Friday, 28 April 2023

*'प्लॅनेट मराठी'वरील 'त्या नंतर सगळं बदललं' पॉडकास्ट शोची चर्चा *

 


*'प्लॅनेट मराठी'वरील 'त्या नंतर सगळं बदललं'  पॉडकास्ट शोची चर्चा * 


प्लॅनेट मराठी नेहमीच नवनवीन. वेगळ्या विषयांद्वारे प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन करणारे विषय घेऊन भेटीस येत असते. कोणतीही वेबसीरिज असो किंवा कोणताही टॉक शो त्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम लाभतेच. आता प्लॅनेट मराठी प्रस्तुत ''त्या' नंतर सगळं बदललं' हा नवाकोरा पॉडकास्ट शो प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या शोची सूत्रसंचालिका सानिका मुतालिक आहे. या शोमध्ये कलाकारांच्या आयुष्यात नक्की कोणत्या ‘त्या’ गोष्टीनंतर सगळं बदलतं, विजयाच्या शिखरावर असताना पाठी वळून जेव्हा ते बघतात, तेव्हा त्यांना कसं वाटतं, या सगळ्या रंजक गोष्टींचा खुलासा या पॉडकास्ट शोद्वारे प्रेक्षकांसमोर होणार आहे. या शोचे ३ एपिसोड्स प्रदर्शित झाले असून हेमांगी कवी, आदिनाथ कोठारे आणि सुयश टिळक यांनी या शोमध्ये हजेरी लावून अनेक गंमतीदार, मजेदार तर कधी भावनिक करणारे अनेक किस्से सांगितले.


'त्या नंतर सगळं बदललं'च्या पहिल्या एपिसोडमध्ये सुयश टिळकने त्याचा फोटोग्राफर ते अभिनेता होण्यापर्यंतचा प्रवास सांगितला तर दुसर्‍या एपिसोडमध्ये हेमांगी कवीने ट्रेंडमुळे होणार्‍या ट्रोलिंगचा कसा सामना करावा लागला, त्याचा किस्सा सांगितला. आदिनाथ कोठारेमध्ये आणि जीजामध्ये घडणार्‍या अनेक गंमतीजंमतींचे भन्नाट किस्से ‍तिसर्‍या एपिसोडमध्ये बघायला मिळतील. आगामी एपिसोडमध्ये कोणता नवीन कलाकार सहभागी होणार आणि त्याचे किंवा तिचे कोणते नवीन किस्से ऐकायला मिळणार, यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार असून लवकरच नवीन एपिसोड प्लॅनेट मराठीच्या यूट्यूब चॅनेलवर पाहता येतील. दर रविवारी सकाळी ११ वाजता प्रदर्शित होणाऱ्या या शोचे पाच भाग आहेत. 


प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, "प्रेक्षकांना लहान व्हिडिओ, पॉडकास्ट शो पाहायला आवडतात. कलाकारांच्या आयुष्यात घडलेले अनेक रंजक, मजेदार किस्से, त्यांच्यासोबत पडद्यामागे घडलेल्या अनेक मजेदार घटना जाणून घ्यायच्या असतात. चाहत्यांच्या याच विषयाला केंद्रस्थानी ठेवून त्यांची आवड जोपासत आम्ही हा पॉडकास्ट शो प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आलो आहोत. कलाकारांच्या आयुष्यात नेमकं काय घडतं, त्यांना काय आवडतं, कोणत्या कारणामुळे ते आज इथपर्यंत पोहोचले, या सगळ्या गोष्टी या पॉडकास्ट शोद्वारे प्रेक्षकांना समजतील."

मनाचे परिवर्तन करणाऱ्या 'अनलॉक जिंदगी'चे ट्रेलर प्रदर्शित

 



मनाचे परिवर्तन करणाऱ्या 'अनलॉक जिंदगी'चे ट्रेलर प्रदर्शित 


दोन वर्षांपूर्वी साऱ्या जगावर एक मोठे संकट आले, कोरोना महामारीचे. अवघ्या काही दिवसांतच या महामारीने जगभर हाहाकार माजवला. कोरोनाच्या विळख्यात आपण असे अडकलो की, संपूर्ण जग ठप्प झाले. शाळा, कॉलेजेस, ऑफिसेस, उद्योगधंदे, मंदिरे, दळणवळणाची साधने. संपूर्ण जगच थांबले. निर्मनुष्य रस्ते पाहून जीव घाबराघुबरा व्हायचा. लोकांचे एकमेकांना भेटणे थांबले. या महामारीत कित्येकांनी आपले प्राण गमावले, अनेकांचे भावनिक, आर्थिक, अशा सगळ्याच बाजूने नुकसानही झाले. आजही हे भयाण वास्तव आठवले, की अंगावर काटा येतो. लॉकडाऊनमधील ही परिस्थिती लवकरच आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. रियल रील्स प्रस्तुत, राजेश गुप्ता निर्मित, दिग्दर्शित 'अनलॉक जिंदगी' या चित्रपटाचे नुकतेच ट्रेलर लाँच झाले असून या चित्रपटात पितोबाश त्रिपाठी, राजेश गुप्ता, देविका दफ्तरदार, शिवानी सुर्वे, इंदिरा कृष्णा, हेमल देव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'अनलॉक जिंदगी'चे लेखन आणि संवादही राजेश गुप्ता यांचेच असून गीतकार नुसरत फतेही अली खान, राजेश गुप्ता आहेत. 


ट्रेलरमधील पहिलाच सीन काळजाचा ठोका चुकवणारा आहे. यात एक स्वार्थी व्यावसायिक, फ्रँटलाईन वर्कर,त्याची काळजी करणारी बायको, गृहिणी, दोन असाह्य स्त्रिया यांची कहाणी पाहायला मिळणार आहे. या सगळ्यांचे आयुष्य समांतर जात असतानाच प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या आहेत. ट्रेलरमध्ये माणुसकीचा खरा चेहरा समोर आणणारी अनेक दृश्ये यात दिसत आहेत. कठीण प्रसंगात रक्ताची नाती कशी मागे फिरतात आणि अनोळखी कसे मदत करतात, याचे दर्शनही यातून होत आहे. माणसाच्या मनाचे परिवर्तन करणाऱ्या या चित्रपटाची लंडन, मेक्सिको, पॅरिस आणि टोरांटो फिल्म फेस्टिवलमध्येही निवड झाली आहे. येत्या १९ मे रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 


दिग्दर्शक आणि निर्माते राजेश गुप्ता म्हणतात, '' ही खूप साधी गोष्ट आहे, ज्याचा अनुभव कोरोनाच्या काळात अनेकांनी अनुभवला आहे. एक गंभीर विषय त्याचे गांभीर्य जाऊ न देता विनोदी पद्धताने मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. या सिनेमाचे संपूर्ण चित्रीकरण पुण्यात झाले आहे. लॅाकडाऊन संपल्यानंतर पुण्यात लॅाकडाऊनचे चित्रीकरण करणे, निश्चितच आव्हानात्मक होते. तरीही आम्हाला अपेक्षित असे चित्रीकरण आम्ही केले. कोरोनाच्या काळातील अस्सल स्थिती दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटातून केला आहे. माणसाचे मतपरिवर्तन करणारी ही कथा आहे. या चित्रपटाची दादासाहेब फाळके पुरस्कारासह आठ राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाली असून त्यापैकी दोन चित्रपट महोत्सवात आम्हाला बेस्ट फिचर फिल्म आणि बेस्ट नरेटिव्ह फिचर फिल्म’चा पुरस्कारही मिळाला आहे.’’

