘लव्हेबल’ भावना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 'टाइमपास ३' मधील ‘लव्हेबल’ हे गाणे नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले असून हे गाणे प्रथमेश परब आणि हृतावर चित्रित करण्यात आले आहे. 


या गाण्यामध्ये दगडू आणि पालवीमध्ये हळूवार खुलत जाणारे प्रेम दिसत आहे.  प्रेमाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर बहरत जाणारे हे गाणे आर्या आंबेकर व हर्षवर्धन वावरे यांनी गायले असून याला अमितराज यांनी संगीत दिले आहे. तर क्षितीज पटवर्धन यांनी हे गाणे शब्दबद्ध केले आहे. 


गाण्याबद्दल दिग्दर्शक रवी जाधव म्हणतात, “काही दिवसांपूर्वीच प्रथमेशचे धमाल गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. आता ह्रता दुर्गुळे आणि प्रथमेश परब यांच्यातील नाजूक नात्यावरील ‘लव्हेबल’ गाणे आपल्या भेटीला आले आहे. यापूर्वीही ‘टाइमपास’च्या दोन्ही चित्रपटातील गाण्यांनी धुमाकूळ घातला होता. त्यामुळे ‘टाइमपास ३’मधील गाणीही संगीतप्रेमींना नक्कीच आवडतील.”

'प्लॅनेट मराठी'वर लवकरच... 'मी पुन्हा येईन '!



 'प्लॅनेट मराठी'वर लवकरच... 'मी पुन्हा येईन '!

https://www.youtube.com/watch?v=Z2zkEb-STKM

महाराष्ट्राच्या राजकारणानं गेल्या काही दिवसांत मोठे भूकंप पाहिले, शेवटपर्यंत कुणालाच माहिती नव्हतं की काय होईल, एखाद्या सस्पेंस सिनेमापेक्षाही जबरदस्त असा क्लायमॅक्स सगळ्यांनी पाहिला. राजकीय घडामोडींच्या या पार्श्वभूमीवर वेबविश्वातही एक मोठी घडामोड घडणार आहे. लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर सत्तानाट्यावर आधारित 'मी पुन्हा येईन' नावाची वेबसीरिज येणार आहे. अरविंद जगताप यांचे लिखाण आणि दिग्दर्शन असलेल्या या वेबसीरिजची निर्मिती प्लॅनेट मराठी, गौतम कोळी आणि जेम क्रिएशन्सने केली आहे. या वेबसीरिजमध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, भारत गणेशपुरे, सिद्धार्थ जाधव, प्रभाकर मोरे, अमित तडवळकर, रमेश वाणी, संजय कुलकर्णी, राजेश दुर्गे, राजेंद्र गुप्ता,  रुचिता जाधव, सीमा कुलकर्णी आणि दिप्ती क्षीरसागर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  


 टीझरमध्ये दोन पक्षाचे नेते सत्तेसाठी आमदारांची कशी पळवापळवी, फोडाफोडी करत आहेत, हे दिसत आहे. एवढेच नाही तर शासकीय यंत्रणांचाही कसा बेमालूमपणे वापर केला जातो आणि अधिकारीवर्गही यात आपली पोळी कशी भाजून घेतात, हे या टीझरमधून कळतेय. राजकारणावर आधारित या वेबसीरिजमध्ये सत्तालोलूपता, कपट-कारस्थान, संधीसाधूपणा, आमदारांची मेगाभरती, फोडाफोडी, पळवापळवी आणि सध्या चर्चेत असलेलं 'रिसॉर्ट पॉलिटिक्स' असा सगळा मसाला पाहायला मिळणार आहे. 


