Thursday, 10 August 2023

“माय संपत्ती – अब आपका घर, हमारी जिम्मेदारी”

 

“माय संपत्ती – अब आपका घर, हमारी जिम्मेदारी”


“माय संपत्ती- आता आपलं घर, आमची जबाबदारी” 

आलिशान राहणीमानाची नवी व्याख्या करणाऱ्या व उत्तम सेवा देणाऱ्या रिअल इस्टेटमधील एका नव्या युगाची सुरूवात कपिल झवेरी व अत्री मुखर्जी यांच्या हस्ते झाली आहे. 


९ ऑगस्ट २०२३, मुंबईः रिअल इस्टेट जगतातील एक महत्त्वाच्या घटनेची नोंद आज झाली आहे. ‘माय संपत्ती’ या एंड-टू-एंड होम सोल्यूशन कंपनीची मुहूर्तमेढ आज रोवण्यात आली असून ही कंपनी रिअल इस्टेट उद्योगात क्रांती घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून ग्राहकांना सर्वोत्तम सुखसोयीचे राहणीमान देण्याचा आणि ग्राहकांना त्यांच्या स्वप्नातील घरे मिळवून देण्यासाठी आपली सेवा देण्यास सज्ज झाली आहे. सचोटी, नावीन्यपणा व सर्वोत्कृष्ट या तीन मुख्य तत्त्वांवर स्थापन झालेली ‘माय संपत्ती’ हे गृहखरेदीदार आणि गुंतवणूकदारांसाठी प्रमुख ठिकाण बनले आहे. अत्यंत अनुभवी व्यावसायिक व उद्योगतज्ज्ञ असलेल्या टीमच्या मदतीने हा ब्रँड रिअल इस्टेट जगतातील सर्व अपेक्षा पुऱ्या करत असल्याचे वचन देत आहे.  

९ ऑगस्ट २०२३ रोजी कपिल झव्हेरी व अत्री मुखर्जी यांच्या ‘माय संपत्ती – आता आपले घर, आमची जबाबदारी’चे उद्घाटन प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू संदीप पाटील, सिनेटीव्ही अभिनेते शिव ठाकरे, सिनेअभिनेत्री आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या कराटेपटू संध्या शेट्टी व नृत्यदिग्दर्शिका शबिना खान यांच्या उपस्थितीत अंधेरी पश्चिम येथील द क्लब येथे झाले. या प्रसंगी दिव्या पुंगावकर, खुशी जैन, अंकिता मैथी, सोनिया बिर्जे व अन्य पाहुणे उपस्थित होते.  

लोकांच्या जीवनात बदल घडवून आणणाऱ्या सर्वसमावेशक घरगुती सेवा देणाऱ्यावर ‘माय संपत्ती’चा विश्वास आहे. त्याच बरोबर शून्य खर्चात सर्व त्या प्रकारच्या घरगुती सेवा देताना ग्राहकाच्या खिशावर भार न पाडता त्याला त्याला सोयीचे व आरामदायी जगता येईल, त्यासाठी बँकेतील त्याला पैसे खर्च करावे लागणार नाही, याची काळजी ‘माय संपत्ती’ घेते. ग्राहकाने ‘माय संपत्ती’मार्फत जरी घर खरेदी केले नसले तरी कंपनी कोणत्याही ग्राहकाला समर्पणाने आपली संपूर्ण सेवा देण्यास वचनबद्ध आहे.    

घरगुती सेवा देणाऱ्या अनेक कंपन्या माहिती पुरवताना व सेवा देताना शुल्क आकारतात. पण ‘माय संपत्ती’ त्यांच्या मौल्यवान ग्राहकांना माहिती व सेवा पुरवताना कोणतेही शुल्क आकारत नाही. उदाहरण द्यायचे झाल्यास प्लम्बिग असो, इलेक्ट्रिकलची कामे असो, घरातील डागडुजी असो वा घरदुरुस्तीसंदर्भातील कोणतेही काम असो, ‘माय संपत्ती’ने या सेवांना कव्हर केलेले असते. 

‘माय संपत्ती’ला एकदा निवडल्यानंतर ग्राहकाला त्याच्या गरजेच्या सर्व विस्तृत घरगुती सेवा मिळू लागतात. त्यामुळे ग्राहकावर अनेक सेवांसाठी अन्य सेवा पुरवठादारांशी संपर्क साधण्याची वेळ येत नाही किंवा त्याच्यावर महागड्या सेवा घेण्याची वेळ येत नाही. ग्राहकाचा संपर्क सर्वोत्तम सेवा देणाऱ्याशी होतो व ग्राहकाच्या इच्छाअपेक्षांनुसार सेवा पुरवठादार आपली सर्वोत्कृष्ट सेवा त्यांना देतो. 

