Friday, 31 March 2023

प्रेमाच्या 'सरी'ची 'संमोहिनी'



 प्रेमाच्या 'सरी'ची 'संमोहिनी' 


प्रेमाच्या एका वेगळ्याच भावविश्वात घेऊन जाणाऱ्या 'सरी' चित्रपटातील पहिलं 'संमोहिनी' हे रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. कॅनरस प्रॅाडक्शन प्रस्तुत, डॉ. सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्मित या चित्रपटाचे लेखन, संकलन दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्दर्शक अशोका के. एस. यांनी केले आहे. आनंदी जोशी हिचा सुरेल आवाज लाभलेल्या या गाण्याचे संगीतकार अमितराज असून मंदार चोळकर यांनी हे गाणे शब्दबद्ध केले आहे. रितिका श्रोत्री, अजिंक्य राऊत, पृथ्वी अंबर, मृणाल कुलकर्णी, संजय खापरे, पंकज विष्णू आणि केतकी कुलकर्णी यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. 


'संमोहिनी' या प्रेमगीतामध्ये दिया रोहितच्या प्रेमात मोहित झाल्याचे दिसत असून मनाला भावणाऱ्या या गाण्याचे संगीतही भावपूर्ण आहे. अनेकांचा आयुष्यात कॉलेजपासून एकतर्फी प्रेमाची सुरूवात होते. तो लपाछुपीचा काळ खूप सुंदर असतो. 'संमोहिनी' या प्रेमगीतातून ते सोनेरी क्षण पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. 


दिग्दर्शक अशोका के. एस. म्हणतात, "पहिल्यांदाच मी मराठी संगीतकार आणि गायकांसोबत काम करत असून मराठी शब्दांमध्ये एक वेगळीच मजा आहे. भावना खूप उत्तमरित्या व्यक्त करता येतात.  संगीतकार अमितराज यांचे नाव मी ऐकून होतो, त्यांच्यासोबत काम करण्याचा एक वेगळाच अनुभव होता. चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला तसाच या चित्रपटातील पहिल्या 'संमोहिनी' प्रेमगीतलासुद्धा मिळेल, अशी आशा करतो." 


संगीतकार अमितराज म्हणतात, "'सरी' हा चित्रपट कधी प्रदर्शित होईल याची आतुरता आहे. अशोका के. एस हे अप्रतिम दिग्दर्शक असून या चित्रपटातील गाण्यांना संगीत देताना मजा आली. सगळीच गाणी अप्रतिम आहेत. अशोकजींच्या बाबतीत एक कौतुकास्पद गोष्ट सांगायची म्हणजे, अशोकजी हे बंगळुरूला राहत असले तरी कित्येकदा गाण्यांसाठी ते बंगळुरूहून मुंबईला यायचे. कामाच्या प्रति इतके प्रेम असणाऱ्या टीमसोबत काम करायला मिळाले. अशोकजी हे संगीतप्रेमी आहेत. त्यांना गाण्यांची खूप आवड आहे. 'संमोहिनी' हे गाणं चित्रपटाच्या पहिल्या टप्प्यात येत, दिया रोहितला बघते, दियाच्या दृष्टिकोनातून संपूर्ण गाणं मांडण्यात आलं आहे. तिच्या मनातील भावना गाण्याच्या माध्यमातून दाखविण्यात आल्या आहेत. सातत्याने आमचा प्रयत्न होता की काहीतरी नवीन देऊयात. 'संमोहिनी' हे गाणं एका वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आले आहे."

Tuesday, 14 March 2023

“Be you, be original, don’t try to be one amongst the herd” says fashion & costume designer -Darshan Jalan & Team

 

“Be you, be original, don’t try to be one amongst the herd” says fashion & costume designer -Darshan Jalan & Team



 Jalan can be credited for changing the narrative of fashion in films, runway & street style. His costumes in films like Vikram Veda, Ankhon Dekhi, Dum Lagake Haisha, Teen, Toilet – Ek Prem Katha, 24 (Tamil), Kahani 2, Sui-Dhaaga, Mithya and web series like Mirzapur, Delhi Crime2, Leila and many more have fetched him a loyal fan base for acing the looks of actors in their characters. He understands the nitty-gritty of the ever-evolving fashion industry, and hence, the need to experiment with newer trends and styles to keep up with the modern-day trends.  