'मी पुन्हा येईन' या वेबसीरिजबद्दल प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, "सध्याच्या राजकीय घडामोडींचा आणि या सीरीजचा तसा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही, पण, सिनेमात किंवा वेबसीरीजमध्ये तेच पाहायला मिळतं जे आपल्या आजुबाजूला घडतं. त्यामुळे अगदीच असत्य घटनांवर आधारित ही वेबसीरीज असली तरी, राजकीय कुलंगड्या, शह-काटशह हे पाहण्यात प्रेक्षकांना रस असतो हे स्पष्ट आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनाची हीच गरज 'मी पुन्हा येईन' ही वेबसीरीज पूर्ण करेल"


'मी पुन्हा येईन' लवकरच प्लॅनेट मराठी या ऍपवर पाहायला मिळणार आहे, नुकतंच या सीरीजचा टीझर लाँच करण्यात आलाय.

Thursday, 7 July 2022

Federal Bank appoints M V S Murthy as its first Chief Marketing Officer

 


Federal Bank appoints M V S Murthy as its first Chief Marketing Officer

 

July 07,2022, Mumbai: Federal Bank appointed M V S Murthy as its first Chief Marketing Officer. He has been mandated to leverage marketing to help build scale by working on the intersection of Brand Communication, Customer Experience and Technology.The function has a horizontal play across the existing portfolio of customers and pans vertically to strengthen the bank's organic acquisition as well as inorganic growth which is powered by its strategic partnerships within the fintech and start-up ecosystem.

 

Prior to being appointed at Federal Bank, M V S was heading – Marketing, Digital and Corporate Communication at TATA AMC.

 

“We are happy to welcome M V S to Federal family. I am certain his vast experience will strengthen our brand positioning and will be an enabler in our journey from good to great.” Said Ajith Kumar K K, President &Chief Human Resources Officer, Federal Bank.

M V S Murthy is a strong CXO level Marketing led Business & Entrepreneurial Leader with an exceptional track-record of building and leading high growth verticals. He has got vast experience across BFSI in Banks, Insurance, Broking and Mutual Funds namely Ogilvy, Urja Communications, ICICI Bank, Edelweiss, TATA AIG and Tata Mutual Fund. 

Monday, 4 July 2022

'वाय'चा विशेष शो आयोजित करून थिएटरमध्येच केला मुलीचा नामकरण विधी, नाव ठेवले 'मुक्ता'



 'वाय'चा विशेष शो आयोजित करून थिएटरमध्येच केला मुलीचा नामकरण विधी, नाव ठेवले 'मुक्ता' 



एखादा सामाजिक विषय असलेला चित्रपट प्रदर्शित व्हावा आणि त्याचे सकारात्मक पडसाद उमटावेत, याहून आनंदाची गोष्ट असूच शकत नाही. ज्या हेतूने चित्रपटाची निर्मिती केली आहे, तो उद्देश साध्य होणे, हे एखाद्या नामांकित पुरस्कारापेक्षाही मोठे आहे आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे अजित वाडीकर दिग्दर्शित 'वाय' हा हायपरलिंक चित्रपट. स्त्री भ्रूण हत्या या गंभीर विषयावर भाष्य करणाऱ्या 'वाय'ने अनेक स्त्रियांना या संवेदनशील विषयावर पुढे येऊन बोलण्यास प्रोत्साहन दिले. अनेक महिला प्रेक्षकांनी आपले अनुभव 'वाय'च्या टीमसोबत शेअर केले. अशा प्रतिक्रिया येत असतानाच आता कोल्हापूरमधील सई राजेशिर्के देशमाने आणि मनोज देशमाने या जोडप्याने या चित्रपटाने प्रेरित होऊन आगळयावेगळया पद्धतीने आपल्या मुलीच्या नामकरण विधी करण्याचे ठरवून त्यानिमित्ताने त्यांनी 'वाय'चा एक खास शो कोल्हापूरमध्ये आयोजित केला होता. या शोच्या दरम्यान थिएटरमध्येच त्यांनी नामकरण विधीही घडवून आणला. मोठमोठे हॉल घेऊन थाटामाटात मोठा समारंभ साजऱ्या करणाऱ्या युगात एखाद्या थिएटरमध्ये आपल्या मुलीचे बारसे करणे आणि 'वाय' सारखा चित्रपट यावेळी दाखवून मौल्यवान संदेश समाजात पोहोचवण्याचा प्रयत्न करणे, हा नक्कीच कौतुकास्पद प्रयोग आहे. विशेष बाब म्हणजे या वेळी देशमाने जोडप्याने आपल्या मुलीचे नाव 'मुक्ता' ठेवले. एखाद्या चित्रपटाने प्रभावित होऊन, हा विषय जास्तीसजास्त लोकांपर्यंत पोहोचावा, यासाठी बारशाचे असे आयोजन करणे, हे असे बहुदा पहिल्यांदाच घडले असावे. हा विषय असा आहे की, तो घराघरात पोहोचणे खूप गरजेचे आहे. याचे गांभीर्य कळले तरच याबाबत जागरूकता निर्माण होऊ शकते आणि या जोडप्याचा नामकरण विधीच्या निमित्ताने हा विषय लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न आहे. 