प्रत्येक ग्राहकाला अतिरिक्त खर्चाच्या ओझ्याशिवाय आपले घर सुंदर व कार्यक्षम असावे असे वाटत असते, ही मागणी लक्षात घेऊन ‘माय संपत्ती’ ग्राहकांची सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहे. आपल्या ग्राहकांच्या गरजा व त्याच्या समाधानाला सर्वोच्च स्थान देऊन होम सोल्यूशन इंडस्ट्रीची व्याख्या परिपूर्ण करण्याचे ध्येय ‘माय संपत्ती’चे आहे.  

ग्राहकांकडून कोणतेही कमिशन न घेता होम सोल्यूशन उद्योगातील एकाधिक सेवा प्रदान करण्याच्या ‘माय संपत्ती’ या कंपनीचे संस्थापक व प्रवर्तक श्री. कपिल झवेरी हे आहेत. श्री. कपिल झवेरी हे रिअल इस्टेट व प्रॉपर्टी उद्योगातील एक विश्वसनीय नाव असून त्यांचा महाराष्ट्र व गोव्यातील मालमत्तांसंदर्भात प्रभावी पोर्टफोलिओ आहे. तसेच मुंबई व गोव्यांमध्ये अनेक जमीन व्यवहार त्यांनी यशस्वीरित्या करून दाखवले आहेत. ‘माय संपत्ती’च्या उद्घाटन प्रसंगी श्री. कपिल झवेरी म्हणाले, की “पारदर्शकता, प्रामाणिकता व सचोटी ही आमची मार्गदर्शक तत्त्वे असून ग्राहकाचा मिळालेला विश्वास व परस्पर आदर यावर आमचे ग्राहकांसोबत दीर्घकाळ नातेसंबंध टिकत आले आहेत. आपले घर आपल्या स्वप्नांचे व आकांक्षांचे प्रतिबिंब असते, याची जाण आम्हाला आहे, त्यामुळे ग्राहकाच्या राहण्याच्या जागेतील प्रत्येक कोपऱ्याची आम्ही मनापासून काळजी घेऊन तुम्हाला उत्तम व्यावसायिक सेवा व कार्यक्षमता देण्याचा प्रयत्न करू. आम्ही तुमच्यासोबत या प्रवासाला सुरूवात करत आहोत, या प्रवासांत तुमच्या घरांचा कायापालट करत त्या घरात येणाऱ्या सर्वांचे स्वागत उबदारमय होऊन त्यांच्यासाठी आदरातिथ्यशील घर तयार करू.”  

या प्रसंगी ‘माय संपत्ती’चे बिझनेस हेड व प्रतिष्ठित व्यावसायिक अत्री मुखर्जी उपस्थित होते. अत्री मुखर्जी हे रिअल इस्टेटच्या गतिमान जगतात अपवादात्मक अशा व्यवसाय पद्धती व वेगळ्या तऱ्हेच्या अद्वितीय अशा ग्राहक सेवा देणारे व्यावसायिक म्हणून प्रसिद्ध आहेत. अत्री मुखर्जी यांनी लोढा ग्रुप व अमेरिकन एक्स्प्रेस या प्रख्यात बड्या ब्रँडच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा व्यूहरचना व धोरणे आखली होती आणि त्यांनी त्याचे यशस्वीपणे नेतृत्वही केले होते. ‘माय संपत्ती’च्या उद्घाटन प्रसंगी ते म्हणाले की, आम्ही जे काही प्रकल्प हाती घेतले त्या प्रकल्पात उत्कृष्टता आणण्याच्या दृष्टिकोनामुळे आम्हाला असंख्य ग्राहकांचे समाधान, विश्वास व निष्ठा प्राप्त झाली आहे. तसेच मूल्य आणि सुविधा प्रदान करण्याच्या आमच्या कटिबद्धतेमुळे आमच्यावर असंख्य घरमालकांचा विश्वास बसला आहे. त्यामुळे स्वप्नातले घर असण्याचा आनंद निर्माण करणारे जग आपण सर्वांनी मिळून निर्माण करूया, जेणेकरून स्वप्नातील वास्तव्याचा आनंद अनुभवू शकू.”



No comments:

Post a Comment