Jalan’s story is equal parts inspiring and relatable. An alumnus of NIFT Mumbai, Darshan started his career as a men’s wear designer for Provogue, followed by Killer Jeans and Options Juhu as their in-house designer. He says that his frugal life in Mumbai for a greater part of early 2000’s was challenging but also built his character.

Matrubhoomi: A Nation Without Women was the first opportunity into movies and a stepping stone to recognition and appreciation he has established in the Indian movie industry. Many award nominations and goodwill has been bestowed upon him but he is far from being complacent.

Born in Ranchi, Jharkhand, Darshan is an artist, designer and a visionary. Growing up in a family that has an astound appreciation for the Arts provided him a platform, but it was his time at Scindia School set within the grand architecture of Gwalior Fort that sparked his interest in design, aesthetics, and storytelling.

Jalan is a private person by nature and likes to keep himself busy. His one-track mission to create a new landscape for costume design in Indian cinema keeps him focused in the times of criticism and self-doubt.

“I think it’s important to know as many skills as you can along the way and keep growing with times. But I think it’s also important to have a unique point of view – be original and don’t try to be one amongst the herd” says Darshan Jalan who also has two design partners, Neelanchal Ghosh and Manish Tiwari.

Friday, 10 March 2023

मुलुंड मध्ये रंगला हिरकणी ग्रुपच्या महिलांचा सत्कार

 


मुलुंड मध्ये रंगला हिरकणी ग्रुपच्या महिलांचा सत्कार

मुंबई - महिला दिना निमित्त सारस्वत बँक मुलुंड पूर्व शाखा व फ्युचर जनराली यांच्या संयुक्त विद्यमाने मुलुंडमधील हिरकणी ग्रुपच्या पाच हरहुन्नरी महिलांचा सत्कार पार पडला. या सर्व महिलांनी आपापल्या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी करत, स्वबळावर यश संपादन केले आहे.

ज्या महिलांचा सत्कार पार पडला, त्यात रांगोळी प्रशिक्षिका व समाजसेविका आरती जोशी यांचा देखील समावेश आहे. मुलुंडमधील असंख्य लोकांना रांगोळीचे प्रशिक्षण देणाऱ्या आरती जोशी या समाजसेविका असून त्या विविध उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवतात. तर फॅशन डिझायनर असलेल्या तानिया परब यांना देखील हा सत्कार प्राप्त झाला. त्यांचे स्वत:चे बुटिक असून या माध्यमातून असंख्य महिलांना रोजगार मिळाला आहे. या यादीत समाजसेविका स्मिता नलावडे यांचा देखील समावेश असून त्या योग वर्ग चालवतात. या धकाधकीच्या जीवनात लोकांचे आरोग्य निरोगी राखण्यासाठी त्यांनी सुरू केलेला योग वर्ग हा उपक्रम मुलुंडमधील असंख्य जणांना फायद्याचा ठरलेला आहे. तसेच विविध भारतीमध्ये निवेदक असलेल्या सोनाली पाठक यांचा देखील यावेशी सत्कार पार पडला. त्या विविध भारतीच्या अनेक कार्यक्रमात निवेदन करत असून त्यांची प्रसिद्धी अफाट आहे. तसेच ब्युटिशियन असलेल्या मेघना जोशी यांना देखील हा मान मिळाला. त्या फक्त ब्युटिशियनच नसून त्यांनी अनेक तरुणींनी ब्युटिशियनची कला अवगत करत त्यांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. एक सर्वोत्कृष्ट ब्युटिशियन म्हणून त्यांची नावलौकिकता आहे. तसेच सर्व सत्कारमुर्तींनी आजपर्यंत अनेक पुरस्कार पटकावले असून या सर्व हिरकण्यांचे सत्कार सारस्वत बँकेच्या ब्रँच मॅनेजर श्रद्धा रेगे व फ्युचर जनरालीच्या मॅनेजर अंजली सिंग यांच्या हस्ते पार पडला. तसेच या कार्यक्रमाला असंख्य महिलांनी उपस्थिती दर्शवली होती.