आपल्या मुलीचा नामकरण विधी अशाप्रकारे साजरा करण्याबाबत सई राजेशिर्के - देशमाने म्हणतात, '' लग्नाच्या दहा वर्षांनंतर आम्हाला कन्यारत्न झाले आणि याचा आम्हाला आनंदच आहे. यापूर्वी मुलगाच हवा, वंशाचा दिवाच हवा, ही अशी वाक्ये मी स्वतः अनुभवली आहेत. 'वाय'च्या कथेत आणि माझ्या आयुष्यात खूप साम्य आहे. त्यामुळे आम्ही 'मुक्ता'चे बारसं अशा पद्धतीने करण्याचे ठरवेल. मिष्टान्नांची मेजवानी तर असतेच मात्र ही आमची वैचारिक आणि समाज प्रबोधनात्मक मेजवानी आहे. हा चित्रपट पाहून मुलगी म्हणजे ओझे मानणाऱ्या लोकांच्या मानसिकतेत थोडा जरी फरक पडला, तर आमचा हेतू साध्य झाल्याचा आम्हाला आनंद होईल. असे चित्रपट बनायला हवेत आणि मुख्य म्हणजे असे चित्रपट प्रेक्षकांनी पाहायला हवेत''. तर मनोज देशमाने म्हणतात, ''आम्हाला सुरुवातीपासूनच मुलगी व्हावी, असे मनापासून वाटत होते. आज 'मुक्ता'च्या निमित्ताने आमची ही इच्छा पूर्ण झाली. आम्ही स्वतःला खूप नशीबवान समजतो की आमच्या पोटी मुलीने जन्म घेतला. आमच्या मुलीचे नाव मुक्ता ठेवण्याचे कारण हे की, मुक्ता म्हणजे मुक्त, जिला कसलंही बंधन असू शकत नाही. आणि हा विचार प्रत्यक्षात उतरावा, लोकांपर्यंत पोचावा म्हणून असा निर्णय घेतला. त्याशिवाय आणखी एक कारण म्हणजे 'वाय' मधील प्रमुख अभिनेत्री मुक्ता बर्वे. ती स्वतः एक उत्तम अभिनेत्री तर आहेच, 'वाय'मधील तिचा धाडसीपणाही मनाला भिडणारा आहे. पण त्याहीपुढे जाऊन मुक्ताने स्वतःचे असे जे स्थान निर्माण केले आहे आणि त्यातून एक मोठा आदर्श समाजासमोर ठेवला आहे, तो खरोखरच प्रेरणादायक आहे. आणि हा विचारही 'मुक्ता' नावामागे होता".


या आगळयावेगळया सोहळ्याबद्दल आणि त्यामागील इतक्या मोठ्या विचाराबद्दल या जोडप्यावर कौतुकाचा वर्षांव होत आहे.

‘अनन्या’च्या भावना व्यक्त झाल्या 'न कळत' रोमँटिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला




 ‘अनन्या’च्या भावना व्यक्त झाल्या 'न कळत' 

रोमँटिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

https://youtu.be/7eZ6EpTWLc4


‘शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे!’ असे म्हणणाऱ्या ‘अनन्या’चा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. आता ‘अनन्या’ चित्रपटातील एक रोमँटिक गाणे सोशल मीडियावर झळकले आहे. हृता दुर्गुळे व चेतन चिटणीस यांच्यात खुलत जाणारे हळूवार नाते यात दिसत आहे. ‘न कळत’ असे या गाण्याचे बोल असून बेला शेंडेचा सुमधूर आवाज या गाण्याला लाभला आहे. तर अभिषेक खणकर यांनी हे गाणे शब्दबद्ध केले असून समीर साप्तीसकर यांनी गाण्याला संगीत दिले आहे. 


प्रताप फड दिग्दर्शित ‘अनन्या’ चित्रपट येत्या २२ जुलैपासून चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या गाण्यात एकमेकांविषयी असलेल्या तरल भावना व्यक्त करत एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचे वचन देत आहेत. प्रेमीयुगुलांच्या मनाला स्पर्श करणारे हे गाणे अतिशय श्रवणीय आहे.


चित्रपटाचे दिग्दर्शक प्रताप फड गाण्याविषयी म्हणतात, " हृता आणि चेतनवर हे गाणे चित्रित करण्यात आले असून अभिषेकने हे गाणे अगदी साध्या व सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. गाणे मनाला मोहून टाकणारे आहे. आपल्या साथीदाराची प्रत्येकवेळी साथ मिळणे किती महत्त्वाचे आहे हे या गाण्यामधून स्पष्ट होत आहे." 


निर्माते संजय छाब्रिया म्हणतात, "एव्हरेस्ट एंटरटेनमेंट नेहमीच चित्रपटासोबत संगीतालाही दर्जेदार बनवण्याच्या प्रयत्नात असते. मला खात्री आहे, या गाण्याला आजची तरुणपिढी चांगला प्रतिसाद देईल." 


एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट, ड्रीमव्हीव्हर एंटरटेनमेंट  व रवी जाधव निर्मित चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन प्रताप फड यांनी केले आहे. तर चित्रपटाचे निर्माते ध्रुव दास, रवी जाधव व संजय छाब्रिया आहेत.

'तमाशा लाईव्ह' उलगडणार 'ब्रेकिंग न्यूज' संजय जाधव दिग्दर्शित चित्रपटाचा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित

 




'तमाशा लाईव्ह' उलगडणार 'ब्रेकिंग न्यूज' 

संजय जाधव दिग्दर्शित चित्रपटाचा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित 

https://www.youtube.com/watch?v=-2gBaReBWkU

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे 'तमाशा लाईव्ह'. या चित्रपटाचे नावच इतके निराळे आहे की, या चित्रपटाविषयी मनात आपसूकच उत्सुकता निर्माण होते. त्यातच आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यात काहीतरी जबरदस्त आणि मनोरंजनात्मक दिसत आहे. 'तमाशा लाईव्ह'मध्ये सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी, पुष्कर जोग, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे, यांच्या प्रमुख भूमिका असून येत्या १५ जुलै रोजी हा भव्य चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.  


यापूर्वीच चित्रपटाच्या संगीताची रसिकांवर भुरळ पडली आहे. आता ट्रेलरही प्रेक्षकांना आवडत असून हा काहीतरी भन्नाट विषय असल्याचे दिसतेय. यात सचित पाटील आणि सोनाली कुलकर्णी वृत्तनिवेदकाच्या भूमिकेत आहेत. व्यावसायिक कारकिर्दीत आपण किती वरचढ आहोत, हे दाखवण्यात त्यांची चढाओढ सुरु असून त्यात 'ब्रेकिंग न्यूज'साठीची त्यांची धडपड, एकमेकांबद्दल असलेली ईर्षा यात अधोरेखित होत आहे. आता यातून आणखी काही 'ब्रेकिंग न्यूज' आपल्या समोर येणार का, हे 'तमाशा लाईव्ह' पाहिल्यावरच कळेल. यात सिद्धार्थ आणि हेमांगीही महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. ट्रेलरमध्ये दिसणारी गाणी कथा पुढे नेणारी आहेत. त्यामुळे या चित्रपटात काहीतरी वेगळे पाहायला मिळणार असल्याचे दिसतेय. 


