Monday 27 November 2023

पत्रकार प्रशिक्षण कार्यशाळेचे नरेंद्र वाबळे यांच्या हस्ते उद्घाटन जय महाराष्ट्र पत्रकार, वृत्तपत्र लेखक, कवी महासंघ आणि साप्ताहिक मराठी जगत यांचा उपक्रम

 पत्रकार प्रशिक्षण कार्यशाळेचे नरेंद्र वाबळे यांच्या हस्ते उद्घाटन

जय महाराष्ट्र पत्रकार, वृत्तपत्र लेखक, कवी महासंघ आणि साप्ताहिक मराठी जगत यांचा उपक्रम

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मोबाईल फोनवरील व्हॉटसअॅप, फेसबुक आदी अत्याधुनिक तंत्रामुळे प्रसिद्धिमाध्यमांचे लोकशाहीकरण झाले आहे. मात्र, त्यासाठी वाचक-दर्शकांपर्यंत घटनेची माहिती तातडीने पोहोचवाव्या लागणार्‍या या स्पर्धेचे धोकेही वाढले आहेत. नागरी पत्रकारितेत माध्यमांमधील या बदलांचा वापर भान ठेवून केला पाहिजे, असे मत 'जय महाराष्ट्र पत्रकार, वृत्तपत्र लेखक, कवी महासंघ आणि साप्ताहिक मराठी जगत' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पत्रकार प्रशिक्षण कार्यशाळा २०२३-२४ च्या उद्घाटन प्रसंगी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि दैनिक शिवनेरचे संपादक नरेंद्र वाबळे यांनी व्यक्त केले. मुंबई मराठी पत्रकार संघ, पत्रकार भवन, लोकमान्य सभागृह येथे संविधान दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त 'जय महाराष्ट्र पत्रकार, वृत्तपत्र लेखक, कवी महासंघ आणि साप्ताहिक मराठी जगत' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पत्रकार प्रशिक्षण कार्यशाळा २०२३-२४ च्या उद्घाटन प्रसंगी त्यांच्यासह कामगार नेते व दैनिक मुंबई मित्रचे संपादक अभिजित राणे, वरिष्ठ पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली, ज्येष्ठ पत्रकार व पर्यावरण तज्ज्ञ प्रा. हेमंत सामंत आणि आकाशवाणी, मुंबई तसेच रेन्बो एफ. एम.च्या निवेदिका प्रा. रश्मी महांबरे, साप्ताहिक मराठी जगतचे संपादक दीपक कलिंगण, जय महाराष्ट्र पत्रकार, वृत्तपत्र लेखक, कवी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश जाधव आणि सचिव सुरज भोईर व्यासपीठावर उपस्थित होते. उद्घाटक नरेंद्र वाबळे यांनी संविधानाच्या सरनाम्याचे वाचन करून पत्रकारिता प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन केले. तत्पूर्वी सर्व मान्यवरांचा 'संविधान गौरव पुरस्कार २०२३' देऊन यथोचित गौरव करण्यात आला.

कार्यशाळेचे आयोजक सुरज भोईर यांनी प्रस्तावना केली. त्यानंतर वरिष्ठ पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते  अनिल गलगली यांनी प्रशिक्षणार्थींना माहिती अधिकार कायदा २००५ बाबत थोडक्यात मार्गदर्शन केले. या कायद्याचा समाजहितासाठी जास्तीत जास्त वापर करण्याचा सल्ला त्यांनी प्रशिक्षणार्थींना दिला. त्यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी जागरूक नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन केले.  गलगली यांनी माहितीच्या अधिकाराशिवाय सेवा हक्क कायदा, लोकशाही दिन, नागरिक सनद अशा विविध कायद्यांची माहिती दिली.

