Tuesday, 30 August 2022

United White Flag brings a brand new track ‘Sorry Jaanu’ feat. Goldie & Sana Sultan

 



United White Flag brings a brand new track ‘Sorry Jaanu’ feat. Goldie & Sana Sultan


Watch the song here- https://youtu.be/RA5LrLU6MpA

Singer / Lyrics/ Composer - Goldie, Music/ Video – Director Ramji Gulati, Produced By Jitin Agrawal, Rajesh Talesara, Ramji Gulati



29th August 2022 in Mumbai- 
United White Flag has just released their latest single - ‘Sorry Jaanu’ feat. Goldie & Sana Sultan. The viral teaser had taken the internet by storm right moments after its release. Goldie has lent his mesmerizing vocals to the track. A Ramji Gulati directorial brings life to Goldie’s beautiful composition and hard-hitting lyrics.

Ramji Gulati elaborates about the song “As a director and producer, I try to make each song as unique as the previous one. The video is shot differently, it’s stylish, modern, and polished. Goldie and Sana have a  beautiful chemistry, it’s a treat to watch them. We hope to impress our fans”

Goldies’s take on the song is "It is a millennial track. It took me hours and days to create the music and write the lyrics of the song. I hope all of you love the song and appreciate all the hard work we have put in."

Sana Sultan says “I am so happy to work with Ramji Gulati. He is a genius. Goldie is a friend, it was great working with him. Keeping our fingers crossed”

Jitin Agrawal
 says “Excited to present our new track Sorry Jaanu. It’s musically and lyrically rich with potential to trend on all the social media platforms”

Rajesh Talesara
 says “Excited and looking forward to the response from the audience. Sorry Jaanu is one of our best works for far, I would like to thank the entire cast and crew for putting in their heart and soul”

Friday, 26 August 2022

आदर्श शिंदे यांचे 'श्रीगणेशा देवा श्रीगणेशा...' प्रेक्षकांच्या भेटीला

 


आदर्श शिंदे यांचे  'श्रीगणेशा देवा श्रीगणेशा...' प्रेक्षकांच्या भेटीला 

https://www.youtube.com/watch?v=mwlVAL1X2gA

लवकरच गणपती बाप्पाचे आगमन होणार असून त्याच्या आगमनाची सर्वत्र जय्यत तयारी सुरु आहे. सर्वत्र चैतन्यदायी वातावरण आहे. त्यातच आता बाप्पाच्या स्वागतासाठी ''अल्ट्रा मीडिया ॲण्ड  एन्टरटेन्मेंट प्रा. लि.'' घेऊन आले आहे, ''श्रीगणेशा देवा श्रीगणेशा...'' हे आल्हाददायी गाणं. आदर्श शिंदे यांच्या जल्लोषमय आवाजातील या गाण्याला ओंकार घाडी यांचे शब्द लाभले असून काशी रिचर्ड यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे. गणेशोत्सवात सर्वांनाच ठेका धरायला लावणाऱ्या या गाण्याची निर्मिती सुशीलकुमार अग्रवाल यांनी केली आहे. 

ढोल ताशांचा गजर ... गुलालाची उधळण.. बाप्पाचा जयघोष... असे गणेशोत्सवातील भारावून जाणारे वातावरण या गाण्यात पाहायला मिळत आहे. बाप्पाविषयीची भाविकांची आत्मीयता या भावपूर्ण गाण्यातून व्यक्त होत आहे. या गाण्याबद्दल  गायक आदर्श शिंदे म्हणतात, ''मुळात बाप्पाचे गाणं गायला मला नेहमीच आवडते. भक्तिमय गाणी गाण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. ''श्रीगणेशा देवा श्रीगणेशा...'' हे गाणेही असेच स्फूर्तिदायी गाणे आहे. हे गाणे भाविकांनाही आवडेल, अशी मी आशा व्यक्त करतो.'' 


त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव  ''श्रीगणेशा देवा श्रीगणेशा...''ने सर्वत्र जल्लोषात आणि थाटात साजरा होणार आहे.

Syrma SGS Technology shares makes strong debut, closes 42% premium to issue price



 


Syrma SGS Technology shares makes strong debut, closes 42% premium to issue price

Mumbai, August 26, 2022:Leading EMS Company Syrma SGS Technology Limitedone of the fastest growing Indian headquartered providers of electronic design and manufacturing services for global & domestic Original Design and equipment manufacturers (ODMs and OEMs),made its debut on a strong footing and closedat a premium of 42% from their issue price of Rs 220 on the higher side of the price band. in the stock exchange.

