Monday, 3 March 2025
नालासोपाऱ्यात जय हनुमान क्रिकेट संघाच्या टर्फ अंडर आर्म लीग स्पर्धेचा थरार!
Friday, 28 February 2025
मराठी साहित्य समृद्ध आहेच, वाचनाने स्वतःलाही समृद्ध बनवा - प्राचार्य डॉ. अर्चना पत्की
मराठी साहित्य समृद्ध आहेच, वाचनाने स्वतःलाही समृद्ध बनवा - प्राचार्य डॉ. अर्चना पत्की
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती मणिबेन एम. पी. शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालय व श्री एम. पी. शाह कला आणि वाणिज्य महिला कनिष्ठ महाविद्यालयाच्या मराठी विभाग, राष्ट्रीय सेवा योजना आणि श्री जी. ओ. शाह ग्रंथालयाच्या संयुक्त विद्यमाने २७ फेब्रुवारी २०२५ रोजी ‘मराठी भाषा गौरव दिन’ विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्राचार्य डॉ. अर्चना पत्की यांनी ‘मराठी साहित्य समृद्ध आहेच, वाचनाने स्वतःलाही समृद्ध बनवा’ या विषयावर विद्यार्थिनींशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, "आपल्या भाषेची श्रीमंती आपणच वाढवली पाहिजे. त्यासाठी अगदी लहान-लहान गोष्टींपासून सुरुवात करावी. अनेक पुस्तकांचा आढावा घेताना ‘मन में है विश्वास’ या पुस्तकाने कसे भारावून टाकले, हे विद्यार्थिनींनी आपल्या स्वानुभवातून मांडले."
कार्यक्रमाची सुरुवात ‘महाराष्ट्र गीताने’ झाली. कवीवर्य कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थिनींनी ‘म...मराठीचा’ हे पथनाट्य सादर केले.
साताऱ्यावरून विशेष उपस्थित असलेले डबिंग कलाकार गणेश चिंचकर यांनी विद्यार्थिनींना मराठीत करिअरच्या संधी समजावून सांगितल्या आणि आवाजाच्या गमतीजमती उलगडून दाखवल्या. उपप्राचार्य डॉ. अवनिश भट्ट यांनी सर्वांना ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या शुभेच्छा दिल्या.
ग्रंथालयाच्या गायत्री हार्डीकर यांनी कुसुमाग्रजांच्या साहित्याचा व मराठी भाषेच्या अभिजाततेचा आढावा घेत वाचनवृद्धीवर विद्यार्थिनींशी संवाद साधला. कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रा. संगीता सिंग यांनी विंदा करंदीकरांची ‘नजर रोखून नजरेमध्ये’ ही कविता सादर केली.
प्रा. किरण जाधव यांनी विदर्भी भाषेतील प्रहसन सादर केले, तर डॉ. हिरालाल भोसले यांनी धनंजय कीर लिखित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या चरित्रात्मक पुस्तकाच्या वाचनाने स्वतःमध्ये कसा बदल घडला, हे विद्यार्थिनींसमोर मांडले.
डॉ. माधवी साठये यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भाषाशुद्धी चळवळीचा आढावा घेत पर्यायी मराठी शब्दांविषयी माहिती दिली तसेच ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकातील विचार मांडले.
मानसशास्त्र विभागाच्या वेदश्री भागवत यांनी अनेक पुस्तकांचा आढावा घेत आपल्या स्वरचित कवितेचे सादरीकरण केले. प्रा. शरद गिरमकर यांनी विश्वास पाटील लिखित ‘संभाजी’ आणि ‘पानिपत’ या ऐतिहासिक कादंबऱ्यांचे सखोल विश्लेषण केले.
प्रा. प्रशांत देशपांडे यांनी सदानंद देशमुख लिखित ‘बारोमास’ कादंबरीचा आढावा घेतला. काही विद्यार्थिनींनीही आपल्या कविता सादर केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रश्मी शेटये-तुपे, प्रा. नेहा भोसले आणि प्रा. सुप्रिया शिंदे यांनी केले. ग्रंथालयाच्या ग्रंथपाल अश्विनी प्रभू यांनी समारोपप्रसंगी आपली भूमिका मांडली तसेच ग्रंथालयाने मराठी कवितासंग्रहाचे प्रदर्शनही आयोजित केले होते. सदर कार्यक्रमात प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
रक्तदान : जीवनदानाची अनमोल भेट!
रक्तदान : जीवनदानाची अनमोल भेट!
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) मुंबई शाखेच्या वतीने इनर व्हॉईस सोशल वेलफेअर फाऊंडेशन, आंतरराष्ट्रीय महावीर क्लब आणि नायर रुग्णालय रक्तपेढी यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्टेशन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि एकूण १२० युनिट्स रक्त संकलित करण्यात आले.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी आयएमए मुंबई शाखेचे सन्माननीय सचिव डॉ. प्रागजी वाजा आणि रक्तदान समितीचे अध्यक्ष डॉ. पंकज बंदरकर उपस्थित होते. रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करताना डॉ. वाजा म्हणाले, "रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. समाजातील प्रत्येक जबाबदार नागरिकाने नियमित रक्तदान करून या कार्यात सहभाग घ्यावा."
