महिला सक्षमीकरणासाठी शिव उद्योग शिवाई मंचची घोषणा
महाराष्ट्र दिनापासून प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत होणार
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आजवर रथी महारथींकडून महिला सक्षमीकरणाच्या केवळ वल्गनाच करण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात किती महिलांना उद्योग उभारून दिले? किती महिलांना स्वयंरोजगार निर्माण करून दिले? याचा कोणताही हिशोब महाराष्ट्राच्या जनतेने अशा लोकांकडे मागितला नाही आणि त्यांनी तो देण्याचा साधा प्रयत्नही केला नाही. पण शिव उद्योग संघटनेचे अध्यक्ष दीपक काळीद यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली राज्यभरात महिला सक्षमीकरणासाठी "शिव उद्योग शिवाई मंच" ची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र दिनापासून "शिव उद्योग शिवाई मंच" प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत होणार आहे.
महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ असलेल्या "शिव उद्योग शिवाई मंच"च्या सभासद नोंदणीला सुरुवात झाली आहे. शिवाई मंच सभासदांना धमाकेदार कार्यक्रम आणि वर्षभर दर्जेदार मराठी नाटक/ सिनेमा/ वाद्यवृंदाचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे. शिवाईच्या लेकींसाठी "शिव उद्योग शिवाई मंच"ने अनेक उपक्रमांसोबतच १०० पेक्षा जास्त व्यवसायांची जत्रा मांडली आहे. कार्यक्रमांचा आस्वाद घेत असतानाच आकर्षक सन्मान/भेटवस्तू मिळवत स्वयंरोजगार, लघुउद्योग तसेच उद्योगातल्या अनेक संधींची कवाडं खुली केली जाणार आहेत. महिलांसाठी ही सुवर्णसंधी असून, त्याची सुरुवात झाली आहे. या सदस्य नोंदणीचे वार्षिक शुल्क फक्त ५०० रुपये एवढेच आहे. त्यात आपल्याला मिळणार आकर्षक "शिव उद्योग शिवाई मंच" ओळखपत्र, विविध गिफ्ट, ५% ते २५% डिस्काउंट कूपन (विविध ऑफर), सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल, श्रावण सम्राज्ञी स्पर्धा, पाककला स्पर्धा, मराठी नाटक/ सिनेमा/ वाद्यवृंद, शिवाई महोत्सव, शिवाई सन्मान, शिवाई पर्यटन सहल, नवरात्रोत्सवा निमित्त शिवाई उत्सव, शिवाई दीपोत्सव, विविध व्यवसाय मार्गदर्शन सेमिनार, १०० पेक्षा विविध व्यवसायांच्या संधी आणि बरंच काही. हे सर्व खास शिवाई मंचच्या सदस्यांना सवलतीच्या दरात उपलब्ध होईल. चांगले काम करणाऱ्या 'शिवाई मंच' सदस्याची 'शिव उद्योग" या मुखपत्रामधून तसेच शिव उद्योग या यूट्युबवर वाहिनीवरून मुलाखत प्रसारित केली जाईल. "शिव उद्योग शिवाई मंच" सदस्य नोंदणीविषयी अधिक माहितीसाठी संपर्क : ९९८७७४६७७६ / ७७३८५२२९९८ / ८३२९६८४६८८ / ९७६३०२५०१४
No comments:
Post a Comment