Friday, 19 March 2021
अमेझॉन प्राइम व्हिडीओ आता भारतात सिने निर्मितीतही; अक्षय कुमारची भूमिका असलेल्या राम सेतूची करणार सहनिर्मिती!
Wednesday, 17 March 2021
क्षिती जोग साकारणार नवी भूमिका - 'झिम्मा'च्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात प्रवेश - - हेमंत- क्षितीची ऑफस्क्रीन जोडी पहिल्यांदाच झळकणार एकत्र -
मराठी, हिंदी मालिका, सिनेमा, थिएटर अशा विविध माध्यमांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारून क्षिती जोग घराघरात पोहोचली. आपल्या अप्रतिम अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली. आजवर अभिनेत्री म्हणून नावाजलेली क्षिती आता मराठी सिनेसृष्टीत एक नवीन भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाली आहे. क्षिती आता 'चलचित्र कंपनी' च्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात प्रवेश करत आहे. 'चलचित्र कंपनी' प्रस्तुत 'झिम्मा' या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा क्षिती सांभाळत असून हा चित्रपट २३ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्यासह सिद्धार्थ चांदेकरची भूमिका असलेला 'झिम्मा' या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाविषयी सर्वांना उत्सुकता होती. टिझरलाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. प्रेक्षकांनीच नाही तर अनेक हिंदी-मराठी कलाकारांनी आपल्या सोशल मीडिया हॅन्डल्स वरून या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे ‘झिम्मा’च्या निमित्ताने हेमंत आणि क्षितीची ही ऑफस्क्रीन जोडी पहिल्यांदाच दिग्दर्शक -अभिनेत्री म्हणून एकत्र काम करणार आहे.
आपल्या निर्मिती क्षेत्रातील नवीन प्रवासाबद्दल क्षिती सांगते, ''खरं सांगायचं तर निर्मिती क्षेत्रात येताना आपल्या जवळचा आपला फेवरेट विषय घेऊन यायचं असं ठरलं होतं आणि झिम्मा ने ती संधी दिली! ज्या पद्धतीचे चित्रपट आपल्याला बघायला आवडतात तसे चित्रपट आपण बनवायचे हे मी पक्क ठरवलं होतं! आता झिम्मा तयार झाल्यावर आपल्या मनासारखं घडल्याचा आनंद आहे! समाधान आहे. प्रवास आणि चित्रीकरणाच्या निमित्ताने झालेला आमच्या सात जणींचा प्रवास खरोखर खूपच रंजक होता. या निमित्ताने मला माझ्या मैत्रिणींसोबत काम करता आले. हेमंतचं दिग्दर्शन जवळुन बघता आलं. पुन्हा प्रेमात पडता आलं. निर्मिती ताई, सुहास ताई यांच्या सहवासातून बरंच काही शिकण्याची संधी मिळाली. खूप मजा आली. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होत आहे, या गोष्टीचा विशेष आनंद आहे. हा चित्रपटात महिला असल्या तरीही प्रत्येक पुरुषाने हा चित्रपट आवर्जून बघावा असाच आहे.''
आज वर्षभराने इतकी मोठी स्टारकास्ट असलेला आणि धमाल चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘चलचित्र कंपनी’ प्रस्तुत आणि अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि क्रेझी फ्यू फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले आहे. तर इरावती कर्णिक लिखित या चित्रपटाची निर्मिती क्षितीसह स्वाती खोपकर, अजिंक्य धमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, अनुपाम मिश्रा यांनीही केली आहे. अमितराज यांचे या चित्रपटाला संगीत लाभले असून संजय मेमाणे यांनी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम पहिले आहे.