शिबिरात युवक-युवती, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, डॉक्टर, पोलिस कर्मचारी आणि रेल्वे प्रवाशांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. काही जणांनी पहिल्यांदाच रक्तदान केले, तर काही नियमित रक्तदात्यांनी या कार्यात आपला सक्रिय सहभाग नोंदवला.
नायर रुग्णालय रक्तपेढीचे तज्ज्ञ डॉक्टर म्हणाले, "अनेक रुग्णालयांमध्ये अपघातग्रस्त, कर्करोगग्रस्त, शस्त्रक्रियेसाठी दाखल रुग्ण आणि थॅलेसिमियासारख्या आजारांनी ग्रस्त रुग्णांना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज असते. त्यामुळे रक्तदान हा समाजासाठी एक अत्यंत आवश्यक आणि महत्त्वपूर्ण उपक्रम आहे."
आयएमए मुंबई शाखेने अशा प्रकारच्या रक्तदान शिबिरांचे नियमित आयोजन करण्याचा निर्धार केला आहे. या उपक्रमातून रक्तदान चळवळ अधिक व्यापक करण्याचा उद्देश आहे. अनेकदा गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळत नाही, त्यामुळे या समस्येवर मात करण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणावर रक्तदान करावे, असे आवाहन डॉ. प्रागजी वाजा यांनी केले.
शिबिर संपल्यानंतर रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. रक्तदान केल्यानंतर अनेक दात्यांनी समाधान व्यक्त करताना सांगितले की, "आपल्या एका छोट्या कृतीमुळे कुणाचे तरी प्राण वाचू शकतात, ही जाणीव खूप आनंद देणारी आहे."
समाजातील प्रत्येक जबाबदार नागरिकाने वर्षातून किमान एकदा रक्तदान करण्याचा संकल्प करावा आणि गरजू रुग्णांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले. "रक्तदान करा, जीवनदान द्या!" हा संदेश देत, या उपक्रमाचा समारोप करण्यात आला.
Monday, 3 February 2025
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे त्याची पत्नीच श्रेष्ठ - आमदार डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे त्याची पत्नीच श्रेष्ठ - आमदार डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : प्रत्येक यशस्वी पुरुषामागे त्याच्या पत्नीचे योगदान महत्त्वाचे ठरते, असे म्हणतात, तेच खरे आहे, कारण ख्रिस्तीवासी शाहीर प्रभाकर रामचंद्र साळवी यांचा मरणोत्तर गुणगौरव त्यांच्या पत्नीच्या जन्मदिनी होत आहे, हा अलौकिक आणि अपूर्व योग आहे. शाहीर प्रभाकर साळवी यांच्या पश्चात श्रीमती शारदा साळवी यांनी अनेक कौटुंबिक अडचणी झेलत परिवाराला सुखाचे जीवन प्राप्त करुन दिले. सामाजिक जडणघडणीत दिव्याप्रमाणे त्या अहोरात्र जळत राहिल्या, अशा शब्दांत आमदार डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड यांनी श्रीमती शारदा यांचा ८० व्या जन्मदिनी गुणगौरव केला.
शाहीर साबळे, अमरशेख आणि शाहीर खामकर यांच्या पिढीतील ख्रिस्तीवासी शाहीर प्रभाकर साळवी यांनी लोककला जोपासताना सामाजसेवेचे व्रत पूर्ण केले, म्हणूनच त्यांना ख्रिस्ती समाजाच्या वतीने मरणोत्तर समाज भूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे. तो मानाचा पुरस्कार त्यांच्या पत्नी शारदा प्रभाकर यांच्या ८० व्या वाढदिवसाच्या औचित्याने आमदार डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शारदा प्रभाकर साळवी यांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन करण्यात आले.
आमदार डॉ. ज्योती गायकवाड ख्रिस्तीवासी शाहीर प्रभाकर साळवी यांच्या स्मृतींना उजाळा देताना म्हणाल्या, शाहीर प्रभाकर साळवी यांनी शाहिरी लोककले बरोबर माणूसपण जपले, म्हणूनच त्यांचे मोठेपण समाजात कायम राहीले.
