Wednesday, 24 August 2022

अल्ट्रा मीडिया ॲण्ड एन्टरटेन्मेंटचे आता मराठी ओटीटीमध्ये पदार्पण

 



अल्ट्रा मीडिया ॲण्ड  एन्टरटेन्मेंटचे आता मराठी ओटीटीमध्ये पदार्पण

 मागील चार दशकांपासून चित्रपट, मालिका, संगीत निर्मिती आणि वितरण क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या अल्ट्रा मीडिया  ॲण्ड  एन्टरटेन्मेंटने प्रेक्षकांचे नेहमीच विविध माध्यमांमधून मनोरंजन केले. प्रेक्षकांचे पारंपरिक माध्यमांतून मनोरंजन केल्यानंतर आता अल्ट्रा आणखी एका नवीन वाटचालीसाठी सज्ज झाले आहे. लवकरच अल्ट्रा मीडिया  ॲण्ड  एन्टरटेन्मेंट  मराठी ओटीटी क्षेत्रात पदार्पण करत आहे. यानिमित्ताने लोकप्रिय चित्रपट, वेबसीरिज, नाटकं, गाणी असा मनोरंजनाचा खजिना प्रेक्षकांना दाखवण्याचा अल्ट्राचा मानस आहे.

अल्ट्रा मीडिया  ॲण्ड  एन्टरटेन्मेंट  प्रा. लि.चे एमडी आणि सीईओ सुशीलकुमार अग्रवाल म्हणतात, ''महाराष्ट्राला वैभवशाली संस्कृतीचा वारसा लाभला असून मुळात मला मराठी भाषेबद्दल खूप अभिमान आहे. ही संस्कृती चित्रपट, वेबसीरिज, नाटकं, गाण्यांच्या माध्यमातून जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मनोरंजन क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. अल्ट्राने नेहमीच काळानुसार बदलत जाणारे तंत्रज्ञान आत्मसात केले. ओटीटीची निर्मिती हा याचाच एक भाग आहे. या माध्यमातून आम्ही आमचा सर्वोत्तम आशय आमच्या प्रेक्षकांसाठी, जागतिक स्तरावर अधिक सहजरित्या उपलब्ध करू शकतो आणि त्यामुळे प्रेक्षकांनाही एकाच ठिकाणी मनोरंजनाचा आनंद घेता येईल.''

 त्यामुळे आता लवकरच प्रेक्षकांना काहीतरी नवीन मनोरंजनात्मक पाहायला मिळणार, हे नक्की !

No comments:

Post a Comment