अक्षय बर्दापूरकर यांच्या प्लॅनेट मराठी आणि निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या सोनाली कुलकर्णी यांच्या नवीन सस्पेन्स 'हाकामारी’ सिनेमाची घोषणा
सस्पेन्स चित्रपट नेहमीच प्रेक्षकांसाठी एक वेगळा आणि चांगला पर्याय आहे. सस्पेन्स चित्रपटांसाठी प्रेक्षक नेहमीच उत्साही असतात. शिवाय हे सिनेमे रसिकांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारे सुद्धा ठरतात. मात्र एखाद्या सिनेमाची कथा ही फक्त कल्पनेपुरती मर्यादित नसेल तर? मनोरंजन विश्वात असे अनेक सिनेमे आहेत जे केवळ काल्पनिक नसून सत्य घटनांवर आधारित आहेत. असाच एक सस्पेन्स सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे नाव आहे 'हाकामारी'. प्लॅनेट मराठीचे सीएमडी अक्षय बर्दापूरकर आणि या सिनेमातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची ही कलाकृती असणार आहे.
'हाकामारी' हा प्लॅनेट मराठीचा पहिलाच वेब चित्रपट असणार आहे, या चित्रपटाचे दिग्दर्शन फिल्मफेअर पुरस्कार विजेते दिग्दर्शक समीर विध्वंस करणार असून या सिनेमाच्या कथेबद्दल अजूनपर्यंत कोणतीही अधिक माहिती समोर आलेली नाही. मुळात या चित्रपटाचे नावच अतिशय वेगळे आणि उत्सुकता निर्माण करणारे आहे. 'हाकामारी’ हा शब्द अनेकांसाठी नवीनच असेल, मात्र सिनेमा आल्यानंतर सर्वांनाच या शब्दाचा अर्थ उमगणार आहे.
फिल्मफेअर पुरस्कार विजेते दिग्दर्शक समीर विध्वंस यांनी २०१३ मध्ये ‘टाईम प्लिज’ या धमाकेदार सिनेमाने त्यांच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी आतापर्यंत धुराळा, आनंदी गोपाळ, डबलसीट, वायझेड, मला काहीच प्रॉब्लेम नाही आदी यशस्वी सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. यातील अनेक चित्रपटांनी राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय पातळीवर वाहवा मिळवली आहे.
लवस्टोरी सिनेमांमध्ये समीर यांचा हातखंडा आहे. तरीही या सिनेमाच्या निमित्ताने समीर पहिल्यांदाच एका भयपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या सिनेमाची कथा 'दिल दिमाग और बत्ती' फेम आणि साहित्य परिषदेचे पुरस्कार प्राप्त लेखक ऋषिकेश गुप्ते यांनी लिहिली असून त्यांनी आतापर्यंत दंशकाल, दैत्यालय, अंधारवारी, कलजुगरी आदी अनेक मोठ्या आणि गाजलेल्या कादंबऱ्या लिहिल्या आहेत.
फिल्मफेअर पुरस्कार विजेती अभिनेत्री आणि सर्वांची लाडकी अप्सरा सोनाली कुलकर्णी नेहमीच तिच्या अभिनयाने आणि नृत्याने रसिकांना वेड लावत असते. नटरंग, अजिंठा, क्लासमेट्स,मितवा, हंपीपर्यंत, सिंघम रिटर्न, ग्रेट ग्रँड मस्ती अशा अनेक मराठी, हिंदी सिनेमांमधून सोनालीने प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांना तिच्या अभिनयाच्या विविध पैलूंचे दर्शन घडवले. या सिनेमाच्या निमित्ताने सोनाली भाऊ अतुल कुलकर्णीसोबत 'द फॅलेरर्स' या बॅनरच्या अंतर्गत निर्मिती क्षेत्रात उतरत आहे. या नव्या भूमिकेबद्दल सांगताना सोनाली म्हणते, " मी एक अभिनेत्री होण्याआधी एक निर्माताच होते. रेडिओ, टीव्ही आणि फिल्म प्रॉडक्शनची विद्यार्थिनी असताना मला निर्मिती क्षेत्राने भुरळ घातली. आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये टॅलेंटला वाव आहे. या सिनेमातून आम्ही एक वेगळा पठडीबाहेरील सिनेमा प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहोत. समीर विध्वंस सारखा दूरदृष्टी असणारा दिग्दर्शक, प्लॅनेट मराठी आणि अक्षय बर्दापूरकर ही टीम एकत्र येत एक सुंदर कलाकृती रसिकांसाठी घेऊन येणार आहे."