कार्यक्रमाला शाहिरी लोककला मंचचे अध्यक्ष शांताराम चव्हाण, कोषाध्यक्ष ज्येष्ठ संगीतकार महादेव खैरमोडे, ज्येष्ठ लेखक, पत्रकार काशिनाथ माटल उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फादर सॅमसन बळीद होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बेंजामिन काकडे यांनी केले. सुधीर प्रभाकर साळवी यांनी उपस्थितांचे आभार मानले. विल्सन शिंदे, संदेश उन्हावणे, संदेश सांगळे, अरुण थोरात, सुमित पटेकर, फिलिप बळीद, अनुश थोरात आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला प्रतिष्ठीत समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साहित्यक्षेत्रात सर्वांनी प्रामाणिकपणे काम करूया - विक्रांत लाळे 'मराठी साहित्य व कला सेवा' आणि 'शोध आनंदाचा फाऊंडेशन' यांची अविरत साहित्य सेवा
साहित्यक्षेत्रात सर्वांनी प्रामाणिकपणे काम करूया - विक्रांत लाळे
'मराठी साहित्य व कला सेवा' आणि 'शोध आनंदाचा फाऊंडेशन' यांची अविरत साहित्य सेवा
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : "साहीत्यक्षेत्रात आपण सर्वांनी प्रामाणिकपणे कार्य करूया. आणि प्रामाणिकपणे कार्य करणार्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहूया. यश आज ना उद्या मिळणार हे नक्की. तसेच योग्यवेळी योग्य सत्कार देखील होणार हे ही नक्कीच. फक्त सातत्य ठेवा, निष्ठा ठेवा, जोवर तुमच्या मनाला खात्री होत नाही तोवर चांगलं नि छान असे लिहिण्याचा प्रयत्न करत रहा, विहिरीत उडी मारल्याशिवाय जसे पोहता येत नाही, तसेच संमेलनाला कार्यक्रमाला गेल्याशिवाय, इतर कवींच्या कवयित्रींच्या कविता नि सादरीकरणाचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला छानसे लिखाण आणि नीटनेटके सादरीकरण करता येणार नाही." अशा भावना आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विक्रांत मारुती लाळे यांनी व्यक्त केल्या. 'मराठी साहित्य व कला सेवा' आणि 'शोध आनंदाचा फाऊंडेशन' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ११व्या कविसंमेलनाच्या निमित्ताने ते बोलत होते. सारस्वतांनी तयार केलेल्या उत्तम रचनांचा आस्वाद घेत, एकमेकांना दाद देत तर वेळप्रसंगी हास्याचे फवारे उडवत मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर येथून आलेल्या निवडक निमंत्रित सारस्वतांनी दादर येथील राजा शिवाजी विद्या संकुलात उत्तमोत्तम रचनांचा नजराना सादर केला.
"मराठी साहित्य व कला सेवा" आणि "शोध आनंदाचा फाऊंडेशन" आयोजित कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी विक्रांत लाळे यांचे ज्येष्ठ कवी प्रफुल अनंत साने यांच्या हस्ते तसेच 'शोध आनंदाचा फाऊंडेशन'चे अध्यक्ष नितीन सुखदरे आणि 'मराठी साहित्य व कला सेवा'चे संस्थापक अध्यक्ष गुरुदत्त वाकदेकर यांच्या उपस्थितीमध्ये सन्मानचिन्ह, मानाची शाल आणि ग्रंथभेट प्रदान करून स्वागत करण्यात आले.
कविसंमेलनाच्या पहिल्या सत्रामध्ये राहुल धोंडीराम थोरात, गौरवी प्रकाश राऊत, आश्विनी सोपान म्हात्रे, नमिता नितीन आफळे, विकास दादाजी पाटील, प्रफुल अनंत साने, पल्लवी परब, रविंद्र शंकर पाटील, मेघना दीपक सावंत, नंदा कोकाटे, संतोष कसवणकर, कल्पना दिलीप मापूसकर, सानिका ज्योतीकुमार कुपटे, अशोक (भाई) नार्वेकर, गीताश्री अनुपमा पुंडलीक नाईक, विलास सूर्यवंशी, सीमा विश्वास मळेकर, वैभवी विनीत गावडे, शितलादेवी सुनिल कुळकर्णी, नितीन अनंत सुखदरे, सनी आडेकर आणि गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांनी आपल्या सुंदर रचना सादर केल्या आणि उपस्थितांनी त्यांना टाळ्यांच्या गजरात दादही दिली. पहिल्या सत्राची शेवटची रचना कविसंमेलनाध्यक्ष विक्रांत लाळे यांनी सादर करताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
मध्यंतरामध्ये विलास सूर्यवंशी यांनी आणलेल्या अल्पोपहारासोबत वैभवी गावडे यांनी आणलेल्या तिळगुळाचा आस्वाद सर्वांनी घेतला. दुसर्या सत्रात सर्व कवींनी त्यांच्या स्वरचित विषय विरहित रचना सुंदररीत्या सादर केल्या.
संमेलनाध्यक्ष विक्रांत लाळे यांनी सादर केलेल्या कवितेला सर्वांनी मनमुराद दाद दिली. मनोगत व्यक्त करताना अध्यक्षांनी उपरोक्त विचार मांडले. नेहमीप्रमाणेच आजचा कार्यक्रम देखील दर्जेदार झाला. सर्वांच्या कविता नावीन्यपूर्ण व आशयायुक्त अशा होत्या. त्यामुळे दोन्ही ही सत्रे अगदी श्रवणीय आणि सुखदायक ठरली. नियोजन, आयोजन सर्व अगदी छान होते. आपण करत असलेली साहित्य सेवा अशीच अखंडित चालू राहो व मराठी भाषेची साहित्य संपदा वाढत राहू दे अशा शुभेच्छाही त्यांनी आयोजकांना दिल्या.
कवितांचा आस्वाद घेण्यासाठी आलेल्या दीपक सावंत, सूरज राय, सारिका अनुप कापले तसेच मुक्त व्यासपीठचे सर्वेसर्वा पंकज के. ह्यांनी कार्यक्रमा विषयी आपल्या भावना मोकळ्या केल्या. सर्वांनी कार्यक्रमासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तर संपूर्ण कार्यक्रमाचं ध्वनीचित्रमुद्रण आणि छायांकन रविंद्र पाटील यांनी केले.
कार्यक्रमाची सांगता करताना "शोध आनंदाचा फाऊंडेशन" चे अध्यक्ष नितीन सुखदरे यांनी सर्वांचे आभार मानले. 'मराठी साहित्य व कला सेवा' आणि 'शोध आनंदाचा फाऊंडेशन' यांच्या वतीने सर्व सारस्वतांना सहभाग सन्मानपत्र तसेच संमेलनाध्यक्ष विक्रांत लाळे यांनी आणलेली भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
१२वे मासिक अर्थात वर्षपूर्ती कविसंमेलन रविवार ९ फेब्रुवारी २०२५ होणार असून त्याच्या अध्यक्षपदी सकस लेखणीचा वरदहस्त लाभलेल्या नंदा कोकाटे असणार आहेत. कविसंमेलनाचे समयोचित सूत्रसंचालन गुरुदत्त वाकदेकर यांनी केले.
कविसंमेलन यशस्वी करण्यासाठी नितीन सुखदरे, विद्याधर शेडगे, सनी आडेकर, विक्रांत लाळे, रविंद्र पाटील आणि गुरुदत्त वाकदेकर यांनी अथक परिश्रम घेतले.
Thursday, 30 January 2025
ग्रामीण भागाला प्राधान्य देऊन महाराष्ट्रातील तरुणांसाठी हजारो नोकरीच्या संधी शिव उद्योग संघटनेच्या हाकेला एव्हरेस्ट फ्लीटची निर्णायक साथ
ग्रामीण भागाला प्राधान्य देऊन महाराष्ट्रातील तरुणांसाठी हजारो नोकरीच्या संधी
शिव उद्योग संघटनेच्या हाकेला एव्हरेस्ट फ्लीटची निर्णायक साथ
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबईतील कमी होत असलेल्या मराठी टक्क्यावर नियंत्रण आणण्यासाठी शिव उद्योग संघटना, एव्हरेस्ट फ्लीटच्या सहकार्याने, ग्रामीण भागावर विशेष लक्ष केंद्रित करून महाराष्ट्रातील तरुणांना हजारो नोकरीच्या संधी देत आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट राज्यातील तरुणांना रोजगार आणि निवास सुविधा प्रदान करणे आहे, त्यांना मुंबईत स्थलांतरित होण्यासाठी आणि शहराला आपलेसे करण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये रोजगार मेळावे ३१ जानेवारी ते २३ फेब्रुवारी दरम्यान नाशिक (३१ जानेवारी), छत्रपती संभाजी नगर (१ फेब्रुवारी), जालना (२ फेब्रुवारी), यवतमाळ (१० फेब्रुवारी), नागपूर (११ फेब्रुवारी), भंडारा/चंद्रपूर (१२ फेब्रुवारी), गोंदिया (१३ फेब्रुवारी), बीड (१६ फेब्रुवारी), धाराशिव (१८ फेब्रुवारी), सोलापूर (१९ फेब्रुवारी), अहिल्यानगर (२१ फेब्रुवारी)आणि पुणे (२३ फेब्रुवारी) येथे प्रत्येक जिल्ह्यात मुलाखती घेतल्या जातील. ज्यामध्ये केवळ नोकरीच्या संधीच नाहीत तर आर्थिक फायदे आणि सामाजिक आधार देखील मिळेल.
महागाई, निवास आणि रोजगार यासारख्या समस्यांमुळे मुंबई आपली मराठी ओळख गमावत आहे, या वाढत्या चिंतेला प्रतिसाद म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. राज्यातील अनेक तरुण महागाई, निवास आणि रोजगार यासारख्या समस्यांमुळे शहरात स्थलांतरित होऊ इच्छित नाहीत. ग्रामीण तरुणांना नोकरीच्या संधी मिळवण्यासाठी आणि मुंबईत स्थायिक होण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देऊन, शिव उद्योग संघटना मुंबईला अधिक समावेशक आणि वैविध्यपूर्ण शहर बनवण्याचे ध्येय बाळगते.