BLOW OUT THE CANDLES! NAVIN AGARWAL HOSTED A GRAND STAR STUDDED BIRTHDAY BASH OF ACTRESS AMI NEEMA

 


BLOW OUT THE CANDLES!


NAVIN AGARWAL HOSTED A GRAND STAR STUDDED BIRTHDAY BASH OF ACTRESS AMI NEEMA


The birthday bash of Ami Neema was a grand affair. It was a flamboyantly splendid party with glitz, glamour, opulence, and loads of love for the birthday girl reflecting from the entire preparations that were no less than perfect.



A significant chunk of the television industry and some names from the film arena were seen like Sahil Anand, Navin Agrawal, Sachin Bhatt, Zulfi Sayed, Sharhaan Singh, Rimi Dey Sarkar, Prashant Virendra Sharma, Navin Prabhakar, Rajdeep Bajpai, Asmi Rishal, Kunal Panwar, Rohan Mehra, Deepak Kalra, Claudia, and many more at the birthday celebrations of Ami which took place at Mumbai's hottest property Dragonfly Experience.

The food was a sumptuous layout of the best that can be imagined. It was a magical feast with the most delicious fare laid down in the most luscious manner. The party was a gourmet lover's delight with a lovely blend of exotic cuisines; it had the best from across the land.

Ami Neema, an actor par excellence who has appeared in shows like Kasauti Zindagi Ki, India Waali Maa, and Naagin 5 shined amongst the attendees and said “Birthdays are always special. The day becomes further special when you spend the day with your friends and family”

South Indian Bank Integrates with Central Board of Indirect Taxes (CBIC) for GST Collections


 

South Indian Bank Integrates with Central Board of Indirect Taxes (CBIC) for GST Collections

Thrissur: South Indian Bank announced integration with the Central Board of Indirect Taxes for the collection of Goods & Service Tax Collection for its retail and corporate customers. The payment facility is LIVE, allowing all Taxpayers to remit GST using ‘Over the Counter Mode’at Bank’s vast branch network.

South Indian bank customers have the additional option to make payments via ‘Internet Banking’ facility as well making the process seamless, faster and hassle free.

Speaking on development, Thomas Joseph K, Chief Business Officer said ‘South Indian Bank has built a bedrock of trust with its customers over several decades. We now are extending our state of the art technological innovations to provide our customers seamless and hassle free services. Our integration with the Central Board of Indirect Taxes (CBIC) for GST Collections for government is among the latest introductions. The feature allows Taxpayers ease of indirect tax payments across our 932 branches as well as through our Internet Banking platform –SIBerNet.’

South Indian bank is already LIVE withTIN 2.0, a  for Direct Tax Payments, ICEGATE for customs duty payments and Telangana Cyber Treasury portal  for Treasury Payments in the State of Telangana. Enabling this facility would further strengthen the ties of South Indian Bank with the Government of India imprinting it as a bankable partner in facilitating payments.

Thursday, 27 April 2023

'सरी'च्या कलाकारांनी दिले गरजूंना सरप्राईस

 


'सरी'च्या कलाकारांनी दिले गरजूंना सरप्राईस


'लाईफ इज फुल्ल ऑफ सरप्राइजेस अँड मिरॅकल्स'. या ओळीचा अनुभव प्रत्येकाच्या आयुष्यात एखाद्या निमित्ताने येतोच. हे सरप्राइजेस आणि मिरॅकल्स कधी चेहऱ्यावर हसूही आणतात तर कधी आसूही. असेच एक सुखद सरप्राईज नुकतेच 'सरी' चित्रपटाच्या कलाकारांनी दिले. मुंबई परिसरातील काही गरजुंना अन्नधान्याच्या वाटपाचे सरप्राईज देऊन त्यांनी गरजूंच्या चेहऱ्यावर हसू आणले. नुकताच हा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाला आहे. ज्याप्रमाणे या कलाकारांनी या गरजूंना सुखद धक्का दिला तसाच सरप्राइजेस आणि मिरॅकल्सने भरलेला अशोका के. एस. दिग्दर्शित 'सरी' हा चित्रपट येत्या ५ मे रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. कॅनरस प्रॉडक्शन्स प्रस्तुत, डॉ. सुरेश नागपाल आणि आकाश नागपाल निर्मित या चित्रपटात  अजिंक्य राऊत, रितिका श्रोत्री, पृथ्वी अंबर, मृणाल कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 


चित्रपटातील कलाकारांनी फुटपाथवर राहणाऱ्या गरजूंना त्यांच्या नकळत अन्नधान्यांची भरलेली पिशवी दिली. ज्या वेळी ही गोष्ट त्यांना कळली, त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद समाधान देणारा होता. याबद्दल अभिनेता अजिंक्य राऊत, पृथ्वी अंबर आणि रितिका श्रोत्री म्हणते, '' प्रत्येकाच्या आयुष्यात काही अपेक्षित, अनपेक्षित चमत्कार घडतच असतात. आज यांना सरप्राईस देऊन त्यांच्या चेहऱ्यावरील ख़ुशी पाहून आम्हालाही खूप आनंद झाला.''

