Friday, 24 May 2024

Miss India Arissa Khan Celebrates Indian Culture with Iconic ‘Ghunghat’ on the Cannes Red Carpet

 


Miss India Arissa Khan Celebrates Indian Culture with Iconic ‘Ghunghat’ on the Cannes Red Carpet


The prestigious Cannes Film Festival witnessed a historic moment as Miss India and Fashion entrepreneur Arissa Khan graced the red carpet, radiating elegance and cultural pride. She was one of the few representing India on this esteemed international platform. 

Arissa Khan made a striking appearance in an elaborately designed gown by Dolly J. In a trailblazing move, Arissa wore a ‘Ghunghat’ on a Western outfit at Cannes, a poignant gesture that paid homage to her roots and showcased the rich cultural tapestry of India. This innovative fusion was a proud representation of her identity as a modern Indian woman deeply connected to her heritage.

In addition to the Dolly J gown, Arissa's Cannes looks featured an array of exquisite ensembles from renowned Indian designers. She graced the festival in stunning outfits from Kalki Fashion, Eeksha Official, and Jajaabor, each meticulously curated to highlight the diversity and creativity of Indian fashion. Complementing her ensembles were breathtaking pieces from Miss Jo Silver Jewellery, adding a touch of traditional glamour to her contemporary looks.

"I wanted to use this incredible platform to celebrate and honour my Indian culture, and wearing the ‘Ghunghat’ was my way of connecting with my roots while embracing the global stage” says Arissa 

Arissa Khan’s red carpet debut at Cannes Film Festival marks a significant milestone in her career and serves as an inspiration for young women worldwide.

Wednesday, 22 May 2024

बेंगळुरूचा प्रवास संपला, क्वालिफायर-२ मध्ये राजस्थान-हैदराबाद भिडणार

 


बेंगळुरूचा प्रवास संपला, क्वालिफायर-२ मध्ये राजस्थान-हैदराबाद भिडणार


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२४ च्या एलिमिनेटरमध्ये, राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा चार गडी राखून पराभव केला आणि स्पर्धेतून बाहेर काढले.  अशाप्रकारे बेंगळुरूचा सलग सहा सामने जिंकण्याचा प्रवासही संपला.  नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने २० षटकांत ८ गडी गमावून १७२ धावा केल्या.  प्रत्युत्तरात राजस्थानने १९ षटकांत सहा गडी गमावून लक्ष्य गाठले. अशा प्रकारे राजस्थानचा संघ क्वालिफायर-२ मध्ये पोहोचला. आता २४ मे रोजी दुसऱ्या बाद फेरीत त्यांचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ २६ मे रोजी कोलकाता नाईट रायडर्सशी अंतिम फेरीमध्ये खेळेल. या सामन्यापूर्वी बेंगळुरूने सलग सहा सामने जिंकून प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. आता सलग १७ व्या हंगामात बेंगळुरू संघाला विजेतेपद मिळवता आले नाही. या सामन्यात ग्लेन मॅक्सवेल आपले खातेही उघडू शकला नाही. त्याचवेळी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध विजयाचे नेतृत्व करणाऱ्या यश दयालने तीन षटकांत ३७ धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही.


बेंगळुरूच्या खेळाडूंनी दिनेश कार्तिकला ज्या प्रकारे मिठी मारली, त्यावरून असे मानले जात आहे की कार्तिकचाही हा आयपीएलमधील शेवटचा सामना होता. कार्तिकने यापूर्वी सीएसकेला पराभूत केल्यानंतर सांगितले होते की, सीएसकेविरुद्धचा सामना त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील शेवटचा असेल असे त्याला वाटत होते.  अशा स्थितीत कार्तिकची कारकीर्द संपल्याचे मानले जात आहे.


तत्पूर्वी, रविचंद्रन अश्विन, आवेश खान आणि ट्रेंट बोल्ट यांच्या शानदार गोलंदाजीसमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या एलिमिनेटरमध्ये अपेक्षेइतकी मोठी धावसंख्या उभारता आली नाही. राजस्थानच्या गोलंदाजांनी आरसीबीला आठ विकेट्सवर एकूण १७२ धावांवर रोखले. आवेश खानने ४४ धावांत ३ बळी घेतले, तर अश्विनने १९ धावांत २ आणि बोल्टने १६ धावांत एक बळी घेतला. स्वकेंद्रित विराट कोहलीने २४ चेंडूत ३३ तर रजत पाटीदारने २२ चेंडूत ३४ धावा केल्या. महिपाल लोमरोरने अखेर १७ चेंडूत ३२ धावा करत आरसीबीला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले.


नाणेफेक जिंकल्यानंतर पॅट कमिन्सने क्वालिफायर-१ मध्ये कोलकाताविरुद्ध जी चूक केली तीच चूक सॅमसनने केली नाही. संजूने आरसीबीला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दुसऱ्याच षटकात विराट कोहलीने संदीपवर चौकार मारून चौकाराची सुरुवात केली. डू प्लेसिसनेही याच षटकात डावातील पहिला षटकार मारला. मात्र, दोघांनीही बोल्टला सावधपणे खेळवले. त्याने दोन षटकात केवळ ५ धावा दिल्या. विराटने अावेशच्या पहिल्याच चेंडूला हुक करून पहिला षटकार ठोकला. या षटकात डुप्लेसिसने दोन चौकार मारून एकूण १७ धावा केल्या. बोल्टला आक्रमणात ठेवण्याचा संजूचा निर्णय बरोबर ठरला. डुप्लेसिसने मारलेला पुल मिडविकेटवर पॉवेलने सुंदर झेलमध्ये परिवर्तीत केला. डुप्लेसिसने १४ चेंडूत २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १७ धावा केल्या. दोघांनी २८ चेंडूत ३७ धावा जोडल्या. बोल्टने पहिल्या तीन षटकात केवळ ६ धावा देऊन एक विकेट घेतली.