अधिक माहितीसाठी 9702058930 वर किंवा oneshivudyog@gmail.com वर संपर्क साधू शकतात. महाराष्ट्रातील तरुणांसाठी मुंबईतील नोकरीच्या बाजारपेठेचा फायदा घेण्याची आणि शहराला स्वतःचे बनवण्याची ही एक अनोखी संधी आहे. मुंबई आमची आहे आणि आमचीच राहिली पाहिजे, आम्हाला तिथेच रोजगार मिळाला पाहिजे आणि आता या उपक्रमामुळे ते स्वप्न प्रत्यक्षात साकारू शकते.
Sunday, 26 January 2025
मुंबईत कबड्डीचा थरार: अमर हिंद मंडळ कबड्डी स्पर्धा दणक्यात संपन्न
मुंबईत कबड्डीचा थरार: अमर हिंद मंडळ कबड्डी स्पर्धा दणक्यात संपन्न
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): २१ ते २५ जानेवारी २०२५ दरम्यान आयोजित अमर हिंद मंडळ कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न झाली, अंतिम सामने किशोर आणि महिला गटांमध्ये खेळवण्यात आले. मुंबई शहर जिल्हा कबड्डी असोसिएशनने मान्यता दिलेल्या या स्पर्धेत मुंबईतील एकूण ३८ वरिष्ठ संघांनी भाग घेतला, ज्यात ८ महिला संघ आणि ३० किशोर संघांचा समावेश होता.
किशोर गटात, विजय क्लब दादर विजेता ठरला, त्यांना रोख ७,००० रुपये रोख बक्षीस आणि चषक प्रदान करण्यात आला. अंतिम उपविजेता संघ, न्यू परशुराम क्रीडा मंडळ काळाचौकी यांना ४,००० रुपये रोख बक्षीस आणि चषक प्रदान करण्यात आला. तसेच वैयक्तिक बक्षिसे देखील देण्यात आली, ज्यामध्ये समर्थ कासुरडे याला अष्टपैलू खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले आणि त्याला चषक आणि २००० रुपये रोख बक्षीस देण्यात आले. रोहित चौगुले याला उत्कृष्ट पकड बक्षीस देण्यात आले, तर प्रेयश फुलेये याला उत्कृष्ट चढाई बक्षीस देण्यात आले, दोघांनाही १,००० रुपये रोख आणि चषक देण्यात आला.
महिला गटात, डॉक्टर शिरोडकर महिला संघाला विजेता घोषित करण्यात आले, त्यांना १०,००० रुपये रोख आणि चषक देण्यात आला. अंतिम उपविजेत्या शिवशक्ती महिला संघाला ५,००० रुपये रोख आणि चषक देण्यात आला. वैयक्तिक बक्षिसे देखील देण्यात आली, मेघा कदम यांना अष्टपैलू खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले आणि त्यांना ३००० रुपये रोख आणि बॅग प्रदान करण्यात आली. पौर्णिमा जेधे आणि धनश्री पोटले यांना अनुक्रमे उत्कृष्ट पकड आणि उत्कृष्ट चढाई बक्षिसे देण्यात आली, दोघींनाही २००० रुपये रोख आणि बॅग देण्यात आली.
या स्पर्धेचे उद्घाटन मुंबई शहर जिल्हा कबड्डी संघटनेचे सचिव माननीय विश्वास मोरे यांनी केले, त्यांनी स्पर्धकांना अतिशय रोमांचक क्रीडा स्पर्धेच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमामुळे तरुण आणि उदयोन्मुख खेळाडूंना त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी आणि अनुभवी खेळाडूंना त्यांचे सातत्य दाखवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले.
अमर हिंद मंडळ कबड्डी स्पर्धा प्रचंड यशस्वी झाली, ज्यामध्ये मुंबईतील सर्वोत्तम कबड्डीचा थरार अनुभवता आला. स्पर्धा सुव्यवस्थित नियोजित केली होती आणि तुल्यबळ संघांमध्ये स्पर्धा तीव्र झाली होती, प्रत्येक संघाने विजयी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. प्रेक्षकांनी त्यांच्या आवडत्या संघांचा खेळ पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
Thursday, 16 January 2025
IIFL Home Finance Partners with Common Services Centre (CSC) to Expand Rural Reach
Services to be launched in Andhra Pradesh, Telangana, Karnataka, Gujarat, & Madhya Pradesh in the first phase
National, 16th January 2025: IIFL Home Finance Ltd., India’s leading affordable housing finance company, announces a strategic partnership with Common Services Centre (CSC), a dedicated network of Village Level Entrepreneurs (VLEs) under the Ministry of Electronics & Information Technology (MeitY), Government of India. The collaboration aims to utilize CSC's digital platform, spanning 6 lakh CSC centers across the country to facilitate home finance queries and lead generation in different states of India.