तर प्लॅनेट मराठीचे सीएमडी अक्षय बर्दापूरकर सांगतात, " 'हाकामारी' हा अतिशय वेगळा सस्पेन्स सिनेमा असणार आहे. या चित्रपटाची कथा लोककथा, गूढता, प्रेम आणि भयपट आदी सर्व विषयांना धरून पुढे जाणारी आहे. हा सिनेमा प्लॅनेट मराठीचा पहिला वेब सिनेमा आहे. या सिनेमामुळे आम्ही एका मोठ्या आणि वेगवान जगात जाणार आहोत, याचा आम्हाला सर्वात जास्त आनंद आहे. 'द फॅलेरर्स' , ए थ्री मीडिया अँड इव्हेंट्स आणि समीर विध्वंस आदी मिळून प्रेक्षकांचे नक्कीच या सिनेमातून जोरदार मनोरंजन करू हे नक्की."
अक्षय बर्दापूरकर, सोनाली कुलकर्णी आणि समीर विध्वंस यांनी केलेल्या या सिनेमाच्या घोषणेमुळे प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण होणार हे नक्की.
Tuesday, 16 March 2021
IOB in forefront supporting Government’s initiative in COVID Vaccination Programme
जनसंपर्क विभाग Public Relations Department
केन्द्रीय कार्यालय Central Office
Chennai
- 600 002
IOB in
forefront supporting
Government’s
initiative in
COVID
Vaccination Programme
Indian Overseas Bank is committed to the cause of common people as well as Bank’s employees and their family members. During the Covid pandemic, the Bank supported all the initiatives taken by the Government in containing the spread of the virus and also in extending financial support to the people. The employees of the Bank have worked tirelessly braving in numerous odds and provided services to the customers spread across urban, rural and remote corners of the Country. When the pandemic was at its peak in the months of April, May & June 2020, staff members extended their service till the last mile in facilitating withdrawal of relief credited in Jan Dhan Accounts, under PMJDY scheme declared by the Government.
The Government of India has launched the Covid vaccination program in a big way. While the vaccine is administered free of cost at Government Hospitals and Public Health Centres, the Government has capped the cost of the vaccine at Rs.250 in private hospitals. As a token of appreciation of the good work rendered by the Bank’s employees and to support the noble cause of the Government in providing vaccine to all the people, the Bank is bearing the cost of vaccine incurred by its employees and their family members. A total number of about one lakh members (Staff and their Family members) are expected to be benefitted by this initiative of the Bank.
लिबर्टी जनरल विमा – भरोसे का वादा
मुंबई,
16 मार्च, 2021: लिबर्टी जनरल इन्शुरन्स लिमिटेड या भारतातील आघाडीच्या
सर्वसाधारण विमा कंपनीने नुकतीच सुरू केलेल्या दूरदर्शनवरील जाहिरात ‘भरोसे का वादा’ सह-360०-डिग्री विमा जागरूकता मोहीम जाहीर केली. टीव्ही जाहिरात लिबर्टी जनरल
इन्शुरन्सच्या वेगवान दाव्यांचे निवारण करण्याचे आश्वासन, डिजिटली इंटिग्रेटेड सीमलेस प्रक्रियांवर प्रकाश टाकते आणि ग्राहकांना न्याय रीतीने विश्वास आणि वचनाचे मूलगामी संदेश देते.
ही जाहिरात दोन समांतर कथांचा शोध
घेते, दोन कुटुंब ज्यांचे नियमित आयुष्य अचानक झालेल्या अपघातांमुळे विचलित झाले असते आणि लिबर्टी जनरलच्या द्रुत दाव्याच्या
सेटलमेंट्स आणि डिजिटली-एकात्मिक प्रक्रियामुळे त्यांना या कठीण परिस्थितीतून बाहेर निघण्यास कशी मदत होते हे या कथेतून सांगण्यात आलेले आहे. या दोन कुटुंबांच्या कथेतून आपल्याला
त्यांच्या विवादास्पद परंतु परस्पर जोडल्या गेलेल्या जीवनाची झलक आणि विश्वास आणि
जबाबदारीच्या समान धाग्यातून एकत्र विणलेल्या सुंदर मार्गाची झलक आपल्याला पाहायला मिळते.
लिबर्टी जनरल इन्शुरन्सचे सीईओ आणि होल टाईम डायरेक्टर श्री. रूपम अस्थाना
म्हणाले, “आम्ही आमच्या अस्तित्त्वात असलेल्या आणि संभाव्य ग्राहकांच्या जीवनात अनपेक्षित घटनांच्या वेळी आम्ही कुटुंबाची कशी काळजी घेतो आणि संरक्षण देतो याबद्दल आमची संरक्षणाचे ब्रँड वचन
दर्शविणारे एक कथानक तयार केली आहे.
सध्याच्या काळात हे फार महत्वाचे आहे कारण त्यांना याची सर्वात जास्त गरज भासणार आहे. ‘भरोसे का वादा’ या भावनेला सुंदर रीतीने व्यक्त करते. शब्दशः “विश्वासाचे वचन” मध्ये भाषांतरित ही टॅगलाइन आम्ही आमच्या ग्राहकांप्रती जबाबदार्या आणि विश्वासाच्या मूल्यांद्वारे त्यांची काळजी घेण्याबद्दल आमच्या ब्रँडची
प्रतिबद्धता दर्शवते."
लिबर्टी जनरल इन्शुरन्स लिमिटेडच्या पर्सनल
लाइन्स, बॅंकसुरन्स अँड एफिनिटी अॅण्ड मार्केटींगचे
अध्यक्ष अमित जैन म्हणाले, “या मोहिमेद्वारे लिबर्टी जनरल इन्शुरन्स हे दर्शवू इच्छिते की लोकांची प्रगति तेंव्हाच होते जेंव्हा त्यांना सुरक्षित वाटते. ग्राहकांच्या विमा
प्रवासामध्ये दाव्यांचे जलद निराकरण करण्यासह निर्बाध समर्थन प्रदान करण्याचा आमचा सतत प्रयत्न आहे. ”
या
मोहिमेवर बोलताना, हेड मार्केटिंग
अँड डिजिटल बिझिनेस गौरव दुबे म्हणाले, “आम्ही टीव्ही, रेडिओ, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, गुगल डिस्प्ले आणि सोशल मीडिया यासारख्या माध्यमांद्वारे या 360-डिग्री एकीकृत मोहिमेची आखणी
केली आहे. आमचे उद्दीष्ट सर्व प्रवेश बिंदूंवर आणि ग्राहकांच्या क्रॉस-प्लॅटफॉर्म संपर्क ठिकाणी पोहोचणे
आहे. या मोहिमेद्वारे लिबर्टी जनरल विमा क्षेत्रीय बाजारपेठेतील ग्राहकांमध्ये लिबर्टी विम्याची लोकप्रियता आणि आठवण
वाढवण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे .
Monday, 15 March 2021
Laxmi Organic subscribed 2.28 times on Day 1
Mumbai, March 15, 2021: Laxmi Organic Industries Limited (Laxmi Organic), a Mumbai based specialty chemicals manufacturer and the largest manufacturers of ethyl acetate in India, as per Frost & Sullivan Report; received bids of 7,42,26,635 shares against the offered 3,25,58,138 equity shares, as per the 5:00 pm data available on the bourses.
The portion reserved for retail investors was subscribed 4.34
times. While the Qualified Institutional Buyer category was subscribed 0.01
times, the Non-Institutional Investor category was subscribed 0.49 times.
The total size of the offer is Rs. 600 cr at the upper price band of
Rs. 130 per share.
The offer consists of a fresh
issuance of equity shares aggregating up to 300 Cr and an Offer for sale of
equity shares aggregating up to Rs 300 cr; of face value of Rs 2 each. The
minimum bid lot is of 115 equity shares, thereafter in multiples. The price band has been fixed at Rs. 129 –
Rs. 130 per Equity Share.
The Company recently raised Rs. 180
Cr through 15 anchor investors which found participation from renowned global
portfolio investors such as Nomura India Equity Fund, Abu Dhabi Investment
Authority, Goldman Sachs, Kuber India (Plutus), Theleme India Master Fund, Malabar
India Fund, Ashoka India Opportunities Fund, India Acorn Fund. The key domestic
players included SBI Mutual Fund, ICICI Prudential Mutual Fund and Aditya Birla
Mutual Fund.
