नालासोपाऱ्यात जय हनुमान क्रिकेट संघाच्या टर्फ अंडर आर्म लीग स्पर्धेचा थरार!
नालासोारा (गुरुदत्त वाकदेकर) : नालासोपारा (प.) येथील चक्रेश्वर तलावाजवळ जय हनुमान क्रिकेट संघ (बामणघर) यांच्या वतीने आयोजित भव्य टर्फ अंडर आर्म लीग क्रिकेट स्पर्धा – २०२५ (पर्व-१) रविवार, दिनांक २ मार्च २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडली. स्पर्धेमध्ये उत्कृष्ट १६ संघांनी सहभाग घेतला आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या सामन्यांचा आनंद मिळाला.
विजेत्यांचा सन्मान:-
प्रथम क्रमांक: आध्या-११ (बामणघर) – ₹१२,०००/- रोख व आकर्षक चषक
द्वितीय क्रमांक: कालिका क्रीडा मंडळ (जांभूळनगर) – ₹७,०००/- रोख व आकर्षक चषक
तृतीय क्रमांक: अद्विक-११ (बामणघर) – आकर्षक चषक
चतुर्थ क्रमांक: आविष्कार-११ – आकर्षक चषक
विशेष पारितोषिके:-
उपांत्य फेरी:-
उत्कृष्ट गोलंदाज – संतोष मामा
उत्कृष्ट फलंदाज – केदार
सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू – अनमोल
अंतिम फेरी:-
उत्कृष्ट गोलंदाज – मयूर
उत्कृष्ट फलंदाज – गिरीश
सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू – केदार
सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जय हनुमान क्रिकेट संघ (बामणघर) चे पदाधिकारी निलेश पालांडे, योगेश जाधव, काशिनाथ चव्हाण, शुभम चव्हाण, आशिष जाधव, नामदेव चव्हाण, नंदकुमार जाधव यांनी मोलाचे योगदान दिले. तसेच, जय हनुमान मराठा मंडळ बामणघरचे अध्यक्ष रविंद्र साळवी, अमोल मोरे, विनोद साळवी संजय लोटणकर आणि गणेश चव्हाण यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू कै. एकनाथ सोलकर यांच्या स्मरणार्थ एक्की इलेव्हन क्रिकेट (काळाचौकी) संघाच्या सौजन्याने खेळाडूंना विशेष कॅप देण्यात आल्या.
सदर स्पर्धेसाठी साळवी परिवाराने प्रथम आणि द्वितीय चषक, तसेच प्रभाकर सुर्वे आणि निलेश पालांडे यांनी पारितोषिकांची रक्कम दिली. शुभम चव्हाण व आशिष जाधव यांनी तृतीय व चतुर्थ चषक प्रदान केला. काशिनाथ चव्हाण आणि प्रतिक विकास जाधव यांनी सामनावीर पुरस्कार प्रायोजित केले. तसेच, मिलिंद सुर्वे व कृष्णा चव्हाण यांनी वस्तूरूपात देणगी देऊन स्पर्धेस सहकार्य केले.
स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी नंदकुमार जाधव, शुभम चव्हाण, योगेश जाधव आणि निलेश पालांडे काशिनाथ चव्हाण यांनी अथक परिश्रम घेतले. या स्पर्धेमुळे नालासोपाऱ्यात क्रिकेटच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली असून, भविष्यातही अशाच रोमांचक स्पर्धांची चाहूल लागली आहे.
No comments:
Post a Comment