ईशान- मानवचे ‘ते’ नाते येणार नातेवाईकांच्या समोर ‘चिकटगुंडे २'चा तिसरा एपिसोड पाहा प्लॅनेट मराठी ओटीटीवर



 ईशान- मानवचे ‘ते’ नाते येणार नातेवाईकांच्या समोर 

‘चिकटगुंडे २'चा तिसरा एपिसोड पाहा प्लॅनेट मराठी ओटीटीवर 


काही दिवसांपूर्वीच प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित झालेला ‘चिकटगुंडे २’ ही प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरत आहे. नुकतेच त्याचे दोन एपिसोड्स प्रेक्षकांच्या भेटीस आले. आता पुढील शुक्रवारी म्हणजेच २८ एप्रिल रोजी ‘चिकटगुंडे २’चा तिसरा एपिसोड येणार आहे. 'पहिल्या सीझनमध्ये ईशान आणि मानव एकमेकांच्या प्रेमात असून ईशानच्या घरच्यांना ही गोष्ट कळल्यावर त्यांचे ‘हे’ नाते ते मान्यही करतात, असे दाखवण्यात आले आहें. आता या भागात ईशान आणि मानवचे नाते नातेवाईकांसमोर येणार असून त्यांच्या प्रतिक्रिया कशा असणार? ईशान आणि मानवला आणखी कोणत्या नवीन आव्हानांना सोमोरे जावे लागणार? हे येत्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे.  प्लॅनेट मराठी आणि भाडिपा प्रस्तुत या सीरिजमध्ये  ईशानची भूमिका सुशांत घाडगेने तर मानवची भूमिका चैतन्य शर्माने साकारली आहे. 


प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, " ही सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. पहिल्या दोन्ही एपिसोड्सना भरभरून प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांना आवडेल, असा उत्तम कॅान्टेन्ट देणे ही भाडिपाची खासियत आहे. मुळात सगळ्या वयोगटातील प्रेक्षकवर्ग पाहू शकेल, अशी ही सीरिज आहे. तिसरा भाग आणि येणारे पुढील भागही प्रेक्षकांना निश्चितच आवडतील. मागील भागातील सरप्राईज या भागात उघड होणार आहे.’’

प्रत्येकाला ठेका धरायला लावणार 'फकाट'मधील 'भाई भाई'



प्रत्येकाला ठेका धरायला लावणार 'फकाट'मधील 'भाई भाई' 


१९ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या श्रेयश जाधव दिग्दर्शित 'फकाट' या चित्रपटातील 'भाई भाई' हे भन्नाट बोल असलेले आयटम साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले असून हे गाणे हेमंत ढोमे, सुयोग गोऱ्हे, जॅाली भाटिया आणि नितेश चव्हाण यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. हटक्या चालीवर आपोआप थिरकायला लावणारे हे गाणे हर्षवर्धन वावरे आणि आदित्य पाटेकर यांनी गायले असून या गाण्याला हर्षवर्धन वावरे, करण वावरे आणि आदित्य पाटेकर (ट्रिनिटी ब्रदर्स) यांचे बोल आणि संगीत लाभले आहे. तर या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन सुजित कुमार यांनी केले आहे. 


या गाण्यात हेमंत, सुयोग आणि नितेश एकदम जल्लोषात नाचताना दिसत असून जॉली भाटियाच्या कातिल अदांनी ते घायाळ झाले आहेत. या गाण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा सुयोगचे नृत्यकौशल्य पाहायला मिळत असून हेमंत आणि नितेशनेही एकदम फकाट डान्स केला आहे. या गाण्यात दिग्दर्शक श्रेयश जाधवचीही झलक पाहायला मिळत आहे. एकंदरच हे उत्स्फूर्त गाणं प्रत्येकाला ठेका धरायला लावणारे आहे. 


या गाण्याबद्दल दिग्दर्शक श्रेयश जाधव म्हणतात, " हे उत्साहाने भरलेले गाणे प्रत्येकाला नाचायला लावणारे आहे. ट्रिनिटी ब्रदर्सने या गाण्याला चारचांद लावले आहेत. या गाण्याचा किस्सा म्हणजे सेटवरचे अनेक जण शूटदरम्यान नाचायचे. इतकी या गाण्याच्या संगीताची ताकद आहे. त्यामुळे चित्रीकरणात विलंब व्हायचा. अखेर शूटच्या दरम्यान कॅमेरासमोर सगळ्यांना ठेका धरायला लावला. तरुणाईला आवडेल असे हे गाणे आहे. 


हायली कॉन्फिडेन्शियल धिंगाणा असलेल्या 'फकाट' या चित्रपटात अविनाश नारकर, हेमंत ढोमे, सुयोग गोऱ्हे, नितेश चव्हाण, रसिका सुनील, अनुजा साठे, किरण गायकवाड, कबीर दुहान सिंग आणि महेश जाधव यांनी प्रमुख भूमिका असून वक्रतुंड एन्टरटेनमेंट्स, गणराज स्टुडिओ प्रस्तुत, निता जाधव निर्मित हा चित्रपट महाराष्ट्रातील चित्रपटगृहात लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Wednesday, 26 April 2023

अरबाज खान, अली असगर ने सिंगर ऎक्टर एस शुभम, अर्चना सिंह राजपूत का म्यूजिक वीडियो किया लॉन्च

 



अरबाज खान, अली असगर ने सिंगर ऎक्टर एस शुभम, अर्चना सिंह राजपूत का म्यूजिक वीडियो किया लॉन्च 


चीफ गेस्ट अरबाज खान ने मुम्बई के सिल्करुट लाउंज में हुए एक भव्य समारोह में सोलग्लिटज़ प्रोडक्शन्स के लेटेस्ट म्युज़िक वीडियो "तुमसे प्यार है" को लॉन्च किया। इसके सिंगर और ऎक्टर एस. शुभम हैं जबकि वीडियो में उनके साथ खूबसूरत अदाकारा अर्चना सिंह राजपूत ने फीचर किया है। इस वीडियो के निर्देशक बजरंग बादशाह, गीतकार संगीतकार एस शुभम हैं। इस अवसर पर म्युज़िक वीडियो "तुम ही हो" की सक्सेस का जश्न भी मनाया गया। इस सॉन्ग का म्युज़िक एसएलएफ ने दिया है और निर्देशक बजरंग बादशाह, गीतकार शब्बीर अहमद हैं।


इस फंकशन के मुख्य अतिथि अरबाज खान थे जबकि दूसरे सेलेब्रिटी गेस्ट्स में निर्देशक दीपक शिवदसानी, अली असगर, शुभम के पिता संजय सेठ, प्रोड्यूसर सलमान अहमद खान, हनीफ छत्रिवाला, ईशान मसीह, एसआरके का नाम उल्लेखनीय है।

गायिका चंद्रकला ने अपनी गायकी से प्रोग्राम की शुरुआत की। अरबाज खान सहित सभी मेहमानों को पुष्पगुच्छ देकर सम्मानित किया गया। फिर तुमसे प्यार है सॉन्ग दिखाया गया, जिसे सभी ने खूब पसन्द किया।


