Monday, 21 August 2023

एकतातर्फे राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा २०२३

 


एकतातर्फे राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा २०२३


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ३५व्या एकता सांस्कृतिक महोत्सवातर्फे एकता कल्चरल अकादमीच्या वतीने गणपत गुणाजी जाधव स्मरणार्थ  राज्यस्तरीय 'काव्यलेखन स्पर्धा' २०२३ आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक कवी-कवियत्रींनी आपल्या दोन कविता, संपूर्ण माहिती, फोटोसहीत  ३१ऑगस्ट २०२३ पर्यत पुढील पत्यावर पाठविणे. अध्यक्ष-  प्रकाश गणपत जाधव, एकता कल्चरल अकादमी, ए/२०४, विशाल हेवन सोसायटी, मनवेल पाडा रोड, विरार (पू). ४०१३०५ (जळबाववाडी समोर) मो.9220899120.

प्रवेश शुल्क - १०० रुपये  गुगल पे 8177870586 पाठवू शकता. (विषयाचे बंधन नाही, दीर्घ कविता नको) विजेत्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय, २०००,१०००,७०० रुपये, तसेच उत्तेजनार्थ ५ पारितोषिक १०० रुपये, एकता सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पारितोषिक वितरण सोहळा डिसेंबर दरम्यान होणाऱ्या ३५वा एकता सांस्कृतिक महोत्सवात प्रदान करण्यात येणार आहे, असे एकताचे सचिव कवी प्रकाश पाटील यांनी एका पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. अधिक माहितीसाठी ९२२०८९९१२० संपर्क करु शकता.


No comments:

Post a Comment