The scrip listed Rs 262per share on BSE and Rs 260 per share on NSE, ata premium of 19.09 % and 18.18% respectively. The company's share price closed at Rs 313.05per share on the BSE, a 42.30% premium, and at Rs 312per share on the NSE, a 41.82% premium.

As per NSE, the total quantity traded stood at 599.61 lakh shares, on BSE the total Quantity stood at 54.77lakh shares. Total Turnover (BSE+NSE) on Day 1 stood at Rs 1901.50crore.

Mr. Sandeep Tandon, Promoter and Executive Chairman–Syrma SGS Technology Limited said“We are humbled by the faith of investors in our company. We are conscious that we are now custodians of the capital of a lac plus shareholders and we have to work even harder to justify their faith in us. We are very confident about the future outlook of the company."

The Market Capitalization of the Company at today’s closing price stood at Rs. 5,516.85 Crore as per BSE and Rs. 5,498.35 Crore as per NSE.

The IPO consists of a fresh issue of equity shares aggregating to 766 crore and an offer for sale (OFS) of up to 3,369,360 equity shares  and the issue closed on 18thAugust 2022.

 

The offer received bids of 93,14,84,536 equity shares against the offered 2,85,63,816 equity shares, at a price band of Rs 209-220, according to the data available on the stock exchanges. The portion reserved for Qualified Institutional Buyers led from the front and was subscribed 87.56 times.The reserved portion of non-institutional investors witnessed a subscription of 17.50 times.The Retail Investors portion was subscribed 5.53 times.Overall the issue was subscribed 32.61 times on the final day of bidding. The company raised Rs 252 crore from anchor investors a day ahead of its initial share sale. The company raised Rs 840 crore through the IPO.

Dam Capital Advisors Limited, ICICI Securities Limited, and IIFL Securities Limited are the book running lead managers to the issue, and Link Intime India Private Limited is the registrar of the Issue.

Siju Wilson & Kayadu Lohar powerhouses of energy in "Pootham Varunnedi"

 Siju Wilson & Kayadu Lohar powerhouses of energy in "Pootham Varunnedi"



Siju Wilson & Kayadu Lohar powerhouses of energy in "Pootham Varunnedi"

Song Link: https://www.youtube.com/watch?v=Q0wLYvz-vd4

 

"Pootham Varunnedi" from Pathonpatham Noottandu starring Siju Wilson & Kayadu Lohar is a power play with powerful music, synth background and percussion. With the lead star cast's rustic looks, aggressive mannerisms and dynamic energy, they rule the song from start to finish and in each frame. While the song is catchy, the high-octane video makes it even more thrilling for the audience.

 

Kumar Taurani said, "With the first single Pootham Varunnedi from Pathonpatham Noottandu Tips has now entered the Malayalam Music market. An amazing combination of M. Jayachandra and Sayanora Philip has elevated this single, the song is dynamic in nature, and the rustic feel of the vocals, music and visuals creates it be a perfect landscape for the film. We've always wanted to diversify our music library and now with Malayalam music and Pathonpatham Noottandu we inch closer to our goal."

 

Lead actor Siju Wilson says "It was exciting to shoot for this high-octane song, it radiates so much energy. To be able to be a part of the song sung by Sayanora and composed by M. Jayachandra sir is an experience itself"

 

Lead actress Kayadu Lohar says, "When I first heard the song, I couldn't stop tapping my feet. Jayachandra sir has created magic and the prowess of Sayanora's voice has elevated it. The choreography is raw and radiates pure energy."

 

The epic historical drama "Pathonpatham Noottandu" is directed by Vinayan, produced by Gokulam Gopalan, starring Siju Wilson, Anoop Menon, Chemban Vinod, Indrans, Kayadu Lohar, Gokulam Gopalan, Sudev Nair, Senthil Krishna, Suresh Krishna, Sudheer Karamana, Vishnu Vinay, Deepti Sati, Poonam Bajwa etc. Pathonpatham Noottandu is set to hit the theatres on 8th September.