मोहित चौहानने गायले 'घर बंदूक बिरयानी'

 



मोहित चौहानने गायले 'घर बंदूक बिरयानी' 

झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत, हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित 'घर बंदूक बिरयानी' चित्रपटातील 'गुन गुन', 'आहा हेरो' गाणे प्रदर्शित झाल्यानंतर आता या चित्रपटाचे  'घर बंदूक बिरयानी' हे टायटल ट्रॅक प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी या गाण्याचे मेकिंग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'आशेच्या भांगेची नशा भारी... घर, बंदूक, बिरयानी...'असे या गाण्याचे बोल आहेत. ए.व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला वैभव देशमुख यांचे बोल लाभले आहेत. तर या जबरदस्त गाण्याला बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक मोहित चौहान यांनी आवाज दिला आहे. 


 या गाण्यात चित्रीकरणादरम्यान संपूर्ण टीमने केलेली धमाल मस्ती दिसत असून कलाकारांनी, चित्रपटाच्या संपूर्ण टीमने पडद्यामागे घेतलेली मेहनतही दिसत आहे. या सगळ्या मेहनतीतूनच या धमाकेदार गाण्याची निर्मिती झाली आहे. चित्रीकरणस्थळ नैसर्गिक वाटावे, यासाठी पडद्यामागच्या कलाकारांनी अनेक आव्हानांना तोंड दिले आहे. पडद्यावर सहज सुंदर दिसणाऱ्या या गाण्याच्या निर्मितीसाठी अनेकांनी घेतलेले श्रम या मेकिंगमधून दिसत आहेत. 


या गाण्याचे गायक मोहित चौहान म्हणतात, ‘’मी पहिल्यांदाच मराठीत असं वेगळं गाणं गात आहे. प्रत्येक गायक हा वेगवेगळ्या भाषेत गात असतो. संगीताला भाषेची मर्यादा नसते. त्यामुळे मराठीत गाण्याचाही मी सुंदर अनुभव घेतला. मी अमराठी असल्याने मला भाषेवर थोडं काम करावं लागलं आणि या सगळ्यात मला संपूर्ण टीमने मदत केली. आतापर्यंत मी नागराज मंजुळे यांचं नाव ऐकून होतो. मात्र या चित्रपटाच्या निमित्ताने आमची भेट झाली आणि आम्ही एकत्र काम केलं. त्यांचा गाण्याच्या अभ्यास, चित्रपटाचा अभ्यास बघून मी थक्क झालो. मराठी सिनेसृष्टीला किती प्रतिभावान टीम लाभली आहे, याचा प्रत्यय आला.’’

समीर वानखेडेंबद्दल क्रांती रेडकर म्हणाली...

 समीर वानखेडेंबद्दल क्रांती रेडकर म्हणाली... 


नुकताच जगभरात महिला दिन साजरा झाला. याच दिनाचे औचित्य साधत यावेळी प्लॅनेट मराठी ओटीटीवरील 'पटलं तर घ्या विथ जयंती' या टॉक शोमध्ये अतिशय हुशार आणि संवेदनशील अशा दोन अभिनेत्रींनी हजेरी लावली. या दमदार अभिनेत्री म्हणजे क्रांती रेडकर आणि उर्मिला कोठारे. अभिनेत्री, दिग्दर्शिका, उद्योजिका अशा विविध माध्यमांमध्ये आपला ठसा उमटवणारी क्रांती नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधत असते. आपल्या आयुष्यातील अनेक छोट्या मोठया गोष्टी ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या मुलींपासून ते नवऱ्यापर्यंतच्या सर्व गोष्टी ती उलगडत असते. मात्र क्रांतीच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अजून तिच्या चाहत्यांना माहित नाही. तिच्या आणि समीर वानखेडे यांच्या आयुष्यातील असेच काही सिक्रेट्स या टॉकशोमध्ये तिने उघड केले आहेत. यावेळी तिने श्रीशांतसोबत जोडल्या गेलेल्या नावाच्या मागे काय तथ्य आहे, याचाही खुलासा केला आहे. तिने एक भयाण गोष्टही सांगितली, तिला अनेकदा सोशल मीडियावर मारण्याच्या धमक्याही येतात. मात्र अशा धमक्यांना ती काय प्रतिउत्तर देते, हे आपल्याला हा एपिसोड पाहिल्यावर कळेल. 