अरबाज खान ने बताया कि शुभम के लिए यह बेहद महत्वपूर्ण फंक्शन है क्योंकि आज उनका अल्बम रिलीज हो रहा है। हम सब यहां उन्हें सपोर्ट करने, उनका हौसला बढ़ाने और शुभकामनाएं देने आए हैं। शुभम के पिता जी इतने खुश दिख रहे हैं कि ऐसा लग रहा है कि उनके बेटे का नहीं बल्कि उनका ही सॉन्ग रिलीज हो रहा है। हर पिता के चेहरे पर अपने पुत्र की कामयाबी के लिए ऐसी ही खुशी होती है। गाना मैंने देखा और मुझे बहुत अच्छा लगा। यह बड़ी खूबसूरती से फ़िल्माया गया है। मैं ऎक्ट्रेस अर्चना सिंह राजपूत को भी बधाई देता हूँ जिन्होंने वीडियो में गजब की एक्टिंग की है। शुभम स्क्रीन पर बहुत प्रोमिसिंग लग रहे हैं, उनकी आवाज़ भी कमाल की है। मैंने उन्हें लाइव गाते हुए भी सुना है और वह अद्भुत तरीके से गाते हैं। अली असगर, ईशान मसीह और सभी लोग शुभम को यहां सपोर्ट करने के लिए हाजिर हुए हैं। बजरंग बादशाह ने वीडियो को बखूबी डायरेक्ट किया है। 


इस अवसर पर शुभम के पिता काफी इमोशनल हो गए। उन्होंने कहा कि पापा कहते हैं बड़ा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा, यह शुभम ने कर दिखाया है। हम सब अरबाज खान के बहुत आभारी हैं कि वह अपना कीमती समय निकाल कर शुभम को आशीर्वाद देने आए।


शुभम भी इस अवसर पर बेहद एक्साइटेड नजर आए। उन्होंने कहा कि मेरे पास शब्द नहीं हैं कि किस तरह हम अरबाज खान, अली असगर जैसे अतिथियों का शुक्रिया अदा करें जो मेरे लेटेस्ट सॉन्ग के लॉन्च पर आए। हम सब ने इस गीत में बड़ी मेहनत की है। माइन्स 17 डिग्री में हमने इसको शूट किया है, आज उसका रिज़ल्ट देखकर खुशी हो रही है। 


इंफ्लुएंसर ईशान मसीह ने यहां कहा कि शुभम ने  बर्फीली वादियों में अपनी परफॉर्मेंस से गर्मी बढ़ा दी है। मैं और अर्शी खान इस गीत पर अलग तरह की रील बनाएंगे।


अभिनेत्री अर्चना सिंह राजपूत ने भी यहां अपनी खुशी और उत्सुकता प्रकट की और कहा कि अरबाज सर के हाथों हमारे अल्बम की लॉन्चिंग होना हमारे लिए प्राउड मोमेंट रहा।

अभिनेते शंतनू मोघे परतले “सफरचंद” मध्ये



 अभिनेते शंतनू मोघे परतले     “सफरचंद” मध्ये  

सरगम + अमरदीप निर्मित, कल्पकला प्रकाशित, निर्माते भरत नारायणदास ठक्कर, प्रविण भोसले व अजय कासुर्डे यांच्या “सफरचंद” या नाटकाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गुजरातीतल्या प्रसिद्ध लेखिका स्नेहा देसाई यांच्या मूळ ‘सफरजन’ नाटकाचे रूपांतर मराठीत मुग्धा गोडबोले यांनी “सफरचंद” या नावाने केले असून राजेश जोशी यांनी कमालीचे दिग्दर्शन केले आहे. एक वेगळा विषय या नाटकात मांडला असून सर्वधर्म समभाव हा एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. एक भव्य दिव्य नाट्यनिर्मिती म्हणून या नाटकाने रंगभूमीवर कमाल केली आहे. हुबेहूब काश्मीर प्रत्यक्षात रंगमंचावर अवतरला असून फिरता रंगमंच, भव्य नेत्रसुखद नेपथ्य, त्या वातावरणाला साजेसं मधुर संगीत ही या नाटकाची उल्लेखनीय बाजू आहे. या नाटकातील उत्कृष्ट अभिनयामुळे अभिनेते शंतनू मोघे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले असून संजय जामखंडी, प्रमोद शेलार, अमीर तडवळकर, रूपेश खरे, अक्षय वर्तक, राजआर्यन कासुर्डे या कलाकारांनीही चोख भूमिका साकारल्या आहेत. या नाटकाला आत्तापर्यंत म. टा. सन्मान सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना भौतेश व्यास, सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत सचिन जिगर, सर्वोत्कृष्ट नेपथ्य संदेश बेंद्रे तसेच अशोक मुळये यांचा माझा पुरस्कार सर्वोत्कृष्ट नेपथ्य संदेश बेंद्रे, सर्वोत्कृष्ट लक्षवेधी अभिनेता शंतनू मोघे या पुरस्काराने गौरविले असून सांस्कृतिक कलादर्पणची सर्वोत्कृष्ट नाटक, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक राजेश जोशी, सर्वोत्कृष्ट अभिनेता शंतनू मोघे, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री शर्मिला शिंदे, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता संजय जामखंडी, सर्वोत्कृष्ट लेखक स्नेहा देसाई, सर्वोत्कृष्ट नेपथ्य संदेश बेंद्रे, सर्वोत्कृष्ट रंगभूषा राजेश परब, सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना भौतेश व्यास, सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत सचिन जिगर, सर्वोत्कृष्ट वेशभूषा तारा देसाई अशी ११ नामांकन मिळाली आहेत. 


सांगायच तात्पर्य असं की, या नाटकातील मध्यवर्ती भूमिका साकारणारा अभिनेता शंतनू मोघे यांचा धुळ्यामध्ये एका महानाट्याच्या प्रयोगा दरम्यान त्यांच्या पायाला मार लागून पाय फ्रॅक्चर झाला. डॉक्टरांनी त्यांना एक महिना आराम करण्यास सांगितले. शो मस्ट गो ऑन या उक्तीप्रमाणे अचानक आलेल्या या प्रसंगाशी हार न मानता व ३१ मार्चचा बोरिवली येथील पूर्वनियोजित प्रयोग रद्द न करता शंतनू मोघे यांनी वॉकरच्या सहाय्याने हा प्रयोग सादर केला. पायाला फ्रॅक्चर झालेलं असतानाही हातात वॉकर घेऊन त्यानं नाटकाचा संपूर्ण प्रयोग केला आणि प्रेक्षकांनीही या प्रयोगाला टाळ्यांच्या कडकडात दाद दिली. नंतर शंतनू मोघे यांच्या जागी दूसरा अभिनेता घेऊन या नाटकाचे प्रयोग निर्मात्यानी सुरू ठेवले. पण आता तब्बल एक महिन्यानंतर शंतनू मोघे पूर्णपणे बरा होऊन या नाटकात परतला आहे. या नाटकाचा पुढील प्रयोग १ मे रोजी दुपारी ३.३० वाजता शिवाजी मंदिर येथे होणार असून पुढील सर्व प्रयोगात शंतनू मोघे अभिनय करताना दिसणार आहे.