Wednesday, 24 August 2022

अल्ट्रा मीडिया ॲण्ड एन्टरटेन्मेंटचे आता मराठी ओटीटीमध्ये पदार्पण

 



अल्ट्रा मीडिया ॲण्ड  एन्टरटेन्मेंटचे आता मराठी ओटीटीमध्ये पदार्पण

 मागील चार दशकांपासून चित्रपट, मालिका, संगीत निर्मिती आणि वितरण क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या अल्ट्रा मीडिया  ॲण्ड  एन्टरटेन्मेंटने प्रेक्षकांचे नेहमीच विविध माध्यमांमधून मनोरंजन केले. प्रेक्षकांचे पारंपरिक माध्यमांतून मनोरंजन केल्यानंतर आता अल्ट्रा आणखी एका नवीन वाटचालीसाठी सज्ज झाले आहे. लवकरच अल्ट्रा मीडिया  ॲण्ड  एन्टरटेन्मेंट  मराठी ओटीटी क्षेत्रात पदार्पण करत आहे. यानिमित्ताने लोकप्रिय चित्रपट, वेबसीरिज, नाटकं, गाणी असा मनोरंजनाचा खजिना प्रेक्षकांना दाखवण्याचा अल्ट्राचा मानस आहे.

अल्ट्रा मीडिया  ॲण्ड  एन्टरटेन्मेंट  प्रा. लि.चे एमडी आणि सीईओ सुशीलकुमार अग्रवाल म्हणतात, ''महाराष्ट्राला वैभवशाली संस्कृतीचा वारसा लाभला असून मुळात मला मराठी भाषेबद्दल खूप अभिमान आहे. ही संस्कृती चित्रपट, वेबसीरिज, नाटकं, गाण्यांच्या माध्यमातून जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मनोरंजन क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. अल्ट्राने नेहमीच काळानुसार बदलत जाणारे तंत्रज्ञान आत्मसात केले. ओटीटीची निर्मिती हा याचाच एक भाग आहे. या माध्यमातून आम्ही आमचा सर्वोत्तम आशय आमच्या प्रेक्षकांसाठी, जागतिक स्तरावर अधिक सहजरित्या उपलब्ध करू शकतो आणि त्यामुळे प्रेक्षकांनाही एकाच ठिकाणी मनोरंजनाचा आनंद घेता येईल.''

 त्यामुळे आता लवकरच प्रेक्षकांना काहीतरी नवीन मनोरंजनात्मक पाहायला मिळणार, हे नक्की !

'श्रीगणेशा' ने होणार गणेशोत्सवाचा उत्साह द्विगुणित !



 'श्रीगणेशा' ने होणार गणेशोत्सवाचा उत्साह द्विगुणित !


गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून सर्वत्र आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे. यंदाचा हा गणेशोत्सव अधिक चैतन्यमय आणि खास करण्यासाठी ''अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि.'' घेऊन येत आहे एक भक्तिमय गाणं. 


''श्रीगणेशा देवा श्रीगणेशा...'' हे गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या गाण्याचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून या गाण्याला आदर्श शिंदे यांचा भारदस्त आवाज लाभला आहे. तर सगळीकडे सकारात्मक वातावरण निर्माण करणाऱ्या या गाण्याला ओंकार घाडी यांनी शब्दबद्ध केले असून काशी रिचर्ड यांचे या गाण्याला संगीत लाभले आहे. ‘’अल्ट्रा मीडिया ॲंड एंटरटेनमेंट प्रा. लि. प्रस्तुत या गाण्याचे सुशिलकुमार अग्रवाल निर्माता आहेत. 


 गणपती हा बुद्धीचा दैवत आहे, विघ्नहर्ता आहे, तारणकर्ता आहे. त्याची मनोभावे आराधना केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. महाराष्ट्रात गणेशोत्सव सर्वत्र अगदी उत्साहात साजरा केला जातो. त्यात 'श्रीगणेशा' या गाण्याने हा उत्साह द्विगुणित होणार आहे.

Saturday, 20 August 2022

"My only competition is myself” says Pyaar Ka Punchnama actor Raayo S. Bakhirta

 



"My only competition is myself” says Pyaar Ka Punchnama actor Raayo S. Bakhirta



Blame his appealing looks and incredible talent, slightly shy but exceptionally ambitious actor Raayo S. Bakhirta has triumphed upon the hearts of millions with his stint as Vikrant Chaudhary in Pyaar Ka Punchnama. He was praised and loved for his upar se tough, andar se softy” character in the film.

Raayo says his competition is with himself as he believes actors cannot be compared because there’s something different about each one of them “I believe each actor is versatile and different so you can’t compare them. I’d prefer comparing my own work from film to film”


 Films like - Ishk Actually, directed by Anish Khanna; 706, directed by Sharavankumar Tiwari and Unknown Caller, directed by Shantanu Anant Tambe may not have been the most commercial films but they certainly gave him a loyal and a niche fan base.