या टॉक शोमध्ये क्रांतीसोबत तिची खास मैत्रीण उर्मिला कोठारेही आहे. प्रेम म्हणजे मैत्री आणि विश्वास मानणाऱ्या उर्मिलाने यावेळी प्रेमात जर या दोन्ही गोष्टी मिळत नसतील तर दुसरं प्रेम शोधावं, असे धाडसी मतही व्यक्त केले. क्रांती रेडकर आणि उर्मिला कोठारेनी भरपूर गप्पा मारल्या असून या टॉकशोमध्ये त्या खूप धमालमस्ती करताना दिसत आहेत, प्रेक्षकांना हा एपिसोड प्लॅनेट मराठी ओटीटीवर कोणतेही शुल्क न आकारता पाहता येईल.

Thursday, 9 March 2023

प्रेमाची परिभाषा सांगणार 'सरी'



प्रेमाची परिभाषा सांगणार 'सरी' 

आयुष्य कधीतरी एका अशा वळणावर येते, जिथे पुढे काय होणार आहे, हे कोणीच सांगू शकत नाही. म्हणूनच म्हणतात की, 'लाईफ इज फुल्ल ऑफ सरप्राइजेस अँड मिरॅकल्स'. याच आशयाचा 'सरी' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून येत्या ५ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रेमाचा त्रिकोण असलेल्या या चित्रपटात अजिंक्य राऊत, रितिका श्रोत्री, पृथ्वी अंबर आणि मृणाल कुलकर्णी प्रमुख भूमिकेत दिसतील. कॅनरस प्रॉडक्शन्स प्रस्तुत, डॉ. सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्मित या चित्रपटाचे लेखन, संकलन आणि दिग्दर्शन अशोका के. एस. यांनी केले असून दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक अशोका के. एस. आणि अभिनेता पृथ्वी अंबर 'सरी'च्या निमित्ताने प्रथमच मराठीत पदार्पण करत आहेत. रिलायन्स एंटरटेनमेंटने या चित्रपटाच्या वितरणाची धुरा सांभाळली आहे. 


चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अशोका के. एस. म्हणतात, '' मी प्रथमच मराठीत चित्रपट दिग्दर्शित करत आहे. मराठीत काम करताना मजा आली. मराठी कलाकार अतिशय प्रतिभाशाली आहेत. चित्रपटाबद्दल सांगायचं तर ही एक प्रेमकहाणी आहे. प्रेमात पडलेल्या तरुणतरुणींच्या आयुष्यात अनेक वळणे येतात, अनेक आश्चर्यकारक घटना घडतात, चमत्कार घडतात, ज्यांचा कधी कोणी विचारही केलेला नसतो. मनाला भिडणारी ही कथा आहे, जी प्रेक्षकांना नक्कीच भावेल.''

Wednesday, 8 March 2023

Shriram General Insurance unveils women-exclusive branches in Jaipur and Ludhiana

Shriram General Insurance unveils women-exclusive branches in Jaipur and Ludhiana

The industry-first initiative will soon extend to other states

Mumbai, March 08, 2023: Shriram General Insurance Company (SGIC) has raised the curtains of two exclusive – women branches in Ludhiana and Jaipur- the first of its kind initiative in the industry. The entire workforce - from the branch manager to the support staff, are women and SGIC has plans to strategically replicate the same model nationwide going forward.

Anil Kumar Aggarwal, MD & CEO, Shriram General Insurance Company said “Diversity and inclusion are crucial for organizations to create an environment that fosters innovation, productivity, and employee satisfaction. Studies have found that women who work in diverse organizations report higher job satisfaction. By hiring qualified women at all levels, we create a more inclusive culture that values diversity.  The CFO and the Legal Head at SGI are women, which is indicative of the culture the company has built.”

Like any other SGI branch, the women-exclusive branches will offer insurance and other financial products with the same fervour, and rich customer experience. The company plans to open more such branches across the country to facilitate the professional growth of women.

SGI’s Women -centric model:

SGI deeply cares about women’s career development and general wellbeing. The company’s top performers are women. Likewise, they have female representation at every level and function of the business including some of the key leadership positions. It has formed various women’s welfare committees managed by women staff members to cater to the needs and requirements of women in the organization.