Key brokerage houses like Axis Capital, ICICI Direct, Canara Bank
Securities, Angel broking, Kotak Securities, Religare Broking, Reliance
Securities, Prabhudas Liladher, Hem Securities, Ventura, Marwadi Financial
services, Choice, BP Wealth shared positive recommendations for the IPO and have
highlighted key aspects of the Company such as leading manufacturer of ethyl
acetate, over 30% market share in the Indian ethyl acetate market, sole Indian manufacturer
of diketene derivatives in India with around 50% market share, absence of sizeable
domestic competition, experienced management team, global presence in over 30
countries, marque clientele and technologically driven manufacturing facilities
amongst others.
The Asia-Pacific market dominated the global acetyls market in 2019 owing
to the increasing demand from end use applications like coatings, adhesives,
sealants and elastomers (CASE), food & beverage and pharmaceuticals
segments. Moreover, the rising geriatric population coupled with the
affordability of generic drugs is expected to fuel the demand in the region.
With many multinational players investing in India for manufacturing, active
players such as Laxmi Organic would benefit the most in the growing industry
scenario.
Axis Capital Limited and DAM Capital
Advisors Limited are appointed as the BRLMs to the Issue.
(Subscription table below)
Anupam Rasayan overall subscribed 3.65 times on Day 2
Mumbai, March 15, 2021: Surat
based, custom synthesis and manufacturing focused specialty chemicals company
Anupam Rasayan India Limited; received bids of 3,53,30,067 shares against the offered 96,66,848
equity shares,
as per the 5:00 pm data available on the bourses.
The portion reserved for retail investors was subscribed 6.63
times. While the Qualified Institutional Buyer was subscribed 0.37 times, the Non-Institutional
Investor category was subscribed 1.40 times. The Employee category was subscribed 0.93
times.
Key brokerage houses like Axis Securities, ICICI Direct, Motilas Oswal,
Canara Bank Securities Ltd, Kotak Securities, Angel Broking, HEM Securities,
Choice Capital, BP Securities and Ventura have given positive recommendations
for the issue while highlighting the key strengths of the company like
diversified customer base, core focus on process
innovation and constant upgradation, consistent R&D, stringent quality
specifications, strong and long-term client relationships, marquee client base amongst
others. These report have further highlighted the Company’s consistent track record of financial performance and experienced
management as one of the key advantages of the Company.
The reports have also highlighted that India’s
specialty chemicals industry is expected to grow at a CAGR of approximately 10%
to 11% over the next five years and that India accounts for approximately 1% to
2% of the global exportable specialty chemicals; which indicates a large scope
of improvement and widespread opportunity in the speciality chemicals segment.
Axis Capital
Limited, Ambit Private Limited, IIFL Securities Limited and JM Financial
Limited are the book running lead
managers to the Issue.
(Subscription
table below)
'प्लॅनेट मराठी'च्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून शरद पोंक्षे यांचे वेबसिरीजमध्ये पदार्पण
प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याबरोबरच त्यांना दर्जेदार आणि आशयपूर्ण कार्यक्रम देण्याची हमी देणाऱ्या प्लॅनेट मराठी या पहिल्यावहिल्या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मच्या आणखी एका नवीन वेबसिरीजच्या चित्रीकरणाचा आज मुंबईत शुभारंभ झाला. यापूर्वीच प्लॅनेट मराठीच्या काही वेबसिरीजची नावे घोषित करण्यात आली होती त्यात आता आणखी एका वेबसिरीजची भर पडणार आहे. मात्र या वेबसिरीजचे नाव सध्या तरी गुलदस्त्यात आहे. असे असले तरी यातील कलाकारांची नावे मात्र जाहीर करण्यात आली आहेत. शरद पोंक्षे, शिल्पा तुळसकर, तेजस बर्वे, पर्ण पेठे, उदय नेने अशी दमदार स्टारकास्ट असलेली ही वेबसिरीज कौटुंबिक आणि विनोदी स्वरूपाची असणार आहे.
सहा भागांची ही वेबसिरीज एक कौटुंबिक कथा असून ही वेबसिरीज बघताना हे कुठेतरी आपल्याही घरात घडतंय, याची प्रेक्षकांना जाणीव होईल आणि त्यामुळेच ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल. या वेबसिरीजच्या निमित्ताने शरद पोंक्षे डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहेत.