आरसीबीसाठी चांगली गोष्ट म्हणजे विराट कोहली पॉवरप्लेमध्ये बाद झाला नाही. विराटने सहाव्या षटकात संदीपवर दोन चौकार मारून आरसीबीला ५० धावांवर नेले. चौकारांसह विराटने आयपीएलमधील ८००० धावाही पूर्ण केल्या. आरसीबीने पॉवरप्लेमध्ये एका विकेटसाठी ५० धावा केल्या होत्या, ज्यामध्ये विराटने १९ चेंडूत ३० धावा केल्या होत्या. या सामन्याला विराट विरुद्ध चहल म्हटले जात होते. मोक्याव्या क्षणी संजूने चहलला आक्रमणात आणले आणि त्याने विराटला  मिडविकेट सीमारेषेवर त्याचा झेल देण्यास भाग पाडले. विराटने २४ चेंडूत तीन चौकार आणि एक षटकार ठोकला. आणि पुन्हा एकदा स्वतःसाठी खेळत असल्याची मोहोर उठवली. राष्ट्रीय संघ असो वा एखाद्या क्लबचा संघ तो केवळ वैयक्तिक विक्रम करण्यासाठी खेळत असतो. त्याच्यासाठी देश किवा कोणताही संघ कधीच महत्वाचा नसतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.


अश्विन आणि चहलने पॉवरप्लेनंतर पुढील तीन षटकांत धावांचा वेग रोखला. या काळात केवळ १३ धावा झाल्या आणि विराट तंबूत परतला. दहाव्या षटकात कॅमेरून ग्रीनने चहलला एक षटकार आणि एक चौकार मारून आक्रमण परतवून लावले. यादरम्यान अश्विनच्या चेंडूवर जुरेलने पाटीदारचा सोपा झेल सोडला. पाटीदार ६ धावांवर खेळत होता आणि आरसीबीची धावसंख्या ७८ धावांवर होती. १३व्या षटकात अश्विनने सलग दोन चेंडूंवर कॅमेरून ग्रीन (२१) आणि मॅक्सवेल (०) यांच्या रूपाने आरसीबीला दुहेरी झटका दिला. मॅक्सवेल आयपीएलमध्ये १८व्यांदा शून्यावर बाद झाला. पाटीदारलाही मोठी खेळी करता आली नाही. आवेशने त्याला ३४ धावांवर बाद केले. आवेशने कार्तिकला (११) बाद करत लोमररसोबतची ३२ धावांची भागीदारी संपवली. यानंतर आवेशच्या गोलंदाजीवर ३२ चेंडूत १७ धावा करून लोमररही बाद झाला.


१७३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या राजस्थानच्या संघाची सुरुवात चांगली झाली. यशस्वी जैस्वाल आणि टॉम कोहलर कॅडमोर यांनी ४६ धावांची सलामी दिली. लोकी फर्ग्युसनने कॅडमोरला त्रिफळाचीत केले.  त्याला २० धावा करता आल्या. यानंतर यशस्वीने कर्णधार संजू सॅमसनसोबत दुसऱ्या विकेटसाठी ३५ धावांची भागीदारी केली. यशस्वी अर्धशतकापूर्वी कॅमेरून ग्रीनचा बळी ठरला. त्याला ३० चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीने ४५ धावा करता आल्या.


मोठा फटका खेळण्याच्या नादात सॅमसन बाद झाला. त्याला १३ चेंडूत १७ धावा करता आल्या. कोहलीच्या एका शानदार चेंडूफेकीमुळे ध्रुव जुरेल आठ धावा करून धावबाद झाला. मात्र, दुसऱ्या टोकाकडून रियान परागने धावा सुरूच ठेवल्या. त्याने शिमरॉन हेटमायरसोबत ४५ धावांची भागीदारी केली आणि बंगळुरूच्या हातून सामना हिसकावून घेतला. १८व्या षटकात परागला सिराजने त्रिफळाचीत बाद केले. तो २६ चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ३६ धावा करून बाद झाला. त्याच षटकात सिराजने शिमरॉन हेटमायरला डुप्लेसिसकरवी झेलबाद केले. त्याला १४ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २६ धावा करता आल्या.


सामन्याने पुन्हा एकदा वळण घेतल्यासारखे वाटत होते, पण रोव्हमन पॉवेलने आठ चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १६ धावांची नाबाद खेळी केली आणि राजस्थानला विजयापर्यंत नेले. पॉवेलने १९व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारून सामना जिंकला. बेंगळुरूकडून सिराजने दोन गडी बाद केले. तर फर्ग्युसन, कर्ण शर्मा आणि ग्रीन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. रविचंद्रन अश्विनला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.


या विजयासह राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने एका खास विक्रमाची बरोबरी केली आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक ३१ सामने जिंकणारा तो राजस्थानचा कर्णधार बनला आहे. या बाबतीत त्याने महान शेन वॉर्नची बरोबरी केली. वॉर्नच्या नेतृत्वाखालीही आरआरने ३१ सामने जिंकले होते. यानंतर राहुल द्रविड १८ विजयांसह तिसऱ्या स्थानावर आहे आणि स्टीव्ह स्मिथ १५ विजयांसह चौथ्या स्थानावर आहे.


त्याचवेळी आरसीबीचा प्लेऑफमधील हा १०वा पराभव आहे. संघाचे चॅम्पियन होण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. बेंगळुरूने आतापर्यंत १७ हंगामात प्लेऑफमध्ये १६ सामने खेळले आहेत आणि १० सामन्यांमध्ये संघाचा पराभव झाला आहे. आरसीबीचा संघ प्लेऑफमध्ये सर्वाधिक सामने गमावणारा संघ बनला आहे. या बाबतीत चेन्नई आणि दिल्ली प्रत्येकी नऊ पराभवांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. प्लेऑफमध्ये चेन्नईने २६ तर दिल्लीने ११ सामने खेळले आहेत. प्लेऑफ म्हणजे क्वालिफायर-१, एलिमिनेटर, क्वालिफायर-२ आणि अंतिम सामना.


राजस्थानच्या विजयात रियान परागने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने २६ चेंडूंत २ चौकार आणि  षटकारांच्या मदतीने ३६ धावांची खेळी केली. पराग या संपूर्ण मोसमात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि त्याने खूप चांगल्या धावा केल्या आहेत. त्याने १७व्या सत्रात आतापर्यंत ५६७ धावा केल्या आहेत. राजस्थानसाठी आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या पराग तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत जोस बटलर पहिल्या क्रमांकावर आहे. आयपीएल २०२२ मध्ये त्याने ८६३ धावा केल्या होत्या. तर, यशस्वी जैस्वालने २०२३ मध्ये ६२५ धावा केल्या होत्या आणि तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.


यासह पराग आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या अनकॅप्ड खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याचा एक नियोजित सामना बाकी आहे आणि जर त्यांनी अंतिम फेरी गाठली तर दोन.  अशा परिस्थितीत तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा अनकॅप्ड खेळाडू यशस्वी जैस्वालचा विक्रम मोडू शकतो. यशस्वीने २०२३ मध्ये अनकॅप्ड खेळाडू म्हणून ६२५ धावा केल्या होत्या. रायन या कामगिरीपासून ५८ धावा दूर आहे. या यादीत माजी क्रिकेटपटू शॉन मार्श दुसऱ्या स्थानावर आहे. २००८ मध्ये पंजाब किंग्जकडून खेळताना त्याने ६१६ धावा केल्या होत्या. अनकॅप्ड खेळाडू म्हणजे त्या विशिष्ट वर्ष किंवा वेळेपर्यंत ज्याने कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही असा खेळाडू असतो.


रियान पराग आयपीएलमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या किंवा एका हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. ऋषभ पंतच्या नावावर आयपीएलच्या एका मोसमात चौथ्या क्रमांकावर किंवा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. त्याने २०१८ मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी चौथ्या किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना ५७९ धावा केल्या. परागच्या नावावर ५६७ धावा आहेत. या हंगामात परागने राजस्थानसाठी फक्त चौथ्या क्रमांकावर किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी केली आहे.


या संपूर्ण सामन्यात बेंगळुरू किंवा राजस्थान दोघांनीही अर्धशतक झळकावले नाही. या सामन्यात एकूण ३४६ धावा झाल्या. कोणाचेही अर्धशतक नसलेल्या सामन्यातील ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. या प्रकरणात, चेन्नई आणि बेंगळुरू यांच्यात खेळला गेलेला हंगामातील पहिला सामना अव्वल स्थानावर आहे.  त्या सामन्यात एकूण ३४९ धावा झाल्या, परंतु दोन्ही संघातील एकही फलंदाज अर्धशतक करू शकला नाही.

Tuesday, 21 May 2024

Motilal Oswal Financial Services Deepens Local Ties by rebranding Malad West Metro Station as the ‘Wealth Creation Station’.

 



Motilal Oswal Financial Services Deepens Local Ties by rebranding Malad West Metro Station as the ‘Wealth Creation Station’.


Mumbai, May 21, 2024:
 Motilal Oswal Financial Services, a diversified financial services company, proudly announces its exclusive acquisition of the Station Branding Rights of Malad West Metro Station, Mumbai. This strategic partnership amplifies Motilal Oswal's brand visibility. It strengthens the company’s longstanding and growing affiliation with Malad as a vibrant business hub, offering our esteemed investors and employees a unique opportunity to be part of this journey.

 

Mr. Motilal Oswal, Group MD & CEO of Motilal Oswal Financial Services, expressed his excitement, stating, "Our acquisition of the station branding rights for Malad West Metro Station marks a significant milestone for us. With our expanding office footprint in Malad, including offices in Palm Spring, Interface 7, and Interface 11, accommodating over 4000 employees, we are deeply rooted in this thriving community

."

 

This is a historic moment for Motilal Oswal Financial Services as this is the company's first-ever initiative to secure station branding rights in Mumbai, a testimony to the company’s innovative approach and pioneering spirit. Situated on the bustling Yellow Line 2A of Mumbai Metro, Motilal Oswal Malad (West) is set to become a focal point for commuters, offering them an immersive and informative experience.

 

Commenting on this first such association, Mr. Ajay Menon, MD & CEO of Broking & Distribution, Motilal Oswal Financial Services, remarked, "Our partnership with Malad West Metro Station not only reinforces our strong ties with the local community but also improves our visibility to the Metro train travellers. Through our station branding efforts, we are dedicated to fostering financial literacy and empowering investors with research-backed insights, enabling informed investment decisions among the masses.”

 

Motilal Oswal Malad (West) will prominently feature the brand's name and showcase visually appealing and intellectually stimulating content, aligning with Motilal Oswal's core values of research-backed recommendations and stock market literacy.

मालाड मेट्रो स्टेशन ‘वेल्थ क्रिएशन स्टेशन’ म्हणून पुनब्रँडिंग मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसने केले स्थानिक संबंध अधिक दृढ

 


मालाड मेट्रो स्टेशन ‘वेल्थ क्रिएशन स्टेशन’ म्हणून पुनब्रँडिंग 

मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसने केले स्थानिक संबंध अधिक दृढ

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस या वैविध्यपूर्ण वित्तीय सेवा कंपनीने मुंबईच्या मालाड पश्चिम मेट्रो स्थानकाचे स्टेशन ब्रँडिंग हक्क अभिमानाने विकत घेतल्याची घोषणा केली. या धोरणात्मक भागीदारीमुळे मोतीलाल ओसवाल यांची ब्रँड दृश्यमानता वाढली आहे. त्यांच्या प्रतिष्ठित गुंतवणूकदारांना आणि कर्मचाऱ्यांना या प्रवासाचा भाग होण्याची एक अनोखी संधी दिली. एक चैतन्यदायी व्यवसाय केंद्र म्हणून मालाडशी कंपनीची दीर्घकालीन आणि वाढती संलग्नता यामुळे अधिक मजबूत होणार आहे. 


मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे समूह व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मोतीलाल ओसवाल यांनी आपला उत्साह व्यक्त करताना सांगितले की, "मालाड पश्चिम मेट्रो स्टेशनसाठी स्टेशन ब्रँडिंग अधिकारांचे अधिग्रहण हा आमच्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. पाम स्प्रिंग, इंटरफेस ७ आणि इंटरफेस ११ मधील कार्यालयांसह मलाडमधील आमच्या विस्तारीत कार्यालय पदचिन्हांमुळे, ४००० हून अधिक कर्मचाऱ्यांना सामावून घेतल्यामुळे, आम्ही या भरभराटीच्या समुदायात खोलवर रुजलेलो आहोत".


मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेससाठी हा ऐतिहासिक क्षण आहे, कारण मुंबईतील स्टेशन ब्रँडिंग हक्क मिळवण्यासाठी कंपनीचा हा पहिलाच उपक्रम आहे, जो कंपनीचा नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आणि अग्रगण्य वृत्तीची साक्ष आहे. मुंबई मेट्रोच्या गजबजलेल्या यलो लाईन २ए वर वसलेले मोतीलाल ओसवाल मालाड (पश्चिम) हे प्रवाशांसाठी एक केंद्रबिंदू बनण्यासाठी सज्ज आहे, ज्यामुळे त्यांना एक आकर्षक आणि माहितीपूर्ण अनुभव मिळेल.


अशा प्रकारच्या पहिल्या सहकार्याबद्दल भाष्य करताना मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे ब्रोकिंग अँड डिस्ट्रिब्युशनचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अजय मेनन म्हणाले, "मालाड पश्चिम मेट्रो स्टेशनसह आमची भागीदारी केवळ स्थानिक समुदायासोबतचे आमचे मजबूत संबंध मजबूत करत नाही तर मेट्रो ट्रेनच्या प्रवाशांसाठी आमची दृश्यमानता देखील सुधारते. आमच्या स्टेशन ब्रँडिंग प्रयत्नांद्वारे, आम्ही आर्थिक साक्षरतेस चालना देण्यासाठी आणि संशोधन-समर्थित अंतर्दृष्टीसह गुंतवणूकदारांना सक्षम करण्यासाठी, लोकांमध्ये माहितीपूर्ण गुंतवणूक निर्णय सक्षम करण्यासाठी समर्पित आहोत".


मोतीलाल ओसवाल मालाड (पश्चिम) मध्ये ब्रँडचे नाव ठळकपणे दृश्यमान केले जाईल आणि मोतीलाल ओसवाल यांच्या संशोधन-समर्थित शिफारशी आणि शेअर बाजाराच्या साक्षरतेच्या मूलभूत मूल्यांशी सुसंगत असलेली आकर्षक दृष्यात्मकता आणि बौद्धिकदृष्ट्या प्रेरक सामग्री प्रदर्शित केली जाईल.

Vilas Transcore Limited’s SME Initial Public Offering to open on Monday, May 27, 2024, price band set at ₹139/- to ₹147/- per Equity Share

 


Vilas Transcore Limited’s SME Initial Public Offering to open on Monday, May 27, 2024, price band set at ₹139/- to ₹147/- per Equity Share


⦁ Price Band of ₹139/- – ₹147/- per equity share bearing face value of ₹10/- each (“Equity Shares”)

⦁ Bid/Offer Opening Date – Monday, May 27, 2024 and Bid/Offer Closing Date – Wednesday, May 29, 2024.

⦁ Minimum Bid Lot is 1000 Equity Shares and in multiples of 1000 Equity Shares thereafter.

⦁ The Floor Price is 13.9 times the face value of the Equity Share and the Cap Price is 14.7 times the face value of the Equity Share


 

Thursday, May 23, 2024: Vadodara-based Vilas Transcore Limited engaged in the manufacturing and supply of transformer components used in the power distribution and transmission sector, primarily to transformer and other power equipments manufacturer in India and abroad, has fixed the price band of ₹139/- to ₹147/- per Equity Share of face value ₹10/- each for its maiden initial public offer. 


The Initial Public Offering (“IPO” or “Offer”) of the Company will open on Monday, May 27th, 2024, for subscription and close on Wednesday, May 29th, 2024. Investors can bid for a minimum of 1000 Equity Shares and in multiples of 1000 Equity Shares thereafter. The offer also includes a reservation of up to 326,000 equity shares for subscription by market makers.

The issue consists of a fresh issue of up to 64,80,000 equity shares with “NO Offer for Sale” (OFS) - from promoter and promoter group. 

The Proceeds from the fresh issue will be used to the extent of Rs 5 crore for funding for strategic investment and acquisitions, Rs 20.09 crore for funding Capital Expenditure towards construction of factory building, Rs 45.20 crore for funding capital expenditure towards acquisition and installation of additional plant and machinery and general corporate purpose.

Vilas Transcore promoted by Nilesh Jitubhai Patel manufactures and supplies a different range of electrical lamination cold rolled grain oriented (C.R.G.O.) lamination core, CRGO slit coils, CRGO stacked (assembled cores), CRGO wound core and CRGO Toroidal core that are critical for the manufacturing of power transformers, distribution transformers & dry type transformers, high voltage / medium voltage & low voltage current transformers, that are used for distribution and transmission of electricity. 