 

झिम्मा २'च्या टीमने साजरा केला महिला दिन



 झिम्मा २'च्या टीमने साजरा केला महिला दिन 


हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा'ला जगभरातील प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्यानंतर आता काही दिवसांपूर्वीच 'झिम्मा २'ची घोषणा करण्यात आली. तेव्हापासूनच या चित्रपटात काय पाहायला मिळणार, हे जाणून घेण्याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान, 'झिम्मा २'च्या टीमने नुकताच जागतिक महिला दिन साजरा केला. या वेळी सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, इरावती कर्णिक, सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव, हेमंत ढोमे आणि निर्माते आनंद एल. राय. उपस्थित होते. 


'झिम्मा'ची कथा ही सात स्त्रियांवर आधारित होती, ज्या वेगवेगळ्या वयोगटातील आणि सामाजिक-सांस्कृतिक पार्श्वभूमीच्या होत्या. त्या एकत्र येऊन इंग्लंडला सहलीला जातात आणि तिथेच त्यांना स्वतःच्या अस्तित्वाचा शोध लागतो. 


दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, “झिम्माच्या प्रतिभावान स्टारकास्टसोबत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करताना मला खूप आनंद होत आहे. पहिला भाग प्रचंड यशस्वी झाला. दुसऱ्या भागासाठी, आमच्यासोबत आनंद एल. राय जोडले गेले आहेत आणि मला खात्री आहे की, 'झिम्मा२' लाही भरभरून प्रेम मिळेल.”


निर्माते आनंद एल. राय म्हणतात, ''सुपर टॅलेंटेड झिम्मातल्या महिलांना कलाकारांना भेटण्यासाठी महिला दिनापेक्षा चांगला दिवस कोणता असूच शकत नाही. पहिला भाग २०२१ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता आणि मी प्रादेशिक सिनेमाला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्यासाठी उत्सुक आहे.”

 

'झिम्मा'ची निर्माती क्षिती जोग म्हणते, "सर्वात प्रतिभावान आणि बहुमुखी महिलांसोबत हा खास दिवस साजरा करणे खूप आनंददायी आहे. दुसरा भाग सर्वांसाठी आनंददायी असेल."


'झिम्मा २'चे दिग्दर्शन हेमंत ढोमे असून इरावती कर्णिक यांनी लेखन केले आहे. आनंद एल. राय यांच्या कलर यलो प्रोडक्शन आणि क्षिती जोग यांच्या चलचित्र मंडळी यांनी मिळून चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचे सहनिर्माते विराज गवस, उर्फी काझमी आणि अजिंक्य ढमाळ आहेत

Tuesday, 7 March 2023

SKYEXCH PRESENTS “COLOUR SPLASH 2023”- MUMBAI’S BIGGEST HOLI FEST WITH SACHET- PARAMPARA

 

SKYEXCH PRESENTS “COLOUR SPLASH 2023”- 

MUMBAI’S BIGGEST HOLI FEST WITH SACHET- PARAMPARA

What you can expect at the Holi parties? Organic colors, rain dances, thandai, gourmet food, premium liquor, photo booths, and tons of surprises, well, we’ve got you covered. Coloring the town with the mega Holi celebration, “Colour Splash 2023” saw a massive crowd by bringing the most happening Holi party to the city. Colour Splash was created 5 years back and this year, they have partnered with Vakaoo to make the festival bigger and better. Mumbai grooved to the best Sachet- Parampara performance, Rain Dance, Live Music played by celebrity DJs Live Puneri and Punjabi Dhol, Organic Colours, Colour Blast, Food and Beverages, and Thandai, etc.


The who's who of the Bollywood, Television, and Fashion industry were spotted at the “COLOUR SPLASH 2023” as they celebrated Holi in true rangeela style. This glamorous, vibrant, and exciting Holi party was held on the 7th of March at the Kutchi Ground in Borivali (West) and saw the most famous faces let their hair down and groove to the best Bollywood music spun. To name a few, there was Saru Maini, Poonam Pandey, Bhavin Bhanushali, Prashant Virendra Sharma, Anjali Pandey, Akanksha Puri, Aashika Bhatia, and many more.

Varun Barot, Vivek Upadhyay, Founder, Coloursplash says* “Colour Splash 2023 is one stop destination for celebrating Holi in a true millennial style while still retaining the cultural factor. We saw a great turnout; I would like to thank each and every person who attended the Holi bash & celebrated the festival with us”

Dhruv Mehra, Apoorva Gaurav, Ameet Mehra- Director, Quinate hospitality Pvt Ltd says “We are proud to present the “Colour Splash 2023” where the guests, celebs from Bollywood and Television fraternity enjoyed the colors of Holi in true festive style. We thank all our guests and partners for supporting us year after year"

This was undoubtedly the most happening celebration of Holi…. the generation next Holi.