‘परिनिर्वाण'मधून उलगडणार नामदेव व्हटकर यांच्या आयुष्यातील संघर्षमय प्रवास...

 



‘परिनिर्वाण'मधून उलगडणार नामदेव व्हटकर यांच्या आयुष्यातील संघर्षमय प्रवास..

भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्यायमंत्री, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर. दलितांचा उद्धारकर्ता अशीही त्यांची ओळख आहे. त्यांचे एकंदरीत जीवन पाहता, आयुष्य मोठे असण्यापेक्षा महान असायला हवे! ही ओळ त्यांना अतिशय अनुरूप ठरते. अशा या 'महामानवा'ने ६ डिसेंबर १९५६ रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अखेरच्या दर्शनाकरता व अंत्ययात्रेत सहभागी होण्याकरता प्रचंड प्रमाणात जनसागर उसळला होता. या मन हेलावणाऱ्या क्षणाचा एक असा साक्षीदार आहे, जो विषमतेच्या वणव्याला न जुमानता, अनेकांना प्रेरणा देत, डौलाने घट्ट उभा राहिला. अशा या महावृक्षाच्या परिनिर्वाणाची गोष्ट आपल्याला आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. कल्याणी पिक्चर्स प्रस्तुत, कल्याणी पिक्चर्स आणि अभिता फिल्म्स प्रॅाडक्शन निर्मित ‘परिनिर्वाण’ हा चित्रपट एका अशा व्यक्तिमत्वावर आधारित आहे, ज्याने आपल्या ‘नॅशनल हिरो’साठी एक असामान्य पाऊल उचलले. नामदेव व्हटकर असे या सामान्य व्यक्तिमत्वाचे नाव असून ही व्यक्तिरेखा प्रसाद ओक साकारणार आहेत. नुकत्याच एका भव्य सोहळ्यात ‘परिनिर्वाण’च्या मोशन पोस्टरचे अनावरण करण्यात आले. या सोहळ्याला  चित्रपटाच्या इतर टीमसोबतच नामदेव व्हटकर यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. यावेळी नामदेव व्हटकर यांच्या आयुष्यावरील चित्रफितही दाखवण्यात आली. तसेच नामदेव व्हटकर यांनी टिपलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्वाण यात्रेची आणि गर्दीची क्षणचित्रंही याठिकाणी उपस्थितांना पाहण्यासाठी ठेवण्यात आली होती. शैलेंद्र कृष्णा बागडे दिग्दर्शित या चित्रपटाचे सुनिल शेळके निर्माता आहेत तर आशिष ढोले सहनिर्माता आहेत. यात प्रसाद ओक यांच्यासोबत प्रमुख भूमिकेत अंजली पाटील असून रोहन - रोहन यांचे या गाण्याला संगीत लाभले आहे. या प्रसंगी एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यात पत्रकार सौमित्र पोटे, प्रसाद ओक आणि जयवंत व्हटकर यांचा सहभाग होता. 


   'परिनिर्वाण'चे मोशन पोस्टर अंगावर अक्षरशः शहारा आणणारे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची परिनिर्वाण महायात्रा नामदेव व्हटकर यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. चित्रीकरणाच्या उद्देशाने झपाटलेला हा एकमेव अवलिया आहे, ज्यांच्याकडे या महायात्रेचे दुर्मिळ चित्रीकरण आहे. नामदेव व्हटकर हे केवळ छायाचित्रकारच नसून ते लेखक, संगीतकार, कुशल प्रशासक, लोककलेचे अभ्यासक, प्रगतीशील शेतकरी, स्वातंत्र्य सैनिक, जागरूक आमदारही होते. 


या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक शैलेंद्र बागडे म्हणतात, '' एका चित्रपटाविषयी पुस्तक वाचत असताना मला नामदेव व्हटकर यांचा एका ओळीचा संदर्भ सापडला आणि नंतर त्याविषयी मी शोध घेत गेलो. इंटरनेटवरही फार काही माहिती उपलब्ध नव्हती. मग इथेतिथे शोधून त्यांच्या कुटुबियांचा नंबर मिळवला आणि त्यांना जाऊन भेटलो. त्यांच्याकडे असलेल्या पुस्तकांमधून मला बरीच माहिती मिळाली. तिच मांडण्याचा प्रयत्न मी या चित्रपटातून केला आहे. हा चित्रपट माहितीपट अथवा चरित्रपट नसून हा एक व्यावसायिक चित्रपट आहे. यातून दोन व्यक्तिमत्वांचा समांतर प्रवास आम्ही समोर आणतोय. या चित्रपटात १९२५ ते १९५६चा काळ दाखवण्यात आला असून डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती देणाऱ्या अनेक गोष्टी समोर येणार आहेत.’’ चित्रपटाचे निर्माता सुनिल शेळके, सहनिर्माता आशिष ढोले म्हणतात, ‘’ आता आपण तांत्रिकदृष्ट्या खूप पुढे गेलो आहोत मात्र त्या काळी माध्यम, तंत्रज्ञानाचा अभाव असतानाही त्या व्यक्तिने एका महामानवाच्या निर्वाण यात्रेचे चित्रीकरण केले, हिच खूप मोठी गोष्ट आहे. त्यामागची त्यांची मेहनत या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. आज ज्याप्रमाणे डॅा. बाबासाहेब आंबेडकरांचे  कार्य जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले आहे तसेच नामदेव व्हटकर यांचे कार्यही  जगाच्या कोपऱ्याकोपऱ्यात पोहोचायला हवे, ही आमच्या सर्वांची इच्छा आहे .’’


'नामदेव व्हटकर' यांची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल प्रसाद ओक म्हणतात, ''जेव्हा एखादा सिनेमा माझ्याकडे येतो तेव्हा मी माझी भूमिका बघण्याआधी सिनेमा काय आहे, ते बघतो मग त्या सिनेमात माझी व्यक्तिरेखा काय करतेय, ते बघतो. या चित्रपटाची संहिता ऐकताना पहिल्या पानापासून काहीतरी वेगळं करण्याचा ध्यास असल्याचे जाणवले. मला नामदेव व्हटकर यांची भूमिका साकारायला मिळतेय, हे मी माझे भाग्य समजतो. नामदेव व्हटकर हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. प्रत्येक वाटेवरचा त्यांचा प्रवास अत्यंत अवघड होता आणि लेखकाने तो अतिशय सुंदर गुंफला आहे. ती सुंदरता आणि सहजता पेलवून नेण्याकरता माझा कस लागणार आहे. परिनिर्वाण झाल्यानंतर मोक्ष मिळतो. मात्र त्यासाठी माणसाला मृत्यू यावा लागतो. परंतु मला जीवंतपणी परिनिर्वाण करायला मिळणार आहे. ही कलाकृती आम्ही उत्तम करू शकलो तर प्रेक्षकांना आणि आम्हालाही समाधानाचा मोक्ष मिळणार आहे.’’ तर नामदेव व्हटकर यांचे सुपुत्र जयवंत व्हटकर म्हणतात, '' आज आम्ही भावंडं जे काही घडलो ते आमच्या वडिलांमुळेच. आमच्यात जो काही बदल आहे, त्यामागे वडिलांचीच पुण्याई आहे. माझ्या वडिलांमध्ये परिस्थितीशी झगडण्याचा गुण होता. ही फिल्म ज्यावेळी त्यांनी बनवली तेव्हा मी सहा वर्षांचा होतो. मात्र वडिल जाण्यापूर्वी आमची या विषयावर चर्चा व्हायची. या ‘महामानवा’ने आपल्या समाजासाठी विशेषत: अस्पृश्य समाजासाठी आपले रक्त आटवले आहे, त्यामुळे त्यांचे महत्व आजच्या पिढीसमोर, घराघरांत पोहोचवण्याचा माझ्या वडिलांचा प्रयत्न होता. या महायात्रेच्या चित्रीकरणासाठी त्यांनी आमचे घर गहाण ठेवले होते, छापखानाही विकला होता. ''

Thursday, 20 April 2023

'आले रे पोस्टर बॉईज २' ढोल ताशाच्या गजरात पोस्टरचे अनावरण



 'आले रे पोस्टर बॉईज २'

ढोल ताशाच्या गजरात पोस्टरचे अनावरण 

 


काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'पोश्टर बॉईज'ने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात एक सामाजिक विषय, त्याचे गांभीर्य न जाता विनोदी पद्धतीने चित्रपटात मांडण्यात आला. या धमाल कॉमेडी चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केल्यामुळेच चित्रपट सुपरहिट झाला. प्रेक्षकांच्या या प्रेमामुळेच आता हे बॉईज पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अजय मयेकर दिग्दर्शित 'आले रे पोश्टर बॉईज २' या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली असून 'दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं' अशी टॅगलाईन असणाऱ्या या चित्रपटात पुन्हा एकदा दिलीप प्रभावळकर, हृषिकेश जोशी आणि अनिकेत विश्वासराव हे बॉईज पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचे भव्य पोस्टर लाँच ढोल ताशाच्या गजरात मुंबईतील दादर परिसरात करण्यात आले. यावेळी चित्रपटाच्या २५ फूट पोस्टरचे अनावरण करण्यात आले. संपूर्ण दादर परिसर यावेळी गर्दीने गजबजलेला होता. 



'आले रे पोश्टर बॉईज २'चे पोस्टर पाहता यात तिघे बॉईज लंडनच्या रॉयल गार्डच्या रूपात दिसत आहेत. त्यामुळे यावेळी हे बॉईज लंडनमध्ये काहीतरी धुमाकुळ घालणार आहेत, हे नक्की ! त्यांच्या हातात असलेल्या पोस्टरमध्ये 'फुल्ल बॉडी मसाज, कॉल डॉली' असे लिहिलेले दिसत आहे, म्हणजे हे नेमकं काय प्रकरण आहे? आणि 'दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं', या उक्तीनुसार कोणाची फसवणूक होणार आहे का, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. श्रेयस तळपदे, एएनडब्लू स्टुडिओज आणि विरांगना फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाचे अविनाश वडगावकर, सेजल शिंदे आणि दिप्ती तळपदे निर्माते असून अमित भानुशाली सहनिर्माते आहेत. हितेश मोडक यांचे संगीत लाभलेल्या या चित्रपटाला डॉ. सुधीर निकम यांची पटकथा आणि संवाद लाभले आहेत.  


निर्माते श्रेयस तळपदे म्हणतात, " पोस्टर बॉईजच्या गाजलेल्या पहिल्या भागानंतर पुढचा भाग कधी येणार याबद्दल अनेकांनी मला विचारणा केली. त्यामुळे पुन्हा एकदा या पोश्टर बॉईजना घेऊन त्यात कॉमेडीचा तडका मारण्यास आम्ही सज्ज झालो आहोत. आता या पोश्टर बॉईजनी परदेशात भरारी घेतली आहे त्यामुळे याची धमालही दुप्पट झाली आहे. हळूहळू प्रेक्षकांसमोर येणाऱ्या गोष्टी सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढवणार आहेत.'' 


निर्मात्या सेजल शिंदे म्हणतात, ‘हल्ली मराठीमध्ये खूप नवनवीन विषय हाताळले जात आहेत. चित्रपट हा केवळ मनोरंजनासाठी नसून त्यातून काही सामाजिक प्रबोधन होणेही गरजेचे असते. आले रे पोश्टर बॅाईज २’ सारख्या चित्रपटांमधून दोन्ही गोष्टी साध्य होतात.’’ तर निर्माते अविनाश वडगावकर म्हणतात, ‘’पहिल्या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर आता या चित्रपटाची मजा दुप्पट झाली आहे. कलाकारही सर्वोत्कृष्ट असून कथाही उत्तम आहे. असे विषय बघायला प्रेक्षकांना आवडतात. त्यामुळे आम्हाला आशा आहे, ‘पोश्टर बॅाईज २’ ही सिनेप्रेमींना आवडेल.’’

‘ते’ खासगी क्षण झाल्यानंतर काय झालं? पाहा ‘ चिकटगुंडे २’चा दुसरा एपिसोड

 


‘ते’ खासगी क्षण झाल्यानंतर काय झालं? पाहा ‘ चिकटगुंडे २’चा दुसरा एपिसोड


'भाडिपा' प्रस्तुत ‘चिकटगुंडे’चा पहिला सिझन एका अशा वळणावर येऊन थांबला जिथे प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती ती सिझन २ ची आणि अखेर ‘चिकटगुंडे २’ मागील शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला. 'चिकटगुंडे २'च्या पहिल्या भागात कार्तिक (सारंग साठे) आणि आभा (श्रुती मराठे) यांच्यात फॅमिली प्लॅनिंग आणि प्रेग्नंसीवर चर्चा सुरू होती. या दरम्यान त्यांची लुटुपुटुची भांडणं, त्यांच्यातलं खट्याळ, खोडकर प्रेम पाहायला मिळाले होते. आता येत्या शुक्रवारी म्हणजेच २१ एप्रिल रोजी प्लॅनेट मराठी ओटीटीवर ‘चिकटगुंडे २’चा दुसरा एपिसोड प्रदर्शित होत असून यात सुहास (सुहास शिरसाठ) आणि गायत्री (स्नेहा माझगांवकर) दिसणार आहेत. एखाद्या कपलचे ‘ते’ खासगी क्षण जगासमोर आल्यावर सगळे जण त्याला एन्जॅाय करतात परंतु त्या कपलवर त्याचा काय परिणाम होतो, हे दुसऱ्या भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता त्यांच्या आयुष्यात आलेला दुरावा कमी होणार का आणखीन काही अडचणी त्यांचा दरवाजा ठोठवणार, हे या भागात पाहायला मिळणार आहे. दरम्यान सध्या आयपीएल फिव्हर असल्यामुळे ‘चिकटगुंडे २’च्या टीमने प्रमोशनच्या निमित्ताने आयपीएललाही भेट दिली . यावेळी क्रिकेटच्या गप्पांसोबतच ‘चिकटगुंडे २’च्याही गप्पा रंगल्या. 


प्लॅनेट मराठी आणि भाडिपा प्रस्तुत, गौरव पत्की दिग्दर्शित 'चिकटगुंडे २' या दुसऱ्या सीझनमध्येही सारंग साठे, श्रुती मराठे, सुहास शिरसाठ, स्नेहा माझगांवकर, सुशांत घाडगे, चैतन्य शर्मा, पुष्कराज चिरपुटकर आणि स्वानंदी टिकेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, " पहिल्या सिझनला भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर आता दुसरा सिझन आला आहे. दुसऱ्याच सिझनच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद लाभला. गेल्या भागात लॅाकडाऊनमध्ये अडकलेले कपल्सची कहाणी आता पुढे गेली आहे. आता त्यांच्या आयुष्यात काय घडामोडी घडतील, त्या दर शुक्रवारी प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रेक्षकांना पाहता येतील.’’

Cholamandalam Finance to raise up to Rs 5,000 cr. via NCDs, launches Maiden Tranche I Issue of up to Rs 1,000 cr., Tranche I Issue OpensApril 25, 2023



 Cholamandalam Finance to raise up to Rs 5,000 cr. via NCDs, launches Maiden Tranche I Issue of up to Rs 1,000 cr., Tranche I Issue OpensApril 25, 2023

Coupon Rate Upto 8.40% p.a.#Effective Yield Up to 8.40% p.a.##

·         Maiden public issue of secured, rated, listed, redeemable non-convertible debentures (“NCDs”) of face value and Issue price of ₹ 1,000 each

·         The Tranche I Issue includes a base Issue size of ₹ 500 crores with an option to retain oversubscription up to ₹ 500 crores aggregating up to ₹ 1,000 crores; within a shelf limit of ₹ 5,000 crore 

·         NCDs proposed to be issued pursuant to the Tranche I Issue are rated as “IND AA+/Stable” by India Ratings & Research Private Limited and “[ICRA]AA+ (Stable)” by ICRA Limited

·         Tenor options: 22 months, 37 months & 60 months with annual and cumulative coupon payment options

·         Coupon rate up to 8.40% p.a.# and Effective Yield up to 8.40% p.a.##

·         The Tranche I Issue opens on Tuesday, April 25, 2023 and closes on Tuesday, May 9, 2023**

·         Allotment on first-come-first-serve basis.

·         The NCDs are proposed to be listed on BSE Limited (“BSE”) and National Stock Exchange of India Limited (“NSE”). NSE Limited is the designated stock exchange for the Tranche I Issue.

 

#For Series V ## For Series VI

**This Tranche I Issue shall remain open for subscription on Working Days from 10 a.m. to 5 p.m.(Indian Standard Time) during the period indicated in the Tranche I Prospectus, except that the Tranche I Issue may close on such earlier date or extendeddate as may be decided by the Board of Directors of our Company or Debenture Committee subject to compliance with Regulation 33A of the SEBI NCS Regulations. In the event of an early closure or extension of the Tranche I Issue, our Company shallensure that notice of the same is provided to the prospective investors through an advertisement in all the newspapers in which pre-issue advertisement for opening of the Tranche I Issue have been given on or before such earlier or initial date of TrancheI Issue closure. Application Forms for the Tranche I Issue will be accepted only from 10:00 a.m. to 5:00 p.m. or such extended time as may be permitted by the Stock Exchanges, on Working Days during the Tranche I Issue Period. On the Tranche IIssue Closing Date, the Application Forms will be accepted only between 10 a.m. and 3 p.m. (Indian Standard Time) and uploaded until 5 p.m. or such extended time as may be permitted by the Stock Exchanges. Further, pending mandate requests forbids placed on the last day of bidding will be validated by 5 p.m. (Indian Standard Time) on one Working Day after the Tranche I Issue Closing Date. For further details please refer to the chapter titled “Issue Related Information” on page 36 of the Tranche I Prospectus.

Mumbai, April 20, 2023: Cholamandalam Investment and Finance Company Limited (CIFCL), a leading financial services provider in India, has announced itsmaiden public issue of secured, rated, listed redeemable non-convertible debentures of the face value of Rs. 1,000 each (“NCDs”)with a base Issue size of Rs. 500 crores with an option to retain any oversubscription up to Rs 500 crores, aggregating up to Rs. 1,000 crores, which is within the shelf  limit of Rs 5000 crore  (“Tranche I Issue”). The Tranche I Issue opens on Tuesday, April 25, 2023 and closes on Tuesday, May 9, 2023 with an option of early closure in compliance with SEBI NCS Regulations.

The NCDs are proposed to be listed on BSE and NSE (“NSE” together with BSE, the “Stock Exchanges”) NSE shall be the Designated Stock Exchange for the Tranche I Issue. The NCDs have been rated “IND AA+/Stable” by India Ratings& Research Private Limited and “[ICRA]AA+ (Stable)” by ICRA Limited.