दिग्दर्शक संजय जाधव म्हणतात, " यात मी थोडा वेगळा विषय हाताळण्याचा प्रयत्न केलाय. संगीताच्या माध्यमातून हा चित्रपट पुढे जाणारा असून यातील प्रत्येक गाण्यामध्ये एक कथा आहे, जी चित्रपटाला पुढे नेते. याचे श्रेय मी संगीत टीमला देईन. कारण यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. प्रत्येक सीनला  साजेसे गाणे, संगीत त्यांनी दिले आहे. लोककलेला आधुनिकतेचे स्वरूप देण्यात आलेल्या  'तमाशा लाईव्ह'ची कथा एका अशा वेगळया वळणावर जाणार आहे, ज्याचा शेवट अतिशय रंजक असणार आहे. प्रत्येक कलाकाराने आपली व्यक्तिरेखा उत्कृष्ट सादर केली आहे. आमचा हा प्रयोग प्रेक्षकांना आवडेल, अशी आशा आहे.'' 


'प्लॅनेट मराठी' चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, "नजरेसमोर असलेली संकल्पना चित्रपटात प्रत्यक्ष उतरवणे, हे खूप कठीण काम आहे आणि हेच काम संजय जाधव उत्तम करतात. त्यांचा कागदावर जो चित्रपट असतो तोच अगदी हुबेहूब पडद्यावर असतो. म्हणूनच प्रेक्षकांना त्यांचे चित्रपट विशेष आवडतात. यात अनेक प्रयोग केले आहेत. 'तमाशा लाईव्ह'च्या निमित्ताने सोनाली, सचित, सिद्धार्थ यांनी गायकाची भूमिकाही साकारली आहे. आधुनिक विषय असलेला हा एक संगीतमय चित्रपट असून प्रत्येक गाण्यात वेगवेगळे प्रयोग करण्यात आले आहेत. या ट्रेलरने चित्रपट पाहाण्याची उत्सुकता अधिकच वाढवली आहे. त्यामुळे हा चित्रपट म्हणजे मनोरंजनाचा खजिना आहे. या चित्रपटाचा भाग होणे, ही आमच्यासाठीही आनंदाची गोष्ट आहे. 'प्लॅनेट मराठी' नेहमीच नवीन आशयाच्या शोधात असल्याने आम्ही अशा वेगळ्या विषयांना नेहमीच उत्तम व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतो. दर्जेदार आशयसह प्रेक्षकांचे मनोरंजन करणे, हेच आमचे मुख्य उद्दिष्टय आहे. त्यामुळे उत्तमोत्तम कलाकृती केवळ महाराष्ट्रापुरताच मर्यादित न ठेवता त्याचा आनंद देशातील, परदेशातील मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो.'' 


एटीएट पिक्चर्स प्रस्तुत, अक्षय बर्दापूरकर निर्मित या चित्रपटाचे सहनिर्माते सौम्या विळेकर (प्लॅनेट मराठी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी), माऊली प्रॉडक्शन्स, डॉ. मनीषा किशोर तोलमारे, समीर विष्णू केळकर व अजय वासुदेव उपर्वात असून चित्रपटाची कथा मनिष कदम यांची आहे. तर संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. चित्रपटाचे संगीत अमितराज व पंकज पडघन यांचे असून गाण्यांचे बोल क्षितीज पटवर्धन यांचे आहेत. उमेश जाधव यांचे ‘तमाशा लाईव्ह’ला नृत्य दिग्दर्शन लाभले आहे

