कँबिनेट बांधकाम मंत्री ना.मा.श्री.रविंद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न..
डोंबिवली दि.०६ जानेवारी २०२४ः भरत भोईर नगर परिसरातील श्री साई सेवा मंडळाने आपल्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पहिल्यांदाच तयार करण्यात आलेल्या "दिनदर्शिका २०२४" चे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे कँबिनेट बांधकाम मंत्री ना.श्री.रविंद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या प्रकाशनाच्या वेळी कडोंमपा माजी महापौर सौ.विनिता राणे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री.राजेश कदम मान्यवरांसह मंडळाचे अध्यक्ष श्री.मंगेश परब आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
हा प्रकाशनाचा कार्यक्रम अरुणोदय सोसायटी चिनार मैदान येथे संपन्न झाला.ह्या दिनदर्शिकाचे सर्वत्र वाटप मोफत केले जाईल.असे या दिनदर्शिकेसाठी अथक मेहनत घेणारे मंडळाचे खजिनदार अवि मानकर यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment