मुलुंड मध्ये रंगला हिरकणी ग्रुपच्या महिलांचा सत्कार
मुंबई - महिला दिना निमित्त सारस्वत बँक मुलुंड पूर्व शाखा व फ्युचर जनराली यांच्या संयुक्त विद्यमाने मुलुंडमधील हिरकणी ग्रुपच्या पाच हरहुन्नरी महिलांचा सत्कार पार पडला. या सर्व महिलांनी आपापल्या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी करत, स्वबळावर यश संपादन केले आहे.
ज्या महिलांचा सत्कार पार पडला, त्यात रांगोळी प्रशिक्षिका व समाजसेविका आरती जोशी यांचा देखील समावेश आहे. मुलुंडमधील असंख्य लोकांना रांगोळीचे प्रशिक्षण देणाऱ्या आरती जोशी या समाजसेविका असून त्या विविध उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवतात. तर फॅशन डिझायनर असलेल्या तानिया परब यांना देखील हा सत्कार प्राप्त झाला. त्यांचे स्वत:चे बुटिक असून या माध्यमातून असंख्य महिलांना रोजगार मिळाला आहे. या यादीत समाजसेविका स्मिता नलावडे यांचा देखील समावेश असून त्या योग वर्ग चालवतात. या धकाधकीच्या जीवनात लोकांचे आरोग्य निरोगी राखण्यासाठी त्यांनी सुरू केलेला योग वर्ग हा उपक्रम मुलुंडमधील असंख्य जणांना फायद्याचा ठरलेला आहे. तसेच विविध भारतीमध्ये निवेदक असलेल्या सोनाली पाठक यांचा देखील यावेशी सत्कार पार पडला. त्या विविध भारतीच्या अनेक कार्यक्रमात निवेदन करत असून त्यांची प्रसिद्धी अफाट आहे. तसेच ब्युटिशियन असलेल्या मेघना जोशी यांना देखील हा मान मिळाला. त्या फक्त ब्युटिशियनच नसून त्यांनी अनेक तरुणींनी ब्युटिशियनची कला अवगत करत त्यांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. एक सर्वोत्कृष्ट ब्युटिशियन म्हणून त्यांची नावलौकिकता आहे. तसेच सर्व सत्कारमुर्तींनी आजपर्यंत अनेक पुरस्कार पटकावले असून या सर्व हिरकण्यांचे सत्कार सारस्वत बँकेच्या ब्रँच मॅनेजर श्रद्धा रेगे व फ्युचर जनरालीच्या मॅनेजर अंजली सिंग यांच्या हस्ते पार पडला. तसेच या कार्यक्रमाला असंख्य महिलांनी उपस्थिती दर्शवली होती.
No comments:
Post a Comment