Known for his expressive eyes and controlled acting, he has been a critic favorite. Raayo will soon be seen in films - Dna Mein Gandhiji, directed by Sandeep Nath; Brunie, directed by Suraj Chitre and Saksham, directed by Shubhanshu Satyadeo.

Talking about his choice of works, Raayo elaborated by saying I just want to act in as many different characters as possible. In the past I have said no to some very important people, because I didn't understand the ways of this industry. You live, you learn. I choose from what comes my way. I am not here to judge, there is an audience for all kinds of content

Thursday, 11 August 2022

कोण होणार राज्याचा मुख्यमंत्री ? दिवटे की मुरकुटे? ‘मी पुन्हा येईन’चे दोन महाएपिसोड्स प्रेक्षकांच्या भेटीला


 



कोण होणार राज्याचा मुख्यमंत्री ? दिवटे की मुरकुटे? 

‘मी पुन्हा येईन’चे दोन महाएपिसोड्स प्रेक्षकांच्या भेटीला 



प्लॅनेट मराठी निर्मित ‘मी पुन्हा येईन’ वेबसीरिजचा गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलाच बोलबाला सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर ही वेबसीरिज प्रदर्शित झाली आणि त्याला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. आता 'मी पुन्हा येईन'चे  अखेरचे दोन भाग येत्या १२ ऑगस्टला  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना मिळणार आहेत. 


 पळून गेलेले ४ अपक्ष आमदार परत रिसॉर्टवर कसे येतात?, अपक्ष आमदारांनी सत्तेचा पाठिंबा काढल्यावर तपास यंत्रणेचा बेमालूमपणे वापर?, पोलिसांवरील दबावतंत्र, राजकारणी नेहमी कसे सर्वश्रेष्ठ असतात? हे सांगण्याचा आमदारांचा प्रयत्न, राजकारण्यांच्या सोयीप्रमाणे अधिकाऱ्यांचा वापर कसा केला जातो? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे येत्या १२ ऑगस्टला प्रेक्षकांना मिळणार आहेत. मुख्य बाब म्हणजे वेबसीरिजच्या शेवटच्या दोन भागात कोण सत्तास्थापन करणार ? नक्की दिवटे की मुरकुटे ? याचे उत्तर मिळणार आहे. 


‘प्लॅनेट मराठी’ चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता लवकरच शेवटचे दोन महाएपिसोड्स प्रदर्शित करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे.  राजकारणावर भाष्य करणारी ही एक व्यंगात्मक वेबसीरिज आहे. राजकारणातील सध्याची घडामोड पाहता प्रेक्षकांना वेबसीरिज एक वेगळा विचार करायला भाग पाडणार हे नक्कीच. शेवटच्या दोन महाएपिसोड्समध्ये नक्की कोण मुख्यमंत्री होणार हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.” 


अरविंद जगताप दिग्दर्शित ‘मी पुन्हा येईन’मध्ये प्रमुख सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, सिद्धार्थ जाधव, रुचिता जाधव, भारत गणेशपुरे यांच्या प्रमुख भूमिका असून याची निर्मिती प्लॅनेट मराठी, गौतम कोळी व जेम क्रिएशन्सने केली आहे.

अखेर तुफान व्यक्तिमत्वावर आधारित तुफान चित्रपटाचा दणकेदार ट्रेलर प्रदर्शित.


 अखेर तुफान व्यक्तिमत्वावर आधारित तुफान चित्रपटाचा दणकेदार ट्रेलर प्रदर्शित.

मुंबईतील गॅंगवॉरमधील सर्वात मोठे नाव म्हणजे 'अरुण गुलाब गवळी' उर्फ 'डॅडी'. त्यांच्या 'दगडी चाळी'वर आधारित 'दगडी चाळ' हा चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. ज्याप्रमाणे डॅडींनी अवघ्या मुंबईवर राज्य केले तसेच या चित्रपटानेही अवघ्या महाराष्ट्रावर राज्य केले. आता पुन्हा एकदा अवघ्या महाराष्ट्रावर राज्य करायला 'दगडी चाळ २' सज्ज झाला असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टरचे अनावरण ‘रिअल डॅडीं’च्या हस्ते दगड चाळीत झाले असून ट्रेलर पाहून चित्रपट पाहाण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित 'दगडी चाळ २' या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत कणसे यांनी केले असून रत्नकांत जगताप कार्यकारी निर्माता आहेत. येत्या १९ अॅागस्ट रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. 