प्रा. रश्मी महांबरे यांनी पत्रकारिता आणि पत्रकार यांच्यापुढील आव्हाने, बातमी तंत्र आत्मसात करण्यासाठी अशा कार्यशाळांची गरज असल्याचे नमूद केले. तसेच अनेक इच्छुकांनी ह्या कार्यशाळेत सहभागी होऊन समाज घडविण्याच्या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहनही केले. प्रा. हेमंत सुधाकर सामंत यांनी क्राइम पत्रकारिता, क्राईम बातम्या, पत्रकारांसाठी असलेला संरक्षण कायदा, पत्रकारांपुढे असलेली आव्हाने, पत्रकारांची आज असलेली अवस्था आदि विषयांना स्पर्श करत सखोल मांडणी ३ डिसेंबर रोजी होणार्‍या त्यांच्या पहिल्या सत्रात करून दिली जाणार असल्याचे सांगितले.

"भारतातच नाही तर संपूर्ण जगात पत्रकारितेला मोठे महत्व आहे. त्यामुळे पत्रकारितेला चौथास्तंभ ही उपमा दिली आहे. जागतीक घटना, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय, जिल्हास्तरीय, गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत संपूर्ण माहिती १४० कोटी जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकारितेच्या माध्यमातून होत असते. समाजामध्ये वृत्तपत्रांच्या माध्यमातून विचार पोहोचविले जातात. पत्रकारिता,जनता आणि नितीनिर्माते यांच्यातील मध्यस्थीतीची भुमिका हाताळत असते. तेव्हाच आपल्याला समतोलता दिसून येते. या समतोलतेचे दायीत्व पुर्णपणे पत्रकारितेवर अवलंबून असते व पत्रकार आपली जबाबदारी मोठ्या शिताफीने पार पाडतो. प्रत्येकबाब जनतेच्या हितासाठी असावी या उद्देशाने प्रत्येक गोष्ट जनतेच्या हितार्थ प्रकाशित केली जाते. समाजातील घडामोडींवर नजर ठेवून माहीती एकत्र करने व ती वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजापर्यंत, सरकारपर्यंत व प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे काम आधुनिक युगात वर्तमानपत्र, रेडिओ, दूरदर्शन, वेब-पत्रकारिता, सोशल मिडिया यांच्या माध्यमातून पत्रकारितेची भुमिका मोठ्या प्रमाणात बजावली जात आहे. तीच निर्भीड पत्रकारिता शिकण्यासाठी अशा कार्यशाळांची गरज आहे. त्यामुळे मी आयोजक सुरज भोईर, दीपक कलिंगण आणि संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि ह्या कार्यशाळेत सहभागी झालेल्या /होणार्‍या सर्वांना खूपखूप शुभेच्छा देतो." असे प्रेरणादायी उद्गार कामगार नेते व दैनिक मुंबई मित्रचे संपादक अभिजित राणे यांनी काढले.

कार्यशाळेच्या उद्घाटनाचे समयोचित निवेदन मराठी साहित्य व कला सेवाचे संस्थापक अध्यक्ष तसेच साहित्यिक पत्रकार गुरुदत्त वाकदेकर यांनी केले. तर आभारप्रदर्शनाची जबाबदारी साप्ताहिक मराठी जगतचे संपादक तसेच कार्यशाळेचे आयोजक दीपक कलिंगण यांनी यांनी लिलया पार पाडली. उद्घाटन सोहळ्यासाठी साई रामापूरकर, संतोष तांबे, संदीप पाटील, विनायक जवळेकर, रामभाऊ गुरव, अॅड. आदिती गायकवाड, निशा जाधव, मोहन जाधव यांनी विशेष सहकार्य केले. ह्या कार्यशाळेसाठी दैनिक मुंबई मित्र, वत्स मिडीया, मुंबई मराठी पत्रकार संघ, विशाल महाराष्ट्र युट्युब वाहिनी तसेच वंचित न्यूज युट्युब वाहिनी यांचा विशेष सहयोग लाभला आहे. कार्यशाळेचे पहिले सत्र ३ डिसेंबर २०२३ रोजी होणार आहे. ज्यांना ह्या कार्यशाळेत अजूनदेखील सहभाग घेण्याची इच्छा असेल त्यांनी सुरज भोईर यांच्याशी ९९६९६८६०१४ ह्या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहनही यानिमित्ताने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment