Tuesday, 15 October 2024

दिव्यांग मुलांसाठी थेरपी सेंटरचे चर्नीरोड येथे भव्य उद्घाटन र. के. फाऊंडेशन आणि देवांचन एज्युकेशन ट्रस्ट यांचा स्तुत्य उपक्रम


 दिव्यांग मुलांसाठी थेरपी सेंटरचे चर्नीरोड येथे भव्य उद्घाटन

र. के. फाऊंडेशन आणि देवांचन एज्युकेशन ट्रस्ट यांचा स्तुत्य उपक्रम


मुंबई  (गुरुदत्त वाकदेकर) : आर. के. फाऊंडेशन आणि देवांचन एज्युकेशन ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने चर्नीरोड, मुंबई येथे नवीन थेरपी सेंटरचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. जे दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय सेवांसह कार्य करणारी प्रशिक्षण संसाधने प्रदान करेल. भारतात बालपणातील अपंगत्व खूप गुंतागुंतीचे आहे. भारतात १८ वर्षांखालील वयोगटातील दिव्यांग मुलांशी संबंधित सेवांमध्ये  उल्लेखनीय सुधारणा झाली आहे, तरीही त्यानंतरच्या विकासात्मक समर्थन प्रणाली अपुऱ्या आहेत. 


नवीन केंद्राच्या उद्घाटनावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जय महाराष्ट्र न्यूजचे डिजिटल कंटेन हेड मनू निळे, भाजपच्या अनुसूचित जमाती महामंत्री प्राची दरेकर, जय महाराष्ट्र न्यूजच्या वृत्त निवेदिका जानवी सावंत, आर. के. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राम कदम, देवांचन एज्युकेशन ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. कांचन पवार, देवेंद्र पवार, इंडिअन मेडिकल असोसिएशनचे मानद सचिव तसेच समाजसेवक डॉ. प्रागजी वाजा, दक्षिण मुंबई कॅटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष नितीन कोलगे, समाजसेविका मनीषा गायकवाड, रिपब्लिकन सेना सहसचिव जिया सुर्वे, समाजसेवक आतिष थोरात, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत खरात, वंचित आघाडी कुलाबाचे उपाध्यक्ष राहुल कांबळे, प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या मुंबई महिला अध्यक्ष झिनथ शेख, मुंबई सचिव संदेश गायकवाड, मुंबई उपाध्यक्ष दयालाल यादव, ईशान्य मुंबई विभाग अध्यक्ष संतोष गुप्ता, जोगेश्वरी विधानसभा अध्यक्ष किरण साबळे, अविनाश काजरोळकर, मस्जीद बंदरचा मोरया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे विपुल चौहान अादी मान्यवर उपस्थित होते. दिव्यांग मुलांना त्यांच्या जास्तीतजास्त क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी आणि समाजात समाविष्ट करण्यात मदत करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आमच्या थेरपी केंद्राद्वारे आम्ही पालकांना प्रशिक्षण देऊ आणि हे लक्ष्य साध्य करण्यासाठी व्यावसायिक आणि समुदायांमध्ये क्षमता निर्माण करू. आम्हाला आशा आहे की, भारतातील प्रत्येक मुलाच्या विकासासाठी गुंतवणूक करण्याच्या चळवळीची ही सुरुवात आहे, असे उद्गार आर. के. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राम कदम यांनी काढले.


हे केंद्र दिव्यांग मुलांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे, असे मत देवांचन एज्युकेशन ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. कांचन पवार यांनी व्यक्त केले.


सदर कार्यक्रमाच्या सुरूवातीला विद्यार्थी, पालक तसेच मान्यवरांच्या मनोरंजनासाठी गीतांची मैफल आयोजित करण्यात आली होती. त्यात बालगायिका वेदश्री जाधव, पूर्णिमा देवळेकर आणि मंदार चिखले यांनी विद्यार्थ्यांना नृत्याचा आनंद घेता यावा ह्यासाठी खास गाणी सादर केली आणि उपस्थितांची मने जिंकली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या खुमासदार शैलीत गुरुदत्त वाकदेकर यांनी केले. १५० दिव्यांग विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.


कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सर्व मान्यवरांचा सत्कार आर. के. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राम कदम आणि देवांचन एज्युकेशन ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. कांचन पवार आणि देवेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या उत्तरार्धाचे सूत्रसंचालन शशिकांत लिंबारे यांनी नेमकेपणाने केले. 


सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी केंद्र समन्वयक मुबारक शेख, मयुरी लवाटे, रिमा गोसावी, प्रमिला चाळके, विनायक जाधव, आशा माने, पॉलसन जगदाळे, मीना जाधव, रुक्मिणी माने ह्या पालक प्रतिनिधींनी तसेच आदित्य कदम, अंजली मोहिते आणि मारवाडी शाळेचे सहकारी यांनी विशेष सहकार्य केले.


No comments:

Post a Comment