'दगडी चाळ २'मध्ये आपल्याला सूर्या आणि डॅडी यांच्यातील एक वेगळे नाते पाहायला मिळणार आहे. एकेकाळी डॅडींचा उजवा हात असणारा सूर्या आता त्याच्या कुटुंबासोबत गॅंगवॉरच्या विळख्यातून बाहेर पडून एक साधं सोप्पं आयुष्य जगताना दिसत आहे. मात्र डॅडी आणि सूर्या यांच्यात असे काही घडले आहे, ज्याने सूर्या डॅडींचा तिरस्कार करू लागला आहे. आता त्यांच्यात नेमके काय घडले आहे, त्यांच्या नात्यात कडवटपणा का आला आहे, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. 


दिग्दर्शक चंद्रकांत कणसे चित्रपटाबद्दल म्हणतात की, "मकरंद देशपांडे यांनी साकारलेली डॅडींची भूमिका खूपच वजनदार असून 'दगडी चाळ २' हा पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर वेगळीच छाप पाडेल, अशी खात्री आहे. या वेळी या चित्रपटात गॅंगवॅारसोबत राजकारणही पाहायला मिळणार आहे. चित्रपटाबद्दल निर्मात्या संगीता अहिर म्हणतात, ‘’ प्रेक्षकांनी ‘दगडी चाळ’ला भरभरून दिलेल्या प्रतिसादामुळेच आम्ही याचा सिक्वेल काढण्याचा निर्णय घेतला. जसे प्रेम आमच्या प्रेक्षकांनी ‘दगडी चाळ’ला दिले तसेच प्रेम आमचे हक्काचे प्रेक्षक ‘दगडी चाळ २’लाही देतील, अशी मला अपेक्षा आहे. लवकरच ‘दगडी चाळ २’ आपल्या भेटीला येत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट १९ ऑगस्ट रोजी तुमच्या जवळच्या चित्रपगृहात येतोय.

Wednesday, 10 August 2022

समायरा'तील 'सुंदर ते ध्यान' गाण्याला आधुनिकतेचा साज


 समायरा'तील 'सुंदर ते ध्यान' गाण्याला आधुनिकतेचा साज 

वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरु होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक पदयात्रा. याचा अनुभवच अतिशय अनोखा असतो. असाच एक  सुंदर अनुभव देणारे 'समायरा' चित्रपटातील 'सुंदर ते ध्यान' हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या सुंदर गाण्याला आधुनिकतेचा साज चढवण्यात आला आहे. संत तुकाराम यांचे शब्द लाभलेल्या या गाण्याला जुईली जोगळेकर हिचा मंत्रमुग्ध करणारा आवाज लाभला आहे.  स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधात निघालेली 'समायरा' आणि तिच्या त्या प्रवासात तिला झालेला बोध या गाण्यातून उलगडत आहे. ऋषी श्रीकृष्ण देशपांडे दिग्दर्शित 'समायरा’ चित्रपट येत्या २६ ऑगस्टपासून चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

        

     चित्रपटाचे दिग्दर्शक  ऋषी श्रीकृष्ण देशपांडे गाण्याविषयी म्हणतात, '' प्रत्येक वारकऱ्याची आपली एक कहाणी असते. तशीच समायराची सुद्धा आहे. समायराची ही अनन्यसाधारण कथा, व्यथा आणि त्यातून तिला झालेली विठूची प्रचिती म्हणजे हे गाणे. विठ्ठल सर्वांची माउली. सर्वांचा तारणहार आहे आणि याची प्रचिती समायरालाही येत आहे. तिचा आयुष्याकडे पाहाण्याचा दृष्टिकोन, अनेक प्रश्नांनी व्याकुळ झालेले तिचे अस्थिर मन विठूचरणी येऊन असे  शांत झाले आहे, हे आपल्याला या गाण्यातून दिसते. या गाण्याला जुईली यांनी खूप सुंदर सादर केले आहे. कीर्तनाला दिलेले हे नवीन रूप श्रोत्यांना नक्कीच भावणारे आहे.'' 

     

    ग्लोबल सेवा एलएलपी प्रस्तुत, आद्योत फिल्म्सच्या सहयोगाने, 'समायरा'ची निर्मिती डॉ. जगन्नाथ सुरपूरे, रतन सुरपूरे, शशिकांत पानट, योगेश आळंदकर आणि ऋषी श्रीकृष्ण देशपांडे यांनी केली असून या चित्रपटाची पटकथा आणि संवाद सुमित विलास तांबे यांचे आहेत

Tuesday, 9 August 2022

सलमान खानने दिल्या 'दगडी चाळ २'ला शुभेच्छा





 सलमान खानने दिल्या 'दगडी चाळ २'ला शुभेच्छा 



'मंगलमूर्ती फिल्म्स' आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित 'दगडी चाळ २' ची सध्या जोरदार चर्चा आहे. 'दगडी चाळ' मध्ये 'डॅडीं'चा विश्वासू सूर्या 'दगडी चाळ २'मध्ये अचानक तिरस्कार करू लागला आहे, याचे कारण जाणून घेण्याची उत्सुकता सर्वच प्रेक्षकांना लागली आहे. त्यातच नुकतेच या चित्रपटातील 'राघू पिंजऱ्यात आला' हे एक जबरदस्त गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे या गाण्याची खासियत म्हणजे या गाण्यातून बॉलिवूड अभिनेत्री डेझी शाह हिने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. त्यामुळे या चित्रपटाची एकंदरच सर्वत्र हवा आहे. आता तर या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान यानेही सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या आहेत. 


   डॅडी आणि सूर्याचे नाते आपण 'दगडी चाळ' मध्ये यापूर्वीच पाहिले आहे. डोकॅलिटीचा वापर करून सूर्या अल्पावधीतच डॅडींचा उजवा हात बनला. मात्र 'दगडी चाळ २' मध्ये असे काय घडले की, सूर्या डॅडींचा इतका रागराग करतोय. या सगळ्यामागचे नेमके कारण काय, हे १८ ऑगस्टला उलगडणार आहे.

Monday, 8 August 2022

Syrma SGS Technology Limited’s Rs 840 crore Initial Public Offering to open onAugust 12, 2022, sets price band at ₹209to ₹220per Equity Share



 Syrma SGS Technology Limited’s Rs 840 crore Initial Public Offering to open onAugust 12, 2022, sets price band at ₹209to ₹220per Equity Share

 

Mumbai, August 08, 2022:Leading EMS Company Syrma SGS Technology Limited (“The Company”) has fixed the price band at ₹209to ₹220per Equity Share for its maiden public offer. The initial public offering (“IPO” or “Offer”) of the Company will open on Friday August 12, 2022, for subscription and close on Thursday, August 18, 2022. Investors can bid for a minimum of 68Equity Shares and in multiples of 68 Equity Shares thereafter.

 

The IPO consists of a fresh issue of equity shares aggregating to ₹766 crore and an offer for sale (OFS) of up to 3,369,360equity shares.

 

The Offer is being made through the Book Building Process, wherein not more than 50% of the Offer shall be available for allocation to Qualified Institutional Buyers, not less than 15% of the Offer shall be available for allocation to Non-Institutional Bidders and not less than 35% of the Offer shall be available for allocation to Retail Individual Bidders.

 

Promoted and led by Sandeep Tandon and Jasbir Singh Gujral, Syrma SGS, is a technology-focused engineering and design company engaged in turnkey electronics manufacturing services (“EMS”)specializes in precision manufacturing.

From Manufacturing High Precision Coils for Hard Disk Drives and USB drives for the IT Industry; Set Top Box requirements for the Home Entertainment Industry; 4G and now 5G Modules for the Telecom Industry; Hall Sensor PCBAs, Vehicle Tracking Systems, Toll Management Systems, Beacons, 4W Lighting System Boards, EV Battery Management Systems for the Automotive End Use Industry; Automatic Dimmers, Induction Cooktop Components, Boiler Management PCBA units, Energy Efficient Electronic Inverters, Home Appliance Control PCBAs for the Consumer Products Industry; Direct Digital Dental X-ray FGPA Controllers, PCBAs for X-Ray Machines, Smart Canes for Visually Challenged People, Augmented Reality Equipment for Ophthalmological Applications  addressing the requirements of the Healthcare Industry, the company caters to diverse industries and has come a long way since its incorporation in 2004. It stands to be one of the leading Printed Circuit Board Assembly manufactures in India and top global manufacturers of custom RFID tags.

Its marquee customers include TVS Motor CompanyLimited, A. O. Smith India Water Products Pvt. Ltd., Robert Bosch Engineering and Business Solution Pvt Ltd,Eureka Forbes Ltd Limited, CyanConnode Limited, Atomberg Technologies Private Limited, and Total PowerEurope B.V. The companies aggregated wallet share from its top 10 and top 20 customers increased by CAGR of 26.20% and 25.79% respectively from FY20 to FY22.