Event by- HardyBoyz, Upshots Media, Vakaoo

१२ मे रोजी होणार 'फकाट'चा हायली कॉन्फिडेन्शिअल ॲक्शन कॅामेडी धिंगाणा



 १२ मे रोजी होणार 'फकाट'चा हायली कॉन्फिडेन्शिअल ॲक्शन कॅामेडी धिंगाणा 


मराठी सिनेसृष्टीला 'बघतोस काय मुजरा कर', 'बस स्टॉप', 'बाबू बॅन्ड बाजा', 'ऑनलाईन बिनलाईन',' मी पण सचिन' यांसारखे धमाकेदार चित्रपट दिल्यानंतर आता श्रेयश जाधव आणखी एक भन्नाट चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहेत. यापूर्वी श्रेयश जाधव यांनी 'मी पण सचिन'चे लेखन, दिग्दर्शन केले होते. आता आणखी एका नवीन चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन त्यांनी केले आहे. 'फकाट' असे आगळेवेगळे नाव असणारा हा चित्रपट येत्या १२ मे रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर झळकले आहे. हायली कॉन्फिडेन्शिअल धिंगाणा असलेल्या या चित्रपटात हेमंत ढोमे, अविनाश नारकर, सुयोग गोऱ्हे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. वक्रतुंड एंटरटेनमेंट, गणराज स्टुडिओ प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटाच्या निता जाधव निर्मात्या आहेत. 

पोस्टरवर हेमंत ढोमे आणि सुयोग गोऱ्हे यांच्या दोघांच्या मध्ये अविनाश नारकर एक पाकीट घेऊन उभे आहेत. या पाकिटावर कॉन्फिडेन्शिअल असे लिहिले आहे. आता या पाकिटात काय गुपित दडले आहे, याचे उत्तर मिळण्यासाठी आपल्याला काही काळ वाट पाहावी लागेल. 

दिग्दर्शक श्रेयश जाधव म्हणतात, '' पुन्हा एकदा एक धमाल चित्रपट घेऊन मी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा ॲक्शन कॅामेडी चित्रपट असून सध्यातरी यातील अनेक गोष्टी कॉन्फिडेन्शिअल आहेत. येतील हळूहळू समोर. हा एक कौटुंबिक सिनेमा असून 'फकाट' प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करेल.''

Sunday, 5 March 2023

वुमन विक सेलेब्रेशनला उत्सफुर्त प्रतिसाद



 वुमन विक सेलेब्रेशनला उत्सफुर्त प्रतिसाद

मुंबई - मी मुलुंडकर प्रतिष्ठान आयोजित 'वुमन विक सेलेब्रेशन' या कार्यक्रमाचे शेवटचे सत्र हे वुमन्स बाईक रॅलीने पार पडले. ही रॅली महिलांसाठी जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आली होती, ज्यात नागरिकांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला.

मी मुलुंडकर प्रतिष्ठान आपल्या विविध उपक्रमांसाठी प्रसिद्ध असून महिला दिनानिमित्त त्यांनी आयोजिलेल्या 'वुमन विक सेलेब्रेशन'ला नेहमीप्रमाणे यंदाही महिलांचा चांगलाच प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाचे शेवटचे सत्र वुमन्स बाईक रॅलीने पार पडले. या रॅलीमधून महिला सक्षमीकरणाचे महत्त्व, महिलांचे आरोग्य व स्त्री स्वातंत्र्याबद्दल आकर्षक असे संदेश दिले गेले. एकूण १२५ बाईक्सने यात सहभाग घेतला असून ज्यात चक्क ६२ महिला बाईकस्वारांचा समावेश होता. ही रॅली ८ वाजता सुरू झाली आणि ९ वाजता संपली. या रॅलीदरम्यान कुठल्याही नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून मी मुलुंडकर प्रतिष्ठानने काळजी घेतली होती. ही बाईक रॅली केळकर कॉलेज मिठागर रोड येथून सुरू होत राजे संभाजी मैदान येथे समाप्त झाली.  