'साई तुझं लेकरू' 'टाइमपास ३'मधील पहिले धम्माल गाणे प्रेक्षकांच्या भेटीला



 'साई तुझं लेकरू' 'टाइमपास ३'मधील पहिले धम्माल गाणे प्रेक्षकांच्या भेटीला 

https://www.youtube.com/watch?v=s36xsA4rocg

आई -बाबा आणि साईबाबाची शपथ असं म्हणणारा दगडू साईबाबांचा किती मोठा भक्त आहे, हे यापूर्वीच आपण दोन भागांमध्ये पाहिले आहे. दगडूचे हेच साईप्रेम 'टाइमपास ३' मध्येही पाहायला मिळणार आहे. 'साई तुझं लेकरू' हे गाणे नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले असून साईच्या चरणी दगडूचे कुटुंब आणि मित्र प्रार्थना करताना दिसत आहेत. या गाण्यात भाऊ कदम म्हणजेच दगडूचे वडील साईबाबांसमोर आभार मानत, दगडू तुमचाच लेकरू असल्याचे सांगत आहेत. दगडूवर तुमची कृपा कायम अशीच राहूदे, असेही ते सांगत आहेत. हे गाणे भाऊ कदम, प्रथमेश परब, आरती वडगबाळकर, मनमीत पेम, ओंकार राऊत आणि जयेश चव्हाण यांच्यावर चित्रित करण्यात आले असून या गाण्याला अमितराज आणि आदर्श शिंदे यांचा भारदस्त आवाज लाभला आहे. तर क्षितीज पटवर्धन यांनी लिहिलेल्या या गाण्याला अमितराज यांनीच संगीतबद्धही केले आहे. राहुल ठोंबरे आणि संजीव होवलादार यांचं  नृत्यदिग्दर्शन आहे. 


यापूर्वीही पहिल्या आणि दुसऱ्या भागातील गाण्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. 'टाइमपास ३'मधील गाणीही प्रेक्षकांच्या ओठांवर अशीच रुळतील. झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्सची निर्मिती असलेल्या 'टाइमपास ३' चे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले असून यात दगडूच्या आयुष्यात आलेली 'पालवी' पाहायला मिळणार आहे. या पालवीची भूमिका हृता दुर्गुळे हिने साकारली आहे. 'टाइमपास ३' २९ जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Saturday, 2 July 2022

'वाय'च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव



 'वाय'च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

 


समाजात वावरताना आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना घडत असतात, ज्यांचा आपल्याला थांगपत्ताही नसतो आणि अगदीच या घटनांबाबत कळले तर त्याकडे आपण सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतो. त्याचेच मिश्र स्वरूपातील पडसाद मग आपल्या समाजात उमटतात. अजित वाडीकर दिग्दर्शित 'वाय' या चित्रपटात अशाच गोष्टीवर भाष्य करण्यात आले आहे, जी वर्षानुवर्षं आपल्या समाजात घडत आहे. मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. काही दिवसांपूर्वीच हा चित्रपट प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांकडून 'वाय'ला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यात मुक्ता बर्वे, प्राजक्ता माळी, नंदू माधव, ओमकार गोवर्धन, रसिका चव्हाण, सुहास शिरसाट, संदीप पाठक, रोहित कोकाटे, संदीप दंडवते, प्रदीप भोसले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा एक असा संवेदनशील विषय आहे, ज्याचे गांभीर्य चुकीच्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर येऊ नये, याची काळजी 'वाय'मध्ये कटाक्षाने घेण्यात आली आहे. त्यामुळेच 'वाय'वर  प्रेक्षक आणि समीक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव होत असून या चित्रपटाबद्दलच्या अनेक प्रतिक्रिया प्रेक्षकांनी शेअर केल्या आहेत आणि या निमित्ताने एक भयाण वास्तव आपल्या समोर आले आहे. 