It currently operates through eleven strategically located manufacturing facilities in north India (i.e. Himachal Pradesh, Haryana and Uttar Pradesh) and south India (i.e. Tamil Nadu and Karnataka) and three dedicated R&D facilities, two of which are located in India at Chennai, Tamil Nadu and Gurgaon, Haryana respectively, and one is located in Stuttgart, Germany.

Syrma’s Proforma EBIDTA, considering SGS Tekniks and Perfect ID revenues from operations attributable to industrial appliances industry, consumer products industry, automotive industry, IT industry and other industries grew at a CAGR of 15.83%, 15.11%, 37.40, 821.03% and 426.59%, respectively from Fiscal 2020 to Fiscal 2022.

Dam Capital Advisors Limited, ICICI Securities Limited, and IIFL Securities Limited are the book running lead manager to the issue and Link Intime India Private Limited is the registrar to the offer.The equity shares are proposed to be listed on BSE and NSE.

Thursday, 4 August 2022

दगडी चाळ२' मध्ये पुन्हा झळकणार 'कलरफुल' पूजा सावंत

 



दगडी चाळ२' मध्ये पुन्हा झळकणार

'कलरफुल' पूजा सावंत

'दगडी चाळ २' ची घोषणा झाल्यापासूनच सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती ती, यात कोणते चेहरे झळकणार ?  हळूहळू हे चेहरे गुलदस्त्याबाहेर येऊ लागले असून आता प्रेक्षकांसमोर कलरफुल सोनल म्हणजेच पूजा सावंतची व्यक्तिरेखा समोर आली आहे. त्याच्यबरोबर सूर्या आणि सोनलच्या तरल प्रेमकहाणीच्या वेलीवर आता अंशुमन नावाचे ‘बटरफ्लाय’ बसले आहे. 'दगडी चाळ २'मध्ये प्रेक्षकांना सूर्या आणि सोनलचा मुलगाही पाहायला मिळणार आहे. नुकतेच त्याचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून एक कौटुंबिक कहाणी यात पाहायला मिळणार हे नक्की. मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित,  चंद्रकांत कणसे दिग्दर्शित 'दगडी चाळ २' येत्या १८ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


पोस्टरमध्ये सोनल सूर्याला मिठी मारून ‘आय लव्ह यू हबी’ म्हणत आहे तर अंशुमनही सूर्याला बिलगून ‘आय लव्ह यू डॅडी’ म्हणताना दिसत आहे. हे सुखी कुटुंब पाहता आता सूर्याने 'डॅडीं'ची साथ सोडली की, अजूनही सूर्या 'डॅडीं'चा उजवा हात आहे? हे 'दगडी चाळ २' पाहिल्यावरच कळेल. 

मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांच्या व्यक्तिरेखा समोर आल्यानंतर आता उत्सुकता लागून राहिली आहे ती, चित्रपटातील इतर कलाकारांविषयी. ज्याचा उलगडा लवकरच होईल.

अखेर 'बॉईज ३' मधील ‘तो’ चेहरा आला समोर विदुला चौगुलेचे चित्रपटसृष्टीत पदार्पण




 अखेर 'बॉईज ३' मधील ‘तो’ चेहरा आला समोर 

विदुला चौगुलेचे चित्रपटसृष्टीत पदार्पण 

'बॉईज' आणि 'बॉईज २' या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धिंगाणा घातला होता. धैऱ्या, ढुंग्या आणि कबीर या धमाल त्रिकुटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप पाडली. आणि त्यात दोन्ही पर्वामध्ये धैऱ्या, ढुंग्या आणि कबीरच्या आयुष्यातील येणारी मुलगी हा एक वेगळाच विषय ठरला. प्रत्येक वेळी यात हॅण्डसम कबीरनेच बाजी मारली. ‘बॅाईज ३’च्या घोषणेपासूनच धैऱ्या, ढुंग्या आणि कबीर यांच्यासोबत राडा घालायला कोण अभिनेत्री असणार, याची सर्वत्र चर्चा सुरु होती. अखेर ‘ती’चा चेहरा समोर आला असून विदुला चौगुले ‘त्या’ मुलीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. विदुला ‘बॅाईज ३’च्या निमित्ताने चित्रपटात पदार्पण करत आहे. आता ही विदुला या त्रिकुटाला भारी पडणार का? हे पाहण्यासाठी १६ सप्टेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.  