It manufactures its products keeping in mind the industry standards and specifications given by the customer, with the use of latest technology to manufacture its products and offers its customers with the defined requirements based on the product dimensions and materials for application in the power & distribution equipment industry. 

The company majorly caters to the power distribution and power engineering industry. Currently, it operates from two ISO 9001:2015 certified manufacturing facilities located at Por near Vadodara, Gujarat. 

Vilas Transcore Limited clocked a profit of Rs 20.22 crores in the FY23, up from Rs 17.91 crores in the previous year, an increase of 12.90%. Revenue from operations during the FY23 increased significantly to Rs 282.60 crores from Rs 233.03 crores in the previous year, an increase of 21.27%, primarily due to an increase in domestic revenue and job work charges received. 

For nine months ended December 31, 2023, revenue from operations stood at Rs 235.74 crores, and profit after tax stood at Rs 16.79 crores.

The Issue is being made through the Book Building Process, wherein not more than 50% of the Net Issue shall be available for allocation to Qualified Institutional Buyers, not less than 15% of the Net Issue shall be available for allocation to Non-Institutional Investors and not less than 35% of the Net Issue shall be available for allocation to Retail Individual Bidders.

Hem Securities Limited is the sole book-running lead manager and Bigshare Services Private Limited is the registrar to the issue. The equity shares are proposed to be listed on the SME Platform of NSE (“NSE Emerge”).


Wednesday, 15 May 2024

 




Q4/FY’24 Results - 15th May, 2024

Ø Consolidated Financial Highlights

·      PFC Group registered the highest annual Profit After Tax (PAT) with 25% increase - Rs. 21,179 crores in FY’23 to Rs. 26,461 crores in FY’24.

·      PFC Group continues to be the largest NBFC Group in India with total balance sheet size crossing more than Rs.10 lakh crore in FY’24 – The current balance sheet size is 10.39 lakh crores.

·      16% growth in consolidated loan asset book from Rs. 8,57,500 crores as on 31.03.2023 to Rs. 9,90,824 crores as on 31.03.2024

·      Consolidated Net worth (including  non-controlling interest) increased by 20% - Rs. 1,11,981 crores as on 31.03.2023 to Rs. 1,34,289 crores as on 31.03.2024

·      The consolidated Gross NPA nearly touches 3% and is at 3.02% in FY’24 vs. 3.66% in FY’23.

·      Owing to active resolution efforts, consolidated Net NPA has reached its lowest level at 0.85% in FY’24 from 1.03% in FY’23.

 

Ø Stand Alone Financial Highlights

·      PFC is now the highest profit making NBFC in India, with 24% remarkable increase registered in Standalone Profit After Tax from Rs. 11,605 crores in FY’23 to Rs. 14,367 crores in FY’24.

·      18% increase registered in Quarterly PAT from Rs. 3,492 crores in Q4’23 to Rs. 4,135 crores in Q4’24.

·      Final dividend of Rs. 2.50 per share proposed by Board in Q4’24. With this, PFC has given a total dividend of Rs. 13.50 per share for FY 24.

·      Double-digit growth of 14% witnessed in loan asset book- from Rs. 4,22,498 crores as on 31.03.2023 to Rs.4,81,462 crores as on 31.03.2024.

·      Renewable book registered 25% year on year growth, The renewable loan portfolio has crossed the 60K milestone and is at Rs.60,208 crores. PFC continues to be the largest renewable lender in India.

·      PFC continues to maintain comfortable capital adequacy levels. CRAR as on 31st March,2024 is at 25.41%, with Tier 1 capital at 23.18%, well above the regulatory limit.

·      16% increase in net worth from Rs. 68,202 crores as on 31.03.2023 to Rs. 79,203 crores as on 31.03.2024.

·      The asset quality has further improved with Net NPA ratio reaching its lowest level in last 6 years at 0.85% in FY’24 vs. 1.07% in FY’23. No new NPA added in more than a year. Gross NPA for FY’24 is at 3.34%, a decrease of 57 bps from 3.91% in FY’23.

 

Ø Management comments

On PFC’s performance, Chairperson and Managing Director, Parminder Chopra shared that PFC Group continues to be the largest NBFC Group in India and is also India's highest profit making NBFC both on a consolidated and on a stand-alone basis.

PFC achieved record profits in FY 24. Profit increased by 24% to Rs. 14,367 crores. This strong performance is backed by a 14% growth in our loan portfolio while retaining a strong asset quality.  Our Net NPA levels reduced from 1.07% in previous financial year to 0.85% currently.

Maximizing shareholder value remains a priority. Today, the final dividend of Rs. 2.50 per share has been proposed by the Board. With this, the total dividend for FY’24 would be Rs. 13.50 per share.

Beyond financials, PFC leads India's clean energy push. Our renewable loan portfolio grew 25% year on year to over Rs. 60,000 crores, solidifying our position as the leading renewable lender in India.

Looking ahead, PFC sees exciting growth in power and infrastructure, and is positioned to be a proactive partner in India's future development.

Friday, 10 May 2024

Go Digit General Insurance Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, May 15, 2024, sets price band at ₹258 to ₹272 per Equity Share

 


Go Digit General Insurance Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, May 15, 2024, sets price band at ₹258 to ₹272 per Equity Share

 

Mumbai, May 10, 2024: Bengaluru-based Go Digit General Insurance Limited is one of the leading digital full-stack insurance companies founded in 2017 by insurance veteran Kamesh Goyal has fixed the price band at ₹258 to ₹272 per equity share for its initial public offer.  The Initial Public Offering (“IPO” or “Offer”) of the Company will open on Wednesday, May 15, 2024, for subscription and close on Friday, May 17, 2024. Investors can bid for a minimum of 55 Equity Shares and in multiples of 55 Equity Shares thereafter.

The Offer with a face value of ₹10 per Equity Share is a mix of fresh issue of Rs 1,125 crore and an offer for sale up to 54.77 million equity shares by Promoters and Other Selling Shareholders.

Go Digit has an end-to-end digital capability and a digital-first approach across customers’ insurance value chain. According to the RedSeer Report for the nine months ended December 31, 2023, and Financial Year 2023, the Company catered for approximately 82.5% (equating to ₹ 66.80 billion) and 82.1% (equating to ₹ 72.43 billion), respectively, of the GWPs written by the digital full-stack insurance players which include Acko and Navi, making it the largest digital full-stack insurance player in India. The Company offers motor insurance, health insurance, travel insurance, property insurance, marine insurance, liability insurance, and other insurance products, according to the needs of the customers. For the nine months ended December 31, 2023 motor insurance contributed 61.1% of the GWP.

As of December 31, 2023, there were 43.26 million customers or people availing insurance benefits under various policies issued by the company since the inception of its insurance operations in 2017.

According to the RedSeer Report, Go Digit's GWP per employee for each of the nine months ended December 31, 2023, and Financial Year 2023 is highest compared to the average GWP per employee for non-life insurance companies in India demonstrating better operational efficiency compared to other general insurance companies in India.

Go Digit launched 74 active products across all business lines. As of the nine months ended December 31, 2023, and Financial Year 2023, it had a market share of approximately 6.0% and 5.4%, respectively, in the motor insurance segment one of the largest non-life insurance segment in India, according to the RedSeer Report.

The company has an established track record of delivering growth. GWP increased from ₹ 5,267.63 crore in Financial Year 2022 to ₹ 7,242.99 crore in Financial Year 2023, an increase of 37.5%, primarily due to an increase in GDPI from motor insurance, health insurance and personal accident insurance. The company has maintained an adequate capital position with a solvency ratio of 1.78 times and 1.60 times as of March 31, 2023, and December 31, 2023, respectively, compared to the IRDAI level minimum solvency ratio guidance of 1.50 times. The policies issued for fiscal 2023 stood at 10.63 million against 7.76 million in fiscal 2022. For the nine months ended 31 December, 2023, policies issued stood at 8.46 million. The Company's AUM increased from Rs 9,393.87 crore in Financial Year 2022 to Rs 12,668.36 crore in Financial Year 2023, an increase of 34.9%, primarily due to an increase in GWP and additional capital infusion from share issuances. For the nine months ended December 31, 2023, AUM stood at 14,909.01 crore. The GDPI increased from ₹ 4,673.94 crore in the Financial Year 2022 to ₹ 6,160.01 crore in the Financial Year 2023, an increase of 31.8%. For the nine months ended December 31, 2023, GDPI stood at ₹ 5,970.53 crore.

The Offer is being made through the Book Building Process, wherein at least 75% of the Offer shall be allocated to Qualified Institutional Buyers, not more than 15% of the Offer shall be available for allocation on a proportionate basis to Non-Institutional Bidders and not more than 10% of the Offer shall be available for allocation to Retail Individual Bidders.

ICICI Securities Limited, Morgan Stanley India Company Private Limited, Axis Capital Limited, HDFC Bank Limited, IIFL Securities Limited, and Nuvama Wealth Management Limited and Link Intime India Private Limited is the registrar to the Offer. The Equity Shares are proposed to be listed on BSE and NSE.

Notes for Reference:

Issue Size of the IPO based on the upper and lower end of the price band

 

Fresh  

OFS (54,766,392 equity shares)

Total

Lower Band (@Rs 258)

Rs 1,125 crore

Rs 1,412.97 crore

Rs 2,537.97 crore

Upper Band (@Rs 272)

Rs 1,125 crore

Rs 1,489.65 crore

Rs 2,614.65 crore

 

Tuesday, 7 May 2024

जागतिक मातृदिनानिमित्त कविसंमेलन दादर येथे संपन्न मराठी साहित्य व कला सेवा आणि शोध आनंदाचा फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम

 


जागतिक मातृदिनानिमित्त कविसंमेलन दादर येथे संपन्न 


मराठी साहित्य व कला सेवा आणि शोध आनंदाचा फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : नातेसंबंधांना जिच्यामुळे परिसस्पर्श लाभतो ती म्हणजे "आई". जगातलं सर्वोच्च आदराचं आणि परमपवित्र स्थान म्हणजे "आई". प्रेमाच्या अथांग सागरात लेकरांच्या अगणित चूका किंवा अक्षम्य अपराध पोटात सामावून घेणारी व्यक्ती म्हणजे "आई". ह्याच आईवर अगणित वेळा लिहिलं गेलं आहे आणि यापुढेही लिहिले जाईल. आईबद्दलच्या आपल्या भावना मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर येथून आलेल्या निवडक निमंत्रित सारस्वतांनी दादर येथील राजा शिवाजी विद्यालयात आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.


"मराठी साहित्य व कला सेवा" आणि "शोध आनंदाचा फाऊंडेशन" यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीय कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी मुंबईतील प्रथितयश कवयित्री सीमा विश्वास मळेकर ह्या विराजमान होत्या. त्यांचे शाल, शब्दगुच्छ अर्थात पुस्तक आणि सन्मानचिन्ह देऊन कवयित्री वैभवी गावडे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. त्यावेळी शोध आनंदाचा फाऊंडेशनचे अध्यक्ष नितीन सुखदरे, सचिव सनी आडेकर आणि मराठी साहित्य व कला सेवाचे संस्थापक अध्यक्ष गुरुदत्त वाकदेकर हेदेखील उपस्थित होते.