The Tranche I Issue offers various series of NCDs for subscription with coupon rates ranging from 8.25% per annum to 8.40% per annumThe minimum application size would be ₹ 10,000 (i.e., 10 NCDs) and thereafter in multiples of ₹ 1,000 (i.e. 1 NCD) thereof. The NCDs under the Tranche I Issueare being offered with maturity/ tenor options of 22 months, 37 months and 60 months with annual and cumulative payments options across series I, II, III, IV, V and VI. Effective yield (per annum) for the NCD holders in all categories of Investors ranges from 8.25% per annum to 8.40% per annum. Interest payment modesfor the NCDs is through various modes selected by the investors. Amount on Redemption on maturity for the NCD holders in all Categories of Investors under the cumulative coupon payment option ranges from ₹ 1,156.64to 1,497.40 per NCD across various tenures.

As of December 31,2022 the company had 22.70 Lakh Active Customers across India being served by 1,166 branches across 29 states and union territories in India. It has a geographically diversified exposure across North, South, East and West regions, 80% of its branches are located in Tier III, Tier IV, Tier V and Tier VI towns

Its principal businesses include vehicle finance, loan against property and home loans, additionally it also provides financing to SMEs, Consumer and Small Enterprises. Recently it has forayed into providing secured business and personal loans. CIFCL’s Total AUM as on Dec 31, 2022 stood at Rs 95,467 crs.

Out of the Net proceeds of the Tranche I Issue, after meeting the expenditures of and related to the Tranche I Issue, at least 75% shall be utilised for the purpose of onward lending, financing, and for repayment of interest and principal of existing borrowings of the Company and up to 25% for general corporate purposes.

The terms of each series ofNCDs offered under the Tranche I Issue are set out below:

Series

I

II

III*

IV

V

VI

Frequency of Interest Payment

Annual

Cumulative

Annual

Cumulative

Annual

Cumulative

Minimum Application

₹ 10,000 (10 NCDs) across all Series

In Multiples of thereafter (₹)

₹ 1,000 (1 NCD)

Face Value/ Issue Price of NCDs (₹/ NCD)

₹ 1,000

Tenor

22 months

22 months

37 months

37 months

60 months

60 months

Coupon (% per annum) for NCD Holders in all Categories of Investors

8.25%

NA

8.30%

NA

8.40%

NA

Effective Yield (% per annum) for NCD Holders in all Categories of Investors

8.26%

8.25%

8.30%

8.30%

8.39%

8.40%

Mode of Interest Payment

Through various modes available

Series

I

II

III*

IV

V

VI

Redemption Amount (₹ / NCD) on Maturity for NCD Holders in all Categories of Investors

₹ 1,000

₹ 1,156.64

₹ 1,000

₹ 1,279.15

₹ 1,000

₹ 1,497.40

Maturity / Redemption Date (from the Deemed Date of Allotment)

22 Months

 

22 Months

37 Months

37 Months

60 Months

60 Months

Put and Call Option

Not Applicable

 

*Company shall allocate and allot Series III NCDs wherein the Applicants have not indicated the choice of the relevant NCD Series.

 

A.K.Capital Services Limited is the Sole Lead Manager tothe Issue. IDBI Trusteeship Services Limited is the Debenture Trustee to the Issue and KFin Technologies Limited is the Registrar to the Tranche I Issue.

Please note that the Basis of Allotment under the Issue will be on the basis of date of upload of each application into the electronic book of the Stock Exchanges in accordance with the SEBI Operational Circular. However, from the date of oversubscription and thereafter, the allotments will be made to the applicants on proportionate basis. For further details refer section titled “Issue Procedure” on page 55 of the Tranche I Prospectus dated April 19, 2023.

Wednesday, 19 April 2023

प्रेमाच्या 'सरी'चा ट्रेलर प्रदर्शित

 


प्रेमाच्या 'सरी'चा ट्रेलर प्रदर्शित 

SARI | Official Trailer | Ajinkya Raut | Ritika Shrotri | Pruthvi Ambaar | Mrinal Kulkarni | 5th May - YouTube



आश्चर्य आणि चमत्कार या अशा दोन गोष्टी ज्याचा अनुभव आयुष्यात प्रत्येकाला कधीनाकधी तरी येतोच. म्हणूनच तर म्हणतात ना, 'लाईफ इज फुल ऑफ सरप्राईजेस अँड मिरॅकल्स'. याच सरप्राईजेस अँड मिरॅकल्सने भरलेल्या 'सरी' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अशोका के. एस. दिग्दर्शित या चित्रपटात अजिंक्य राऊत, रितिका श्रोत्री, पृथ्वी अंबर आणि मृणाल कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कॅनरस प्रॉडक्शन प्रस्तुत, डॉ. सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्मित हा चित्रपट येत्या ५ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. 



आतापर्यंत झळकलेल्या टिझर, गाण्यांवरून यात प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळणार याची कल्पना आतापर्यंत आली असेलच. ट्रेलरमध्ये सुरुवातीलाच दिया (रितिका) ‘मला माझं पूर्ण जीवन तुझ्यासोबत घालवायचंय... आय लव्ह यू...’ म्हणताना दिसत आहे. आता हे वाक्य नक्की कोणासाठी आहे, रोहित (अजिंक्य) की आदी (पृथ्वी) साठी? रोहितवर मनापासून प्रेम करणाऱ्या दियाच्या आयुष्यात आदीही दिसत आहे. मात्र या तिघांच्याही प्रेमात अनेक चढउतार दिसत आहेत. आता तिघांच्या आयुष्यात आलेले हे सरप्राइजेस आणि मिरॅकल्स नेमके काय आहेत आणि अखेर दिया कोणाची निवड करणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना 'सरी' पाहिल्यावर मिळणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्दर्शक अशोका के. एस. आणि अभिनेता पृथ्वी अंबर मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. त्यामुळे आता प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे ती, चित्रपटाच्या प्रदर्शनाची. 


दिग्दर्शक अशोक के. एस. म्हणतात, "खूप वर्षांपासून मराठी चित्रपट करण्याची इच्छा होती. 'सरी'च्या निमित्ताने ही इच्छा पूर्ण झाली. आजवर मराठी चित्रपटांविषयी, कलाकारांबद्दल खूप चांगले ऐकले होते. यावेळी प्रत्यक्ष काम करताना त्याचा अनुभव आला. मुळात मराठी कलाकार हे खूप प्रतिभावान आहेत. सगळ्यांनीच एकमेकांना खूप सहकार्य केले. चित्रपटाबद्दल सांगायचे तर ही एक प्रेमकहाणी आहे. अशी प्रेमकहाणी ज्यात प्रत्येक वळणावर सरप्राईज आणि चमत्कारीत घटना घडणार आहेत. तरुण-तरुणी भावेल असा हा चित्रपट असला तरी संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा, असा 'सरी' आहे.