Wednesday, 30 October 2024

कॅन्सरग्रस्त रुग्णांसोबत "स्वामी"ची दिवाळी साजरी

 


कॅन्सरग्रस्त रुग्णांसोबत "स्वामी"ची दिवाळी साजरी

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : 'स्वामी' ही संस्था समाजातील गरीब गरजू लोकांसाठी आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण या क्षेत्रात विविध उपक्रम राबवित असते. त्यापैकी एक उपक्रम म्हणजे "कॅन्सरग्रस्त रुग्णांसोबत दिवाळीची एक आनंदी संध्याकाळ आणि फराळ वाटप". दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शनिवार दिनांक २६ ऑक्टोबर २०२४ रोजी शिरोडकर सभागृह, परळ, मुंबई येथे मुंबई, नवी मुंबई, ठाण्यासह परगावाहून आलेल्या ३०० कॅन्सरग्रस्तरुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना दिवाळी फराळासोबत साडी, चटई, चादर, टॉवेल, साबण, तेल व पावडर इत्यादींचे वाटप एका सुंदर बॅगमधून करण्यात आले. 

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भोईवाडा पोलीस वरिष्ठ निरीक्षक सचिन कदम, श्रीपाद फाटक - अध्यक्ष अपना बाजार, क्षा. म. स. अध्यक्ष, उदय फणसेकर - क्षा. म. स. विश्वस्त, रोटरीयन सुरेंद्र भगत, नितिन कदम - समाजसेवक, दिलीपभाई जैन - समाजसेवक, बाबुभाई सोळंकी - समाजसेवक, शरद डिचोलकर - माजी अध्यक्ष, फेस्काॅम मुंबई , श्री खाडीलकर -विश्वस्त, नाना पालकर समिती तसेच 'स्वामी'चे अध्यक्ष - सुरेश लाड, उपाध्यक्ष - वैशाली शिंदे, कार्याध्यक्ष - मोहन कटारे, खजिनदार - उल्हास हरमळकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. मुख्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेमक्या शब्दांची पखरण करत कौशल्यपूर्ण पद्घतीने सचिव - सुरेंद्र व्हटकर, सह-सचिव - साध्वी डोके यांनी केले. 

कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मनोरंजनासाठी स्वामीच्या विरंगुळा ज्येष्ठ नागरिक केंद्राचा सुगम संगीताचा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्या कार्यक्रमाचे संयोजन विमल माळोदे, प्रतिभा सावंत, गीता नाडकर्णी, प्रदीप ढगे यांनी केले तर खुमासदार सूत्रसंचालन अनिल तावडे यांनी केले. तालबद्ध वाद्यवृंदाची जबाबदारी हार्मोनियमवर दत्ताराम घाडी, नंदकुमार आरोंदेकर, संतोष घाडी, ढोलकीपटू दिलीप मेस्त्री, शैलेश तुम्मा, तालवाद्य शिवाजी गावकर यांनी सांभाळली. तर उपस्थितांना शुभदा मोरे, शैलजा काळे, सुनिता पारकर, वंदना भाटवडेकर, प्रतिभा मेस्त्री, मंदा कणेरकर, गणेश करलकर, कांतीलाल परमार, दिलीप मेस्त्री, सुरेश पवार ,भरत कस्तुर, अशोक अंबुर्ले यांनी आपल्या गायनाने मंत्रमुग्ध केले. 

सभागृहात येणाऱ्यांच्या स्वागतासाठी मनमोहक रांगोळी आभा व्हटकर आणि रश्मी नाईक यांनी साकारली होती. पाहुण्यांचे स्वागत रचना खुळे, नितीन तांबे, निलेश पाठारे, विलास पाटील ह्यांनी केले.

रुग्णांची नावनोंदणी करण्यासाठी सुमंगल गुरव, सिध्दी परब, नम्रता पडवळ तत्पर होत्या. कार्यक्रमाची व्यवस्था वैशाली ढोलम, ममता खेडेकर, गोविंद राणे, विष्णू मणियार, प्रतिभा सपकाळ, प्रियांका गायकर, लखबीर कौर, नम्रता व्हटकर, योगिनी लाड, गीतांजली करलकर यांनी चोख सांभाळली. 

दीपावलीचा हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विश्वस्त गोविंद राणे, रचना खुळे, प्रतिभा सावंत, सल्लागार गजानन माटे, किरण करलकर, उदय पारकर, तृप्ती पवार, उर्मिला जाधव, तसेच प्रकल्प प्रमुख - मातृभाव- विमल माळोदे, प्रतिभा सपकाळे, रुग्ण साह्य केंद्र-नितीन तांबे, शिवाजी गावकर, दिवाळी धमाका वैशाली ढोलम, ममता खेडेकर, पॅथॉलॉजी-रश्मी नाईक,  विद्यार्थी सहाय्य योजना नम्रता व्हटकर, गीता नाडकर्णी तसेच प्रतिभा सावंत, हिरेश चौधरी, गुरुदत्त वाकदेकर यांनी अथक परिश्रम घेतले.


No comments:

Post a Comment