कविसंमेलनामध्ये स्वाती हेमंतकुमार शिवशरण, बालकवी वेदान्त यशवंत पंडित, विक्रांत मारूती लाळे, प्रसाद यशवंत कोचरेकर, वैभवी विनीत गावडे, गौरी यशवंत पंडित, जयश्री हेमचंद्र चुरी, संतोष धर्मराज मोहिते, शैलेश भागोजी निवाते, कल्पना दिलीप मापूसकर, शितलादेवी सुनिल कुळकर्णी, आदित्य प्रदीप भडवळकर, किशोरी शंकर पाटील, सुनिता पांडुरंग अनभुले, सरोज सुरेश गाजरे, अशोक नार्वेकर आणि कविसंमेलनाच्या आयोजनाचा महत्त्वाचा भाग असलेले सनी आडेकर यांनी पहिल्या सत्रामध्ये जागतिक मातृदिनानिमित्त आपल्या सुंदर रचना सादर केल्या आणि उपस्थितांनी त्यांना टाळ्यांच्या गजरात दादही दिली. मध्यंतरामध्ये शितलादेवी कुळकर्णी यांनी एक प्रहसन सादर करून उपस्थितांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं. चहा अल्पोपहाराचा आस्वाद घेतल्यानंतर सगळेच कवी पुन्हा कविता सादरीकरणासाठी सज्ज झाले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सर्व कवींनी आपल्या आवडीची कविता सादर करून सभागृह भारून टाकले.   

कविसंमेलनच्या अध्यक्षपदी विराजमान असलेल्या सीमा विश्वास यांनी देखील आपल्या दोन रचना सादर केल्या. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना त्यांनी मराठी साहित्य व कला सेवा आणि शोध आनंदाचा फाऊंडेशन यांच्या आयोजकांच्या कार्याची दखल घेतली. त्या आपल्या मनोगतामध्ये पुढे म्हणाल्या, "आपण सर्व कवी नेहमीच सुंदर रचना सादर करण्याचा प्रयत्न करतो, यावेळीही सर्वांच्याच रचना खूप सुंदर होत्या. पण मला बालकवी वेदान्तचे खूप कौतुक करावेसे वाटते कारण त्याच्या कविता तर छान असतातच पण ह्या वयात त्याला कविता सुचतात हीच फार कौतुकाची गोष्ट आहे. वेदांत, तुला माझ्याकडून खूप खूप प्रेमळ शुभेच्छा आणि हे कवीपण असेच कायम जप आणि 'बाळाचे पाय पाळण्यात दिसतात' या उक्तीप्रमाणे नक्किच मोठेपणी या क्षेत्रात तू आपला वेगळा ठसा उमटवशील असा आमच्या सर्वांकडूनच तुला आशिर्वाद आहे." मनोगताच्या अखेरीस आयोजकांनी सुरू केलेली ही वाटचाल प्रगतीचे शिखर गाठू दे, अशी प्रार्थना करून आभार मानले.
 
कार्यक्रमाची सांगता करताना 'मराठी साहित्य व कला सेवा' आणि 'शोध आनंदाचा फाऊंडेशन' यांच्या वतीने सर्व सारस्वतांना सहभाग सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. 

जून महिन्याच्या पहिल्या रविवारी पुढचे मासिक कविसंमेलन होणार असून त्याच्या अध्यक्षपदी अष्टपैलू साहित्यिक कल्पना मापूसकर यांची निवड करण्यात आली. कविसंमेलनाचे समयोचित सूत्रसंचालन गुरुदत्त वाकदेकर यांनी केले.

कविसंमेलन यशस्वी करण्यासाठी नितीन सुखदरे, सनी आडेकर, शैलेश निवाते, विक्रांत लाळे आणि गुरुदत्त वाकदेकर यांनी अथक परिश्रम घेतले.

Plant based Specialty Products and Ingredients Solutions Company, Sanstar Limited, gets SEBI nod to float IPO

 Plant based Specialty Products and Ingredients Solutions Company, Sanstar Limited,  gets SEBI nod to float IPO


Ahmedabad based Sanstar Limited (“Sanstar” or “the Company”), one of the major manufacturers of Plant-based Specialty Products and Ingredient Solutions in India for Food, Animal Nutrition, and Industrial Applications filed its DRHP dated January 01, 2024 with SEBI and has received capital markets regulator SEBI's nod on April 30, 2024 to launch Initial Public Offering (IPO). 


Sanstar exports to over 45 countries across Asia, Americas, Europe and Oceania, Middle East and Africa and derives more than 30% of the revenue from exports. Notably, the Kutch facility of the Company is registered with United States Food and Drug Administration (USFDA). The manufacturing facilities of the Company are spread across cumulative land area of approximate 245 acres (~11 million square feet) with ample scope for expansion. During FY 2023, on a Consolidated basis, the Company generated ₹ ~1,180 crores of revenue, ~73 cores of EBITDA and ~ 42 crores of Profit After Tax (PAT) while ROE and ROCE were ~28% and 24% respectively. Revenue, EBITDA and PAT have grown at a CAGR of ~57%, ~39% and ~71% respectively during FY21-FY23, on a Standalone basis.


Speciality products and ingredient solutions add taste, texture, nutrients and increased functionality to food, animal nutrition and industrial products, as ingredients, thickening agents, stabilizers, sweeteners, emulsifiers, additives nutritional ingredients, disintegrants, excipients, supplements, coating agents, binders, smoothing & flattering agents, finishing agents, among others.


The IPO comprises Fresh Issue of upto 40 million shares and an Offer for Sale of upto 8 million shares by the selling shareholders. 


Sanstar has an installed capacity of 1,100 tons per day through its two manufacturing facilities at Dhule in Maharashtra and Kutch in Gujarat. Sanstar is promoted by two generations of the Promoters having cumulative experience of over 6 decades in the industry. To tap the next phase of the growth, the Company is in the process of expanding the capacity at Dhule facility on the existing land which is expected to increase 1,000 tons per day in capacity.