Friday, 3 March 2023

मराठ्यांच्या अखंडित लढ्याची कहाणी उलगडणार मोगलमर्दिनी ‘छत्रपती ताराराणी’


 मराठ्यांच्या अखंडित लढ्याची कहाणी उलगडणार मोगलमर्दिनी ‘छत्रपती ताराराणी’

स्वराज्याच्या तिन्ही छत्रपतींचे छत्र हरवल्यानंतर पोरक्या झालेल्या मराठा साम्राज्याला आपले वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून आपल्या कर्तुत्वाने आधार देणाऱ्या रणमर्दिनी, रणरागिनी महाराणी ताराबाई राजाराम भोसले म्हणजे स्त्रीनेतृत्वाचे सर्वोत्कृष्ट उदाहरण होय. ज्यांच्या शौर्याचे गुणगान मुघलांसारख्या बलाढ्य शत्रुनेदेखील केले, ज्यांची राजनीति आणि रणनीती इतिहासकारांनी गौरविली, बिकट आणि क्लिष्ट परिस्थितीतही ज्यांनी उत्तम व्यवस्थापनाचे उदाहरण स्थापित केले यासोबत एक पुत्री, सून, पत्नी, माता तसेच राजस्त्री या भूमिकांमध्ये देखील आदर्श प्रस्थापित केले अशा अष्टपैलू स्त्रीचे जीवनचरित्र सर्वांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने दिग्दर्शक राहुल जनार्दन जाधव डॉ. जयसिंगराव पवार यांच्या 'मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी' या ग्रंथावर आधारित 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. नुकतेच याचे चित्रीकरण पूर्ण झाले असून चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर प्रसारित झाला आहे. प्लॅनेट मराठी, अक्षय विलास बर्दापूरकर आणि मंत्रा व्हिजन प्रस्तुत या चित्रपटाचे क्रिएटिव्ह व्हाईब आणि समीर अरोरा हे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाची पटकथा आणि संवाद डॉ. सुधीर निकम यांचे असून या चित्रपटाला सुप्रसिद्ध संगीतकार अवधुत गुप्ते यांचे संगीत लाभले आहे.


टिझर मध्ये असामान्य शौर्य दाखवणाऱ्या, रणांगण गाजवणाऱ्या, आक्रमक राजकारणी छत्रपती ताराराणी यांची झलक दिसत आहे. मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याचे हे विलक्षण पर्व आहे जिथे एक युगप्रवर्तक सासऱ्याचे, पराक्रमी पित्याचे, कुशल राजकारणी अशा पतीचे  आणि शूर, गुरुसमान दिराचे छत्र हरवलेली तडफदार स्त्री औरंगजेबासारख्या बलाढय शत्रूविरुद्ध त्यांचे नेतृत्व करत आहे. 


चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल जनार्दन जाधव म्हणतात, " चित्रपट हे समाजप्रबोधनाचे आणि समाजजागरणाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. सध्याच्या आणि येणाऱ्या पिढ्यांवर चांगला प्रभाव पाडणारे, उत्कृष्ट वैयक्तिक आणि सामाजिक मूल्यांची स्थापना करणारे चित्रपट निर्माण होणे ही काळाची गरज आहे म्हणूनच  प्रत्येक पिढीतील स्त्रियांना आदर्श वाटावे असे व्यक्तिमत्त्व पडद्यावर आणण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटाद्वारे करत आहोत."


छत्रपती ताराराणींची भूमिका साकारण्याचा मान मिळाल्याबद्दल सोनाली कुलकर्णी म्हणते, '' छत्रपती ताराराणी. मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धातील एक रणरागिणी. त्यांचे कार्य, कर्तृत्व दैदिप्यमान आहे. अशा तडफदार व्यक्तिमत्वाची भूमिका साकारायला मिळणे ही माझ्यासाठी सन्मानाची आणि जबाबदारीची गोष्ट आहे.'' 


प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, '' जगाच्या इतिहासात महाराणी ताराबाई यांच्या कर्तृत्वाला तोड नाही. या चित्रपटाच्या निमित्ताने एका महान स्त्रीची कहाणी घराघरांत पोहोचणार आहे. आजवर छत्रपती महाराणी ताराबाई भोसले यांची शौर्यगाथा फार अशी प्रकाशझोतात आलेली नाही. या निमित्ताने त्यांचे कर्तृत्व जगासमोर येईल.''