The partnership leverages CSC's extensive network, which hosts a variety of services such as credit enablement, EMI collection, and banking services in remote locations. IIFL Home Finance foresees tremendous potential in this collaboration to extend its reach beyond Tier 1 and 2 markets, addressing the needs of customers in Tier 3, 4, and 5 locations who are underserved in terms of loan disbursement and home ownership.
Initially, IIFL Home Finance will begin disbursements under the given partnership in Andhra Pradesh, Telangana, Madhya Pradesh, Gujarat, and Karnataka, with further plans to penetrate deeper in regional markets.
Mr. Monu Ratra, ED and CEO, IIFL Home Finance, said, “Our partnership with CSC represents a significant milestone in our mission to make affordable housing accessible to every household. By partnering with CSC and leveraging its extensive pan-India network, particularly in semi-urban areas, we will significantly expand our reach. Our technology-driven processes are designed to make the home loan journey as smooth and hassle-free as possible. This collaboration reflects our dedication to financial inclusion and aligns with the government's vision of ensuring Housing for All.”
Mr. Sanjay Kumar Rakesh, MD and CEO, Common Services Centre (CSC), on the tie up adds, "Partnership with IIFL Home Finance is perfectly aligned with our mission to felicitate essential finance services within the rural belts. By integrating home finance solutions of IIFL Home Finance into our platform, we're empowering our representatives to play a crucial role in making the dream of home ownership a reality for the EWS and LIG category. Our network of 6 lakh CSC centers across 2.5 lakh Gram Panchayats will now serve as a bridge, connecting aspiring homeowners with the Company’s affordable housing solutions."
The company will offer Home Loans to start with and would further expand the bouquet of services in Tier 2, 3 and 4 markets. The initiative is not only a testament to IIFL Home Finance's commitment to financial inclusion but also aligns seamlessly with the Government of India's Pradhan Mantri Awas Yojana 2.0 (PMAY 2.0), which emphasizes "Housing for All" by providing affordable housing to the economically weaker sections of society.
By leveraging CSC's extensive network, IIFL Home Finance is poised to become the partner of choice for millions of aspiring homeowners in underserved rural markets, reinforcing its leadership in the affordable housing sector and driving forward the national agenda of inclusive growth.
Monday, 13 January 2025
सेंट जोसेफ महाविद्यालयात उद्योजकता प्रशिक्षण संपन्न
सेंट जोसेफ महाविद्यालयात उद्योजकता प्रशिक्षण संपन्न
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शनिवार, दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी ज्ञानदीप मंडळ संचलित सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय, सत्पाळा, विरार (पश्चिम) यांच्या सेल्फ फायनान्स विभागाच्या वतीने 'उद्योजकता प्रशिक्षण अर्थात Enterpreneural Talk Show' चे आयोजन करण्यात आले होते. वसई विरार मधील प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय विल्फ्रेड डिमोंटि आणि जॉय डायस यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. कविता आल्मेडा यांनी सांगितले, की उद्योगात आपण जितका जास्त धोका पत्करू तितका नफा जास्त कमवितो.
प्रसिद्ध उद्योजक विल्फ्रेड म्हणाले, "कोणताही व्यवसाय यशस्वी होण्यासाठी आणि नफा कमवण्यासाठी प्रयत्न अत्यंत महत्त्वाचे असतात. व्यवसायामध्ये संघर्ष, सातत्य आणि आत्मविश्वासाची नितांत गरज असते." सदर कार्यक्रमात बोलताना प्रसिद्ध उद्योजक जॉय डायस म्हणाले, "व्यवसायातील उज्वल यशासाठी आणि भवितव्यासाठी तुमचा जनसंपर्क दांडगा असायला हवा. प्रत्येक ग्राहकाला भगवान मानता यायला हवे." कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उद्योजकांचे स्वागत सेल्फ फायनान्स कॉर्डिनेटर डॉ. दीपा लोपीस यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सबिना कोरीया आणि आभार प्रदर्शन अलिशा तुस्कानो यांनी केले. सदर कार्यक्रमास आई क्यू एसी कॉर्डिनेटर डॉ. विन्सेंट डिमेलो, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुभाष डिसोजा आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेल्फ फायनान्स विभागाच्या सर्व प्राध्यापकांनी अथक परिश्रम घेतले.
Wednesday, 1 January 2025
लग्नाच्या आठवणींना उजाळा देणारं 'फसक्लास दाभाडे’मधील 'दिस सरले' गाणं प्रदर्शित! सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र झळकणार
लग्नाच्या आठवणींना उजाळा देणारं 'फसक्लास दाभाडे’मधील 'दिस सरले' गाणं प्रदर्शित!
सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र झळकणार
‘फसक्लास दाभाडे’ या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. ज्याने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप सोडली आहे. या चित्रपटाच्या गाण्यांना आणि टीझरला रसिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. विशेषतः ‘यल्लो यल्लो’ गाण्यावर दाभाडे कुटुंबीयांनी जल्लोष साजरा केला असून हे गाणं सोशल मीडियावर, लग्नात प्रचंड गाजत आहे. या चित्रपटात क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे, आणि राजसी भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
‘फसक्लास दाभाडे’ मधील नुकतेच लग्नाच्या आठवणींना उजाळा देणारे ‘दिस सरले’ हे गाणं सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यात लग्नातील प्रत्येक भावनिक क्षणांचा एक सुंदर कोलाज पाहायला मिळत आहे. रुखवत तयार करण्यापासून नवरीच्या पाठवणीपर्यंत प्रत्येक प्रसंग या गाण्यात उत्कृष्टपणे मांडला असून प्रत्येकाच्या मनातील भावना आणि लग्नातील हास्यविनोद दिसत आहे. विशेष म्हणजे यात मिताली मयेकर दिसत असून या चित्रपटाच्या निमित्ताने सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. यात नेमकं त्यांचा नातं काय असेल, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता आता अधिकच वाढली आहे. अमितराज यांचे संगीत लाभलेल्या या गाण्याला क्षितिज पटवर्धन यांनी शब्दबद्ध केलं आहे. तर हे गाणं हर्षवर्धन वावरे आणि आनंदी जोशी यांनी गायले आहे.
निर्माते भूषण कुमार म्हणतात," ‘दिस सरले’ हे गाणं प्रत्येक प्रेक्षकाच्या हृदयाला स्पर्श करणारे आहे. लग्नातील भावनिक क्षण आणि हास्यविनोदाची गुंफण या गाण्यात उत्तमरित्या मांडली गेली असून हे गाणं प्रत्येक प्रेक्षकाला आपल्या आयुष्यातील खास आठवणींशी नक्कीचं जोडेल, याची आम्हाला खात्री आहे.’’
निर्माते आनंद एल राय म्हणतात, "लग्नातील रुखवतापासून पाठवणीपर्यंतचा प्रत्येक क्षण ‘दिस सरले’ या गाण्यात प्रभावीपणे मांडला गेला आहे. लग्नासारख्या उत्सवातील आनंद आणि भावनांचा हा अनोखा संगम रसिकांच्या हृदयाला नक्कीच भिडेल".
दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, लग्न हे दोन जीवांच्या एकत्र येण्याचा सोहळा असतो जो एक अत्यंत भावनिक अनुभव असतो, प्रत्येक कुटुंबासाठी सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण असतो. या गाण्याच्या निमित्ताने प्रत्येक लग्नासाठी एक वैश्विक भावना तयार करण्याचा प्रयत्न आम्ही केलाय. मला खात्री आहे लग्नं झालेल्या आणि होऊ घातलेल्या प्रत्येकाला हे गाणं आपलंसं वाटणार आहे.
टी-सीरीज, कलर यल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी यांचा आगामी चित्रपट ‘फसक्लास दाभाडे’ २४ जानेवारी २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार, कृष्ण कुमार, आनंद एल राय आणि क्षिती जोग आहेत. चित्रपटाचे वितरण पॅनोरमा स्टुडिओजने केले आहे.
मापुस्कर ब्रदर्स घेऊन येत आहेत….‘एप्रिल मे ९९’ रोहन मापुस्करांचे दिग्दर्शनात पदार्पण!
मापुस्कर ब्रदर्स घेऊन येत आहेत….‘एप्रिल मे ९९’
रोहन मापुस्करांचे दिग्दर्शनात पदार्पण!
सध्या चित्रपटसृष्टीत एक नवीन चर्चा सुरू आहे. या नवं वर्षात मापुस्कर ब्रदर्स प्रेक्षकांसाठी एक खास भेट घेऊन येणार आहेत. चित्रपटसृष्टीतील अव्वल दर्जाचे दिग्दर्शक व निर्माते राजेश मापुस्कर आणि कास्टिंगच्या दुनियेतलं नावाजलेलं नाव रोहन मापुस्कर हे दोघे एक नवीन प्रकल्प घेऊन येत आहेत.
राजेश मापुस्कर यांना ‘व्हेंटिलेटर’, ‘फरारी की सवारी’, आणि अलीकडेच प्रदर्शित झालेला ‘येक नंबर’ सारख्या हिट चित्रपटांसाठी ओळखलं जातं, तर रोहन मापुस्कर यांनी प्रख्यात दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांच्यासोबत ‘लगे रहो मुन्नाभाई’ व ‘३ इडियट्स’ या चित्रपटासाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मापुस्कर ब्रदर्स ‘एप्रिल मे ९९’ हा आगामी चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने रोहन मापुस्कर दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहेत.
तर आता प्रश्न असा आहे की, चित्रपटाची कथा काय असेल? कलाकार कोण असतील? यांसारख्या अनेक गोष्टी अद्याप गोपनीय असल्या तरी या नवीन वर्षात मापुस्कर ब्रदर्स एकत्र येऊन मोठ्या पडद्यावर धमाका करणार हे नक्की!
