Tuesday, 27 June 2023

'मुसाफिरा' ठरला स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेला पहिला भारतीय चित्रपट



 'मुसाफिरा' ठरला स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेला पहिला भारतीय चित्रपट 


आनंद पंडित आणि पुष्कर जोग घेऊन येत आहेत मैत्रीचा एक अविस्मरणीय प्रवास 


आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि पुष्कर जोग यांच्या ' 'व्हिक्टोरिया' या भयपटाने प्रेक्षकांना सुंदर स्कॉटलँडची सफर घडवल्यानंतर आता पुन्हा ही जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर्स, गूझबम्प्स एंटरटेन्मेंट आणि नितीन वैद्य प्रॉडक्शनच्या 'मुसाफिरा' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून अभिनेता आणि निर्माता म्हणून काम केल्यानंतर आता पुष्कर जोग 'मुसाफिरा'च्या माध्यमातून पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात पुष्कर जोग, पूजा सावंत, पुष्कराज चिरपुटकर, भोजपुरी स्टार स्मृती सिन्हा, दिशा परदेशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  


मैत्री हा विषय बॉक्स ऑफिसवर नेहमीच यशस्वी ठरला आहे. 'मुसाफिरा' हा चित्रपटही मैत्रीवर बेतलेला असून मैत्रीची  नवीन परिभाषा यात अनुभवायला मिळणार आहे. या बिग बजेट मराठी चित्रपटाची खासियत म्हणजे स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित केलेला हा पहिला भारतीय चित्रपट ठरणार आहे. 


'मुसाफिरा'बद्दल दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणतात, '' अलीकडे मराठी चित्रपटांनी चित्रीकरणासाठी भारताची सीमा ओलांडली आहे. त्यामुळे आता मराठी चित्रपटाचे परदेशात चित्रीकरण करणे नवीन नाही. मात्र एक पाऊल पुढे टाकत 'मुसाफिरा'ने मराठी सिनेसृष्टीत एक नवीन विक्रम प्रस्थपित केला आहे. निसर्गरम्य अशा स्कॉटिश हायलँड्सची सफर प्रेक्षकांची करमणूक द्विगुणित करेल हे नक्की. हा तरुणाईला आवडणारा विषय असला तरी हा एक कौटुंबिक आणि हृदयस्पर्शी चित्रपट आहे. 'मुसाफिरा'चे चित्रीकरण पूर्ण झाले असून या वर्षाच्या अखेरीस 'मुसाफिरा' चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.'' 


आनंद पंडित, रूपा पंडित, पुष्कर जोग, नितीन वैद्य आणि सहनिर्मिती असलेल्या या बिग बजेट चित्रपटाची निर्मिती वैशाली शहा, राहुल व्ही. दुबे आणि डॉ. कादंबरी जेठवानी यांनी केली आहे.


No comments:

Post a Comment