या वेबसिरीजबद्दल प्लॅनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ''आजवर हाताळलेल्या विषयांपेक्षा हा जरा वेगळाच विषय आहे. ही वेबसिरीज प्रेक्षक आपल्या आयुष्याशी कुठेतरी जोडू शकतात. ही सिरीज ज्या विषयावर आधारित आहे, तो विषय खरोखरच गंभीर होता. मात्र तरीही आम्ही या गंभीर विषयाला विनोदाची जोड देत, अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीने हा विषय मांडला आहे. अभिनयात पूर्ण मुरलेले कलाकार असल्याने या सर्व जणांनी आपापल्या भूमिकेला उत्तम न्याय दिला आहे.''
वर्जिनोशन्सची प्रथम निर्मिती असणाऱ्या या वेबसिरीजचे दिग्दर्शन अमित कान्हेरे यांचे असून योगेश विनायक जोशी यांनी संवादलेखन केले आहे. तर प्रतीक व्यास, अमित कान्हेरे यांनी निर्मिती केली आहे. विशाल संगवई डीओपीचे काम पाहिले असून ओंकार महाजन क्रिएटीव्ह प्रोड्युसर आहेत. रोहन-रोहन यांनी या वेबसिरिजला संगीत दिले आहे.
अमेझॉन प्राइम व्हिडिओ करणार मराठी चित्रपटाचा वर्ल्ड प्रिमिअर
SenseGiz introduces India’s first historical contact tracing sports-tech solution – “SenseGiz Sentinel Platform”
SenseGiz introduces India’s first historical contact tracing sports-tech solution – “SenseGiz Sentinel Platform”
~The IoT enabled “Bio-Bubble” is scalable and can be deployed at any sporting event~
Mumbai, 15th March 2021: SenseGiz Technologies, an Indian Start-up that creates enterprise and industrial IoT solutions, has revealed its “Made in India” social distancing & historical contact tracing solution called “SenseGiz Sentinel Platform” – A virtual Bio-Bubble that keeps all players, support staff, match officials and others involved safe within a dedicated zone. The IoT powered solution comes loaded with features like historic contact tracing, geo-fencing, overcrowding, and real time alerts on social distancing violations.
The recently concluded India vs. England Test Series under BCCI benefitted from this path-breaking solution which was deployed successfully at Chennai for the first two Tests and then at Ahmedabad for the remainder of the series. This was also the first Bio-secure Test series between India and England.
Even the Legends feel safe with SenseGiz:
The ongoing Road Safety World Series (RSWS), a 6-Nation International T20 Cricket tournament in Raipur, has seen the solution being successfully deployed and experienced by world legends such as Sachin Tendulkar, Brian Lara, Sanath Jayasuriya, Jonty Rhodes, Kevin Pietersen to name a few. The Bio-Bubble is focussed towards ensuring the safety of these legends and has shown extremely good results during this tournament.
“Technology is playing a critical role in return of sports tournaments and large-scale events. Our ‘Made in India’ Bio-Bubble solution is designed for player safety. This is first such solution to bring the concept of historical contact tracing to India and will revolutionize the sporting industry. The data-driven approach with instant reporting ensures sports tournaments comply with all the necessary Government protocols”, said Abhishek Latthe, Founder & CEO – SenseGiz Technologies
This solution operates like a hub and spoke architecture to create a Bio-secure environment. FIND (used as a wristband) is a Bluetooth enabled IoT device that is tagged to each player within the Bio-Bubble and can enforce social distancing between its users. A combination of other hardware devices such as COINs and Gateways communicate and push this critical data retrieved from the FINDs to the cloud, and helps enforce social distancing and historical contact tracing in real time so that only the infected users and their immediate contacts can be isolated/quarantined.
SenseGiz is the First Indian company to provide Bio-Bubble solution safeguards large-scale events and international sports tournaments. The company behind this innovative solution is from Belagavi, Karnataka, and is being recognised for its historical contact tracing solutions which has seen great traction amongst the Sports fraternity, hosting International tournaments. The company has won many national and international awards for their pioneering work in IoT based solutions.
“The experience with the SenseGiz Bio-Bubble has been seamless. The solution is easy to use and has a positive impact on all players (mentally as well) since it is designed for the safety of all players, which is of prime importance during this pandemic. A big boost to the sporting fraternity, and I am happy to learn that an Indian startup is leveraging technology to keep us "players" safe while we are on OR off the cricket field” ~ said Mohammed Kaif who is currently part of the Indian Legends Team and playing the Road Safety World Series at Raipur.
Sunday, 14 March 2021
कोण होणार करोडपती' येतंय तुमच्या भेटीला
२०१९मध्ये सोनी मराठी वाहिनीनं 'कोण होणार करोडपती' केलं होतं. पण गेल्या वर्षी वैश्विक महामारीमुळे हा कार्यक्रम करणं शक्य झालं नाही. आता २०२१ मध्ये सोनी मराठी वाहिनीवर 'कोण होणार करोडपती' सुरू होणार आहे. ज्ञान तुम्हांला यशाच्या शिखरावर पोचवू शकतं.
या वर्षी 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन खेडेकर करणार आहेत. मराठी घराघरांत सगळ्यांना सचिन खेडेकर परिचित आहेत. आपल्या देहबोलीमुळे आणि आवाजामुळे सचिन खेडेकर हे प्रेक्षकांचे लाडके अभिनेते आहेत.
'कोण होणार करोडपती' ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी २४ मार्चपासून नोंदणी सुरू होणार आहे. २४ मार्च ते २ एप्रिल यादरम्यान ८०८०० ४४ २२२ या क्रमांकावर मिसकॉल देऊन किंवा सोनी लिव्ह ॲपवर जाऊन प्रेक्षक स्वतःची नोंदणी करून घेऊ शकतात.
टीव्ही अभिनेत्री एकता जैन यांनी महाशिवरात्रीवर 'अर्धनारीश्वर' चे रूप घेतले
भगवान शिव (अर्धनारीश्वर) म्हणून एकता जैन फॅब कट युनिसेक्स सलूनमधून मॉडेल टाऊनचे चाचा नेहरू पार्क आणि संगीतकार अनिल मोहिले मनोरंजन पार्क येथे स्कूटीवर शूटिंगला गेली होती . एकता जैन दररोज भगवान शिवची पूजा करते . यावर्षी त्यांनी महाशिवरात्रीवर अर्धनारीश्वर स्वरुपात डमरू आणि त्रिशूलबरोबर नृत्य केले आणि भगवान शिवची पूजा केली. त्यांचा मेक अप रीमा नंदी आणि तिची मित्र कृष्णा आर्य यांनी बनविली होती. या मेक अप आणि शूटिंगबद्दल एकता जैन यांनी सांगितले की, तिला मेकअप करण्यास तीन तास लागले, त्यानंतर शूटिंगला पूर्ण दिवस लागला. एकता जैन हा शतरंज , खली बाली आणि त्रिहीम सारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांचा एक भाग आहे. सत्य साई बाबा 2 चे शूटिंग एप्रिल 2021 मध्ये मुंबई आणि बंगळुरू येथे सुरू होईल. एकता जैनने शतरंज पोलिस कर्मचारी आणि त्रिहिममध्ये वकिलाची भूमिका साकारली आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपटाचे शुटिंग आणि डबिंगही त्याने पूर्ण केले आहे आणि 2021 मध्ये त्याला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरुन काम मिळेल अशी अपेक्षा आहे. सोशल मीडियात खूप नाव मिळाल्यामुळे एकता सांगते की मला माझ्यावर खूप प्रेम दिल्याबद्दल मी माझ्या सर्व चाहत्यांचे आभार मानू इच्छिते . "हर हर महादेव.
-
महाराष्ट्राचा फेवरेट सिनेमा परत येतोय… आनंद एल राय, क्षिती जोग निर्मित, हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ ची घोषणा ‘झिम्मा’ने एक वर्षापूर्...
-
SenseGiz introduces India’s first historical contact tracing sports-tech solution – “SenseGiz Sentinel Platform” ~The IoT enabled “B...

