Tuesday, 31 December 2024
Standard Glass Lining Technology Limited’s Initial Public Offering to open on Monday, January 6, 2024, price band set at ₹133/- to ₹140/- per Equity Share
Standard Glass Lining Technology Limited’s Initial Public
Offering to open on Monday, January 6, 2024, price band set at ₹133/- to ₹140/-
per Equity Share
Mumbai, December 31, 2024: Standard Glass Lining Technology Limited is one of the top five
specialized engineering equipment manufacturers for the pharmaceutical and
chemical sectors in India, in terms of revenue in Fiscal 2024, it has fixed the
price band of ₹133/- to ₹140/- per Equity Share of face value ₹10/- each
for its maiden initial public offer.
The Initial Public Offering (“IPO” or “Offer”)
of the Company will open on Monday, January 6, 2024, for subscription and
close on Wednesday,
January 8, 2024. Investors can bid for a minimum of 107 Equity
Shares and in multiples of 107 Equity Shares thereafter.
The IPO is a mix of fresh issues of up to Rs 210 crore and an
offer of sale of up to 1,42,89,367 equity shares by Promoter Selling and
Promoter Group and Other Selling Shareholders.
The proceeds from its fresh issuance to the extent of Rs 10
crore will be utilized for funding of capital expenditure requirements of the
Company towards the purchase of machinery and equipment; Rs 130 crore for
repayment or prepayment, in full or in part, of all or a portion of certain
outstanding borrowings availed by the Company and investment in its wholly
owned Material Subsidiary, S2 Engineering Industry Private Limited, for
repayment or prepayment, in full or in part, of all or a portion of certain
Outstanding borrowings availed by S2 Engineering Industry Private Limited, from
banks and financial institutions; Rs 30 crore for Investment in its wholly
owned Material Subsidiary, S2 Engineering Industry Private Limited, for funding
its capital expenditure requirements towards the purchase of machinery and
equipment; Rs 20 crore for funding inorganic growth through strategic
investments and/or acquisitions; and general corporate purposes.
Standard Glass Lining Technology’s capabilities include designing,
engineering, manufacturing, assembly, installation, and commissioning solutions
and establishing standard operating procedures for pharmaceutical and chemical
manufacturers on a turnkey basis. Its portfolio comprises core equipment used
in the manufacturing of pharmaceutical and chemical products, which can be
categorized into: Reaction Systems; Storage, Separation, and Drying Systems;
and Plant, Engineering, and Services (including other ancillary parts). It is
also one of India’s top three manufacturers of glass-lined, stainless steel,
and nickel alloy-based specialized engineering equipment, in terms of revenue
in Fiscal 2024, according to an F&S Report. It is also one of the top three
suppliers of polytetrafluoroethylene (“PTFE”) lined pipelines and fittings in
India, in terms of revenue in Fiscal 2024. It has been the fastest-growing
company in the industry, and it has operated during the past three completed
fiscals in terms of revenue.
The company possesses in-house capabilities to manufacture all
the core specialized engineering equipment required in the active
pharmaceutical ingredient (“API”) and fine chemical products manufacturing
process. Over the last decade, it has supplied over 11,000 products. Its
marquee customer base includes 30 out of approximately 80 pharmaceutical and
chemical companies in the NSE 500 index as of June 30, 2024. It operates
through its eight manufacturing facilities spread across a built-up/floor area
of over 400,000 sq. ft., strategically located in Hyderabad, Telangana, the
“Pharma Hub” of India, which accounted for 40.00% of the total Indian bulk drug
production in Fiscal 2024.
IIFL Capital Services Limited, and Motilal Oswal Investment
Advisors Limited are the book-running lead managers, and KFin Technologies Limited
is the registrar of the issue.
The Offer is being made through the book-building process,
wherein not more than 50% of the offer shall be available for allocation on a
proportionate basis to qualified institutional buyers, not less than 15% of the
offer shall be available for allocation to non-institutional investors, and not
less than 35% of the offer shall be available for allocation to retail
individual bidders.
Notes for
Reference:
Issue Size
of the IPO based on the upper and lower end of the price band
|
Fresh
Issue |
OFS (1,42,89,367 equity shares) |
Total |
Lower
Band (@Rs 133) |
Rs 210
crore |
Rs 190.05
crore |
Rs 400.05 crore |
Upper
Band (@Rs 140) |
Rs 210
crore |
Rs 200.05
crore |
Rs 410.05 crore |
-
मैत्रीचे धागे घट्ट गुंफतानाच स्वातंत्र्यदिनाचा झाला जागर "मराठी साहित्य व कला सेवा" आणि "शोध आनंदाचा फाऊंडेशन"चे दादरम...
-
प्रबोधन विद्या निकेतनमध्ये प्रवेशोत्सवाचा उत्साह मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जून महिना आला की चाहूल लागते शाळा सुरू होण्याची. पूर्वी १३ जून...