या चित्रपटाच्या माध्यमातून स्त्री भ्रूण हत्या हा समाजातील एक अतिशय घृणास्पद प्रकार प्रेक्षकांसमोर आला आहे. राज्यातील अनेक भागात हा प्रकार आजही सर्रास चालतो आणि यात कोणालाच काही गैर वाटत  नाही. 'वाय'च्या निमित्ताने वैद्यकीय विभागात चालणारी ही लाजिरवाणी गोष्ट पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. अनेकदा स्त्रियांना हा निर्णय दबावाखाली घ्यावा लागतो. याची साधी वाच्यताही कुठे करता येत नाही. मात्र 'वाय' पाहिल्यानंतर अनेक महिला प्रेक्षक या विषयावर उघडपणे भाष्य करण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. स्वतःहून पुढे येऊन अनेक महिलांनी आपले हृदयस्पर्शी अनुभव ‘वाय’च्या टीमसोबत शेअर केले.  काही प्रेक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया संदेशाद्वारे, फोनद्वारे, सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. चित्रपट पाहताना आपलीच व्यथा पडद्यावर मांडण्यात आल्याचा भास झाल्याचेही अनेकांनी सांगितले. अनेकांनी हे प्रकार आपल्या आजूबाजूला घडल्याचेही सांगितले. तर यातील अनेक जणी 'या' घटनेतून गेल्या होत्या.समाजातील सत्य परिस्थिती यात हुबेहूब दाखवण्यात आली आहे. मेंदू सुन्न करणाऱ्या या प्रतिक्रिया असून कित्येक अनुभव हे निःशब्द करणारे आहेत. अनेक वर्षांपासून चालत आलेल्या या अर्थहीन परंपरेला  'वाय'च्या निमित्ताने कुठेतरी पूर्णविराम लागेल, अशाही प्रतिक्रियाही काही महिलांनी दिल्या आहेत. काही प्रेक्षकांनी मुक्तासारखी ताकद, प्राजक्ता सारखी निर्णय घेण्याची धमक आमच्यात यावी, असेही म्हटले आहे. त्यामुळे या चित्रपटातून देण्यात आलेला संदेश 'ती'ला प्रेरणा आणि 'या' संघर्षाशी लढा देण्याची ताकद देणारा आहे. जो संदेश या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा आहे, तो योग्यरित्या त्यांच्यापर्यंत पोहोचतोय, हे या प्रतिक्रियांवरून कळतेय. मात्र त्यांच्या प्रतिक्रिया आणि अनुभव मन सुन्न करणाऱ्या आहेत. आजच्या काळातही अशा घटना घडत आहेत, हे खरंच दुर्दैवी आहे. हा खरंच 'ती'चा तिच्याशीच लढा आहे. हा कुठेतरी थांबला पाहिजे आणि यासाठी 'ती'नेच पुढाकार घेतला पाहिजे.''

Friday, 1 July 2022

'राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध अभिजित पानसे- अक्षय बर्दापूरकर पुन्हा एकत्र



 'राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

अभिजित पानसे- अक्षय बर्दापूरकर पुन्हा एकत्र 





सध्या महाराष्ट्रातील वातावरण तापलेले असून राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. काही अनपेक्षित उलथापालथ होत आहे. याच पार्श्वभूमीवर आधारित 'राजी-नामा' ही जबरदस्त वेबसीरिज 'प्लॅनेट मराठी' ओटीटीवर लवकरच झळकणार आहे. प्लॅनेट मराठी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी प्रस्तुत 'राजी-नामा'चे दिग्दर्शन अभिजित पानसे यांनी केले असून वेबविश्व हादरून सोडणाऱ्या 'रानबाजार'नंतर अभिजित पानसे आणि 'प्लॅनेट मराठी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर ही जोडी पुन्हा एकदा 'राजीनामा'च्या निमित्ताने एकत्र येणार आहे. प्रियम गांधी मोदी यांच्या 'ट्रेडिंग पॉवर' या पुस्तकावर आधारित 'राजी-नामा'ची संकल्पना आणि लेखन चिन्मय मांडलेकर यांनी केले असून आता लवकरच प्रेक्षकांना पुन्हा एकदा सनसनाटी विषय पाहायला मिळणार आहे.


