Saturday 20 April 2024

धाराशिव येथे एकदिवसीय संत गोरोबाकाका साहित्य संमेलन संपन्न

 


धाराशिव येथे एकदिवसीय संत गोरोबाकाका साहित्य संमेलन संपन्न



धाराशीव (गुरुदत्त वाकदेकर) : संत गोरोबाकाका सेवा समिती, धाराशिव आयोजित श्री संत गोरोबाकाका संगीतमय चरित्र कथेचे जिजाऊ चौक, बार्शी नाका येथील स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. या चरित्र कथेमध्ये एक एकदिवसीय संत गोरोबाकाका साहित्य संमेलनही आयोजित करण्यात आले होते.


कार्यक्रमाची संकल्पना कविता रमेशराव पुदाले यांची होती. आपल्या जिल्हयाचा अभिमान वैराग्य महामेरू  संत श्री गोराबाकाका यांच्या चरित्राचा आणि साहित्याचा प्रसार होण्याचा प्रमुख उद्देश घेऊन ह्या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.


सदर संत साहित्य संमेलनाचे उद्घाटन ह.भ.प. मा. गहिनीनाथ महाराज, औसेकर (अध्यक्ष, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर) यांचे हस्ते झाले. संमेलनाध्यक्ष ह.भ.प. मा. दीपक महाराज जेवणे, पुणे (संत साहित्याचे गाढे अभ्यासक) संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ह.भ.प. अॅड. पांडुरंग महाराज लोमटे, डॉ. अभय शहापुरकर, मा. नितीनभाऊ तावडे (अध्यक्ष, म.सा.प. धाराशिव), ह.भ.प. पद्मनाभ व्यास महाराज, कमलताई नलावडे (ज्येष्ठ लेखिका, धाराशिव) या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रा. कृष्णा तेरकर तर आभार डॉ. रुपेशकुमार जावळे ह्यांनी मानले.


साहित्य संमेलनाच्या पहिल्या सत्राची सुरूवात संत गोरोबाकाका यांचे भक्तिमय जीवन यावरील परिसंवादाने झाली. या परिसंवादाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सतिश कदम (छ. शिवाजी महाराज चरित्र साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन) तर वक्ते म्हणून ह.भ.प. प्रा. एकनाथ महाराज मेंढेकर, मा. प्राचार्य डॉ. श्रुती वडगबाळकर, ह.भ.प. प्रसाद महाराज माटे आळंदी हे उपस्थित होते.


परिसंवादाचे सूत्रसंचालन प्रा. पल्लवी क्षीरसागर तर आभार मा. प्रा. सोमनाथ लांडगे यांनी मानले.


दुसर्‍या सत्रात कविसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून शब्दप्रभू मा. माधव पवार सोलापूर तर प्रमुख उपस्थिती म्हणून, मा. अरुण रोडे (अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक महासंघ, महाराष्ट्र राज्य), ह.भ.प. भारत महाराज कोकाटे, मा. मिलिंद सुधाकर जोशी (माजी अध्यक्ष, काव्यशिल्प, पुणे), मा. राजेंद्र अत्रे, मा. युवराज नळे, मा. मधूकर हुजरे, डॉ. अरविंद हंगरगेकर, डॉ. रुपेशकुमार जावळे, मा. बाळू घेवारे, मा. सुनिल उकंडे, मा. कविता पुदाले हे उपस्थित होते.


याच कार्यक्रमात शांता ठाकूर, गीता पुदाले, रुपाली डुकरे, कविता पुदाले आणि मीरा महाबोले यांनी भारूड सादर केले. 


निमंत्रक कवी / कवयित्री म्हणून बाळ पाटील, शाम नवले, कृष्णा साळुंके, रत्नाकर उपासे, प्रा. नरेंद्र गुंडेली, हणमंत पडवळ, वंदना कुलकर्णी, संजय घोंगडे, अॅड. शुभदा पोतदार, अंजली बुरगुटे, मनिषा पोतदार, सुवर्णा शिनगारे, सरिता उपासे, सुरभी भोजने, जयश्री घोडके, माधुरी घोडके, अलका सपकाळ, अनुराधा देवळे, के. पी. बिराजदार, हिराचंद देशमाने, मधुकर गुरव, राधिका मिटकर आणि उषाताई लांडगे कवी कवयित्री यांनी आपल्या रचना सादर केल्या. या कविसंमेलनाचे सूत्रसंचालन प्रा डॉ अरविंद हंगरगेकर आणि माधुरी घोडके यांनी तर आभारप्रदर्शन कविता पुदाले यांनी मानले.


समारोप सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून ह.भ.प. मा. दीपक महाराज खरात (सकल संत चरीत्रकथा निरुपणकार, श्रीक्षेत्र तेर) तर प्रमुख उपस्थिती होते.

श्रीकृष्ण देशमुख प्रितमभैया बागल, अॅड. रविंद्र मोहिते राजाराम जगताप आणि राजाभाऊ लोहार उपस्थित होते.


समारोप सत्राचे सूत्रसंचालन सौ. राऊत ए.डी. तर आभार शामराव दहिटणकर यांनी केले. शामराव दहिटणकर अध्यक्ष, संत गोरोबाकाका साहित्य संमेलन, धाराशिव, श्रीकृष्ण देशमुख कार्यवाह, ह.भ.प. डॉ. ईश्वर महाराज  कुंभार स्वागताध्यक्ष प्रा. सोमनाथ लांडगे सचिव, श्रीमती कविता रमेशराव पुदाले उपाध्यक्षा आणि सदस्य अॅड. रविंद्र मोहिते, अॅड. बाबूराव हंद्राळे, पुणे, डॉ. शिवाजी सोनार, संदिपान कुंभार, बाळू घेवारे, रामदास कुंभार आणि डॉ. रूपशेकुमार जावळे, डॉ. अरविंद हंगरगेकर, डॉ. कृष्णा तेरकर या सर्वांनी संत साहित्य संमेलन यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले.


No comments:

Post a Comment