Monday, 11 March 2024

डॉ. सौम्या स्वामीनाथन यांना यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार २०२३ जाहीर





 डॉ. सौम्या स्वामीनाथन यांना यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार २०२३ जाहीर


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे दरवर्षी राष्ट्रीय एकात्मता, संवैधानिक मूल्यांचे जतन, भारताच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात योगदान देणाऱ्या क्षेत्रात भरीव आणि अग्रेसर कार्य करणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो. रोख रक्कम रु.५,००,०००/- आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप अाहे.

उपरोक्त क्षेत्रामध्ये लक्षणीय कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांविषयी प्राप्त झालेल्या शिफारशींचा विचार करून ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार निवड समितीने “डॉ. सौम्या स्वामीनाथन” यांची सन २०२३ च्या पुरस्कारासाठी निवड केलेली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या अलौकिक, अतुलनीय कार्याची गौरवपूर्ण नोंद घ्यावी म्हणून यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार २०२३, डॉ. सौम्या स्वामीनाथन यांना देण्याचे चव्हाण सेंटरने जाहीर केले आहे.

डॉ. सौम्या स्वामीनाथन यांना यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजे मंगळवार, दि. १२ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये सेंटरचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल, असे सरचिटणीस हेमंत टकले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.


No comments:

Post a Comment