काही दिवसांपूर्वीच या तिघांच्या आयुष्यात आलेली ‘ती’ मुलगी सोशल मीडियावर झळकली होती. मात्र अर्धा चेहरा दिसत असल्याने ‘ती’ नक्की कोण, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अखेर या चेहऱ्यावरून पडदा उठला असून आता प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे ती, विदुला नक्की कोणाच्या आयुष्यात येणार याची? तिच्या येण्याने या तिघांच्या आयुष्यात काय गडबड होणार की त्यांचे आयुष्य एका वेगळ्याच वळणावर जाणार? अर्थात या सगळ्यांची उत्तरे ‘बॅाईज ३’ पाहिल्यावरच मिळतील.


 सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत  'बॉईज ३' चे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केले असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे.  येत्या १६ सप्टेंबर रोजी प्रतीक लाड, पार्थ भालेराव आणि सुमंत शिंदे या त्रिकुटासह विदुला चौगुले चित्रपटगृहात दंगा घालायला येत आहेत.

यंदा घातलाय सोनाली -कुणालच्या लग्नाचा घाट प्लॅनेट मराठी ओटीटी सोबत उपस्थित राहून सर्वांनी वाढवा शुभकार्याचा थाट.



 यंदा घातलाय सोनाली -कुणालच्या लग्नाचा घाट  प्लॅनेट मराठी ओटीटी सोबत उपस्थित राहून सर्वांनी वाढवा शुभकार्याचा थाट. 


लग्न म्हणजे अनमोल क्षणांची तिजोरी.त्याला आपले कलाकार ही अपवाद नाहीत.या कलाकारांचा लग्नसोहळा कसा साजरा केला जातो, त्यांनी  लग्नात कोणते कपडे घातले असतील, काय दागिने घातले होते, जेवणाची पंगत कशी रचली होती, त्यांनी किती धमाल केली असेल अशा अनेक गोष्टी जाणून घेण्याची त्यांच्या चाहत्यांना कायमच उत्सुकता असते. चाहत्यांची हिच उत्सुकता लक्षात घेऊन ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर महाराष्ट्राची अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांचा भव्य विवाह सोहळा पाहता येणार आहे. नुकतेच या सोहळ्याचे निमंत्रण प्रेक्षकांना सोशल मीडियाद्वारे देण्यात आले. त्यामुळे लवकरच आता चाहत्यांना सोनालीच्या आयुष्यातील सुवर्णक्षणांचा साक्षीदार होता येणार आहे. 


एखाद्या मराठी कलाकाराच्या विवाह सोहळ्याचे ओटीटीवर प्रक्षेपण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यात उपस्थितांना सोनाली आणि कुणाल यांचा लंडनमध्ये पार पडलेला संपूर्ण लग्नसोहळा, वऱ्हाडींची धुमधाम, लग्नातील विधी हे सर्व पाहाता येणार आहे. 


सोनाली कुलकर्णी म्हणते, " 'प्लॅनेट मराठी ओटीटी' वर पहिल्यांदाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या लग्नसोहळ्याचे प्रक्षेपण केले जात आहे. ज्यांना माझ्या लग्नसोहळ्याला उपस्थित राहाता आले नाही त्यांना आणि माझ्या जगभरातील चाहत्यांना माझ्या आयुष्यातील हा सर्वात आनंददायी क्षण अनुभवायला मिळेल. 'प्लॅनेट मराठी ओटीटी' माझ्या चाहत्यांपर्यंत माझे लग्न पोहोचवत आहे, ही गोष्ट माझ्यासाठी खूपच आनंददायी आहे."


'प्लॅनेट मराठी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, "कलाकार आणि त्यांचे चाहते यांच नातं आगळंवेगळंच असत आणि त्यात जर आपल्या लाडक्या कलाकारांचे लग्न असेल तर चाहत्यांची उत्सुकता वेगळ्याच लेव्हलला असते त्यात तर  सोनालीने सातासमुद्रापार लग्न केले तेही अगदी मराठमोळ्या पद्धतीने ज्याची  चर्चा सर्वत्र रंगली आहे. त्यात तिचे लग्नातील फोटोही कुठे झळकले नाहीत. त्यामुळे सगळ्यांनाच सोनाली आणि कुणालचा विवाह कसा संपन्न झाला याची उत्सुकता लागून राहिली आहे. त्यामुळे हा लग्न सोहळा प्रेक्षकांपर्यंत  पोहचवून त्यांना  खुश करण्याचा हा आमचा प्रयत्न आहे.सोनालीच्या चाहत्यांसाठी ही तर पर्वणीच म्हणावी लागेल. सर्व प्रेक्षकांना लवकरच फक्त 'प्लॅनेट मराठी ओटीटी वर ' सोनालीच्या लग्नाला हजर राहण्याची संधी मिळणार आहे.’’