Saturday 26 October 2024

श्रीमती ताराबाई वर्तक मेमोरियल अकॅडमी मध्ये साहस आणि कला प्रशिक्षण शिबीर संपन्न


 श्रीमती ताराबाई वर्तक मेमोरियल अकॅडमी मध्ये साहस आणि कला प्रशिक्षण शिबीर संपन्न

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्थेच्या श्रीमती ताराबाई वर्तक मेमोरियल अकॅडमी सीबीएससी विरार पूर्व येथील विद्यालयात मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, तसेच आत्मविश्वास, स्वावलंबन इत्यादी मूल्ये जोपासली जावीत म्हणून वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन केले जाते. सतत प्रोत्साहन आणि मार्गदर्शन संस्थेचे अध्यक्ष नरसिंह विकास वर्तक आणि शालेय समितीच्या अध्यक्ष प्राची बगे वर्तक ह्यांच्यावतीने करण्यात येत असते. दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी सुद्धा  बालवाटीका आणि इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शिबिर शाळेच्या आवारात दिनांक २१ आणि २२ ऑक्टोबर २०२४ च्या कालावधीत  भरविण्यात आले होते. सदर शिबिरामध्ये एकूण ५०० विद्यार्थ्यांनी आपला उस्फुर्त सहभाग नोंदविला. शिबिरामध्ये रायफल शूटिंग, पायलेट लॅडर, कमांडो ब्रीज, सेल्फ डिफेन्स टेक्नीक आणि टीम बिल्डिंग अशा विविध रोमांचक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सदर रोमांचक उपक्रम क्रीडा प्रशिक्षक जितेंद्र राऊत आणि प्रशांत पाटील ह्यांच्या मार्गदर्शनाखाली  राबविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या   वयोगटानुसार दिव्यांचे तोरण, फोटोफ्रेम, वॉल हँगिंग, किचेन मेंकिग, कुकिंग विटाऊट फायर, किल्ला बनविणे, प्रदुषण मुक्त दिवाळी असे विविध उपक्रम व काळाची गरज ओळखून प्रभाव अकॅडमीतर्फे स्वसंरक्षण (स्लेफडिफेन्स) याचा समावेश केला होता. तसेच रेडिओ जॉकी तसेच सेंट जोसेफ कॉलेजचे प्रोफेसर जगदीश संसारे यांनी मुलांना विनोदातून नैतिकतेचे धडे दिले. 

    

सदर दोन दिवसीय शिबिरासाठी शाळेच्या मुख्यध्यापिका रंजना कोळवणकर ह्यांचे मार्गदर्शन तसेच शिक्षकांचे  विशेष सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमासाठी संस्थेच्या

व्यवस्थापन मंडळाचेही विशेष सहकार्य लाभले.


No comments:

Post a Comment