Monday 18 December 2023

६२व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या मुंबई-१ केंद्रातून "ज्याचा त्याचा प्रश्न" प्रथम

 


६२व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या मुंबई-१ केंद्रातून "ज्याचा त्याचा प्रश्न" प्रथम

 


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या मुंबई-१ केंद्रातून ग्रामीण समाज प्रबोधिनी, मुंबई या संस्थेच्या "ज्याचा त्याचा प्रश्न" या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच बेस्ट कला आणि क्रीडा मंडळ, मुंबई या संस्थेच्या "मॅकबेथ" या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी १८ डिसेंबर रोजी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे मुंबई-१ केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे:- सहप्रमुख कामगार अधिकारी, बृहन्मुंबई मनपा, मुंबई या संस्थेच्या "फ्लाईंग राणी" या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शन प्रथम पारितोषिक वनमाला वेंदे (नाटक - ज्याचा त्याचा प्रश्न), द्वितीय पारितोषिक प्रसिध्दी राजेश (नाटक - मॅकबेथ), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक श्याम चव्हाण (नाटक - ज्याचा त्याचा प्रश्न), द्वितीय पारितोषिक - प्रशांत सावंत (नाटक - मॅकबेथ), नेपथ्य प्रथम पारितोषिक संतोष मोरे (नाटक - गुलमोहर), द्वितीय पारितोषिक रोहिणी पालवे (नाटक - बोल राधा बोल), रंगभूषा प्रथम पारितोषिक शेखर केमनाईक (नाटक - विजयस्तंभ), द्वितीय पारितोषिक दिवाकर मोहिते (नाटक - शेवंता जिती हाय) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक सौरभ येसवारे (नाटक - खटला) व वनमाला वेंदे (नाटक - ज्याचा त्याचा प्रश्न), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे नम्रता म्हेत्रे (नाटक - बोल राधा बोल), नम्रता काळसेकर (नाटक - धनंजय माने इथे रहातात का ?), प्रियंका जाधव ठोकळे (नाटक - फ्लाईंग राणी), नेहा शर्मा (नाटक - आम्ही सौ कुमुद प्रभाकर आपटे), ऐश्वर्या शिंदे (नाटक - गुलमोहोर), प्रमोद सुर्वे (नाटक - मॅकबेथ), सचिन शिंदे (नाटक - ज्याचा त्याचा प्रश्न), अशोक पालवे (नाटक - बोल राधा बोल), अनिल तांबे (नाटक - शेवंता जिती हाय), पुष्कर सराड (नाटक - अण्णांच्या शेवटच्या इच्छा).

दि. २० नोव्हेंबर ते १४ डिसेंबर, २०२३ या कालावधीत साहित्य संघ मंदिर, गिरगाव, मुंबई येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १७ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. समीर मोने, विनोद दुर्गापुरे आणि सुजाता गोडसे यांनी काम पाहिले. 

सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केलेले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रथम व द्वितीय आलेल्या नाटकाच्या संघाचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले असून भविष्यातही या संघांनी आणि कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे.


No comments:

Post a Comment