Monday 8 May 2023

सरी'ला लाभले ‘कांतारा’च्या बी. अजनीश लोकनाथ यांचे संगीत



 सरी'ला लाभले ‘कांतारा’च्या बी. अजनीश लोकनाथ यांचे संगीत


 'लाईफ इज फुल्ल ऑफ सरप्राइजेस अँड मिरॅकल्स' अशी टॅगलाईन असलेल्या 'सरी' चित्रपट ५ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या तो पसंतीस उतरत आहे. अनेक कलाकारांनीही हा चित्रपट चांगला असल्याचे आपल्या सोशल मीडियावरून सांगितले आहे. चित्रपटाची कथा, कलाकार या सगळ्या जमेच्या बाजू असतानाच या चित्रपटाच्या संगीताचीही संगीतप्रेमींना भुरळ पडली आहे. मंदार चोळकर यांचे बोल लाभलेल्या या गाण्यांना अमितराज आणि अरजीत चक्रवर्ती यांनी संगीतबद्ध केले आहे. याशिवाय 'सरी'ची खासियत म्हणजे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध संगीतकार बी. अजनीश लोकनाथ यांचे संगीत 'सरी' चित्रपटाला लाभले आहे. यापूर्वी  बी. अजनीश लोकनाथ  यांनी 'कांतारा' या सुपरहिट चित्रपटाला संगीत दिले होते. तसेच या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक अशोका के. एस. आणि अभिनेता पृथ्वी अंबर मराठीत पदार्पण करत आहेत. कॅनरस प्रॉडक्शन प्रस्तुत, डॉ. सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्मित, रिलायन्स एंटरटेनमेंट प्रदर्शित 'सरी'मध्ये अजिंक्य राऊत, रितिका श्रोत्री, पृथ्वी अंबर आणि मृणाल कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 


प्रेमाची परिभाषा सांगणाऱ्या 'सरी'मध्ये प्रेमाचा त्रिकोण असून दिया ( रितिका श्रोत्री) अखेर कोणाचा स्विकार करणार रोहित ( अजिंक्य राऊत) की आदीचा (पृथ्वी अंबर), हे सरप्राईज प्रेक्षकांना ‘सरी’ पाहिल्यावरच मिळेल.या चित्रपटात मैत्री, प्रेम, विनोद, भावना, नात्याचे महत्व असे मनोरंजांचे संपूर्ण पॅकेजच पाहायला मिळणार आहे. 


चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अशोका के. एस. म्हणतात, '' अतिशय साधेपणाने आम्ही ही कथा मांडली असून मनाच्या खोलवर जाणारी ही कथा आहे. नात्यांबद्दल विचार करायला लावणारी ही कथा आहे. 'सरी'ची गाणीही अतिशय श्रवणीय आहेत. इतकी तगडी संगीत टीम या चित्रपटाला लाभली आहे. चित्रपटगृहातून बाहेर पडल्यावरही प्रेक्षकांच्या डोक्यात ही कथा रेंगाळत राहील.'' तर दाक्षिणात्य चित्रपटांची निर्मिती करणारे निर्माते डॅा. सुरेश नागपाल म्हणतात, '' हा माझा पहिलाच मराठी चित्रपट. मुळात हा चित्रपट मराठीत येतोय, हीच आनंदाची गोष्ट आहे. या चित्रपटाची कथा खूप सुंदर असून मनाला स्पर्शून जाणारी आहे. सगळे प्रभाशाली कलाकार असलेला हा चित्रपट सर्वांनी नक्कीच पाहावा, असा आहे.'' तर संगीतकार बी. अजनीश लोकनाथ म्हणतात, ‘पहिल्यांदाच मी मराठी गाण्याला संगीत दिले आहे. अमितराज आणि अरजीत चक्रवर्ती यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव अनोखा होता. मंदार चोळकर यांच्या शब्दांना संगीतात  गुंफताना मजा आली. एकंदरच चित्रपटाची संपूर्ण टीम कमाल आहे. पुन्हा मराठीत काम करायला मला निश्चितच आवडेल.’’

No comments:

Post a Comment