   अभिजित पानसे आणि राजकारणातील ज्वलंत विषय हे एक समीकरणच आहे. त्यांच्या चित्रपटाचे विषय हे नेहमीच हटके असतात. आंतरराष्ट्रीय दर्जाचा  आशय असलेल्या 'रानबाजार'ला जगभरातील प्रेक्षकांनी पसंती दर्शवली. यशोशिखरावर पोहोचलेल्या  'रानबाजार'मधील सत्तानाट्यानंतर आता 'राजी-नामा'मध्येही 'खुर्ची'साठी चाललेले राजकीय युद्ध पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता हा ‘राजी-नामा’ मंजूर झाल्यावर सत्ताचक्रं कशी फिरणार, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

A rhythmic club dance number “Paisa Paisa” by Star Boy LOC and Nia Sharma from the House of BCC Music Factory and Amit Majithia








 A rhythmic club dance number “Paisa Paisa” by Star Boy LOC and Nia Sharma from the House of BCC Music Factory and Amit Majithia



BCC Music Factory and Amit Majithia presents Paisa Paisa, Singer/ Lyrics - StarBoy LOC, Female Lead - Nia Sharma, Music- G Skillz, Producer- Amit Majithia, Project by - Occasionz360, Director- Gaurav Mehra

Song Link- https://youtu.be/Td1x_rzfqwE

While party songs have become a mainstay of music labels, singers, and composers; few manage to bring as much swag to it as Nia Sharma, Star Boy LOC, Amit Majithia, Gaurav Mehra, G Skills. BCC Music Factory, and Amit Majithia’s latest release ‘Paisa Paisa’ is a rhythmic club dance number with funky beats and Punjabi lyrics. High on beats, the track brings a perfect mix of fun with a steady hypnotic beat which will keep the listeners engrossed. It opens with a fun opening verse and then launches into club mode with the party beats. When the song speeds up the tempo, it sounds very party- which enhances the danceable mood of the song.

Presented by BCC Music Factory and Amit Majithia who practically breathes and lives entertainment has always been powered by innovation. While Amit takes it as a responsibility, to be honest to our fans, he strives to present only and only original content to his audience “We at BCC Music Factory are driven by passion and innovation. We work hard to give the best to our audience"

Rapper Star Boy LOC, known for songs such as "Dili Se Hu B.C', ‘Breakup Trip’,  ‘Fire’, and ‘Million Dollar Girl’ has always been in the limelight for his quirky looks and catchy raps. Sharing some exclusive anecdotes about Paisa Paisa, he says “It was a very different experience because this song is very unique. When it started we didn't anticipate using Paisa Paisa as a hook line but the beat was so good that it fits perfectly. G Skillz has done a terrific job. It was so organic that we started humming the track. We first made the hook line before the lyrics of the song which was written in 15-20 mins. We stuck to our
naughtiness and added a few names of the girls so that they wait to hear their names & make reels on that. Keeping our fingers crossed" 

Nia Sharma has been entertaining viewers for over a decade. If you’ve ever seen her in front of the camera, you’ll probably agree that she was simply born to be in the spotlight. Featuring as the female lead in Paisa Paisa, Nia quotes saying "This being almost my 12th music video, I’ve dabbled in all kinds of genres by now. From dance numbers to heartbreak songs, I’ve left probably nothing. ‘Paisa Paisa’ sounded quirky from the title itself and the storyboard was equally fun to be a part of. I hope it finds its way into the clubs soon and leaves everyone grooving to it"

As a director who is full of ideas, Gaurav Mehra aims to venture into unexplored genres of direction by experimenting with new themes* “The song is shot very well. We had a lot of fun while shooting. Amit Majithia had given me the creative freedom to experiment with ideas & concepts. Starboy LOC & Nia Sharma are outstanding in the song. G Skillz is fab, as we all know it. The video is lavish, it has more than 10 sets, and the lighting of the song is amazing. I would like to thank the entire technical team for making this project so grand, thank you"

G Skillz's knack for upbeat music has given the Punjabi music industry peppy tracks like ‘Chandigarh Police’, ‘Fall’, ‘Galat Bande’ and many more says “ “Had a great time composing the track. We went back and forth with the tune, and after hours and hours of brainstorming we came up with this composition. We wanted it to be catchy, we want people to sing the song after listening to"

Occasionz360 celebrity management company in partnership with BCC Music Factory owned by the visionary Manish Sharma "Occasionz360 is honored to be associated with BCC Music Factory as partners. This synergy is the result of our passion to present the audience with good content with utmost commitment and  enthusiasm"