किशोरी पाटील "आदर्श योग शिक्षिका" प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कारानेे सन्मानित
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आदर्श योग शिक्षिका प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्काराने किशोरी पाटील यांना सन्मानित करण्यात आले. साहित्यिका सामाजिक कार्यकर्त्या तसेच दहा वर्षांपासून योग शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या किशोरी पाटील यांनी नुकतेच कल्याण येथे एकदिवसीय योग शिबीरात मार्गदर्शन केले. तसेच कोमसापच्या मॉरिशस येथील कार्यक्रमात कलाविष्कार सदरात शिवतांडव स्रोत्र योग प्रात्यक्षिक केले. अक्षर मानव संस्थेच्या पालघर जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्यावर अाहे. वसई महानगर पालिका कला क्रीडा महोत्सव योगासन स्पर्धेमध्ये कांस्य पदकाची झेप त्यांनी घेतली आहे. अंबिका योग निकेतन संस्थेमध्ये विनामूल्य योग वर्ग शिकवण्याचा प्रामाणिक हेतू आजही बाळगून आहेत. योग शिक्षिका या क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय भरीव योगदान आणि उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समिती महाराष्ट्र राज्य आयोजित "आदर्श योग शिक्षिका प्रजासत्ताक अमृत गौरव" पुरस्काराने रविवार, दि.२५ ऑगस्ट रोजी नॅशनल लायब्ररी, बांद्रा, मुंबई येथील सभागृहात किशोरी पाटील यांना सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून साहित्यिक बाळासाहेब तोरसकर उपस्थित होते. उद्घाटक डाॅ. ख. र. माळवे, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला संस्कृती महोत्सव समिती, स्वागताध्यक्ष प्रा. नागेश हुलवाळे, पद्मश्री शास्त्रज्ञ डाॅ. जी. डी. यादव, अध्यक्ष राष्ट्रीय विज्ञान संस्था भारत सरकार, डाॅ. डेरीक एंजल, नासा शास्त्रज्ञ, संपादक डाॅ. सकृत खांडेकर, दैनिक प्रहार अशा दिग्गज पाहुण्यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. आम्ही मुबंईकर साप्ताहिकाचे संपादक प्रमोद सुर्यवंशी आणि प्रा. वर्ल्ड व्हिजन टाईम्स मुंबईचे प्रा. नागेश हुलवाळे आणि आयोजकांनी प्रचंड मेहनत घेऊन हा कार्यक्रम सुंदररित्या पार पाडला.
No comments:
Post a Comment