The Fresh Issue proceeds (or “Net Proceeds”) would be utilised for funding the capital expenditure requirement for expansion of the Dhule facility and repayment and/or pre-payment of certain borrowings. 


Pantomath Capital Advisors Private Limited is the sole Book Running Lead Manager. Company’s equity shares are proposed to be listed on the BSE and NSE.

Monday, 6 May 2024

"शिव उद्योग स्वराधिश १.० कराओके राज्यस्तरीय स्पर्धा"


"शिव उद्योग स्वराधिश १.० कराओके राज्यस्तरीय स्पर्धा"

शिव उद्योग संघटना आणि मराठी साहित्य व कला सेवा देणार नवोदित गायकांना संधी

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : प्रत्येकाच्या हाताला काम हा एकच ध्यास घेऊन देशात कार्यरत असणारी "शिव उद्योग संघटना" आणि मराठी साहित्य आणि कला क्षेत्रात नवोदितांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी कार्यरत असणारी "मराठी साहित्य व कला सेवा" यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरातील गायकांसाठी एक सर्वोत्तम संधी अर्थात "शिव उद्योग स्वराधिश १.० कराओके राज्यस्तरीय स्पर्धा" जाहीर करण्यात आली आहे.


तीन फेर्‍यांमध्ये रंगणाऱ्या ह्या स्पर्धेसाठी १६ ते ५० वयोगटातल्या स्पर्धकांना सहभाग नोंदवता येईल. नावनोंदणीची अंतिम तारीख २५ मे २०२४ आहे. स्पर्धा शुल्क ₹३००/- आहे. स्पर्धेची अंतिम फेरी मुंबई येथे १३ जुलै २०२४ होणार आहे. स्पर्धेच्या विजेत्यांना रोख रकमेसोबतच, आकर्षक सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी गुरुदत्त वाकदेकर ९९८७७४६७७६ ह्या क्रमांकावर संपर्क साधू शकता.


Saturday, 4 May 2024

*मुंबईत रविवारी रात्रीपर्यंत समुद्राच्या उंच लाटा; महानगरपालिकेने दिला इशारा*



*मुंबईत रविवारी रात्रीपर्यंत समुद्राच्या उंच लाटा; महानगरपालिकेने दिला इशारा*


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : बृहन्मुंबई महानगरपालिकेने शनिवारी एक सावधानतेचा इशारा दिला आहे. ज्यामध्ये रविवारी संध्याकाळपर्यंत कायम राहणाऱ्या भरतीमुळे लोकांना अरबी समुद्रात जाण्यापासून परावृत्त करण्याचा सल्ला दिला.


नागरी संस्थेने सांगितले की, भारतीय हवामान विभाग आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन  नुसार, शनिवार सकाळी ११:३० ते रविवारी रात्री ११:३० वाजेपर्यंत समुद्रात "लाटांच्या लाटा" दिसून येतील. या कालावधीत, लाटांची उंची ०.५ ते १.५ मीटरने वाढण्याची अपेक्षा आहे.


महानगरपालिकेने मच्छीमारांनाही परिस्थिती लक्षात घेता आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. 

महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी नागरी अधिकाऱ्यांना पोलिसांच्या सहकार्याने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय, शहरातील समुद्रकिनाऱ्यांवर तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना लोकांना पाण्यात जाण्यापासून रोखण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Thursday, 2 May 2024

'जुनं फर्निचर' चित्रपटाच्या संपूर्ण टीमने केली धमाल; 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' शोचा प्रोमो रिलीझ

 




'जुनं फर्निचर' चित्रपटाच्या संपूर्ण टीमने केली धमाल; 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' शोचा प्रोमो रिलीझ 

“हसताय ना मंडळी? हसायलाच पाहिजे!” असे म्हणत प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडणारा अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक डॉ. निलेश साबळे त्याचा नवीन शो 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' कलर्स मराठीवर आपल्या रसिकांसाठी घेऊन आला आहे.


गेल्या अनेक दिवसांपासून या नव्या शोचे बरेच प्रोमोज, व्हिडिओज आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळत होते. तेव्हापासूनच या शोची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये ओंकार भोजने व भाऊ कदम यांच्या विनोदावर ‘बाईपण भारी देवा' या चित्रपटाची संपूर्ण टीम खळखळून हसली.

नुकताच या शोचा दुसरा प्रोमो रिलीझ झाला असून या नवीन प्रोमोत निलेश साबळे व भाऊ कदम यांच्या विनोदावर महेश मांजरेकरांसह जुनं फर्निचर चित्रपटाची संपूर्ण टीम एन्जॅाय करताना दिसत आहे. इतकंच नाही तर, चित्रपटाच्या संपूर्ण टीमने चांगलीच धमाल, मजामस्ती केल्याचे व्हिडिओत पाहायला मिळत आहे. निलेश साबळेंचे प्रश्न आणि रोहितच्या उत्तरांवर उपेंद्र लिमेय अन् सचिन खेडेकर लोटपोट हसत आहेत. त्यामुळे एकंदरीत या मंचावरती संपूर्ण टीम धमाल करणार असल्याचे दिसून येतेय.

‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’च्या या नवीन प्रोमोला चाहत्यांनीही लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला. रसिकवर्ग आता पुढच्या एपिसोडची आतुरतेने वाट पाहात आहेत. निलेश साबळेंचा नवीन शो प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरलेला दिसत आहे. 

‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या शोचे लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन डॉ. निलेश साबळे करत आहेत.  तर भाऊ कदम, ओंकार भोजनेबरोबरच सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम व रोहित चव्हाण आदी कलाकारांचा समावेश आहे. कलर्स मराठीवर शनिवार-रविवार रात्री नऊ वाजता हा कार्यक्रम पाहायला मिळणार.