Saturday 26 August 2023

श्री समर्थ व्यायाम मंदिराच्या ज्युडो शिबिराचा समारोप



 श्री समर्थ व्यायाम मंदिराच्या ज्युडो शिबिराचा समारोप


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : श्री समर्थ व्यायाम मंदिरच्या ३५ व्या समर्थ ज्युडो शिबिराचा समारोप राष्ट्रीय ज्युडो खेळाडू नेव्हिल धुमासिया यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्क येथे पार पडला. यावेळी ज्युडो प्रशिक्षक रवि पाटील, उदय शेट्टी, प्रदीप कावथे यांच्यासह श्री समर्थ व्यायाम मंदिरचे सरचिटणीस उदय देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. 

नेव्हिल धुमासिया यांच्या हस्ते खेळाडूंना पारितोषिके देण्यात आली. या शिबिरात ५ वर्षांवरील २०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. ऋषा निंबाळकर, ऋषी कोरोटू, ध्रुव ठाणेकर, नील येडेकर, आगमज्योत कौर खालसा, वीर निंबाळकर, चैतन्य शेटे, अक्षय भोसले, लावण्य तांबे या खेळाडूंना यावेळी सन्मानित करण्यात आले. 


No comments:

Post a Comment