फलश्रुती एका तपश्चर्येची...
अर्चना नेवरेकर फाउंडेशनचा
वर्ष २०२० आणि २०२१ साठी “कलादर्पण” पुरस्कार सोहळा
अर्चना नेवरेकर फाउंडेशन या संस्थेने गेली बारा वर्षे प्रामाणिकपणे कलेचा आणि कलाकारांचा सन्मान करण्याची आपली तपश्चर्या पूर्ण केल्यानंतर आपल्या कारकीर्दीच्या तेराव्या वर्षी आपले वार्षिक पुरस्कार “कलादर्पण” या नावाने प्रदान करायचे ठरवले आणि वर्ष २०२० आणि २०२१ मधील चित्रपट, मालिका आणि नाटक या क्षेत्रांचे महनीय “कलादर्पण” पुरस्कार आज एका भरगच्च सभेत समारंभपूर्वक प्रदान केले गेले. २०२० आणि २०२१ साठीच्या “कलादर्पण” पुरस्कारांसाठी सहभागी नाटक, चित्रपट, मालिका आणि वृत्त वाहिन्या यांची नामांकने संस्थेच्या संचालक मंडळाने २७ डिसेंबर रोजी जाहीर केली होती.
कलादर्पण पुरस्कार “नाटक”
नाटकासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून आमने सामने साठी नीरज शिरवईकर, सर्वोत्कृष्ट लेखक म्हणून थोडं तुझं थोडं माझं साठी अभिजित गुरु, सर्वोत्कृष्ट अभिनेता झुंड साठी अक्षर कोठारी आणि इब्लिस साठी वैभव मांगले, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून आमने सामने साठी लीना भागवत आणि व्हॅक्यूम क्लीनर साठी निर्मिती सावंत, सर्वोत्कृष्ट सहाय्यक/विनोदी अभिनेता म्हणून तेरी भी चुप साठी प्रियदर्शन जाधव तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक/विनोदी अभिनेत्री म्हणून दहा बाय दहा साठी सुप्रिया पाठारे, सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना व्हॅक्यूम क्लीनर साठी रवी रसिक, सर्वोत्कृष्ट नेपथ्यासाठी इब्लिसचे संदेश बेंद्रे, सर्वोत्कृष्ट संगीत डोन्ट वरी हो जायेगा साठी मितेश चिंदरकर, सर्वोत्कृष्ट नाटकासाठी अवनीश नाटक मंडळी/ अथर्व थिएटर्स च्या आमने सामने साठी महेश ओवे यांना दिला गेला. व्हॅक्यूम क्लीनरसाठी अशोक सराफ यांना तसेच दहा बाय दहा साठी विजय पाटकर यांना घोषित पुरस्कार प्रदान केले गेले. करोना काळातील विशेष उल्लेखनीय कामगिरीसाठी श्रीमंथ इंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या धनंजय माने इथेच राहतात आणि स्मितहरी प्रोडक्शनच्या लावण्य दरबार या नाटकांसाठी प्रदान केले गेले.
कलादर्पण पुरस्कार “चित्रपट”
चित्रपटांसाठीचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार हिरकणी साठी प्रसाद ओक यांना तर सर्वोत्कृष्ट कथा बाबा साठी मनीष सिंग यांना प्रदान केला गेला. सर्वोत्कृष्ट पटकथा माई घाट क्राईम नंबर 103 / 2005 साठी अनंत महादेवन यांना तर सर्वोत्कृष्ट संवाद धुरळा साठी क्षितिज पटवर्धन यांना, सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून धुरळा साठी अंकुश चौधरी यांना तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून आनंदी गोपाळ साठी भाग्यश्री मिलिंद पुरस्कार प्रदान केले गेले. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून धुरळासाठी सिद्धार्थ जाधव आणि विजेता साठी सुशांत शेलार यांना तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून धुरळासाठी अलका कुबल यांना पुरस्कार दिले गेले. सर्वोत्कृष्ट संकलनासाठी फत्तेशिकस्तचे प्रमोद कहार यांना तर सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून आनंदी गोपाळचे नितेश वाघ/सुनीत निगवेकर यांना पुरस्कृत केले गेले. सर्वोत्कृष्ट गीत रचनेसाठी तुला जपणार आहे–खारी बिस्कीट चे क्षितिज पटवर्धन यांना तर सर्वोत्कृष्ट छायांकनासाठी झिम्माचे संजय मेमाणे याना पुरस्करा प्रदान केले गेले. सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक म्हणून खारी बिस्कीटसाठी अमित राज सावंत यांना तर तुम्हा बघून काळीज-पांडू साठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून वैशाली सामंत यांना आणि सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून तुला जपणार आहे–खारी बिस्कीट साठी आदर्श शिंदे यांना पुरस्कार प्रदान केले गेले.
सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा पुरस्कार अल्केमी व्हिजन वर्क्स यांच्या माई घाट क्राईम नंबर 103 / 2005 ला प्रदान केला गेला. या व्यतिरिक्त घोषित पुरस्कारांमध्ये झिम्मा हा लक्षवेधी चित्रपट तर पेन्शन साठी सोनाली कुलकर्णी या लक्षवेधी अभिनेत्री, पांडू हा विनोदी चित्रपट, श्रीमती सुषमा शिरोमणी यांना कलादर्पण जीवन गौरव पुरस्कार मानसी नाईक यांना डान्स अँड स्टाईल आयकॉन पुरस्कार, रवींद्र पाथरे यांना विशेष पत्रकारिता पुरस्कार, अक्षय बर्दापूरकर यांना मराठी ओ टी टी साठी विशेष योगदान पुरस्कार, किशोरी शहाणे यांना जीवन संध्यासाठी लक्षवेधी अभिनेत्री ओ टी टी पुरस्कार, अभिजित पानसे यांना रान बाजार साठी सर्वोत्कृष्ट वेब सिरीज दिग्दर्शक म्हणून तर फ्रेंड्स इन कार्पोरेट यांना पी आर पुरस्कार तसेच प्रज्ञा सुमथी शेट्टी आणि प्रेम झांगियानी यांना मिडीया डायरेक्टर पुरस्कार प्रदान केले गेले.
कलादर्पण पुरस्कार “मालिका”
सर्वोत्कृष्ट मालिकांसाठीच्या कलादर्पण पुरस्कारात फिल्म फार्म इंडियाची ठिपक्यांची रांगोळी आणि ट्रंप कार्ड प्रोडक्शन यांची तुझीच मी गीत गात आहे यांना पुरस्कार प्रदान केले गेले. सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून आई कुठे काय करते साठी मिलिंद गवळी यांना तर संत गजानन शेगावीचे साठी अमित फाटक यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून आई कुठे काय करते मधील मधुराणी प्रभुलकर, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता स्वाभिमान साठी अशोक शिंदे, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री स्वाभिमान साठी सविता प्रभुणे यांना पुरस्कृत केले गेले. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून आई कुठे काय करते साठी रवींद्र करमरकर, फुलाला सुगंध मातीचाच्या सर्वोत्कृष्ट शीर्षक गीतासाठी रोहिणी निनावे आणि निलेश मोहरीर यांना तर सर्वोत्कृष्ट म्युझिक चॅनल म्हणून सी सी ओ चे दीपक देऊळकर यांना पुरस्कार प्रादान केला गेला.
कलादर्पण पुरस्कार “वृत्त वाहिन्या”
कलादर्पण पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट वृत्त वाहिनी ठरली टीव्ही ९ मराठी तर पुरुष सूत्रधार न्यूज १८ लोकमत चे विशाल पाटील आणि स्त्री सूत्रधार ठरल्या टीव्ही ९ मराठीच्या निखिला म्हात्रे. एक लक्षवेधी न्यूज चॅनल म्हणून लोकशाही मराठी यांना कलादर्पण पुरस्कार प्रदान केला गेला.
नाटकांच्या परीक्षक समितीत रोहिणी निनावे, स्मिता जयकर, प्रमोद पवार, रमेश साळगावकर आणि शीतल करदेकर होत्या तर चित्रपटांसाठी समृद्धी पोरे, अभिजित पानसे आणि मिलिंद इंगळे तसेच मालिकांसाठी स्मिता जयकर, मानसी इंगळे आणि कल्पना सावंत-नवले यांचा समितीत समावेश होता.
No comments:
Post a Comment