Thursday 11 May 2023

आयडीफोर्जकडून अद्ययावत नेत्रा व्ही4प्रो चे एक्सपोनेंशियल 2023 मध्ये अनावरण

 आयडीफोर्जकडून अद्ययावत नेत्रा व्ही4प्रो चे एक्सपोनेंशियल 2023 मध्ये अनावरण

डेनेव्हेर, कॉलरॅडो, 10 मे, 2023 – 1लॅटिसच्या अहवालानुसार वित्त वर्ष 2022 मध्ये भारतातील मानवविरहित विमाना प्रणाली (युएव्ही) क्षेत्रातील 50% बाजारपेठेचा हिस्सा असलेल्या आयडीयाफोर्ज टेक्नॉलॉजी लिमिटेड या सदर क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने अद्ययावत युएव्ही, नेत्रा व्ही4 प्रो चे एक्स्पोनेंशियल 2023 मध्ये अनावरण केले आहे ज्याची उडाण क्षमता 90 मिनिटे आहे. 

नेत्रा व्ही4 प्रो हा आयडीयाफोर्ज विकसित केलेल्या नेत्रा सिरिज युएव्ही मधील नवीन समावेश आहे. नेत्रा व्ही4 प्रो बाबत मुख्य सुधारणा ही 90 मिनिटे उडण्याची क्षमता ही आहे. हे 10 मैलांपर्यंत प्रवास करू शकते. नेत्रा व्ही4 प्रो चा वापर संरक्षण, लोकांच संरक्षण, आपत्काल प्रतिसाद आणि मॅपिंग अशा विविध बाबींसाठी करता येऊ शकतो. 

“नेत्रा सिरिज युएव्हींची रचना ही विविध प्रकारच्या वापरांसाठी करण्यात आली आहे आणि नेत्रा व्ही4 प्रो मध्ये 90 मिनिटे एवढी विस्तारीत उडण्याची क्षमता आहे”, असे आयडियाफोर्जचे सीईओ अंकित मेहता म्हणाले. ते पुढे असे ही म्हणाले की “एक्सपोंशियल हा फक्त एक कार्यक्रमच नाही तर जागतिक युएव्ही उद्योगातील तंत्रज्ञान सादर करण्यासाठीचे जागतिक व्यासपीठ आहे. नेत्रा व्ही4 प्रो अशा जागतिक स्तरावरील व्यासपिठावर सादर करताना आयडियाफोर्जला आपले नवीन शोधही सादर करण्याची संधी मिळत आहे. 


नेत्रा व्ही4 प्रो सादर करण्याबरोबरच आडियाफोर्जने ‘अर्ली अडॉप्टर प्रोग्राम (इएपी) ही अमेरिका आणि कॅनडात चालू केला आहे ज्याद्वारे ग्राहकांना आयडियाफॉर्जची युएव्ही कोणतीही प्राथमिक गुंतवणूक न करता चाचणी म्हणून वापरून पाहता येऊ शकतील. सदर योजना ग्राहकांना 90 मिनिटांची उडाण क्षमता असलेल्या अद्यावत नेत्रा व्ही4 प्रो चा प्रत्यक्ष अनुभव घेता येऊ शकेल. या योजनेत सहभागी झाल्यानंतर ग्राहकांना युएव्ही सवलतीच्या दरात विकत घेता येऊ शकेल. इएपी अंतर्गत आद्य वापरकर्ते म्हणून आयडियाफोर्ज अशा ग्राहकांना नवीन फिचर्सची आधी उपलब्धता आणि समर्पित ग्राहक सेवा देऊ शकणार आहे. 

No comments:

Post a Comment